संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय ५
माझ्या आत्म्याचा आवाज ही माझ्या संपूर्ण प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला समजले का? या मुद्द्यावर अस्पष्ट असणे म्हणजे थेट मला विरोध करण्यासारखे आहे. याचे महत्त्व तुम्ही खरोखर पाहिले आहे का? मी तुमच्यावर किती मेहनत, किती ऊर्जा खर्च करतो हे तुम्हाला खरोखर माहीत आहे का? तुम्ही काय केले आहे व तुम्ही माझ्यासमोर कसे वागलात ते उघडपणे मांडण्याचे धाडस तुमच्यात खरोखर आहे का? आणि तुम्ही माझ्या तोंडावर स्वतःला माझे लोक म्हणवून घेण्याची हिंमत करता—तुम्हाला कोणतीही लाज नाही, तर्कशक्ती तर दूरच! उशिरा का होईना, तुमच्यासारख्या लोकांना माझ्या घरातून बाहेर काढून टाकले जाईल! तुम्ही माझ्यासाठी साक्ष देत आहात असे समजून माझ्यासमोर मोठेपणा करण्याचा प्रयत्न करू नका! मानवजात हे असे काही करण्यास सक्षम आहे का? जर तुझे हेतू व तुझे ध्येय यांपैकी काहीही राहिले नसते, तर तू खूप पूर्वीच वेगळ्या मार्गावर गेला असतास. मानवी हृदय किती संयम धरू शकते हे मला माहीत नाही असे तुला वाटते का? या काळापासून, सर्व गोष्टींमध्ये, तू आचरणाच्या वास्तविकतेत प्रवेश केला पाहिजेस; फक्त बाष्कळ बडबड करण्याने, जसे तू भूतकाळात केले होतेस, आता तू पुढे जाणार नाही. भूतकाळात, तुमच्यापैकी बहुतेकांनी माझ्या औदार्याचा फायदा घेण्यात यशस्वी झालात; आज तुम्ही खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम आहात हे पूर्णपणे माझ्या वचनांच्या तीव्रतेमुळे आहे. मी वायफळ आणि हेतूशिवाय बोलतो असे तुला वाटते का? अशक्य! मी उंचावरून सर्व गोष्टींकडे खाली पाहतो व उंचावरून सर्व गोष्टींवर प्रभुत्व गाजवतो. त्याचप्रमाणे, मी पृथ्वीवर माझे तारण ठेवले आहे. असा एकही क्षण नसतो जेव्हा मी पाहत नाही, मी माझ्या गुप्त स्थानावरून मनुष्यांची प्रत्येक हालचाल आणि ते जे काही बोलतात व करतात ते पाहत असतो. मनुष्यप्राणी माझ्यासाठी उघडलेल्या पुस्तकासारखे आहेत: मी त्या सर्वांना पाहतो आणि ओळखतो. गुप्त स्थान माझे निवासस्थान आहे व स्वर्गातील संपूर्ण तिजोरी म्हणजे मी ज्यावर झोपतो तो पलंग आहे. सैतानाची शक्ती माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण मी वैभव, नीतिमत्व आणि न्यायाने भरलेला आहे. माझ्या वचनांमध्ये अगम्य रहस्य आहे. जेव्हा मी बोलत असतो, तेव्हा तुम्ही नुकत्याच पाण्यात टाकलेल्या, भारावलेल्या, गोंधळलेल्या किंवा नुकत्याच घाबरलेल्या बालकांसारखे होता, त्यांना काहीच कळत नाही, कारण तुमचा आत्मा स्तब्ध झाला आहे. गुप्त स्थान हे माझे निवासस्थान आहे असे मी का म्हणतो? माझ्या वचनांचा सखोल अर्थ तुला माहीत आहे का? मनुष्यांपैकी कोण मला ओळखण्यास सक्षम आहे? ते स्वतःच्या आईवडिलांना ओळखतात तसे मला जाणून घेण्यास कोण सक्षम आहेत? माझ्या निवासस्थानात विश्रांती घेत असताना, मी जवळून निरीक्षण करतो: पृथ्वीवरील सर्व लोक केवळ त्यांच्या नशिबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी, “जगभर प्रवास” करतात व मागेपुढे धावत असतात. मात्र माझे राज्य निर्माण करण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढी उर्जा एकाही व्यक्तीकडे नाही, श्वास घेण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतात तेवढीही नाही. मी मनुष्याला निर्माण केले आहे आणि मी त्यांना अनेक वेळा यातनांमधून मुक्त केले आहे; तथापि, ही सर्व मनुष्यप्राणी कृतघ्न आहेत: त्यांच्यापैकी एकही माझ्या तारणाच्या सर्व घटना मोजण्यास सक्षम नाही. जगाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत इतकी वर्षे, अनेक शतके झाली आहेत; मी अनेक चमत्कार केले आहेत व माझे शहाणपण अनेक वेळा प्रकट केले आहे. तरीसुद्धा, मनुष्यप्राणी मानसिकदृष्ट्या आजारी लोकांसारखेच विकृत आणि सुन्न झालेले आहेत व काहीवेळा माझ्या गोष्टींकडे लक्ष न देता, जंगलात फिरणाऱ्या श्वापदांप्रमाणे आहेत. अनेक वेळा, मी मनुष्यांना देहदंड दिला आहे आणि त्यांना मृत्यूसाठी शिक्षा केली आहे, परंतु माझी व्यवस्थापन योजना कोणीही बदलू शकत नाही. आणि म्हणूनच, माझ्या हातात, मनुष्य ज्या जुन्या गोष्टींना चिकटून राहतात ते उघड करत राहतात. माझ्या कार्याच्या टप्प्यांमुळे, मी पुन्हा एकदा तुम्हाला, ज्यांचा जन्म एका मोठ्या नीच, भ्रष्ट, मलीन व विकृत कुटुंबात झाला आहे, त्यांना वाचवले आहे.
माझे नियोजित कार्य क्षणभरही न थांबता पुढे सुरू राहते. राज्याच्या युगात गेल्यानंतर आणि माझे लोक म्हणून तुम्हाला माझ्या राज्यात घेऊन गेल्यानंतर, माझ्या तुमच्याकडे इतर मागण्या असतील; याचा अर्थ असा, की मी तुमच्यासमोर ते संविधान लागू करण्यास सुरुवात करेन ज्याने मी या युगाचे शासन करेन:
तुम्हाला माझे लोक म्हटले जात असल्यामुळे, तुम्ही माझ्या नावाचा गौरव करण्यास सक्षम असले पाहिजे; म्हणजेच, कसोटी दरम्यान साक्ष दिली पाहिजे. जर कोणी माझी खुशामत करण्याचा व माझ्यापासून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या पाठीमागे अप्रतिष्ठित व्यवहारात गुंतले, तर कोणताही अपवाद न वगळता अशा लोकांना, माझ्या घरातून हाकलून बाहेर काढले जाईल, ते मला सामोरे जाण्याची वाट पाहतील. जे भूतकाळात माझ्याशी अविश्वासू राहिले आणि पुत्रासारखे राहिले नाहीत व जे आज पुन्हा उघडपणे माझा न्याय करण्यासाठी उठले आहेत—त्यांनादेखील माझ्या घरातून हाकलून दिले जाईल. जे माझे लोक आहेत त्यांनी सतत माझ्या ओझ्यांचा विचार केला पाहिजे आणि माझी वचने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी अशा लोकांनाच ज्ञानाने प्रकाशित करेन व ते माझ्या मार्गदर्शनाखाली आणि ज्ञानप्राप्तीत जगतील, त्यांना कधीही ताडणाला सामोरे जावे लागणार नाही. जे माझ्या ओझ्यांचा विचार करण्यात अयशस्वी होऊन, त्यांच्या स्वतःच्या भविष्यासाठी नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित करतात—म्हणजेच, जे त्यांच्या कृती माझ्या हृदयाला संतुष्ट करण्याच्या उद्देशाने करत नाहीत, तर ते आयत्या मिळालेल्या गोष्टींच्या शोधात राहतात—या भिकाऱ्यासारख्या प्राण्यांना वापरणे मी पूर्णपणे नाकारतो, कारण त्यांचा जन्म झाल्यापासून कधीही, त्यांना माझ्या ओझ्यांचा विचार करणे म्हणजे काय हे माहीत नव्हते. ते असे लोक आहेत ज्यांच्यामध्ये सामान्य तर्कशक्तीचा अभाव आहे; असे लोक मेंदूच्या “कुपोषणाने” ग्रस्त आहोत व त्यांना काही “पोषणासाठी” घरी जावे लागते. अशा लोकांचा मला काही उपयोग नाही. माझ्या लोकांमध्ये, प्रत्येकाने मला ओळखणे हे शेवटपर्यंत अनिवार्य कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे, जसे की खाणे, वस्त्रे परिधान करणे आणि झोपणे, जे कोणीही अगदी काही क्षणासाठीही कधी विसरत नाहीत, जेणेकरून शेवटी, मला ओळखणे खाण्याइतकेच परिचित होईल—अशा एखाद्या कृतीप्रमाणे जी तुम्ही सहजतेने, सरावाने करता. मी उच्चारत असलेल्या वचनांबद्दल बोलायचे, तर प्रत्येक वचन अत्यंत विश्वासाने व पूर्णपणे आत्मसात केले पाहिजे; कोणतेही उपाय निष्काळजी, अर्धवट असू शकत नाहीत. जो कोणी माझ्या वचनांकडे लक्ष देत नाही तो मला थेट विरोध करणारा समजला जाईल; जो कोणी माझ्या वचनांचे सेवन करत नाही किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तो माझ्याकडे लक्ष देत नाही असे मानले जाईल आणि त्याला माझ्या घराच्या दारातून थेट बाहेर काढले जाईल. याचे कारण असे, की मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, मला भरपूर लोक नकोत तर मला उत्कृष्टता हवी आहे. शंभर लोकांपैकी, जर फक्त एक व्यक्ती जरी माझ्या वचनांद्वारे मला ओळखू शकली, तर मी स्वेच्छेने इतर सर्वांना दूर फेकून देईन व या एकाच व्यक्तीला ज्ञानाने प्रकाशित आणि तेजस्वी करण्यावर लक्ष केंद्रित करेन. यावरून तुम्ही हे पाहू शकता, की केवळ भरपूर लोकच माझी अभिव्यक्ती प्रकट करू शकतात व मला जिवंत करू शकतात हे खरे नाही. मला गहू हवा आहे (जरी दाणे भरलेले नसले तरी) आणि चारा नाही (जरी त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे दाणे भरलेले असले तरीही). जे पाठपुरावा करण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत, परंतु त्याऐवजी आळशीपणाने वागतात, त्यांनी स्वतःहून निघून जावे; ते माझ्या नावाची बदनामी करत राहतील म्हणून मला त्यांना यापुढे पाहण्याची इच्छा नाही. माझ्या लोकांकडून मला काय हवे आहे याविषयी, मी सध्या या नीतीनियमांवर थांबेन व परिस्थिती कशी बदलते यानुसार पुढील निर्बंध करण्यासाठी प्रतीक्षा करेन.
भूतकाळात, बहुसंख्य लोकांना वाटायचे, की मी स्वतःच शहाणपणाचा देव आहे, मी तोच देव आहे ज्याने मनुष्यांच्या हृदयांमध्ये खोलवर पाहिले आहे; तथापि, ही फक्त वरवरची चर्चा होती. जर मनुष्यांनी मला खरोखर ओळखले असते, तर त्यांनी निष्कर्षापर्यंत झेप घेतली नसती, तर त्याऐवजी माझ्या वचनांद्वारे मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. जेव्हा ते माझी कृत्ये खरोखर पाहण्याच्या टप्प्यावर पोहोचतील, तेव्हाच ते मला शहाणे आणि अद्भूत म्हणण्यास पात्र ठरतील. तुमचे माझ्याबद्दलचे ज्ञान खूप उथळ आहे. युगानुयुगे, अनेकांनी इतकी वर्षे माझी सेवा केली आहे व माझे कर्तृत्व पाहिल्यानंतर त्यांना माझ्याबद्दल खरोखर काही कळले आहे. या कारणास्तव, त्यांचे हृदय नेहमी माझ्यासाठी अधीन झालेले असायचे, माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणे खूप कठीण असल्यामुळे माझा विरोध करण्याचा किंचितही हेतू मनात ठेवण्याचे धाडस त्यांनी केले नाही. जर या लोकांमध्ये माझे मार्गदर्शन अनुपस्थित असते, तर त्यांनी अविचारीपणे वागण्याचे धाडस केले नसते. म्हणूनच, बऱ्याच वर्षांच्या अनुभवांनंतर, त्यांनी शेवटी माझ्याबद्दलच्या ज्ञानाच्या एका भागाचे सामान्यीकरण केले, मला शहाणा, अद्भूत आणि सल्लागार म्हणून संबोधले, माझी वचने दुधारी तलवारीसारखी आहेत, माझी कृत्ये महान, आश्चर्यकारक व अद्भूत आहेत, मी वैभवाचे वस्त्र परिधान केले आहे, माझे शहाणपण आणि इतर अंतर्दृष्टी आकाशापेक्षा उंच आहे असे म्हटले. तथापि, आज तुमचे माझ्याबद्दलचे ज्ञान केवळ त्यांनी उभारलेल्या पायावर आधारित आहे, म्हणून तुमच्यातील बहुसंख्य—पोपटांसारखे—फक्त त्यांनी उच्चारलेली वचने बोलत आहेत. तुम्ही मला जाणण्याचा मार्ग किती उथळ आहे व तुमचे “शिक्षण” किती अपुरे आहे हे मी लक्षात घेतल्यामुळेच मी तुमचे ताडण केलेले नाही. असे असले तरी, तुमच्यातील बहुसंख्य लोक अजूनही स्वतःला ओळखत नाहीत किंवा तुम्हाला असे वाटते, की तुम्ही तुमच्या कृत्यांमध्ये माझ्या इच्छेची आकांक्षा आधीच बाळगली आहे आणि या कारणास्तव न्यायापासून वाचला आहात; किंवा, देह धारण केल्यानंतर, मी मानवतेच्या कृत्यांबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे व या कारणास्तव तुम्ही ताडणापासून वाचला आहात; किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता तो विश्वाच्या विस्तृत जागेत अस्तित्वात नाही आणि म्हणून तुम्ही देवाला जाणणे हे कर्तव्य म्हणून अंतःकरणात धारण करण्यापेक्षा ते फावल्या वेळात करावयाचे कार्य ठरवले आहे, तुम्ही देवावरील विश्वासाचा उपयोग स्वतःचे मनोरंजन म्हणून करत आहात जो वेळ अन्यथा आळशीपणात घालवला गेला असता. जर मला तुमची योग्यता, तर्क व अंतर्दृष्टी यांच्या अभावाबद्दल दया आली नाही, तर तुम्ही सर्व माझ्या ताडणामध्ये नष्ट व्हाल, तुमचे अस्तित्व नष्ट होईल. तरीसुद्धा, पृथ्वीवरील माझे कार्य पूर्ण होईपर्यंत मी मानवजातीसाठी क्षमाशील राहीन. याचे तुम्हा सर्वांना ज्ञान असले पाहिजे आणि चांगले व वाईट यामध्ये गोंधळून जाणे थांबवले पाहिजे.
२५ फेब्रुवारी १९९२