देवाचे कार्य आणि मनुष्याचे आचरण
मनुष्यामधील देवाचे कार्य मनुष्यापासून वेगळे करू शकत नाही, कारण मनुष्य हा या कार्याचा विषय आहे आणि देवाने उत्पन्न केलेल्या निर्मितीपैकी केवळ मनुष्य देवाची साक्ष देऊ शकतो. मनुष्याचे जीवन व मनुष्याच्या सर्व कृती देवापासून वेगळ्या करता येत नाहीत आणि त्या सर्वांवर देवाच्या हस्ते नियंत्रण केले जाते. असेही म्हणता येईल, की कोणतीही व्यक्ती देवाशिवाय स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू शकत नाही. हे कोणीही नाकारू शकत नाही, कारण ही वस्तुस्थिती आहे. देव जे करतो हे सर्व मानवजातीच्या लाभासाठी करीत असतो व ते सर्व सैतानाच्या कटकारस्थनांना विरोध करण्यासाठी केलेले असते. मनुष्याला हवे असलेले सर्व काही देवापासून येते आणि देवच मनुष्याच्या जीवनाचा स्त्रोत आहे. अशा प्रकारे मनुष्याला देवापासून विभक्त होता येत नाही. तसेच मनुष्यापासून दूर जाण्याचा देवाचा कधीही हेतू नव्हता. देव सर्व मानवजातीसाठी कार्य करतो व त्याचे विचार नेहमी दयाळू असतात. म्हणून मनुष्यासाठी देवाचे कार्य आणि देवाचे विचार (म्हणजे देवाची इच्छा) हे दोन्ही “दृष्टांत” असतात, हे मनुष्याला माहीत असले पाहिजे. असे दृष्टांत देवाचे व्यवस्थापन व कार्यदेखील असते जे करण्यास मनुष्य असमर्थ आहे. देव त्याचे कार्य करत असताना मनुष्यासाठी ज्या आवश्यकता तयार करतो त्यांना मनुष्याचे “आचरण” म्हणतात. दृष्टांत म्हणजे स्वतः देवाचे कार्य असते किंवा ही देवाची मानवजातीसाठी इच्छा असते किंवा त्याच्या कार्याचा हेतू आणि महत्त्व असते. दृष्टांतांना व्यवस्थापनाचा एक भाग असेदेखील म्हणता येईल, कारण हे व्यवस्थापन देवाचे कार्य आहे व ते मनुष्यासाठी आहे, याचा अर्थ असा, की हे कार्य देव मनुष्यामध्ये करतो. हे कार्य पुरावा आणि मार्ग असून, याद्वारे मनुष्याला देवाची ओळख होते व ते मनुष्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. लोकांनी देवाच्या कार्याच्या ज्ञानाकडे लक्ष देण्याऐवजी केवळ देवावरील विश्वासाच्या सिद्धांतांकडे लक्ष दिले किंवा किरकोळ क्षुल्लक तपशील याकडे लक्ष दिले, तर त्यांना देवाची ओळख होणार नाही आणि त्यापेक्षा अधिक म्हणजे ते देवाच्या अंतःकरणाप्रमाणे असणार नाहीत. मनुष्याच्या देवाच्या ज्ञानासाठी अत्यंत सहाय्यकारी अशा देवाच्या कार्याला दृष्टांत म्हणतात. हे दृष्टांत देवाचे कार्य, इच्छा, हेतू व देवाच्या कार्याचे महत्व असते आणि ते सर्व मनुष्याच्या लाभासाठी असते. आचरण म्हणजे मनुष्याने जे केले पाहिजे ते, देवाचे अनुसरण करणाऱ्या निर्मिलेल्या प्राण्याने केले पाहिजे ते व ते मनुष्याचे कर्तव्य आहे. मनुष्याला जे करायचे आहे ते त्याला सुरुवातीपासून समजले नव्हते, परंतु देव त्याच्या कार्यादरम्यान मनुष्याने करावयाच्या आवश्यक गोष्टी आखून देतो. देव कार्य करत असताना या आवश्यक गोष्टी हळूहळू अधिक सखोल आणि उंच होत जातात. उदाहरणार्थ, नियमशास्त्राच्या युगामध्ये मनुष्याला नियमशास्त्राचे पालन करावे लागत असे व कृपेच्या युगामध्ये मनुष्याला वधस्तंभ वाहावा लागतो. राज्याचे युग वेगळे आहे: मनुष्यासाठीच्या आवश्यक बाबी नियमशास्त्राच्या युगापेक्षा आणि कृपेच्या युगापेक्षा उच्च आहेत. दृष्टांत जितके अधिक उंच होत जातात तितक्याच मनुष्याच्या आवश्यक बाबी उंच होत जातात व अधिक स्पष्ट आणि अधिक वास्तव होत जातात. त्याचप्रमाणे दृष्टांत यांची वास्तविकता अधिक वाढत जाते. हे वास्तविक दृष्टांत देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी मनुष्याला अनुकूल करतात एवढेच नव्हे तर, त्याच्या देवाविषयीच्या ज्ञानासही अधिक अनुकूल करतात.
पूर्वीच्या युगांच्या तुलनेत, राज्याच्या युगात देवाचे कार्य अधिक व्यावहारिक आहे, मनुष्याचे मूलतत्त्व आणि त्याच्या प्रवृत्तीतील बदलांवर अधिक निर्देशित आहे व जे त्याचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी स्वतः देवाची साक्ष देण्यास अधिक सक्षम आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, राज्याच्या युगात, तो कार्य करत असताना, देव भूतकाळातील कोणत्याही काळापेक्षा मनुष्याला स्वतःला अधिक दाखवतो, याचा अर्थ असा होतो, की मनुष्याला जे दृष्टांत माहीत असले पाहिजेत ते मागील कोणत्याही युगापेक्षा जास्त आहेत. कारण देवाचे कार्य मनुष्यामध्ये अभूतपूर्व क्षेत्रात आले आहे, राज्याच्या युगात मनुष्याला कळलेले दृष्टांत सर्व व्यवस्थापन कार्यात सर्वोच्च आहेत. देवाच्या कार्याने अभूतपूर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे आणि म्हणून मनुष्याला कळलेले दृष्टांत सर्व दृष्टांतांपेक्षा सर्वोच्च बनले आहेत व मनुष्याचे परिणामस्वरूप आचरण पूर्वीच्या कोणत्याही युगापेक्षा उच्च आहे, कारण मनुष्याचे आचरण दृष्टांतांनुसार बदलत जाते आणि दृष्टांतांची परिपूर्णतादेखील मनुष्याच्या आवश्यकतांची परिपूर्णता दर्शवते. देवाचे सर्व व्यवस्थापन ठप्प होताच, मनुष्याचे आचरणदेखील थांबते व देवाच्या कार्याशिवाय, मनुष्याला भूतकाळातील सिद्धांतावर टिकून राहण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अन्यथा त्याला कोठेही जाण्यासाठी जागा उरणार नाही. नवीन दृष्टांतांशिवाय, मनुष्य कोणतेही नवीन आचरण करणार नाही; पूर्ण दृष्टांतांशिवाय, मनुष्य कोणतेही परिपूर्ण आचरण करणार नाही; उच्च दृष्टांतांशिवाय मनुष्य उच्च आचरण करणार नाही. देवाच्या पावलांसोबत मनुष्याचे आचरण बदलते आणि त्याचप्रमाणे देवाच्या कार्यासोबत मनुष्याचे ज्ञान व अनुभवही बदलतात. मनुष्य कितीही कर्तृत्ववान असला, तरीही तो देवापासून अविभाज्य आहे आणि देवाने क्षणभर जरी कार्य करणे थांबवले तर मनुष्य त्याच्या क्रोधामुळे लगेच मरेल. मनुष्याकडे अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही, कारण आज मनुष्याचे ज्ञान कितीही उच्च असले तरी, त्याचे अनुभव कितीही सखोल असले तरी, तो देवाच्या कार्यापासून अविभाज्य आहे—कारण मनुष्याचे आचरण व त्याने देवावरील त्याच्या विश्वासात जे शोधले पाहिजे ते दृष्टांतांपासून अविभाज्य आहे. देवाच्या कार्याच्या प्रत्येक प्रसंगात, मनुष्याला माहीत असले पाहिजे असे दृष्टांत आहेत आणि त्यांचे अनुसरण करणे, ही मनुष्याकडून अपेक्षा आहे. या दृष्टांतांचा आधार नसेल तर, मनुष्य आचरण करण्यास असमर्थ असेल किंवा मनुष्य अखंडपणे देवाचे अनुसरणही करू शकणार नाही. जर मनुष्य देवाला ओळखत नसेल किंवा त्याला देवाची इच्छा समजत नसेल, तर मनुष्य जे काही करतो ते व्यर्थ आहे व तो देवाची मान्यता मिळण्यास असमर्थ आहे. मनुष्याची प्रतिभा कितीही विपुल असली, तरी तो देवाच्या कार्यापासून व देवाच्या मार्गदर्शनापासून अविभाज्य आहे. मनुष्याच्या कृती कितीही चांगल्या असल्या किंवा मनुष्याने कितीही कृती केल्या, तरी त्या देवाच्या कार्याची जागा घेऊ शकत नाहीत. आणि म्हणूनच, कोणत्याही परिस्थितीत मनुष्याचे आचरण दृष्टांतांपासून विभक्त होऊ शकत नाही. जे नवीन दृष्टांत स्वीकारत नाहीत त्यांच्याकडे नवीन आचरण नसते. त्यांच्या आचरणाचा सत्याशी काही संबंध नसतो, कारण ते सिद्धांताचे पालन करतात व कालबाह्य नियमशास्त्राचे पालन करतात; त्यांच्याकडे नवीन दृष्टांत अजिबात नसतात आणि परिणामी, ते नवीन युगातील काहीही आचरणात आणत नाहीत. त्यांनी दृष्टांत गमावले आहेत व असे करताना त्यांनी पवित्र आत्म्याचे कार्यदेखील गमावले आहे आणि त्यांनी सत्य गमावले आहे. जे सत्याशिवाय आहेत ते मूर्खपणाचे वंशज आहेत, ते सैतानाचे मूर्त स्वरूप आहेत. एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारची असली, तरीही ते देवाच्या कार्याच्या दृष्टांताशिवाय असू शकत नाहीत व पवित्र आत्म्याच्या उपस्थितीपासून वंचित राहू शकत नाहीत; दृष्टांत गमावल्याबरोबर, मनुष्य ताबडतोब नरकात पडतो आणि अंधारात राहतो. दृष्टांत नसलेले लोक मूर्खपणाने देवाचे अनुसरण करतात, ते पवित्र आत्म्याच्या कार्यापासून वंचित आहेत व ते नरकात जगत आहेत. असे लोक सत्याचा पाठपुरावा करत नाहीत, उलट देवाचे नाव फलकाप्रमाणे लटकवतात. ज्यांना पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नसते, ज्यांना देहधारी देव माहीत नसतो, ज्यांना देवाच्या संपूर्ण व्यवस्थापनातील कार्याचे तीन टप्पे माहीत नसतात—त्यांना दृष्टांत माहीत नसतात व ते सत्यापासून वंचित असतात. आणि ज्यांच्याकडे सत्य नाही, ते सर्व दुष्ट नाहीत का? जे सत्य आचरणात आणण्यास इच्छुक आहेत, जे देवाचे ज्ञान मिळवण्यास इच्छुक आहेत व जे खरोखर देवाला सहकार्य करतात, त्यांच्यासाठी दृष्टांत म्हणजे पाया आहे. त्यांना देवाने मान्यता दिलेली असते कारण ते देवाला सहकार्य करतात आणि ते मनुष्याने आचरणात आणले पाहिजे.
दृष्टांतांमध्ये आचरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. मनुष्याकडून केलेल्या व्यावहारिक मागण्या तसेच मनुष्याने देवाचे कार्य ओळखणे हेदेखील दृष्टांतांमध्ये समाविष्ट आहे. पूर्वी, विविध ठिकाणी होणाऱ्या विशेष मेळाव्यांमध्ये किंवा भव्य संमेलनांमध्ये आचरणाच्या मार्गाच्या एकाच पैलूविषयी बोलले जायचे. हे आचरण कृपेच्या युगात आचरणात आणायचे होते आणि त्याचा देवाच्या ज्ञानाशी क्वचितच संबंध होता, कारण कृपेच्या युगाचा दृष्टांत हा केवळ येशूला वधस्तंभावर खिळण्याचा दृष्टांत होता आणि यापेक्षा मोठे दृष्टांत कोणतेही नव्हते. मानवजातीची वधस्तंभावर खिळण्याच्या माध्यमातून सुटका करण्याच्या कार्यापेक्षा अधिक काही मनुष्याला माहीत नसावे असे मानले जात होते व म्हणूनच कृपेच्या युगात मनुष्याला जाणून घेण्यासारखे दुसरे कोणतेही दृष्टांत नव्हते. अशा प्रकारे, मनुष्याला देवाविषयीचे थोडेसे ज्ञान होते आणि येशूच्या प्रेम व करुणेच्या ज्ञानाव्यतिरिक्त, काही साध्या आणि दयनीय गोष्टींचे तो आचरण करू शकत होता, ज्या आजच्या काळापासून खूप दूरच्या होत्या. भूतकाळात, त्याचे संमेलन कसेही असले, तरीही मनुष्य देवाच्या कार्याच्या व्यावहारिक ज्ञानाबद्दल बोलण्यास असमर्थ होता, मनुष्याने प्रवेश करण्यासाठी आचरणाचा सर्वात योग्य मार्ग कोणता आहे हे कोणीही सांगू शकणे तर दूरच. मनुष्याने सहनशीलता व संयमाच्या पायावर फक्त काही साधे तपशील जोडले; त्याच्या आचरणाच्या मूलतत्त्वात कोणताही बदल झाला नाही, कारण त्या युगात देवाने कोणतेही नवीन कार्य केले नाही आणि फक्त सहनशीलता व संयम किंवा वधस्तंभ वाहणे एवढ्याच अपेक्षा त्याने मनुष्याकडून ठेवल्या. अशा आचरणांव्यतिरिक्त, येशूच्या वधस्तंभावर खिळण्यापेक्षा कोणतेही उच्च दृष्टांत नव्हते. भूतकाळात, इतर दृष्टांतांचा उल्लेख नव्हता कारण देवाने फार मोठे कार्य केले नाही तसेच त्याने मनुष्याकडे मर्यादित मागण्या केल्या. अशा प्रकारे, मनुष्याने काहीही केले, तरी तो या मर्यादा ओलांडण्यास असमर्थ होता, या मर्यादा ज्या काही साध्या आणि उथळ गोष्टी होत्या ज्या मनुष्याने आचरणात आणावयाच्या होत्या. आज मी इतर दृष्टांतांबद्दल बोलतो कारण आज, अधिक कार्य केले गेले आहे, जे कार्य नियमशास्त्राच्या युगापेक्षा व कृपेच्या युगापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मनुष्याच्या आवश्यकतादेखील भूतकाळातील आवश्यकतांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहेत. जर मनुष्य असे कार्य पूर्णतः जाणण्यास असमर्थ असेल, तर त्याला फारसे महत्त्व नसते; असे म्हणता येईल, की जर मनुष्याने आयुष्यभर प्रयत्न केले नाहीत तर त्याला असे कार्य पूर्णपणे जाणून घेणे कठीण जाईल. विजयाच्या कार्यात, केवळ आचरणाच्या मार्गावर बोलले तर मनुष्यावर विजय मिळवणे अशक्य होईल. मनुष्याकडून कोणत्याही आवश्यकता न ठेवता, केवळ दृष्टांतांची चर्चा केली तरी, मनुष्यावर विजय मिळवणे अशक्य होईल. जर आचरणाच्या मार्गाशिवाय काहीही बोलले गेले नसते, तर मनुष्याच्या सर्वात गंभीर कमकुवतपणावर प्रहार करणे किंवा मनुष्याच्या धारणा दूर करणे अशक्य झाले असते, त्याचप्रमाणे मनुष्यावर पूर्णपणे विजय मिळवणेदेखील अशक्य झाले असते. दृष्टांत हे मनुष्यावर विजय मिळवण्याचे मुख्य साधन आहे, मात्र जर दृष्टांतांशिवाय आचरणाचा कोणताही मार्ग नसता, तर मनुष्याकडे अनुसरण करण्याचा कोणताही मार्ग नसता, त्याच्याकडे प्रवेशाचे कोणतेही साधन असणे तर दूरच. हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवाच्या कार्याचे तत्त्व आहे: दृष्टांतांमध्ये असे काही असते जे प्रत्यक्षात आणले जाऊ शकते तसेच आचरणाव्यतिरिक्त दृष्टांतदेखील असतात. मनुष्याच्या जीवनातील आणि त्याच्या प्रवृत्तीतील बदलांच्या प्रमाणानुसार दृष्टांतांमध्ये बदल होतात. जर मनुष्याला केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहायचे असते, तर त्याच्यासाठी कोणतेही मोठे बदल साध्य करणे अशक्य झाले असते. दृष्टांत देवाच्या कार्याबद्दल व देवाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलतात. आचरण म्हणजे मनुष्याच्या आचरणाचा मार्ग आणि मनुष्याच्या अस्तित्वाचा मार्ग; देवाच्या सर्व व्यवस्थापनामध्ये, दृष्टांत व आचरण यांच्यातील संबंध हा देव आणि मनुष्य यांच्यातील संबंध आहे. जर दृष्टांत काढून टाकले असते किंवा आचरणाची चर्चा न करता दृष्टांताबद्दल बोलले गेले असते अथवा केवळ दृष्टांत असते व मनुष्याच्या आचरणाचा नाश केला असता, तर अशा गोष्टींना देवाचे व्यवस्थापन मानले जाऊ शकले नसते, देवाचे कार्य मानवजातीसाठी केले जाते असे म्हणणे तर दूरच; अशा प्रकारे, मनुष्याचे कर्तव्यच काढून टाकले गेले असते, तसेच ते देवाच्या कार्याच्या उद्देशाला नकार देणारे ठरले असते. जर, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, देवाच्या कार्यात सहभाग न घेता, मनुष्याला केवळ आचरण करणे आवश्यक असते आणि त्याशिवाय, जर मनुष्याला देवाचे कार्य माहीत असणे आवश्यक नसते, तर अशा कार्याला देवाचे व्यवस्थापन म्हणणे दूरच राहिले असते. जर मनुष्य देवाला ओळखत नसेल व देवाच्या इच्छेबद्दल अनभिज्ञ असेल आणि आंधळेपणाने अस्पष्ट व अमूर्त मार्गाने त्याचे आचरण करत असेल, तर तो कधीही पूर्ण पात्र प्राणी बनणार नाही. आणि म्हणूनच, या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आहेत. जर केवळ देवाचे कार्य असते, म्हणजे फक्त दृष्टांत असते व मनुष्याचे सहकार्य किंवा आचरण नसते, तर अशा गोष्टींना देवाचे व्यवस्थापन म्हणता येणार नाही. जर फक्त मनुष्याचे आचरण आणि प्रवेश असते, तर मनुष्याने कितीही उच्च मार्गावर प्रवेश केला तरी हेदेखील अस्वीकार्य असते. मनुष्याचा प्रवेश हा कार्य व दृष्टांतांसह हळूहळू टप्प्याटप्प्याने बदलला पाहिजे; तो लहरीपणाने बदलू शकत नाही. मनुष्याच्या आचरणाची तत्त्वे स्वतंत्र आणि अनियंत्रित नसून ती काही मर्यादेत असतात. अशी तत्त्वे कार्याच्या दृष्टांतांनुसार टप्प्याटप्प्याने बदलतात. म्हणूनच, देवाचे व्यवस्थापन शेवटी देवाच्या कार्यावर आणि मनुष्याच्या आचरणावर येते.
व्यवस्थापनाचे कार्य केवळ मानवजातीमुळेच उद्भवले, याचा अर्थ ते केवळ मानवजातीच्या अस्तित्वामुळे उद्भवले. मानवजातीपूर्वी किंवा सुरुवातीला, जेव्हा आकाश आणि पृथ्वी व सर्व गोष्टी निर्माण केल्या गेल्या, तेव्हा कोणतेही व्यवस्थापन नव्हते. जर, देवाच्या सर्व कार्यात, मनुष्यासाठी फायदेशीर असे कोणतेही आचरण नसते, म्हणजेच जर देवाने भ्रष्ट मानवजातीसाठी योग्य आवश्यकता केल्या नसत्या (जर, देवाने केलेल्या कार्यात, मनुष्याच्या आचरणासाठी कोणताही योग्य मार्ग नसता), तर या कार्याला देवाचे व्यवस्थापन म्हणता आले नसते. जर देवाच्या संपूर्ण कार्यामध्ये केवळ भ्रष्ट मानवजातीला त्यांचे आचरण कसे करावे हे सांगणे समाविष्ट असते आणि देवाने स्वतःचा कोणताही उपक्रम राबवला नसता व त्याच्या सर्वशक्तिमानतेचा किंवा शहाणपणाचा एक घटकही प्रदर्शित केला नसता, तर मग देवाने मनुष्यासाठी कितीही उच्च आवश्यकता केल्या, देव मनुष्यामध्ये कितीही काळ राहिला, तरी मनुष्याला देवाच्या प्रवृत्तीविषयी काहीच कळले नसते; जर तसे झाले असते, तर अशा प्रकारचे कार्य देवाचे व्यवस्थापन म्हणवून घेण्याच्या योग्यतेपेक्षाही कमी योग्यतेचे असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य हे देवाने केलेले कार्य आहे आणि ज्यांना देवाने प्राप्त केले आहे त्यांनी देवाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडलेले सर्व कार्य आहे. असे कार्य व्यवस्थापन म्हणून सारांशित केले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत, देवाचे मनुष्यांमधील कार्य, तसेच त्याचे अनुसरण करणाऱ्यांच्या सर्व सहकार्याला एकत्रितपणे व्यवस्थापन म्हणतात. येथे, देवाच्या कार्याला दृष्टांत म्हणतात व मनुष्याच्या सहकार्याला आचरण म्हणतात. देवाचे कार्य जितके उच्च असेल (म्हणजे, दृष्टांत जितके उच्च), तितकीच देवाची प्रवृत्ती मनुष्याला स्पष्ट केली जाते, तितका ते मनुष्याच्या धारणांशी विसंगत असते आणि मनुष्याचे आचरण व सहकार्य तितके जास्त वाढते. मनुष्याच्या आवश्यकता जितक्या जास्त असतील तितकेच देवाचे कार्य मनुष्याच्या धारंणाशी विसंगत असते, परिणामी मनुष्याच्या कसोट्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली मानकेदेखील उच्च होतात. या कार्याच्या समाप्तीनंतर, सर्व दृष्टांत पूर्ण केले जातील व मनुष्याला जे आचरणात आणणे आवश्यक आहे ते परिपूर्णतेच्या टोकावर पोहोचले असेल. हीच वेळ असेल जेव्हा प्रत्येकाचे प्रकारानुसार वर्गीकरण केले जाईल, त्यासाठी मनुष्याला जे माहीत असणे आवश्यक आहे ते मनुष्याला दाखवले जाईल. म्हणूनच, जेव्हा दृष्टांत त्यांच्या कळसाला पोहोचतात, तेव्हा त्याप्रमाणे कार्य त्याच्या समाप्तीकडे जाईल आणि मनुष्याचे आचरणदेखील त्याच्या शिखरावर पोहोचेल. मनुष्याचे आचरण देवाच्या कार्यावर आधारित आहे व देवाचे व्यवस्थापन केवळ मनुष्याचे आचरण आणि सहकार्य यांमुळे पूर्णपणे व्यक्त होते. मनुष्य हा देवाच्या कार्याचा उत्कृष्ट नमुना आहे व देवाच्या सर्व व्यवस्थापनाच्या कार्याचे लक्ष्य आहे आणि देवाच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे फलित आहे. जर देवाने मनुष्याच्या सहकार्याशिवाय, एकट्याने कार्य केले असते, तर त्याच्या संपूर्ण कार्याचे प्रत्यक्षरूप म्हणून कार्य करू शकणारे काहीही नसते व मग देवाच्या व्यवस्थापनास किंचितही महत्त्व नसते. देवाच्या कार्याव्यतिरिक्त, केवळ देवाने त्याचे कार्य व्यक्त करण्यासाठी आणि त्याची सर्वशक्तिमानता व शहाणपण सिद्ध करण्यासाठी योग्य लक्ष्य निवडणे याद्वारेच देव त्याच्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो आणि या सर्व कार्याचा उपयोग करून देव सैतानाला पूर्णपणे पराभूत करण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकतो. म्हणूनच, मनुष्य हा देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचा एक अपरिहार्य भाग आहे व केवळ मनुष्यच देवाच्या व्यवस्थापनाला फलदायी बनवू शकतो आणि त्याचे अंतिम उद्दिष्ट साध्य करू शकतो; मनुष्याशिवाय, इतर कोणत्याही जीवसृष्टीला अशी भूमिका पार पाडता येत नाही. जर मनुष्याला देवाच्या व्यवस्थापन कार्याचे खरे प्रत्यक्षरूप बनायचे असेल, तर भ्रष्ट मानवजातीची अवज्ञा पूर्णपणे दूर केली पाहिजे. यासाठी मनुष्याला वेगवेगळ्या काळासाठी योग्य आचरण प्रदान करणे व देवाने मनुष्यांमध्ये अनुरूप कार्य करणे आवश्यक आहे. केवळ अशा प्रकारे देवाच्या व्यवस्थापन कार्याचे प्रत्यक्षरूप असणाऱ्या लोकांचा एक समूह शेवटी प्राप्त केला जाईल. मनुष्यामधील देवाचे कार्य केवळ देवाच्या कार्याद्वारे स्वतः देवाची साक्ष देऊ शकत नाही; अशी साक्ष साध्य करण्यासाठी, त्याच्या कार्याकरिता योग्य असलेल्या जिवंत मनुष्यांचीदेखील आवश्यकता असते. देव प्रथम या लोकांवर कार्य करेल, ज्यांच्याद्वारे त्याचे कार्य नंतर व्यक्त केले जाईल आणि अशा प्रकारे त्याच्या इच्छेनुसार निर्मिलेल्या प्राण्यांमध्ये साक्ष जन्माला येईल व यामध्ये देवाने त्याच्या कार्याचे उद्दिष्ट साध्य केले असेल. सैतानाला पराभूत करण्यासाठी देव एकटाच कार्य करत नाही कारण तो सर्व निर्मिलेल्या प्राण्यांमध्ये स्वतःबद्दल थेट साक्ष देऊ शकत नाही. जर त्याने असे केले असते, तर मनुष्याला पूर्णपणे पटवून देणे अशक्य झाले असते, म्हणून देवाने मनुष्यावर विजय मिळवण्यासाठी त्याच्यावर कार्य केले पाहिजे आणि तरच तो सर्व निर्मिलेल्या प्राण्यांमध्ये साक्ष प्राप्त करण्यास सक्षम असेल. मनुष्याच्या सहकार्याशिवाय, केवळ देवानेच कार्य केले असते किंवा मनुष्याला सहकार्य करण्याची आवश्यकता नसती, तर मनुष्याला देवाची प्रवृत्ती कधीच कळू शकली नसती आणि देवाच्या इच्छेबद्दल तो कायमचा अनभिज्ञ राहिला असता; अशा वेळी देवाच्या कार्याला देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य म्हणता आले नसते. देवाचे कार्य समजून न घेता फक्त मनुष्याने जर स्वतःच धडपड केली, शोध घेतला, कष्ट केले, तर मनुष्य खोड्या करत बसेल. पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय, मनुष्य जे करतो ते सैतानाचे आहे, तो बंडखोर व दुष्ट आहे; भ्रष्ट मानवजातीच्या सर्व गोष्टींमध्ये सैतान प्रदर्शित होतो आणि देवाशी सुसंगत असे काहीही नसते व मनुष्य जे काही करतो ते सैतानाचे प्रकटीकरण असते. जे काही बोलले गेले आहे ते दृष्टांत आणि आचरणाशिवाय नाही. दृष्टांतांच्या पायावर, मनुष्याला आचरण आणि आज्ञापालनाचा मार्ग सापडतो, जेणेकरून तो त्याच्या धारणा बाजूला ठेवू शकतो व त्या गोष्टी मिळवू शकतो ज्या त्याच्याकडे भूतकाळात नव्हत्या. देवाची अपेक्षा आहे की मनुष्याने त्याच्याशी सहकार्य करावे, मनुष्याने त्याच्या आवश्यकता पूर्णतः पूर्ण कराव्यात आणि मनुष्याला स्वतः देवाने केलेले कार्य पाहण्यास, देवाच्या सर्वशक्तिमान सामर्थ्याचा अनुभव घेण्यास व देवाची प्रवृत्ती जाणून घेण्यास सांगितले आहे. हे, थोडक्यात, देवाचे व्यवस्थापन आहे. देवाचे मनुष्याशी असलेले मिलन हे व्यवस्थापन आहे आणि ते सर्वात मोठे व्यवस्थापन आहे.
ज्यामध्ये दृष्टांतांचा समावेश आहे ते मुख्यतः स्वतः देवाचे कार्य असते आणि ज्यामध्ये आचरणाचा समावेश आहे ते मनुष्याने केले पाहिजे व त्याचा देवाशी काहीही संबंध नाही. देवाचे कार्य स्वतः देवाने पूर्ण केले आहे आणि मनुष्याचे आचरण मनुष्य स्वतःच साध्य करतो. जे स्वतः देवाने केले पाहिजे ते मनुष्याने करण्याची गरज नाही व जे मनुष्याने आचरणात आणले पाहिजे ते देवाशी संबंधित नाही. देवाचे कार्य हे त्याचे स्वतःचे सेवाकार्य आहे आणि त्याचा मनुष्याशी काहीही संबंध नाही. हे कार्य मनुष्याने करण्याची गरज नाही व त्याशिवाय, देवाने करावयाचे कार्य करण्यास मनुष्य असमर्थ असेल. मनुष्याला जे आचरणात आणणे आवश्यक आहे ते मनुष्याने साध्य केले पाहिजे, मग ते त्याच्या जीवनाचे बलिदान असो किंवा त्याला साक्ष देण्यासाठी सैतानाच्या स्वाधीन करणे असो—हे सर्व मनुष्याने साध्य केले पाहिजे. देवाला जे कार्य करायचे आहे ते सर्व कार्य स्वतः देव पूर्ण करतो आणि मनुष्याने जे करावे ते मनुष्याला दाखवले जाते व बाकीचे कार्य मनुष्यावर सोपवले जाते. देव अतिरिक्त कार्य करत नाही. तो फक्त तेच कार्य करतो जे त्याच्या सेवाकार्यात आहे व मनुष्याला फक्त मार्ग दाखवतो आणि फक्त मार्ग उघडण्याचे कार्य करतो व मार्ग मोकळा करण्याचे कार्य करत नाही; हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. सत्य आचरणात आणणे म्हणजे देवाची वचने आचरणात आणणे आणि हे सर्व मनुष्याचे कर्तव्य आहे, जे मनुष्याने केले पाहिजे व त्याचा देवाशी काहीही संबंध नाही. जर मनुष्याने मागणी केली, की देवानेदेखील मनुष्याप्रमाणेच सत्यात संकट आणि परिष्करण भोगावे, तर मनुष्य अवज्ञाकारी आहे. देवाने त्याचे सेवाकार्य पार पाडणे हे देवाचे कार्य आहे व कोणत्याही प्रतिकाराशिवाय देवाच्या सर्व मार्गदर्शनाचे पालन करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. देवाने कोणत्याही पद्धतीने कार्य केले, तरीही मनुष्याने जे साध्य केले पाहिजे ते त्याला साध्य करणे आवश्यक आहे. केवळ स्वतः देवच मनुष्याच्या आवश्यकता तयार करू शकतो, ज्याचा अर्थ असा आहे, की केवळ स्वतः देवच मनुष्यासाठी आवश्यकता तयार करण्यास योग्य आहे. मनुष्याला कोणताही पर्याय नसावा आणि त्याने पूर्णपणे अधीन जाण्याशिवाय व आचरण करण्याशिवाय काहीही करू नये; ही भावना मनुष्याच्या अंगी असली पाहिजे. जे कार्य स्वतः देवाने केले पाहिजे ते पूर्ण झाल्यानंतर मनुष्याने टप्प्याटप्प्याने अनुभव घेणे आवश्यक आहे. शेवटी, देवाचे सर्व व्यवस्थापन पूर्ण झाल्यावर, जर, देवाला अपेक्षित असलेले कार्य मनुष्याने अद्याप केले नसेल, तर मनुष्याला शिक्षा झाली पाहिजे. जर मनुष्याने देवाच्या आवश्यकता पूर्ण केल्या नाहीत, तर हे मनुष्याच्या अवज्ञेमुळे आहे; याचा अर्थ असा नाही, की देवाने त्याचे कार्य पुरेशा सखोलपणे केले नाही. जे देवाची वचने आचरणात आणू शकत नाहीत, जे देवाच्या आवश्यकता पूर्ण करू शकत नाहीत आणि जे त्यांची निष्ठा देऊ शकत नाहीत व त्यांचे कर्तव्य पूर्ण करू शकत नाहीत, त्या सर्वांना शिक्षा होईल. आज तुम्हाला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या अतिरिक्त मागण्या नाहीत, तर मनुष्याचे कर्तव्य आहे आणि जे सर्व लोकांनी केले पाहिजे ते आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यास किंवा ते चांगल्या प्रकारे करण्यासही असमर्थ असाल, तर तुम्ही स्वतःवर संकट ओढवून घेत नाही का? तुम्ही मृत्यूला कवटाळत नाही का? तुम्ही तरीही भविष्य व संधींची अपेक्षा कशी करू शकता? देवाचे कार्य मानवजातीसाठी केले जाते आणि देवाच्या व्यवस्थापनासाठी मनुष्याचे सहकार्य दिले जाते. देवाने जे काही करायचे आहे ते पूर्ण केल्यावर, मनुष्याने त्याच्या आचरणात अविचल राहणे व देवाला सहकार्य करणे आवश्यक आहे. देवाच्या कार्यात, मनुष्याने कोणतीही कसर सोडू नये, त्याची निष्ठा सोडू नये आणि असंख्य धारणांमध्ये गुंतू नये किंवा निष्क्रियपणे बसून मृत्यूची वाट पाहू नये. देव मनुष्यासाठी स्वतःचा त्याग करू शकतो, मग मनुष्य देवाला त्याची निष्ठा का वाहू शकत नाही? देव मनुष्यासाठी एक हृदयाचा व मनाचा आहे, मग मनुष्य थोडेफार सहकार्य का करू शकत नाही? देव मानवजातीसाठी कार्य करतो, मग मनुष्य देवाच्या व्यवस्थापनासाठी त्याचे काही कर्तव्य का बजावू शकत नाही? देवाचे कार्य इथपर्यंत आले आहे, तरीही तुम्ही पाहता पण कृती करत नाही, तुम्ही ऐकता पण हालचाल करत नाही. असे लोक विनाशासाठी पात्र नाहीत का? देवाने त्याचे सर्वस्व मनुष्यासाठी आधीच अर्पण केले आहे, मग आज मनुष्य त्याचे कर्तव्य निष्ठेने करण्यास असमर्थ का आहे? देवासाठी, त्याचे कार्य हे त्याचे प्रथम प्राधान्य आहे आणि त्याच्या व्यवस्थापनाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मनुष्यासाठी, देवाची वचने आचरणात आणणे व देवाच्या आवश्यकता पूर्ण करणे हे त्याचे पहिले प्राधान्य आहे. हे तुम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे. तुमच्याशी बोललेली वचने तुमच्या साराच्या गाभ्यापर्यंत पोहोचली आहेत आणि देवाच्या कार्याने अभूतपूर्व क्षेत्रात प्रवेश केला आहे. या मार्गातील सत्य किंवा असत्य अजूनही अनेकांना समजलेले नाही; ते अजूनही वाट पाहत आहेत व त्यांचे कर्तव्य बजावत नाहीत. त्याऐवजी, ते देवाच्या प्रत्येक वचनाचे आणि कृतीचे परीक्षण करतात, तो काय खातो व काय परिधान करतो यावर ते लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या धारणा अधिक गंभीर होतात. असे लोक विनाकारण गडबड करत नाहीत का? असे लोक देव शोधणारे कसे असू शकतात? आणि देवाच्या अधीन होण्याचा हेतू असलेले लोक असे कसे असू शकतात? ते त्यांची निष्ठा व कर्तव्य यांना दुय्यम मानतात आणि त्याऐवजी देवाच्या ठावठिकाण्यावर लक्ष केंद्रित करतात. ते भयंकर आहेत! मनुष्याला जे समजायचे आहे ते सर्व समजले व जे आचरणात आणायचे आहे ते सर्व आचरणात आणले, तर देव मनुष्याला नक्कीच आशीर्वाद देईल, कारण त्याला जे हवे आहे ते मनुष्याचे कर्तव्य आहे आणि जे मनुष्याने केले पाहिजे. मनुष्याला जे समजायचे आहे ते समजण्यास तो असमर्थ असेल व जे आचरणात आणले पाहिजे ते आचरणात आणण्यास तो असमर्थ असेल, तर मनुष्याला शिक्षा होईल. जे देवाला सहकार्य करत नाहीत ते देवाशी वैर करतात, जे नवीन कार्य स्वीकारत नाहीत ते त्यास विरोध करतात, जरी असे लोक उघडपणे त्याला विरोध करणारे काहीही करत नसले तरीही. जे लोक देवाला आवश्यक असलेले सत्य आचरणात आणत नाहीत ते सर्व लोक देवाच्या वचनांना जाणूनबुजून विरोध करणारे आणि अवज्ञा करणारे लोक असतात, जरी असे लोक पवित्र आत्म्याच्या कार्याकडे विशेष लक्ष देत असले तरीही. जे लोक देवाच्या वचनांचे पालन करत नाहीत व देवाच्या अधीन नाहीत ते बंडखोर आहेत आणि ते देवाच्या विरोधात आहेत. जे लोक त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत ते देवाला सहकार्य न करणारे असतात व जे लोक देवाला सहकार्य करत नाहीत ते पवित्र आत्म्याचे कार्य न स्वीकारणारे असतात.
जेव्हा देवाचे कार्य एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचते आणि त्याचे व्यवस्थापन एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचते, तेव्हा जे त्याच्या हृदयाचे पालन करतात ते सर्व त्याच्या आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम असतात. देव त्याच्या स्वतःच्या मानकांनुसार व मनुष्य जे साध्य करण्यास सक्षम आहे त्यानुसार मनुष्याच्या आवश्यकता बनवतो. त्याच्या व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना, तो मनुष्यासाठी मार्गदेखील निर्देशित करतो आणि मनुष्याला जगण्याचा मार्ग प्रदान करतो. देवाचे व्यवस्थापन व मनुष्याचे आचरण या दोन्ही गोष्टी एकाच टप्प्यातील कार्य आहेत आणि एकाच वेळी पार पाडल्या जातात. देवाच्या व्यवस्थापनाची चर्चा मनुष्याच्या प्रवृत्तीतील बदलांशी संबंधित आहे व मनुष्याचे कर्तव्य आणि मनुष्याच्या प्रवृत्तीतील बदलांबाबत बोलण्याचा संबंध देवाच्या कार्याशी आहे; हे दोघे विभक्त होण्याची वेळ कधीच येत नाही. मनुष्याचे आचरण टप्प्याटप्प्याने बदलत आहे. कारण देवाच्या मनुष्यासाठी आवश्यकतादेखील बदलत आहेत व देवाचे कार्य नेहमी बदलत आहे आणि प्रगती करत आहे. जर मनुष्याचे आचरण सिद्धांतामध्ये अडकले, तर हे सिद्ध होते, की तो देवाच्या कार्यापासून आणि मार्गदर्शनापासून वंचित आहे; जर मनुष्याचे आचरण कधीच बदलत नसेल नाही किंवा खोलवर जात नसेल, तर यावरून हे सिद्ध होते, की मनुष्याचे आचरण मनुष्याच्या इच्छेनुसार पार पाडले जाते व ते सत्याचे आचरण नाही; जर मनुष्याकडे चालण्याचा कोणताही मार्ग नसेल, तर तो आधीच सैतानाच्या ताब्यात गेला आहे आणि सैतानाद्वारे नियंत्रित केला जात आहे, याचा अर्थ असा आहे, की तो दुष्ट आत्म्यांद्वारे नियंत्रित आहे. जर मनुष्याचे आचरण सखोल झाले नाही, तर देवाचे कार्य विकसित होणार नाही व जर देवाच्या कार्यात बदल झाला नाही, तर मनुष्याचा प्रवेश थांबेल; हे अपरिहार्य आहे. देवाच्या सर्व कार्यात, जर मनुष्य नेहमी यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन करत असता, तर देवाचे कार्य प्रगती करू शकले नसते, संपूर्ण युगाचा अंत करणे तर दूरच. जर मनुष्याने नेहमी वधस्तंभाला धरले असते आणि संयम व नम्रतेचे आचरण केले असते, तर देवाच्या कार्याची प्रगती होणे अशक्य होते. जे लोक केवळ नियमशास्त्राचे पालन करतात किंवा केवळ वधस्तंभाला धरून संयम आणि नम्रतेचे आचरण करतात त्यांच्यामध्ये सहा हजार वर्षांचे व्यवस्थापन संपुष्टात आणले जाऊ शकत नाही. त्याऐवजी, देवाच्या व्यवस्थापनाचे संपूर्ण कार्य देवाला ओळखत असलेल्या, सैतानाच्या तावडीतून सुटलेल्या व ज्यांनी सैतानाच्या प्रभावापासून स्वतःला पूर्णपणे मुक्त केले आहे, अशा शेवटच्या दिवसांतील लोकांमध्ये पूर्ण होते. ही देवाच्या कार्याची अपरिहार्य दिशा आहे. धार्मिक चर्चमधील लोकांचे आचरण कालबाह्य आहे असे का म्हटले जाते? कारण त्यांनी जे आचरणात आणले ते आजच्या काळातील कार्यापासून वेगळे झाले आहे. कृपेच्या युगात, त्यांनी जे आचरणात आणले ते योग्यच होते, परंतु जसजसे युग निघून गेले आणि देवाचे कार्य बदलत गेले, तसतसे त्यांचे आचरण हळूहळू कालबाह्य होत गेले. नवीन कार्य व नवीन प्रकाश यामुळे ते मागे राहिले आहे. त्याच्या मूळ पायावर आधारित, पवित्र आत्म्याचे कार्य अनेक पायऱ्या खोलवर गेले आहे. तरीही ते लोक अजूनही देवाच्या कार्याच्या मूळ टप्प्यावरच अडकलेले आहेत आणि अजूनही जुनी आचरणे व जुन्या प्रकाशाला चिकटून आहेत. देवाचे कार्य तीन किंवा पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात बदलू शकते, तर २,००० वर्षांच्या कालावधीत आणखी मोठे परिवर्तन होणार नाही का? जर मनुष्याकडे नवीन प्रकाश किंवा आचरण नसेल, तर याचा अर्थ असा होतो, की त्याने पवित्र आत्म्याच्या कार्यात सातत्य ठेवले नाही. हे मनुष्याचे अपयश आहे; देवाच्या नवीन कार्याचे अस्तित्व नाकारले जाऊ शकत नाही कारण, ज्यांच्याकडे पूर्वी पवित्र आत्म्याचे कार्य होते ते आज, अजूनही कालबाह्य आचरणांचे पालन करतात. पवित्र आत्म्याचे कार्य नेहमीच पुढे जात असते आणि जे पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेत ते सर्वदेखील सखोल प्रगती केली पाहिजे व बदलत गेले पाहिजेत. त्यांनी एका टप्प्यावर थांबू नये. ज्यांना पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नाही केवळ तेच त्याच्या मूळ कार्यात राहतील आणि पवित्र आत्म्याचे नवीन कार्य स्वीकारणार नाहीत. केवळ जे अवज्ञाकारी आहेत ते पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त करण्यास असमर्थ असतील. जर मनुष्याचे आचरण पवित्र आत्म्याच्या नवीन कार्याशी जुळत नसेल, तर मनुष्याचे आचरण निश्चितच आजच्या कार्यापासून विभक्त आहे व आजच्या कार्याशी विसंगत आहे. असे कालबाह्य विचारसरणीचे लोक फक्त देवाच्या इच्छेची पूर्तता करण्यास असमर्थ आहेत, शेवटी देवाला साक्ष देणाऱ्या लोकांमधील होणे तर दूरच. शिवाय, संपूर्ण व्यवस्थापन कार्याचा अशा लोकांच्या समूहामध्ये निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. ज्यांनी एकेकाळी यहोवाचे नियमशास्त्र पाळले आणि ज्यांनी एकेकाळी वधस्तंभासाठी दुःख सहन केले, जर ते शेवटच्या दिवसांतील कार्याचा टप्पा स्वीकारू शकत नसतील, तर त्यांनी जे काही केले ते व्यर्थ व निरर्थक ठरेल. पवित्र आत्म्याच्या कार्याची स्पष्ट अभिव्यक्ती म्हणजे भूतकाळाला चिकटून न राहता, येथे व वर्तमानकाळाचा स्वीकार करणे. ज्यांनी आजच्या कार्यात सातत्य ठेवले नाही आणि जे आजच्या आचरणापासून वेगळे झाले आहेत, तेच पवित्र आत्म्याच्या कार्याला विरोध करतात व त्याचा स्वीकार करत नाहीत. असे लोक देवाच्या वर्तमान कार्याचा अवमान करतात. जरी ते भूतकाळाचा प्रकाश धरून असले, तरी त्यांना पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नाही हे नाकारता येत नाही. मनुष्याच्या आचरणात झालेले बदल, भूतकाळातील आणि आजच्या आचरणातील तफावत, पूर्वीच्या काळात हे आचरण कसे पार पाडले जात होते आणि आज ते कसे केले जाते, या सर्व चर्चा का होत आहेत? मनुष्याच्या आचरणातील अशा विभाजनाबद्दल नेहमी बोलले जाते कारण पवित्र आत्म्याचे कार्य सतत पुढे जात असते व अशा प्रकारे मनुष्याच्या आचरणात सतत बदल करणे आवश्यक असते. जर मनुष्य एका टप्प्यातच अडकून राहिला, तर हे सिद्ध होते की तो देवाचे नवीन कार्य आणि नवीन प्रकाशात टिकून राहण्यास असमर्थ आहे; त्यावरून हे सिद्ध होत नाही, की देवाच्या व्यवस्थापनाची योजना बदललेली नाही. जे पवित्र आत्म्याच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांना नेहमी वाटते, की ते बरोबर आहेत, परंतु खरे तर, त्यांच्यामध्ये देवाचे कार्य फार पूर्वीपासून थांबले आहे व पवित्र आत्म्याचे कार्य त्यांच्यामध्ये अनुपस्थित आहे. देवाचे कार्य फार पूर्वीपासून लोकांच्या दुसऱ्या समूहाकडे हस्तांतरित केले गेले होते, ज्यांच्यावर तो त्याचे नवीन कार्य पूर्ण करू इच्छित होता. कारण जे धर्मात आहेत ते देवाचे नवीन कार्य स्वीकारण्यास असमर्थ आहेत आणि केवळ भूतकाळातील जुन्या कार्याला धरून आहेत, त्यामुळे देवाने या लोकांना सोडले आहे व जे लोक हे नवीन कार्य स्वीकारतात त्यांच्यावर तो त्याचे नवीन कार्य करतो. हे असे लोक आहेत जे त्याच्या नवीन कार्यात सहकार्य करतात आणि केवळ अशा प्रकारे त्याचे व्यवस्थापन पूर्ण होऊ शकते. देवाचे व्यवस्थापन नेहमीच पुढे जात असते व मनुष्याचे आचरण नेहमीच उंचावत असते. देव नेहमी कार्यरत असतो आणि मनुष्याला नेहमीच गरज असते, जेणेकरुन दोघेही त्यांच्या शिखरावर पोहोचतील व देव आणि मनुष्य पूर्ण एकात्मता प्राप्त करतील. हे देवाच्या कार्याच्या सिद्धीची अभिव्यक्ती आहे व हा देवाच्या संपूर्ण व्यवस्थापनाचा अंतिम परिणाम आहे.
देवाच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात मनुष्याच्या संबंधित आवश्यकतादेखील आहेत. जे लोक पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेत त्या सर्वांनी पवित्र आत्म्याची उपस्थिती आणि शिस्त प्राप्त केली आहे व जे पवित्र आत्म्याच्या प्रवाहात नाहीत ते सैतानाच्या आज्ञेखाली आहेत आणि पवित्र आत्म्याच्या कोणत्याही कार्याशिवाय आहेत. जे लोक पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेत ते असे आहेत जे देवाचे नवीन कार्य स्वीकारतात व जे देवाच्या नवीन कार्यात सहकार्य करतात. जर या प्रवाहात असलेले लोक सहकार्य करण्यास असमर्थ असतील आणि या काळात देवाला आवश्यक असलेले सत्य आचरणात आणू शकत नसतील, तर त्यांना शिस्त लावली जाईल व सर्वात वाईट म्हणजे पवित्र आत्मा त्यांचा त्याग करेल. जे पवित्र आत्म्याचे नवीन कार्य स्वीकारतात, ते पवित्र आत्म्याच्या प्रवाहात राहतील आणि त्यांना पवित्र आत्म्याची देखभाल व संरक्षण मिळेल. जे सत्य आचरणात आणण्यास इच्छुक आहेत त्यांना पवित्र आत्म्याद्वारे ज्ञानप्राप्ती होते आणि जे सत्य आचरणात आणण्यास तयार नाहीत त्यांना पवित्र आत्म्याद्वारे शिस्त लावली जाते व त्यांना शिक्षादेखील होऊ शकते. ते कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असले, तरीही ते पवित्र आत्म्याच्या प्रवाहात असले, तर देव त्याच्या नावासाठी त्याचे नवीन कार्य स्वीकारणाऱ्या सर्वांची जबाबदारी घेईल. जे त्याच्या नावाचा गौरव करतात आणि त्याची वचने आचरणात आणण्यास तयार असतात, त्यांना त्याचे आशीर्वाद प्राप्त होतील; जे लोक त्याची अवज्ञा करतात व त्याची वचने आचरणात आणत नाहीत त्यांना त्याची शिक्षा मिळेल. जे लोक पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेत ते असे आहेत जे नवीन कार्य स्वीकारतात आणि त्यांनी नवीन कार्य स्वीकारले असल्याने त्यांनी देवाला योग्य सहकार्य केले पाहिजे व त्यांचे कर्तव्य न बजावणारे बंडखोर म्हणून वागू नये. ही देवाची मनुष्याकडून एकमेव अपेक्षा आहे. जे लोक नवीन कार्य स्वीकारत नाहीत त्यांच्यासाठी तसे नाही: ते पवित्र आत्म्याच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत आणि पवित्र आत्म्याची शिस्त व निंदा त्यांना लागू होत नाही. दिवसभर, हे लोक देहात राहतात, ते त्यांच्या मनात राहतात आणि ते जे काही करतात ते त्यांच्या स्वतःच्या मेंदूच्या विश्लेषण व संशोधनाद्वारे तयार केलेल्या सिद्धांतानुसार होते. पवित्र आत्म्याच्या नवीन कार्यासाठी हे आवश्यक नाही, मग हे देवाबरोबरचे सहकार्य असणे तर दूरच. जे देवाचे नवीन कार्य स्वीकारत नाहीत ते देवाच्या उपस्थितीपासून वंचित आहेत आणि त्याशिवाय, देवाचे आशीर्वाद व संरक्षणापासून वंचित आहेत. त्यांची बहुतेक वचने आणि कृती पवित्र आत्म्याच्या कार्याच्या भूतकाळातील आवश्यकतांना धरून आहेत; ते सिद्धांत आहेत, सत्य नाही. या लोकांचे एकत्र येणे हे धर्माशिवाय दुसरे काही नाही, हे सिद्ध करण्यासाठी असे सिद्धांत व नियम पुरेसे आहेत; ते निवडलेले लोक नाहीत किंवा देवाच्या कार्यास पात्र नाहीत. त्यांच्यातील सर्वांच्या एकत्रित येण्याला केवळ धर्माची भव्य सभा म्हणता येईल आणि चर्च म्हणता येणार नाही. हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे. त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे नवीन कार्य नाही; ते जे करतात ते धर्माशी सुसंगत दिसते, ते जे जगतात ते धर्माने भरलेले दिसते; त्यांच्याकडे पवित्र आत्म्याची उपस्थिती व कार्य नाही, ते शिस्त किंवा पवित्र आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र असणे तर दूरच. हे लोक सर्व निर्जीव प्रेते आहेत व अध्यात्मापासून वंचित आहेत. त्यांना मनुष्याच्या बंडखोरपणाबद्दल आणि विरोधाविषयी माहिती नाही, त्यांना मनुष्याच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल माहिती नाही, त्यांना देवाचे सर्व कार्य व देवाच्या सध्याच्या इच्छेबद्दल माहिती असणे तर दूरच. ते सर्व अज्ञानी, बेसावध लोक आहेत आणि ते घाणेरडे आहेत जे आस्तिक म्हणवून घेण्यास अयोग्य आहेत! त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीचा देवाच्या व्यवस्थापनावर काहीही परिणाम होत नाही, त्यांच्यामुळे देवाच्या योजना विस्कळीत होणे तर दूरच. त्यांची वचने व कृती खूप घृणास्पद, खूप दयनीय आणि उल्लेख करण्यायोग्यदेखील नाहीत. जे पवित्र आत्म्याच्या प्रवाहात नाहीत त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीचा पवित्र आत्म्याच्या नवीन कार्याशी काहीही संबंध नाही. यामुळे, ते काहीही करत असले तरी ते पवित्र आत्म्याच्या शिस्तीशिवाय आहेत व त्याशिवाय, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाशिवाय आहेत. कारण ते सर्व असे लोक आहेत ज्यांचे सत्यावर प्रेम नाही आणि ज्यांचा पवित्र आत्म्याने तिरस्कार केला आहे व त्यांना नाकारले आहे. त्यांना दुष्ट म्हटले जाते कारण ते देहबुद्धीने चालतात आणि देवाच्या फलकाखाली त्यांना जे आवडते ते करतात. देव कार्य करत असताना, ते जाणूनबुजून त्याच्याशी वैर करतात व त्याच्या विरुद्ध दिशेने धावतात. देवाला सहकार्य करण्यात मनुष्याचे अपयश हीच सर्वोच्च बंडखोरी आहे, मग जे लोक जाणूनबुजून देवाच्या विरोधात धाव घेतात त्यांना त्यांची न्याय्य शिक्षा मिळणार नाही का? या लोकांच्या दुष्कृत्यांचा उल्लेख केल्यावर, काही लोक त्यांना शाप देण्यास उत्सुक असतात, मात्र देव त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मनुष्याला, असे दिसते की त्यांच्या कृती देवाच्या नावाशी संबंधित आहे, परंतु खरे तर, देवासाठी, त्यांचा देवाच्या नावाशी किंवा त्याच्या साक्षीशी काही संबंध नाही. हे लोक काय करतात हे महत्त्वाचे नाही, ते देवाशी संबंधित नाही: हे त्याचे नाव आणि त्याचे वर्तमान कार्य या दोन्हीशी संबंधित नाही. हे लोक स्वतःला अपमानित करतात व सैतानाला प्रकट करतात; ते दुष्ट लोक आहेत जे क्रोधाच्या दिवसासाठी राग साठवून ठेवत आहेत. आज, त्यांच्या कृती कशाही असल्या तरी जर त्यांनी देवाच्या व्यवस्थापनात अडथळा आणला नाही व देवाच्या नवीन कार्याशी त्यांचा काहीही संबंध नसेल, तर अशा लोकांना संबंधित शिक्षेला सामोरे जावे लागणार नाही, कारण क्रोधाचा दिवस अजून यायचा आहे. लोकांचा विश्वास आहे, की असे बरेच काही आहे जे देवाने आधीच हाताळलेले असावे आणि त्यांना असे वाटते, की त्या दुष्टांना लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे. परंतु देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य अद्याप संपले नसल्यामुळे व क्रोधाचा दिवस येणे बाकी असल्यामुळे, अनीतिमान लोक अजूनही त्यांची अनीतिमान कृत्ये करत आहेत. काही म्हणतात, “जे धर्मात आहेत त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती किंवा कार्य नसते आणि ते देवाच्या नावाला लाज आणतात; मग त्यांचे बेलगाम वर्तन सहन करण्यापेक्षा देव त्यांचा नाश का करत नाही?” हे लोक, जे सैतानाचे प्रकटीकरण आहेत व जे देह व्यक्त करतात, ते अज्ञानी, सामान्य लोक आहेत; ते मूर्ख लोक आहेत. देव मनुष्यामध्ये त्याचे कार्य कसे करतो हे समजण्याआधी ते देवाच्या क्रोधाचे आगमन पाहणार नाहीत आणि त्यांच्यावर पूर्णपणे विजय मिळवल्यानंतर, त्या दुष्टांना त्यांची शिक्षा मिळेल व त्यांच्यापैकी कोणीही क्रोधाच्या दिवसापासून सुटू शकणार नाही. आता मनुष्याच्या शिक्षेची वेळ नाही, परंतु विजयाचे कार्य पार पाडण्याची वेळ आली आहे, मात्र देवाचे व्यवस्थापन विस्कळीत करणारे लोक नाहीत तोपर्यंत हे शक्य होईल, अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या कृतींच्या तीव्रतेच्या आधारावर शिक्षेला सामोरे जावे लागेल. देवाच्या मानवजातीच्या व्यवस्थापनादरम्यान, जे सर्व पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेत त्यांचा देवाशी संबंध आहे. पवित्र आत्मा ज्यांचा तिरस्कार करतो आणि ज्यांना नाकारतो ते सैतानाच्या प्रभावाखाली राहतात व जे ते आचरणात आणतात त्यांचा देवाशी काही संबंध नाही. जे देवाचे नवीन कार्य स्वीकारतात आणि देवाला सहकार्य करतात तेच देवाशी संबंध ठेवतात, कारण देवाचे कार्य केवळ ते स्वीकारणार्यांसाठी आहे व ते सर्व लोकांनी स्वीकारले किंवा स्वीकारले नाही तरीही ते सर्व लोकांसाठी उद्देशून नाही. देवाने केलेल्या कार्यात नेहमीच एक उद्देश असतो आणि ते लहरीपणाने केले जात नाही. जे सैतानाशी संबंधित आहेत ते देवाला साक्ष देण्यास योग्य नाहीत, मग ते देवाला सहकार्य करण्यास योग्य असणे तर दूरच.
पवित्र आत्म्याच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी मनुष्याची साक्षदेखील आवश्यक आहे. कार्याचा प्रत्येक टप्पा म्हणजे देव आणि सैतान यांच्यातील लढाई आहे व या लढाईचे लक्ष्य सैतान आहे, तर जो या कार्याद्वारे परिपूर्ण होईल तो मनुष्य आहे. देवाचे कार्य फलदायी होऊ शकते की नाही हे मनुष्याने देवाची साक्ष देण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. ही साक्ष देवाचे अनुसरण करणाऱ्या लोकांकडून अपेक्षित आहे; ही सैतानासमोर दिलेली साक्ष आहे व त्याच्या कार्याच्या परिणामाचा पुरावादेखील आहे. देवाचे संपूर्ण व्यवस्थापन तीन टप्प्यात विभागले गेले आहे आणि प्रत्येक टप्प्यात, मनुष्यासाठी योग्य आवश्यकता आहेत. शिवाय, जसजसे युग पुढे जात आहे व प्रगती होत आहे, तसतसे सर्व मानवजातीकडून देवाच्या आवश्यकता वाढत आहेत. अशा प्रकारे, टप्प्याटप्प्याने, देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य त्याच्या पराकोटीला पोहोचते, जोपर्यंत मनुष्याला “देहात वचनाचे स्वरूप” दिसून येत नाही तोपर्यंत हे होते आणि अशा प्रकारे मनुष्याकडून असलेल्या आवश्यकता अधिक वाढतात, तसेच मनुष्याच्या साक्ष देण्याच्या आवश्यकताही वाढतात. मनुष्य देवाला खऱ्या अर्थाने सहकार्य करण्यास जितका जास्त सक्षम असतो, तितका देव गौरव प्राप्त करतो. मनुष्याचे सहकार्य ही अशी साक्ष आहे जी त्याला द्यावी लागते व तो जी साक्ष देतो ते मनुष्याचे आचरण आहे. म्हणूनच, देवाच्या कार्याचा योग्य परिणाम होऊ शकतो की नाही आणि खरी साक्ष असू शकते की नाही, हे मनुष्याच्या सहकार्याशी व साक्षीशी अतूटपणे जोडलेले असते. जेव्हा कार्य पूर्ण होईल, म्हणजे जेव्हा देवाचे सर्व व्यवस्थापन पूर्ण होईल, तेव्हा मनुष्याला उच्च साक्ष द्यावी लागेल आणि जेव्हा देवाचे कार्य समाप्त होईल, तेव्हा मनुष्याचे आचरण व प्रवेश त्याच्या शिखरावर पोहोचेल. भूतकाळात, मनुष्याने नियमशास्त्राचे आणि आज्ञांचे पालन करणे आवश्यक होते व त्याने संयम बाळगणे आणि नम्र असणे आवश्यक होते. आज, मनुष्याने देवाच्या सर्व व्यवस्थांचे पालन करणे व देवावरील सर्वोच्च प्रेम साध्य करणे आवश्यक आहे आणि शेवटी त्याने संकटातही देवावर प्रेम करणे आवश्यक आहे. हे तीन टप्पे म्हणजे देवाने त्याच्या संपूर्ण व्यवस्थापनादरम्यान टप्प्याटप्प्याने, मनुष्यासाठी बनवलेल्या आवश्यकता आहेत. देवाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा आधीच्या टप्प्यापेक्षा खोलवर जातो व प्रत्येक टप्प्यात मनुष्याच्या आवश्यकता आधीच्या टप्प्यापेक्षा अधिक गहन असतात आणि अशा प्रकारे, देवाचे संपूर्ण व्यवस्थापन हळूहळू आकार घेते. याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्याच्या आवश्यकता नेहमीच इतक्या जास्त असतात, की मनुष्याची प्रवृत्ती देवाला आवश्यक असलेल्या मानकांच्या जवळ येते व तेव्हाच संपूर्ण मानवजात हळूहळू सैतानाच्या प्रभावापासून दूर जाऊ लागते, देवाचे कार्य पूर्ण होईपर्यंत आणि संपूर्ण मानवजातीला सैतानाच्या प्रभावापासून वाचवले जाईपर्यंत हे सुरू राहिल. जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा देवाचे कार्य पूर्ण झालेले असेल आणि त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी मनुष्याचे देवासोबतचे सहकार्य यापुढे राहणार नाही व संपूर्ण मानवजात देवाच्या प्रकाशात जगेल व तेव्हापासून, बंडखोरी किंवा देवाचा विरोध होणार नाही. देवदेखील मनुष्याकडे कोणतीही मागणी करणार नाही आणि मनुष्य व देव यांच्यात अधिक सामंजस्यपूर्ण सहकार्य असेल, जे मनुष्य आणि देव यांचे एकत्र जीवन असेल, हे देवाच्या व्यवस्थापन पूर्ण झाल्यानंतर येणारे जीवन व देवाने मनुष्याला सैतानाच्या तावडीतून पूर्णपणे वाचवल्यानंतरचे जीवन असेल. जे देवाच्या पावलावर पाऊल ठेवू शकत नाहीत ते असे जीवन प्राप्त करण्यास असमर्थ असतात. ते स्वतःला अंधारात लोटतील, जेथे ते रडतील आणि दातओठ खातील; ते असे लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवतात परंतु त्याचे अनुसरण करत नाहीत, जे देवावर विश्वास ठेवतात परंतु त्याचे सर्व कार्य पाळत नाहीत. मनुष्य देवावर विश्वास ठेवत असल्याने, त्याने टप्प्याटप्प्याने देवाच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे; त्याने “कोकरू जेथे जाईल तेथे त्याच्या मागे गेले” पाहिजे. केवळ हेच लोक खरा मार्ग शोधतात, केवळ हेच लोक पवित्र आत्म्याचे कार्य जाणतात. जे लोक गुलामीने लेख व सिद्धांतांचे पालन करतात ते असे लोक आहेत ज्यांना पवित्र आत्म्याच्या कार्याने बाहेर काढून टाकले गेले आहे. प्रत्येक कालखंडात, देव नवीन कार्य सुरू करेल आणि प्रत्येक कालखंडात, मनुष्यामध्ये एक नवीन सुरुवात होईल. जर मनुष्य फक्त “यहोवा देव आहे” व “येशू ख्रिस्त आहे” या सत्यांचे पालन करत असेल, जी केवळ त्या त्या युगांना लागू होणारी सत्ये आहेत, तर मनुष्य पवित्र आत्म्याच्या कार्यात कधीही टिकून राहणार नाही आणि तो पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त करण्यासाठी कायम असमर्थ राहील. देव कसेही कार्य करत असला, तरी मनुष्य किंचितही शंका न ठेवता त्याचे अनुसरण करतो व तो जवळून अनुसरण करतो. अशा प्रकारे, पवित्र आत्म्याद्वारे मनुष्याला बाहेर कसे काढले जाऊ शकते? देवाने काहीही केले, तरीही जोपर्यंत मनुष्याला खात्री आहे, की हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे आणि तो पवित्र आत्म्याच्या कार्यात कोणतीही शंका न बाळगता सहकार्य करतो व देवाच्या आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत त्याला शिक्षा कशी होऊ शकते? देवाचे कार्य कधीच थांबले नाही, त्याची पावले कधीच थांबली नाहीत आणि त्याचे व्यवस्थापन कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी व्यस्त असतो व कधीही थांबत नाही. पण मनुष्य वेगळा आहे: पवित्र आत्म्याच्या कार्याचा अल्पांश मिळवून, तो कधीही बदलणार नाही असे तो मानतो; थोडेसे ज्ञान प्राप्त करून, तो देवाच्या नवीन कार्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी पुढे जात नाही; देवाचे थोडेसे कार्य पाहिल्यावर, तो ताबडतोब देवाला विशिष्ट लाकडी आकृती म्हणून विहित करतो आणि विश्वास ठेवतो, की देव त्याच्यासमोरच्या या रूपात कायम राहील, पूर्वीही असेच होते व भविष्यातही नेहमी असेच राहील; केवळ वरवरचे ज्ञान प्राप्त करून, मनुष्याला इतका अभिमान वाटतो, की तो स्वतःला विसरतो आणि अस्तित्त्वात नसलेल्या देवाच्या प्रवृत्तीची व व्यक्तित्वाची घोषणा करू लागतो; आणि पवित्र आत्म्याच्या कार्याच्या एका टप्प्याबद्दल खात्री झाल्यानंतर, देवाच्या नवीन कार्याची घोषणा करणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारची असली तरीही, मनुष्य ते स्वीकारत नाही. हे असे लोक आहेत जे पवित्र आत्म्याचे नवीन कार्य स्वीकारू शकत नाहीत; ते खूप पुराणमतवादी आहेत व नवीन गोष्टी स्वीकारण्यास असमर्थ आहेत. हे असे लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवतात परंतु देवाला नाकारतात. मनुष्याचा असा विश्वास आहे, की इस्रायली लोक “फक्त यहोवावर विश्वास ठेवतात आणि येशूवर विश्वास ठेवत नाहीत” हे चुकीचे होते, तरीही बहुतेक लोक अशी भूमिका पार पाडतात ज्यामध्ये ते “केवळ यहोवावर विश्वास ठेवतात व येशूला नाकारतात” आणि “मशीहाच्या पुनरागमनासाठी आतुर आहेत, पण येशू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिहाला विरोध करतात.” त्यामुळे, पवित्र आत्म्याच्या कार्याचा एक टप्पा स्वीकारल्यानंतरही लोक सैतानाच्या अधीन राहतात व त्यांना देवाचे आशीर्वाद मिळत नाहीत यात काही आश्चर्य नाही. हा मनुष्याच्या बंडखोरपणाचा परिणाम नाही का? जगभरातील ज्या ख्रिस्ती लोकांनी आजचे नवीन कार्य चालू ठेवले नाही, ते सर्वजण देव त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल असे गृहीत धरून भाग्यवान ठरण्याच्या आशेला चिकटून राहतात. तरीही देव त्यांना तिसर्या स्वर्गात का घेऊन जाईल हे ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत किंवा येशू पांढर्या मेघावर स्वार होऊन त्यांचे स्वागत कसे करेल याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत, त्यांनी कल्पना केलेल्या दिवशी येशू खरोखरच आकाशात पांढऱ्या मेघावर येईल की नाही याबद्दल ते पूर्ण खात्रीने सांगणे तर दूरच. ते सर्व चिंताग्रस्त आहेत आणि गोंधळलेले आहेत; वेगवेगळे मूठभर लोक, ज्यात प्रत्येक संप्रदायाचे लोक आहेत त्यांना स्वतःला हेदेखील माहीत नाही, की देव त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वीकारेल की नाही. देव आता करत असलेले कार्य, सध्याचे युग, देवाची इच्छा—यापैकी कशाचीही त्यांना समज नाही व ते हाताच्या बोटावर दिवस मोजण्याशिवाय काही करू शकत नाहीत. जे शेवटपर्यंत कोकराच्या पावलावर पाऊल ठेवतात तेच अंतिम आशीर्वाद मिळवू शकतात, तर ते “चतुर लोक” जे शेवटपर्यंत अनुसरण करू शकत नाहीत आणि तरीही विश्वास ठेवतात, की त्यांनी सर्व काही मिळवले आहे, ते देवाचे स्वरूप पाहण्यास असमर्थ आहेत. त्यांचा प्रत्येकाचा विश्वास आहे, की ते पृथ्वीवरील सर्वात हुशार व्यक्ती आहेत व देवाच्या कार्याचा सुरू असलेला विकास ते विनाकारण थांबवतात आणि ज्यांची “देवाप्रती अत्यंत निष्ठा आहे, जे देवाचे अनुसरण करतात व देवाच्या वचनांचे पालन करतात” त्यांची पूर्ण खात्री असते, की देव त्यांना स्वर्गात घेऊन जाईल. जरी देवाने उच्चारलेल्या वचनांबद्दल त्यांची “अत्यंत निष्ठा” असली, तरीही त्यांची वचने व कृती अजूनही खूप घृणास्पद असतात, कारण ते पवित्र आत्म्याच्या कार्याला विरोध करतात आणि फसवणूक व वाईट कृत्ये करतात. जे शेवटपर्यंत अनुसरण करत नाहीत, जे पवित्र आत्म्याच्या कार्यात सातत्य ठेवत नाहीत व जे केवळ जुन्या कार्याला चिकटून राहतात, ते देवावर निष्ठा राखण्यात अयशस्वी होतात, तर याउलट, ते असे लोक बनतात जे देवाला विरोध करतात, ते असे लोक बनतात ज्यांना नवीन युग नाकारते आणि ज्यांना शिक्षा होईल. त्यांच्यापेक्षा दयनीय कोणी आहे का? जुने नियमशास्त्र नाकारणाऱ्या व नवीन कार्य स्वीकारणाऱ्या सर्वांनाच सद्सद्विवेकबुद्धी नाही, असाही अनेकांचा समज आहे. हे लोक, जे फक्त “सद्सद्विवेकबुद्धी” बद्दल बोलतात आणि पवित्र आत्म्याचे कार्य जाणत नाहीत, शेवटी त्यांच्या स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीमुळे त्यांच्या संधी कमी होतात. देवाचे कार्य सिद्धांताचे पालन करत नाही व जरी ते त्याचे स्वतःचे कार्य असले, तरीही देव त्याला चिकटून राहत नाही. जे नाकारले पाहिजे ते नाकारले जाते, जे बाहेर काढून टाकले पाहिजे ते बाहेर काढले जाते. तरीही मनुष्य देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचा एक छोटासा भाग धरून स्वतः देवाशी वैर करतो. हा मनुष्याचा मूर्खपणा नाही का? हे मनुष्याचे अज्ञान नाही का? लोकांना देवाचे आशीर्वाद मिळणार नाहीत म्हणून ते जितके जास्त भयभीत आणि सावध असतात, तितकेच ते मोठे आशीर्वाद मिळवण्यास व अंतिम आशीर्वाद प्राप्त करण्यास असमर्थ असतात. जे लोक गुलामगिरीने नियमशास्त्राचे पालन करतात ते सर्व नियमशास्त्रापति कमालीची निष्ठा दाखवतात आणि नियमशास्त्राप्रति निष्ठा जेवढी जास्त दाखवतात तितकेच ते देवाला विरोध करणारे बंडखोर असतात. कारण सध्या राज्याचे युग आहे व नियमशास्त्राचे युग नाही आणि आजचे कार्य व भूतकाळातील कार्य एकाच श्वासात नमूद केले जाऊ शकत नाही किंवा भूतकाळातील कार्याची आजच्या कार्याशी तुलनादेखील केली जाऊ शकत नाही. देवाचे कार्य बदलले आहे आणि मनुष्याच्या आचरणातही बदल झाला आहे; हे आचरण म्हणजे नियमशास्त्राला धरून राहणे किंवा वधस्तंभ वाहणे नाही, म्हणूनच लोकांची नियमशास्त्राप्रति व वधस्तंभाप्रति असलेली निष्ठा यामुळे देवाची मान्यता प्राप्त होणार नाही.
राज्याच्या युगात मनुष्य पूर्णतः परिपूर्ण होईल. विजयाच्या कार्यानंतर, मनुष्य परिष्करण आणि संकटांच्या अधीन होईल. जे लोक या संकटांवर मात करू शकतात व साक्ष देऊ शकतात तेच शेवटी परिपूर्ण केले जातील; ते विजय मिळवणारे आहेत. या संकटांदरम्यान, मनुष्याने हे परिष्करण स्वीकारणे आवश्यक आहे आणि हे परिष्करण देवाच्या कार्याचे शेवटचे उदाहरण आहे. देवाच्या व्यवस्थापनाच्या सर्व कार्याच्या समाप्तीपूर्वी मनुष्याला परिष्कृत केले जाण्याची ही शेवटची वेळ आहे व जे देवाचे अनुसरण करतात त्यांनी ही अंतिम कसोटी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी हे अंतिम परिष्करण स्वीकारले पाहिजे. ज्यांना संकटांनी वेढले आहे ते पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय व देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आहेत, परंतु ज्यांच्यावर खरोखर विजय मिळवला गेला आहे आणि जे खरोखर देवाचा शोध घेत आहेत ते शेवटी भक्कमपणे उभे राहतील; ते असे लोक आहेत ज्यांच्याकडे माणुसकी आहे व जे खरोखर देवावर प्रेम करतात. देवाने काहीही केले, तरी हे विजयी लोक दृष्टांतांपासून वंचित राहणार नाहीत आणि तरीही त्यांच्या साक्षीत न चुकता सत्य आचरणात आणतील. तेच शेवटी मोठ्या संकटातून बाहेर पडतील. जे गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना आज फुकटात लाभ होत असले, तरी अंतिम संकटातून कोणीही सुटू शकत नाही व अंतिम कसोटीतून कोणीही सुटू शकत नाही. विजय मिळवणाऱ्या लोकांसाठी, अशी संकटे म्हणजे निर्णायक परिष्करण आहे; परंतु जे गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा घेतात त्यांच्यासाठी ते पूर्णपणे बाहेर काढून टाकण्याचे कार्य आहे. ज्यांच्या हृदयात देव आहे त्यांची निष्ठा कितीही कसोट्या घेतल्या तरी कायम राहते; परंतु ज्यांच्या अंतःकरणात देव नाही ते देवाचे कार्य त्यांच्या देहासाठी फायदेशीर ठरले नाही, तर ते देवाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन बदलतात आणि देवापासून दूर जातात. हे असे लोक आहेत जे शेवटी स्थिर राहणार नाहीत, जे फक्त देवाचे आशीर्वाद शोधतात व देवासाठी स्वतःला खर्च करण्याची आणि त्याला समर्पित करण्याची त्यांची इच्छा नसते. जेव्हा देवाचे कार्य पूर्ण होईल, तेव्हा अशा अगदी साधारण लोकांना बाहेर काढले जाईल व ते कोणत्याही सहानुभूतीसाठी पात्र नसतील. माणुसकी नसलेले लोक खरोखर देवावर प्रेम करण्यास असमर्थ आहेत. जेव्हा परिस्थिती सुरक्षित आणि चांगली असते किंवा नफा मिळवायचा असतो, तेव्हा ते देवाप्रति पूर्णपणे आज्ञाधारक असतात, परंतु त्यांच्या इच्छेशी तडजोड झाल्यानंतर किंवा शेवटी ते नाकारले गेल्यानंतर, लगेच बंड करतात. अगदी एका रात्रीच्या अंतराळातही, ते हसतमुख, “दयाळू” व्यक्तीपासून कुरूप दिसणार्या व क्रूर मारेकरीपर्यंत जाऊ शकतात, अचानक कालच्या त्यांच्या उपकारकर्त्याला त्यांचा प्राणघातक शत्रू मानतात, कोणत्याही अटी किंवा कारणाशिवाय. जर या भुतांना हाकलले नाही, तर एका सेकंदात ठार मारणारी ही भुते छुपा धोका ठरणार नाहीत का? विजयाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर मनुष्याला वाचवण्याचे कार्य साध्य होत नाही. विजयाचे कार्य संपले असले तरी मनुष्य शुद्ध करण्याचे कार्य झालेले नाही; जेव्हा मनुष्य पूर्णपणे शुद्ध होतो, खरोखर देवाला समर्पण करणारे परिपूर्ण होतात आणि सोंग घेतलेले, अंतःकरणात देव नसलेले लोक शुद्ध होतात, त्यानंतर असे कार्य पूर्ण होईल. जे देवाला त्याच्या कार्याच्या अंतिम टप्प्यात संतुष्ट करत नाहीत ते पूर्णपणे बाहेर काढून टाकले जातील व ज्यांना काढून टाकले जाईल ते सैतानाचे आहेत. ते देवाला संतुष्ट करण्यास असमर्थ असल्यामुळे ते देवाविरुद्ध बंडखोर आहेत आणि जरी हे लोक आज देवाचे अनुसरण करत असले, तरी यावरून हे सिद्ध होत नाही, की ते शेवटपर्यंत तसेच राहतील. “जे शेवटपर्यंत देवाचे अनुसरण करतात त्यांना तारण प्राप्त होईल” या शब्दात “अनुसरण” चा अर्थ संकटांच्या वेळी खंबीरपणे उभे राहणे असा आहे. आज, अनेकांचा असा विश्वास आहे, की देवाचे अनुसरण करणे सोपे आहे, परंतु जेव्हा देवाचे कार्य संपणार असेल, तेव्हा तुला “अनुसरण” चा खरा अर्थ कळेल. विजय मिळवल्यानंतरही तू आजही देवाचे अनुसरण करण्यास सक्षम आहेस म्हणून हे सिद्ध होत नाही, की तू परिपूर्ण बनलेल्यांपैकी एक आहेस. जे कसोट्या सहन करू शकत नाहीत, जे संकटात विजयी होण्यास असमर्थ आहेत, ते शेवटी, भक्कमपणे उभे राहण्यास असमर्थ होतील आणि त्यामुळे शेवटपर्यंत देवाचे अनुसरण करण्यास असमर्थ असतील. जे खरोखर देवाचे अनुसरण करतात ते त्यांच्या कार्याच्या कसोटीचा सामना करण्यास सक्षम असतात, तर जे खरोखर देवाचे अनुसरण करत नाहीत ते देवाच्या कोणत्याही कसोट्यांना तोंड देण्यास असमर्थ असतात. कधी ना कधी त्यांची हकालपट्टी केली जाईल, तर विजय मिळवणारे राज्यातच राहतील. मनुष्य खरोखरच देवाचा शोध घेतो की नाही हे त्याच्या कार्याच्या कसोटीद्वारे, म्हणजेच देवाच्या कसोट्यांद्वारे ठरवले जाते आणि मनुष्याच्या स्वतःच्या निर्णयाशी त्याचा काहीही संबंध नसतो. देव कोणत्याही व्यक्तीला लहरीपणाने नाकारत नाही; तो जे काही करतो ते मनुष्याला पूर्णपणे पटवून देऊ शकते. मनुष्याला न दिसणारे किंवा मनुष्याला पटू न शकणारे कोणतेही कार्य तो करत नाही. मनुष्याचा विश्वास खरा आहे की नाही हे तथ्यांवरून सिद्ध होते व मनुष्य ठरवू शकत नाही. “गव्हाचे निदण बनवता येत नाही आणि निदणाचे गहू बनवता येत नाहीत” यात शंका नाही. जे देवावर खरोखर प्रेम करतात ते सर्व शेवटी राज्यातच राहतील व देव त्याच्यावर खरोखर प्रेम करणाऱ्या कोणाशीही गैरवर्तन करणार नाही. राज्यामध्ये विजय मिळवणारे लोक त्यांची वेगवेगळी कार्ये आणि साक्षी यांनुसार याजक किंवा अनुयायी म्हणून सेवा करतील व जे लोक संकटात विजयी होतात ते राज्यामध्ये याजकांचे शरीर बनतील. संपूर्ण विश्वातील सुवार्तेचे कार्य समाप्त झाल्यानंतर याजकांचे शरीर तयार केले जाईल. जेव्हा ती वेळ येते, तेव्हा मनुष्याचे कर्तव्य हे देवाच्या राज्यात त्याचे कर्तव्य पार पाडणे आणि राज्यात देवाबरोबर एकत्र राहणे हे असेल. याजकांच्या शरीरात मुख्य याजक व याजक असतील आणि उर्वरित देवाचे पुत्र व लोक असतील. हे सर्व संकटाच्या वेळी देवाला दिलेल्या त्यांच्या साक्षींवरून ठरवले जाते; ती काही उपाधी नाही जी लहरीपणाने दिली जाते. मनुष्याचा दर्जा प्रस्थापित झाल्यानंतर, देवाचे कार्य थांबेल, कारण प्रत्येकाचे प्रकारानुसार वर्गीकरण केले जाते आणि ते त्यांच्या मूळ स्थानावर परत येतात व हे देवाच्या कार्याच्या सिद्धीचे चिन्ह आहे, हा देवाच्या कार्याचा आणि मनुष्याच्या आचरणाचा अंतिम परिणाम आहे व हे देवाच्या कार्याच्या दृष्टांतांचे आणि मनुष्याच्या सहकार्याचे प्रत्यक्षरूप आहे. शेवटी, मनुष्याला देवाच्या राज्यात विसावा मिळेल आणि देवदेखील त्याच्या निवासस्थानी विश्रांतीसाठी परत येईल. देव व मनुष्य यांच्यातील ६,००० वर्षांच्या सहकार्याचा हा अंतिम परिणाम असेल.