एक अतिशय गंभीर समस्या: विश्वासघात (१)
अगदी लवकरच, माझे कार्य पूर्ण होईल आणि अनेक वर्षांची मिळून एक असह्य अशी स्मृती तयार झाली आहे. मी वारंवार, अथकपणे माझ्या वचनांचा पुनरुच्चार केलेला आहे व सतत माझे कार्य जगापुढे उलगडून ठेवलेले आहे. अर्थात, माझा सल्ला म्हणजे मी करत असलेल्या प्रत्येक कार्याचा आवश्यक घटक आहे. माझ्या हितोपदेशाशिवाय तुम्ही सर्व लोक इतस्ततः भरकटाल आणि तुम्ही स्वतःचे सर्वस्व सुद्धा गमावल्याचे तुम्हाला आढळेल. माझे कार्य आता पूर्ण होण्याच्या बेतातच आहे व ते शेवटच्या टप्प्यात आलेले आहे. मला अजूनही उपदेश देण्याचे कार्य करायचे आहे, म्हणजेच तुम्हा लोकांना चार उपदेशाचे शब्द ऐकवायाचे आहेत. मला एवढीच आशा आहे, की मी केलेले प्रयास वाया जाऊ न देण्यास तुम्ही लोक समर्थ असाल आणि त्याहूनही अधिक म्हणजे, मी घेतलेली वैचारिक पातळीवरची काळजी तुम्हाला समजू शकेल व एक मानव म्हणून तुम्ही लोकांनी कसे वागावे याचा पाया म्हणून तुम्ही माझ्या वचनांकडे पहाल. तुम्ही ती वचने ऐकण्यास तयार असो वा नसो, ती स्वीकारण्यात तुम्हाला आनंद होवो वा न होवो किंवा तुम्ही ती फक्त अस्वस्थ अंतःकरणाने स्वीकारू शकलात तरी तुम्ही त्यांचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. अन्यथा, तुमची प्रासंगिक व बेफिकीर प्रवृत्ती आणि वागणूक मला गंभीरपणे अस्वस्थ करेल व खरंच, मला किळस वाटेल. मला खूप आशा आहे, की तुम्ही लोक माझी वचने पुनःपुन्हा—हजारो वेळा—वाचू शकता आणि तुम्ही ती आत्मसात सुद्धा करू शकता. माझ्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा केवळ याच पद्धतीने तुम्ही विफल होऊ देणार नाही. तथापि, तुम्हा लोकांपैकी कोणीच आता अशा प्रकारे जगत नाही. उलट, तुम्ही सर्वजण अनैतिक जीवनात बुडलेले आहात, तुमच्या इच्छांप्रमाणे खाण्यापिण्याची मनमानी करत जगत आहात आणि तुमचे हृदय व आत्मा समृद्ध करणाऱ्या माझ्या वचनांचा वापर कोणीच करत नाही. या कारणामुळे, मानवजातीच्या खऱ्याखुऱ्या चेहऱ्याबाबत मी एका निष्कर्षाला येऊन पोहोचलो आहे: मनुष्य कोणत्याही वेळी माझा विश्वासघात करू शकतो आणि माझ्या वचनांशी कोणीही निखळपणे एकनिष्ठ असू शकत नाही.
“सैतानाने मनुष्याला इतके भ्रष्ट बनवलेले आहे, की आता त्यातला मनुष्य दिसेनासा झालेला आहे.” बहुसंख्य लोकांना आता ह्या वाक्प्रचारातला थोडाफार अर्थ कळलेला आहे. मी असे म्हणतो कारण मी उल्लेख करतो ते “समजणे” हे फक्त, खऱ्या ज्ञानाच्या विरूद्ध असलेली एक वरवरची पोचपावती आहे. तुमच्यापैकी कोणीही स्वतःचे अचूक मूल्यमापन करू शकत नाही किंवा स्वतःचे सांगोपांग विश्लेषणही करू शकत नाही म्हणून, तुम्ही लोक माझ्या वचनांबद्दल संदिग्ध राहता. पण या वेळी, तुम्हा लोकांमध्ये अस्तित्वात असलेली एक सर्वाधिक गंभीर समस्या समजावून सांगण्यासाठी मी सत्य बाबींचा वापर करत आहे. ही समस्या आहे विश्वासघाताची. तुमच्यापैकी सर्वजण “विश्वासघात” या शब्दाशी परिचित आहात, कारण बहुसंख्य लोकांनी असे काही केलेले आहे, की तो दुसऱ्यासाठी विश्वासघात ठरला आहे, जसे की, पती त्याच्या पत्नीचा विश्वासघात करतो, पत्नी तिच्या पतीचा विश्वासघात करते, पुत्र त्याच्या वडिलांचा विश्वासघात करतो, मुलगी तिच्या आईचा विश्वासघात करते, एक गुलाम त्याच्या मालकाचा विश्वासघात करतो, मित्रमैत्रिणी एकमेकांचा विश्वासघात करतात, नातेवाईक एकमेकांचा विश्वासघात करतात, विक्रेते त्यांच्या ग्राहकांचा विश्वासघात करतात आणि असे बरेच काही. या सर्व उदाहरणांमध्ये विश्वासघाताचे सार समाविष्ट आहे. थोडक्यात काय, विश्वासघात हा वर्तणूकीचा एक प्रकार आहे की ज्यात एक आश्वासन मोडले जाते, नैतिक तत्त्वांचे उल्लंघन होते किंवा मानवी नैतिकतेच्या विरूद्ध कृत्ये केली जातात, त्यात मानवतेचे नुकसान दिसून येते. सर्वसाधारणपणे, या जगात जन्माला आलेला एक मनुष्य म्हणून, तुम्ही काहीतरी असे केलेले असेलच की जे सत्याचा विश्वासघात ठरते, मग दुसऱ्या व्यक्तीचा विश्वासघात करण्यास कधीतरी काहीतरी केल्याचे किंवा पूर्वी तू इतरांचा पुष्कळ वेळा विश्वासघात केलेला असल्याचे तुला आठवू दे अगर न आठवू दे. तू तुझ्या आईवडिलांचा किंवा मित्रांचा विश्वासघात करण्यास सक्षम असल्यामुळे, तू इतरांचाही विश्वासघात करण्यास सक्षम आहेसच आणि त्याहून जास्त म्हणजे, माझा विश्वासघात करण्यास व मला तिरस्करणीय वाटतात त्या गोष्टी करण्यास सक्षम आहेस. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, विश्वासघात ही केवळ वरवरची अनैतिक वर्तणूक नाही तर, सत्याच्या विरोधात संघर्ष करणारे असे काहीतरी आहे. मानवजातीचा माझ्याप्रति प्रतिकार व माझी अवज्ञा करण्याचा हा नेमका स्रोत आहे. म्हणून मी त्याचा सारांश खालील विधानात मांडलेला आहे: विश्वासघात हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि हा स्वभाव प्रत्येक व्यक्तीने माझ्याशी एकमत होण्याचा मोठा शत्रू आहे.
जी वर्तणूक माझे पूर्णपणे आज्ञापालन करू शकत नाही, ती विश्वासघात आहे. माझ्याशी एकनिष्ठ नसलेली वर्तणूक म्हणजे विश्वासघात. माझी फसवणूक करणे आणि मला फसवण्यासाठी खोटे बोलणे म्हणजे विश्वासघात. अनेक धारणांना आश्रय देणे व त्यांचा सर्वत्र प्रसार करणे म्हणजे विश्वासघात. माझी साक्ष आणि हितसंबंध राखण्यात असमर्थ असणे म्हणजे विश्वासघात. माझ्यापासून दूर असताना खोटे हसणे म्हणजे विश्वासघात. ही सर्व विश्वासघाताची कृत्ये आहेत, ज्यासाठी तुम्ही नेहमीच सक्षम असता व ते तुमच्यासाठी सामान्य आहे. तुमच्यापैकी कोणीही याला समस्या मानणार नाही, परंतु मला असे वाटत नाही. एखाद्या व्यक्तीने माझ्याशी केलेल्या विश्वासघाताला मी क्षुल्लक बाब मानू शकत नाही आणि मी त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू शकत नाही. आता, जेव्हा मी तुमच्यामध्ये कार्य करत आहे, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे वागत आहात—जर असा दिवस आला जेव्हा तुमच्यावर कोणीही लक्ष ठेवणारा नाही, तर तुम्ही अशा गुंडांसारखे होणार नाही का ज्यांनी स्वतःला त्यांच्या लहान पर्वतांचे राजे घोषित केले आहे? जेव्हा असे घडते व तुम्ही आपत्ती घडवून आणता, तेव्हा तुमच्यानंतर ते सर्व कोण निस्तरेल? तुम्हाला असे वाटते, की विश्वासघाताची काही कृत्ये केवळ अधूनमधून घडलेल्या घटना आहेत, ती तुमची सततची वर्तणूक नाही आणि त्यांची अशा तीव्रतेने चर्चा करणे योग्य नाही, ज्यामुळे तुमचा अभिमान दुखावला जाईल. जर तुम्हाला खरोखर असे वाटत असेल, तर तुम्हाला समज नाही. असा विचार करणे म्हणजे बंडखोरीचा नमुना व छाप आहे. मनुष्याचा स्वभाव म्हणजे त्याचे जीवन; या तत्त्वावर तो जगण्यासाठी अवलंबून असतो आणि तो हे बदलू शकत नाही. विश्वासघात करण्याचा स्वभाव हे उदाहरण म्हणून घ्या. जर तू एखाद्या नातेवाईकाचा किंवा मित्राचा विश्वासघात करण्यासाठी काही करू शकत असशील, तर हे सिद्ध होते की तो तुझ्या जीवनाचा एक भाग आहे व तुझा स्वभाव जन्मजात तसाच आहे. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला इतरांकडून चोरी करण्यात आनंद होत असेल, तर चोरीचा हा आनंद त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे, जरी ते कधीकधी चोरी करतात आणि कधीकधी करत नाहीत तरीही. ते चोरी करोत किंवा न करोत, हे सिद्ध करू शकत नाही की चोरी ही त्यांची केवळ एक प्रकारची वर्तणूक आहे. उलट, हे सिद्ध होते की चोरी करणे हा त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे—म्हणजेच त्यांचा स्वभाव आहे. काहीजण विचारतील: हा त्यांचा स्वभाव आहे, मग जेव्हा ते चांगल्या गोष्टी पाहतात, तेव्हा काही वेळा ते चोरी करत नाहीत, असे का? उत्तर अगदी सोपे आहे. त्यांनी चोरी न करण्याची अनेक कारणे आहेत. ते एखादी गोष्ट चोरू शकत नाहीत, कारण ती सावध नजरेसमोरून हिसकावून घेण्यासाठी खूप मोठी आहे किंवा ही कृती करण्यासाठी योग्य वेळ नाही अथवा एखादी गोष्ट खूप महाग आहे, खूप कडक पहाऱ्यात ठेवली आहे किंवा कदाचित त्यांना त्यात काही विशेष स्वारस्य नाही अथवा त्याचा काय उपयोग होऊ शकतो हे त्यांना दिसत नाही आणि अशी बरीच कारणे. ही सर्व संभाव्य कारणे आहेत. परंतु काहीही असो, त्यांनी एखादी गोष्ट चोरली की नाही, यावरून हा विचार केवळ क्षणिक, लगेच निघून जाणारा विचार होता, हे सिद्ध करता येत नाही. त्याउलट, हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे, जो कायमचा बदलणे कठीण आहे. अशा मनुष्याला एकदाच चोरी करून समाधान मिळत नाही; जेव्हा जेव्हा त्यांना काहीतरी छान दिसते किंवा योग्य परिस्थिती येते, तेव्हा इतरांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचे असे विचार उद्भवतात. म्हणूनच माझे असे म्हणणे आहे, की हा विचार अधूनमधून सतत डोक्यात येतो असे काही नाही, परंतु तो विचार या व्यक्तीच्या स्वतःच्या स्वभावातच असतो.
कोणतीही व्यक्ती त्यांचे स्वतःचे शब्द आणि कृती त्यांचा खरा चेहरा दर्शवण्यासाठी वापरू शकते. हा खरा चेहरा म्हणजे अर्थातच त्यांचा स्वभाव असतो. जर तू उद्धटपणे बोलत असशील, तर तुझा स्वभाव उद्धट आहे. जर तुझा स्वभाव धूर्त असेल, तर तू धूर्तपणे वागतोस व इतरांना खूप सहज फसवतोस. जर तुझा स्वभाव वाईट असेल, तर तुझे शब्द ऐकायला आनंददायी वाटतील, पण तुझी कृती तुझ्या वाईट युक्त्या लपवू शकत नाही. जर तुझा स्वभाव आळशी असेल, तर तू जे काही म्हणतोस ते तुझ्या कामचुकारपणा आणि आळशीपणाची जबाबदारी टाळणे आहे व तुझी कृती मंद आणि बेफिकीर असेल व सत्य लपवण्यात पारंगत असेल. जर तुझा स्वभाव सहानुभूतीपूर्ण असेल, तर तुझे शब्द वाजवी असतील आणि तुझी कृतीदेखील सत्याशी सुसंगत असेल. जर तुझा स्वभाव निष्ठावान असेल, तर तुझे शब्द नक्कीच प्रामाणिक असतील व तुझी वागण्याची पद्धत नम्र असेल, तुझ्या स्वामीला अस्वस्थ करणाऱ्या सर्व गोष्टींपासून मुक्त असेल. जर तुझा स्वभाव वासनायुक्त किंवा पैशाचा लोभी असेल, तर तुझे हृदय वारंवार या गोष्टींनी भरले जाईल आणि तू नकळत विचलित करणारे, अनैतिक कृत्य करशील जे लोक सहजासहजी विसरणार नाहीत व त्यामुळे लोकांना तुझा तिरस्कार वाटेल. मी म्हटल्याप्रमाणे, जर तुझा विश्वासघाताचा स्वभाव असेल, तर तू स्वतःला त्यातून बाहेर काढू शकत नाहीस. नशिबावर विश्वास ठेवू नकोस, की जर तू इतरांवर अन्याय केला नसशील तर तुझा विश्वासघात करण्याचा स्वभाव नाही, जर तुला असे वाटत असेल तर, तू खरोखर बंड करत आहेस. माझी सर्व वचने, प्रत्येक वेळी जेव्हा मी बोलतो, तेव्हा ते सर्व लोकांसाठी असते, केवळ एक व्यक्ती किंवा एका प्रकारच्या व्यक्तीसाठी नाही. केवळ एका बाबतीत तू माझा विश्वासघात केला नाहीस म्हणून हे सिद्ध होत नाही, की तू कोणत्याही बाबतीत माझा विश्वासघात करू शकत नाहीस. काही लोक, त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडथळ्यांच्या वेळी, सत्य शोधण्यात त्यांचा आत्मविश्वास गमावतात. काही लोक कौटुंबिक तंट्यांच्या वेळी माझ्याशी एकनिष्ठ राहण्याचे त्यांचे कर्तव्य सोडतात. काही लोक आनंद आणि उत्साहाचे क्षण शोधण्यासाठी माझा त्याग करतात. काही लोक प्रकाशात राहण्यापेक्षा व पवित्र आत्म्याच्या कार्याचा आनंद मिळवण्यापेक्षा अंधःकारमय दरीमध्ये पडणे पसंत करतात. काही लोक संपत्तीची लालसा तृप्त करण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि आताही स्वतःची चूक मान्य करून स्वतःचा मार्ग बदलू शकत नाहीत. काही लोक माझे संरक्षण मिळवण्यासाठी केवळ माझ्या नावाखाली तात्पुरते जगतात, तर काही लोक दबावाखाली माझ्यासाठी स्वतःला अत्यल्प वाहून घेतात, कारण ते जीवनाला चिकटून राहतात व मृत्यूला घाबरतात. या आणि इतर अप्रामाणिक आणि अनैतिक कृती म्हणजे ज्यामुळे लोकांनी त्यांच्या अंतःकरणात माझ्याशी दीर्घकाळ विश्वासघात केला आहे, अशीच वर्तणूक नाही का? अर्थात, मला माहीत आहे, की लोक माझा विश्वासघात करण्यासाठी आगाऊ योजना आखत नाहीत; त्यांचा विश्वासघात हे त्यांच्या स्वभावाचे नैसर्गिक प्रकटीकरण आहे. कोणीही माझा विश्वासघात करू इच्छित नाही व माझा विश्वासघात करण्यासाठी काहीतरी केले आहे, याचा कोणालाही आनंद झालेला नाही. उलट, ते तर भीतीने थरथर कापत आहेत, नाही का? तर, या विश्वासघातांची परतफेड कशी करायची आणि सद्य परिस्थिती कशी बदलायची याचा विचार करत आहात का?