तू असा कोणी आहेस का जो जिवंत झाला आहे?

जेव्हा तुम्ही तुमच्या भ्रष्ट प्रवृत्तींचा त्याग कराल आणि सामान्य माणुसकीतून जीवन जगण्याचा प्रयत्न कराल, तेव्हाच तुम्ही परिपूर्ण व्हाल. जरी तू भविष्याबद्दल किंवा कोणत्याही गूढ गोष्टींबद्दल बोलण्यास असमर्थ असशील, तरी तू जगत असशील आणि तुझ्यातील माणुसकीचे दर्शन घडवत असशील. देवाने मनुष्याला निर्माण केले, परंतु नंतर सैतानाने त्याला भ्रष्ट केले, अशा प्रकारे लोक “मृत” बनले. जर तू स्वत:मध्ये बदल घडवलेस, तर तू यापुढे “मृत मनुष्यासारखा” राहणार नाहीस. देवाची वचनेच लोकांचा आत्मा जागृत ठेवतात आणि त्यांना पुनर्जन्म घेण्यास भाग पाडतात आणि जेव्हा लोकांच्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो तेव्हा ते जिवंत होतात. जेव्हा मी “मृत मनुष्यांबद्दल” बोलतो, तेव्हा मी अशा लोकांबद्दल बोलतो ज्यांना आत्मा नसतो, ज्यांचा आत्मा मृत पावलेला असतो. जेव्हा लोकांच्या मनामध्ये आयुष्य जगण्याची प्रेरणा निर्माण होते, तेव्हा लोक जिवंत होतात. पूर्वी ज्या संतांबद्दल बोलले जायचे ते संत म्हणजे ज्यांचा जन्म झालेला आहे, असे लोक, जे आधी सैतानाच्या प्रभावाखाली होते परंतु त्यांनी सैतानाचा पराभव केला. चीनच्या निवडलेल्या लोकांनी अग्निवर्ण अजगराचा क्रूर, अमानुष छळ आणि फसवणूक सहन केली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आणि त्यांच्यामध्ये जगण्याचे थोडेही धैर्य राहिले नाही. त्यामुळे, त्यांच्या आत्म्याचे प्रबोधन त्यांच्या मूलतत्वापासून झाले पाहिजे: थोडे थोडे करून, त्यांचे मूलतत्त्व, आत्मा जागृत केला गेला पाहिजे. असे केल्यास एक दिवस येईल, जेव्हा त्यांचा जन्म होईल, तेव्हा पुढे कोणताही अडथळा राहणार नाही आणि सर्वकाही सुरळीतपणे पार पडेल. सध्या, हे अशक्य आहे. बहुतेक लोक अशाप्रकारे जगतात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक प्राणघातक घटना घडतात, ते मृत्यूच्या आच्छादनामध्ये अडकतात आणि त्या लोकांमध्ये अनेक प्रकारच्या कमतरता असतात. काही लोकांच्या शब्दांमध्ये मृत्यू असतो, त्यांच्या कृतींमध्ये मृत्यू असतो आणि ते ज्या प्रकारे जीवन जगतात त्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीमध्ये मृत्यू असतो. आज जर लोक, सार्वजनिकपणे देवाची साक्ष देत असतील तर ते या कामात अपयशी ठरतील, कारण त्यांना अजून पूर्णपणे जिवंत व्हायचे आहे आणि तुमच्यामध्ये अजूनही पुष्कळ असे लोक आहेत जे मृत आहेत. आज, काही लोक विचारतात, की देव काही संकेत का देत नाही किंवा चमत्कार का दाखवत नाही, म्हणजे तो त्याचे कार्य परराष्ट्रीय लोकांमध्ये लवकर पसरवू शकेल. मृत लोक देवाची साक्ष देऊ शकत नाही; हे केवळ जिवंत लोकच करू शकतात आणि तरीही आज बहुतेक “मृत मनुष्य” आहेत, अनेकजण मृत्यूच्या आच्छादनाखाली, सैतानाच्या प्रभावाखाली जगतात आणि विजय प्राप्त करू शकत नाही. असे असताना, ते देवाची साक्ष कसे देऊ शकतील? ते सुवार्ता कशी पसरवू शकतील?

जे अंधाराच्या प्रभावाखाली जगतात ते मृत्यूच्या छायेत जगतात आणि ते सैतानाच्या ताब्यात असतात. देवाद्वारे बचाव केल्याशिवाय आणि देवाकडून न्याय आणि ताडण झाल्याशिवाय लोक मृत्यूच्या प्रभावातून सुटू शकत नाहीत, ते जिवंत होऊ शकत नाहीत. हे “मृत मनुष्य” देवाची साक्ष देऊ शकत नाहीत आणि देवाकडून त्यांचा उपयोग केला जाऊ शकत नाहीत आणि जे देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देवाला जिवंत लोकांची साक्ष हवी असते, मृत लोकांची नाही आणि देवाची इच्छा असते, की मृत नाही, तर जिवंत लोकांनी त्याच्यासाठी काम करावे. “मृत” ते आहेत जे देवाचा विरोध आणि बंड करतात; ज्यांचा आत्मा बधिर झाला आहे आणि ज्यांना देवाची वचने समजत नाहीत, जे सत्य आचरणात आणत नाहीत आणि ज्यांच्या मनात देवाप्रति थोडीशीही निष्ठा नसते, जे सैतानाच्या अधिपत्याखाली राहतात आणि सैतानाने त्यांचे शोषण केले आहे. मृत लोक सत्याच्या विरोधात उभे राहून, देवाविरोधात बंड करून, निंद्य, द्वेषपूर्ण, क्रूर, कपटी, विश्वासघातकी आणि हळूहळू हानी करणारे बनून स्वत:ला उघड करतात. असे लोक देवाच् वचनांचे सेवन आणि प्राशन करू शकत असले, तरी ते त्या वचनाला जागू शकत नाहीत. ते जिवंत असले तरीही ते केवळ चालते फिरते मृतदेह आहेत. मृत लोक देवाला संतुष्ट करण्यात पूर्णपणे असमर्थ असतात, देवाप्रति आज्ञाधारक तर मुळीच नसतात. ते केवळ देवाची फसवणूक करू शकतात, त्याची निंदा करतात, त्याचा विश्वासघात करतात आणि ते त्यांच्या जगण्यातून सैतानाचे स्वरूप प्रकट करतात. जर लोकांना जिवंत प्राणी बनायचे असेल आणि देवाची साक्ष द्यायची असेल व देवाची मान्यता मिळवायची असेल, तर त्यांनी देवाचे तारण स्वीकारले पाहिजे; त्यांनी आनंदाने त्याच्या न्याय आणि ताडणांना अधीन गेले पाहिजे व देवाची छाटणी आणि त्याची वर्तणूक आनंदाने स्वीकारले पाहिजे. त्यानंतरच ते देवाला आवश्यक असलेली सर्व सत्ये आचरण्यात आणण्यात सक्षम होतील आणि तेव्हाच त्यांना देवाकडून तारण प्राप्त होईल आणि ते खऱ्या अर्थाने जिवंत प्राणी होतील. जे जिवंत आहेत त्यांना देवाने तारले आहे, त्यांना देवाने न्याय दिला आहे आणि त्यांचे ताडण केले आहे, ते देवासाठी स्वतःला अर्पण करण्यास तयार आहेत आणि ते त्यांचे संपूर्ण आयुष्य आनंदाने देवाला समर्पित करतील. जेव्हा एखादा जिवंत मनुष्य देवाची साक्ष देतो फक्त तेव्हाच सैतानाला लज्जित करता येते. केवळ जिवंत लोकच देवाच्या सुवार्तेच्या कार्याचा प्रसार करू शकतात, केवळ जिवंत लोकच देवाच्या हृदयात आहेत आणि केवळ जिवंत लोकच खरे आहेत. सर्वात आधी देवाने बनवलेला मनुष्य जिवंत होता, पण सैतानाच्या भ्रष्टतेमुळे मनुष्य मृत्यूच्या छायेमध्ये आणि सैतानाच्या प्रभावाखाली जगतो आणि अशाप्रकारे लोक आत्मा नसल्यामुळे मृत झाले आहेत, ते देवाला विरोध करणारे शत्रू बनले आहेत, ते सैतानाच्या हातचे साधन बनून त्याचे बंदीवान बनले आहेत. देवाने निर्माण केलेले सर्व जिवंत लोक मृत बनले आहेत आणि म्हणून देवाने त्यांची साक्ष गमावली आहे आणि मानवजात गमावली आहे जी देवाने निर्माण केली आहे आणि केवळ ज्यामध्ये देवाचा श्वास आहे. जर देवाला त्याची साक्ष परत मिळवायची असेल आणि देवाने स्वतःच्या हाताने निर्माण केलेल्या पण आता सैतानाच्या ताब्यात गेलेल्या लोकांना परत घ्यायचे असेल तर, देवाने त्यांचे पुनरूत्थान केले पाहिजे म्हणजे ते पूर्णपणे जिवंत होतील आणि देवाने त्यांच्यावर पुन्हा ताबा मिळवला पाहिजे म्हणजे ते देवाच्या प्रकाशात जगतील. मृत ते आहेत ज्यांच्यामध्ये आत्मा नाही, जे अत्यंत बधिर आहेत आणि ज्यांचा देवाला विरोध आहे. ते बहुतांश ते आहेत जे लोक देवाला ओळखत नाहीत. या लोकांचा देवाची आज्ञा पाळण्याचा किंचितही हेतू नसतो, ते केवळ देवाविरूद्ध बंड करतात, त्याला विरोध करतात आणि अशा लोकांना देवाप्रति थोडीशीही निष्ठा नसते. जिवंत ते आहेत ज्यांच्या आत्म्याने पुनर्जन्म घेतलेला आहे, ज्यांना देवाची आज्ञा पाळणे म्हणजे काय ते माहीत आहे आणि जे देवाप्रती एकनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे सत्य आणि साक्ष आहे आणि असे लोक एकटेच देवाला त्याच्या घरी प्रसन्न करून घेतात. देव अशा लोकांना तारतो जे पूर्णपणे जिवंत होऊ शकतात, जे देवाने दिलेले तारण पाहू शकतात, जे त्याच्याशी एकनिष्ठ राहू शकतात आणि जे देवाला शोधण्यास इच्छुक असतात. जे लोक देवाच्या अवतारावर आणि स्वरूपावर विश्वास ठेवतात त्यांना तो तारतो. काही लोक जिवंत होऊ शकतात तर काही लोक होऊ शकत नाही; हे त्यांच्यातील गुणधर्माला वाचवले जाऊ शकते किंवा नाही यावर अवलंबून असते. अनेक लोकांनी देवाची अनेक वचने ऐकली असली तरी देवाची इच्छा ते समजू शकत नाहीत आणि ती आचरणात आणण्यात अजूनही असमर्थ आहेत. असे लोक कोणतेही सत्य जगण्यात असमर्थ असतात आणि ते देवाच्या कार्यात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करतात. असे लोक देवासाठी कोणतेही काम करण्यास असमर्थ असतात, ते देवाला काहीही अर्पित करू शकत नाहीत आणि ते लोक चर्चचे पैसे गुप्तपणे खर्च करतात आणि देवाच्याच घरी मोफत खातात. असे लोक मृत आहेत आणि ते देवाकडून तारलेही जाणार नाहीत. देवाचे कार्य करत असलेल्या सर्वांना देव वाचवतो, परंतु लोकांचा असा एक गट आहे ज्यांना देवाकडून तारण प्राप्त होत नाही, खूप कमी लोकांना देवाकडून तारण प्राप्त होते. याचे कारण असे, की बहुतेक लोक खूप खोलवर भ्रष्ट झाले आहेत, यामुळेच ते मृत झाले आहेत आणि ते तारण प्राप्त करण्याच्या पलीकडे गेले आहेत; सैतानाने त्यांचे पूर्णपणे शोषण केले आहे आणि ते स्वभावाने खूप द्वेषपूर्ण आहेत. ते अल्पसंख्य लोक देवाची आज्ञा पूर्णपणे पाळण्यासदेखील असमर्थ आहेत. त्या लोकांचा सुरुवातीपासून देवावर पूर्ण विश्वास नाही किंवा त्यांचे सुरुवातीपासून देवावर नितांत प्रेम नाही, तर देवाच्या विजयाच्या कार्यामुळे ते त्याचे आज्ञाधारक बनले आहेत, ते देवाला त्याच्या सर्वोच्च प्रेमामुळे ओळखतात, देवाच्या नीतिमान प्रवृत्तीमुळे त्यांच्या प्रवृत्तीत बदल होतात आणि ते देवाला त्याच्या कार्यामुळे ओळखतात, देवाचे कार्य जे वास्तविक आणि सामान्य दोन्ही असते. देवाचे हे कार्य नसते, तर हे लोक कितीही चांगले असले, तरीही ते सैतानाच्याच ताब्यात असते, ते अजूनही मृत असते आणि मृतच राहिले असते. हे लोक देवाकडून आज तारण प्राप्त करू शकतात, कारण ते देवाला सहकार्य करण्यास इच्छुक आहेत.

देवाप्रति असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे, पूर्णपणे जिवंत झालेल्या लोकांना देवाकडून प्राप्त केले जाईल आणि ते देवाच्या वचनानुसार जगतील आणि देवाच्या विरोधात गेल्यामुळे मृत लोकांना देवाचा तिरस्कार सहन करावा लागेल आणि ते देवाकडून नाकारले जातील आणि ते लोक देवाच्या शिक्षेमध्ये आणि शापामध्ये जगतील. देवाची प्रवृत्ती ही अशी नीतिमान आहे जी कोणत्याही मनुष्याला बदलता येणार नाही. त्यांच्या स्वत:च्या शोधामुळे, लोकांना देवाची मान्यता मिळते आणि ते त्याच्या प्रकाशात राहतात; त्यांच्या धूर्त योजनांमुळे, देव लोकांना शाप देतो आणि त्यांना शिक्षा भोगावी लागते; त्यांच्या दुष्कृत्यामुळे, लोकांना देवाकडून शिक्षा होते आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि निष्ठेमुळे, लोकांना देवाचे आशीर्वाद मिळतात. देव नीतिमान आहे: त्याने जिवंत लोकांना आशीर्वाद दिले आणि मृत लोकांना शाप दिले जेणेकरून, ते नेहमी मृत्यूच्या मध्यभागी राहतील आणि देवाच्या प्रकाशात कधीही जगणार नाहीत. देव जिवंत लोकांना सदैव त्यांच्यासोबत राहता यावे म्हणून त्याच्या राज्यात घेऊन जाईल आणि नेहमी त्यांना आशीर्वाद देईल. पण मृत लोकांना, तो त्यांना यातना देईल आणि नरकात पाठवेल, ते त्याच्या नाशाचे लक्ष्य आहेत आणि ते लोक नेहमी सैतानाचेच राहतील. देव कोणावरही अन्याय करत नाही. जे लोक खरोखरच देवाचा शोध घेतात ते सर्व देवाच्या घरात नक्कीच राहतील आणि जे देवाची आज्ञा मानत नाहीत आणि त्याच्याशी विसंगत आहेत ते सर्व नक्कीच त्याच्या शिक्षेत जगतील. कदाचित तुला देवाच्या देहातील कार्याबद्दल खात्री नसेल—पण एके दिवशी, देवाचा देह मनुष्याच्या मृत्युची व्यवस्था करणार नाही तर त्याऐवजी त्याचा आत्मा मनुष्याच्या गंतव्यस्थानाची व्यवस्था करेल आणि त्या वेळेस मनुष्याला कळेल, की देवाचा देह आणि आत्मा एकच आहे, देवाचा देह चूक करू शकत नाही आणि त्याचा आत्मा तर चूक करणे शक्यच नाही. अखेरीस, जे पूर्णपणे जिवंत झाले आहेत, त्यांना देव नक्कीच आपल्या राज्यात स्थान देईल. पण मृत लोकांसाठी, जे अजूनही पूर्णपणे जिवंत झाले नाहीत त्यांना देव सैतानाच्या गुहेत फेकून देईल.

मागील:  सत्याने आचरण न करणाऱ्या लोकांसाठी इशारा

पुढील:  अपरिवर्तित प्रवृत्ती असणे म्हणजे देवाशी शत्रुत्व असणे आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger