तू येशूचे आध्यात्मिक शरीर पाहाशील तेव्हा, देवाने स्वर्ग आणि पृथ्वी नव्याने निर्माण केलेली असेल

तुला येशूला पाहायचे आहे का? तुला येशूसोबत राहायचे आहे का? तुला येशूने सांगितलेली वचने ऐकायची आहेत का? जर असे असेल, तर तू येशूच्या पुनरागमनाचे स्वागत कसे करशील? तू पूर्णपणे तयार आहेस का? तू कोणत्या पद्धतीने येशूच्या पुनरागमनाचे स्वागत करशील? मला असे वाटते, की येशूचे अनुसरण करणारे प्रत्येक भाऊ आणि बहीण त्याचे चांगले स्वागत करू इच्छित आहेत. परंतु तुम्ही या गोष्टींचा विचार केला आहे का: येशूचे पुनरागमन झाल्यावर तू त्याला खरोखर ओळखशील का? तो जे काही बोलतो त्याचे तुम्हाला खरोखरच पूर्णपणे आकलन होईल का? तो जे कार्य करतो ते सर्व तुम्ही कोणत्याही अटींशिवाय खरोखर स्वीकाराल का? ज्यांनी बायबल वाचले आहे त्यांना येशूच्या पुनरागमनाबद्दल माहीत आहे आणि ज्यांनी बायबल वाचले आहे ते सर्व त्याच्या येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही सर्वजण तो क्षण येण्याची आतुरतेने वाट पाहत आहात व तुमचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे, तुमची श्रद्धा खरोखरच हेवा करण्याजोगी आहे, पण तुम्ही एक गंभीर चूक केली असल्याची तुम्हाला जाणीव आहे का? येशू पुनरागमन कसे करेल? तुमचा विश्वास आहे, की येशू पांढर्‍या मेघावर बसून परत येईल, परंतु मी तुम्हाला विचारत आहे: हा पांढरा मेघम्हणजे काय? येशूचे अनेक अनुयायी त्याच्या परत येण्याची वाट पाहत असताना, तो कोणत्या लोकांमध्ये अवतरेल? जर येशू तुमच्यामध्ये पहिले अवतरला, तर इतरांना हे अत्यंत अन्यायकारक वाटणार नाही का? मला माहीत आहे, की तुम्ही येशूप्रति प्रामाणिक आणि निष्ठावान आहात, पण तुम्ही येशूला कधी भेटलात का? त्याची प्रवृत्ती तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही कधी त्याच्याबरोबर राहिला आहात का? तुम्हाला त्याच्याबद्दल खरोखर किती समजते? काही जण म्हणतील, की ही वचने त्यांना एका विचित्र संकटात टाकतात. ते म्हणतील, “मी अनेक वेळा बायबल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचले आहे. मी येशूला कसे समजू शकणार नाही? येशूच्या प्रवृत्तीचे तर राहूच द्या—त्याला कोणत्या रंगाचे कपडे घालायला आवडायचे तेदेखील मला माहीत आहे. जेव्हा तू म्हणतोस, की मला तो समजत नाही तेव्हा तू मला तुच्छ लेखत नाहीस का?” मी असे सुचवत आहे, की तू या मुद्द्यांवर वाद घालू नकोस; पुढील प्रश्नांबद्दल शांत राहून सहभागिता करणे चांगले आहे: सर्वप्रथम, वास्तविकता काय आहे आणि सिद्धांत काय आहे हे तुला माहीत आहे का? दुसरे म्हणजे, धारणा म्हणजे काय व सत्य म्हणजे काय हे तुला माहीत आहे का? तिसरे म्हणजे, काल्पनिक काय आहे आणि वास्तविक काय आहे हे तुला माहीत आहे का?

काही लोक हे सत्य नाकारतात, की त्यांना येशू समजत नाही. आणि तरीही मी म्हणत आहे, की तुम्हाला तो किंचितही समजत नाही व येशूच्या एकाही वाचनाचे पूणर्पणे आकलन झालेले नाही. कारण तुमच्यापैकी प्रत्येकजण बायबलमधील वृत्तांतांमुळे, इतरांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे अनुसरण करतो. तुम्ही येशूला कधीही पाहिले नाही, त्याच्यासोबत राहणे तर दूरच व तुम्ही त्याला थोड्या काळासाठीही सोबत ठेवलेले नाही. अशाप्रकारे, तुमची येशूबद्दलची समज हा केवळ एक सिद्धांत नाही का? त्यामध्ये वास्तविकतेची कमी नाही का? कदाचित काही लोकांनी येशूचे चित्र पाहिले असेल किंवा काहींनी स्वतः येशूच्या घरी भेट दिली असेल. कदाचित काहींनी येशूच्या कपड्यांना स्पर्श केला असेल. जरी येशूने स्वतः सेवन केलेले अन्न तुम्ही चाखले असेल, तरीही तुझी त्याच्याबद्दलची समज सैद्धांतिक आहे आणि व्यावहारिक नाही. काहीही असो, तू येशूला कधीही पाहिले नाहीस व तुम्ही दैहिक स्वरुपात कधीही त्याच्या सहवासात राहिलेले नाही आणि म्हणून तुझी येशूबद्दलची समज नेहमीच रिक्त सिद्धांत असेल ज्यामध्ये वास्तविकता नसेल. कदाचित माझ्या शब्दांमध्ये तुला फारसे स्वारस्य नसेल, परंतु मी तुला हे विचारत आहे: तू ज्या लेखकाची सर्वात जास्त प्रशंसा करतोस त्या लेखकाचे अनेक लेख तू वाचले असशील, तरीही तू त्याच्यासोबत वेळ न घालवता त्याला पूर्णपणे समजून घेऊ शकतोस का? त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे तुला माहीत आहे का? तो कोणत्या प्रकारचे जीवन जगतो हे तुला माहीत आहे का? तुला त्याच्या भावनिक अवस्थेबद्दल काही माहीत आहे का? तू ज्याची प्रशंसा करतोस अशा मनुष्यालादेखील तू पूर्णपणे समजू शकत नाहीस, मग तू येशू ख्रिस्ताला कसे समजू शकतोस? तुला येशूबद्दल जे काही समजते ते सर्व काल्पनिक गोष्टी व धारणांनी भरलेले आहे आणि त्यात कोणतेही सत्य किंवा वास्तविकता नाही. ते अत्यंत तिरस्कारणीय व मांसाने भरलेले आहे. अशी समज तुला येशूच्या पुनरागमनाचे स्वागत करण्यास कशी पात्र ठरवू शकते? जे काल्पनिक गोष्टी आणि देहाच्या धारणांनी भरलेले आहेत त्यांना येशू स्वीकारणार नाही. ज्यांना येशू समजत नाही ते त्याच्यावर विश्वास ठेवण्यास कसे पात्र असतील?

परुश्यांनी येशूला विरोध का केला याचे मूळ कारण तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? तुम्हाला परुश्यांचे मूलतत्त्व जाणून घ्यायचे आहे का? त्यांच्या अंतःकरणामध्ये मशीहाविषयी काल्पनिक गोष्टी होत्या. इतकेच काय, मशीहा येईल फक्त यावर त्यांचा विश्वास होता, तरीही त्यांनी जीवनाच्या सत्याचा पाठपुरावा केला नाही. आणि म्हणूनच, आजही ते मशीहाची वाट पाहत आहेत, कारण त्यांना जीवनाच्या मार्गाबद्दल ज्ञान नाही व सत्याचा मार्ग काय आहे हे त्यांना माहीत नाही. तुम्ही म्हणाल, अशा मूर्ख, हट्टी आणि अज्ञानी लोकांना देवाचा आशीर्वाद कसा मिळू शकेल? ते मशीहाला कसे पाहू शकतील? त्यांनी येशूला विरोध केला कारण त्यांना पवित्र आत्म्याच्या कार्याची दिशा माहीत नव्हती, कारण त्यांना येशूने उच्चारलेल्या सत्याचा मार्ग माहीत नव्हता व त्याशिवाय, त्यांना मशीहा समजला नव्हता. आणि त्यांनी मशीहाला कधीच पाहिले नसल्यामुळे व ते कधीही मशीहाच्या सहवासात नसल्यामुळे त्यांनी मशीहाच्या मूलतत्त्वाला सर्व प्रकारे विरोध करून केवळ मशीहाच्या नावाला चिकटून राहण्याची चूक केली. हे परुशी मूलतः हट्टी, गर्विष्ठ होते आणि सत्याचे पालन करत नव्हते. देवावरील त्यांच्या विश्वासाचे तत्त्व असे होते: तुझा उपदेश कितीही सखोल असला, तुझा अधिकार कितीही उच्च असला तरीही, जोपर्यंत तुला मशीहा म्हटले जात नाही तोपर्यंत तू ख्रिस्त नाहीस. हा विश्वास निंदनीय व हास्यास्पद नाही का? मी तुम्हाला पुढे विचारत आहे: तुम्हाला येशूबद्दल किंचितही समज नसताना, अगदी सुरुवातीच्या परुश्यांनी केलेल्या चुका करणे तुमच्यासाठी सोपे नाही का? तू सत्याचा मार्ग स्पष्टपणे ओळखू शकतोस का? तू ख्रिस्ताला विरोध करणार नाहीस याची तू खरोखर हमी देऊ शकतोस का? तू पवित्र आत्म्याच्या कार्याचे अनुसरण करू शकतोस का? जर तुला माहीत नसेल, की तू ख्रिस्ताला विरोध करणार की नाही, तर माझे असे म्हणणे आहे की तू आधीच मृत्यूच्या उंबरठ्यावर जगत आहात. जे लोक मशीहाला ओळखत नव्हते ते सर्व येशूला विरोध करण्यास, येशूला नाकारण्यास, त्याची निंदा करण्यास समर्थ होते. ज्या लोकांना येशू समजत नाही ते सर्व त्याला नाकारण्यास आणि त्याची निंदा करण्यास समर्थ आहेत. शिवाय, ते येशूच्या पुनरागमनाकडे सैतानाची फसवणूक म्हणून पाहण्यास समर्थ आहेत व आणखी लोक देहात परतलेल्या येशूचा निषेध करतील. तुम्हाला या सगळ्याची भीती वाटत नाही का? तुम्हाला ज्याला सामोरे जावे लागेल ती पवित्र आत्म्याची निंदा असेल, पवित्र आत्म्याने चर्चसाठी उच्चारलेल्या वचनांचा सर्वनाश असेल आणि येशूने व्यक्त केलेल्या सर्व गोष्टींचा त्याग असेल. जर तुम्ही इतके गोंधळलेले असाल तर तुम्ही येशूकडून काय प्राप्त करणार आहात? जर तुम्ही तुमच्या चुका लक्षात घेण्यास हट्टाने नकार दिला, तर येशू जेव्हा पांढऱ्या मेघावर बसून परत येईल तेव्हा त्याचे कार्य तुम्ही कसे समजू शकाल? माझे तुम्हाला सांगणे आहे: जे लोक सत्य स्वीकारत नाहीत, तरीही पांढर्‍या मेघांवर बसून येणाऱ्या येशूची आंधळेपणाने वाट पाहतात, ते नक्कीच पवित्र आत्म्याची निंदा करतील आणि हा अशा लोकांचा वर्ग आहे ज्यांचा नाश होणार आहे. तुम्ही केवळ येशूच्या कृपेची इच्छा बाळगता व केवळ स्वर्गातील अतिसुखी राज्याचा आनंद घेऊ इच्छिता, तरीही तुम्ही येशूने सांगितलेली वचने कधीच पाळली नाहीत आणि येशू देहात परतल्यावर त्याने व्यक्त केलेले सत्य कधीही प्राप्त केले नाही. पांढर्‍या मेघावर बसून परत येण्याच्या येशूच्या वस्तुस्थितीच्या बदल्यात तुम्ही काय देणार आहात? ज्या प्रामाणिकपणाने तुम्ही वारंवार पापे करता आणि नंतर वारंवार तुम्ही कबुल करता ते देणार आहात का? पांढर्‍या मेघावर बसून परत येणाऱ्या येशूला तुम्ही अर्पण म्हणून काय वाहाल? तुम्ही स्वतःला ज्या कार्याबद्दल मोठे म्हणवता ते वर्षानुवर्षे केलेले कार्य अर्पण करणार आहात का? परत आलेल्या येशूने तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही त्याला काय देणार आहात? कुठल्याही सत्याचे पालन न करण्याचा हा तुमचा उद्धट स्वभाव आहे का?

तुमची निष्ठा केवळ शब्दात आहे, तुमचे ज्ञान केवळ बौद्धिक व वैचारिक आहे, तुमचे श्रम स्वर्गाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहेत आणि म्हणूनच तुमची श्रद्धा कशी असली पाहिजे? आजही, तुम्ही सत्याच्या प्रत्येक शब्दाकडे दुर्लक्ष करता. देव म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही, ख्रिस्त म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही, यहोवाचा आदर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नाही, पवित्र आत्म्याच्या कार्यात प्रवेश कसा करायचा हे तुम्हाला माहीत नाही आणि खुद्द देवाचे कार्य व मनुष्याची फसवणूक यांमध्ये फरक कसा करावा हे तुम्हाला माहीत नाही. तुझ्या स्वतःच्या विचारांशी सुसंगत नसलेल्या अशा देवाने व्यक्त केलेल्या सत्याच्या प्रत्येक वचनाचा निषेध करणे तुला माहीत आहे. तुझी विनम्रता कुठे आहे? तुझे आज्ञापालन कुठे आहे? तुझी निष्ठा कुठे आहे? सत्य शोधण्याची तुझी इच्छा कुठे आहे? देवाविषयी तुझा आदर कुठे आहे? माझे तुम्हाला सांगणे आहे, जे संकेतांमुळे देवावर विश्वास ठेवतात ते निश्चितपणे नष्ट होणाऱ्या वर्गामधील आहेत. जे लोक देहात धारण केलेल्या येशूची वचने प्राप्त करण्यास असमर्थ आहेत ते नक्कीच नरकाचे संतान आहेत, आद्यदिव्यदूताचे वंशज आहेत, असा वर्ग ज्याचा अनंतकाळी सर्वनाश केला जाईल. मी काय म्हणत आहे याची अनेकांना पर्वा नसेल, पण तरीही येशूचे अनुसरण करणार्‍या प्रत्येक तथाकथित संताला मी सांगू इच्छित आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी येशूला पांढर्‍या मेघावर बसून स्वर्गातून उतरताना पाहाल, तेव्हा हे नीतिमत्वाच्या सूर्याचे सार्वजनिक दर्शन असेल. कदाचित तो तुझ्यासाठी खूप उत्साहाचा काळ असेल, तरीही तुला हे माहीत असले पाहिजे, की जेव्हा तू येशूला स्वर्गातून खाली येताना पाहाशील तेव्हा ही वेळ तू शिक्षा भोगण्यासाठी नरकात जाण्याचीदेखील वेळ असेल. ती देवाच्या व्यवस्थापन योजनेच्या समाप्तीची वेळ असेल आणि तेव्हाच देव चांगल्या लोकांना बक्षीस देईल व दुष्टांना शिक्षा करेल. कारण जेव्हा केवळ सत्याची अभिव्यक्ती असेल तेव्हा मनुष्याला संकेत दिसण्यापूर्वीच देवाचा न्याय संपलेला असेल. जे सत्य स्वीकारतात आणि संकेत शोधत नाहीत व अशा प्रकारे शुद्ध झाले आहेत, ते देवाच्या सिंहासनासमोर परतलेले असतील आणि निर्माणकर्त्यासोबत अंतर्भूत होतील. “पांढऱ्या मेघावर स्वार न होणारा येशू हा खोटा ख्रिस्त आहे” या विश्वासावर टिकून राहणाऱ्यांनाच अनंतकाळी शिक्षेला सामोरे जावे लागेल, कारण ते केवळ संकेत दाखवणाऱ्या येशूवरच विश्वास ठेवतात, परंतु कठोर निर्णयाची घोषणा करणाऱ्या आणि सत्याचा मार्ग व जीवन देणाऱ्या येशूला मानत नाहीत. आणि म्हणूनच फक्त असे होऊ शकते, की जेव्हा येशू उघडपणे पांढर्‍या मेघावर बसून परत येईल तेव्हाच त्यांच्याशी व्यवहार करेल. ते खूप हट्टी, स्वतःवर खूप विश्वास असलेले, खूप गर्विष्ठ आहेत. अशा अधःपतनांना येशूकडून बक्षीस कसे मिळू शकते? जे सत्य स्वीकारण्यास समर्थ आहेत त्यांच्यासाठी येशूचे पुनरागमन हे एक मोठे तारण आहे, परंतु जे सत्य स्वीकारण्यास असमर्थ आहेत त्यांच्यासाठी हे निषेधाचे लक्षण आहे. तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा आणि पवित्र आत्म्याची निंदा करू नये व सत्य नाकारू नये. तुम्ही अज्ञानी आणि गर्विष्ठ व्यक्ती बनू नये, परंतु पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचे पालन करणारी व सत्याची तळमळ आणि शोध घेणारी व्यक्ती बनावे; फक्त अशा प्रकारे तुम्हाला लाभ होईल. मी तुम्हाला देवावर विश्वास ठेवण्याच्या मार्गावर काळजीपूर्वक चालण्याचा सल्ला देत आहे. थेट निष्कर्षांपर्यंत जाऊ नका; इतकेच काय, देवावरच्या तुमच्या विश्वासात बेफिकीर व अविचारी होऊ नका. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की किमान जे देवावर विश्वास ठेवतात त्यांनी नम्र आणि आदरणीय असले पाहिजे. ज्यांनी सत्य ऐकले व तरीही त्याला नाक मुरडले, ते मूर्ख आणि अडाणी आहेत. ज्यांनी सत्य ऐकले आहे आणि तरीही निष्काळजीपणे निष्कर्षांपर्यंत उडी मारली आहे किंवा त्याचा निषेध केला आहे ते अहंकाराने ग्रासलेले आहेत. येशूवर विश्वास ठेवणारा कोणीही इतरांना शाप देण्यास अथवा त्यांची निषेध करण्यास पात्र नाही. तुम्ही सर्वांनी समजूतदार व सत्य स्वीकारणारे असले पाहिजे. कदाचित, सत्याचा मार्ग ऐकून आणि जीवनाचे वचन वाचून, तुझा असा विश्वास आहे, की या १०,००० वचनांपैकी फक्त एकच वचन तुझ्या मतांशी व बायबलशी सुसंगत आहे आणि मग तू या वचनांमधील १०,००० व्या वचनामध्ये शोध पुढे सुरू ठेवला पाहिजेस. मी तुला अजूनही नम्र राहण्याचा सल्ला देत आहे, अतिआत्मविश्वास ठेवू नकोस व स्वतःबद्दल खूप बढाई मारू नकोस. तू अंतःकरणात देवाप्रति थोडा जरी आदर बाळगलास तरी तुला अधिक प्रकाश प्राप्त होईल. जर तू या वचनांचे बारकाईने परीक्षण केलेस आणि वारंवार चिंतन केलेस तर ते सत्य आहेत की नाही व ते जीवन आहेत की नाही हे तुला समजेल. कदाचित, फक्त काही वाक्ये वाचून, काही लोक या वचनांचा आंधळेपणाने निषेध करतील, असे म्हणतील, की “हे पवित्र आत्म्याच्या ज्ञानप्राप्तीशिवाय काही नाही” किंवा, “हा खोटा ख्रिस्त लोकांना फसवण्यासाठी आला आहे”. असे बोलणारे अज्ञानाने आंधळे झालेले असतात! तुला देवाचे कार्य आणि शहाणपण फारच कमी समजते व मी तुला पुन्हा सुरवातीपासून सुरुवात करण्याचा सल्ला देत आहे! शेवटच्या दिवसांत खोटे ख्रिस्त प्रकट झाल्यामुळे देवाने व्यक्त केलेल्या वचनांचा तुम्ही आंधळेपणाने निषेध करू नये आणि तुम्हाला फसवणुकीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पवित्र आत्म्याची निंदा करणारे बनू नये. ही मोठी खेदाची गोष्ट नाही का? जर बऱ्याच तपासणीनंतरदेखील तुझा असा विश्वास असेल, की ही वचने सत्य नाहीत, मार्ग नाहीत व देवाची अभिव्यक्ती नाहीत, तर शेवटी तुला शिक्षा होईल आणि तू आशीर्वादांपासून वंचित राहशील. जर तू इतके सरळ आणि स्पष्टपणे सांगितलेले सत्य स्वीकारू शकत नाहीस, तर तू देवाच्या तारणासाठी अयोग्य नाहीस का? तू देवाच्या सिंहासनासमोर परत येण्याइतपत आशीर्वाद नसलेला नाहीस का? याचा विचार कर! अविचारी आणि उतावीळ होऊ नकोस व देवावरील विश्वासाला खेळ मानू नकोस. तुझ्या गंतव्यस्थानासाठी, तुझ्या संभाव्यतांसाठी, तुझ्या जीवनासाठी विचार कर आणि स्वतःशी खेळू नकोस. तू ही वचने स्वीकारू शकतोस का?

मागील:  देव आणि मनुष्य एकत्र विश्रांतीमध्ये प्रवेश करतील

पुढील:  जे ख्रिस्ताशी विजोड आहेत ते नक्कीच देवाचे विरोधक आहेत

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger