राज्याचे गौरवगीत

असंख्य लोक माझा जयजयकार करतात, असंख्य लोक माझी स्तुती करतात; सर्व मुखे एकाच सच्च्या देवाचा नामोच्चार करतात, सर्व लोक माझी कृत्ये पाहण्यासाठी नजर लावून बसतात. राज्य मनुष्यांच्या जगावर उतरते, माझे व्यक्तित्व समृद्ध आणि विपुल आहे. याचा कोणाला हर्ष होणार नाही? यामुळे कोण आनंदाने नाचणार नाही? हे झिऑन! तुझी विजयपताका उंचावून माझा विजयोत्सव साजरा कर! माझ्या पवित्र नामाचा प्रसार करण्यासाठी तुझे विजयगीत गा! हे पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या सृष्टी! स्वतःला स्वच्छ करण्यासाठी त्वरा कर जेणेकरून तू मला अर्पण केली जाऊ शकशील! स्वर्गस्थ तारकापुंजांनो! नभामध्ये माझी शक्तिशाली सत्ता दाखवण्यासाठी त्वरेने आपल्या जागी परत जा! पृथ्वीवरचे लोक त्यांच्या गीतातून माझ्याप्रति असलेले प्रेम आणि आदर पुरेपूर व्यक्त करतात, त्यांचे आवाज मी कान देऊन ऐकतो! सर्व सृष्टी पुनर्जात होत असताना या दिवशी, मी मनुष्यांच्या जगात अवतरतो. या क्षणी, नेमक्या या टप्प्यावर, सर्व फुलांना उत्फुल्ल बहर येतो, सर्व पक्षी एका सुरात गातात, सर्व गोष्टी आनंदभरित होतात! राज्याच्या सलामीच्या आवाजाने सैतानाचे राज्य उलथून पडते, राज्याच्या विजयगीताच्या दुमदुमण्याने नष्ट होते, पुन्हा कधीही न उठण्यासाठी!

पृथ्वीवरील कोणाची उठून प्रतिकार करण्याची हिम्मत आहे? मी जेव्हा पृथ्वीवर येतो, तेव्हा मी ज्वलन घेऊन येतो, क्रोध घेऊन येतो, सर्व प्रकारची संकटे घेऊन येतो. पृथ्वीवरील राज्ये ही आता माझे राज्य आहे! वर आकाशात, ढग गडगडतात; आकाशाखाली, सरोवरे आणि नद्या फुगतात आणि आनंदाने एक उत्फुल्ल धून निर्माण करतात. विसावा घेणारे प्राणी त्यांच्या गुहांमधून बाहेर पडतात आणि मी सर्व लोकांना त्यांच्या गाढ झोपेतून जागे करतो. असंख्य लोक ज्याची वाट पाहात होते, तो दिवस अखेर आला आहे! ते अत्यंत सुंदर गीते मला अर्पण करतात!

या सुंदर क्षणी, या आनंदाच्या वेळी,

वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर सर्वत्र स्तुती ऐकू येते. यामुळे कोण उत्साहित होणार नाही?

कोणाचे हृदय हलके होणार नाही? हे दृश्य पाहून कोण रडणार नाही?

आकाश आता पूर्वीचे आकाश नाही, आता ते राज्याचे आकाश आहे.

पृथ्वी पूर्वी जशी होती तशी नाही, आता ती पवित्र भूमी आहे.

जोरदार पाऊस पडून गेल्यानंतर, घाणेरडे जुने जग आता अगदी नवीन बनले आहे.

पर्वत बदलत आहेत … जलाशय बदलत आहेत …

लोकसुद्धा बदलत आहेत … सर्व गोष्टी बदलत आहेत….

हे मूक पर्वतांनो! उठा आणि माझ्यासाठी नृत्य करा!

हे स्तब्ध जलाशयांनो! मुक्तपणे वाहत राहा!

तुम्ही स्वप्न पाहणाऱ्या लोकांनो! उठा आणि त्यांचा पाठलाग करा!

मी आलो आहे … मी राजा आहे….

संपूर्ण मानवजात त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी माझा चेहरा पाहील, त्यांच्या स्वतःच्या कानांनी माझा आवाज ऐकेल,

त्यांच्या स्वतःसाठी राज्याचे आयुष्य जगेल….

किती छान … किती सुंदर….

अविस्मरणीय … विसरणे अशक्यच….


माझ्या क्रोधाच्या ज्वाळांमध्ये, अग्निवर्ण अजगर धडपड करतो;

माझ्या वैभवसंपन्न न्यायामध्ये, दानव त्यांची खरी रूपे दाखवतात;

माझ्या कठोर वचनांमुळे, सर्व लोकांना खोलवर शरम वाटते आणि ते कोठेही लपू शकत नाहीत.

त्यांना भूतकाळ आठवतो, त्यांनी माझी कशी कुचेष्टा आणि थट्टा केली होती ते आठवते.

त्यांनी स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले नाही अशी एकही वेळ नव्हती, त्यांनी मला आव्हान दिले नाही अशी वेळ कधीही नव्हती.

आज, कोण रडत नाही? कोणाला पश्चात्ताप वाटत नाही?

संपूर्ण विश्व शोकाने भरून गेले आहे …

आनंदाच्या आवाजांनी भरून गेले आहे … हास्याच्या आवाजांनी भरून गेले आहे….

अतुलनीय आनंद … ज्याला तुलना नाही असा आनंद….


पावसाची रिमझिम … फडफडणाऱ्या बर्फाच्या जड गारा….

लोकांच्या आत, दुःख आणि आनंद एकत्र आहेत … थोडेसे हास्य आहे …

थोडे हुंदके आहेत … आणि थोडा जयघोष आहे….

जणू काही प्रत्येकजण विसरला आहे … जणू काही हा पाऊस आणि ढगांनी परिपूर्ण वसंतकाळ आहे,

बहरून येणाऱ्या फुलांचा ग्रीष्म, समृद्ध पिकाचा शरद,

किंवा दहिवर आणि हिमासारखा थंड हिवाळा, कोणालाही माहीत नाही….

आकाशात ढग तरंगत आहेत, पृथ्वीवर महासागर रोरावत आहेत.

पुत्र बाहू उभावत आहेत … लोक नृत्याचे पदन्यास करत आहेत….

देवदूत कार्यमग्न आहेत … देवदूत सांभाळत आहेत….

पृथ्वीवरच्या लोकांची लगबग चालू आहे आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी अनेक होत आहेत.

मागील:  संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय १०

पुढील:  संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय १२

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger