ज्यांना देवाविषयी आणि देवाच्या कार्याविषयी ज्ञान आहे तेच देवाला संतुष्ट करू शकतात

देहधारी देवाच्या कार्यात दोन भाग समाविष्ट आहेत. जेव्हा त्याने प्रथमच देह धारण केला, तेव्हा लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा त्याला ओळखले नाही आणि त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळले. त्यानंतर, जेव्हा त्याने दुसऱ्यांदा देह धारण केला, तेव्हाही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याला ओळखणे तर दूरच आणि त्यांनी पुन्हा एकदा ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले. मनुष्य देवाचा शत्रू नाही का? जर मनुष्य त्याला ओळखत नसेल, तर मनुष्य देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट कसा होऊ शकतो? तो देवाची साक्ष देण्यासाठी पात्र कसा असू शकतो? देवावर प्रेम करण्याचे, देवाची सेवा करण्याचे आणि देवाचा गौरव करण्याचे मनुष्याचे दावे सर्व फसवे नाहीत का? जर तू तुझे जीवन या अवास्तविक, अव्यवहार्य गोष्टींसाठी वाहून घेतलेस, तर तुझे श्रम व्यर्थ जात नाहीत का? देव कोण आहे हे माहीत नसताना तू देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट कसे बनू शकतोस? असा पाठपुरावा अस्पष्ट आणि अमूर्त नाही का? ही फसवणूक नाही का? एखादी व्यक्ती देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट कशी होऊ शकते? देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट असण्याचे व्यावहारिक महत्त्व काय आहे? तू देवाच्या आत्म्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट होऊ शकतोस का? आत्मा किती महान आणि श्रेष्ठ आहे हे तू पाहू शकतोस का? अदृश्य, अमूर्त देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट असणे—हे अस्पष्ट व अमूर्त नाही का? अशा प्रयत्नांचे व्यावहारिक महत्त्व काय आहे? हे सर्व फसवे असत्य नाही का? तू देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्याचा पाठपुरावा करतोस, तरीही खरे तर तू सैतानाचे पाळलेले पिल्लू आहेस, कारण तू देवाला ओळखत नाहीस आणि तू अस्तित्वात नसलेल्या “सर्व गोष्टींच्या देवाचा” पाठपुरावा करतोस, जो अदृश्य, अमूर्त आणि तुझ्या स्वतःच्या धारणांचे फलित आहे. अस्पष्टपणे सांगायचे तर, असा “देव” सैतान आहे व व्यावहारिकदृष्ट्या बोलायचे तर, ते तू स्वतःच आहेस. तू स्वतःच्याच जिव्हाळ्याची गोष्ट बनण्याचा प्रयत्न करतोस, तरीही देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्याचा पाठपुरावा करतो असे म्हणतोस—ही ईश्वरनिंदा नाही का? अशा पाठपुराव्याला काय किंमत आहे? जर देवाच्या आत्म्याने देह धारण केला नाही, तर देवाचे सार मनुष्यासाठी केवळ अदृश्य, अमूर्त जीवनाचा आत्मा, निराकार आणि बेढब, अभौतिक प्रकारचे, अगम्य व अनाकलनीय असे आहे. मनुष्य अशा निराकार, अद्भूत, अथांग आत्म्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट कसा असू शकतो? हा विनोद नाही का? असा मूर्खपणाचा तर्क अयोग्य आणि अव्यवहार्य आहे. निर्माण केलेला मनुष्य हा देवाच्या आत्म्यासाठी अंगभूत वेगळ्या प्रकारचा आहे, मग त्या दोघांमध्ये जिव्हाळा कसा असू शकतो? जर देवाचा आत्मा देहात प्रत्यक्षात आला नसता, जर देवाने देह धारण केला नसता आणि त्याने निर्मित जीव बनून स्वतःला नम्र बनवले नसते, तर निर्माण केलेला मनुष्य अयोग्य व त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्यास असमर्थ ठरला असता आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या ज्या लोकांना त्यांच्या आत्म्यांनी स्वर्गात प्रवेश केल्यानंतर देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्याची संधी मिळाली असती, त्यांच्या व्यतिरिक्त बहुतांश लोक देवाच्या आत्म्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्यास असमर्थ ठरले असते. आणि जर लोकांना देहधारी देवाच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गात देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनायची इच्छा असेल, तर ते आश्चर्यकारकपणे अमानवी मूर्ख नाहीत का? लोक केवळ अदृश्य देवाच्या “श्रद्धाळूपणा” चा पाठपुरावा करतात आणि दृश्य देवाकडे अजिबात लक्ष देत नाहीत, कारण अदृश्य देवाचा पाठपुरावा करणे खूप सोपे आहे. लोक त्यांना वाटेल तसे करू शकतात, परंतु दृश्य देवाचा पाठलाग करणे इतके सोपे नाही. जो मनुष्य अस्पष्ट देवाचा पाठपुरावा करतो, तो देवाला प्राप्त करण्यास पूर्णपणे असमर्थ असतो, कारण अस्पष्ट व अमूर्त गोष्टी मनुष्याच्या कल्पनेतून निर्माण झाल्या आहेत आणि मनुष्य त्या प्राप्त करण्यास असमर्थ आहे. तुमच्यामध्ये आलेला देव जर तुमच्यासाठी अगम्य असा उदात्त आणि उन्नत देव असेल, तर तुम्ही त्याची इच्छा कशी समजून घेऊ शकता? आणि तुम्ही त्याला कसे ओळखू व समजून घेऊ शकता? जर त्याने फक्त त्याचे कार्य केले असते आणि त्याचा मनुष्याशी कोणताही सामान्य संपर्क नसता किंवा त्याच्याकडे कोणतीही सामान्य मानवता नसती आणि मर्त्य मनुष्यांसाठी अगम्य असता, तर त्याने तुमच्यासाठी खूप कार्य केले असले तरीही, तुमचा त्याच्याशी संपर्क नव्हता व तुम्ही त्याला पाहण्यास असमर्थ होता, तुम्ही त्याला कसे ओळखू शकता? जर हा देह सामान्य मानवतेचा नसता, तर मनुष्याकडे देवाला ओळखण्याचा कोणताही मार्ग नसता; देवाने देह धारण केल्यामुळेच मनुष्य देहधारी देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट होण्यास पात्र आहे. लोक देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनतात कारण ते त्याच्या संपर्कात येतात, कारण ते त्याच्याबरोबर राहतात आणि त्याचा सहवास ठेवतात व हळुहळू त्याला ओळखतात. तसे नसते तर, मनुष्याने केलेला पाठपुरावा व्यर्थ ठरला नसता का? सांगायचे असे आहे, की देवाच्या कार्यामुळे मनुष्य देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनू शकत नाही, तर देहधारी देवाच्या वास्तविकतेमुळे व सामान्यतेमुळे हे सर्व होऊ शकते. देवाने देह धारण केल्यामुळेच लोकांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्याची आणि खऱ्या देवाची उपासना करण्याची संधी मिळते. हे सर्वात वास्तविक आणि व्यावहारिक सत्य नाही का? आता, तुला अजूनही स्वर्गात देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट होण्याची इच्छा आहे का? जेव्हा देव स्वतःला एका विशिष्ट टोकापर्यंत नम्र करतो, म्हणजे, जेव्हा देव देह धारण करतो तेव्हाच मनुष्य त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट व विश्वासू होऊ शकतो. देव आत्म्याचा आहे: या इतक्या उच्च आणि अथांग आत्म्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट होण्यास लोक कसे पात्र असू शकतात? जेव्हा देवाचा आत्मा देहात अवतरतो व मनुष्यासारखेच बाह्यस्वरूप असलेला प्राणी बनतो, तेव्हाच लोक त्याची इच्छा समजू शकतात आणि प्रत्यक्षात त्याच्याकडून प्राप्त होऊ शकतात. तो देह धारण करून बोलतो व कार्य करतो, मानवजातीच्या सुख-दु:खात आणि संकटांमध्ये सामील होतो, मानवजातीबरोबरच जगात राहतो, मानवजातीचे संरक्षण करतो व त्यांना मार्गदर्शन करतो आणि याद्वारे तो लोकांना शुद्ध करतो व त्यांना त्याचे तारण आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्याची अनुमती देतो. या गोष्टी प्राप्त केल्यामुळे, लोकांना खऱ्या अर्थाने देवाची इच्छा समजते व तेव्हाच ते देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनू शकतात. फक्त हेच व्यावहारिक आहे. जर देव लोकांसाठी अदृश्य आणि अमूर्त असेल, तर ते त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट कसे असतील? हा पोकळ सिद्धांत नाही का?

आजपर्यंत देवावर विश्वास ठेवून, बरेच लोक अजूनही अस्पष्ट आणि अमूर्त गोष्टींचा पाठपुरावा करतात. त्यांना देवाच्या आजच्या कार्याची वास्तविकता समजलेली नाही व तरीही ते अक्षरे आणि सिद्धांतांमध्ये राहतात. शिवाय, “देवावर प्रेम करणार्‍यांची नवीन पिढी”, “देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट”, “देवावर प्रेम करण्याचा आदर्श व नमुना” आणि “पेत्राची शैली” यांसारख्या नवीन वाक्यांशांच्या वास्तविकतेत अद्याप बहुतेकांनी प्रवेश करायचा आहे; त्याऐवजी, त्यांचा पाठपुरावा अजूनही अस्पष्ट व अमूर्त आहे, ते अजूनही सिद्धांतांमध्ये फिरत आहेत आणि त्यांना या वचनांच्या वास्तविकतेचे आकलन नाही. जेव्हा देवाचा आत्मा देह धारण करतो, तेव्हा तू देहधारी देवाचे कार्य पाहू शकतोस व त्याला स्पर्श करू शकतोस. तरीही, जर तू अजूनही त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनण्यास असमर्थ असशील, जर अजूनही त्याचा विश्वासू होऊ शकत नसशील, तर तू देवाच्या आत्म्याचा विश्वासू कसा होऊ शकतोस? जर तू आजच्या देवाला ओळखत नसशील, तर तू देवावर प्रेम करणार्‍यांच्या नव्या पिढीतील कसा होऊ शकतोस? ही वाक्ये केवळ रिक्त अक्षरे आणि सिद्धांत नाहीत का? तू आत्म्याला पाहण्यास आणि त्याची इच्छा समजून घेण्यास समर्थ आहेस का? ही वाक्ये रिक्त नाहीत का? फक्त ही वाक्ये आणि संज्ञा बोलणे तुझ्यासाठी पुरेसे नाही व केवळ संकल्पाद्वारे तू देवाला संतुष्ट करू शकत नाहीस. तू फक्त ही वचने बोलण्यातच समाधानी आहेस आणि तू तुझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझ्या स्वतःच्या अवास्तविक आदर्शांच्या समाधानासाठी व तुझ्या स्वतःच्या धारणा आणि विचारांचे समाधान करण्यासाठी असे करतोस. जर तू आजच्या देवाला ओळखत नसशील, तर तू काहीही केलेस तरी देवाच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकणार नाहीस. देवाचा विश्वासू असणे म्हणजे काय? हे तुला अजूनही समजत नाही का? देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट मनुष्य असल्यामुळे, देवदेखील मनुष्यच आहे. म्हणजेच, देवाने देह धारण केला आहे आणि तो मनुष्य बनला आहे. जे समान प्रकारचे आहेत तेच एकमेकांना विश्वासू म्हणू शकतात, तरच ते जिव्हाळ्याचे मानले जाऊ शकतात. जर देव आत्म्याचा असता, तर निर्माण केलेला मनुष्य त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट कसा बनू शकतो?

तुझा देवावरचा विश्वास, सत्याचा पाठपुरावा आणि तू ज्या प्रकारे वागतोस ते सर्व वास्तविकतेवर आधारित असले पाहिजे: जे काही करतोस ते व्यावहारिक असले पाहिजे व भ्रामक आणि काल्पनिक गोष्टींचा पाठपुरावा करू नये. अशा रीतीने वागण्याला काही किंमत नाही व शिवाय, अशा जीवनाला काही अर्थ नाही. कारण तुझा पाठपुरावा आणि जीवन हे खोटेपणा व फसवणुकीपेक्षा अधिक कशातही व्यतीत होत नाही आणि तू मूल्य व महत्त्व असलेल्या गोष्टींचा पाठलाग करत नाहीस, त्यामुळे, तू केवळ हास्यास्पद तर्क आणि सिद्धांत प्राप्त करतोस ज्यामध्ये कोणतेही सत्य नसते. अशा गोष्टींचा तुझ्या अस्तित्वाच्या महत्त्व आणि मूल्याशी काहीही संबंध नसतो व ते तुला एका पोकळ ठिकाणी आणू शकतात. अशाप्रकारे, तुझ्या संपूर्ण जीवनाला कोणतेही मूल्य किंवा अर्थ उरणार नाही—आणि जर तू अर्थपूर्ण जीवनाचा पाठपुरावा केला नाहीस, तर तू शंभर वर्षे जगलास तरी ते सर्व व्यर्थ असेल. याला मानवी जीवन कसे म्हणता येईल? हे खरे तर प्राण्यांचे जीवन नाही का? त्याचप्रमाणे, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवण्याच्या मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करत असाल, तरीही जो देव दिसत आहे त्या देवाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न न करता, त्याऐवजी अदृश्य आणि अमूर्त देवाची उपासना करत असाल, तर असा शोध आणखी व्यर्थ नाही का? शेवटी, तुझा पाठपुरावा अवशेषांचा ढीग होईल. असा पाठपुरावा करून तुला काय फायदा होणार आहे? मनुष्याची सर्वात मोठी समस्या ही आहे, की त्याला फक्त अशाच गोष्टी आवडतात ज्या त्याला दिसत नाही किंवा ज्यांना तो स्पर्श करू शकत नाही, ज्या गोष्टी अत्यंत रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहेत व ज्या मनुष्यासाठी अकल्पनीय आहेत आणि मर्त्य मनुष्यासाठी अगम्य आहेत. या गोष्टी जितक्या जास्त अवास्तविक असतील तितकेच लोक त्यांचे विश्लेषण करतात व लोक इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांचा पाठपुरावा करतात आणि त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ते जितके अधिक अवास्तविक असतात, तितकेच लोक त्यांचे बारकाईने परीक्षण व विश्लेषण करतात, अगदी त्यांच्याबद्दल त्यांच्या स्वतःच्या सर्वसमावेशक कल्पना तयार करण्याइतपत पुढे जातात. याउलट, गोष्टी जितक्या जास्त वास्तविक असतात, तितके लोक त्यांकडे दुर्लक्ष करतात; ते सरळ त्यांना कमी लेखतात आणि त्यांचा तिरस्कारदेखील करतात. आज मी करत असलेल्या वास्तविक कार्याबद्दल तुमचा नेमका हाच दृष्टिकोन नाही का? अशा गोष्टी जितक्या अधिक वास्तविक असतील, तितके तुम्ही त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रहदूषित असाल. तुम्ही त्यांचे परीक्षण करण्यासाठी वेळ देत नाही, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करता; या वास्तविक, निम्न-मानक आवश्यकतांना तुम्ही कमी लेखता आणि सर्वात जास्त वास्तविक असलेल्या या देवाबद्दलच्या असंख्य धारणांना आश्रय देता व त्याची वास्तविकता आणि सामान्यता स्वीकारण्यास असर्मथच असता. अशाप्रकारे, तुम्ही केवळ अस्पष्ट विश्वासालाच चिकटून राहत नाही का? तुमचा भूतकाळातील अस्पष्ट देवावर अढळ विश्वास आहे आणि आजच्या खर्‍या देवामध्ये तुम्हाला स्वारस्य नाही. याचे कारण हे तर नाही ना, की कालचा देव व आजचा देव हे दोन वेगवेगळ्या कालखंडातील आहेत? याचे कारण हे तर नाही ना, की कालचा देव हा स्वर्गातील सर्वोच्च देव आहे, तर आजचा देव पृथ्वीवरील एक क्षुल्लक मनुष्य आहे? शिवाय, याचे कारण हे तर नाही ना, की मनुष्य ज्या देवाची उपासना करतो तो त्याच्या धारणांनी निर्माण होतो, तर आजचा देव पृथ्वीवर उत्पन्न झालेला खरा देह आहे? संपूर्ण विचार करता, याचे कारण हे तर नाही ना, की, आजचा देव इतका वास्तविक आहे, की मनुष्य त्याचा पाठपुरावा करत नाही? कारण आजचा देव लोकांकडून जे काही मागणे मागतो ते तेच आहे जे लोक करायला तयार नसतात आणि ज्यामुळे त्यांना लाज वाटते. यामुळे लोकांसाठी गोष्टी अधिकच कठीण होत नाहीत का? यामुळे लोकांच्या मनावर उमटलेले व्रण उघड होत नाहीत का? अशाप्रकारे, बरेच लोक खऱ्या देवाचा, व्यावहारिक देवाचा पाठपुरावा करत नाहीत आणि म्हणून ते देहधारी देवाचे शत्रू म्हणजेच ख्रिस्तविरोधी बनतात. हे उघड सत्य नाही का? भूतकाळात, जेव्हा देवाने अद्याप देह धारण केला नव्हता, तेव्हा तू कदाचित धार्मिक व्यक्ती किंवा निस्सीम भक्ती करणारा असशील. देवाने देह धारण केल्यानंतर, असे अनेक निस्सीम भक्त नकळत ख्रिस्तविरोधी बनले. येथे काय सुरू आहे तुला माहीत आहे का? देवावरील तुझ्या विश्वासामध्ये, तू वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करत नाहीस किंवा सत्याचा पाठपुरावा करत नाहीस, तर त्याऐवजी खोट्या गोष्टींनी व्यापून जातोस—हा देवाशी असलेल्या तुझ्या वैराचा सर्वात स्पष्ट स्रोत नाही का? देहधारी देवाला ख्रिस्त म्हणतात, मग जे देहधारी देवावर विश्वास ठेवत नाहीत ते सर्व ख्रिस्तविरोधी नाहीत का? तर, तू ज्याच्यावर विश्वास ठेवतोस आणि ज्याच्यावर प्रेम करतोस तो खरोखरच देहधारी देव आहे का? खरोखरच हा जिवंत, श्वास घेणारा देव सर्वात वास्तविक आणि विलक्षणरीत्या सामान्य आहे का? तुझ्या पाठपुराव्याचा नेमका उद्देश काय आहे? तो स्वर्गात आहे की पृथ्वीवर? ही धारणा आहे की सत्य आहे? तो देव आहे की काही अलौकिक प्राणी आहे? खरे सांगायचे तर, सत्य हे जीवनातील सर्वात वास्तविक सूत्र आहे आणि संपूर्ण मानवजातीमध्ये अशा सूत्रांपैकी सर्वोच्च आहे. कारण ही देवाने मनुष्यासाठी बनवलेली आवश्यकता आहे आणि देवाने वैयक्तिकरीत्या केलेले कार्य आहे, म्हणून याला “जीवनाचे सूत्र” असे म्हणतात. हे एखाद्या गोष्टीवरून सारांशित केलेले सूत्र नाही किंवा तो एखाद्या महान व्यक्तीचा प्रसिद्ध सुविचारदेखील नाही. त्याऐवजी, हे आकाश आणि पृथ्वी व सर्व गोष्टींच्या स्वामीने मानवजातीसाठी दिलेले वचन आहे; ही मनुष्याने मांडलेली काही वचने नसून देवाचे अंगभूत जीवन आहे. आणि म्हणून त्याला “सर्व जीवनातील सूत्रांपैकी सर्वोच्च” असे म्हटले जाते. लोकांनी सत्य आचरणात आणण्याचा पाठपुरावा करणे म्हणजे त्यांचे कर्तव्य पार पाडणे आहे—म्हणजेच, हा देवाच्या आवश्यकता पूर्ण करण्याचा पाठपुरावा आहे. या आवश्यकतेचे सार म्हणजे कोणत्याही मनुष्याद्वारे साध्य करता येणारे रिक्त सिद्धांत नव्हेत, तर हे सर्व सत्यांपैकी सर्वात वास्तविक आहे. जर तुझा पाठपुरावा सिद्धांताशिवाय दुसरे काहीही नसेल आणि त्यात कोणतीही वास्तविकता नसेल, तर तू सत्याविरुद्ध बंड करत नाहीस का? तू सत्यावर हल्ला करणारा नाहीस का? अशी व्यक्ती देवावर प्रेम करू पाहणारी व्यक्ती कशी असू शकते? वास्तविकता नसलेले लोक सत्याचा विश्वासघात करणारे असतात आणि ते सर्व जन्मजात बंडखोर असतात!

तू कसाही पाठपुरावा करत असलास तरी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आज देव करत असलेले कार्य तुला समजले पाहिजे आणि या कार्याचे महत्त्व तुला माहीत असले पाहिजे. देव शेवटच्या दिवसांत कोणते कार्य घेऊन येतो, तो कोणती प्रवृत्ती आणतो आणि मनुष्यामध्ये काय परिपूर्ण केले जाईल हे तू समजून घेतले पाहिजेस व जाणून घेतले पाहिजेस. तो देहामध्ये जे कार्य करण्यासाठी आला आहे ते जर तुला माहीत नसेल किंवा समजत नसेल, तर तू त्याची इच्छा कशी समजून घेऊ शकशील आणि तू त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट कशी बनू शकशील? खरे तर, देवाच्या जिव्हाळ्याची गोष्ट बनणे गुंतागुंतीचे नाही, पण ते सोपेही नाही. लोकांनी ते पूर्णपणे समजून घेऊन आचरणात आणले, तर ते गुंतागुंतीचे होत नाही; जर लोकांना ते पूर्णपणे समजले नाही, तर ते खूप जास्त कठीण होते आणि त्याशिवाय, त्यांचा पाठपुरावा त्यांना अस्पष्टतेकडे घेऊन जातो. जर, देवाचा पाठपुरावा करत असताना, लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची स्वतःची स्थिती नसेल आणि त्यांनी कोणत्या सत्यासोबत राहिले पाहिजे हे जर त्यांना माहीत नसेल, तर याचा अर्थ असा होतो, की त्यांना कोणताही पाया नाही आणि त्यामुळे त्यांना ठामपणे उभे राहणे कठीण होते. आज असे बरेच लोक आहेत ज्यांना सत्य समजत नाही, जे चांगले व वाईट यात फरक करू शकत नाहीत किंवा कशावर प्रेम करावे अथवा कशाचा द्वेष करावा, हे ते सांगू शकत नाहीत. असे लोक क्वचितच ठामपणे उभे राहू शकतात. देवावरील विश्वासाची गुरुकिल्ली म्हणजे सत्य आचरणात आणणे, देवाच्या इच्छेची काळजी घेणे, देव देह धारण करतो तेव्हा तो मनुष्यावर करत असलेले कार्य आणि तो ज्या तत्त्वांद्वारे बोलतो ती तत्त्वे जाणून घेणे आहे. जनतेच्या पाठीमागे जाऊ नका. तू ज्यामध्ये प्रवेश केला पाहिजेस त्यामध्ये तुझ्याकडे तत्त्वे असली पाहिजेत व तू ती पाळली पाहिजेत. देवाच्या ज्ञानामुळे तुला प्राप्त झालेल्या गोष्टी घट्ट धरून राहणे तुझ्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तू तसे केले नाहीस, तर आज तू एका मार्गाने वळशील, उद्या दुसऱ्या मार्गावर जाशील आणि तुला वास्तविक असे काहीही कधीही मिळणार नाही. असे राहणे तुझ्या स्वतःच्या जीवनासाठी किंचितही फायदेशीर नाही. ज्यांना सत्य समजत नाही ते नेहमी इतरांचे अनुसरण करतात: जर लोक म्हणाले, की हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे, तर तूदेखील म्हणतोस, की हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे; जर लोक म्हणाले, की हे दुष्ट आत्म्याचे कार्य आहे, तर तूदेखील संशय बाळगतोस किंवा ते दुष्ट आत्म्याचे कार्य आहे असे म्हणतोस. तू नेहमी इतरांच्या शब्दांची पोपटपंची करतोस आणि स्वतःहून काहीही वेगळे करण्यास असमर्थ असतोस किंवा स्वतःसाठीदेखील विचार करू शकत नाहीस. ही अशी व्यक्ती आहे जिच्याकडे कोणतेही पद नाही, जी फरक करण्यास असमर्थ आहे—अशी व्यक्ती नालायक दुष्ट व्यक्ती असते! तू नेहमी इतरांच्या शब्दांची पुनरावृत्ती करतोस: आज असे म्हटले जाते, की हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे, परंतु अशी शक्यता आहे, की एके दिवशी कोणीतरी म्हणेल, की हे पवित्र आत्म्याचे कार्य नाही आणि ते खरे तर मनुष्याच्या कृत्यांशिवाय दुसरे काहीही नाही—तरीही तू हे ओळखू शकत नाहीस, व जेव्हा हे इतरांनी सांगितलेले तू पाहतोस, तेव्हा तू तेच बोलतोस. हे खरे तर पवित्र आत्म्याचे कार्य आहे, परंतु तू म्हणतोस ते मनुष्याचे कार्य आहे; तू पवित्र आत्म्याच्या कार्याची निंदा करणाऱ्यांपैकी झाला नाहीस का? यामध्ये, तू फरक करू शकत नाहीस, म्हणजे तू देवाला विरोध केला नाहीस का? कदाचित एक दिवस कोणीतरी मूर्ख येईल आणि म्हणेल, की “हे दुष्ट आत्म्याचे कार्य आहे” आणि जेव्हा तू हे शब्द ऐकाल तेव्हा तुला काहीच समजणार नाही व तू पुन्हा एकदा इतरांच्या बोलण्यात अडकशील. प्रत्येक वेळी कोणीतरी गडबड केली, की तू तुझ्या भूमिकेवर ठाम उभे राहण्यास असमर्थ असतोस आणि हे सर्व तुझ्याजवळ सत्य नसल्यामुळे होते. देवावर विश्वास ठेवणे आणि देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे ही काही साधी गोष्ट नाही. केवळ एकत्र येऊन व उपदेश ऐकून या गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत आणि केवळ उत्कटतेने तू परिपूर्ण होऊ शकत नाहीस. तू अनुभवले पाहिजेस व जाणून घेतले पाहिजेस आणि तुझ्या कृतींमध्ये तत्त्वनिष्ठ असले पाहिजेस व पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त केले पाहिजेस. जेव्हा तू अनुभवले असशील, तेव्हा तू अनेक गोष्टी ओळखण्यास सक्षम असशील—चांगले आणि वाईट, नीतिमत्त्व व दुष्टता, देह आणि रक्त व सत्य काय आहे यांमधील फरक ओळखण्यास सक्षम असशील. तुला या सर्व गोष्टींमध्ये फरक करता आला पाहिजे आणि असे करताना, परिस्थिती काहीही असो, तुझा कधीही पराभव होणार नाही. फक्त हीच तुझी खरी नैतिक पातळी आहे.

देवाचे कार्य जाणून घेणे ही काही साधी गोष्ट नाही. तुझ्या पाठपुराव्यात मानके आणि उद्दिष्ट असले पाहिजे, खरा मार्ग कसा शोधायचा, तो खरा मार्ग आहे की नाही हे कसे मोजायचे व ते देवाचे कार्य आहे की नाही हे तुला माहीत असले पाहिजे. खरा मार्ग शोधण्याचे सर्वात मूलभूत तत्त्व काय आहे? अशा प्रकारे पवित्र आत्म्याचे कार्य आहे की नाही, ही वचने सत्याची अभिव्यक्ती आहेत की नाही, कोणासाठी साक्ष दिली जात आहे आणि ते तुझ्यासाठी काय करू शकतात, हे तुला पाहावे लागेल. खरा मार्ग व खोटा मार्ग यातील फरक ओळखण्यासाठी मूलभूत ज्ञानाच्या विविध पैलूंची आवश्यकता आहे, त्यातील सर्वात मूलभूत म्हणजे त्यात पवित्र आत्म्याचे कार्य आहे की नाही हे सांगणे. कारण लोकांच्या देवावरील विश्वासाचे सार हा देवाच्या आत्म्यावरील विश्वास आहे आणि देहधारी देवावरील विश्वासाचे कारण हा देह देवाच्या आत्म्याचे मूर्त स्वरूप हेच आहे, याचा अर्थ असा आहे, की असा विश्वास अजूनही आत्म्यावरील विश्वास आहे. आत्मा व देह यांच्यात फरक आहेत, परंतु हा देह आत्म्यापासून आला आहे आणि वचनाचा देह बनला आहे, अशा प्रकारे मनुष्य ज्यावर विश्वास ठेवतो ते अजूनही देवाचे मूळ सार आहे. म्हणून, तो खरा मार्ग आहे की नाही यामध्ये फरक करताना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात पवित्र आत्म्याचे कार्य आहे की नाही हे तुम्ही पाहिले पाहिजे, त्यानंतर तुम्ही या मार्गात सत्य आहे की नाही हे पाहिले पाहिजे. सत्य सामान्य मानवतेची जीवन प्रवृत्ती आहे, याचा अर्थ असा आहे, की जेव्हा देवाने मनुष्याला सुरुवातीला निर्माण केले, तेव्हा त्याने मनुष्याला आवश्यक अशा संपूर्णपणे सामान्य मानवतेसह (मानवी संवेदना, अंतर्दृष्टी, शहाणपण आणि मनुष्य असण्याचे मूलभूत ज्ञान) निर्माण केले. म्हणजेच, या मार्गाने लोकांना सामान्य मानवतेचे जीवन जगता येईल की नाही, जे सत्य सांगितले जाते ते सामान्य मानवतेच्या वास्तविकतेनुसार आवश्यक आहे की नाही, हे सत्य व्यावहारिक आहे की वास्तविक आहे आणि ते सर्व वेळेवर आहे की नाही, हे तुम्ही पाहणे आवश्यक आहे. जर सत्य असेल, तर ते लोकांना सामान्य आणि वास्तविक अनुभवांमध्ये नेण्यास सक्षम असेल; शिवाय, लोक अधिक सामान्य होतात, त्यांची मानवी भावना अधिकाधिक पूर्ण होत जाते, त्यांचे देह जीवन व आध्यात्मिक जीवन अधिक व्यवस्थित होते आणि त्यांच्या भावना अधिक सामान्य होतात. हे दुसरे तत्व आहे. आणखी एक तत्त्व आहे, ते म्हणजे लोकांचे देवाविषयीचे ज्ञान वाढत आहे की नाही व असे कार्य आणि सत्य अनुभवल्याने त्यांच्यामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होऊ शकते की नाही व त्यांना देवाच्या आणखी जवळ आणता येईल की नाही. यामध्ये हा मार्ग खरा आहे की नाही हे मोजता येते. हा मार्ग अलौकिक ऐवजी वास्तविक आहे की नाही आणि तो मनुष्याच्या जीवनासाठी योग्य आहे की नाही हे सर्वात मूलभूत आहे. जर ते या तत्त्वांशी सुसंगत असेल, तर हाच मार्ग खरा आहे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. मी ही वचने तुम्हाला तुमच्या भविष्यातील अनुभवांमध्ये इतर मार्ग स्वीकारायला भाग पाडावीत म्हणून उच्चारत नाही किंवा भविष्यात आणखी एका नवीन युगाचे कार्य होईल असे भाकीत म्हणूनदेखील उच्चारत नाही. आजचा मार्ग हाच खरा मार्ग आहे याची तुम्हाला खात्री पटावी म्हणून मी ती उच्चारतो जेणेकरून, आजच्या कार्यावर तुमचा विश्वास असण्याबद्दल तुमची पूर्णपणे खात्री पटेल आणि त्याबद्दल माहिती मिळवता येणार नाही. असेदेखील अनेक आहेत जे निश्चित असूनही संभ्रमात असतात; अशा निश्चिततेचे कोणतेही तत्त्व नाही आणि अशा लोकांना कधी ना कधी बाहेर काढून टाकले पाहिजे. जे विशेषतः अनुसरणात उत्कट आहेत, तेदेखील तीन भाग निश्चित आहेत व पाच भाग अनिश्चित आहेत, जे दर्शवते की त्यांचा कोणताही पाया नाही. कारण तुमच्यामध्ये खूपच कमी क्षमता आहे आणि तुमचा पाया खूप उथळ आहे, तुम्हाला वेगळेपणाची समज नाही. देव त्याच्या कार्याची पुनरावृत्ती करत नाही, तो वास्तविक नसलेले कार्य करत नाही, तो मनुष्याकडून अतिरिक्त अपेक्षा करत नाही व तो मनुष्याच्या जाणीवेच्या पलीकडे असलेले कार्य करत नाही. तो जे काही कार्य करतो ते मनुष्याच्या सामान्य ज्ञानाच्या कक्षेत असते आणि ते सामान्य मानवतेच्या जाणीवेपेक्षा जास्त नसते व त्याचे कार्य मनुष्याच्या सामान्य गरजांनुसार केले जाते. जर हे पवित्र आत्म्याचे कार्य असेल, तर लोक अधिक सामान्य होतील आणि त्यांची मानवता अधिक सामान्य होईल. लोकांना त्यांच्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीचे आणि मनुष्याच्या वस्तुस्थितीचे अधिकाधिक ज्ञान मिळते व त्यांना सत्याची अधिकाधिक उत्कंठा प्राप्त होते. म्हणजेच, मनुष्याचे जीवन वृद्धिंगत होत जाते आणि मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती बदलास अधिकाधिक सक्षम होत जाते—देवाने मनुष्याचे आयुष्य बनण्याचा हाच अर्थ आहे. जर एखादा मार्ग मनुष्याचे तत्व असलेल्या गोष्टी प्रकट करण्यास असमर्थ असेल, मनुष्याची प्रवृत्ती बदलण्यास असमर्थ असेल आणि त्याशिवाय, लोकांना देवासमोर आणण्यास किंवा त्यांना देवाची खरी समज देण्यास असमर्थ असेल व त्यांच्या मानवतेला अधिकाधिक नीच बनवण्यास आणि त्यांची भावना अधिक असामान्य बनवण्यास कारणीभूत ठरत असेल, तर हा मार्ग सत्याचा मार्ग निश्चितच नसेल व तो दुष्ट आत्म्याचे कार्य अथवा जुना मार्ग असू शकतो. थोडक्यात, हे पवित्र आत्म्याचे वर्तमान कार्य असू शकत नाही. तुम्ही इतकी वर्षे देवावर विश्वास ठेवला आहे, तरीही तुम्हाला खरा मार्ग आणि खोटा मार्ग यातील फरक ओळखण्याच्या किंवा खरा मार्ग शोधण्याच्या तत्त्वांची पुसटशीही कल्पना नाही. बहुतेक लोकांना या गोष्टींमध्ये रसही नसतो; ते फक्त तेथे जातात जेथे बहुसंख्य जातात आणि बहुसंख्य जे म्हणतात तेच पुन्हा सांगतात. ही व्यक्ती खरा मार्ग शोधणारी व्यक्ती कशी असू शकते? व अशा लोकांना खरा मार्ग कसा सापडेल? तुम्ही ही विविध प्रमुख तत्त्वे समजून घेतल्यास, काहीही झाले तरी तुमची फसवणूक होणार नाही. आज, फरक करण्याची क्षमता लोकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे; सामान्य मानवतेकडे हेच असले पाहिजे आणि लोकांना याचाच अनुभव आला पाहिजे. जर, आजही, लोक अजूनही अनुसरण करण्याच्या प्रक्रियेत काहीही फरक करत नसतील आणि त्यांची मानवी भावना अद्याप वाढली नसेल, तर लोक खूप मूर्ख आहेत व त्यांचा पाठपुरावा चुकीचा आणि मार्गापासून ढळलेला आहे. आज तुझ्या पाठपुराव्यात किंचितही फरक नाही आणि हे सत्य असतानाच, तू म्हणतोस त्याप्रमाणे, तुला खरा मार्ग सापडला आहे, तो तुला मिळाला आहे का? तुला काही फरक करता आला आहे का? खऱ्या मार्गाचे सार काय आहे? खऱ्या मार्गामध्ये, तुला खरा मार्ग मिळाला नाही; तुला सत्याचे काहीही मिळाले नाही. याचा अर्थ असा, की देवाला तुझ्याकडून जे अपेक्षित आहे ते तू साध्य केले नाहीस व त्यामुळे तुझ्या भ्रष्टतेत कोणताही बदल झालेला नाही. अशा प्रकारे पाठपुरावा करणे पुढे सुरू ठेवल्यास, शेवटी तुला बाहेर काढून टाकले जाईल. आजपर्यंत अनुसरण करून, तू जो मार्ग स्वीकारला आहेस तो योग्य मार्ग आहे याची खात्री बाळगली पाहिजे आणि यापुढे कोणतीही शंका नसावी. बरेच लोक नेहमीच अनिश्चित असतात आणि काही लहानसहान गोष्टींमुळे सत्याचा पाठपुरावा करणे थांबवतात. असे लोक ते आहेत ज्यांना देवाच्या कार्याचे ज्ञान नाही; ते आहेत जे गोंधळून देवाचे अनुसरण करतात. ज्या लोकांना देवाचे कार्य माहीत नाही ते त्याच्या जिव्हाळ्याची गोष्ट होण्यास किंवा त्याची साक्ष देण्यास असमर्थ आहेत. जे लोक फक्त आशीर्वाद शोधतात आणि फक्त अस्पष्ट व अमूर्त आहे त्याचा पाठपुरावा करतात, त्यांना मी शक्य तितक्या लवकर सत्याचा पाठपुरावा करण्याचा सल्ला देतो जेणेकरून, त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. यापुढे स्वतःला फसवू नका!

मागील:  ज्या मनुष्याने देवाला त्याच्या धारणांमध्ये मर्यादित केले आहे त्याला देवाची प्रकटीकरणे कशी प्राप्त होतील?

पुढील:  देहधारी देवाचे सेवाकार्य आणि मनुष्याचे कर्तव्य यातील फरक

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger