ज्यांना देवाचे कार्य माहीत आहे, तेच आज देवाची सेवा करू शकतात
देवाच्या असण्याची साक्ष देण्याकरता आणि त्या अग्निवर्ण अजगराला खजील करण्याकरता, तुमच्याकडे एखादे तत्त्व असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही एक अटही पूर्ण केली पाहिजे. ती म्हणजे: तू देवावर अंतःकरणापासून प्रेम केले पाहिजेस आणि त्याच्या शब्दांमध्ये अगदी सामावून गेले पाहिजे. जर तू देवाच्या शब्दांमध्ये सामावून गेला नाहीस, तर सैतानाला खजील करण्यासाठीचा तुझ्याकडे कोणताही मार्ग नाही. जसजशी आयुष्यात तुझी प्रगती होते, तसतसे तू त्या भल्यामोठ्या अग्निवर्ण अजगराचा त्याग करतोस आणि त्याला अतिशय अपमानित करतोस; आणि हे केवळ त्या भल्यामोठ्या अग्निवर्ण अजगराला लज्जित करण्यासाठी असते. देवाचे शब्द आचरणात आणण्यास तू जितका जास्त इच्छुक असशील, तितका तुझ्या देवावरील प्रेमाचा आणि त्या भल्यामोठ्या अग्निवर्ण अजगराविषयी वाटणाऱ्या तिरस्काराचा पुरावा अधिक प्रमाणात दिसून येतो. देवाच्या वचनांचे तू जितके जास्त पालन करतोस, तितका तुला सत्याविषयी वाटणाऱ्या ओढीचा पुरावा अधिक प्रमाणात देत असतोस; ज्यांना देवाच्या शब्दांची आस लागलेली नाही, त्यांच्यात जीवनच शिल्लक नसते. हे असे लोक धर्माशी निगडीत असले, तरी ते देवाच्या शब्दाबाहेरील असतात. जे लोक देवावर खरोखर विश्वास ठेवतात, त्यांच्यात देवाची वचने जणू शरीरात अन्नपाण्याप्रमाणे सेवन केल्याप्रमाणे खोलवर भिनलेली असतात. तुला देवाच्या वचनाची खरीखुरी आस लागलेली नसेल, तर तू खरोखरच त्याचे शब्द आत्मसात करू शकत नाहीस. जर तुला देवाच्या या वचनांबाबतचे ज्ञान नसेल, तर देवासमोर साक्ष देण्याकरता किंवा त्याला संतुष्ट करण्याकरता तुझ्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाही.
देवावर विश्वास ठेवत असताना, देवाला नेमके कसे जाणून घ्यावे? देवाच्या शब्दांच्या आणि कार्याच्या आधारे आज देवाला जाणून घेतले पाहिजे, या दरम्यान जराही विचलित न होता, चूक न करता सर्वात आधी देवाचे कार्य जाणून घेतले पाहिजे. देव जाणून घेण्याच्या प्रक्रियेचा हा पाया आहे. देवाच्या शब्दांचे योग्य आकलन नसलेले विविध समज म्हणजे निव्वळ चुकीच्या धार्मिक कल्पना आहेत. ते भरकटलेले आणि चुकीचे समज आहेत. धार्मिक व्यक्तींच्या अंगी असलेले सर्वात मोठे कौशल्य म्हणजे भूतकाळात समजलेल्या देवाच्या वचनांचा संदर्भ वापरून त्यांच्या तुलनेत आज देवाची वचने बघणे, हे होय. जर, आज देवाची सेवा करताना, तुम्ही पवित्र आत्म्याने भूतकाळात प्रकट केलेल्या गोष्टींवर आधारित ज्ञानाला चिकटून राहिलात, तर तुमच्या सेवेत व्यत्यय येईल. तुमची साधना कालबाह्य होऊन तिला केवळ वरवरच्या धार्मिक समारंभापेक्षा फारसा अधिक अर्थ राहणार नाही. जे देवाची सेवा करतात त्यांच्यात आवश्यक असलेल्या इतर गुणांसह त्यांनी आपले वागणे नम्रतेचे आणि संयमपूर्ण ठेवले पाहिजे, असा जर तुझा विश्वास असेल आणि आज तू त्याप्रमाणे वागू लागलास तर ते ज्ञान म्हणजे एक धार्मिक धारणा होऊन बसते. अशी साधना म्हणजे एक दांभिक वर्तणूक होऊन बसली आहे; “धार्मिक कल्पना” या संज्ञेतून कालबाह्य आणि काळाशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी सूचित होतात (देवाने पूर्वी उच्चारलेल्या शब्दांचे आकलन आणि पवित्र आत्म्याने थेट प्रकट केलेला ज्ञान-प्रकाश हे देखील त्यातच आले), आणि त्या कल्पना जर आज आचरणात आणल्या, तर देवाच्या कार्यात त्या व्यत्यय आणत असतात आणि मानवाला त्यांपासून काहीच फायदा होत नाही. जर धार्मिक विचारांशी संबंधित असलेल्या गोष्टींना लोक स्वतःपासून दूर करू शकत नसतील, तर मग देवाच्या सेवेत त्यांचा मोठाच अडथळा होतो. धार्मिक धारणा असलेल्या लोकांना पवित्र आत्म्याच्या कार्यात त्याच्या बरोबरीने राहताच येत नाही. ते एकेक पाऊल मागे पडत पडत हळूहळू मागेच पडत जातात. याचे कारण म्हणजे या धार्मिक धारणांमुळे मनुष्य कमालीचा दुराभिमानी आणि उद्धट बनतो. आपण स्वत: भूतकाळात जे काही बोललो आणि जे काही केले त्याबद्दल देवाला ममत्व वाटत नाही. त्यातले काही जर काळाशी सुसंगत नसेल, तर तो ते काढून टाकतो. तुला खरोखरच स्वतःच्या धारणा सोडणे जमत नाही का? जर तू देवाने भूतकाळात उच्चारलेल्या शब्दांनाच चिकटून राहशील, तर तुला देवाचे कार्य माहीत आहे असे सिद्ध होते का? जर तू तुम्ही पवित्र आत्म्याचा ज्ञान-प्रकाश स्वीकारण्यास असमर्थ असशील आणि त्याऐवजी भूतकाळातील ज्ञान-प्रकाशालाच चिकटून राहशील, तर यामुळे तू देवाच्या मार्गाला अनुसरून चालत आहेस हे सिद्ध होईल का? तू अजूनही धार्मिक धारणा सोडू शकत नाहीस का? असे जर असेल, तर तू देवाला विरोधच करणाराच ठरशील.
जर लोक जुन्या धार्मिक धारणा सोडू शकले, तर देवाची आजची वचने आणि कार्य समजावून घेताना ते आपल्या डोक्यातील संकल्पनांचा वापर करणार नाहीत, त्याऐवजी ते थेट आज्ञा पाळतील. भूतकाळाच्या तुलनेत देवाचे आजचे प्रत्यक्षात येणारे कार्य जरी पूर्णपणे भिन्न असले, तरी आज तू भूतकाळातील विचार सोडून देऊ शकतोस आणि देवाच्या कार्याबाबतच्या आज्ञांचे थेट पालन करू शकतोस. भूतकाळात देवाने कसे कार्य केले याची तमा न बाळगता जर, देवाच्या आजच्या कार्याला अभिमानास्पद मानलेच पाहिजे हे समजण्यास तू सक्षम असशील तर, तू असा कोणीतरी ठरतोस की ज्याने त्याच्या कल्पना सोडून दिल्या आहेत, जो देवाची आज्ञा पाळतो, आणि तो देवाचे काम व वचने पाळण्यास आणि देवाचे अनुकरण करणारा असा आहे. असे असेल तरच तू खरोखर देवाची आज्ञा पाळणारे असशील. यात तू देवाच्या कार्याचे विश्लेषण किंवा त्याचे अन्वेषण करत बसत नाहीस. जणू काही देव आपले पूर्वीचे काम विसरला आहे आणि तूही ते विसरला आहेस. वर्तमान हा आजचा आहे आणि भूतकाळ पूर्वी होऊन गेलेला आहे. भूतकाळात आपण जे काही केले ते खुद्द देवाने आजपासून बाजूला ठेवले आहे. तूही त्यात अडकून पडू नकोस. केवळ असे करणारी व्यक्तीच पूर्णपणे देवाची आज्ञा पाळणारी आणि आपल्या धार्मिक धारणा संपूर्णपणे सोडून देणारी असते.
देवाच्या कार्यात सतत नवीन काहीतरी घडत असते. नवीन कार्य पुढे आले, की आधीचे काम निरुपयोगी आणि जुने होत जाते. मात्र जुने आणि नवे असे ही कामे परस्परविरोधी नसून ती परस्परपूरकच आहेत; आधीच्या पायरी पुरी केली की मगच पुढच्या पायरीकडे जाता येते. आता नवीन प्रकारचे काम करायचे असल्याने जुन्या गोष्टी काढून टाकणे अनिवार्यच झालेले आहे. उदाहरणार्थ, दीर्घकाळ चालू असलेले रीतिरिवाज आणि माणसांच्या नेहमीच्या सवयीचे वाक्प्रयोग यांसंबंधीचा अनेक वर्षांचा अनुभव आणि शिकवण यांमुळे मानवाच्या मनात सर्व सवयी आणि समजुती तयार झाल्या आहेत. देवाने अजून आपला खरा चेहरा आणि अंगभूत स्वभाव मनुष्याला पूर्णपणे दर्शवलेला नाही. तसेच प्राचीन काळच्या पारंपारिक सिद्धांतांचा पसारा गेली कित्येक वर्षे मानवाच्या अशा तऱ्हेच्या धारणांसाठी अधिकच पोषक बनून राहिलेला आहे. देवावर विश्वास ठेवताना, विविध कल्पनांच्या प्रभावामुळे माणसांमध्ये देवाबद्दलच्या सर्व प्रकारच्या काल्पनिक समजांची सातत्याने जडणघडण झाली आहे आणि त्यात मोठे बदल झालेले आहेत. त्यामुळे देवाची सेवा करणारे अनेक धार्मिक लोक प्रत्यक्षात त्याचे शत्रू बनले आहेत असे म्हणता येऊ शकते. म्हणून तर, लोकांच्या धार्मिक कल्पना जितक्या ठाशीव असतील, तितके ते देवाला विरोध करतात आणि तितक्या अधिक प्रमाणात ते देवाचे शत्रू असतात. देवाचे कार्य नेहमीच नवीन असते आणि ते कधीही जुने होत नसते; ते कधीही एखादी कायमस्वरुपी शिकवण देत नाही. त्याऐवजी ते सतत बदलत राहते आणि थोड्या किंवा फार प्रमाणात सतत नव्याने जन्मही घेत राहते. अशा प्रकारे कार्य करणे ही खुद्द ईश्वराच्या मूळ स्वभावाचीच अभिव्यक्ती आहे. हे देवाच्या कार्याचे मूलतत्त्वदेखील आहे आणि देव ज्याद्वारे आपले व्यवस्थापन टिकवून ठेवण्याचे काम करतो, त्या साठीचे ते एक माध्यमही आहे. देवाने अशा प्रकारे कार्य केले नाही, तर मनुष्य बदलणार नाही किंवा तो देवाला ओळखू शकणार नाही व सैतानाचा पराभवही होणार नाही. अशा प्रकारे देवाच्या कार्यात सतत बदल घडत असतात वरवर दिसताना ते चुकीचे वाटतात, परंतु प्रत्यक्षात ठरलेल्या काळाने ते घडत असतात. मात्र मनुष्याची देवावर विश्वास ठेवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. तो जुन्या, परिचित शिकवणींना आणि व्यवस्थांनाच चिकटून राहतो. त्या जितक्या जुन्या असतील, तितक्या त्याला अधिकच प्रिय असतात. एखाद्या पाषाणासम हट्टी असणारे माणसाचे मूर्ख मन देवाचे इतके अथांग असे भासणारे नवीन कार्य आणि वचन लगेच कसे स्वीकारू शकेल? मनुष्य नवीन प्रकारच्या, कधीही जुन्या न झालेल्या देवाचा नेहमी तिरस्कार करतो. त्याला फक्त म्हातारा असलेला देव आवडतो. कालबाह्य झालेला, पांढऱ्या केसांचा आणि एका जागीच अडकलेला देव त्याला पसंत असतो. अशाप्रकारे, देवाची आणि मनुष्याची पसंती वेगवेगळी असल्यामुळे, माणूस देवाचा शत्रू बनला आहे. सुमारे सहा हजार वर्षांपासून देव नवीन कार्य करत असून देखील यातील अनेक विरोधाभास आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्यावर काहीच उपाय नाही. कदाचित मनुष्याच्या हट्टीपणामुळे किंवा देवाच्या सत्तेचे आदेश मोडणे कोणाच्याही आवाक्याबाहेर असल्यामुळे हे घडत असावे—परंतु ते धर्मगुरु आणि स्त्रिया अजूनही जुन्या ग्रंथांना आणि चोपड्यांना चिकटून बसलेले असतात. खुद्द देव मात्र जणू आपल्या बाजूने कोणीच नाही असे समजून आपले विश्वाच्या व्यवस्थापनाचे अपूर्ण कार्य पुढे चालू ठेवतो. या विरोधाभासांमुळे देव आणि माणूस एकमेकांचे शत्रू होतात व त्यांचे शत्रुत्व कधीच मिटू शकत नाही. असे असले तरी देव त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जणू काही त्याच्यासाठी ते असून नसल्यासारखेच असतात. तरीही माणूस स्वतःच्या समजुती आणि धारणांना चिकटून राहतो आणि त्या कधीही सोडत नाही. हे काहीही असले, तरी एक गोष्ट स्वयंसिद्धच आहे—माणूस आपल्या भूमिकेपासून दूर जात नसला तरी, देव सतत संचार करत असतो आणि तो नेहमी बदलत्या परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलतो. कारण शेवटी माणूसच लढा न देता पराभूत होणार असतो. देवाच्या सर्व पराभूत शत्रूंचा सर्वात मोठा शत्रू हा देवच आहे. तसेच पराभूत आणि अपराजित असे दोन्ही असलेल्या मानवजातीचा तो विजेता आहे. देवाशी स्पर्धा करून कोण विजयी होऊ शकतो का? मनुष्याच्या धारणा देवाकडून आल्या आहेत असे दिसते, कारण त्यांच्यापैकी अनेकींचे मूळ देवाच्या कार्याच्या पार्श्वभूमीमध्ये सापडते. तथापि, यामुळे देव माणसाला क्षमा करत नाही. तसेच ईश्वरी कामाकरता मनुष्याने “देवासाठी” ची अनेकानेक उत्पादने उत्पादित केल्याबद्दल तो स्वतःच्या कामाच्या परिघाबाहेर जाऊन मनुष्यावर स्तुतीचा वर्षावही करत नाही. त्याऐवजी, मनुष्याच्या धारणा आणि जुनाट, धार्मिक श्रद्धांबद्दल त्याला अत्यंत तिरस्कार वाटत असतो. तसेच अशा कल्पना प्रथम केव्हा उदयाला आल्या याची दखल घेण्याचीही त्याला इच्छा होत नाही. या कल्पना आपल्या कार्यामुळे निर्माण झाल्या आहेत हेच त्याला मुळी मान्य नाही. मनुष्यजातीच्या कल्पना मनुष्यानेच पसरवलेल्या आहेत; मनुष्याचे विचार आणि मन हाच त्यांचा स्रोत आहे—ते मन देवाचे नसून सैतानाच्या प्राबल्याखालचे आहे. आपले कार्य नेहेमी नवीन आणि जिवंत असावे, जुने आणि मृत नसावे असा देवाचा हेतू असतो. मनुष्याने ज्या गोष्टींचे पालन करावे असे देवाला वाटते, त्या गोष्टी माणसाचे वय आणि काळ यांनुसार बदलत असते. ते चिरस्थायी आणि अपरिवर्तनीय नसते. याचे कारण म्हणजे माणसाने जगावे आणि नवनवीन बनत राहावे असे घडवून आणणारा देव आहे, तो काही माणसाला वृद्ध करणारा आणि त्याला मरण्यास प्रवृत्त करणारा सैतान नव्हे. तुम्हा लोकांना अजूनही हे समजत नाही का? तुझ्या देवाबद्दलच्या काही ठाशीव कल्पना आहेत आणि तू त्या सोडू शकत नाहीस. देवाच्या कार्याला फार कमी अर्थ आहे म्हणून किंवा देवाचे कार्य मानवी इच्छेहून निराळे आहे म्हणून, किंवा देव आपल्या कर्तव्याकडे कायम दुर्लक्ष करतो म्हणूनही असे होत नाही, तर तुझ्या मनाची कवाडे बंद आहेत म्हणून तसे घडत असते. देव तुझ्या वाटेत अडथळे आणत आहे म्हणून तू तुझ्या धारणा सोडू शकत नाहीस, असे मुळीच नाही, असे होण्याचे कारण म्हणजे तुझ्यामध्ये आज्ञाधारकपणा नाही आणि देवाने निर्माण केलेल्या अस्तित्वाशी तुझे जराही साम्य नाही; तू हे सर्व घडवून आणले आहेस आणि त्याचा देवाशी अजिबात संबंध नाही. आपले सर्व दुःख आणि दुर्दैव माणसानेच स्वत:साठी निर्माण केले आहे. देवाचे विचार नेहमीच चांगले असतात. तू काही धारणा करून घ्याव्यास असे त्याला मुळीच वाटत नाही. उलट, युगे जातील तसे तू बदलत जावेस आणि तुला नवे जीवन मिळावे अशीच त्याची इच्छा आहे. आपल्यासाठी काय चांगले आहे हे तुलाच माहीत नाही. तू नेहमी एकतर त्याच्या इच्छांची छाननी किंवा विश्लेषण करत बसतोस. देव तुझ्या वाटेत अडथळे आणत आहे असे नाही, तर तुला देवाबद्दल आदर नाही आणि तू खूप मोठ्या प्रमाणात त्याची अवज्ञा करत आहेस. देवाने तयार केलेल्या एका लहानशा जीवाने, देवाने पूर्वी दिलेल्या गोष्टींतला एक अगदी नाममात्र हिस्सा घेण्याचे धाडस करून, नंतर उलटून तीच गोष्ट देवावर हल्ला करण्यासाठी वापरणे, ही मनुष्याने त्याची केलेली अवज्ञा नाही का? देवासमोर आपले मत व्यक्त करण्यास मानव पूर्णत: अपात्र आहेत असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही. त्यांची ती निरुपयोगी, दुर्गंधीयुक्त, कुजलेली अलंकारयुक्त भाषा आपल्या मर्जीनुसार वापरण्याची तर त्यांची मुळीच पात्रता नाही—त्या बुरसटलेल्या कल्पनांबद्दल काहीही बोलण्याची त्यांची योग्यता नाही. मग ते अधिकच अपात्र ठरत नाहीत का?
जो खऱ्या अर्थाने देवाची सेवा करतो तो देवाचे हृदयाचे अनुसरण करतो. तो देवाने उपयोग करून घेण्याच्या पात्रतेचा असतो आणि तो जुन्या धार्मिक कल्पना सोडून देऊ शकतो. जर तुला प्रभावीपणे देवाच्या वचनांचे प्राशन आणि सेवन करायचे असेल, तर तू तुझ्या धार्मिक धारणा सोडून दिल्या पाहिजेस. तुला देवाची सेवा करायची असेल, तर प्रथम धार्मिक कल्पना सोडून देणे आणि प्रत्येक बाबतीत देवाच्या वचनांचे पालन करणे अधिकच आवश्यक आहे. देवाची सेवा करणार्या व्यक्तीकडे हे गुण असलेच पाहिजेत. तुझ्याकडे अशा गुणांचा अभाव असेल, तर तू सेवा करताच अव्यवस्था आणि अशांतता माजेल आणि तू तुझ्या कल्पनांना धरून राहिलास, तर देव तुला अटळपणे असा धडा शिकवेल, की तू पुन्हा कधीही त्यातून सावरू शकणार नाहीस. उदाहरणार्थ, सध्याचीच परिस्थिती पाहा—आजची अनेक वचने आणि कार्य बायबलशी आणि देवाने पूर्वी केलेल्या कार्याशी सुसंगत नाहीत. जर तुझी आज्ञा पाळण्याची इच्छा नसेल, तर तुला कधीही धडा शिकवला जाऊ शकतो. तुला जर देवाच्या इच्छेनुसार सेवा करायची असेल, तर तू प्रथम धार्मिक धारणा सोडून दिल्याच पाहिजेस आणि स्वतःचे विचार सुधारले पाहिजेस. पुढे जे काही बोलले जाईल त्यातील बरेचसे भूतकाळात जे सांगितले गेले आहे त्याच्यापेक्षा निराळ्या प्रकारचे असेल, आणि आता जर तुला ईश्वरी आज्ञा पाळण्याची इच्छा नसेल, तर तू पुढच्या मार्गावर चालण्यास अक्षम ठरशील. देवाच्या कार्यपद्धतींपैकी एखादी पद्धत तुझ्या आत खोलवर रुजली असेल आणि तू ती कधीही काढून टाकली नसशील, तर ही पद्धतच तुझी धार्मिक धारणा बनेल. जर ‘देव’ म्हणजे जे तत्त्व आहे ते तुझ्यामध्ये रुजले असेल, तर तुला सत्याची प्राप्ती झालेली असेल, आणि जर देवाचे शब्द आणि सत्य हेच तुझे जीवन होऊ शकणार असतील, तर यापुढे देवाबद्दल तुझ्या अशा कुठल्याच धारणा उरणार नाहीत. ज्यांच्याकडे देवाबाबतचे खरे ज्ञान आहे, त्यांच्या मनात कसल्याही धारणा नसतील आणि ते शिकवणुकीला चिकटून राहणार नाहीत.
स्वतःला जागृत ठेवण्यासाठी पुढील प्रश्न विचार:
१. तुझ्याकडे असलेले ज्ञान देवाच्या सेवेत हस्तक्षेप करते का?
२. तू आपल्या दैनंदिन जीवनात किती धार्मिक प्रथा पाळत असतोस? जर तू केवळ धार्मिकता बाह्य रुपातच दाखवत असशील, तर याचा अर्थ तुझे जीवन प्रगत आणि परिपक्व झाले आहे का?
३. जेव्हा तू देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करतोस, तेव्हा तू तुझ्या धार्मिक धारणा सोडू शकतोस का?
४. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तू धार्मिक उपचार टाळू शकतोस का?
५. देवाने तुझ्या सेवेचा उपयोग करून घ्यावा, यासाठी तू योग्य व्यक्ती आहेस का?
६. देवाविषयीच्या तुझ्या ज्ञानामध्ये धार्मिक कल्पना किती प्रमाणात आहेत?