तुम्ही दर्जारूपी आशीर्वाद दूर ठेवायला हवेत आणि मनुष्याचे तारण करण्याची देवाची इच्छा समजून घ्यायला हवी
मानवी दृष्टिकोनातून, मवाबाच्या वंशजांना परिपूर्ण बनवणे शक्य नाही, ते तसे बनवण्यास पात्रदेखील नाहीत. याउलट, दावीदाच्या मुलांच्या बाबतीत नक्कीच आशा आहे आणि त्यांना खरोखर परिपूर्ण केले जाऊ शकते. जर कोणी मवाबाचा वंशज असेल, तर त्याला परिपूर्ण करता येणार नाही. आजही, तुमच्यामध्ये केल्या जात असलेल्या कार्याचे महत्त्व तुम्हाला अजूनही माहीत नाही; या टप्प्यावर, तुम्ही अजूनही अंतःकरणात तुमच्या भविष्यातील संधींविषयी आशा बाळगता आणि त्यांचा त्याग करण्याचा तिरस्कार करता. आज देवाने तुमच्यासारख्या सर्वात अयोग्य लोकांच्या गटावर कार्य करण्याची निवड का केली, याची कोणालाही पर्वा नाही. या कार्यात त्याने चूक केली असावी का? क्षणिक नजरचुकीमुळे असे झाले का? तुम्ही मवाबाची मुले आहात हे ज्याला सदैव माहीत आहे, तो देव नेमका तुमच्यामध्ये कार्य करण्यासाठी खाली का आला? याचा विचार तुमच्या मनात कधी आला नाही का? देव त्याचे कार्य करताना याचा कधीच विचार करत नाही का? तो उद्धटपणे वागतो का? तुम्ही मवाबाचे वंशज आहात, हे त्याला सुरुवातीपासून माहीत नव्हते का? या गोष्टींचा विचार करायचे तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या धारणा कुठे गेल्या आहेत? तुमची ती निरोगी विचारसरणी चुकीची झाली आहे का? तुमची हुशारी आणि शहाणपण कुठे गेले? की तुम्ही इतके उदार आहात, की अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही? तुमची मने तुमच्या भविष्यातील संधी आणि तुमचे स्वतःचे नशीब यांसारख्या गोष्टींबद्दल सर्वात संवेदनशील असतात, परंतु इतर कोणत्याही गोष्टींबाबत ती सुन्न, मंदबुद्धी आणि पूर्णपणे अज्ञानी असतात. तुम्ही नेमके कशावर विश्वास ठेवता? तुमच्या भविष्यातील संधीवर? की देवावर? तुझा ज्या सर्व गोष्टींवर विश्वास आहे, ते तुझे सुंदर गंतव्यस्थान नाही का? त्या तुझ्या भविष्यातील संधी नाहीत का? जीवनाचा मार्ग तुला आता किती समजला आहे? तुम्ही किती मिळवले आहे? मवाबाच्या वंशजांवर सध्या जे कार्य केले जात आहे, ते तुमचा अपमान करण्यासाठी केले जात आहे असे तुला वाटते का? तुमची कुरूपता उघड करण्यासाठी हे मुद्दाम केले आहे का? हे तुम्हाला ताडण स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी आणि नंतर तुम्हाला अग्नीच्या सरोवरात फेकून देण्यासाठी जाणूनबुजून केले जाते का? मी असे कधीही म्हटले नाही, की तुम्हाला भविष्यात कोणत्याही संधी नाहीत, तुम्हाला नष्ट व्हावे लागेल किंवा विनाश सहन करावा लागेल, असे तर कधीच नाही. मी अशा गोष्टी जाहीर केल्या आहेत का? तू म्हणतोस, की तू आशाहीन आहेस, पण हा तू स्वतः काढलेला निष्कर्ष नाही का? हा तुझ्या स्वतःच्या मानसिकतेचा परिपाक नाही का? तुझे स्वतःचे निष्कर्ष गणले जातात का? जर मी असे म्हटले, की तू आशीर्वादीत नाहीस, तर तू नक्कीच नष्ट होशील; आणि जर मी म्हटले, की तू आशीर्वादीत आहेस, तर निश्चितच तुझा नाश होणार नाही. हे केवळ इतकेच आहे, की मवाबाच्या वंशजांना शाप देण्यात आला आहे आणि ते भ्रष्ट मानवांची एक जात आहेत. पापाचा उल्लेख पूर्वी केला होता; तुम्ही सर्व पापी नाही का? सर्व पापी सैतानाने भ्रष्ट केलेले नाहीत का? सर्व पापी लोक देवाचा अवमान आणि त्याच्याविरोधात बंड करत नाहीत का? जे देवाचा अवमान करतात, त्यांना शापित करू नये का? सर्व पापी लोकांना नष्ट केले जाऊ नये का? अशावेळी, रक्त-मांसाच्या लोकांपैकी कोणाला वाचवता येईल? तुम्ही आजपर्यंत कसे जगू शकलात? तुम्ही नकारात्मक झाला आहात, कारण तुम्ही मवाबाचे वंशज आहात; तुमचीदेखील पापी माणसं म्हणून गणना केली जात नाही का? तुम्ही आजपर्यंत कसे टिकून राहिलात? जेव्हा परिपूर्णतेचा उल्लेख केला जातो, तेव्हा तुम्ही आनंदी होता. तुम्हाला खूप क्लेश अनुभवावे लागतील हे ऐकल्यानंतर, तुम्हाला असे वाटते, की तुम्ही अधिक आशीर्वादीत झाला आहात. तुम्हाला असे वाटते, की क्लेशातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही विजयी होऊ शकता आणि हे देवाचे महान आशीर्वाद आणि तुमची महान उन्नती आहे. मवाबाचा उल्लेख केल्यावर, तुमच्यात गोंधळ माजतो; प्रौढ आणि लहान मुले दोघांनाही सांगता येणार नाही असे दुःख अनुभवतात आणि तुमच्या अंतःकरणात अजिबात आनंद नसतो आणि तुम्हाला जन्माला आल्याबद्दल खेद वाटतो. मवाबाच्या वंशजांमध्ये या टप्प्यातील कार्याचे महत्त्व तुम्हाला समजत नाही; तुम्हाला केवळ उच्च पदे मिळवणे माहीत असते आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते, की कोणतीही आशा नाही, तेव्हा तुम्ही मागे सरता. परिपूर्णता आणि भविष्यातील गंतव्यस्थानाचा उल्लेख केल्यावर, तुम्हाला आनंद वाटतो; तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहे कारण तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत आणि चांगले गंतव्यस्थान मिळवायचे आहे. काही लोकांना आता त्यांच्या स्थितीमुळे भीती वाटते. ते कमी मोलाचे आणि कनिष्ठ दर्जाचे असल्यामुळे, परिपूर्ण होऊ इच्छित नाहीत. प्रथम, परिपूर्णतेबद्दल बोलले गेले आणि नंतर मवाबाच्या वंशजांचा उल्लेख केला गेला, त्यामुळे लोकांनी पूर्वी उल्लेख केलेल्या परिपूर्णतेचा मार्ग नाकारला. याचे कारण असे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तुम्हाला या कार्याचे मोल कधीच कळले नाही किंवा तुम्ही त्याची पर्वाही केली नाही. तुमची पातळी खूप कमी आहे आणि अगदी थोडासा त्रासही तुम्ही सहन करू शकत नाही. जेव्हा तुम्ही पाहता, की तुमचा स्वतःचा दर्जा खूप कमी आहे, तेव्हा तुम्ही नकारात्मक बनता आणि शोध घेण्याचा आत्मविश्वास गमावता. लोक केवळ कृपेची प्राप्ती आणि शांतीचा उपभोग यांना श्रद्धेचे प्रतीक मानतात आणि आशीर्वादाचा शोध हा त्यांच्या देवावरील विश्वासाचा आधार मानतात. फार कमी लोक देवाला जाणून घेण्याचा किंवा त्यांच्या प्रवृत्तीत बदल करण्याचा प्रयत्न करतात. लोक त्यांच्या श्रद्धेनुसार, देवाला त्यांना एक योग्य गंतव्यस्थान आणि त्यांना आवश्यक असलेली सर्व कृपा द्यायला लावण्याचा, त्याला आपला सेवक बनवण्याचा प्रयत्न करतात, त्याला त्यांच्याशी शांततापूर्ण, मैत्रीपूर्ण नातेसंबंध ठेवायला लावण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून, त्यांच्यामध्ये कधीही संघर्ष होऊ नये. म्हणजेच, देवावरील त्यांच्या विश्वासाची ही मागणी असते, की बायबलमधील “मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकेन” या त्यांनी वाचलेल्या शब्दांच्या अनुषंगाने देवाने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे वचन द्यावे आणि त्यांनी ज्यासाठी प्रार्थना केली, ते सर्व त्यांना पुरवावे. त्यांची अशी अपेक्षा असते, की देवाने कोणाचाही न्याय करू नये किंवा कोणाचाही सामना करू नये, कारण तो निरंतर दयाळू तारणहार येशू आहे जो सदैव आणि सर्वत्र लोकांशी चांगला संबंध ठेवतो. लोक देवावर विश्वास ठेवतात तो अशा पद्धतीने: ते केवळ निर्लज्जपणे देवाकडे मागणी करतात, त्यांना वाटते की ते बंडखोर असोत वा आज्ञाधारक, तो त्यांना सर्व काही अंधपणाने देईल. ते निरंतर देवाकडून केवळ “कर्ज गोळा” करतात, या विश्वासाने, की त्याने कोणत्याही प्रतिकाराशिवाय त्यांना “परतफेड” करावी, एवढेच नव्हे तर दामदुपटीने द्यावे; त्यांना वाटते, की देवाला त्यांच्याकडून काही मिळालेले असो वा नसो, ते त्याला केवळ हाताळू शकतात आणि तो स्वैरपणे लोकांचे व्यवस्थापन करू शकत नाही, मग कित्येक वर्षे लपून राहिलेले त्याचे शहाणपण आणि नीतिमान प्रवृत्ती त्याला हवी तेव्हा आणि लोकांच्या परवानगीविना त्यांच्यासमोर प्रकट करणे तर दूरच. ते केवळ देवाला त्यांच्या पापांची कबुली देतात, त्यांना वाटते की देव त्यांना क्षमा करेल, असे करण्याची त्याला घृणा वाटणार नाही आणि हे निरंतर चालू राहील. देव त्यांची आज्ञा पाळेलच असा विश्वास ठेवून ते केवळ देवाला आदेश देतात, कारण बायबलमध्ये असे लिहिले आहे, की देव मनुष्यांकडून सेवा करून घेण्यासाठी नाही, तर त्यांची सेवा करण्यासाठी आलेला आहे आणि तो येथे त्यांचा सेवक होण्यासाठी आला आहे. तुम्ही निरंतर असा विश्वास बाळगलेला नाही का? जेव्हा तुम्ही देवाकडून काही मिळवण्यास असमर्थ ठरता, तेव्हा तुम्हाला पळून जाण्याची इच्छा होते; जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही, तेव्हा तुम्ही इतके चिडता आणि त्याला सर्व प्रकारे शिवीगाळ करण्यापर्यंत तुमची मजल जाते. तुम्ही देवाला त्याचे शहाणपण आणि आश्चर्य पूर्णपणे व्यक्त करू देणार नाही; त्याऐवजी, तुम्हाला केवळ तात्पुरत्या सुखसोयी आणि आरामाचा आनंद घ्यायचा असतो. आत्तापर्यंत, देवावरील तुमच्या श्रद्धेतील तुमच्या दृष्टिकोनात केवळ त्याच जुन्या मतांचा समावेश होता. जर देवाने तुम्हाला थोडेसे वैभव दाखवले, तर तुम्ही दुःखी होता. तुमची पातळी नेमकी किती आहे, हे आता तुम्हाला समजते का? तुमची जुनी मते बदललेली नसतानाही तुम्ही सर्व देवाशी एकनिष्ठ आहात असे समजू नका. जेव्हा तुला काहीही होत नाही, तेव्हा तुला वाटते, की सर्व काही सुरळीत चालले आहे आणि तुझे देवावरील प्रेम उच्च बिंदूवर पोहोचते. जेव्हा तुला किरकोळ काही तरी होते, तेव्हा तू नरकात पडतोस. हे देवाशी एकनिष्ठ राहणे आहे का?
जर विजयाच्या कार्याचा अंतिम टप्पा इस्रायलमध्ये सुरू होणार असेल, तर अशा विजयाच्या कार्याला काही अर्थ उरणार नाही. हे कार्य तेव्हा सर्वात लक्षणीय ठरेल, जेव्हा ते चीनमध्ये पार पाडले जाईल आणि तुम्हा लोकांवर पार पाडले जाईल. सर्व लोकांमध्ये तुम्ही सर्वात कनिष्ठ, सर्वात कमी दर्जाचे लोक आहात; तुम्ही या समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरील लोक आहात आणि सुरुवातीला देवाला सगळ्यात कमी मान्यता देणारे तुम्हीच आहात. तुम्ही असे लोक आहात जे देवापासून सगळ्यात दूर गेलेले आहात आणि ज्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. कारण कार्याचा हा टप्पा केवळ विजयासाठी आहे, भविष्यातील साक्षीदार होण्यासाठी तुम्हाला निवडणे सर्वात योग्य नाही का? विजयाच्या कार्याची पहिली पायरी तुम्हा लोकांवर केली नसती, तर पुढे जे विजयाचे कार्य होणार आहे ते पुढे नेणे कठीण होऊन बसेल, कारण विजयाचे जे कार्य पुढे चालणार आहे, त्याचे परिणाम आज केल्या जात असलेल्या कार्याच्या वस्तुस्थितीवर आधारित असतील. विजयाचे सध्याचे कार्य ही विजयाच्या एकूण कार्याची केवळ सुरुवात आहे. ज्यांच्यावर विजय मिळवायचा आहे, त्यांच्यापैकी तुम्ही पहिली तुकडी आहात; तुम्ही सर्व मानवजातीचे प्रतिनिधी आहात, ज्यांना जिंकले जाईल. ज्या लोकांकडे खरे ज्ञान आहे त्यांना समजेल, की देव आज करत असलेले सर्व कार्य महान आहे आणि तो लोकांना केवळ त्यांची स्वतःची बंडखोरी समजण्याची परवानगी देत नाही, तर त्यांचा दर्जादेखील प्रकट करतो. त्याच्या वचनांचा उद्देश आणि अर्थ लोकांना निराश करणे किंवा त्यांना पाडणे हा नाही. त्याच्या शब्दांद्वारे त्यांनी आत्मज्ञान आणि तारण प्राप्त करावे; त्याच्या शब्दांद्वारे त्यांचा आत्मा जागृत करावा. जगाच्या निर्मितीपासून, मनुष्य सैतानाच्या अधिपत्याखाली राहिला आहे, देव आहे हे त्याला माहीत नाही किंवा यावर त्याचा विश्वास नाही. या लोकांना देवाच्या महान तारणात समाविष्ट केले जाऊ शकते आणि देवाकडून मोठ्या प्रमाणात उन्नत केले जाऊ शकते, यावरून खरोखरच देवाचे प्रेम दिसते; ज्यांना हे खऱ्या अर्थाने समजते, ते सर्व यावर विश्वास ठेवतील. ज्यांना असे ज्ञान नाही त्यांचे काय? ते म्हणतील, “अहो, देव म्हणतो, की आम्ही मवाबाचे वंशज आहोत; हे त्याने स्वतःच्या शब्दात सांगितले. तरीही आम्ही चांगले फलित साध्य करू शकतो का? आम्ही मवाबचे वंशज आहोत आणि भूतकाळात आम्ही त्याचा प्रतिकार केला आहे. देव आम्हाला दोषी ठरवण्यासाठी आला आहे; त्याने सुरुवातीपासूनच आमचा निरंतर न्याय कसा केला आहे, हे तुला दिसत नाही का? आम्ही देवाचा प्रतिकार केला आहे, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे शिक्षा दिली पाहिजे.” ही वचने बरोबर आहेत का? आज देव तुमचा न्याय करतो, तुम्हाला शिक्षा करतो आणि तुमची निंदा करतो, परंतु तू स्वतःला ओळखावेस, हेच या निंदेचे कारण आहे, हे तुला माहीत असले पाहिजे. तो निंदा करतो, शाप देतो, न्याय करतो आणि शिक्षा देतो, जेणेकरून तू स्वतःला ओळखू शकशील, तुझी प्रवृत्ती बदलू शकशील, एवढेच नव्हे, तर तुला तुझी योग्यता कळेल, जेणेकरून तुला पाहता येईल, की देवाच्या सर्व कृती नीतिमान आहेत आणि त्याच्या प्रवृत्तीनुसार आणि त्याच्या कार्याच्या आवश्यकतांनुसार आहेत, तो मनुष्याच्या तारणासाठी त्याच्या योजनेनुसार कार्य करतो आणि तो नीतिमान देव आहे जो मनुष्यावर प्रेम करतो, त्याला वाचवतो, त्याचा न्याय करतो आणि त्याला सुधारतो. जर तुला केवळ हे माहीत असेल, की तू नीच दर्जाचा आहेस, भ्रष्ट आणि अवज्ञाकारी आहेस, परंतु तुला हे माहीत नसेल, की देव तुझ्यामध्ये आज करत असलेला न्याय आणि ताडण यांद्वारे त्याचे तारण स्पष्ट करू इच्छितो, तर तुझ्याकडे अनुभव मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही, मग तू पुढे जाण्यास सक्षम असणे तर दूरच. देव हा मारण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी आलेला नाही, तर न्याय करण्यासाठी, शाप देण्यासाठी, ताडण करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे. जोपर्यंत त्याची ६,००० वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत—तो मनुष्याच्या प्रत्येक श्रेणीचे परिणाम प्रकट करेपर्यंत—देवाचे पृथ्वीवरील कार्य हे तारणासाठी असेल; त्याचा उद्देश हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना परिपूर्ण करणे—पूर्णपणे—आणि त्यांना त्याच्या अधिपत्याखाली आणणे हा आहे. देव लोकांना कसे वाचवतो हे महत्त्वाचे नाही, हे सर्व त्यांना त्यांच्या जुन्या सैतानी स्वभावापासून दूर करून केले जाते; म्हणजेच, त्यांना जीवनाचा शोध घ्यायला लावून तो त्यांना वाचवतो. जर त्यांनी तसे केले नाही, तर देवाचे तारण स्वीकारण्याचा कोणताही मार्ग त्यांच्याकडे असणार नाही. तारण हे देवाचे स्वतःचे कार्य आहे आणि तारण स्वीकारण्यासाठी मनुष्याने जीवनाचा शोध हा स्वीकारलाच पाहिजे. मनुष्याच्या दृष्टीने, तारण हे देवाचे प्रेम आहे आणि देवाचे प्रेम हे शिक्षा, न्याय आणि शाप असू शकत नाही; तारणामध्ये प्रेम, करुणा एवढेच नव्हे तर सांत्वनाची वचने, तसेच देवाने दिलेले अमर्याद आशीर्वाद असले पाहिजेत. लोकांचा असा विश्वास असतो, की जेव्हा देव मनुष्याला वाचवतो, तेव्हा तो त्याच्या आशीर्वादाने आणि कृपेने त्यांना हलवतो, जेणेकरून ते त्यांचे अंतःकरण देवाला देऊ शकतील. म्हणजेच, त्याने मनुष्याला स्पर्श करणे म्हणजेच त्याने त्यांना वाचवणे आहे. अशा प्रकारचे तारण करार करून केले जाते. केवळ जेव्हा देव मनुष्याला शंभरपट देतो, तेव्हाच मनुष्य देवाच्या नावापुढे शरण जाईल आणि त्याच्यासाठी चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला गौरव प्राप्त करून देईल. मानवजातीसाठी देवाची ही इच्छा नाही. भ्रष्ट मानवजातीला वाचवण्यासाठी देव पृथ्वीवर कार्य करण्यासाठी आला आहे; यात काही असत्य नाही. जर तसे असते, तर तो त्याचे कार्य करण्यासाठी स्वतःहून निश्चितच आला नसता. भूतकाळात, त्याच्या तारणाच्या साधनांमध्ये अत्यंत प्रेम आणि करुणा दाखवण्याचा समावेश होता, जसे की त्याने संपूर्ण मानवजातीच्या बदल्यात त्याचे सर्वस्व सैतानाला दिले. वर्तमान हे भूतकाळासारखे बिलकुल नाही: आज तुम्हाला लाभलेले तारण शेवटच्या दिवसांच्या वेळी, प्रत्येकाच्या प्रकारानुसार वर्गीकरण करण्याच्या दरम्यान होते; म्हणजेच तुमच्या तारणाचे साधन प्रेम किंवा करुणा नाही, तर ताडण आणि न्याय आहे, जेणेकरून मनुष्य अधिक चांगल्या प्रकारे वाचू शकेल. अशा प्रकारे, तुम्हाला जे काही मिळते ते ताडण, न्याय आणि निर्दयपणे मारणे आहे, परंतु हे जाणून घ्या: या निर्दयी मारहाणीत किंचितही ताडण नाही. माझी वचने कितीही कठोर असली तरीही, तुम्हाला ज्याला तोंड द्यावे लागते, ती केवळ काही वचने असतात, जी तुम्हाला पूर्णपणे निर्दयी वाटू शकतात आणि मी कितीही रागावलो असलो तरीही तुमच्यावर जे बरसतात ती केवळ शिकवणुकीची वचने असतात आणि तुमचे नुकसान करण्याचा किंवा तुम्हाला मारण्याचा माझा उद्देश नसतो. हे सर्व तथ्य नाही का? हे जाणून घ्या की आजकाल, तो यथोचित न्याय असो किंवा निर्दयी परिष्करण आणि ताडण असो, सर्व काही तारणासाठी आहे. आज प्रत्येकाचे प्रकारानुसार वर्गीकरण केले किंवा मनुष्याच्या श्रेणी उघड केल्या तरीदेखील, देवाच्या सर्व वचनांचा आणि कार्याचा उद्देश हा देवावर खरोखर प्रेम करणाऱ्यांना वाचवणे हा आहे. मनुष्याला शुद्ध करण्यासाठी यथोचित न्याय केला जातो आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी निर्दयी परिष्करण केले जाते; कठोर शब्द किंवा ताडण दोन्ही शुद्ध करण्यासाठी केले जातात आणि तारणासाठी आहेत. अशा प्रकारे, तारणाची आजची पद्धत भूतकाळातील पद्धतीसारखी नाही. आज, तुम्हाला यथोचित न्यायाद्वारे तारण प्राप्त झाले आहे आणि हे तुमच्या प्रत्येकाचे प्रकारानुसार वर्गीकरण करण्यासाठी चांगले साधन आहे. शिवाय, निर्दयी ताडण तुमचे परम तारण म्हणून कार्य करते—आणि अशी असे ताडण आणि न्याय यांच्याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत निरंतर तारणाचा आनंद लुटलेला नाही का? तुम्ही देहधारी देवाला पाहिलेले आहे आणि त्याची सर्वशक्तिमानता आणि बुद्धीची जाणीव तुम्हाला झाली आहे; एवढेच नव्हे, तर तुम्ही वारंवार ताडण आणि शिस्त अनुभवली आहे. मात्र, तुम्हाला सर्वोच्च कृपादेखील प्राप्त झालेली नाही का? तुमचे आशीर्वाद इतर कोणाच्याहीपेक्षा मोठे नाहीत का? शलमोनाने उपभोगलेले वैभव आणि संपत्तीपेक्षाही तुमची कृपा अधिक उदार आहे! विचार करा: जर माझ्या आगमनाचा उद्देश तुम्हाला वाचवण्याऐवजी तुम्हाला दोषी ठरवून शिक्षा करण्याचा असता, तर तुम्ही एवढे दिवस वाचला असतात का? तुम्ही रक्तामांसांचे पापी प्राणी आजपर्यंत जगू शकला असतात का? जर तुम्हाला शिक्षा करणे हेच केवळ माझे ध्येय असते, तर मी देहधारी होऊन एवढा मोठा उद्योग का केला असता? तुम्हा सामान्य मर्त्य मानवांना केवळ एक शब्द उच्चारून शिक्षा करता येणार नाही का? हेतुपुरस्सर तुमची निंदा केल्यानंतरही, तुमचा नाश करायची मला गरज आहे का? माझ्या या वचनांवर तुमचा अजूनही विश्वास बसत नाही का? मी केवळ प्रेम आणि करुणेने मनुष्याला वाचवू शकतो का? किंवा मी मनुष्याला वाचवण्यासाठी केवळ वधस्तंभावर खिळण्याचा वापर करू शकतो? माझी नीतिमान प्रवृत्ती मनुष्याला पूर्णपणे आज्ञाधारक बनवण्यासाठी अधिक अनुकूल नाही का? ती मनुष्याला पूर्णपणे वाचवण्यास अधिक समर्थ नाही का?
जरी माझी वचने कठोर असली, तरी ती सर्व मनुष्याच्या तारणासाठी उच्चारलेली आहेत, कारण मी केवळ वचने उच्चारत आहे, मनुष्याच्या देहाला शिक्षा देत नाही. ही वचने मनुष्याला प्रकाशात जगण्यास, प्रकाश अस्तित्वात आहे हे त्याला कळण्यास, प्रकाश मौल्यवान आहे हे उमजण्यास, एवढेच नव्हे, तर ही वचने त्यांच्यासाठी किती लाभदायक आहेत हे जाणून घेण्यास, तसेच देव तारण आहे, हे जाणून घेण्यास कारणीभूत ठरतात. जरी मी ताडण आणि न्यायाची अनेक वचने उच्चारली आहेत, तरीही ती ज्याचे प्रतिनिधित्व करतात, ते तुमच्यावर कृतीत केले गेलेले नाही. मी माझे कार्य करण्यासाठी आणि माझी वचने उच्चारण्यासाठी आलेलो आहे आणि माझी वचने जरी कठोर असली तरी ती तुमचा भ्रष्टाचार आणि तुमचा बंडखोरपणा यांचा न्याय करण्यासाठी उच्चारलेली आहेत. मी हे करण्यामागचा उद्देश मनुष्याला सैतानाच्या अधिपत्यापासून वाचवणे हा आहे; मी माझी वचने मनुष्याला वाचवण्यासाठी वापरत आहे. माझ्या वचनांनी मनुष्याला इजा करणे हा माझा उद्देश नाही. माझ्या कार्याचा परिणाम साधण्यासाठीच माझी वचने कठोर आहेत. केवळ अशा कार्यातूनच मनुष्य स्वतःला ओळखू शकतो आणि त्यांच्या बंडखोर प्रवृत्तीपासून दूर जाऊ शकतो. वचनांच्या कार्याचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे लोकांना सत्य समजल्यानंतर ते आचरणात आणण्यास परवानगी देणे, त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणणे आणि स्वतःचे आणि देवाच्या कार्याचे ज्ञान प्राप्त करणे. केवळ वचने उच्चारून कार्य केल्याने देव आणि मनुष्य यांच्यातील संवाद शक्य होतो आणि केवळ वचनेच सत्य समजावून सांगू शकतात. अशा प्रकारे कार्य करणे हे मनुष्यावर विजय मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे; वचनांच्या उच्चारणाशिवाय, अन्य कोणतीही पद्धत लोकांना सत्य आणि देवाच्या कार्याची स्पष्ट समज देण्यास सक्षम नाही. अशाप्रकारे, देवाच्या कार्याच्या अखेरच्या टप्प्यात, देव मनुष्याशी बोलतो जेणेकरून त्यांना अद्याप न समजलेली सर्व सत्ये आणि रहस्ये उलगडता येतील, त्यांना देवाकडून खरा मार्ग आणि जीवन मिळू शकेल आणि त्याद्वारे त्याची इच्छा पूर्ण होईल. मनुष्यावर देवाच्या कार्याचा उद्देश त्यांना देवाच्या इच्छेनुसार सक्षम करणे हा आहे आणि त्यांचे तारण करण्यासाठी हे केले जाते. म्हणून, मनुष्याच्या तारणाच्या काळात, तो त्यांना शिक्षा करण्याचे कार्य करत नाही. मनुष्याला तारण प्राप्त करून देताना, देव वाईटाला शिक्षा देत नाही किंवा चांगल्याला बक्षीस देत नाही किंवा तो विविध प्रकारच्या लोकांची गंतव्यस्थानेही प्रकट करत नाही. त्याऐवजी, त्याच्या कार्याचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतरच तो वाईटाला शिक्षा आणि चांगल्याला बक्षीस देण्याचे कार्य करेल आणि तेव्हाच तो विविध प्रकारच्या सर्व लोकांचे अंत प्रकट करेल. ज्यांना शिक्षा होईल, ते असे असतील ज्यांना वाचवणे खरोखरच शक्य नाही, तर ज्यांना वाचवले जाईल, ते असे असतील, ज्यांनी मनुष्याच्या तारणाच्या वेळी देवाकडून तारण प्राप्त केले आहे. देवाचे तारणाचे कार्य केले जात असताना, ज्यांना वाचवणे शक्य आहे अशा शक्य त्या प्रत्येक व्यक्तीला वाचवले जाईल आणि त्यापैकी कोणाचाही त्याग केला जाणार नाही, कारण देवाच्या कार्याचा उद्देश मनुष्याला वाचवणे हाच आहे. देवाकडून मानवाचे तारण करण्याच्या काळात, जे लोक त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यास असमर्थ असतात—त्याचबरोबर जे लोक पूर्णपणे देवाच्या अधीन होऊ शकत नाहीत—त्या सर्वांना शिक्षा केली जाईल. कार्याचा हा टप्पा—वचनांचे कार्य—लोकांना न समजणारे सर्व मार्ग आणि रहस्ये उलगडून दाखवेल, जेणेकरून त्यांना देवाची इच्छा आणि देवाला त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा समजू शकतील तसेच देवाची वचने व्यवहारात आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी पूर्वतयारी करता येईल. देव त्याचे कार्य करण्यासाठी केवळ वचने वापरतो आणि थोडा बंडखोरपणा केला म्हणून लोकांना शिक्षा देत नाही; कारण आता तारणाच्या कार्याची वेळ आली आहे. बंडखोर कृत्य करणार्याला शिक्षा झाली, तर कोणाला वाचवण्याची संधी मिळणार नाही; प्रत्येकाला शिक्षा होईल आणि तो नरकात पडेल. मनुष्याचा न्याय करणार्या वचनांचा उद्देश हा त्यांना स्वतःला जाणून घेण्याची आणि देवाच्या अधीन जाण्याची परवानगी देणे हा आहे; अशा न्यायाने त्यांना शिक्षा करणे हा नाही. वचनांच्या कार्याच्या काळात, बरेच लोक त्यांचा बंडखोरपणा आणि अवहेलना, तसेच देहधारी देवाप्रती त्यांची अवज्ञा प्रकट करतील. तरीसुद्धा, परिणाम म्हणून तो या सर्व लोकांना शिक्षा करणार नाही, तर त्याऐवजी जे अंतःकरणापासून भ्रष्ट आहेत आणि ज्यांना वाचवता येणार नाही त्यांनाच बाजूला टाकेल. तो त्यांचे देह सैतानाला देईल आणि काही प्रकरणांमध्ये, त्यांचे शरीर संपुष्टात आणेल. जे उरतील ते अनुसरण करत राहतील आणि त्यांना सामोरे जाण्याचा आणि छाटण्याचा अनुभव घेतील. जर, अनुसरण करत असताना, हे लोक अजूनही सामोरे जाणे आणि छाटले जाणे स्वीकारण्यात अक्षम असतील आणि त्यांचे अधिकाधिक अधःपतन होत असेल, तर त्यांची तारणाची संधी संपुष्टात येईल. देवाच्या वचनांद्वारे जिंकले जाण्याच्या अधीन झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तारणाची भरपूर संधी मिळेल; या प्रत्येकाचे देवाकडून तारण होणे हे त्याची कमालीची उदारता दर्शवेल. दुसऱ्या शब्दांत, त्यांना अत्यंत सहिष्णुता दाखवली जाईल. जोपर्यंत लोक चुकीच्या मार्गापासून मागे वळतात आणि जोपर्यंत ते पश्चात्ताप करू शकतात, तोपर्यंत देव त्यांना त्याचे तारण प्राप्त करण्याची संधी देईल. जेव्हा मनुष्य पहिल्यांदा देवाविरुद्ध बंड करतो, तेव्हा त्यांना ठार मारण्याची त्याची इच्छा नसते; उलट, तो त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. जर कोणाला खरोखरच तारणाची संधी नसेल, तर देव त्यांना बाजूला टाकेल. देव काही लोकांना शिक्षा करण्यासाठी मंदगतीने पावले उचलतो याचे कारण म्हणजे ज्यांना वाचवले जाऊ शकते अशा प्रत्येकाला वाचवण्याची त्याची इच्छा आहे. तो केवळ वचनांनी लोकांना न्याय देतो, ज्ञान देतो आणि मार्गदर्शन करतो आणि त्यांना मारण्यासाठी दंड वापरत नाही. मनुष्यांना तारण प्राप्त करून देण्यासाठी वचनांचा वापर करणे हा कार्याच्या अंतिम टप्प्याचा उद्देश आणि महत्त्व आहे.