राज्याच्या युगात देवाने निवडलेल्या लोकांनी पाळणे आवश्यक असलेले दहा प्रशासकीय आदेश

१. मनुष्याने स्वतःला मोठे दाखवू नये किंवा बढाई मारू नये. त्याने देवाची उपासना आणि स्तुती करावी.

२. देवाच्या कार्यासाठी फायदेशीर असे सर्व काही करा आणि देवाच्या कार्याच्या हितासाठी बाधा आणणारे काहीही करू नका. देवाचे नाव, देवाची साक्ष व देवाच्या कार्याचे रक्षण करा.

३. देवाच्या घरातील पैसा, भौतिक वस्तू आणि सर्व मालमत्ता या मनुष्याने देऊन टाकल्या पाहिजेत. या अर्पणांचा उपभोग याजक व देव यांच्याशिवाय कोणीही घेऊ शकत नाही, कारण मनुष्याची अर्पणे ही देवाच्या आनंदासाठी असतात. देव ही अर्पणे फक्त याजकांसोबत सामायिक करतो; इतर कोणीही त्यांच्या कोणत्याही भागाचा आनंद घेण्यास पात्र किंवा लायक नाही. मनुष्याची सर्व अर्पणे (पैसे आणि भौतिक गोष्टींसह ज्यांचा आनंद घेता येईल अशी) देवाला दिली जातात, मनुष्याला नाही व म्हणून या गोष्टींचा आनंद मनुष्याने घेऊ नये; जर मनुष्य त्यांचा उपभोग घेत असेल तर ते अर्पणांची चोरी करणे आहे. जो कोणी असे करतो तो एक यहूदा आहे, कारण तो द्रोही होता, तसेच पैशाच्या पिशवीत जे ठेवले होते ते यहुदाने स्वतःच घेतले.

४. मनुष्याची प्रवृत्ती भ्रष्ट आहे आणि शिवाय त्याच्यात भावना असतात. त्यामुळे, देवाची सेवा करताना विरुद्ध लिंगाच्या दोन सदस्यांना एकांतात एकत्र कार्य करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे करताना आढळलेल्या कोणालाही अपवाद न करता, निष्कासित केले जाईल.

५. देवाबद्दल न्याय देऊ नका किंवा देवाशी संबंधित विषयांवर सहजपणे चर्चा करू नका. मनुष्याने जसे केले पाहिजे तसे करा आणि मनुष्याने जसे बोलले पाहिजे तसे बोला व मर्यादा ओलांडू नका अथवा सीमा उल्लंघू नका. तुमची जीभ सांभाळा आणि तुम्ही कुठेही पाऊल ठेवताना काळजी घ्या, देवाच्या प्रवृत्तीला अपमानित करणारे काहीही करू नका.

६. मनुष्याने जे केले पाहिजे ते करा आणि तुमची कर्तव्ये पार पाडा व तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा व तुमचे कर्तव्य पाळा. तुमचा देवावर विश्वास असल्याने, तुम्ही देवाच्या कार्यात तुमचे योगदान दिले पाहिजे; जर तुम्ही तसे केले नाही, तर तुम्ही देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्यास अयोग्य आहात व देवाच्या घरामध्ये राहण्यास अयोग्य आहात.

७. चर्चच्या कार्यात आणि गोष्टींमध्ये, देवाची आज्ञा पाळण्याव्यतिरिक्त, प्रत्येक गोष्टीत पवित्र आत्म्याद्वारे वापरल्या जाणार्‍या मनुष्याच्या सूचनांचे अनुसरण करा. अगदी लहानसे उल्लंघनदेखील अस्वीकार्य आहे. तुमच्या अनुपालनामध्ये परिपूर्ण रहा व योग्य किंवा अयोग्य विश्लेषण करू नका; बरोबर काय चुकीचे काय याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. संपूर्ण तुम्ही आज्ञाधारकतेवरच तुमचे लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

८. जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांनी देवाची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला उच्चासनी नेऊ नका किंवा आदर्श म्हणून पाहू नका; देवाला प्रथम, तुमच्या आदर्श व्यक्तींना दुसरे आणि स्वतःला तिसरे स्थान देऊ नका. कोणत्याही व्यक्तीने तुमच्या हृदयात स्थान धारण करू नये आणि तुम्ही लोकांना-विशेषतः ज्यांना तुम्ही आदराने पाहता त्यांना-देवाच्या बरोबरीने किंवा त्याच्या तोडीचे मानू नये. हे देवासाठी असह्य आहे.

९. तुमचे विचार चर्चच्या कार्यावर केंद्रित करा. तुमच्या स्वतःच्या देहाची संधी बाजूला ठेवा, कौटुंबिक बाबींवर निर्णायक व्हा, मनापासून स्वतःला देवाच्या कार्यात झोकून द्या आणि देवाचे कार्य प्रथम ठेवा व स्वतःचे जीवन दुसरे ठेवा. ही पवित्र जनाची शालीनता आहे.

१०. जे नातेवाईक श्रद्धा बाळगत नाहीत (तुमची मुले, तुमचा पती किंवा पत्नी, तुमच्या बहिणी किंवा तुमचे पालक आणि असे बरेच) त्यांना चर्चमध्ये येण्यास जबरदस्ती करू नये. देवाच्या घरामध्ये सदस्यांची कमतरता नाही व ज्यांचा काही उपयोग नाही अशा लोकांची त्यात भर करवण्याची गरज नाही. जे लोक आनंदाने विश्वास ठेवत नाहीत त्यांना चर्चमध्ये नेले जाऊ नये. हा आदेश सर्व लोकांसाठी निर्देशित आहे. तुम्ही या प्रकरणाची तपासणी, निरीक्षण आणि एकमेकांना आठवण करून दिली पाहिजे; कोणीही त्याचे उल्लंघन करू शकत नाही. श्रद्धा नसलेले नातेवाईक जेव्हा अनिच्छेने चर्चमध्ये प्रवेश करतात, तेव्हा त्यांना पुस्तके देऊ नयेत किंवा नवीन नाव देऊ नये; असे लोक देवाच्या घरातील नसतात व त्यांचा चर्चमधील प्रवेश आवश्यक त्या कोणत्याही मार्गाने थांबवला पाहिजे. जर भुतांच्या आक्रमणामुळे चर्चवर संकटे आली, तर तुम्हालाच काढून टाकले जाईल किंवा तुमच्यावर निर्बंध लादले जातील. थोडक्यात, या प्रकरणात प्रत्येकाची जबाबदारी आहे, तुम्ही बेपर्वा होऊ नका किंवा वैयक्तिक गोष्टींचा बदला घेण्यासाठी त्याचा वापर करू नका.

मागील:  सर्वशक्तिमान देवाचा निःश्वास

पुढील:  परिशिष्ट 1: नवीन युगात देव प्रकट झाला आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger