पेत्राचे अनुभव: ताडण आणि न्याय याबद्दल त्याचे ज्ञान

जेव्हा देवाने पेत्राचे ताडण केले, तेव्हा त्याने प्रार्थना केली, “हे देवा! माझा देह अवज्ञाकारी आहे आणि तू माझे ताडण करतोस व माझा न्याय करतोस. मी तुझ्या ताडणाने आणि न्यायाने आनंदित आहे व जरी तुला मी नको असलो, तरी तुझ्या न्यायामध्ये मी तुझी पवित्र आणि नीतिमान प्रवृत्ती पाहतो. जेव्हा तू माझा न्याय करतोस, जेणेकरून इतरांना तुझ्या न्यायामध्ये तुझी नीतिमान प्रवृत्ती दिसेल, तेव्हा मला समाधान वाटते. जर त्यामुळे तुझी प्रवृत्ती व्यक्त होऊ शकत असेल व तुझी नीतिमान प्रवृत्ती सर्व निर्मिलेल्या प्राण्यांना दिसू शकत असेल आणि जर त्यामुळे तुझ्यावरचे माझे प्रेम अधिक शुद्ध होऊ शकत असेल, ज्याने मी नीतिमान व्यक्तीची समानता प्राप्त करू शकेन, तर तुझा न्याय चांगला आहे, कारण तुझी इच्छा खूपच उदंड आहे. मला माहीत आहे, की माझ्यामध्ये अजूनही बरेच काही आहे जे बंडखोर आहे व मी अजूनही तुझ्यासमोर येण्यास योग्य नाही. प्रतिकूल वातावरण असो वा मोठे संकट असो तू माझा आणखी न्याय करावा अशी माझी इच्छा आहे; तू काहीही केलेस, तरी माझ्यासाठी ते मौल्यवान आहे. तुझे प्रेम इतके सखोल आहे आणि मी कोणतीही तक्रार न करता तुझ्या योजनांच्या अधीन जाण्यास तयार आहे.” हे पेत्राचे ज्ञान आहे जे त्याने देवाचे कार्य अनुभवल्यानंतर प्राप्त केले होते व ही देवावरील त्याच्या प्रेमाची साक्षदेखील आहे. आज, तुमच्यावर आधीच विजय मिळवला गेला आहे—परंतु हा विजय तुमच्यामध्ये कसा व्यक्त होतो? काही लोक म्हणतात, “माझ्यावर विजय मिळवणे ही देवाची सर्वोच्च कृपा आणि उदात्तता आहे. मनुष्याचे जीवन पोकळ आहे व त्याला महत्त्व नाही हे मला आताच कळले. पिढ्यानपिढ्या मनुष्य मुलांना जन्म देण्यात, त्यांना वाढवण्यात त्याचे आयुष्य घालवतो आणि शेवटी त्याच्याकडे काहीच उरत नाही. आज, देवाने विजय मिळवल्यानंतरच मी पाहिले आहे, की अशा प्रकारे जगण्याला काहीही किंमत नाही; ते खरोखर अर्थहीन जीवन आहे. कदाचित मी मरेन व ते संपून जाईल!” ज्या लोकांवर विजय मिळवला आहे त्यांना देव प्राप्त करेल का? ते नमुने आणि आदर्श बनू शकतात का? असे लोक निष्क्रियतेचा धडा असतात; त्यांच्या कोणत्याही आकांक्षा नसतात व ते स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत. जरी त्यांच्यावर विजय मिळवला असे गणले जात असले, तरी असे निष्क्रिय लोक परिपूर्ण बनण्यास असमर्थ असतात. पेत्राच्या आयुष्याच्या शेवटी, त्याला परिपूर्ण बनवल्यानंतर, तो म्हणाला, “हे देवा! जर मी आणखी काही वर्षे जगलो, तर मला तुझे आणखी शुद्ध आणि सखोल प्रेम प्राप्त करायचे आहे.” जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळण्यात येणार होते, तेव्हा त्याने मनात प्रार्थना केली, “हे देवा! तुझी वेळ आता आली आहे; तू माझ्यासाठी तयार केलेली वेळ आली आहे. मी तुझ्यासाठी वधस्तंभावर खिळले पाहिजे, मला तुझ्यासाठी ही साक्ष दिली पाहिजे व मला आशा आहे, की माझे प्रेम तुझ्या अपेक्षा पूर्ण करेल आणि ते आणखी शुद्ध होऊ शकेल. आज, तुझ्यासाठी मृत्यू पत्करण्यास सक्षम असणे व तुझ्यासाठी वधस्तंभावर खिळले जाणे, मला सांत्वन देणारे आणि आश्वस्त करणारे आहे, कारण तुझ्यासाठी वधस्तंभावर खिळले जाणे व तुझ्या इच्छा पूर्ण करणे आणि स्वतःला तुझ्या स्वाधीन करण्यास सक्षम असणे, माझे जीवन तुझ्यासाठी अर्पण करण्यास सक्षम असणे यापेक्षा मला अधिक समाधान देणारे दुसरे काहीही नाही. हे देवा! तू खूप प्रेमळ आहेस! जर तू मला जगू दिलेस, तर मी तुझ्यावर प्रेम करण्यास आणखी इच्छुक असेन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेन. मी तुझ्यावर आणखी मनापासून प्रेम करू इच्छितो. तू माझा न्याय कर, माझे ताडण कर व माझी परीक्षा घे कारण मी नीतिमान नाही, कारण मी पाप केले आहे. आणि तुझी नीतिमान प्रवृत्ती मला अधिक स्पष्ट होते. हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे, कारण मी तुझ्यावर अधिक सखोल प्रेम करण्यास सक्षम आहे व तू माझ्यावर प्रेम करत नसलास, तरीही मी तुझ्यावर अशा प्रकारे प्रेम करण्यास तयार आहे. मी तुझी नीतिमान प्रवृत्ती पाहण्यास तयार आहे, कारण हे मला अर्थपूर्ण जीवन जगण्यास अधिक सक्षम करते. मला असे वाटते, की माझे जीवन आता अधिक अर्थपूर्ण आहे, कारण मी तुझ्यासाठी वधस्तंभावर खिळलो आहे आणि तुझ्यासाठी मृत्यू पत्करणे अर्थपूर्ण आहे. तरीही मला समाधान वाटत नाही, कारण मला तुझ्याबद्दल खूप कमी माहिती आहे, मला माहीत आहे, की मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही व मी तुला खूप कमी परत केले आहे. माझ्या आयुष्यात, मी माझे सर्वस्व तुला परत करण्यास असमर्थ आहे; मी त्यापासून खूप दूर आहे. या क्षणी मागे वळून पाहताना, मला तुझे खूप ऋणी असल्याची जाणीव होते आणि माझ्या सर्व चुकांची भरपाई करण्यासाठी व मी तुला परत न केलेल्या सर्व प्रेमाची भरपाई करण्यासाठी केवळ हा क्षण माझ्याकडे आहे.”

मनुष्याने अर्थपूर्ण जीवन जगण्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्या सध्याच्या परिस्थितीत समाधानी राहू नये. पेत्राची प्रतिमा जगण्यासाठी, त्याच्याकडे पेत्राचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. मनुष्याने उच्च आणि सखोल गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याने देवावरील सखोल, शुद्ध प्रेम व मूल्य आणि अर्थ असलेल्या जीवनाचा पाठपुरावा केला पाहिजे. फक्त हेच जीवन आहे; तरच मनुष्य पेत्रासारखा होईल. तुम्ही सकारात्मक बाजूने तुमच्या प्रवेशासाठी सक्रिय असण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व अधिक सखोल, अधिक विशिष्ट आणि अधिक व्यावहारिक सत्यांकडे दुर्लक्ष करून क्षणिक आरामासाठी स्वतःला लीनपणे मागे पडू देऊ नये. तुझे प्रेम व्यावहारिक असले पाहिजे व तू प्राण्यांपेक्षा वेगळे नसलेल्या या भ्रष्ट, निश्चिंत जीवनापासून स्वतःला मुक्त करण्याचे मार्ग शोधले पाहिजेस. तू अर्थपूर्ण, मौल्यवान जीवन जगले पाहिजे आणि स्वतःला फसवू नयेस किंवा आयुष्यासोबत खेळू नयेस. देवावर प्रेम करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी, कोणतेही सत्य अगम्य नाही व कोणताही न्याय नाही ज्यासाठी ते ठाम राहू शकत नाहीत. तू तुझे जीवन कसे जगले पाहिजेस? तू देवावर प्रेम कसे केले पाहिजे आणि या प्रेमाचा उपयोग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कसा केला पाहिजेस? तुझ्या आयुष्यात याहून मोठी गोष्ट नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुझ्यामध्ये अशी आकांक्षा व चिकाटी असली पाहिजे आणि जे भेकड आहेत, जे कमकुवत आहेत त्यांच्यासारखे नसावेस. अर्थपूर्ण जीवन कसे अनुभवायचे व अर्थपूर्ण सत्यांचा अनुभव कसा घ्यायचा हे तू शिकले पाहिजेस आणि अशा प्रकारे स्वतःला चुकीचे वागवू नयेस. ते कळले नाही, तर आयुष्य हातून निसटून जाईल; त्यानंतर, तुला देवावर प्रेम करण्याची आणखी एक संधी मिळेल का? मनुष्य मृत्युमुखी पडल्यानंतर देवावर प्रेम करू शकतो का? तुझ्याकडे पेत्रासारखीच आकांक्षा व सदसद्विवेकबुद्धी असणे आवश्यक आहे; जीवन अर्थपूर्ण असले पाहिजे आणि स्वतःशी खेळ करू नये. मनुष्यप्राणी म्हणून व देवाचा पाठपुरावा करणारी व्यक्ती म्हणून, तू तुझे जीवन कसे हाताळतोस, स्वतःला देवाला कसे अर्पण करायला हवे, देवावर अधिक अर्थपूर्ण विश्वास कसा असायला हवा आणि तुझे देवावर प्रेम असल्यामुळे त्याच्यावर अधिक शुद्ध, अधिक सुंदर व अधिक चांगल्या प्रकारे प्रेम कसे करायला हवे याचा काळजीपूर्वक विचार करता आला पाहिजे. आज, तू केवळ तुझ्यावर विजय मिळवण्यातच समाधानी राहू शकत नाहीस, तर भविष्यात तू कोणत्या मार्गावर चालणार आहेस याचाही विचार केला पाहिजेस. तुझ्याकडे परिपूर्ण बनण्यासाठी आकांक्षा आणि धैर्य असणे आवश्यक आहे व स्वतःला कधीही कमी लेखू नये. सत्याला काही आवडनिवड असते का? सत्य जाणूनबुजून लोकांना विरोध करू शकते का? जर तू सत्याचा पाठपुरावा केलास, तर ते तुला ग्रासून टाकू शकते का? जर तू न्यायासाठी ठाम राहिलास, तर ते तुला खाली पाडेल का? जीवनाचा पाठपुरावा करण्याची तुझी खरोखरच आकांक्षा असेल, तर जीवन तुझ्यापासून दूर जाऊ शकते का? जर तू सत्यापासून वंचित असशील, तर ते सत्य तुझ्याकडे दुर्लक्ष करते म्हणून नाही, तर तू सत्यापासून दूर राहिलास म्हणून आहे; जर तू न्यायासाठी तग धरू शकत नसशील, तर ते न्यायात काहीतरी चूक आहे म्हणून नाही, तर ते वस्तुस्थितीच्या विरूद्ध आहे असा तुझा विश्वास आहे म्हणून आहे; जर अनेक वर्षे जीवनाचा पाठपुरावा करूनही तुला जीवन मिळाले नाही, तर याचा अर्थ असा नाही, की जीवनाला तुझ्याबद्दल विवेक नाही, तर तुला जीवनाबद्दल विवेक नसल्यामुळे आणि तू जीवनाला दूर नेल्यामुळे आहे; जर तू प्रकाशात राहत असशील व प्रकाश मिळवण्यास असमर्थ असशील, तर हे प्रकाश तुला प्रकाशित करू शकत नाही म्हणून नाही, तर प्रकाशाच्या अस्तित्वाकडे तू लक्ष दिले नाहीस म्हणून प्रकाश तुझ्यामधून शांतपणे निघून गेला आहे. जर तू पाठपुरावा केला नाहीस, तर केवळ असे म्हणता येईल, की तू निरुपयोगी कचरा आहेस आणि तुझ्या जीवनात धैर्य नाही व अंधाराच्या शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी आत्मा नाही. तू खूप दुबळा आहेस! तुला वेढा घालणार्‍या सैतानाच्या शक्तींपासून तू सुटू शकत नाहीस आणि केवळ अशा प्रकारचे खात्रीचे व सुरक्षित जीवन जगण्यास आणि अज्ञानात मृत्युमुखी पडण्यास तयार आहेस. तू जे साध्य केले पाहिजे ते म्हणजे तुझ्यावर विजय मिळवला जाण्याचा पाठपुरावा आहे; हे तुझे बंधनकारक कर्तव्य आहे. जर तू तुझ्यावर विजय मिळवला जाण्यात समाधानी असशील, तर तू प्रकाशाचे अस्तित्व काढून टाकतोस. सत्यासाठी तुला त्रास सहन करावा लागेल, तू स्वतःला सत्यासाठी अर्पण केले पाहिजेस, तू सत्यासाठी अपमान सहन केला पाहिजेस व सत्याचा अधिकाधिक फायदा मिळवण्यासाठी तुला आणखी दुःख सहन केले पाहिजे. तू हे केले पाहिजेस. शांतीपूर्ण कौटुंबिक जीवनासाठी तू सत्य फेकून देऊ नयेस आणि क्षणिक आनंदासाठी तू तुझ्या जीवनाची प्रतिष्ठा व सचोटी गमावू नयेस. जे सुंदर आणि चांगले आहे त्या सर्वांचा तू पाठपुरावा केला पाहिजेस व जीवनात अधिक अर्थपूर्ण मार्गाचा पाठपुरावा केला पाहिजेस. जर तू असे असभ्य जीवन जगत असशील आणि कोणतीही उद्दिष्टे पूर्ण करत नसशील, तर तू तुझे आयुष्य वाया घालवत नाहीस का? अशा जीवनातून तू काय मिळवू शकतोस? एका सत्यासाठी तू देहाचे सर्व उपभोग सोडले पाहजेस आणि थोड्याशा उपभोगासाठी सर्व सत्यांचा त्याग करू नयेस. अशा लोकांमध्ये सचोटी किंवा प्रतिष्ठा नसते; त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही!

देव मनुष्याचे ताडण करतो आणि त्याचा न्याय करतो, कारण त्याच्या कार्यासाठी ते आवश्यक आहे व त्याशिवाय, मनुष्याला त्याची आवश्यकता आहे. मनुष्याला ताडण आणि न्याय मिळणे आवश्यक आहे व तेव्हाच तो देवाचे प्रेम प्राप्त करू शकतो. आज, तुमची पूर्ण खात्री झाली आहे, परंतु जेव्हा तुम्हाला थोडासा धक्का बसतो, तेव्हा तुम्ही संकटात येता; तुमची पातळी अजूनही खूप कमी आहे आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही अशा ताडणाचा व न्यायाचा अधिक अनुभव घेतला पाहिजे. आज तुमच्या मनात देवाबद्दल थोडा आदर आहे आणि तुम्ही देवाचे भय बाळगता, व तो खरा देव आहे हे तुम्हाला माहीत आहे, परंतु तुमचे त्याच्यावर फारसे प्रेम नाही, तुम्ही शुद्ध प्रेम साध्य करणे तर दूरच; तुमचे ज्ञान खूप वरवरचे आहे आणि तुमची पातळी अजूनही अपुरी आहे. जेव्हा तुम्हाला खरोखरच एखाद्या वातावरणाचा सामना करावा लागतो, तेव्हा तुम्ही अजूनही साक्ष दिलेली नसते, तुमचा प्रवेश फारच कमी सक्रिय असतो व तुम्हाला आचरण कसे करावे याची कल्पना नसते. बहुतेक लोक उदासीन आणि निष्क्रिय असतात; ते फक्त त्यांच्या हृदयात देवावर गुप्तपणे प्रेम करतात, परंतु त्यांच्याकडे आचरण करण्याचा कोणताही मार्ग नसतो किंवा त्यांचे ध्येय काय आहे हे त्यांना स्पष्ट नसते. ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे त्यांच्याकडे सामान्य मानवता असते, तसेच त्यांच्याकडे सदसद्विवेकबुद्धीच्या मापांपेक्षा जास्त असलेली सत्ये असतात, जी सदसद्विवेकबुद्धीच्या मानकांपेक्षा उच्च असतात; ते देवाच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करतात, तसेच त्याहूनही अधिक, त्यांनी देवाला ओळखले आहे व पाहिले आहे, की देव सुंदर आहे आणि मनुष्याच्या प्रेमास पात्र आहे व देवामध्ये प्रेम करण्यासारखे बरेच काही आहे; मनुष्य त्याच्यावर प्रेम करण्याशिवाय राहू शकत नाही! ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे त्यांचे देवावरील प्रेम त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. त्यांचे प्रेम उत्स्फूर्त आहे, असे प्रेम ज्या बदल्यात ते काहीही मागत नाही आणि जो व्यवहार नाही. ते फक्त त्यांच्या देवाबद्दलच्या ज्ञानामुळे त्याच्यावर प्रेम करतात. अशा लोकांना देव त्यांच्यावर कृपा करतो की नाही याची पर्वा नसते व ते फक्त देवाला संतुष्ट करण्यामध्ये समाधानी असतात. ते देवाबरोबर सौदेबाजी करत नाहीत किंवा ते सदसद्विवेकबुद्धीने देवावरील प्रेमाचे मोजमाप करत नाहीत: “तू मला दिले आहेस, त्या बदल्यात मी तुझ्यावर प्रेम करतो; जर तू मला दिले नाहीस तर त्या बदल्यात माझ्याकडे तुझ्यासाठी काहीही नाही.” ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे ते नेहमी मानतात: “देव हा निर्माणकर्ता आहे आणि तो त्याचे कार्य आपल्यावर पार पाडतो. मला परिपूर्ण बनवण्याची ही संधी, स्थिती व पात्रता असल्याने, माझा पाठपुरावा अर्थपूर्ण जीवन जगण्याचा असावा आणि मी त्याला संतुष्ट केले पाहिजे.” हे पेत्राच्या अनुभवाप्रमाणेच आहे: जेव्हा तो सर्वात कमकुवत होता, तेव्हा त्याने देवाची प्रार्थना केली व म्हटले, “हे देवा! वेळ किंवा स्थळ काहीही असो, तू नेहमी माझ्या विचारात असतोस हे तुला माहीत आहे. वेळ किंवा स्थळ काहीही असो, तुला माहीत आहे, की मला तुझ्यावर प्रेम करायचे आहे, परंतु माझी पातळी खूप लहान आहे, मी खूप दुबळा आणि शक्तीहीन आहे, माझे प्रेम खूप मर्यादित आहे व तुझ्याबद्दलची माझी प्रामाणिकता खूपच कमी आहे. तुझ्या प्रेमाच्या तुलनेत मी जगण्यास अयोग्य आहे. माझी एवढीच इच्छा आहे, की माझे जीवन व्यर्थ जाऊ नये आणि मी तुझ्या प्रेमाची परतफेड करू शकेन, तसेच, माझ्याकडे जे काही आहे ते मी तुझ्यासाठी समर्पित करू शकेन. जर मी तुला संतुष्ट करू शकलो, तर निर्मिलेला प्राणी म्हणून मला मनःशांती मिळेल व मी आणखी काहीही मागणार नाही. जरी मी आता दुबळा आणि शक्तीहीन असलो, तरी मी तुझे उपदेश विसरणार नाही व मी तुझे प्रेम विसरणार नाही. आता तुझ्या प्रेमाची परतफेड करण्यापलीकडे मी काहीच करत नाही. देवा, मला खूप वाईट वाटते! माझ्या हृदयातील प्रेम मी तुला कसे परत देऊ शकेन, मी जे काही करू शकतो ते कसे करू शकेन आणि तुझ्या इच्छा कशा पूर्ण करू शकेन व माझ्याकडे जे काही आहे ते तुला कसे अर्पण करू शकेन? मनुष्याचा दुबळेपणा तुला माहीत आहे; मी तुझ्या प्रेमास पात्र कसा होऊ शकतो? हे देवा! तुला माहीत आहे, की माझी पातळी लहान आहे, माझे प्रेम खूप तुटपुंजे आहे. अशा वातावरणात मी जे काही करू शकतो ते कसे करू शकतो? मला माहीत आहे, की मी तुझ्या प्रेमाची परतफेड केली पाहिजे, मला माहीत आहे, की माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला दिले पाहिजे, परंतु आज माझी पातळी खूपच लहान आहे. मी विनंती करतो, की तू मला सामर्थ्य आणि आत्मविश्वास दे, जेणेकरून मला तुझ्यावर समर्पित करण्यासाठी शुद्ध प्रेम प्राप्त करण्यास व माझ्याकडे जे काही आहे ते तुला अर्पण करण्यास मी अधिक सक्षम होईन; मी तुझ्या प्रेमाची परतफेड करू शकेन, तसेच मी तुझे ताडण, न्याय आणि कसोट्या व त्याहूनही कठोर शाप अनुभवण्यास अधिक सक्षम होईन. तू मला तुझे प्रेम पाहू दिले आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करण्यास असमर्थ आहे व आज मी दुबळा आणि शक्तीहीन आहे, तरी मी तुला कसे विसरेन? तुझे प्रेम, ताडण व न्याय या सर्वांमुळे मला तुझी ओळख कळली आहे, तरीही मला असे वाटते की मी तुझ्या प्रेमाची पूर्तता करण्यास असमर्थ आहे, कारण तू इतका महान आहेस. माझ्याकडे जे काही आहे ते मी निर्माणकर्त्याला कसे अर्पण करू?” अशी पेत्राची विनंती होती, तरीही त्याची पातळी फारच अपुरी होती. या क्षणी त्याला त्याच्या हृदयात चाकू फिरवल्याचा भास झाला. तो व्यथित होता; अशा परिस्थितीत काय करावे हे त्याला कळत नव्हते. तरीही तो प्रार्थना करत राहिला: “हे देवा! मनुष्याची पातळी बालिश आहे, त्याची सदसद्विवेकबुद्धी कमकुवत आहे आणि तुझ्या प्रेमाची परतफेड करणे हेच मी साध्य करू शकतो. आज, मला तुझ्या इच्छा कशा पूर्ण करायच्या हे माहीत नाही व मला फक्त माझ्याकडून जे काही करता येईल ते करण्याची, माझ्याकडे जे काही आहे ते देण्याची आणि माझ्याकडे जे काही आहे ते तुला अर्पण करण्याची इच्छा आहे. तुझ्या न्यायाची पर्वा न करता, तुझ्या ताडणाची पर्वा न करता, तू मला काय दिलेस, तू माझ्यापासून काय काढून घेतोस याची पर्वा न करता, मला तुझ्याबद्दलच्या कोणत्याही तक्रारीपासून मुक्त कर. बर्‍याच वेळा, जेव्हा तू माझे ताडण केलेस व माझा न्याय केलास, तेव्हा मी स्वतःशीच कुरकुर केली आणि पवित्रता प्राप्त करण्यास किंवा तुझ्या इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ होतो. तुझ्या प्रेमाची माझी परतफेड सक्तीमुळे झाली आहे व या क्षणी मी स्वतःचा अधिक द्वेष करतो.” पेत्राने अशा प्रकारे प्रार्थना केली, कारण त्याने देवाच्या शुद्ध प्रेमाचा शोध घेतला. तो शोधत होता, विनवणी करत होता आणि शिवाय, तो स्वतःला दोष देत होता व देवाला त्याच्या पापांची कबुली देत होता. त्याला देवाचे ऋणी वाटले आणि स्वतःचा तिरस्कारही वाटला, तरीही तो काहीसा दुःखी व निष्क्रियही होता. त्याला नेहमी असे वाटायचे, की तो देवाच्या इच्छेएवढा पुरेसा चांगला नाही आणि त्याचे सर्वोत्तम कार्य करू शकत नाही. अशा परिस्थितीतही, पेत्राने ईयोबाच्या श्रद्धेचा पाठपुरावा केला. त्याने पाहिले, की ईयोबाची श्रद्धा किती मोठी होती, कारण ईयोबाने पाहिले होते, की त्याच्याकडे असलेले सर्व काही देवाने दिले आहे व देवाने त्याच्याकडून सर्व काही घेणे स्वाभाविक होते, देव ज्याला इच्छितो त्याला देईल—ही देवाची नीतिमान प्रवृत्ती होती. ईयोबाची काहीही तक्रार नव्हती आणि तो देवाची स्तुतीही करू शकत होता. पेत्रादेखील स्वतःला ओळखत होता व त्याने मनात प्रार्थना केली, “आज मी माझ्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून आणि तुला कितीही प्रेम परत देऊन तुझ्या प्रेमाची परतफेड करण्यात समाधान मानू नये, कारण माझे विचार खूप भ्रष्ट आहेत व मी तुला निर्माणकर्ता म्हणून पाहण्यास असमर्थ आहे. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करण्यास अयोग्य असल्यामुळे, माझ्याकडे जे काही आहे ते तुझ्यासाठी समर्पित करण्याची क्षमता मी विकसित केली पाहिजे, जे मी स्वेच्छेने करेन. तू जे काही केले आहेस ते मला माहीत असले पाहिजे आणि मला पर्याय नाही व मी तुझे प्रेम पाहिले पाहिजे आणि तुझी स्तुती करण्यास व तुझ्या पवित्र नावाची स्तुती करण्यास सक्षम असले पाहिजे, जेणेकरून तुला माझ्याद्वारे महान गौरव प्राप्त होईल. तुझ्या या साक्षीत मी ठामपणे उभे राहण्यास तयार आहे. हे देवा! तुझे प्रेम खूप मौल्यवान आणि सुंदर आहे; मी दुष्टाच्या हातात जगण्याची इच्छा कशी बाळगेन? तूच मला घडवले नाहीस का? मी सैतानाच्या वर्चस्वाखाली कसा राहू शकेन? माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या ताडणामध्ये जगणे मला आवडते. मी दुष्टाच्या वर्चस्वाखाली राहण्यास तयार नाही. जर मी शुद्ध बनू शकलो व माझे सर्वस्व तुझ्यासाठी समर्पित करू शकलो, तर मी माझे शरीर आणि मन तुझ्या न्याय व ताडणाला अर्पण करण्यास तयार आहे, कारण मी सैतानाचा तिरस्कार करतो आणि त्याच्या अधीन राहण्यास तयार नाही. माझ्याबद्दलच्या तुझ्या न्यायाने तू तुझी नीतिमान प्रवृत्ती दाखवतोस. मी आनंदी आहे व माझी काहीही तक्रार नाही. जर मी निर्मिलेल्या प्राण्याचे कर्तव्य पार पाडू शकलो, तर माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या न्यायाने जावे अशी माझी इच्छा आहे, ज्याद्वारे मला तुझी नीतिमान प्रवृत्ती कळेल आणि दुष्टाच्या प्रभावापासून माझी सुटका होईल.” पेत्राने नेहमी अशीच प्रार्थना केली, नेहमी अशीच मागणी केली व तो बऱ्यापैकी उच्च पातळीवर पोहोचला. तो देवाच्या प्रेमाची परतफेड करू शकला, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने निर्मिलेला प्राणी म्हणून त्याचे कर्तव्यदेखील पार पाडले. त्याच्या सदसद्विवेकबुद्धीने त्याच्यावर आरोप केले नाही, तसेच तो सदसद्विवेकबुद्धीच्या मानकांच्याही पुढे जाऊ शकला. त्याची प्रार्थना देवापुढे अशा प्रकारे होत राहिली, की त्याच्या आकांक्षा वाढत होत्या आणि देवावरचे त्याचे प्रेम वृद्धिंगत होत होते. जरी त्याला वेदनादायक त्रास सहन करावा लागला, तरीही तो देवावर प्रेम करण्यास विसरला नाही व तरीही त्याने देवाची इच्छा समजून घेण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रार्थनांमध्ये त्याने पुढील वचने उच्चारली: “मी तुझ्या प्रेमाची परतफेड करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. मी सैतानासमोर तुझी साक्ष दिली नाही, सैतानाच्या प्रभावापासून स्वतःला मुक्त केले नाही आणि तरीही मी देहात राहतो. मी माझ्या प्रेमाचा उपयोग सैतानाला पराभूत करण्यासाठी, त्याला लज्जित करण्यासाठी व अशा प्रकारे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी करू इच्छितो. मी माझे सर्वस्व तुला अर्पण करू इच्छितो, सैतानाला माझे किंचितही काही देऊ इच्छित नाही, कारण सैतान तुझा शत्रू आहे.” त्याने या दिशेने जितके जास्त प्रयत्न केले, तितका तो अधिक भावनाविवश झाला आणि या बाबींचे त्याचे ज्ञान अधिक वृद्धिंगत झाले. हे लक्षात न घेता त्याला समजले, की त्याने स्वतःला सैतानाच्या प्रभावापासून मुक्त केले पाहिजे व स्वतःला पूर्णपणे देवाकडे परत नेले पाहिजे. असे त्याला प्राप्त झालेले क्षेत्र होते. तो सैतानाच्या प्रभावाच्या पलीकडे जात होता आणि स्वतःला देहाच्या सुखांपासून व उपभोगांपासून मुक्त करत होता आणि देवाचे ताडण व त्याचा न्याय या दोन्ही गोष्टी अधिक सखोलपणे अनुभवण्यास इच्छुक होता. तो म्हणाला, “मी तुझ्या ताडणामध्ये आणि न्यायामध्ये जगत असलो आणि मला कितीही त्रास सहन करावा लागला, तरीही मी सैतानाच्या वर्चस्वाखाली राहण्यास तयार नाही, मी सैतानाच्या युक्त्या सहन करण्यास तयार नाही. मी तुझ्या शापांमध्ये जगण्याचा आनंद घेतो व सैतानाच्या आशीर्वादांमध्ये जगण्यात मला दुःख होते. तुझ्या न्यायात राहून मी तुझ्यावर प्रेम करतो आणि यामुळे मला खूप आनंद होतो. तुझे ताडण व न्याय नीतिमान आणि पवित्र आहे; ते मला शुद्ध करण्यासाठी आहे व त्याहूनही अधिक, ते मला वाचवण्यासाठी आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या न्यायात घालवण्यास प्राधान्य देईन, जेणेकरून मी तुझ्या देखरेखीखाली राहू शकेन. मी एका क्षणासाठीही सैतानाच्या वर्चस्वाखाली राहण्यास तयार नाही; मी तुझ्याद्वारे शुद्ध होऊ इच्छितो; मला त्रास सहन करावा लागला, तरीही मी सैतानाकडून शोषण आणि फसवणूक करून घेण्यास तयार नाही. मी, हा निर्मिलेला प्राणी, तुझ्याद्वारे वापरला गेला पाहिजे, तुझ्या ताब्यात असला आहे, तुझ्याद्वारे माझा न्याय केला गेला पाहिजे व तुझ्याद्वारे माझे ताडण झाले पाहिजे. मला तुझ्याकडून शापही मिळाला पाहिजे. जेव्हा तू मला आशीर्वाद देण्यास तयार असतोस, तेव्हा माझे हृदय आनंदित होते, कारण मी तुझे प्रेम पाहिले आहे. तू निर्माणकर्ता आहेस आणि मी निर्मिलेला प्राणी आहे: मी तुझा विश्वासघात करू नये व सैतानाच्या अधीन राहू नये किंवा सैतानाकडून माझे शोषण होऊ नये. सैतानासाठी जगण्याऐवजी मी तुझा घोडा किंवा बैल व्हावे. मी शारीरिक आनंदाऐवजी तुझ्या ताडणामध्ये जगू इच्छितो आणि यामुळे मला तुझी कृपा गमवावी लागली, तरीही मला आनंद मिळेल. तुझी कृपा माझ्यावर नसली, तरी तुझ्याकडून ताडण व न्याय मिळण्यात मला आनंद वाटतो; हा तुझा सर्वश्रेष्ठ आशीर्वाद आहे, तुझी सर्वात मोठी कृपा आहे. जरी तू माझ्याबाबतीत नेहमी उदात्त आणि क्रोधित असलास, तरीही मी तुला सोडण्यास असमर्थ आहे व तरीही मी तुझ्यावर पुरेसे प्रेम करू शकत नाही. मी तुझ्या घरी राहण्यास प्राधान्य देईन, तुझ्याकडून शाप, ताडण आणि मारहाण प्राप्त करण्यास मी प्राधान्य देईन व मी सैतानाच्या वर्चस्वाखाली राहण्यास तयार नाही किंवा मी घाई करण्यास तयार नाही आणि केवळ देहासाठी स्वतःला व्यस्त ठेवण्यास तयार नाही व मी देहासाठी जगण्यास तयार असणे तर दूरच.” पेत्राचे प्रेम शुद्ध प्रेम होते. हा परिपूर्ण बनण्याचा अनुभव आहे आणि परिपूर्ण बनण्याचे सर्वोच्च क्षेत्र आहे; यापेक्षा अधिक अर्थपूर्ण असे कोणतेही जीवन नाही. त्याने देवाचे ताडण व न्याय स्वीकारला, त्याने देवाच्या नीतिमान प्रवृत्तीची कदर केली आणि पेत्राबद्दल यापेक्षा काहीही अधिक मौल्यवान नव्हते. तो म्हणाला, “सैतान मला भौतिक आनंद देतो, पण मी त्यांची किंमत ठेवत नाही. देवाचे ताडण व न्याय माझ्यावर येतो—यात मला कृपा मिळते, यात मला आनंद मिळतो आणि यातच मी धन्य आहे. जर देवाचा न्याय नसता, तर मी देवावर कधीच प्रेम केले नसते, मी अजूनही सैतानाच्या वर्चस्वाखाली राहत असतो, अजूनही त्याच्याद्वारे नियंत्रित झालो असतो व त्याची आज्ञा पाळली असती. तसे झाले असते तर मी कधीच खरा मनुष्य बनू शकलो नसतो, कारण मी देवाला संतुष्ट करू शकलो नसतो आणि माझे सर्वस्व देवाला समर्पित केले नसते. जरी देव मला आशीर्वाद देत नसला, माझ्या आत अग्नी जळत असल्यासारखे मला आतून चिंताविवश सोडले असले आणि शांती किंवा आनंद दिला नसला व जरी देवाचे ताडण आणि न्याय माझ्यापासून कधीच वेगळे झाले नसले, तरीही देवाच्या ताडणात व न्यायात मी त्याची नीतिमान प्रवृत्ती पाहण्यास सक्षम आहे. मला याचा आनंद होतो; जीवनात यापेक्षा अधिक मौल्यवान किंवा अर्थपूर्ण गोष्ट नाही. जरी त्याचे संरक्षण आणि संगोपन हे निर्दयी ताडण, न्याय, शाप व मारणे बनले आहे, तरीही मी या गोष्टींचा आनंद घेतो, कारण ते मला अधिक चांगल्या प्रकारे शुद्ध करू शकतात आणि मला बदलू शकतात, मला देवाच्या जवळ आणू शकतात, मला देवावर प्रेम करण्यास अधिक सक्षम बनवू शकतात व देवावरील माझे प्रेम अधिक शुद्ध करू शकतात. हे मला निर्मिलेला प्राणी म्हणून माझे कर्तव्य पूर्ण करण्यास सक्षम बनवते आणि मला देवासमोर व सैतानाच्या प्रभावापासून दूर नेते, जेणेकरून मी यापुढे सैतानाची सेवा करणार नाही. जेव्हा मी सैतानाच्या वर्चस्वाखाली राहणार नाही आणि माझ्याकडे जे काही आहे व मी जे काही करू शकतो ते काहीही माझ्याकडे न ठेवता देवाला अर्पण करण्यास सक्षम असेन—तेव्हा मी पूर्ण समाधानी असेन. देवाच्या ताडणाने आणि न्यायाने मला वाचवले आहे व माझे जीवन देवाचे ताडण आणि न्याय यापासून अविभाज्य आहे. पृथ्वीवरील माझे जीवन सैतानाच्या वर्चस्वाखाली आहे व जर देवाचे ताडण आणि न्याय याचे संगोपन व संरक्षण नसते, तर मी सदैव सैतानाच्या अधीन राहिलो असतो आणि त्याशिवाय, मला अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी संधी किंवा साधन मिळाले नसते. जर देवाच्या ताडणाने व न्यायाने मला कधीही सोडले नाही, तरच मी देवाकडून शुद्ध होऊ शकेन. केवळ कठोर वचने आणि देवाच्या नीतिमान प्रवृत्तीने व देवाच्या उदात्त न्यायाने, मला सर्वोच्च संरक्षण प्राप्त झाले आहे आणि मी प्रकाशात राहण्यासाठी आलो आहे व देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत. शुद्ध होण्यास सक्षम होणे आणि सैतानापासून स्वतःला मुक्त करणे व देवाच्या वर्चस्वाखाली जगणे—आज माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे.” हे पेत्राने अनुभवलेले हे सर्वोच्च क्षेत्र आहे.

हीच अवस्था मनुष्याने परिपूर्ण झाल्यावर प्राप्त केली पाहिजे. जर तू एवढे साध्य करू शकत नसशील, तर तू अर्थपूर्ण जीवन जगू शकत नाहीस. मनुष्य देहात राहतो, याचा अर्थ तो मानवी नरकात राहतो आणि देवाचा न्याय व ताडण यांच्याविना, मनुष्य सैतानासारखा मलीन होतो. मनुष्य पवित्र कसा असू शकतो? पेत्राचा असा विश्वास होता, की देवाने केलेले ताडण आणि न्याय हे मनुष्याचे सर्वोत्तम संरक्षण व सर्वात मोठी कृपा आहे. केवळ देवाच्या ताडणाने आणि न्यायाने मनुष्य जागृत होऊ शकतो व देहाचा द्वेष करू शकतो, सैतानाचा द्वेष करू शकतो. देवाची कठोर शिस्त मनुष्याला सैतानाच्या प्रभावापासून मुक्त करते, त्याला त्याच्या स्वतःच्या छोट्या जगापासून मुक्त करते आणि त्याला देवाच्या उपस्थितीच्या प्रकाशात जगण्याची अनुमती देते. ताडण व न्याय यापेक्षा चांगले तारण नाही! पेत्राने प्रार्थना केली, “हे देवा! जोपर्यंत तू माझे ताडण करशील आणि माझा न्याय करशील, तोपर्यंत मला कळेल, की तू मला सोडले नाहीस. जरी तू मला आनंद किंवा शांती दिली नाहीस व मला दुःखात जगायला लावलेस आणि माझे अगणित वेळा ताडण केलेस, तरी जोपर्यंत तू मला सोडत नाहीस तोपर्यंत माझे हृदय शांत राहील. आज, तुझे ताडण व न्याय माझे सर्वोत्तम संरक्षण आणि माझा सर्वात मोठा आशीर्वाद बनला आहे. तू माझ्यावर केलेली कृपा माझे संरक्षण करते. आज तू माझ्यावर केलेली कृपा तुझ्या नीतिमान प्रवृत्तीचे प्रकटीकरण आहे व ताडण आणि न्याय आहे; शिवाय, ही कसोटी आहे व त्याहूनही अधिक म्हणजे ते दुःखाचे जीवन आहे.” पेत्र देहाचे सुख बाजूला ठेवू शकला आणि सखोल प्रेम व अधिक संरक्षण शोधू शकला, कारण त्याला देवाच्या ताडणातून आणि न्यायातून खूप कृपा मिळाली होती. त्याच्या जीवनात, जर मनुष्याला शुद्ध व्हायचे असेल व त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणायचा असेल, त्याला अर्थपूर्ण जीवन जगायचे असेल आणि निर्मिलेला प्राणी म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडायचे असेल, तर त्याने देवाचे ताडण व न्याय स्वीकारला पाहिजे आणि देवाची शिस्त व देवाचे फटकारणे याला त्याच्यापासून दूर जाऊ देऊ नये, जेणेकरून तो स्वतःला सैतानाच्या डावपेचांपासून आणि प्रभावापासून मुक्त करेल आणि देवाच्या प्रकाशात जगेल. हे जाणून घ्या, की देवाचे ताडण व न्याय हा प्रकाश आहे आणि तो मनुष्याच्या तारणाचा प्रकाश आहे व मनुष्यासाठी यापेक्षा चांगला आशीर्वाद, कृपा किंवा संरक्षण नाही. मनुष्य सैतानाच्या प्रभावाखाली जगतो आणि देहात अस्तित्वात असतो; जर तो शुद्ध झाला नाही व त्याला देवाचे संरक्षण मिळाले नाही, तर मनुष्य अधिकाधिक भ्रष्ट होईल. जर त्याला देवावर प्रेम करायचे असेल, तर त्याला शुद्ध झाले पाहिजे आणि वाचवले गेले पाहिजे. पेत्राने प्रार्थना केली, “देवा, जेव्हा तू माझ्याशी दयाळूपणे वागतोस, तेव्हा मला आनंद होतो व सांत्वन मिळते; जेव्हा तू माझे ताडण करतोस, तेव्हा मला अधिक आराम आणि आनंद वाटतो. जरी मी अशक्त असलो व खूप यातना सहन करत असलो, जरी अश्रू आणि दुःख असले, तरीही तुला माहीत आहे, की हे दुःख माझ्या अवज्ञेमुळे व माझ्या दुबळेपणामुळे आहे. मी रडतो कारण मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, मला दुःख व खेद वाटतो कारण मी तुझ्या अपेक्षांना अपुरा पडतो, परंतु मी हे क्षेत्र प्राप्त करण्यास तयार आहे, मी तुला संतुष्ट करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास तयार आहे. तुझ्या ताडणाने मला संरक्षण दिले आहे आणि मला सर्वोत्तम तारण दिले आहे; तुझा न्याय तुझ्या सहनशीलतेहून व संयमाहून मोठा ठरतो. तुझ्या ताडणाशिवाय आणि न्यायाशिवाय, मला तुझ्या दयेचा आणि प्रेमळपणाचा आनंद घेता आला नसता. आज, मला अधिक स्पष्टपणे दिसत आहे, की तुझे प्रेम आकाशाच्याही पलिकडे आहे व ते इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. तुझे प्रेम म्हणजे दया आणि प्रेमळपणा आहे; तसेच त्याहूनही अधिक, ते ताडण आणि न्याय आहे. तुझ्या ताडणाने व न्यायाने मला खूप काही दिले आहे. तुझ्या ताडणाशिवाय आणि न्यायाशिवाय, एकही व्यक्ती शुद्ध होणार नाही व एकही व्यक्ती निर्माणकर्त्याचे प्रेम अनुभवू शकणार नाही. जरी मी शेकडो कसोट्या आणि संकटे सहन केली आहेत व मृत्यूच्या अगदी जवळ आलो आहे, तरीही त्यांनी मला खरोखर तुला ओळखण्याची आणि सर्वोच्च तारण प्राप्त करण्याची अनुमती दिली आहे. जर तुझे ताडण, न्याय व शिस्त माझ्यापासून दूर गेली, तर मी सैतानाच्या अंधारात राहीन. मनुष्याच्या देहाचे काय फायदे आहेत? जर तुझे ताडण आणि न्याय मला सोडून गेला, तर जणू काही तुझा आत्माच मला सोडून गेला आहे असे वाटेल, जणू काही तू माझ्याबरोबर नाहीस. तसे झाले तर मी कसे जगू शकेन? जर तू मला आजारपण दिलेस व माझे स्वातंत्र्य घेतलेस, तरी मी जगू शकेन, परंतु जर कधी तुझे ताडण आणि न्याय मला सोडून गेले, तर मला जगण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. जर मी तुझ्या ताडणाशिवाय व न्यायाशिवाय असतो, तर मी तुझे प्रेम गमावले असते, असे सखोल प्रेम जे मी शब्दात सांगू शकत नाही. तुझे प्रेम नसेल, तर मी सैतानाच्या वर्चस्वाखाली राहीन आणि तुझा तेजस्वी चेहरा पाहू शकणार नाही. मी कसे जगू शकेन? असा अंधार, असे जीवन मी सहन करू शकत नाही. तू माझ्यासोबत असणे म्हणजे तुला पाहण्यासारखे आहे, मग मी तुला कसे सोडू शकेन? मी तुला विनवणी करतो, मी तुला विनंती करतो, की माझे सर्वात मोठे समाधान माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस, जरी ते आश्वासनाचे काही शब्द असले तरीही. मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेतला आहे व आज मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही; मी तुझ्यावर प्रेम कसे करू शकत नाही? तुझ्या प्रेमामुळे मी दुःखाचे अनेक अश्रू ढाळले आहेत, तरीही मला नेहमीच असे वाटले आहे, की असे जीवन अधिक अर्थपूर्ण आहे, मला समृद्ध करण्यास अधिक सक्षम आहे, मला बदलण्यास अधिक सक्षम आहे आणि निर्मिलेल्या प्राण्यांना माहीत असलेले असे सत्य प्राप्त करण्यास अधिक सक्षम आहे.”

मनुष्य त्याचे संपूर्ण जीवन सैतानाच्या वर्चस्वाखाली जगतो आणि एकही व्यक्ती अशी नाही जी स्वतः स्वतःला सैतानाच्या प्रभावापासून मुक्त करू शकेल. सर्वजण मलीन जगात, भ्रष्टाचारात व शून्यतेत राहतात, ज्यामध्ये किंचितही अर्थ किंवा मूल्य नाही; ते देहासाठी, वासनेसाठी आणि सैतानासाठी असे निश्चिंत जीवन जगतात. त्यांच्या अस्तित्वाला किंचितही किंमत नाही. सैतानाच्या प्रभावापासून त्याला मुक्त करणारे सत्य शोधण्यास मनुष्य असमर्थ आहे. जरी मनुष्य देवावर विश्वास ठेवत असला व बायबल वाचत असला, तरीही त्याला सैतानाच्या प्रभावापासून मुक्त कसे व्हावे हे समजत नाही. युगानुयुगे, फार कमी लोकांना हे रहस्य सापडले आहे, फार कमी लोकांना ते समजले आहे. अशा प्रकारे, जरी मनुष्य सैतानाचा तिरस्कार करत असला आणि देहाचा तिरस्कार करत असला, तरी सैतानाच्या प्रभावातून स्वतःची सुटका कशी करावी हे त्याला माहीत नाही. आज, तुम्ही अजूनही सैतानाच्या वर्चस्वाखाली नाही का? तुम्हाला तुमच्या अवज्ञाकारी कृतींबद्दल पश्चात्ताप होत नाही व तुम्ही मलीन आणि अवज्ञाकारी आहात असे तुम्हाला वाटणे तर दूरच. देवाला विरोध केल्यानंतर, तुम्हाला मनःशांती मिळते व खूप शांतता वाटते. तू भ्रष्टाचारी आहेस, म्हणूनच तू शांत नाहीस का? ही मनःशांती तुझ्या अवज्ञेमुळे मिळत नाही का? मनुष्य मानवी नरकात राहतो, तो सैतानाच्या गडद प्रभावाखाली राहतो; संपूर्ण भूमीवर, भुते मनुष्यासोबत एकत्र राहतात, मनुष्याच्या देहावर अतिक्रमण करतात. पृथ्वीवर, तू सुंदर नंदनवनात राहत नाहीस. तू जेथे आहेस ते ठिकाण सैतानाचे क्षेत्र आहे, मानवी नरक आहे, पाताळ आहे. जर मनुष्य शुद्ध झाला नाही, तर तो मलीन आहे; जर त्याला देवाने संरक्षित केले नाही आणि त्याची काळजी घेतली नाही, तर तो अजूनही सैतानाचा बंदिवान आहे; जर त्याचा न्याय केला गेला नाही व त्याचे ताडण केले गेले नाही, तर सैतानाच्या अंधःकारमय प्रभावाच्या जुलमातून सुटण्याचे कोणतेही माध्यम त्याच्याकडे राहणार नाही. तू दर्शवलेली भ्रष्ट प्रवृत्ती आणि तू जगत असलेली अवज्ञाकारी वर्तणूक हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, की तू अजूनही सैतानाच्या वर्चस्वाखाली जगत आहेस. जर तुझे मन व विचार शुद्ध केले गेले नाहीत आणि तुझ्या प्रवृत्तीचा न्याय व ताडण केले गेले नाही, तर तुझे संपूर्ण अस्तित्व अजूनही सैतानाच्या वर्चस्वाखाली आहे, तुझे मन सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे, तुझे विचार सैतानाद्वारे हाताळले जात आहेत आणि तुझे संपूर्ण अस्तित्व सैतानाच्या हातांनी नियंत्रित केले जात आहे. आता तू पेत्राच्या मानकांपासून किती दूर आहेस हे तुला माहीत आहे का? तुझ्याकडे ती क्षमता आहे का? आजच्या काळातील ताडण व न्याय याविषयी तुला किती माहिती आहे? पेत्राला जे कळले ते तुझ्याकडे किती आहे? आज, जर तुला हे माहीत नसेल, तर भविष्यात तू हे ज्ञान प्राप्त करू शकशील का? तुझ्याइतकी आळशी आणि भ्याड व्यक्ती ताडण व न्याय जाणून घेण्यास असमर्थ आहे. जर तू देहाच्या शांतीचा आणि देहाच्या सुखांचा पाठलाग केलास, तर तुला शुद्ध होण्याचे कोणतेही माध्यम मिळणार नाही व शेवटी तू सैतानाकडे परत जाशील, कारण तू जे जगतोस ते सैतान आहे आणि ते देह आहे. आजच्या घडामोडींनुसार, बरेच लोक जीवनाचा पाठपुरावा करत नाहीत, ज्याचा अर्थ असा होतो, की त्यांना शुद्ध होण्याची किंवा जीवनाच्या सखोल अनुभवात प्रवेश करण्याची पर्वा नाही. असे असताना ते परिपूर्ण कसे होऊ शकतात? जे जीवनाचा पाठलाग करत नाहीत त्यांना परिपूर्ण बनण्याची संधी नाही व जे देवाच्या ज्ञानाचा पाठपुरावा करत नाहीत, जे त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणत नाहीत, ते सैतानाच्या अंधकारमय प्रभावापासून दूर जाऊ शकत नाहीत. जे धर्मावर विश्वास ठेवतात, जे केवळ समारंभाचे पालन करतात आणि नियमित सेवांना उपस्थित राहतात, त्यांच्याप्रमाणेच ते देवाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानाबद्दल व त्यांच्या प्रवृत्तीतील बदलांमध्ये प्रवेशाबद्दल गंभीर नसतात. तो वेळेचा अपव्यय नाही का? जर, मनुष्याच्या देवावरील विश्वासाच्या बाबतीत, तो जीवनाच्या बाबतीत गंभीर नसेल, सत्यात प्रवेश करण्याचा पाठपुरावा करत नसेल, त्याच्या प्रवृत्तीतील बदलांचा पाठपुरावा करत नसेल, देवाच्या कार्याच्या ज्ञानाचा पाठपुरावा करणे दूरचे असेल, तर तो परिपूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल, तर तुम्ही देवाचे कार्य समजून घेतले पाहिजे. विशेषतः, तुम्ही त्याच्या ताडणाचे व न्यायाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि हे कार्य मनुष्यावर का केले जाते हे समजून घेतले पाहिजे. तू स्वीकारण्यास सक्षम आहेस का? या प्रकारच्या ताडणादरम्यान, तू पेत्रासारखे अनुभव व ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम आहेस का? जर तू देवाचे ज्ञान आणि पवित्र आत्म्याच्या कार्याचा पाठपुरावा करत असशील व प्रवृत्तीत बदल घडवून आणण्याचा पाठपुरावा करत असाल, तर तुला परिपूर्ण बनण्याची संधी आहे.

ज्यांना परिपूर्ण बनवायचे आहे, त्यांच्यासाठी कार्याची विजय मिळवण्याची ही पायरी अपरिहार्य आहे; मनुष्यावर विजय मिळवल्यानंतर, त्याला परिपूर्ण बनवण्याचे कार्य अनुभवता येते. केवळ विजय मिळवल्याची भूमिका पार पाडण्यात कोणतेही मोठे मूल्य नाही, ते तुम्हाला देवाच्या वापरासाठी योग्य बनवणार नाही. सुवार्ता पसरवण्याच्या कामी तुझी भूमिका बजावण्याचे कोणतेही माध्यम तुझ्याकडे नसेल, कारण तू जीवनाचा पाठपुरावा करत नाहीस आणि स्वतःमध्ये बदल व नूतनीकरणाचा पाठपुरावा करत नाहीस आणि त्यामुळे तुला जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. या टप्प्याटप्प्याने पूर्ण होणाऱ्या कार्यादरम्यान, तू एकेकाळी सेवेकरी म्हणून व विरोध म्हणून कार्य केले होते, परंतु जर शेवटी तू पेत्र बनण्याचा पाठपुरावा केला नाहीस आणि तुझा पाठपुरावा पेत्राला ज्या मार्गाने परिपूर्ण बनवले गेले त्या मार्गानुसार नसेल, तर साहजिकच, तू तुझ्या प्रवृत्तीत बदल अनुभवणार नाहीस. तू जर परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करत असशील, तर तू साक्ष देशील व तू म्हणशील: “देवाच्या या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कार्यात, मी देवाचे ताडणाचे आणि न्यायाचे कार्य स्वीकारले आहे व जरी मी खूप सहन दुःख केले असले, तरी मला कळले आहे, की देव मनुष्याला कसा परिपूर्ण बनवतो, मी देवाने केलेले कार्य प्राप्त केले आहे, मला देवाच्या नीतिमत्वाचे ज्ञान मिळाले आहे आणि त्याच्या ताडणाने मला वाचवले आहे. त्याची नीतिमान प्रवृत्ती माझ्यावर आली आहे व मला आशीर्वाद आणि कृपा मिळाली आहे; हा त्याचा न्याय व त्याचे ताडण आहे ज्याने मला संरक्षित केले आहे आणि शुद्ध केले आहे. जर देवाने माझे ताडण केले नसते आणि न्याय केला नसता व जर देवाची कठोर वचने माझ्यावर आली नसती, तर मी देवाला ओळखू शकलो नसतो आणि मला वाचवता आले नसते. आज मी पाहतो: निर्मिलेला प्राणी म्हणून, एखादी व्यक्ती निर्माणकर्त्याने बनवलेल्या सर्व गोष्टींचा आनंद घेते, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्व प्राण्यांनी देवाच्या नीतिमान प्रवृत्तीचा व त्याच्या यथोचित न्यायाचा आनंद घेतला पाहिजे, कारण देवाची प्रवृत्ती मनुष्याच्या आनंदासाठी योग्य आहे. सैतानाने भ्रष्ट केलेला प्राणी या नात्याने, एखाद्याने देवाच्या नीतिमान प्रवृत्तीचा आनंद घेतला पाहिजे. त्याच्या नीतिमान प्रवृत्तीत ताडण आणि न्याय आहे व त्याशिवाय महान प्रेम आहे. जरी मी आज देवाचे प्रेम पूर्णपणे प्राप्त करण्यास असमर्थ असलो, तरी मला ते पाहण्याचे भाग्य लाभले आहे आणि यात मला आशीर्वाद मिळाला आहे.” जे परिपूर्ण बनण्याचा अनुभव घेतात त्यांनी चाललेला हा मार्ग आहे व ते याच ज्ञानाबद्दल बोलतात. असे लोक पेत्रासारखेच आहेत; त्यांच्याकडे पेत्रासारखेच अनुभव आहेत. अशा लोकांनाच जीवन प्राप्त झाले आहे, ज्यांच्याकडे सत्य आहे. जेव्हा ते अगदी शेवटपर्यंत अनुभव घेतात, तेव्हा देवाच्या न्यायाच्या वेळी ते निश्चितपणे सैतानाच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त होतील आणि देवाकडून प्राप्त केले जातील.

लोकांवर विजय मिळवल्यानंतर, त्यांच्याकडे कोणतीही निर्णायक साक्ष नाही. त्यांनी सैतानाला फार थोडेसे लज्जित केले आहे, परंतु त्यांनी देवाच्या वचनांची वास्तविकता जगली नाही. तुला दुसरे तारण मिळाले नाही; तुम्ही केवळ पापार्पण मिळवले आहे, तरीही तुम्हाला परिपूर्ण केले गेले नाही—हे मोठे नुकसान आहे. तुम्ही कशामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि तुम्ही काय जगले पाहिजे व तुम्ही त्यामध्ये नक्कीच प्रवेश केला पाहिजे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. जर, शेवटी, तुला परिपूर्ण केले गेले नाही, तर तू खरा मनुष्य प्राणी बनू शकणार नाहीस आणि तू पश्चात्तापाने भरून जाशील. देवाने सुरुवातीला निर्माण केलेले आदाम व हव्वा हे पवित्र लोक होते, म्हणजे एदेनच्या बागेत ते पवित्र होते, त्यांना मलिनतेचा स्पर्श झालेला नव्हता. त्यांची यहोवावरदेखील श्रद्धा होती आणि त्यांना यहोवाच्या विश्वासघाताबद्दल काहीही माहीत नव्हते. याचे कारण असे, की ते सैतानाच्या प्रभावापासून मुक्त होते, सैतानाच्या विषाशिवाय होते व सर्व मानवजातीतील सर्वात शुद्ध होते. ते एदेनच्या बागेत, कोणत्याही मलिनतेशिवाय निर्विकार, देहाच्या नियंत्रणापासून मुक्त आणि यहोवाचा आदर बाळगत राहत होते. नंतर, जेव्हा सैतानाने त्यांना मोहात पाडले, तेव्हा त्यांना सर्पाचे विष लाभले व यहोवाचा विश्वासघात करण्याची इच्छा झाली आणि ते सैतानाच्या प्रभावाखाली जगले. सुरुवातीला ते पवित्र होते व त्यांनी यहोवाचा आदर केला; फक्त या अवस्थेतच ते मानव होते. नंतर, सैतानाच्या मोहात पडल्यानंतर, त्यांनी चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाल्ले व सैतानाच्या प्रभावाखाली जगले. सैतानाने त्यांना हळूहळू भ्रष्ट केले आणि त्यांनी मनुष्याची मूळ प्रतिमा गमावली. सुरुवातीला, मनुष्याला यहोवाचा श्वास लाभला होता, तो अजिबात अवज्ञाकारी नव्हता व त्याच्या हृदयात काहीही वाईटही नव्हते. त्यावेळी मनुष्य खऱ्या अर्थाने मनुष्य होता. सैतानाने भ्रष्ट केल्यावर मनुष्य पशू बनला. त्याचे विचार वाईट आणि अशुद्धतेने भरलेले होते, त्यात कोणताही चांगुलपणा वा पावित्र्य नव्हते. हा सैतान नाही का? तू देवाचे बरेच कार्य अनुभवले आहेस, तरीही तुझ्यात बदल घडलेला नाही किंवा तू शुद्ध झालेला नाहीस. तू अजूनही सैतानाच्या वर्चस्वाखाली राहतोस व अजूनही देवाच्या अधीन होत नाहीस. ही अशी व्यक्ती असते, जिच्यावर विजय मिळवला गेला आहे, परंतु तिला परिपूर्ण केलेले नाही. आणि अशा व्यक्तीला परिपूर्ण केलेले नाही असे का म्हटले जाते? कारण ही व्यक्ती जीवनाचा किंवा देवाच्या कार्याच्या ज्ञानाचा पाठपुरावा करत नाही व दैहिक सुख आणि क्षणिक आराम याशिवाय कशाचीच लालसा बाळगत नाही. परिणामी, त्यांच्या जीवनाच्या प्रवृत्तीत कोणतेही बदल झाले नाहीत व त्यांना देवाने निर्माण केलेले मनुष्याचे मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त झाले नाही. असे लोक म्हणजे चालती फिरती प्रेते आहेत, ते मृत आहेत ज्यांना आत्मा नाही! जे आत्म्यामध्ये गोष्टींचे ज्ञान घेत नाहीत, जे पावित्र्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि जे सत्याचा पाठपुरावा करत नाहीत, जे केवळ नकारात्मक बाजूने त्यांच्यावर विजय मिळवला जाण्यात समाधानी आहेत व जे देवाच्या वचनांनुसार जगू शकत नाहीत आणि पवित्र मानव बनू शकत नाहीत—हे असे लोक आहेत ज्यांना वाचवलेले नाही. कारण, जर मनुष्य सत्याशिवाय असेल, तर मनुष्य देवाच्या कसोट्यांमध्ये ठाम राहण्यास असमर्थ आहे; जे देवाच्या कसोटीत ठाम राहू शकतात त्यांनाच वाचवले गेले आहे. मला पेत्रासारखे लोक हवे आहेत, जे लोक परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना आजच्या सत्याची तळमळ असते व जे ते शोधतात त्यांनाच ते दिले जाते. हे तारण त्यांनाच दिले जाते, ज्यांना देवाकडून तारण मिळण्याची इच्छा असते आणि ते केवळ तुमच्याद्वारे प्राप्त केले जाऊ शकत नाही. त्याचा उद्देश असा आहे, की तुम्हाला देवाकडून प्राप्त केले जाऊ शकते; देव तुम्हाला प्राप्त करू शकेल यासाठी तुम्ही देवाला प्राप्त करावे. आज मी ही वचने तुमच्याशी बोललो आहे व तुम्ही ती ऐकली आहेत आणि तुम्ही या वचनांनुसार आचरण केले पाहिजे. सरतेशेवटी, जेव्हा तुम्ही ही वचने आचरणात आणाल, तेव्हा तोच तो क्षण असेल जेव्हा मी तुम्हाला या वचनांद्वारे प्राप्त केलेले असेल; त्याच वेळी, तुम्हाला ही वचनेदेखील प्राप्त झालेली असतील, म्हणजेच तुम्हाला हे परम तारण प्राप्त झालेले असेल. तुम्ही शुद्ध झाल्यानंतर, खरे मनुष्य प्राणी व्हाल. जर तू सत्य जगण्यास असमर्थ असशील किंवा ज्याला परिपूर्ण बनवले आहे त्याच्या प्रतिरूपात जगण्यास असमर्थ असशील, तर असे म्हणता येईल, की तू मनुष्य नाहीस, तर चालते फिरते प्रेत, पशू आहेस, कारण तू सत्याशिवाय आहेस, म्हणजेच, तू यहोवाच्या श्वासाशिवाय आहेस व अशा प्रकारे तू मृत व्यक्ती आहेस ज्याला आत्मा नाही! विजय मिळवल्यानंतर साक्ष देणे शक्य असले, तरी तुला जे काही मिळते ते केवळ अल्प तारण आहे आणि तू आत्म्याने युक्त असलेला जिवंत प्राणी बनलेला नाहीस. तुला ताडणाचा व न्यायाचा अनुभव आला असला, तरी तुझ्या प्रवृत्तीचे नूतनीकरण झालेले नाही किंवा त्यामध्ये बदल झालेला नाही; तू अजूनही तुझे जुने रूप आहेस, तू अजूनही सैतानाचा आहेस आणि शुद्ध झालेला नाहीस. ज्यांना परिपूर्ण केले आहे तेच मोलाचे आहेत व अशा लोकांनाच खरे जीवन मिळाले आहे. एक दिवस, कोणीतरी तुला म्हणेल, “तू देवाचे कार्य अनुभवले आहेस, म्हणून त्याचे कार्य कसे आहे याबद्दल बोल. दाविदाने देवाच्या कार्याचा अनुभव घेतला आणि यहोवाची कृत्ये पाहिली, मोशेनेदेखील यहोवाची कृत्ये पाहिली व ते दोघे यहोवाच्या कृत्यांचे वर्णन करण्यास सक्षम होते आणि यहोवाच्या अद्भुततेबद्दल बोलू शकले. शेवटच्या दिवसांत देहधारी देवाने केलेले कार्य तुम्ही पाहिले आहे; तू त्याच्या शहाणपणाबद्दल बोलू शकतोस का? तू त्याच्या कार्याच्या अद्भूततेबद्दल बोलू शकतोस का? देवाने तुमच्याकडून कोणत्या मागण्या केल्या व तुम्ही त्या कशा अनुभवल्या? शेवटच्या दिवसांत तुम्ही देवाच्या कार्याचा अनुभव घेतला आहे—तुमचा सर्वात मोठा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही याबद्दल बोलू शकता का? तुम्ही देवाच्या नीतिमान प्रवृत्तीबद्दल बोलू शकता का?” या प्रश्नांना तू कसे उत्तर देशील? जर तू म्हणालास, “देव खूप नीतिमान आहे, तो आमचे ताडण करतो आणि आम्हाला न्याय देतो व निर्दयपणे आम्हाला उघड करतो; देवाची प्रवृत्ती खरोखरच मनुष्याचे अपराध सहन करू शकत नाही; देवाच्या कार्याचा अनुभव घेतल्यानंतर, मला आपले स्वतःचे पशुत्व कळले आहे व मी खरोखरच देवाची नीतिमान प्रवृत्ती पाहिली आहे,” मग दुसरी व्यक्ती तुला विचारत राहील, “तुला देवाबद्दल आणखी काय माहीत आहे? एखाद्या व्यक्तीचा जीवनात प्रवेश कसा होतो? तुझ्या काही वैयक्तिक आकांक्षा आहेत का?” तू उत्तर देशील, “सैतानाने भ्रष्ट केल्यावर, देवाचे निर्मिलेले प्राणी पशू बनले आणि ते गाढवापेक्षा वेगळे नव्हते. आज, मी देवाच्या हातात राहतो व म्हणूनच मी निर्माणकर्त्याच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत आणि तो जे काही शिकवतो त्याचे पालन केले पाहिजे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.” जर तू फक्त अशा सामान्यतेने बोललास, तर त्या व्यक्तीला तू काय म्हणत आहेस ते समजणार नाही. जेव्हा ते तुला विचारतात, की तुला देवाच्या कार्याबद्दल काय ज्ञान आहे, तेव्हा ते तुझ्या वैयक्तिक अनुभवांबद्दल विचारत असतात. देवाचे ताडण व न्याय अनुभवल्यानंतर तुला त्याबद्दल काय ज्ञान आहे याची ते चौकशी करत आहेत आणि त्यात ते तुझ्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलत आहेत व तुला सत्याबद्दलच्या तुझ्या ज्ञानाबद्दल बोलण्यास सांगत आहेत. जर तू अशा गोष्टींबद्दल बोलू शकत नसशील, तर हे सिद्ध होते, की तुला आजच्या कार्याबद्दल काहीच माहिती नाही. तू नेहमी वरवर चांगली भासणारी किंवा सर्वत्र ज्ञात असलेली वचने बोलतोस; तुला कोणतेही विशिष्ट अनुभव नाहीत, तुझ्या ज्ञानामध्ये मूलतत्त्व असणे तर दूरच आणि तुझ्याकडे कोणतीही खरी साक्ष नाही, त्यामुळे इतरांना तुझी खात्री पटत नाही. देवाचे निष्क्रिय अनुयायी बनू नका व जे तुम्हाला जिज्ञासू बनवते त्याचा पाठपुरावा करू नका. उदासीन किंवा उत्सुक दोन्ही नसल्यामुळे तू स्वतःचा नाश करशील आणि तुझ्या आयुष्यामध्ये उशीर करशील. तू स्वतःला अशा निष्क्रियतेपासून व क्रियाशून्यतेपासून मुक्त केले पाहिजेस आणि सकारात्मक गोष्टींचा पाठपुरावा करण्यात व स्वतःच्या दुबळेपणावर मात करण्यात पारंगत झाले पाहिजेस, जेणेकरून तुला सत्य प्राप्त होईल आणि सत्य जगता येईल. तुझ्या दुबळेपणामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही आणि तुझ्या कमतरता ही तुझी सर्वात मोठी समस्या नाही. तुझी सर्वात मोठी समस्या व तुझी सर्वात मोठी कमतरता म्हणजे तू उदासीन किंवा उत्सुक दोन्ही नसणे आणि सत्य शोधण्याची तुझी इच्छा नसणे. तुम्हा सर्वांची सर्वात मोठी समस्या भ्याड मानसिकता ही आहे, म्हणजेच जसे आहे, त्यात तुम्ही आनंदी असता व फक्त निष्क्रीयपणे प्रतीक्षा करत असता. हा तुमच्यासमोरचा सर्वात मोठा अडथळा आहे आणि तुमच्या सत्याच्या शोधातला सर्वात मोठा शत्रू आहे. मी जी वचने उच्चारतो ती इतकी गहन आहेत म्हणून जर तू ती पाळत असशील, तर तुझ्याकडे खरे ज्ञान नाही व तुला सत्याची कदरही नाही. तुझ्यासारखे आज्ञापालन ही साक्ष नाही आणि असे आज्ञापालन मला मान्य नाही. कोणीतरी तुला विचारेल, “तुझा देव नेमका कुठून येतो? तुझ्या या देवाचे मूलतत्त्व काय आहे?” तू उत्तर देशील, “त्याचे मूलतत्त्व ताडण व न्याय आहे.” मग तो पुढे म्हणतो, “देव मनुष्याच्या बाबतीत दयाळू आणि प्रेमळ नाही का? तुला हे माहीत नाही का?” तू म्हणशील, “तो इतरांचा देव आहे. धर्माचे लोक ज्या देवावर विश्वास ठेवतात, तो हा देव आहे व तो आमचा देव नाही.” जेव्हा तुझ्यासारखे लोक सुवार्तेचा प्रसार करतात, तेव्हा तू खरा मार्ग विचलित करतोस आणि मग तुझा काय उपयोग? तुझ्याकडून इतरांना खरा मार्ग कसा मिळेल? तू सत्याशिवाय आहेस व सत्याविषयी काहीही बोलू शकत नाहीस, तसेच, सत्य जगूदेखील शकत नाहीस. देवासमोर जगण्यासाठी तुला काय पात्र बनवते? जेव्हा तू इतरांपर्यंत सुवार्तेचा प्रसार करतोस आणि सत्याविषयी सहभागिता करतोस व देवाची साक्ष देतोस, तेव्हा तू त्यांच्यावर विजय मिळवण्यास असमर्थ असशील, तर ते तुझ्या शब्दांचे खंडन करतील. तू जागेचा अपव्यय नाहीस का? तू देवाच्या कार्याचा खूप अनुभव घेतला आहेस, तरीही तू जेव्हा सत्य बोलतोस, तेव्हा त्यात काहीही अर्थपूर्ण नसते. तू निरुपयोगी नाहीस का? तुझा काय उपयोग आहे? तुम्ही देवाचे इतके कार्य अनुभवूनही तुम्हाला त्याचे थोडेसे ज्ञानदेखील कसे नाही? जेव्हा ते विचारतात, की तुझे देवाबद्दलचे खरे ज्ञान काय आहे, तेव्हा तू शब्द गमावून बसतोस, नाहीतर काहीतरी असंबद्ध उत्तर देतोस—देव पराक्रमी आहे, तुला मिळालेले मोठे आशीर्वाद हे खरोखरच देवाचे मोठेपण आहे आणि यापेक्षा मोठे दुसरे काहीही नाही, वैयक्तिकरीत्या देव पाहण्यास सक्षम होण्यापेक्षा मोठा विशेषाधिकार इतर कोणताही नाही, असे म्हणतोस. असे म्हणण्यात काय अर्थ आहे? ते निरुपयोगी, पोकळ शब्द आहेत! देवाच्या कार्याचा एवढा अनुभव घेतल्यावर, देवाचे उदात्तीकरण हे सत्य आहे एवढेच तुला कळले का? तुला देवाचे कार्य माहीत असले पाहिजे व तेव्हाच तू देवाला खरी साक्ष देशील. ज्यांना सत्य मिळाले नाही ते देवाला साक्ष कशी देऊ शकतात?

एवढ्या कार्याचा आणि इतक्या वचनांचा तुझ्यावर काहीही परिणाम झाला नसेल, तर जेव्हा देवाच्या कार्याचा प्रसार करण्याची वेळ येईल, तेव्हा तू तुझे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरशील व लज्जित आणि अपमानित होशील. त्या वेळी, तुला असे वाटेल, की तू देवाचा इतका ऋणी आहेस आणि तुझे देवाबद्दलचे ज्ञान खूपच वरवरचे आहे. जर तू आज, तो कार्य करत असताना— देवाबद्दलच्या ज्ञानाचा पाठपुरावा केला नाहीस, तर नंतर खूप उशीर होईल. सरतेशेवटी, तुझ्याकडे बोलण्यासारखे काहीच ज्ञान नसेल—तू रिकामा राहशील, तुझ्याकडे काहीही उरणार नाही. देवाला हिशेब देण्यासाठी तू कशाचा उपयोग करशील? देवाकडे पाहण्याचे धाडस तुझ्याकडे आहे का? तू आत्ताच तुझ्या शोधात कठोर परिश्रम केले पाहिजेस, जेणेकरून शेवटी, पेत्राप्रमाणे, तुला समजेल, की देवाचे ताडण आणि न्याय मनुष्यासाठी किती फायदेशीर आहे व त्याच्या ताडणाशिवाय आणि न्यायाशिवाय मनुष्याला वाचवता येऊ शकत नाही व तो या मलीन जमिनीत चिखलात अधिकाधिक खोलवर बुडू शकतो. सैतानाने लोकांना भ्रष्ट केले आहे, एकमेकांविरुद्ध भडकवले आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करायला लावली आहे, त्यांनी देवाची भीती गमावली आहे. त्यांची अवज्ञा खूप मोठी आहे, त्यांच्या धारणा खूप आहेत व ते सर्व सैतानाचे आहेत. देवाच्या ताडणाशिवाय आणि न्यायाशिवाय, मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती शुद्ध होऊ शकत नाही व त्याला वाचवले जाऊ शकत नाही. देहधारी देवाच्या देहातील कार्याद्वारे जे व्यक्त केले जाते ते नेमकेपणे आत्म्याद्वारे व्यक्त केले जाते आणि तो जे कार्य करतो ते आत्म्याद्वारे केले जाते त्यानुसार केले जाते. आज जर तुला या कार्याचे ज्ञान नसेल, तर तू खूपच मूर्ख आहेस व खूप काही गमावले आहेस! जर तुला देवाचे तारण मिळाले नसेल, तर तुझा विश्वास ही धार्मिक श्रद्धा आहे आणि तू असा ख्रिश्चन आहेस जो धार्मिक आहे. मृत सिद्धांताला चिकटून राहिल्यामुळे, तुम्ही पवित्र आत्म्याचे नवीन कार्य गमावले आहे; देवाच्या प्रेमाचा पाठपुरावा करणारे इतर लोक सत्य व जीवन प्राप्त करण्यास सक्षम आहेत, तर तुमची श्रद्धा देवाची मान्यता मिळवण्यास असमर्थ आहे. त्याऐवजी, तुम्ही घातक आणि तिरस्करणीय कृती करणारे दुष्ट झाला आहात; तुम्ही सैतानाच्या चेष्टेची गोष्ट व सैतानाचे बंदिवान झाला आहात. मनुष्याने देवावर विश्वास ठेवू नये, तर त्याच्यावर प्रेम केले पाहिजे व त्याचा पाठपुरावा करून त्याची उपासना केली पाहिजे. जर तू आज पाठपुरावा केला नाहीस, तर तो दिवस येईल जेव्हा तू म्हणशील, “पूर्वी मी देवाचे योग्य अनुसरण का केले नाही, त्याला योग्यरीत्या संतुष्ट का केले नाही, माझ्या जीवनाच्या प्रवृत्तीत बदल का केला नाही? त्या वेळी देवाच्या अधीन न राहिल्याबद्दल आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानाचा पाठपुरावा न केल्याबद्दल मला किती खेद वाटतो. तेव्हा देव खूप काही म्हणाला; मी पाठपुरावा कसा करू शकलो नाही? मी खूप मूर्ख होतो!” काही प्रमाणात तू स्वतःचा द्वेष करशील. आज, माझ्या शब्दांवर तुझा विश्वास बसत नाही व तू त्यांच्याकडे लक्ष देत नाहीस. जेव्हा या कार्याचा प्रसार होण्याचा दिवस येईल आणि तुला ते संपूर्ण दिसेल, तेव्हा तुला पश्चात्ताप होईल व त्या वेळी तू सुन्न होशील. ते आशीर्वाद आहेत, तरीही तुला त्यांचा आनंद घेणे माहीत नाही आणि ते सत्य आहे, तरीही तू त्याचा पाठपुरावा करत नाहीस. तू स्वतःचाच अपमान करत नाहीस का? आज, जरी देवाच्या कार्याची पुढची पायरी अद्याप सुरू व्हायची असली, तरी तुझ्याकडून केलेल्या अपेक्षा व तुला जे जगण्यास सांगितले आहे त्यात अपवादात्मक असे काहीही नाही. खूप कार्य आहे आणि खूप सत्य आहे; ती तू जाणून घेण्यायोग्य नाहीत का? देवाचे ताडण व न्याय तुझा आत्मा जागृत करण्यास असमर्थ आहे का? देवाचे ताडण आणि न्याय तुला स्वतःचा द्वेष करायला लावण्यास असमर्थ आहे का? तू सैतानाच्या प्रभावाखाली, शांततेने व आनंदाने आणि थोड्याफार दैहिक सुखसोयी घेऊन जगण्यात समाधानी आहेस का? तू सर्व लोकांपेक्षा नीच नाहीस का? ज्यांनी तारण पाहिले आहे पण ते मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यांच्यापेक्षा अधिक मूर्ख कोणी नाही; हे असे लोक आहेत जे स्वतःला देहावर लादतात व सैतानाचा आनंद घेतात. तुला आशा आहे, की देवावरील तुझ्या श्रद्धेमुळे तुला कोणत्याही आव्हानांना किंवा संकटांना अथवा किंचितही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. तू नेहमी निरुपयोगी गोष्टींचा पाठपुरावा करतोस आणि जीवनाला किंमत देत नाहीस, त्याऐवजी स्वतःचे बेताल विचार सत्याच्याही पुढे ठेवतोस. तू किती मूल्यहीन आहेस! तू डुकरासारखे जगतोस—तुमच्यात व डुकरांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये काय फरक आहे? जे सत्याचा पाठपुरावा करत नाहीत व त्याऐवजी देहावर प्रेम करतात, ते सर्व पशू नाहीत का? आत्मे नसलेले हे सर्व मृत म्हणजे केवळ चालती फिरती प्रेते नाहीत का? तुमच्यामध्ये किती वचने उच्चारली गेली आहेत? तुमच्यामध्ये थोडेच कार्य झाले आहे का? मी तुमच्यामध्ये किती पुरवले आहे? मग तुला ते का मिळाले नाही? तुला कशाबद्दल तक्रार करायची आहे? तू देहाच्या प्रेमात पडल्यामुळे तुला काहीच मिळाले नाही, असे नाही का? आणि तुझे विचार बेताल आहेत, म्हणून नाही का? तू खूप मूर्ख आहेस, म्हणून नाही का? जर तू हे आशीर्वाद मिळवण्यास असमर्थ असशील, तर तुला वाचवले नाही म्हणून तू देवाला दोष देऊ शकतोस का? देवावर विश्वास ठेवल्यानंतर शांती मिळवण्यासाठी, मुले आजारपणापासून मुक्त राहावीत, पतीला चांगली नोकरी मिळावी, मुलाला चांगली पत्नी मिळावी, मुलीला चांगला नवरा मिळावा, बैल आणि घोड्यांनी जमीन चांगली नांगरावी, पिकांसाठी वर्षभर चांगले हवामान असावे, यासाठी पाठपुरावा करतोस. तू हेच शोधत आहेस. तुझा पाठपुरावा फक्त आरामात जगण्यासाठी, तुझ्या कुटुंबावर कोणताही अपघात होऊ नये, वारा तुझ्या जवळून जाऊ नये, तुझ्या चेहऱ्याला दृष्ट लागू नये, तुझ्या कुटुंबाची पिके पुरात उद्ध्वस्त होऊ नयेत, तुझ्यावर कोणत्याही आपत्तीचा परिणाम होऊ नये, तुला देवाच्या आलिंगनात राहता यावे, आरामदायी घरट्यात राहता यावे, यासाठी आहे. तुझ्यासारखा भ्याड, जो नेहमी देहाचा पाठपुरावा करतो—तुझ्याकडे हृदय आहे का, तुझ्यामध्ये आत्मा आहे का? तू पशू नाहीस का? बदल्यात काहीही न मागता मी तुला खरा मार्ग प्रदान करतो, तरीही तू पाठपुरावा करत नाहीस. तू देवावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहेस का? मी तुला वास्तविक मानवी जीवन देतो, तरीही तू पाठपुरावा करत नाहीस. तू डुक्कर किंवा कुत्र्यापेक्षा वेगळा आहेस का? डुक्कर मनुष्याच्या जीवनाचा पाठपुरावा करत नाहीत, ते शुद्ध होण्याच्या मागे धावत नाहीत व त्यांना जीवन म्हणजे काय हे समजत नाही. दररोज, पोटभर जेवल्यानंतर, ते फक्त झोपतात. मी तुला खरा मार्ग दिला आहे, तरीही तू तो मिळवला नाही: तू रिकामटेकडा आहेस. तू या जीवनात, डुकराचे जीवन सुरू ठेवू इच्छितोस का? अशा लोकांच्या जिवंत असण्याला काय मोल आहे? तुझे जीवन तिरस्करणीय आणि लाजिरवाणे आहे, तू मलिनता व स्वैराचारामध्ये जगतोस आणि कोणतेही ध्येय शोधत नाही; तुझे जीवन सर्वांपेक्षा अज्ञानी नाही का? तुझ्याकडे देवाकडे पाहण्याचे धाडस आहे का? असाच अनुभव घेत राहिलात तर काहीच मिळणार नाही का? खरा मार्ग तुला देण्यात आला आहे, परंतु तू शेवटी तो मिळवू शकतोस की नाही हे तुझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रयत्नांवर अवलंबून आहे. लोक म्हणतात, की देव नीतिमान देव आहे व जोपर्यंत मनुष्य शेवटपर्यंत त्याचे अनुसरण करतो तोपर्यंत तो मनुष्याशी निःपक्षपातीपणे वागेल, कारण तो सर्वात नीतिमान आहे. जर मनुष्य शेवटपर्यंत त्याचे अनुसरण करत असेल, तर तो मनुष्याला बाजूला काढून टाकू शकतो का? मी सर्व लोकांशी निःपक्षपाती वागतो आणि माझ्या नीतिमान प्रवृत्तीने सर्व लोकांचा न्याय करतो, तरीही मी मनुष्याकडून ज्या काही अपेक्षा ठेवतो, त्यासाठी सुयोग्य अटी असतात आणि माझ्या अपेक्षा सर्व मनुष्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत, मग ते कोणीही असोत. तुझ्या पात्रता काय आहेत किंवा तू त्या किती काळ धारण केल्या आहेस याची मला पर्वा नाही; तू माझ्या मार्गाने चालत आहेस की नाही व तुला सत्याबद्दल प्रेम आणि तहान आहे की नाही याची मला काळजी आहे. जर तुझ्यात सत्याचा अभाव असेल व त्याऐवजी तू माझ्या नावाला लाज आणत असशील आणि माझ्या मार्गाप्रमाणे वागत नसशील, काळजी किंवा पर्वा न करता फक्त अनुसरण करत असशील, तर त्या वेळी मी तुला फटकारेन व तुझ्या वाईटाची शिक्षा देईन आणि तेव्हा तू काय म्हणशील? देव नीतिमान नाही असे तू म्हणू शकाल का? आज, जर मी बोललेल्या वचनांचे तू पालन केले असशील, तर तू अशा प्रकारचा आहेस ज्याला मी मान्यता देतो. तू म्हणतोस, की तू देवाचे अनुसरण करत असताना नेहमीच दुःख सहन केले आहेस, तू प्रत्येक परिस्थितीत त्याचे अनुसरण केले आहेस व त्याच्याबरोबर चांगली आणि वाईट वेळ एकत्र घालवली आहेस, परंतु तू देवाने सांगितलेली वचने पाळली नाहीस; तुला फक्त देवासाठी कष्ट करण्याची इच्छा आहे व दररोज देवासाठी स्वतःला खर्च करण्याची इच्छा आहे आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा कधीही विचार केला नाहीस. तू असेही म्हणतोस, “कोणत्याही परिस्थितीत, माझा विश्वास आहे, की देव नीतिमान आहे. मी त्याच्यासाठी दुःख सहन केले आहे, त्याच्यासाठी कष्ट केले आहेत व त्याच्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे आणि कोणतीही ओळख मिळाली नाही, तरी मी कठोर परिश्रम केले आहेत; त्याला माझी आठवण नक्कीच असेल.” हे खरे आहे की देव नीतिमान आहे, तरीही हे नीतिमत्त्व कोणत्याही अशुद्धतेने कलंकित झालेले नाही: त्यात मानवी इच्छा नाही व ते देह किंवा मानवी व्यवहारांमुळे कलंकित नाही. जे बंडखोर आणि विरोधात आहेत, जे त्याच्या मार्गाचे पालन करत नाहीत, त्यांना शिक्षा होईल; कोणालाही माफ केले जात नाही व कोणालाही सोडले जात नाही! काही लोक म्हणतात, “आज मी तुझ्यासाठी कष्ट घेत आहे; जेव्हा शेवट येईल तेव्हा तू मला थोडेफार आशीर्वाद देशील का?” म्हणून मी तुला विचारतो, “तू माझ्या वचनांचे पालन केले आहेस का?” तू ज्या नीतिमत्वाबद्दल बोलत आहेस ते व्यवहारावर आधारित आहे. तुला फक्त असे वाटते, की मी सर्व लोकांसाठी नीतिमान आणि निष्पक्ष आहे व जे शेवटपर्यंत माझे अनुसरण करतात ते सर्व निश्चितपणे तारले जातील आणि माझे आशीर्वाद प्राप्त करतील. माझ्या वचनांचा आंतरिक अर्थ आहे, की “जे सर्व शेवटपर्यंत माझे अनुसरण करतात ते निश्चितपणे तारले जातील”: जे शेवटपर्यंत माझे अनुसरण करतात ते असे आहेत ज्यांना मी पूर्णपणे प्राप्त करेन, ते असे आहेत ज्यांच्यावर मी विजय मिळवल्यानंतर ते सत्याचा शोध घेतात व परिपूर्ण बनतात. तू कोणत्या अटी पूर्ण केल्या आहेस? तू फक्त शेवटपर्यंत माझे अनुसरण करणे एवढेच साध्य केले, दुसरे काय केले आहे? तू माझ्या वचनांचे पालन केले आहेस का? तू माझ्या पाच अपेक्षांपैकी एकच पूर्ण केली आहेस, तरीही उर्वरित चार अपेक्षा पूर्ण करण्याचा तुझा हेतू नाही. तुला सर्वात सोपा, साधा मार्ग सापडला आहे व फक्त भाग्यवान होण्याची आशा बाळगून तू त्याचा पाठपुरावा केला आहेस. तुझ्यासारख्या व्यक्तीसाठी माझी नीतिमान प्रवृत्ती म्हणजे ताडण आणि न्याय आहे, तो न्याय्य प्रतिशोध आहे व सर्व दुष्कृत्यांसाठी ती नीतिमान शिक्षा आहे; जे लोक माझ्या मार्गावर चालत नाहीत त्यांना नक्कीच शिक्षा होईल, जरी त्यांनी अगदी शेवटपर्यंत अनुसरण केले तरीही. हे देवाचे नीतिमत्व आहे. जेव्हा मनुष्याच्या शिक्षेमध्ये ही नीतिमान प्रवृत्ती व्यक्त केली जाते, तेव्हा मनुष्य सुन्न होईल आणि त्याला खेद वाटेल, की देवाचे अनुसरण करताना, तो त्याच्या मार्गाने चालला नाही. “त्या वेळी, मी देवाचे अनुसरण करताना थोडेच दुःख सहन केले, परंतु देवाच्या मार्गाने चाललो नाही. काय सबबी आहेत? ताडण होण्याशिवाय पर्याय नाही!” तरीही त्याच्या मनात तो विचार करत असतो, “असो, मी अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा केला आहे, म्हणून तू माझे ताडण केलेस, तरी ते ताडण फार मोठे असू शकत नाही आणि हे ताडण भोगल्यानंतरही तुला मी हवा असेन. मला माहीत आहे, की तू नीतिमान आहेस व माझ्याशी कायम असे वागणार नाहीस. शेवटी, मी पुसल्या जाणाऱ्यांसारखा नाही; ज्यांचा नाश होणार आहे त्यांना कठोर ताडण मिळेल, तर माझे ताडण सौम्य असेल.” नीतिमान प्रवृत्ती म्हणजे तू म्हणतोस तशी नाही. असे नाही, की जे त्यांचे पाप कबूल करतात, त्यांना औदार्याने वागवले जाते. नीतिमत्व हे पावित्र्य आहे व अशी प्रवृत्ती आहे जी मनुष्याचा अपराध सहन करत नाही आणि जे काही मलीन आहे व बदललेले नाही ते देवाच्या तिरस्काराचे लक्ष्य आहे. देवाची नीतिमान प्रवृत्ती हा कायदा नसून प्रशासकीय आदेश आहे: हा राज्याच्या अंतर्गत प्रशासकीय आदेश आहे आणि ज्याच्याजवळ सत्य नाही व जो बदललेला नाही अशा प्रत्येकासाठी हा प्रशासकीय आदेश म्हणजे नीतिमान शिक्षा आहे आणि तारणासाठी कोणतीही शक्यता नाही. कारण जेव्हा प्रत्येक मनुष्याचे प्रकारानुसार वर्गीकरण केले जाते, तेव्हा चांगल्याला प्रतिफळ मिळेल व वाईटाला शिक्षा होईल. जेव्हा मनुष्याचे गंतव्यस्थान स्पष्ट होईल; हीच वेळ आहे जेव्हा तारणाचे कार्य समाप्त होईल, त्यानंतर, मनुष्याला वाचवण्याचे कार्य यापुढे केले जाणार नाही आणि जे वाईट करतात त्यांच्यापैकी प्रत्येकाला शिक्षा दिली जाईल. काही लोक म्हणतात, “देव त्याच्या पाठीशी असलेल्या प्रत्येकाची आठवण ठेवतो. तो आपल्यापैकी कोणालाही विसरणार नाही. देवाने आपल्याला परिपूर्ण बनवण्याची खात्री दिली आहे. त्याला खालच्या लोकांपैकी कोणाचेही स्मरण राहणार नाही, खालच्या लोकांपैकी जे परिपूर्ण केले जातील ते खात्रीने आपल्यापेक्षा कमी असतील, आपण ज्यांना अनेकदा देव भेटतो; आपल्यापैकी कोणालाही देव विसरला नाही, आपल्या सर्वांना देवाने मान्यता दिली आहे व देवाने आपल्याला परिपूर्ण बनवण्याची खात्री दिली आहे.” तुम्हा सर्वांच्याच अशा धारणा आहेत. हे नीतिमत्व आहे का?तू सत्य आचरणात आणले आहेस की नाही? तू खरोखर अशा अफवा पसरवतोस—तुला लाज वाटत नाही!

आज, काही लोक देवाने उपयोग केल्या जाण्याचा पाठपुरावा करतात, परंतु विजय मिळवल्यानंतर ते थेट वापरले जाऊ शकत नाहीत. आज बोलल्या जाणाऱ्या वचनांबद्दल, देव जेव्हा लोकांचा वापर करतो, तरीही तू ते साध्य करू शकत नसशील, तर तू परिपूर्ण बनलेला नाहीस. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मनुष्याला परिपूर्ण बनवण्याच्या कालावधीच्या समाप्तीचे आगमन हे ठरवेल, की मनुष्याकाढून टाकले जाईल की देवाद्वारे वापरले जाईल. ज्यांच्यावर विजय मिळवला गेला आहे ते निष्क्रियता आणि नकारात्मकतेच्या उदाहरणांशिवाय दुसरे काही नाहीत; ते नमुने व प्रतिमा आहेत, परंतु ते तफावतीपेक्षा अधिक काही नाहीत. जेव्हा मनुष्याची जीवनप्रवृत्ती बदलली असेल आणि त्याने अंतरंगातून बदल घडवून आणले असतील, तेव्हाच तो पूर्णपणे परिपूर्ण होईल. आज, तुला काय हवे आहे: विजय मिळवलेले बनायचे आहे की परिपूर्ण बनायचे आहे? तुला काय साध्य करायचे आहे? परिपूर्ण होण्यासाठी तू अटी पूर्ण केल्या आहेस का? अजूनही कोणत्या अटींची कमतरता आहे? तू स्वतःला कसे सुसज्ज करावेस व कमतरता कशा भरून काढाव्यास? परिपूर्ण होण्याच्या मार्गावर तू कसा प्रवेश करावास? तू पूर्णपणे कसे अधीन जावेस? तू परिपूर्ण होण्याबद्दल विचारतोस, म्हणून तू पावित्र्याचा पाठपुरावा करतोस का? तू शुध्द व्हावे म्हणून ताडण आणि न्यायाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती आहेस का? तू शुद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेस, मग तू ताडण व न्याय स्वीकारण्यास तयार आहेस का? तू देवाला जाणून घेण्यासाठी विचारतोस, पण तुला त्याच्या ताडणाचे आणि न्यायाचे ज्ञान आहे का? आज, तो तुझ्यावर करत असलेले बहुतेक कार्य ताडण व न्यायाचे आहे; तुझ्यावर केलेल्या या कार्याबद्दल तुला काय माहिती आहे? तू अनुभवलेल्या ताडण आणि न्यायाने तुला शुद्ध केले आहे का? त्याने तुला बदलले आहे का? त्याचा तुझ्यावर काही परिणाम झाला आहे का? तुला आजच्या कार्याचा—शाप, न्याय व प्रकटीकरणे यांचा— खूप कंटाळा आला आहे का किंवा तुला असे वाटते, की या गोष्टी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत? तू देवावर प्रेम करतोस, पण तू त्याच्यावर प्रेम का करतोस? तुझ्यावर थोडी कृपा झाली म्हणून तू देवावर प्रेम करतोस का? किंवा शांती आणि आनंद मिळाल्यानंतर देवावर प्रेम करतोस? किंवा त्याच्या ताडण व न्यायाने शुद्ध झाल्यानंतर तू देवावर प्रेम करतोस? तुला देवाविषयी प्रेम नक्की कशामुळे वाटते? परिपूर्ण होण्यासाठी पेत्राने कोणत्या अटी पूर्ण केल्या? त्याला परिपूर्ण बनवल्यानंतर, ते कोणत्या महत्त्वपूर्ण मार्गाने व्यक्त केले गेले? त्याने प्रभू येशूवर प्रेम केले ते त्याला त्याची आस लागली होती म्हणून की तो त्याला पाहू शकत नव्हता म्हणून की त्याची निंदा करण्यात आली होती म्हणून? की त्याने प्रभू येशूवर त्याहूनही जास्त प्रेम केले कारण त्याने संकटांचे दुःख स्वीकारले होते व त्याला स्वतःची मलिनता आणि अवज्ञा कळली होती, प्रभूचे पावित्र्य जाणले होते म्हणून? देवाच्या ताडणामुळे व न्यायामुळे त्याचे देवावरील प्रेम अधिक शुद्ध झाले की आणखी कशामुळे? ते काय आहे? देवाच्या कृपेमुळे तू देवावर प्रेम करतोस आणि आज त्याने तुला थोडासा आशीर्वाद दिला आहे. हे खरे प्रेम आहे का? तू देवावर प्रेम कसे करावेस? तू त्याचे ताडण व न्याय स्वीकारलेस आणि त्याची नीतिमान प्रवृत्ती पाहिल्यानंतर, त्याच्यावर खरोखर प्रेम करण्यास सक्षम असशील, इतके की तुला त्याची पूर्ण खात्री असेल व त्याचे ज्ञान असेल? पेत्राप्रमाणे, तू असे म्हणू शकतोस का, की तू देवावर पुरेसे प्रेम करू शकत नाहीस? तू ज्याचा पाठपुरावा करत आहेस, ते ताडण आणि न्यायानंतर विजय मिळवला जाण्यासाठी की ताडण व न्यायानंतर शुद्ध, संरक्षित आणि काळजी घेण्यासाठी? तू यापैकी कशाचा पाठपुरावा करतोस? तुझे जीवन अर्थपूर्ण आहे की ते निरर्थक व मूल्यहीन आहे? तुला देह हवा आहे की सत्य हवे आहे? तुला न्याय हवा आहे की सांत्वन हवे आहे? देवाच्या कार्याचा इतका अनुभव घेतल्यावर आणि देवाचे पावित्र्य व नीतिमत्व पाहिल्यानंतर, तू कसा पाठपुरावा केला पाहिजेस? या मार्गावर तू कसे चालले पाहिजेस? तू तुझे देवावरील प्रेम कसे आचरणात आणले पाहिजेस? देवाच्या ताडण आणि न्यायाचा तुझ्यावर काही परिणाम झाला आहे का? तुला देवाच्या ताडणाची व न्यायाची माहिती आहे की नाही हे तू काय जगतोस आणि तू देवावर किती प्रमाणात प्रेम करतोस यावर अवलंबून आहे! तुझे ओठ सांगतात, की तू देवावर प्रेम करतोस, तरीही तू जे जगतोस ती जुनी, भ्रष्ट प्रवृत्ती आहे; तुला देवाचे भय नाही व तुझ्यात सदसद्विवेकबुद्धी कमी आहे. असे लोक देवावर प्रेम करतात का? असे लोक देवाशी एकनिष्ठ असतात का? जे देवाचे ताडण आणि न्याय स्वीकारतात ते हेच आहेत का? तू म्हणतोस, की तू देवावर प्रेम करतोस व त्याच्यावर विश्वास ठेवतोस, तरीही तू तुझ्या धारणा सोडत नाहीस. तुझ्या कामात, प्रवेशामध्ये, तू बोलतोस ते शब्द आणि तुझ्या जीवनात, तुझ्या देवावरील प्रेमाचे प्रकटीकरण नाही व देवाबद्दल आदर नाही. हा असा कोणी आहे का ज्याने ताडण आणि न्याय प्राप्त केला आहे? असे कोणीतरी पेत्र असू शकते का? जे पेत्रासारखे आहेत त्यांना फक्त ज्ञान आहे, पण जिवंतपणा नाही का? आज मनुष्याला वास्तविक जीवन जगण्यासाठी कोणती परिस्थिती आहे? पेत्राच्या प्रार्थना म्हणजे त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या वचनांशिवाय अधिक काही नव्हते का? ती त्याच्या अंतःकरणातील वचने नव्हती का? पेत्राने फक्त प्रार्थना केली का आणि सत्य आचरणात आणले नाही का? तुझा पाठपुरावा कोणासाठी आहे? देवाच्या ताडण व न्यायाच्या वेळी तू स्वतःसाठी संरक्षण आणि शुद्धीकरण कसे मिळवावेस? देवाचे ताडण व न्याय मनुष्याला लाभदायक नाही का? सर्व न्याय म्हणजे शिक्षा आहे का? असे असू शकते का, की केवळ शांतता आणि आनंद, केवळ भौतिक आशीर्वाद व क्षणिक आराम या गोष्टी मनुष्याच्या जीवनासाठी फायदेशीर आहेत? जर मनुष्य आनंददायी आणि आरामदायी वातावरणात, न्यायाच्या जीवनाशिवाय राहत असेल, तर तो शुद्ध होऊ शकतो का? जर मनुष्याला बदलून शुद्ध व्हायचे असेल, तर त्याने परिपूर्ण बनणे कसे स्वीकारावे? आज तू कोणता मार्ग निवडावास?

मागील:  विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (४)

पुढील:  तू भविष्यातील कामगिरीमध्ये कसे सहभागी व्हावे?

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger