विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (३)

विजयाच्या कार्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे, मनुष्य देहाने यापुढे बंड करू नये; म्हणजेच, मनुष्याच्या अंतःकरणाला देवाचे नवीन ज्ञान मिळावे, मनुष्याच्या अंतःकरणाने देवाचे पूर्णपणे आज्ञापालन करावे आणि मनुष्याने देवासाठी वाहून घेण्याची आकांक्षा बाळगावी. लोकांचा स्वभाव बदलतो किंवा दैहिक बदल होतात, तेव्हा त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जात नाही; जेव्हा मनुष्याची विचारसरणी, मनुष्याची चेतना आणि मनुष्याची जाणीव बदलते, म्हणजे जेव्हा तुझी संपूर्ण मानसिक वृत्ती बदलते—त्याच वेळी देवाने तुझ्यावर विजय मिळवलेला असेल. जेव्हा तुम्ही आज्ञा पाळण्याचा निश्चय केला असेल आणि नवीन मानसिकता स्वीकारली असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या कोणत्याही धारणा किंवा हेतू देवाच्या वचनांच्या आणि कृतीच्या मध्ये आणत नाही आणि जेव्हा तुमचा मेंदू सामान्यपणे विचार करू शकतो—म्हणजेच जेव्हा तुम्ही स्वतःला अंतःकरणापासून देवासाठी सादर करता—तेव्हा तुम्ही पूर्णपणे विजय मिळवलेली व्यक्ती बनता. धर्मात, पुष्कळ लोकांना आयुष्यभर खूप त्रास सहन करावा लागतो: ते त्यांच्या शरीराला वश करून घेतात आणि त्यांचा वधस्तंभ वाहतात आणि मृत्यूच्या अगदी उंबरठ्यावर असतानाही ते दुःख झेलत आणि सहन करत राहतात! काही जण त्यांच्या मृत्यूच्या दिवशी सकाळीही उपास करत असतात. संपूर्ण आयुष्यभर ते स्वतःला चांगले अन्न आणि कपडे यांपासून वंचित ठेवतात, केवळ दुःखावर लक्ष केंद्रीत करतात. ते त्यांच्या देहाला वश करण्यास आणि त्यांच्या देहाचा त्याग करण्यास सक्षम असतात. दुःख सहन करण्याची त्यांची मनोवृत्ती वाखाणण्याजोगी असते. पण त्यांची विचारसरणी, त्यांच्या धारणा, त्यांचा मानसिक दृष्टिकोन आणि खरे तर त्यांचा जुना स्वभाव यांचा जराही विचार केलेला नसतो. त्यांना स्वतःबद्दलचेच खरे ज्ञान नसते. त्यांच्या मनातील देवाची प्रतिमा ही पारंपरिक, अस्पष्ट आहे. देवासाठी दुःख सहन करण्याचा त्यांचा निश्चय त्यांच्या आवेशातून आणि त्यांच्या माणुसकीच्या चांगल्या चारित्र्यातून येतो. जरी त्यांचा देवावर विश्वास असला, तरीही ते त्याला ओळखत नाहीत किंवा त्याची इच्छाही त्यांना ओळखता येत नाही. ते फक्त कार्य करत राहतात आणि देवासाठी आंधळेपणाने दुःख सहन करतात. ते विवेकबुद्धीला बिलकुल महत्त्व देत नाहीत, त्यांच्या सेवेने खरोखरच देवाची इच्छा पूर्ण होत आहे का, याची खातरजमा करण्याची पर्वा ते करत नाहीत आणि देवाचे ज्ञान कसे मिळवायचे याबद्दल तर त्यांना फारच कमी माहिती असते. ते ज्या देवाची सेवा करतात, ती देवाची जन्मजात प्रतिमा नसते, तर तो असा देव असतो, ज्याची त्यांनी कल्पना केलेली असते, ज्याच्याविषयी त्यांनी केवळ ऐकलेले असते किंवा ज्यांच्याबद्दल त्यांनी केवळ दंतकथा वाचलेल्या असतात. मग ते त्यांच्या सुपीक कल्पनाशक्तीचा आणि धार्मिकतेचा उपयोग करून देवासाठी दु:ख सोसतात आणि देव करू इच्छित असलेले देवाचे कार्य हाती घेतात. त्यांची सेवा खूप अयोग्य असते, अशी की व्यावहारिकदृष्ट्या त्यापैकी कोणीही देवाच्या इच्छेनुसार सेवा करण्यास समर्थ नसतात. ते कितीही आनंदाने दुःख सहन करत असले तरी, सेवेबद्दलचा त्यांचा मूळ दृष्टिकोन आणि देवाबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रतिमा यात बदल होत नाही, कारण त्यांनी देवाचा न्याय, ताडण, परिष्करण आणि परिपूर्णता अनुभवलेली नाही आणि सत्याचा वापर करून त्यांना कोणीही मार्गदर्शन केलेले नाही. जरी ते तारणहार येशूवर विश्वास ठेवत असले, तरी त्यांच्यापैकी कोणीही तारणहाराला पाहिलेले नाही. त्यांना केवळ दंतकथा आणि ऐकीव गोष्टींवरून त्याची माहिती असते. परिणामी, त्यांची सेवा म्हणजे डोळे मिटून, एखाद्या अंध व्यक्तीने स्वतःच्या वडिलांची सेवा करण्यापेक्षा अधिक नसते. अशा सेवेतून शेवटी काय साध्य होणार? आणि त्याला कोण मान्यता देणार? सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांची सेवा कायम समान राहते; त्यांना केवळ मानवनिर्मित धडे मिळतात आणि त्यांची सेवा केवळ त्यांच्या नैसर्गिकतेवर आणि त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडींवर आधारित असते. यातून कोणते बक्षीस आणू मिळणार? येशूला पाहिलेल्या पेत्रालासुद्धा देवाच्या इच्छेनुसार सेवा कशी करावी हे माहीत नव्हते; हे त्याला शेवटी त्याच्या म्हातारपणातच कळले. ज्यांना सामोरे जाण्याचा किंवा छाटले जाण्याचा थोडासाही अनुभव आला नाही आणि ज्यांना कोणीही मार्गदर्शन केलेले नाही अशा अंधांबद्दल यातून काय समजते? आज तुमच्यातील अनेकांची सेवा या आंधळ्यांसारखी नाही का? ज्यांना न्याय मिळाला नाही, छाटणी आणि हाताळणीही मिळालेली नाही आणि जे बदललेले नाहीत—त्या सर्वांवर अर्धवटच विजय मिळवलेला नाही का? अशा लोकांचा काय उपयोग? जर तुझी विचारसरणी, तुझे जीवनाचे ज्ञान आणि देवाविषयीचे तुझे ज्ञान यात कोणतेही नवीन बदल होत नसतील आणि तुला खरोखर काहीही मिळाले नसेल, तर तू तुझ्या सेवेत कधीही उल्लेखनीय असे काहीही साध्य करू शकणार नाहीस! देवाच्या कार्याची दृष्टी आणि नवीन ज्ञान यांच्याशिवाय, तुझ्यावर विजय मिळवता येणार नाही. मग, देवाचे अनुसरण करण्याचा तुझा मार्ग दुःख सहन करणार्‍या आणि उपवास करणार्‍या लोकांसारखा असेल: काहीच मोल नसलेला! याचे नेमके कारण म्हणजे, ते जे काही करतात त्यात थोडी साक्ष आहे आणि म्हणूनच मी म्हणतो, की त्यांची सेवा व्यर्थ आहे! आयुष्यभर, ते लोक त्रास सहन करतात आणि तुरुंगात वेळ व्यतीत करतात; ते नेहमीच सहनशील, प्रेमळ असतात आणि ते कायम वधस्तंभ वाहतात, जगाकडून त्यांची थट्टा केली जाते आणि त्यांना नाकारले जाते, त्यांना प्रत्येक त्रास सहन करावा लागतो आणि जरी ते अगदी अखेरपर्यंत आज्ञाधारक असले, तरीही त्यांच्यावर विजय मिळवला जात नाही आणि विजय मिळवण्याची कोणतीही साक्ष ते देऊ शकत नाहीत. त्यांनी खूप त्रास सोसला आहे, पण अंतःकरणातून ते देवाला बिलकुल ओळखत नाहीत. त्यांची जुनी विचारसरणी, जुन्या धारणा, धार्मिक प्रथा, मानवनिर्मित ज्ञान, मानवी कल्पना यापैकी कशाचाच विचार केला गेलेला नाही. त्यांच्यामध्ये कणभरही नवीन ज्ञानाचा अंश नाही. देवाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानाचा एकही अंश खरा किंवा अचूक नाही. त्यांनी देवाची इच्छा चुकीची समजून घेतली आहे. ही देवाची सेवा ठरेल का? भूतकाळातील तुझे देवाविषयीचे जे काही ज्ञान असेल, ते आजही तसेच राहिले आणि देव काहीही करत असला तरी तू देवाविषयीचे तुझे ज्ञान तुझ्या धारणांवर आणि कल्पनांवर आधारीत ठेवलेस, म्हणजेच, जर तुझ्याकडे देवाचे कोणतेही नवीन, खरे ज्ञान नसेल आणि जर तू देवाची खरी प्रतिमा आणि प्रवृत्ती जाणून घेण्यात असमर्थ ठरलास, जर तुझे देवाविषयीचे ज्ञान अजूनही सरंजामी, अंधश्रद्धाळू विचारसरणीतून आलेले असेल आणि अजूनही मानवी कल्पनाशक्ती आणि धारणांतून आलेले असेल, तर तुझ्यावर विजय मिळवलेला नाही. मी आता तुझ्याशी बोलत असलेली सर्व वचने तुला समजू देण्यासाठी आहेत, हे ज्ञान तुला नवीन, अचूक ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी आहे; ते तुझ्यातील जुन्या धारणा आणि जुने ज्ञान नष्ट करण्यासाठीदेखील आहे, जेणेकरून तुला नवीन ज्ञान मिळू शकेल. जर तू खरोखरच माझ्या वचनांचे सेवन आणि प्राशन केलेस, तर तुझे ज्ञान लक्षणीयरीत्या बदलेल. जोपर्यंत तू देवाच्या वचनांचे आज्ञाधारक अंतःकरणाने सेवन आणि प्राशन करत असशील, तोपर्यंत तुझा दृष्टिकोन बदलेल. जोपर्यंत तू वारंवार ताडण स्वीकारण्यास सक्षम असशील, तोपर्यंत तुझी जुनी मानसिकता हळुहळू बदलत जाईल. जोपर्यंत तुझ्या जुन्या मानसिकतेची जागा पूर्णपणे नवीन मानसिकता घेईल, तुझे अनुसरणही त्यानुसार बदलेल. अशाप्रकारे, तुझी सेवा लक्ष्याच्या अधिकाधिक जवळ जाईल, देवाची इच्छा पूर्ण करण्यास अधिकाधिक सक्षम होईल. जर तू तुझे जीवन बदलू शकत असशील, मानवी जीवनाबद्दलचे तुझे ज्ञान आणि देवाबद्दलच्या तुझ्या अनेक धारणा बदलू शकत असशील, तर तुझी नैसर्गिकता हळुहळू कमी होईल. देव जेव्हा लोकांवर विजय मिळवतो, तेव्हा हा परिणाम होतो, हा बदल लोकांमध्ये होतो. जर, देवावरील तुझ्या श्रद्धेमध्ये, तुझ्या शरीराला वश करणे आणि सोसणे आणि दु:ख सहन करणे एवढेच तुला माहीत असेल आणि हे योग्य की अयोग्य हे तुला माहीत नसेल, हे कोणासाठी करायचे, याचेही तुला ज्ञान नसेल, तर असे आचरण बदल कसे घडवू शकेल?

हे समजून घ्या, की मी तुमच्याकडे जे मागतो, ते तुमच्या देहाला बंधनात ठेवण्यासाठी किंवा तुमच्या मेंदूला मनमानी विचार करण्यापासून रोखण्यासाठी नाही. हे ना कार्याचे उद्दिष्ट आहे, ना आत्ताच करावयाचे कार्य आहे. सध्या, तुम्हाला सकारात्मक पैलूंचे ज्ञान असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला बदलू शकाल. सर्वात आवश्यक कृती म्हणजे तुम्ही स्वतःला देवाच्या वचनांनी सुसज्ज करा, म्हणजेच वर्तमानातील सत्य आणि दृष्टी यांच्या साहाय्याने स्वतःला पूर्णपणे सुसज्ज करा आणि नंतर पुढे जा आणि ते आचरणात आणा. ही तुमची जबाबदारी आहे. मी तुम्हाला आणखी मोठ्या प्रकाशाचा शोध घेण्यास आणि तो प्राप्त करण्यास सांगत नाही. सद्यस्थितीत, तुमच्याकडे त्यासाठीचा दर्जाच नाही. तुम्ही केवळ देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करणे एवढेच आवश्यक आहे. तुम्ही देवाचे कार्य समजून घेतले पाहिजे आणि तुमचा स्वभाव, तुमचे सार आणि तुमचे जुने जीवन जाणून घेतले पाहिजे. विशेषतः, तुम्हाला भूतकाळात तुम्ही केलेले चुकीचे आणि मूर्खपणाचे आचरण आणि मानवी कृत्यांची माहिती असणे आवश्यक आहे. हे बदलण्यासाठी, तुम्ही तुमची विचारसरणी बदलण्यापासून सुरुवात केली पाहिजे. प्रथम, तुमची जुनी विचारसरणी सोडून देऊन नवीन विचारसरणीचा अंगिकार करा, नवीन विचारसरणीनुसार तुमचे शब्द आणि कृती आणि तुमचे जीवन निश्चित करा. तुम्हा प्रत्येकाकडे आज हेच मागणे आहे. आंधळेपणाने आचरण करू नका किंवा आंधळेपणाने अनुसरण करू नका. तुमच्याकडे एक आधार आणि एक लक्ष्य असायला हवे. स्वतःची फसवणूक करू नका. तुमची देवावरची श्रद्धा नेमकी कशासाठी आहे, त्यातून काय मिळवले पाहिजे आणि आता तुम्ही कशात प्रवेश केला पाहिजे, हे तुम्हाला माहीत असायला हवे. हे सर्व तुला माहीत असणे अत्यावश्यक आहे.

सध्या तुम्ही तुमचे जीवन वरच्या पातळीवर न्यायला हवे आणि तुमची क्षमता वाढवायला हवी. याशिवाय, तुम्ही तुमच्या भूतकाळातील ते जुने दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे, तुमचे विचार आणि तुमच्या धारणा बदलणे आवश्यक आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्याला नूतनीकरणाची गरज आहे. जेव्हा देवाच्या कृत्यांविषयी तुझे ज्ञान बदलते, जेव्हा देवाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीच्या सत्यतेचे नवीन ज्ञान तुला मिळते आणि जेव्हा तुझ्यातील ज्ञान उंचावले जाते, तेव्हा तुझे जीवन चांगले वळण घेते. आता लोक जे करतात आणि जे बोलतात, त्या सर्व गोष्टी व्यावहारिक आहेत. हे सिद्धांत नाहीत, तर लोकांना त्यांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या आणि त्यांच्याकडे असणे आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. विजयाच्या कार्यादरम्यान लोकांमध्ये होणारा हा बदल असतो, जो लोकांनी अनुभवायला हवा आणि त्यांच्यावर विजय मिळवल्यानंतरचा हा परिणाम असतो. जेव्हा तू तुझी विचारसरणी बदलली असशील, नवीन मानसिक दृष्टिकोन अंगिकारला असशील, तुझ्या धारणा आणि हेतू आणि तुझे पूर्वीचे तर्क उलथून टाकले असशील, तुझ्या आत खोलवर रुजलेल्या गोष्टींचा त्याग केला असशील आणि देवावरील श्रदेधेचे नवीन ज्ञान मिळवले असशील, तेव्हा तू दिलेल्या साक्षी उंचावल्या जातील आणि तुझे संपूर्ण अस्तित्व खऱ्या अर्थाने बदलले जाईल. या सर्व गोष्टी सर्वात व्यावहारिक, सर्वात वास्तववादी आणि सर्वात मूलभूत गोष्टी आहेत—ज्या गोष्टी लोकांना भूतकाळात समजू शकल्या नाहीत आणि ज्या गोष्टींमध्ये गुंतण्यास ते असमर्थ होते. ते आत्म्याचे खरे कार्य आहेत. भूतकाळात तुला बायबल नेमके कसे समजले? त्याची आजच्या काळाशी तुलना कर, म्हणजे तुला कळेल. भूतकाळात तू मोशे, पेत्रा, पौल किंवा बायबलमधील सर्व विधाने आणि दृष्टिकोनांना मानसिकदृष्ट्या उन्नत केलेस आणि त्यांना वेदीवर ठेवलेस. आता, जर तुला बायबल एका वेदीवर ठेवण्यास सांगितले, तर तू ते करशील का? बायबलमध्ये मनुष्याने लिहिलेल्या अनेक नोंदी आहेत आणि बायबल हे देवाच्या कार्याच्या दोन टप्प्यांचा केवळ मनुष्याचा वृत्तांत आहे हे तुला दिसेल. ते इतिहासाचे पुस्तक आहे. याचा अर्थ तुझे त्याविषयीचे ज्ञान बदलले आहे असे नाही का? जर तू आज मॅथ्यूच्या सुवार्तेत दिलेली येशूची वंशावळ पाहिली, तर तू म्हणशील, “येशूची वंशावळ? मूर्खपणा! ही जोसेफची वंशावळ आहे, येशूची नाही. येशू आणि जोसेफ यांच्यात कोणताही संबंध नाही.” जेव्हा तू आता बायबल पाहतोस, तेव्हा तुझे त्याबद्दलचे ज्ञान वेगळे असते, याचा अर्थ तुझा दृष्टीकोन बदलला आहे आणि तू धर्माच्या ज्येष्ठ विद्वानांपेक्षा त्यात उच्च दर्जाचे ज्ञान आणतोस. या वंशावळीत काहीतरी आहे असे कोणी म्हटल्यास, तू प्रतिसाद देशील, “त्यात काय आहे? चल, स्पष्ट करा. येशू आणि जोसेफ यांचा संबंध नाही. हे तुला माहीत नाही का? येशूची वंशावळ असू शकते का? येशूचे पूर्वज कसे असू शकतात? तो मनुष्याचा वंशज कसा असू शकतो? त्याचा देह मरियेपासून जन्माला आला; त्याचा आत्मा हा देवाचा आत्मा आहे, मनुष्याचा आत्मा नाही. येशू हा देवाचा प्रिय पुत्र आहे, मग त्याची वंशावळ असू शकते का? पृथ्वीवर असताना तो मानवजातीचा सदस्य नव्हता, मग त्याची वंशावळ कशी असेल?” जेव्हा तू वंशावळीचे विश्लेषण करशील आणि आतील सत्य स्पष्टपणे स्पष्ट करशील, तुला जे समजले आहे ते सामायिक करशील, तेव्हा ती व्यक्ती अवाक होईल. काही लोक बायबलचा संदर्भ घेतील आणि तुला विचारतील, “येशूची वंशावळ होती. तुझ्या आजच्या देवाची वंशावळ आहे का?” त्यानंतर तू त्यांना तुझ्या ज्ञानाबद्दल सांगशील, जे सर्वात वास्तविक आहे, आणि अशा प्रकारे, तुझ्या ज्ञानाने परिणाम साधलेला असेल. खरे तर, येशू आणि जोसेफचा संबंध नव्हता, अब्राहामाचा तर आणखीच कमी होता; तो केवळ इस्रायलमध्ये जन्मला होता. मात्र देव इस्रायली नाही किंवा इस्रायली लोकांचा वंशजदेखील नाही. इस्रायलमध्ये जन्माला आला, याचा अर्थ तो केवळ इस्रायली लोकांचा देव आहे, असा नाही. केवळ त्यांच्या कार्यासाठीच त्याने अवताराचे कार्य केले. देव हा संपूर्ण विश्वातील सर्व सृष्टीचा देव आहे. त्याने केवळ त्याच्या कार्याचा एक टप्पा प्रथम इस्रायलमध्ये पार पाडला, त्यानंतर तो इतर राष्ट्रांमध्ये कार्य करू लागला. मात्र, लोकांनी येशूला इस्रायली लोकांचा देव मानले, एवढेच नव्हे तर, त्याला इस्रायली लोकांमध्ये आणि डेव्हिडच्या वंशजांमध्ये स्थान दिले. बायबल म्हणते, की दिवसांच्या शेवटी, परराष्ट्रांमध्ये यहोवाचे नाव महान बनेल, याचा अर्थ देव शेवटच्या दिवसांत परराष्ट्रांमध्ये कार्य करेल. देव यहूदीयामध्ये अवतरला होता, याचा अर्थ असा नाही की देव फक्त यहुद्यांवर प्रेम करतो. हे घडले ते केवळ कार्याची गरज म्हणून; असे नाही की देव फक्त इस्रायलमध्येच अवतरला असता (कारण इस्रायली हे त्याचे निवडलेले लोक होते). परराष्ट्रांमध्येही देवाने निवडलेले लोक आढळत नाहीत का? येशूने यहूदीयामधील कार्य पूर्ण केल्यानंतर हे कार्य परराष्ट्रांमध्ये विस्तारले. (इस्रायली लोक इस्रायल वगळता इतर सर्व राष्ट्रांना “परराष्ट्रे” म्हणत.) खरे तर, त्या परराष्ट्रांमध्येही देवाने निवडलेले लोक होते; त्यावेळी तेथे अद्याप कोणतेही कार्य केले जात नव्हते, एवढेच. लोकांनी इस्रायलवर एवढा भर दिला कारण कार्याचे पहिले दोन टप्पे इस्रायलमध्ये पार पडले, तर परराष्ट्रांमध्ये कोणतेही कार्य केले जात नव्हते. परराष्ट्रांमधील कार्य आता कुठे सुरू होत आहे, म्हणूनच लोकांना ते स्वीकारणे इतके अवघड वाटते. जर तू हे सर्व स्पष्टपणे समजू शकत असशील, जर तू ते आत्मसात करू शकत असशील आणि त्याचा योग्य विचार करू शकत असशील, तर तुला आजच्या आणि भूतकाळातील देवाचे अचूक ज्ञान असेल आणि हे नवीन ज्ञान संपूर्ण इतिहासात सर्व संतांना मिळालेल्या देवाच्या ज्ञानापेक्षा अधिक असेल. जर तू आजचे कार्य अनुभवत असशील आणि आज देवाचे वैयक्तिक उद्गार ऐकत असशील, तरीही तुम्हाला देवाचे संपूर्ण ज्ञान नसेल आणि तुझा पाठपुरावा नेहमीप्रमाणेच राहिला आहे आणि त्याची जागा नवीन कशानेही घेतली नाही, विशेषत: जर तू विजयाचे सर्व कार्य अनुभवले असशील, तरीही अखेर तुझ्यामध्ये काहीही बदल दिसून येत नसेल, तर मग तुझी श्रद्धा फक्त भूक भागवण्यासाठी भाकरीचा शोध घेणाऱ्या लोकांसारखी नाही का? अशावेळी, विजयाच्या कार्याचा तुझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मग ज्यांना बाहेर काढून टाकले जाणार आहे तू त्यांच्यापैकी बनणार नाहीस का?

जेव्हा विजयाचे सर्व कार्य पूर्ण होते, तेव्हा तुम्ही सर्वांनी हे समजून घेणे अत्यावश्यक आहे, की देव केवळ इस्रायलचा देव नाही, तर संपूर्ण सृष्टीचा देव आहे. त्याने केवळ इस्रायली लोकांनाच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला निर्माण केले. जर तू म्हणत असशील, की देव हा केवळ इस्रायली लोकांचाच देव आहे किंवा देवाचा अवतार इस्रायलच्या बाहेरील कोणत्याही राष्ट्रात होणे अशक्य आहे, तर विजयाच्या कार्यादरम्यान तुला अद्याप कोणतेही ज्ञान मिळालेले नाही आणि देव तुझा देव आहे हे अगदी अल्पांशानेही तू मान्य करत नाहीस; तू फक्त हे ओळखतोस, की देव इस्रायलमधून चीनमध्ये गेला आणि तुझा देव होण्यास त्याला भाग पाडले जात आहे. जर आजही तू या दृष्टीने पाहत असशील, तर मी तुझ्यामध्ये केलेले कार्य निष्फळ ठरले आहे आणि मी सांगितलेली एकही गोष्ट तुला समजलेली नाही. अखेर, जर तू मत्तयाप्रमाणे माझ्यासाठी दुसरी वंशावळ लिहिलीस, माझ्यासाठी योग्य पूर्वज शोधलास—माझा अचूक पूर्वज शोधलास, जसे की देवाच्या दोन अवतारांसाठी दोन वंशावळी आहेत—तर हा जगातील सर्वात मोठा विनोद ठरणार नाही का? माझी वंशावळ शोधून काढणारी “चांगल्या हेतूची व्यक्ती” असलेला तू देवाचे विभाजन करणारा व्यक्ती बनणार नाहीस का? तू या पापाचे ओझे उचलण्यास समर्थ आहेस का? या सर्व विजयाच्या कार्यानंतर, जर तू अजूनही देव संपूर्ण सृष्टीचा देव आहे यावर विश्वास ठेवत नसशील, जर देव फक्त इस्रायली लोकांचाच देव आहे असे तुला वाटत असेल, तर तू देवाचे उघड विरोधक ठरणार नाहीस का? आज तुझ्यावर विजय मिळवण्याचा उद्देश हा आहे, की तू देव हा तुझा देव आहे आणि इतरांचाही देव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा देव आहे आणि सर्व सृष्टीचा देव आहे, हे तुझ्याकडून मान्य करवून घ्यावे. तो इस्रायली लोकांचा देव आहे आणि इजिप्तच्या लोकांचादेखील देव आहे. तो ब्रिटिशांचा देव आणि अमेरिकन लोकांचाही देव आहे. तो केवळ आदाम आणि हव्वा यांचा देव नाही, तर त्यांच्या सर्व वंशजांचाही देव आहे. तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा देव आहे. सर्व कुटुंबे, मग ती इस्रायली असोत वा परराष्ट्रीय, सर्व एकाच देवाच्या हाती आहेत. त्याने केवळ हजारो वर्षे इस्रायलमध्ये कार्य केले आणि तो एकदा यहूदीयामध्ये जन्मला होता, एवढेच नाही, तर आज तो चीनमध्ये उतरला आहे, या ठिकाणी जेथे महान अग्निवर्ण अजगर वेटोळे घालून पडला आहे. जर यहूदीयामध्ये जन्म घेतल्याने तो यहूद्यांचा राजा बनतो, तर आज तुमच्या सर्वांमध्ये उतरल्यामुळे तो तुमचा सर्वांचा देव ठरत नाही का? त्याने इस्रायली लोकांचे नेतृत्व केले आणि त्याचा जन्म यहूदीयात झाला होता आणि त्याचा जन्म परराष्ट्रातही झाला होता. त्याचे सर्व कार्य त्याने निर्माण केलेल्या संपूर्ण मानवजातीसाठी नाही का? तो इस्रायली लोकांवर शंभरपट प्रेम करतो आणि परराष्ट्रीयांचा हजार पटीने तिरस्कार करतो का? ही तुमची धारणा नाही का? देव कधीच तुमचा देव नव्हता असे नाही, तर तुम्ही त्याला कबूल करत नाही; असे नाही की देव तुमचा देव होण्यास तयार नाही, परंतु तुम्ही त्याला नाकारले आहे. निर्माण केलेल्यांपैकी कोण सर्वशक्तिमान देवाच्या हातात नसतो? आज तुमच्यावर विजय मिळवताना, देव दुसरा कोणी नसून तुमचा देव आहे हे मान्य करणे हे ध्येय नाही का? जर तुम्ही अजूनही देव हा केवळ इस्रायली लोकांचा देव आहे आणि इस्रायलमधील डेव्हिडचे घर हे देवाच्या जन्माचे मूळ आहे, असे मानत असाल आणि इस्रायल व्यतिरिक्त इतर कोणतेही राष्ट्र देव “निर्माण” करण्यास पात्र नाही, परराष्ट्रीय कुटुंब वैयक्तिकरीत्या यहोवाचे कार्य स्वीकारण्यास सक्षम आहे, असे तुम्हाला वाटत नसेल—जर तू अजूनही असाच विचार करत असशील, तर तू हट्टी ठरत नाहीस का? सदैव इस्रायलवर लक्ष केंद्रीत करू नका. देव आज तुमच्यामध्येच आहे. तू स्वर्गाकडेही पाहत राहू नयेस. स्वर्गात तुझ्या देवाचा शोध घेणे थांबव! देव तुमच्यामध्ये आला आहे, मग तो स्वर्गात कसा असेल? तू दीर्घकाळ देवावर विश्वास ठेवला नाहीस, तरीही तुझ्या मनात त्याच्याविषयी खूप धारणा आहेत, एवढ्या की इस्रायली लोकांचा देव त्याच्या उपस्थितीने तुमच्यावर कृपा करेल, असा विचार तू एका क्षणासाठीही करत नाही. तुम्ही किती असह्यपणे घाणेरडे आहात हे लक्षात घेऊन, देव स्वतः तुमच्यासमोर प्रकट होईल, असा विचार करण्याचे धाडसही तुम्ही कमी करता. देव परराष्ट्रीय देशात वैयक्तिकरीत्या कसा उतरू शकतो, याचाही विचार तुम्ही कधी केला नाही. त्याने सिनाई शिखरावर किंवा ऑलिव्ह शिखरावर उतरून इस्रायली लोकांना दिसले पाहिजे. परराष्ट्रीय (म्हणजे इस्रायलच्या बाहेरील लोक) त्याच्यासाठी तिरस्कारणीय नाहीत का? तो स्वतः त्यांच्यामध्ये कसे कार्य करू शकतो? या सर्व खोलवर रुजलेल्या धारणा आहेत, ज्या तुम्ही अनेक वर्षांपासून विकसित केल्या आहेत. आज तुमच्यावर विजय मिळवण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या या धारणांचा भंग करणे हा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये देवाचे वैयक्तिक स्वरूप पाहत आहात—सिनाई शिखरावर किंवा ऑलिव्ह शिखरावर नाही, परंतु त्याने यापूर्वी कधीही ज्यांचे नेतृत्व केले नाही अशा लोकांमध्ये. देवाने इस्रायलमध्ये त्याच्या कार्याचे दोन टप्पे पार पाडल्यानंतर, इस्रायली आणि सर्व परराष्ट्रीयांनीदेखील ही धारणा बाळगली, की देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या हे खरे असले तरी, तो केवळ इस्रायली लोकांचा देव बनण्यास इच्छुक आहे, परराष्ट्रीयांचा देव बनण्यास इच्छुक नाही. इस्रायली पुढील गोष्टींवर विश्वास ठेवतात: देव केवळ आमचा देव असू शकतो, तो तुम्हा परराष्ट्रीयांचा देव नाही आणि तुम्ही यहोवाचा आदर करत नाही, म्हणून यहोवा—आमचा देव—तुमचा तिरस्कार करतो. ते यहुदी लोक पुढील गोष्टींवरदेखील विश्वास ठेवतात: प्रभू येशूने आम्हा यहुदी लोकांची प्रतिमा धारण केली आणि तो यहुदी लोकांचे चिन्ह धारण करणारा देव आहे. देव आमच्यामध्येच कार्य करतो. देवाची प्रतिमा आणि आमची प्रतिमा सारखीच आहे; आमची प्रतिमा देवांच्या जवळ आहे. प्रभू येशू हा आम्हा यहुदी लोकांचा राजा आहे; परराष्ट्रीय लोक इतके मोठे तारण प्राप्त करण्यास पात्र नाहीत. प्रभू येशू आम्हा यहुदी लोकांसाठी पापार्पण आहे. केवळ कार्याच्या त्या दोन टप्प्यांच्या आधारे इस्रायली आणि यहुदी लोकांनी या सर्व धारणा तयार केल्या. ते स्वतः देवावर दावा करतात, देव हा परराष्ट्रीयांचाही देव आहे हे ते मान्य करत नाहीत. अशा रीतीने देवाची परराष्ट्रीयांच्या अंतःकरणात उणीव भासली. याचे कारण असे, की प्रत्येकाचा असा विश्वास होता की देवाला परराष्ट्रीयांचा देव होण्याची इच्छा नाही आणि त्याला फक्त इस्रायली—जे त्याने निवडलेले लोक आहेत—आणि यहुदी, विशेषतः त्याचे अनुसरण करणारे शिष्य हेच आवडतात. यहोवा आणि येशूने जे कार्य केले ते सर्व मानवजातीच्या अस्तित्वासाठी आहे हे तुला माहीत नाही का? देव हा इस्रायलच्या बाहेर जन्मलेल्या तुम्हा सर्वांचा देव आहे, हे आता तरी तू मान्य करतोस का? देव आज थेट तुमच्यामध्येच नाही का? हे स्वप्न असू शकत नाही, हो ना? ही वास्तविकता तुम्हाला मान्य नाही का? तुमची त्यावर विश्वास ठेवण्याची किंवा त्याबद्दल विचार करण्याची हिंमत नाही. तुम्ही याकडे कसेही पाहत असलात तरीही, देव इथे थेट तुमच्यामध्येच नाही का? तुम्हाला अजूनही या वचनांवर विश्वास ठेवण्यास भय वाटते का? या दिवसापासून, विजय मिळवलेले सर्व लोक आणि देवाचे अनुयायी होऊ इच्छिणारे सर्व लोक हे देवाने निवडलेलेच लोक नाहीत का? तुम्ही सर्व जण जे आज अनुयायी आहात, ते इस्रायलच्या बाहेरचे निवडलेले लोकच नाही का? तुमची स्थिती इस्रायली लोकांसारखीच नाही का? हे सर्व तुम्ही ओळखायला नको का? तुमच्यावर विजय मिळवण्याच्या कार्याचे हे ध्येय नाही का? तुम्ही देवाला पाहू शकत असल्यामुळे, तो सुरुवातीपासून आणि भविष्यकाळापर्यंत कायम तुमचा देव असेल. जोपर्यंत तुम्ही सर्व त्याचे अनुसरण करण्यास आणि त्याचे एकनिष्ठ, आज्ञाधारक बनण्यास तयार असाल तोपर्यंत तो तुम्हाला सोडून देणार नाही.

लोक देवावर प्रेम करण्याची कितीही आकांक्षा बाळगत असले तरीही, ते आजपर्यंत त्याचे अनुसरण करण्यात आज्ञाधारक राहिले आहेत. शेवटी, जेव्हा कार्याचा हा टप्पा संपुष्टात येईल, त्या समाप्तीपर्यंत त्यांना संपूर्ण पश्चात्ताप होणार नाही. तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांवर विजय प्राप्त होईल. सध्या, ते फक्त विजय मिळवण्याच्या प्रक्रियेत आहेत. ज्या क्षणी काम संपेल, त्या क्षणी त्यांच्यावर पूर्णपणे विजय मिळवलेला असेल, परंतु सध्या तरी तशी स्थिती नाही! जरी प्रत्येकाला खात्री पटली असली, तरी याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. याचे कारण असे, की सध्या लोकांनी केवळ वचने पाहिली आहेत, वस्तुस्थिती नाही आणि त्यांनी कितीही खोलवर विश्वास ठेवला तरीही त्यांच्या मनात अनिश्चितता असते. म्हणूनच केवळ त्या अखेरच्या वास्तविक घटनेने, वचने वास्तविकता बनतील, तेव्हा लोकांवर पूर्णपणे विजय मिळवलेला असेल. सध्या, या लोकांवर विजय मिळवला आहे कारण ते अनेक रहस्ये ऐकतात, जी त्यांनी यापूर्वी कधीही ऐकलेली नाहीत. परंतु त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनात, ते अजूनही पाहत आहेत आणि काही तथ्यात्मक घटनांची वाट पाहत आहेत ज्यायोगे त्यांना देवाचे प्रत्येक वचन प्रत्यक्षात आलेले दिसेल. तेव्हाच त्यांची पूर्ण खात्री पटेल. अखेर जेव्हा, सर्वांनी या प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिल्या असतील आणि या वास्तविकतेमुळे त्यांना खात्री पटली असेल, तेव्हाच त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या डोळ्यांत खात्री दिसेल आणि त्यांना अंतःकरणाच्या तळापासून पूर्ण खात्री पटेल. मनुष्याचा स्वभाव असा आहे: तुम्हाला सर्व वचने सत्यात उतरताना पाहण्याची गरज आहे, तुम्हाला काही सत्य घटना घडताना पाहण्याची गरज आहे आणि काही लोकांवर होणारी आपत्ती पाहणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अंतःकरणातून पूर्ण खात्री होईल. यहूद्यांप्रमाणे, तुम्ही संकेत आणि चमत्कार पाहण्यात व्यग्र आहात. तरीही तेथे काही संकेत आणि चमत्कार घडताहेत आणि ती वास्तविकता तुमचे डोळे उघडण्यासाठी आहे, हे पाहण्यात तुम्ही सतत अपयशी ठरता. आकाशातून कोणीतरी खाली आलेले असो किंवा ढगांचा स्तंभ तुमच्याशी बोलत असो, किंवा मी तुमच्यापैकी एकावर भूतविद्या करत असो किंवा माझा आवाज तुमच्यामध्ये मेघगर्जनासारखा घुमत असो, तुम्हाला या प्रकारची घटना पाहण्याची नेहमीच इच्छा होती आणि असेल. कोणीही म्हणेल, की देवावर विश्वास ठेवताना, तुमची सर्वात मोठी इच्छा ही आहे की देवाला येताना पाहावे आणि वैयक्तिकरीत्या तुम्हाला संकेत दाखवावे. तेव्हा तुमचे समाधान होईल. तुम्‍हा लोकांवर विजय मिळवण्यासाठी, मला स्‍वर्ग आणि पृथ्‍वीवरील सृष्‍टीप्रमाणे कार्य करावे लागेल आणि त्‍या व्यतिरिक्त, तुम्‍हाला कोणती तरी संकेत दाखवावे लागतील. मग, तुमच्या अंतःकरणांवर पूर्णपणे विजय मिळवलेला असेल.

मागील:  विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (१)

पुढील:  विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (४)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger