ज्यांना परिपूर्ण करायचे आहे त्यांनी परिष्करणाला सामोरे जाणे भाग आहे
जर तुझा देवावर विश्वास असेल तर तू देवाची आज्ञा पाळली पाहिजेस, सत्य आचरणात आणले पाहिजेस आणि तुझी सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेस. याव्यतिरिक्त, ज्या गोष्टी तू अनुभवणे आवश्यक आहे त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेस. जर तू फक्त ठरावीक परिस्थितीला सामोरे जाणे, शिस्त लावणे व न्याय करणे या गोष्टी अनुभवत असशील, जर तू फक्त देवाचा आनंद घेण्यास सक्षम असशील, परंतु देव तुला शिस्त लावत असताना किंवा तुला सांभाळत असताना तुला ते जाणवू शकत नसल्यास—हे अस्वीकार्य आहे. कदाचित परिष्करणाच्या या उदाहरणात, तू तुझ्या बाजूवर ठाम राहण्यास सक्षम असशील, परंतु हे अजूनही पुरेसे नाही; अजूनही पुढे जात राहणे आवश्यक आहे. देवावर प्रेम करण्याचा धडा कधीही थांबत नाही आणि त्याला अंतही नाही. देवावर विश्वास ठेवणे लोकांना अत्यंत सोपे वाटते, परंतु त्यांना काही व्यावहारिक अनुभव आल्यानंतर त्यांना समजते, की देवावरचा विश्वास लोकांच्या कल्पनेइतका सोपा नाही. जेव्हा देव मनुष्याला परिष्कृत करण्याचे कार्य करतो, तेव्हा मनुष्याला त्रास होतो. एखाद्या व्यक्तीचे परिष्करण जितके मोठे असेल, तितके त्यांचे देवावरील प्रेम जास्त असेल व देवाची शक्ती त्यांच्यामध्ये तितकी अधिक प्रकट होईल. याउलट, एखाद्या व्यक्तीला जितके कमी परिष्करण प्राप्त होईल, तितकेच त्यांचे देवावरील प्रेम कमी वृद्धिंगत होईल आणि त्यांच्यामध्ये देवाची शक्ती तितकी कमी प्रकट होईल. अशा व्यक्तीचे परिष्करण व वेदना जितकी जास्त असेल आणि ते जितका जास्त त्रास अनुभवतील, तितके त्यांचे देवावरील प्रेम अधिकाधिक वाढेल, देवावरील त्यांची श्रद्धा तितकी जास्त अस्सल होईल व देवाबद्दलचे त्यांचे ज्ञान अधिक प्रगल्भ होईल. तुझ्या अनुभवांमध्ये, तू असे लोक पाहशील, की ज्यांना परिष्कृत केले जात असताना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांना ठरावीक परिस्थितींना सामोरे जावे लागते व खूप शिस्त लावली जाते आणि तू पाहशील, की अशाच लोकांचे देवावर अतोनात प्रेम असते व देवाचे अधिक गहन आणि भेदक ज्ञान असते. ज्यांना ठरावीक परिस्थितींना सामोरे जाण्याचा अनुभव आलेला नसतो त्यांच्याकडे केवळ वरवरचे ज्ञान असते आणि ते इतकेच म्हणू शकतात: “देव खूप चांगला आहे, तो लोकांवर कृपा करतो जेणेकरून ते त्याचा आनंद घेऊ शकतील.” जर ठरावीक परिस्थितींना सामोरे जाण्याचा व शिस्तबद्धतेचा अनुभव आला असेल, तरच ते देवाविषयीच्या खऱ्या ज्ञानाबद्दल बोलू शकतात. म्हणून मनुष्यामध्ये देवाचे कार्य जितके अधिक आश्चर्यकारक असते, तितकेच ते अधिक मौल्यवान आणि महत्त्वपूर्ण असते. ते तुझ्यासाठी जितके अभेद्य असेल व तुझ्या धारणांशी ते जितके विसंगत असेल, तितकेच देवाचे कार्य तुझ्यावर अधिक विजय मिळवू शकेल, तुला प्राप्त करू शकेल आणि तुला परिपूर्ण बनवू शकेल. देवाच्या कार्याचे महत्त्व किती मोठे आहे! जर देवाने मनुष्याला अशा प्रकारे परिष्कृत केले नाही, जर त्याने या पद्धतीनुसार कार्य केले नाही, तर त्याच्या कार्याचा प्रभाव होणार नाही आणि त्याला महत्त्व उरणार नाही. भूतकाळात असे म्हटले जात होते, की देव या समूहाची निवड करून त्यांना प्राप्त करेल व शेवटच्या दिवसांत त्यांना परिपूर्ण करेल; यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो तुमच्यामध्ये जितके मोठे कार्य करतो, तितकेच तुमचे देवावरील प्रेम अधिक सखोल आणि शुद्ध असते. देवाचे कार्य जितके मोठे असतो, तितके मनुष्य त्याच्या शहाणपणातून काहीतरी समजून घेण्यास सक्षम असतो व मनुष्याचे त्याच्याबद्दलचे ज्ञान अधिक सखोल असते. शेवटच्या दिवसांत, देवाची सहा हजार वर्षांची व्यवस्थापनासाठी केलेली योजना समाप्त होईल. ती खरोखर सहज समाप्त होऊ शकते का? त्याने मानवजातीला जिंकल्यानंतर त्याचे कार्य संपेल का? हे इतके सोपे असू शकते का? लोक खरंच कल्पना करतात की हे इतके सोपे आहे, परंतु देव जे करतो ते इतके सोपे नाही. देवाच्या कार्याच्या कोणत्याही भागाचा उल्लेख केला तरीही, हे सर्व मनुष्यासाठी अथांग आहे. जर तुला याचा थांग लागला, तर देवाच्या कार्याला महत्त्व किंवा मोल उरणार नाही. देवाने केलेले कार्य अथांग आहे; ते तुझ्या धारणांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे व तुझ्या धारणांशी ते जितके अधिक विसंगत, तितकेच ते दाखवते की देवाचे कार्य अर्थपूर्ण आहे; जर ते तुझ्या धारणांशी सुसंगत असते, तर ते निरर्थक असते. आज, तुला असे वाटते की देवाचे कार्य इतके आश्चर्यकारक आहे आणि तुला ते जितके अधिक आश्चर्यकारक वाटते तितकेच तुला देव अथांग आहे असे वाटते व देवाचे कार्य किती महान आहेत हे तुला दिसते. जर त्याने मनुष्यावर विजय मिळवण्यासाठी फक्त काही वरवरचे, अव्यवस्थित कार्य केले आणि नंतर दुसरे काही केले नाही, तर मनुष्य देवाच्या कार्याचे महत्त्व पाहण्यास असमर्थ असेल. तुला आता थोडेफार परिष्करण प्राप्त होत असले तरी, तुझ्या जीवनातील वाढीसाठी याचा खूप फायदा होतो; त्यामुळे अशा त्रासाला सामोरे जाणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज, तुला थोडेफार परिष्करण प्राप्त होत आहे, परंतु नंतर तू खऱ्या अर्थाने देवाची कृत्ये पाहण्यास सक्षम असशील आणि शेवटी तू म्हणशीलल: “देवाची कृत्ये खूप आश्चर्यकारक आहेत!” हे तुझ्या हृदयातील शब्द असतील. काही काळासाठी देवाचे परिष्करण (सेवेकऱ्यांची परीक्षा आणि ताडणाची वेळ) अनुभवल्यानंतर काही लोक शेवटी म्हणाले: “देवावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे!” त्यांनी “खरोखर कठीण” असे शब्द वापरले, या वस्तुस्थितीवरून हे दिसून येते, की देवाची कृत्ये अथांग आहेत, देवाच्या कार्याला खूप महत्त्व व किंमत आहे आणि त्याचे कार्य मनुष्यासाठी जपून ठेवावे इतके मौल्यवान आहे. मी इतके कार्य करूनही जर तुला थोडेफारही ज्ञान नसेल, तर माझ्या कामाचे मोल राहिल का? हे तुला असे म्हणण्यास प्रवृत्त करेल: “देवाची सेवा करणे खरोखर कठीण आहे, देवाची कृत्ये खूप आश्चर्यकारक आहेत आणि देव खरोखरच ज्ञानी आहे! देव खूप सुंदर आहे!” जर, अनुभवाच्या कालावधीतून पार पडल्यानंतर, तू असे शब्द बोलू शकत असशील, तर तुला तुझ्यामध्ये देवाचे कार्य प्राप्त झाले आहे, हेच सिद्ध होते. एके दिवशी, जेव्हा तू परदेशात सुवार्ता पसरवत असशील आणि कोणीतरी तुला विचारेल: “देवावरील तुझा विश्वास कसा आहे?” तू म्हणू शकशील: “देवाच्या कृती खूप अद्भुत आहेत!” त्यांना असे वाटेल, की तुझे शब्द खरे अनुभव सांगतात. हे खरोखर साक्ष देण्यासारखे आहे. तू म्हणशील, की देवाचे कार्य शहाणपणाने भरलेले आहे आणि तुझ्यातील त्याच्या कार्याने तुला खरोखर खात्री दिली आहे व तुझे हृदय जिंकून घेतले आहे. तू नेहमी त्याच्यावर प्रेम करशील कारण तो मानवजातीच्या प्रेमासाठी खूपच पात्र आहे! जर तू या गोष्टी बोलू शकत असशील, तर तू लोकांची हृदये हेलावून टाकू शकशील. हे सर्व साक्ष देणे आहे. जर तू निर्णायक साक्ष देण्यास सक्षम असशील, लोकांच्या डोळ्यात अश्रू आणू शकत असशील, तर हे दर्शवते की तू खरोखरच देवावर प्रेम करणारा आहेस, कारण तू देवावर प्रेम करण्याची साक्ष देऊ शकतोस व तुझ्याद्वारे, देवाच्या कृती साक्षीमध्ये दाखवल्या जाऊ शकतात. तुझ्या साक्षीने, इतरांना देवाचे कार्य शोधण्यासाठी, देवाच्या कार्याचा अनुभव घेण्यासाठी तयार केले जाते आणि त्यांनी ते कोणत्याही परिस्थितीत अनुभवले तरी ते खंबीरपणे उभे राहू शकतात. साक्ष देण्याचा हा एकमेव खरा मार्ग आहे व आता तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. तू हे लक्षात घेतले पाहिजेस, की देवाचे कार्य अत्यंत मौल्यवान आणि लोकांद्वारे जपून ठेवण्यासारखे आहे, देव इतका मौल्यवान व विपुल आहे; तो बोलू शकतो आणि लोकांचा न्यायदेखील करू शकतो, त्यांची अंतःकरणे सुधारू शकतो, त्यांना आनंद देऊ शकतो, त्यांना प्राप्त करू शकतो, त्यांच्यावर विजय मिळवू शकतो व त्यांना परिपूर्ण करू शकतो. अनुभवावरून तुला दिसेल, की देव खूप प्रेमळ आहे. मग आता तुझे देवावर किती प्रेम आहे? या गोष्टी तू मनापासून सांगू शकतोस का? जेव्हा तू हे शब्द तुझ्या हृदयातून तळमळीने व्यक्त करण्यास समर्थ होशील, तेव्हा तू साक्ष देऊ शकशील. तुझा अनुभव या पातळीवर पोहोचल्यानंतर तू देवाचा साक्षीदार होण्यास सक्षम होशील आणि पात्र होशील. जर तू तुझ्या अनुभवात या पातळीपर्यंत पोहोचला नाहीस, तर तू अजूनही खूप दूर असशील. परिष्करण प्रक्रियेदरम्यान लोकांमध्ये कमकुवतपणा दिसून येणे सामान्य आहे, परंतु परिष्करणानंतर तू असे म्हणण्यास सक्षम असले पाहिजेस: “देवाच्या कार्यात खूप शहाणपण आहे!” जर तू खरोखरच या शब्दांची व्यावहारिक समज प्राप्त करण्यास सक्षम असशील, तर ते तुला आवडते असे काहीतरी होईल व तुझ्या अनुभवाचे मूल्य असेल.
आता तू कशाचा पाठपुरावा केला पाहिजेस? तू देवाच्या कार्यासाठी साक्ष देण्यास सक्षम आहेस की नाही, तू देवाची साक्ष आणि प्रकटीकरण बनण्यास सक्षम आहेस की नाही व त्याच्याद्वारे वापरण्यास योग्य आहेस की नाही—या गोष्टींचा तू पाठपुरावा केला पाहिजेस. देवाने तुझ्यामध्ये खरोखर किती कार्य केले आहे? तू किती पाहिलेस, किती स्पर्श केला आहेस? तू किती अनुभवले आहेस आणि चव घेतली आहेस? देवाने तुझी परीक्षा घेतली तरी, तुला ठरावीक परिस्थितींना सामोरे जावे लागले तरी किंवा तुला शिस्त लावली तरी, त्याच्या कृती व त्याचे कार्य तुझ्यावर पार पाडले गेले आहे. परंतु देवावर विश्वास ठेवणारी आणि त्याच्याद्वारे परिपूर्ण होण्याचा पाठपुरावा करण्यास इच्छुक असलेली व्यक्ती म्हणून, तू तुझ्या व्यावहारिक अनुभवाच्या आधारावर देवाच्या कार्याची साक्ष देण्यास सक्षम आहेस का? व्यावहारिक अनुभवातून तू देवाचे वचन जगू शकतोस का? तू तुझ्या स्वतःच्या व्यावहारिक अनुभवातून इतरांना पुरवू शकतोस का व देवाच्या कार्याची साक्ष देण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवू शकतोस का? देवाच्या कार्याची साक्ष देण्यासाठी, तू तुझ्या अनुभवावर, ज्ञानावर आणि तू दिलेली किंमत यावर विश्वास ठेवला पाहिजेस. केवळ अशा प्रकारे तू त्याची इच्छा पूर्ण करू शकतोस. तू देवाच्या कार्याची साक्ष देणारा आहेस का? तुझी ही आकांक्षा आहे का? जर तू त्याच्या नावाची आणि त्याहूनही अधिक, त्याच्या कार्याची साक्ष देण्यास सक्षम असशील व त्याच्या लोकांकडून त्याला अपेक्षित असलेली प्रतिमा जगू शकत असशील, तर तू देवाचा साक्षीदार आहेस. तू देवासाठी साक्ष खरोखर कशी देतोस? तू देवाचे वचन जगण्याची इच्छा आणि आकांक्षा बाळगून व तुझ्या शब्दांद्वारे साक्ष देऊन, लोकांना त्याचे कार्य जाणून घेण्यास आणि त्याच्या कृती पाहण्यास अनुमती देऊन ते करतोस. जर तू खरोखरच या सर्वांचा पाठपुरावा केलास, तर देव तुला परिपूर्ण करेल. जर तू फक्त देवाकडून परिपूर्ण होण्याचा आणि शेवटी आशीर्वाद मिळवण्याचा पाठपुरावा करत असशील, तर तुझा देवावरील विश्वासाचा दृष्टिकोन शुद्ध नाही. वास्तविक जीवनात देवाची कृत्ये कशी पहावीत, जेव्हा तो तुझ्यासमोर त्याची इच्छा प्रकट करतो तेव्हा त्याचे समाधान कसे करावे आणि त्याच्या अद्भुततेची व शहाणपणाची तू साक्ष कशी द्यावी आणि तो कसा शिस्त लावतो व तुझ्याशी कसा वागतो याची साक्ष कशी द्यावी, याचा तू पाठपुरावा केला पाहिजेस. या सर्व गोष्टी तू आता विचारात घेतल्या पाहिजेस. जर तुझे देवावरचे प्रेम केवळ यासाठी असेल, की त्याने परिपूर्ण केल्यानंतर तू देवाच्या गौरवात सहभागी होशील, तर ते अजूनही अपुरे आहे आणि देवाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तू देवाच्या कार्याची साक्ष देण्यास, त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास व त्याने लोकांवर केलेल्या कार्याचा व्यावहारिक मार्गाने अनुभव घेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. वेदना असोत, अश्रू असोत किंवा दुःख असो, आचरणात या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. ते तुला देवासाठी साक्ष देणारे म्हणून परिपूर्ण करण्यासाठी आहेत. हे नक्की काय आहे जे आता दुःख सहन करण्यास आणि परिपूर्णता मिळवण्यास भाग पाडते? सध्याचे दु:ख खरोखरच देवावर प्रेम करण्यासाठी व त्याच्यासाठी साक्ष देण्यासाठी आहे का? की देहाच्या आशीर्वादासाठी, भविष्यातील योजनांसाठी आणि नशिबासाठी आहे? तुझे सर्व हेतू, प्रेरणा व पाठपुरावा करत असलेली ध्येये दुरुस्त करणे आवश्यक आहे आणि ते तुझ्या स्वतःच्या इच्छेने मार्गदर्शित होऊ शकत नाही. जर एखादी व्यक्ती आशीर्वाद मिळवण्यासाठी व सत्तेवर राज्य करण्यासाठी परिपूर्णतेचा पाठपुरावा करत असेल आणि दुसरी व्यक्ती देवाला संतुष्ट करण्यासाठी, देवाच्या कार्याची व्यावहारिक साक्ष देण्यासाठी परिपूर्णतेचा पाठपुरावा करत असेल, तर तू दोन मार्गांपैकी कोणता निवडशील? जर तू पहिली निवड केली असेल, तर तू अजूनही देवाच्या मानकांपासून खूप दूर आहेस. मी एकदा सांगितले होते, की माझी कृती संपूर्ण विश्वात उघडपणे ओळखली जाईल आणि मी विश्वात राजा म्हणून राज्य करेन. दुसरीकडे, तुम्हाला जे सोपवण्यात आले आहे ते देवाच्या कार्याची साक्ष देण्यासाठी बाहेर जाणे आहे, राजा बनणे व संपूर्ण विश्वासमोर येणे नाही. देवाच्या कृत्यांनी ब्रह्मांड आणि आकाश भरू द्या. सर्वांना त्याला पाहू द्या आणि त्याला मान्यता देऊ द्या. हे शब्द स्वतः देवाच्या संबंधात बोलले जातात आणि मनुष्याने जे केले पाहिजे ते म्हणजे देवासाठी साक्ष दिली पाहिजे. तुला आता देवाबद्दल किती माहिती आहे? तू देवाची किती साक्ष देऊ शकतोस? मनुष्याला परिपूर्ण करण्याचा देवाचा उद्देश काय आहे? तुला देवाची इच्छा समजल्यानंतर तू त्याच्या इच्छेकडे कसे लक्ष द्यावे? जर तू परिपूर्ण होऊ इच्छित असशील आणि तू जे जगतोस त्याद्वारे देवाच्या कार्याची साक्ष द्यायला तयार असशील, जर तुझ्याकडे ही प्रेरक शक्ती असेल, तर काहीही कठीण नाही. लोकांना आता श्रद्धेची गरज आहे. जर तुझ्याकडे ही प्रेरक शक्ती असेल, तर कोणतीही नकारात्मकता, निष्क्रीयपणा, आळशीपणा व देहाच्या धारणा, जगण्याचे तत्त्वज्ञान, बंडखोर प्रवृत्ती, भावना आणि इतर गोष्टी सोडून देणे सोपे आहे.
कसोट्यांना सामोरे जात असताना, लोकांनी दुर्बल असणे किंवा त्यांच्यात नकारात्मकता असणे अथवा देवाच्या इच्छेबद्दल किंवा त्यांच्या आचरणाच्या मार्गाबद्दल स्पष्टता नसणे हे सामान्य आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत, तुझी देवाच्या कार्यावर श्रद्धा असली पाहिजे आणि ईयोबाप्रमाणेच देवाला नाकारू नये. जरी ईयोब अशक्त होता व त्याच्या स्वतःच्या जन्माच्या दिवशी त्याला शाप देण्यात आला होता, तरीसुद्धा त्याने हे नाकारले नाही की मानवी जीवनातील सर्व गोष्टी यहोवाने बहाल केल्या आहेत आणि त्या सर्वांना घेऊन जाणारादेखील यहोवा आहे. त्याची कशीही परीक्षा घेतली गेली तरी त्याने हा विश्वास कायम ठेवला. तुझ्या अनुभवानुसार, देवाच्या वचनांमार्फत तुला कितीही परिष्कृत केले तरीही, देव मानवजातीकडून काय अपेक्षा करतो, तर थोडक्यात, त्यांचा विश्वास आणि त्यांचे प्रेम. अशा प्रकारे काम करून तो जे परिपूर्ण करतो ते म्हणजे लोकांची श्रद्धा, प्रेम व आकांक्षा. देव लोकांवर परिपूर्णतेचे कार्य करतो व लोक ते पाहू शकत नाहीत, अनुभवू शकत नाहीत; अशा परिस्थितीत तुझ्या ठायी श्रद्धा असणे आवश्यक आहे. जेव्हा एखादी गोष्ट उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही तेव्हा लोकांची श्रद्धा आवश्यक असते आणि जेव्हा तू तुझ्या स्वतःच्या धारणा सोडू शकत नाहीस तेव्हा तुझी श्रद्धा आवश्यक असते. जेव्हा तुला देवाच्या कार्याबद्दल स्पष्टता नसते, तेव्हा तुझ्याकडे श्रद्धा असणे आणि तू ठाम भूमिका घेणे व साक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा ईयोब या टप्प्यावर पोहोचला तेव्हा देवाने त्याला दर्शन दिले आणि तो त्याच्याशी बोलला. म्हणजेच तुझ्या श्रद्धेतूनच तू देवाला पाहू शकशील व जेव्हा तुझी अंतःकरणातून श्रद्धा असेल तेव्हा देव तुला परिपूर्ण करेल. श्रद्धेशिवाय, तो हे करू शकत नाही. तुला जे काही मिळवण्याची आशा आहे ते देव तुला देईल. जर तुझ्या ठायी श्रद्धा नसेल, तर तू परिपूर्ण होऊ शकत नाहीस आणि तुम्ही देवाच्या कृती पाहण्यास असमर्थ असशील, त्याची सर्वशक्तिमानता पाहणे तर दूरच. जेव्हा तुझ्या ठायी श्रद्धा असते, की तुला तुझ्या व्यावहारिक अनुभवात त्याची कृती दिसेल, तेव्हा देव तुझ्यासमोर प्रकट होईल आणि तो तुला अंतःकरणातून ज्ञान देईल व मार्गदर्शन करेल. त्या श्रद्धेशिवाय, देव ते करू शकत नाही. जर तू देवावरील आशा गमावली असशील, तर तू त्याचे कार्य कसे अनुभवू शकशील? म्हणूनच, जेव्हा तुझ्या ठायी श्रद्धा असते व तू देवाविषयी शंका बाळगत नाहीस, त्याने काहीही केले तरीही तुझी त्याच्यावर श्रद्धा असते, तेव्हाच तो तुझ्या अनुभवांद्वारे तुला ज्ञान आणि प्रकाश देईल व तेव्हाच तू त्याच्या कृती पाहू शकशील. या सर्व गोष्टी श्रद्धेने साध्य होतात. श्रद्धा केवळ परिष्करणातूनच येते आणि परिष्करणाच्या अनुपस्थितीत, श्रद्धा निर्माण होऊ शकत नाही. “श्रद्धा” हा शब्द काय सूचित करतो? जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट पाहू किंवा तिला स्पर्श करू शकत नाही, जेव्हा देवाचे कार्य मानवी धारणांशी जुळत नाही, जेव्हा ते मानवी आवाक्याबाहेर असते, तेव्हा श्रद्धा हा असा खरा विश्वास व प्रामाणिक हृदय मनुष्याकडे असले पाहिजे. मी याच श्रद्धेबद्दल बोलत आहे. लोकांना कष्टाच्या आणि परिष्करणाच्या काळात श्रद्धेची गरज असते व श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी परिष्करणानंतर येते; परिष्करण आणि श्रद्धा वेगळे केले जाऊ शकत नाही. देवाने कसेही कार्य केले तरी व परिस्थिती काहीही असली तरी, तू जीवनाचा पाठपुरावा करू शकतोस आणि सत्याचा शोध घेऊ शकतोस व देवाच्या कार्याचे ज्ञान मिळवू शकतोस आणि त्याच्या कृतींचे आकलन करू शकतोस व सत्यानुसार कार्य करू शकता. असे करणे म्हणजे खरी श्रद्धा असणे आहे आणि असे केल्याने हे दिसून येते की तुझी देवावरील श्रद्धा कमी झालेली नाही. जर तू परिष्करणाद्वारे सत्याचा पाठपुरावा करत राहण्यास सक्षम असशील, जर तू देवावर खरोखर प्रेम करू शकत असशील व त्याच्याबद्दल शंका घेत नसशील, त्याने काहीही केले तरी तू त्याला संतुष्ट करण्यासाठी सत्य आचरणात आणत असशील आणि जर तू त्याच्या इच्छेसाठी खोलवर जाऊन पाठपुरावा करण्यास सक्षम असशील व त्याच्या इच्छेचा विचार करत असशील, तरच देवावर तुझी खरी श्रद्धा असू शकते. भूतकाळात, जेव्हा देव म्हणाला, की तू राजा म्हणून राज्य करशील, तेव्हा तू त्याच्यावर प्रेम केलेस आणि जेव्हा त्याने उघडपणे तुला दर्शन दिले, तेव्हा तू त्याचा शोध घेतलास. पण, आता देव लपलेला आहे, तू त्याला पाहू शकत नाहीस व तुझ्यावर संकटे आली आहेत—मग आता तू देवाबद्दलची आशा गमावलीस का? म्हणूनच, तू नेहमी जीवनाचा पाठपुरावा केला पाहिजेस व देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजेस. याला खरी श्रद्धा म्हणतात आणि हेच सर्वात खरे व सुंदर प्रकारचे प्रेम आहे.
भूतकाळात, सर्व लोक त्यांचे संकल्प करण्यासाठी देवासमोर येत असत आणि ते म्हणत: “जरी इतर कोणीही देवावर प्रेम करत नसले तरी, मी त्याच्यावर प्रेम केले पाहिजे.” पण आता, परिष्करण तुझ्यावर येते व हे तुझ्या धारणांशी जुळत नसल्यामुळे, तुझी देवावरील श्रद्धा कमी होते. हे खरे प्रेम आहे का? तू ईयोबाच्या कृत्यांबद्दल पुष्कळ वेळा वाचले आहेस—तू त्याबद्दल विसरलास का? खरे प्रेम केवळ अंतःकरणातील श्रद्धेतूनच आकार घेऊ शकते. तू करत असलेल्या परिष्करणांद्वारे तुझ्यामध्ये देवाविषयी खरे प्रेम उत्पन्न होते आणि श्रद्धेद्वारेच तू तुझ्या व्यावहारिक अनुभवांमध्ये देवाच्या इच्छेचा विचार करू शकतोस व श्रद्धेद्वारेच तू तुझा स्वतःचा देह त्यागून जीवनाचा पाठपुरावा करतोस; लोकांनी हेच केले पाहिजे. जर तू असे केलेस तर तू देवाच्या कृती पाहण्यास सक्षम असशील, परंतु जर तुझ्यात श्रद्धेची कमतरता असेल, तर तू देवाच्या कृती पाहू शकणार नाहीस किंवा त्याचे कार्य अनुभवू शकणार नाहीस. जर देवाने तुला वापरावे आणि परिपूर्ण बनवावे असे तुला वाटत असेल, तर तुझ्याकडे हे सर्वकाही असले पाहिजे: दुःख सहन करण्याची इच्छा, श्रद्धा, सहनशीलता, आज्ञाधारकता व देवाचे कार्य अनुभवण्याची, त्याची इच्छा समजून घेण्याची, त्याच्या दुःखाचा विचार करण्याची आणि बरेच काही करण्याची क्षमता असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला परिपूर्ण करणे सोपे नाही आणि अनुभवलेल्या प्रत्येक परिष्करणासाठी तुझ्या ठायी श्रद्धा व प्रेम असणे आवश्यक आहे. जर देवाकडून परिपूर्ण व्हायचे असेल, तर मार्गावर नुसती धावपळ करणे पुरेसे नाही किंवा केवळ देवासाठी स्वतःला खर्च करणेदेखील पुरेसे नाही. देवाकडून परिपूर्ण केली जाणारी व्यक्ती बनण्यासाठी तुमच्याकडे अनेक गोष्टी असणे आवश्यक आहे. जेव्हा दुःखाचा सामना करावा लागतो, तेव्हा तू देहाची चिंता बाजूला ठेवण्यास आणि देवाविरुद्ध तक्रार न करण्यास सक्षम असले पाहिजेस. जेव्हा देव स्वतःला तुझ्यापासून लपवून ठेवतोस, तेव्हा पूर्वीचे प्रेम कमी किंवा नष्ट होऊ न देता ते टिकवून ठेवण्यासाठी, त्याचे अनुसरण करण्याकरिता तुझ्या ठायी श्रद्धा असणे गरजेचे आहे. देवाने काहीही केले तरी, तू त्याच्या रचनेला अधीन राहून, त्याच्याविरुद्ध तक्रारी करण्याऐवजी स्वतःच्या देहाला शाप देण्यास तयार असले पाहिजेस. जरी तू खूप रडत असशील अथवा एखाद्या प्रिय वस्तूपासून विभक्त होण्यास नाखूष असशील तरीही, जेव्हा कसोट्यांचा सामना करावा लागतो तेव्हा देवाला संतुष्ट केले पाहिजे. फक्त हेच खरे प्रेम आणि श्रद्धा आहे. तुझी खरी पातळी कितीही असली तरी, तुझ्यात प्रथम कष्ट सोसण्याची इच्छा व खरी श्रद्धा या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे आणि देहाचा त्याग करण्याची इच्छादेखील असली पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक त्रास सहन करण्यास व वैयक्तिक हितसंबंधांचे नुकसान सहन करण्यास तयार असले पाहिजे. हृदयात स्वतःबद्दल पश्चात्ताप करण्यास सक्षम असले पाहिजे: पूर्वी तू देवाला संतुष्ट करू शकत नव्हतास आणि आता तू स्वतःबद्दल पश्चात्ताप करू शकतोस. यापैकी कशातही अपुरे पडू नये—या गोष्टींद्वारेच देव तुला परिपूर्ण करेल. जर तू हे निकष पूर्ण करू शकत नसशील, तर तू परिपूर्ण होऊ शकत नाहीस.
जो कोणी देवाची सेवा करतो त्याला त्याच्यासाठी दुःख कसे सहन करावे हे माहीत असले पाहिजे; त्याहूनही अधिक, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की देवावर विश्वास ठेवण्याचा उद्देश देवाच्या प्रेमाचा पाठपुरावा करणे हा आहे. देव तुझा उपयोग फक्त तुझ्या परिष्करणासाठी किंवा तुला त्रास देण्यासाठी करत नाही, तर तो तुझा वापर करतो जेणेकरून, तुला त्याच्या कृती कळतील, मानवी जीवनाचे खरे महत्त्व कळेल आणि विशेषतः देवाची सेवा करणे सोपे काम नाही हे तुला कळेल. देवाचे कार्य अनुभवणे म्हणजे कृपेचा आनंद घेणे नव्हे, तर त्याच्यावरील प्रेमासाठी दुःख सहन करणे आहे. तू देवाच्या कृपेचा आनंद घेत असल्याने, त्याच्या ताडणाचाही आनंद घेतला पाहिजेस; हे सर्व अनुभवले पाहिजेस. तू तुझ्यामध्ये देवाचे ज्ञान अनुभवू शकतोस आणि तो तुझ्याशी कसा वागतो व तुझा न्याय कसा करतो हेदेखील तू अनुभवू शकतोस. अशा प्रकारे, तुझा अनुभव सर्वसमावेशक असेल. देवाने त्याचे न्यायाचे आणि ताडणाचे कार्य तुझ्यावर पार पाडले आहे. तू देवाच्या वचनांना सामोरा गेला आहेस, परंतु इतकेच नाही; त्याने तुला प्रबुद्ध व प्रकाशित केले आहे. जेव्हा तू नकारात्मक आणि कमकुवत असतोस, तेव्हा देव तुझी काळजी करतो. हे सर्व कार्य तुला हे समजावे, यासाठी आहे की मनुष्याविषयी सर्व काही देवाच्या नियोजनानुसार आहे. तुला वाटेल, की देवावर विश्वास ठेवणे म्हणजे दुःख सहन करणे किंवा त्याच्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी करणे आहे; तुला असे वाटेल की देवावर विश्वास ठेवण्याचा उद्देश हा आहे की देहाला शांती मिळावी अथवा जीवनातील सर्व काही सुरळीत चालावे किंवा सर्व गोष्टींमध्ये सोय आणि आराम मिळावा. तथापि, यापैकी कोणताही उद्देश लोकांनी देवावरील त्यांच्या विश्वासाला जोडण्यायोग्य नाही. जर तू या हेतूंसाठी विश्वास ठेवत असशील, तर तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे आणि तू परिपूर्ण होणे केवळ अशक्य आहे. देवाची कृती, देवाची नीतिमान प्रवृत्ती, त्याचे शहाणपण, त्याची वचने व त्याचे चमत्कार आणि अथांगपणा या सर्व गोष्टी लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत. हे समजून घेतल्यास, तू ते सर्व वैयक्तिक मागण्या, आशा आणि धारणांपासून मुक्त करण्यासाठी वापरावे. या गोष्टी दूर करूनच तू देवाने घातलेल्या अटी पूर्ण करू शकतोस व असे केल्यानेच तुला जीवन मिळू शकते आणि देवाला संतुष्ट करता येऊ शकते. देवावर विश्वास ठेवण्याचा उद्देश त्याला संतुष्ट करणे व त्याला अपेक्षित असलेल्या प्रवृत्तीनुसार जगणे हा आहे जेणेकरून, अयोग्य लोकांच्या या समुहामधून त्याची कृती आणि गौरव प्रकट होईल. देवावर विश्वास ठेवण्याचा हाच योग्य दृष्टिकोन आहे आणि याच ध्येयाचा तू पाठपुरावा केला पाहिजेस. देवावर विश्वास ठेवण्याबद्दल दृष्टिकोन योग्य असला पाहिजे व देवाची वचने प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करणे आवश्यक आहे व सत्य जगता आले पाहिजे व विशेषतः त्याची व्यावहारिक कृत्ये, संपूर्ण विश्वातील त्याची अद्भुत कृत्ये, तसेच तो जे व्यावहारिक कार्य करतो ते पाहण्यास सक्षम असले पाहिजे. लोक त्यांच्या व्यावहारिक अनुभवांद्वारे, देव त्यांच्यावर त्याचे कार्य कसे करतो आणि त्यांच्यासाठी त्याची इच्छा काय आहे याची प्रशंसा करू शकतात. या सर्वांचा उद्देश लोकांची भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती नष्ट करणे हा आहे. तुझ्यातील सर्व मलीनता व अनीति बाहेर टाकून, तुझा चुकीचा हेतू काढून टाकून आणि देवावर खरी श्रद्धा निर्माण करून—केवळ खर्या श्रद्धेनेच देवावर खरे प्रेम करू शकतोस. देवावरील विश्वासाच्या पायावरच त्याच्यावर खरे प्रेम करता येते. देवावर विश्वास न ठेवता त्याच्यावर प्रेम करता येईल का? तुझा देवावर विश्वास असल्याने तू त्याबद्दल गोंधळ करू शकत नाहीस. देवावरील श्रद्धेमुळे आशीर्वाद मिळेल हे पाहताच काही लोक जोमाने भरलेले असतात, परंतु परिष्करण भोगावे लागते हे पाहताच ते सर्व शक्ती गमावतात. हे देवावर विश्वास ठेवणे आहे का? शेवटी, श्रद्धेमध्ये देवासमोर अखंड आणि पूर्ण आज्ञाधारकता प्राप्त केली पाहिजे. तुझा देवावर विश्वास आहे पण तरीही तुझ्या त्याच्याकडे मागण्या आहेत, अनेक धार्मिक धारणा आहेत ज्या तू सोडू शकत नाहीस, वैयक्तिक हितसंबंध सोडू शकत नाहीस व तरीही तू देहाचा आशीर्वाद शोधतोस आणि देवाने तुझ्या देहाची सुटका करावी, तुझ्या आत्म्याला वाचवावे असे तुला वाटते—हे सर्व वर्तन चुकीचा दृष्टिकोन असलेल्या लोकांचे आहे. धार्मिक मत असलेल्या लोकांचा देवावर विश्वास असला, तरी ते त्यांच्या प्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि देवाच्या ज्ञानाचा पाठपुरावा करत नाहीत, तर केवळ त्यांच्या देहाचे हित शोधतात. तुमच्यापैकी पुष्कळ लोकांची अशी श्रद्धा आहे जी धार्मिक श्रद्धांच्या श्रेणीतील आहेत; ही देवावरची खरी श्रद्धा नाही. देवावर विश्वास ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी दुःख सहन करण्यास तयार असलेले हृदय आणि स्वतःचा त्याग करण्याची इच्छा लोकांकडे असणे आवश्यक आहे. जोपर्यंत लोक या दोन अटी पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत त्यांचा देवावरील विश्वास वैध नाही व ते त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवू शकणार नाहीत. केवळ जे लोक खऱ्या अर्थाने सत्याचा पाठपुरावा करतात, देवाचे ज्ञान शोधतात आणि जीवनाचा पाठपुरावा करतात तेच लोक देवावर खरोखर विश्वास ठेवतात.
जेव्हा तुला कसोट्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा तू त्या कसोट्यांना हाताळण्यासाठी देवाचे कार्य कसे लागू करशील? तू नकारात्मक होशील की देवाची कसोटी आणि मनुष्याचे परिष्करण सकारात्मक पैलूतून समजून घेशील? देवाच्या कसोट्या व परिष्करणांमधून तुला काय मिळणार आहे? देवावरील तुझे प्रेम वाढेल का? जेव्हा तू परिष्करणाच्या अधीन असशील, तेव्हा तू ईयोबाच्या कसोट्या लागू करू शकशील का आणि देव तुझ्यामध्ये करत असलेल्या कार्यात मनापासून सहभागी होशील का? ईयोबाच्या कसोट्यांद्वारे देव मनुष्याची कशी परीक्षा घेतो ते तू पाहू शकतोस का? ईयोबाच्या कसोट्यांमुळे तुला कोणत्या प्रकारची प्रेरणा मिळू शकते? तू तुझ्या परिष्करणांमध्ये देवासाठी साक्षीदार होण्यास तयार असशील का की तुला आरामदायी वातावरणात देह तृप्त करायचा असेल? देवावरील विश्वासाबद्दल तुझा खरोखर काय दृष्टिकोन आहे? तो खरोखर देहासाठी नसून त्याच्यासाठी आहे का? खरोखर असे एखादे लक्ष्य आहे का ज्याचा तू पाठपुरावा करत आहेसत? तू परिष्करण करण्यास तयार आहेस का जेणेकरून, तू देवाद्वारे परिपूर्ण होशील किंवा त्याऐवजी तू देवाकडून ताडण व शाप स्वीकारालशील? देवासाठी साक्ष देण्याच्या बाबतीत तुझा खरोखर काय दृष्टिकोन आहे? देवाची खरी साक्ष देण्यासाठी काही विशिष्ट वातावरणात लोकांनी काय केले पाहिजे? व्यावहारिक देवाने त्याच्या तुझ्यामधील प्रत्यक्ष कार्यात खूप काही प्रकट केले आहे, तर तुला नेहमी सोडून जाण्याचा विचार का येतो? तुझा देवावरील विश्वास देवासाठी आहे का? तुमच्यापैकी बहुतेकांसाठी, तुमचा विश्वास हा तुमच्या स्वतःच्या वतीने, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठीच्या डावपेचांचा भाग आहे. फार कमी लोक देवाला देवासाठी मानतात; ही बंडखोरी नाही का?
परिष्करणाच्या कार्याचा उद्देश हा प्रामुख्याने लोकांची श्रद्धा परिपूर्ण करणे हा आहे. शेवटी, जे साध्य होते ते तुला सोडायचे असते परंतु, त्याच वेळी, तू तसे करू शकत नाहीस; काही लोकांसाठी किंचितही आशेचा किरण नसला तरीही ते श्रद्धा ठेवण्यास सक्षम असतात; आणि लोकांना यापुढे त्यांच्या स्वतःच्या भविष्यातील गोष्टींबद्दल अजिबात आशा नसते. केवळ याच वेळी देवाचे परिष्करण पूर्ण होईल. माणूस अजूनही जीवन व मृत्यू यांच्यामध्ये घिरट्या घालण्याच्या टप्प्यावर पोहोचलेला नाही आणि त्यांनी मृत्यूची चव चाखलेली नाही, त्यामुळे परिष्करणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सेवेकऱ्यांच्या पायरीवर असणार्यांचेही फारसे परिष्करण झालेले नाही. ईयोब कमालीच्या परिष्करणातून पार पडला आणि त्याला अवलंबून राहण्यासारखे काहीही उरले नव्हते. लोकांनी एवढ्या परिष्करणातून पार पडणे आवश्यक आहे की त्यांना कोणतीही आशा उरणार नाही आणि ज्यावर विसंबून राहावे असे काहीही उरणार नाही—फक्त हेच खरे परिष्करण आहे. सेवेकऱ्यांच्या काळात, जर तुझे हृदय देवासमोर नेहमी शांत असेल आणि जर त्याने काहीही केले व तुझ्यासाठी त्याची इच्छा काहीही असली तरीही, तू नेहमी त्याच्या व्यवस्थापनांचे पालन केलेस, तर शेवटी देवाने जे काही केले ते तू समजून घेशील. तू ईयोबाच्या कसोट्यांना सामोरे जातोस आणि त्याच वेळी पेत्राच्या कसोट्यांनादेखील सामोरे जातोस. ईयोबाची कसोटी घेतली गेली तेव्हा तो साक्षीला उभा राहिला व शेवटी, यहोवा त्याच्यासमोर प्रकट झाला. तो साक्षीदार झाल्यावरच तो देवाचा चेहरा पाहण्यास पात्र ठरला. असे का म्हटले आहे: “मी घाणेरड्या देशापासून लपतो पण पवित्र राज्यासमोर प्रकट होतो”? याचा अर्थ असा आहे, की जेव्हा तू पवित्र असशील व साक्षीदार असशील, तेव्हाच तुला देवाचा चेहरा पाहण्याची प्रतिष्ठा मिळेल. जर तू त्याच्यासाठी साक्षीदार राहू शकत नसशील, तर तुला त्याचा चेहरा पाहण्याची प्रतिष्ठा लाभणार नाही. जर तू परिष्करणांना तोंड देत असताना माघार घेतलीस किंवा देवाविरुद्ध तक्रारी केल्यास आणि त्यामुळे त्याच्यासाठी साक्षीदार राहण्यात अयशस्वी झालास आणि सैतानाच्या चेष्टेचा विषय बनलास, तर तुला देवाचे दर्शन लाभणार नाही. जर तू ईयोबासारखा असशील, ज्याने कसोट्यांच्या वेळी स्वतःच्या शरीराला शाप दिला व देवाविरुद्ध तक्रार केली नाही आणि त्याच्या वचनांद्वारे तक्रार किंवा पाप न करता स्वतःच्या देहाचा तिरस्कार करू शकला, तर तू साक्षीदार होशील. जेव्हा तू एका विशिष्ट प्रमाणात परिष्करण करतोस व तरीही तू ईयोबासारखे असू शकतोस, देवासमोर पूर्णपणे आज्ञाधारक असू शकतोस, त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नाहीस अथवा स्वतःच्या धारणा बाळगत नाहीस, तेव्हा देव तुझ्यासमोर प्रकट होईल. आता देव तुला दिसत नाही कारण तुझ्या स्वतःच्या अनेक धारणा, वैयक्तिक पूर्वग्रह, स्वार्थी विचार, वैयक्तिक गरजा आणि दैहिक हितसंबंध आहेत व तू त्याचा चेहरा पाहण्यास पात्र नाहीस. जर तू देवाला पाहिलेस तर तू त्याला तुझ्या स्वतःच्या धारणांनुसार जोखशील आणि असे करताना, तो तुझ्याद्वारे वधस्तंभावर खिळला जाईल. जर तुझ्यावर अनेक गोष्टी आल्या ज्या तुझ्या धारणांशी जुळत नाहीत, पण तरीही तू त्या बाजूला ठेवू शकलास आणि या गोष्टींमधून देवाच्या कृतींचे ज्ञान मिळवू शकलास व परिष्करणांच्या दरम्यान तू तुझे देवावरील प्रेमाने भरलेले अंतःकरण प्रकट केलेस, तर हे साक्ष देणे आहे. जर तुझे घर शांततापूर्ण असेल, तू दैहिक सुखांचा उपभोग घेत असशील, कोणीही तुझा छळ करत नसेल व चर्चमधील तुझे भाऊ आणि बहिणी तुझी आज्ञा पाळत असतील, तर तू तुझे देवावरील प्रेमाने भरलेले अंतःकरण प्रदर्शित करू शकतोस का? ही परिस्थिती तुला परिष्कृत करू शकते का? केवळ परिष्करणाद्वारेच तुझे देवावरील प्रेम दाखवता येते व तुझ्या धारणांशी जुळत नसलेल्या गोष्टींद्वारेच तू परिपूर्ण होऊ शकतोस. अनेक विपरीत व नकारात्मक गोष्टींमुळे आणि सैतानाच्या सर्व प्रकारच्या प्रकटीकरणांचा उपयोग करून—त्याच्या कृती, त्याचे आरोप, त्याचा त्रास व फसवणूक—देव तुला सैतानाचा भयंकर चेहरा स्पष्टपणे दाखवतो आणि त्याद्वारे सैतानाला ओळखण्याची तुझी क्षमता पूर्ण करतो जेणेकरून, तुम्ही सैतानाचा द्वेष कराल व त्याचा त्याग कराल.
तुला आलेले अपयश, कमकुवतपणा, नकारात्मकता यांचे अनेक अनुभव, या सर्व गोष्टी म्हणजे देवाच्या कसोट्या आहेत असे म्हणता येईल. कारण हे सर्व काही देवाकडून येते आणि सर्व गोष्टी व घटना त्याच्या हातात असतात. तू अयशस्वी असशील किंवा कमकुवत असशील आणि अडखळलास तरी, हे सर्व देवावर अवलंबून आहे व त्याला त्याची समज आहे. देवाच्या दृष्टिकोनातून, ही तुझी एक कसोटी आहे व जर तू ते ओळखू शकत नसशील, तर तो मोह ठरेल. लोकांनी दोन प्रकारच्या स्थिती ओळखल्या पाहिजेत: एक पवित्र आत्म्याकडून येते आणि दुसरीचा संभाव्य स्रोत सैतान आहे. एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये पवित्र आत्मा तुला प्रकाशित करतो व तुला स्वतःला जाणून घेण्यास, स्वतःबद्दल तिरस्कार आणि खेद वाटू देण्यास व देवावर खरे प्रेम करण्यास, त्याला संतुष्ट करण्यावर तुझे हृदय केंद्रित करण्यास सक्षम करतो. दुसरी अशी स्थिती आहे ज्यामध्ये तू स्वतःला ओळखतोस, परंतु तू नकारात्मक आणि कमकुवत असतोस. असे म्हटले जाऊ शकते, की ही स्थिती देवाचे परिष्करण आहे व ते सैतानाचे प्रलोभनदेखील आहे. जर तू ओळखलेस, की हे देवाचे तुझे तारण आहे व जर तुला असे वाटत असेल, की तू आता त्याच्या ऋणात बुडलेला आहेस आणि आतापासून तू त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न केलास व यापुढे अशा वंचिततेत पडला नाहीस, जर तू त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्याचा प्रयत्न केलास व जर तू स्वतःला नेहमी कमी समजत असशील आणि तुझ्या हृदयात तळमळ असेल, तर ही देवाची कसोटी आहे. दु:ख संपल्यानंतर आणि पुन्हा एकदा पुढे जात असताना, देव तुला मार्गदर्शन करेल, प्रकाश देईल, ज्ञानप्राप्ती देईल व तुझे पोषण करेल. परंतु जर तू ते ओळखत नसशील आणि नकारात्मक असशील, स्वतःला फक्त निराशेमध्ये झोकून दिलेस, जर तू असा विचार केलास, तर सैतानाचे प्रलोभन तुझ्यावर कोसळेल. ईयोबाने कसोट्यांचा सामना केला, तेव्हा देव आणि सैतान एकमेकांशी पैज लावत होते व देवाने सैतानाला ईयोबाला त्रास देऊ दिला. देवाने ईयोबाची परीक्षा घेतली असली तरी, प्रत्यक्षात सैतानच त्याच्यावर आला होता. सैतानासाठी, हे ईयोबाला मोहात पाडणारे होते, परंतु ईयोब देवाच्या बाजूने होता. तसे नसते, तर ईयोब मोहाला बळी पडला असता. लोक मोहाला बळी पडताच संकटात सापडतात. परिष्करणातून पार पडणे म्हणजे देवाने घेतलेली चाचणी आहे असे म्हटले जाऊ शकते, परंतु जर तू चांगल्या स्थितीत नसशील तर ते सैतानाकडून आलेले प्रलोभन म्हटले जाऊ शकते. जर तू दृष्टिबद्दल स्पष्ट नसशील, तर सैतान तुझ्यावर आरोप करेल आणि दृष्टीच्या पैलूमध्ये तुला अस्पष्ट करेल. तुला काही कळण्याआधीच तू मोहाला बळी पडशील.
जर तू देवाच्या कार्याचा अनुभव घेतला नाहीस, तर तू कधीही परिपूर्ण होऊ शकणार नाहीस. तुझ्या अनुभवामध्ये, तपशीलदेखील अनुभवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कोणत्या गोष्टींमुळे तुझ्यामध्ये धारणा निर्माण होतात आणि हेतूंचा अतिरेक होतो व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुला कोणत्या प्रकारच्या योग्य पद्धती आचरणात आणाव्या लागतील? जर तू देवाच्या कार्याचा अनुभव घेऊ शकत असशील, तर याचा अर्थ असा की तुझ्याकडे पातळी आहे. जर तुमच्यात फक्त सामर्थ्य दिसत असेल, तर ही खरी पातळी नाही आणि तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकणार नाही. जेव्हा तुम्ही देवाचे कार्य अनुभवण्यास सक्षम असाल आणि तुम्ही कधीही व कोणत्याही ठिकाणी ते अनुभवण्यास आणि त्यावर मनन करण्यास सक्षम असाल, जेव्हा तुम्ही मेंढपाळांना सोडून देवावर अवलंबून राहून स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम असाल आणि देवाच्या कृतींचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यास समर्थ असाल—केवळ तेव्हाच देवाची इच्छा साध्य होईल. सध्या, बर्याच लोकांना अनुभव कसा घ्यावा हे माहीत नसते व जेव्हा त्यांना एखादी समस्या येते तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यावी हे त्यांना माहीत नसते; ते देवाच्या कार्याचा अनुभव घेण्यास असमर्थ असतात आणि ते आध्यात्मिक जीवन जगू शकत नाहीत. तू देवाची वचने आणि कार्य तुमच्या व्यावहारिक जीवनात आचरणात आणले पाहिजेस.
कधीकधी देव तुला एक विशिष्ट प्रकारची भावना देतो, अशी भावना ज्यामुळे तू तुमचा आंतरिक आनंद गमावून बसतोस आणि देवाची उपस्थिती गमावतोस, एवढे की तू अंधारात बुडून जातोस. हे एक प्रकारचे परिष्करण आहे. जेव्हा तू काहीही करतोस, तेव्हा ते नेहमी बिघडते किंवा तुझ्या कार्याला खीळ बसते. ही देवाची शिस्त आहे. काहीवेळा, जेव्हा तू देवाप्रती अवज्ञाकारी आणि बंडखोर असे वर्तन करतोस, इतर कोणालाही ते माहीत नसते—पण देवाला माहीत असते. तो तुला सोडणार नाही व तो तुला शिस्त लावेल. पवित्र आत्म्याचे कार्य अतिशय तपशीलवार आहे. तो लोकांचा प्रत्येक शब्द आणि कृती, त्यांचे प्रत्येक कर्म व हालचाल आणि त्यांचा प्रत्येक विचार व कल्पना यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करतो, जेणेकरून लोकांना या गोष्टींबद्दल आंतरिक जाणीव होऊ शकेल. तू एकदा काहीतरी करतोस आणि ते बिघडते, तू पुन्हा काहीतरी करतोस व तेही चुकीचे होते आणि हळूहळू तुला पवित्र आत्म्याचे कार्य समजते. अनेक वेळा शिस्तबद्ध राहून, देवाच्या इच्छेनुसार काय करावे व त्याच्या इच्छेनुसार काय करू नये हे तुला कळेल. शेवटी, तुझ्या अंतःकरणातून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला अचूक प्रतिसाद मिळेल. कधी कधी तू बंडखोर होशील आणि तुला अंतःकरणातून देवाकडून फटकारले जाईल. हे सर्व देवाच्या शिस्तीतून येते. जर तू देवाच्या वचनाची कदर करत नसशील, जर त्याचे कार्य तुच्छ मानत असशील, तर तो तुझ्याकडे लक्ष देणार नाही. तू देवाची वचने जितकी गांभीर्याने घेशील तितके तो तुला ज्ञान देईल. सध्या, चर्चमध्ये असे काही लोक आहेत ज्यांची श्रद्धा अव्यवस्थित आणि गोंधळलेली आहे व ते खूप अयोग्य गोष्टी करतात आणि बेशिस्त वागतात व त्यामुळे त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य स्पष्टपणे दिसत नाही. काही लोक पैसे कमावण्याच्या हेतूने त्यांच्या कर्तव्यांचा त्याग करतात, शिस्त न ठेवता व्यवसाय करण्यासाठी बाहेर पडतात; अशा प्रकारची व्यक्ती आणखी धोक्यात आहे. त्यांच्याकडे सध्या पवित्र आत्म्याचे कार्य तर नाहीच, शिवाय भविष्यातदेखील त्यांना परिपूर्ण करणे कठीण होईल. असे बरेच लोक आहेत ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य पाहिले जाऊ शकत नाही आणि ज्यांच्यामध्ये देवाची शिस्त दिसू शकत नाही. ते असे आहेत जे देवाच्या इच्छेबद्दल स्पष्ट नाहीत व ज्यांना त्याचे कार्य माहीत नाही. जे परिष्करणांमध्येही स्थिर उभे राहू शकतात, जे देवाने काहीही केले तरी त्याचे अनुसरण करतात आणि किमान हे सोडू शकत नाहीत किंवा पेत्राच्या ०.१% तरी साध्य करू शकतात ते व्यवस्थित असतात, परंतु देवाने त्यांचा वापर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काहीही किंमत नसते. बऱ्याच लोकांना गोष्टी लवकर समजतात, त्यांचे देवावर खरे प्रेम असते आणि ते पेत्राच्या पातळीपेक्षा पुढे जाऊ शकतात व देव त्यांच्यावर परिपूर्णतेचे कार्य करतो. अशा लोकांना शिस्त आणि ज्ञान प्राप्त होते व जर त्यांच्यामध्ये असे काही असेल जे देवाच्या इच्छेनुसार नसेल तर ते त्याच क्षणी ते सोडून देऊ शकतात. असे लोक सोने, चांदी आणि मौल्यवान खड्यांसारखे आहेत—त्यांची किंमत सर्वात जास्त आहे! देवाने अनेक प्रकारची कार्ये केली आहेत, पण तरीही तू वाळू किंवा दगडासारखा असशील, तर तू नालायक आहेस!
अग्निवर्ण अजगराच्या देशात देवाचे कार्य अद्भुत आणि अथांग आहे. तो लोकांच्या एका समूहाला परिपूर्ण करेल व इतर काहींना बाहेर टाकेल, कारण चर्चमध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत—असे आहेत जे सत्यावर प्रेम करतात आणि जे करत नाहीत; जे देवाच्या कार्याचा अनुभव घेतात व जे घेत नाही; जे त्यांचे कर्तव्य करतात आणि जे करत नाहीत; जे देवासाठी साक्ष देतात व जे देत नाहीत—आणि त्यांच्यापैकी काही अविश्वासू व दुष्ट आहेत आणि त्यांना नक्कीच बाहेर काढून टाकले जाईल. जर तुला देवाचे कार्य स्पष्टपणे माहीत नसेल, तर तू नकारात्मक होशील; कारण देवाचे कार्य केवळ अल्पसंख्यांमध्येच दिसून येते. यावेळी, देवावर कोणाचे खरे प्रेम आहे आणि कोणाचे नाही हे स्पष्ट होईल. जे देवावर खरोखर प्रेम करतात त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य असते, तर जे त्याच्यावर खरे प्रेम करत नाहीत ते त्याच्या कार्याच्या प्रत्येक चरणातून उघड होतील. त्यांना बाहेर काढून टाकले जाईल. हे लोक विजयाच्या कार्यादरम्यान उघड होतील आणि ते असे लोक आहेत ज्यांना परिपूर्ण होण्याचे मोल समजत नसेल. जे परिपूर्ण झाले आहेत, त्यांना देवाने संपूर्णपणे प्राप्त केलेले आहे व ते पेत्राप्रमाणे देवावर प्रेम करण्यास सक्षम आहेत. ज्यांच्यावर विजय मिळवला गेला आहे त्यांच्याकडे उत्स्फूर्त प्रेम नाही, परंतु केवळ निष्क्रीय प्रेम आहे आणि त्यांना देवावर प्रेम करण्यास भाग पाडले जाते. उत्स्फूर्त प्रेम हे व्यावहारिक अनुभवातून मिळालेल्या समजातून विकसित होते. हे प्रेम एखाद्या व्यक्तीचे हृदय व्यापते व त्यांना स्वेच्छेने देवाला समर्पित करते; देवाची वचने त्यांचा पाया बनतात व ते देवासाठी दुःख सहन करण्यास सक्षम असतात. अर्थात, या अशा गोष्टी देवाने परिपूर्ण केलेल्यांच्या ठायी असतात. जर तू फक्त विजय मिळवू इच्छित असशील, तर तू देवासाठी साक्ष देऊ शकत नाहीस; जर देवाने केवळ लोकांवर विजय मिळवून त्याचे तारणाचे ध्येय साध्य केले तर सेवेकऱ्यांची पायरी पूर्ण होईल. तथापि, लोकांवर विजय मिळवणे हे देवाचे अंतिम ध्येय नाही, लोकांना परिपूर्ण करणे हे त्याचे अंतिम ध्येय आहे. तेव्हा हा टप्पा विजयाचे कार्य आहे असे म्हणण्यापेक्षा ते सिद्ध करण्याचे आणि बाहेर काढून टाकण्याचे कार्य आहे असे म्हणा. काही लोकांवर पूर्णपणे विजय मिळवलेला नाही आणि त्यांच्यावर विजय मिळवताना लोकांचा एक समूह परिपूर्ण होईल. ही दोन कार्ये एकसंधपणे चालतात. एवढ्या प्रदीर्घ कार्यकाळातही लोक निघून गेले नाहीत आणि यावरून असे दिसून येते, की विजय मिळवण्याचे ध्येय साध्य झाले आहे—ही विजय मिळवण्याची वस्तुस्थिती आहे. परिष्करणे विजय मिळवण्यासाठी नाहीत, तर परिपूर्ण होण्यासाठी आहेत. परिष्करणांशिवाय, लोक परिपूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे परिष्करणे खरोखरच मौल्यवान आहेत! आज लोकांचा एक समूह परिपूर्ण आणि प्राप्त केला जात आहे. याआधी उल्लेख केलेले दहा आशीर्वाद हे ज्यांना परिपूर्ण केले आहे त्यांच्यासाठी होते. पृथ्वीवरील त्यांची प्रतिमा बदलण्याबद्दल सर्व काही ज्यांना परिपूर्ण केले आहे त्यांच्यासाठी आहे. जे परिपूर्ण झाले नाहीत ते देवाची वचने प्राप्त करण्यास पात्र नाहीत.