जे देवावर प्रेम करतात, ते सदैव त्याच्या प्रकाशात राहतील
बहुतेक लोकांच्या देवावरील विश्वासाचे सार म्हणजे धार्मिक श्रद्धा असते: ते देवावर प्रेम करण्यास असमर्थ असतात आणि केवळ एखाद्या यंत्रासारखे काम करणाऱ्या मनुष्याप्रमाणेच देवाचे अनुसरण करू शकतात, ते खऱ्या अर्थाने देवाचा ध्यास धरू शकत नाहीत किंवा त्याची पूजा करू शकत नाहीत. ते फक्त शांतपणे त्याचे अनुसरण करतात. बरेच लोक देवावर विश्वास ठेवतात, परंतु देवावर प्रेम करणारे फार थोडे असतात; ते केवळ देवाचा “आदर” करतात कारण त्यांना आपत्तीची भीती वाटते, अन्यथा ते देवाची “प्रशंसा” करतात कारण तो उच्च आणि शक्तिमान आहे—परंतु त्यांचा आदर आणि प्रशंसा यामध्ये प्रेम किंवा खरी तळमळ नसते. त्यांच्या अनुभवांमध्ये ते सत्याची सूक्ष्मता किंवा काही क्षुल्लक रहस्यांचा शोध घेतात. बहुतेक लोक फक्त अनुसरण करतात, खवळलेल्या समुद्रात आशीर्वाद मिळवण्यासाठी जाळे टाकतात; ते सत्याचा शोध घेत नाहीत किंवा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने देवाच्या आज्ञेचे पालन करत नाहीत. सर्व लोकांचा देवावरील विश्वास निरर्थक आहे, तो मूल्यहीन आहे आणि त्या विश्वासामध्ये त्यांचे वैयक्तिक विचार आणि प्रयत्न आहेत; ते देवावर प्रेम करण्यासाठी नव्हे, तर केवळ त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात. बरेच लोक मनाला येईल तसे वागतात; त्यांना पाहिजे ते करतात आणि कधीही देवाच्या हिताचा किंवा त्यांची कृती देवाच्या इच्छेनुसार आहे की नाही, याचा विचार करत नाहीत. असे लोक देवावर खरा विश्वासदेखील प्राप्त करू शकत नाहीत, देवाबद्दलचे प्रेम तर दूरच. देवाचे सार म्हणजे माणसाने केवळ विश्वास ठेवावा एवढेच नव्हे, तर माणसाने प्रेम करावे, हे आहे. परंतु जे देवावर विश्वास ठेवतात, त्यापैकी बरेच लोक हे “रहस्य” शोधण्यास असमर्थ असतात. लोक देवावर प्रेम करण्याचे धाडस करत नाहीत किंवा ते त्याच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्नदेखील करत नाहीत. देवावर प्रेम करण्यासारखे बरेच काही आहे हे त्यांनी कधीच जाणले नाही; देव हा मनुष्यावर प्रेम करणारा देव आहे आणि मनुष्याने त्याच्यावर प्रेम करायला हवे, याचीही त्यांना कधीच जाणीव झालेली नसते. देवाचा प्रेमळपणा त्याच्या कार्यातून व्यक्त होत असतो: जेव्हा लोक त्याच्या कार्याचा अनुभव घेतील, तेव्हाच त्यांना त्याच्या प्रेमाची जाणीव होऊ शकेल; केवळ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारेच ते देवाच्या प्रेमळपणाची प्रशंसा करू शकतील; आणि प्रत्यक्ष जीवनात त्याचा अनुभव घेतल्याशिवाय त्यांना देवाच्या प्रेमळपणाची जाणीवच होणार नाही. देवावर प्रेम करण्यासारखे बरेच काही असते, परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये गुंतल्याखेरीज लोक त्याचा शोध घेण्यात असमर्थ असतात. याचा अर्थ असा आहे, की जर देवाने देह धारण केला नाही, तर लोक त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध ठेवण्यास असमर्थ असतील आणि जर ते खरोखर त्याच्याशी संलग्न होऊ शकले नाहीत, तर ते त्याचे कार्य अनुभवू शकणार नाहीत—आणि म्हणूनच त्यांचे देवावरील प्रेम खूप खोटेपणा आणि कल्पनेने कलंकित झालेले असेल. स्वर्गात असलेल्या देवावरील प्रेम हे पृथ्वीवर असलेल्या देवावरील प्रेमाइतके खरे नसते, कारण स्वर्गातील देवाबद्दल लोकांचे ज्ञान हे त्यांच्या कल्पनेवर आधारित असते, त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले आहे आणि त्यांनी वैयक्तिकरित्या जे अनुभवले आहे, त्यावर ते आधारित नसते. जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा लोक त्याची वास्तविक कृत्ये आणि त्याचा प्रेमळपणा पाहू शकतात आणि ते त्याच्या व्यावहारिक आणि सामान्य प्रवृत्तीतील सर्व काही पाहू शकतात, हे सर्व स्वर्गात असलेल्या देवाबद्दलच्या ज्ञानापेक्षा हजारो पटीने अधिक सत्य असते. स्वर्गात असलेल्या देवावर लोकांचे कितीही प्रेम असले, तरीही या प्रेमाबद्दल काहीही खरे नसते आणि हे प्रेम म्हणजे केवळ मानवी कल्पनांवर आधारित असते. पृथ्वीवर असलेल्या देवावरचे त्यांचे प्रेम कितीही अल्प असले, तरी हे प्रेम खरे असते; जरी ते थोडेच असले, तरीही ते सत्य असते. देव प्रत्यक्ष कार्याद्वारे लोकांना त्याची ओळख करून देतो आणि या ज्ञानाद्वारेच तो त्यांचे प्रेम प्राप्त करतो. हे पेत्रासारखे आहे: जर तो येशूबरोबर राहिला नसता, तर तो येशूची पूजा करूच शकला नसता. त्याचप्रमाणे, येशूबद्दलची त्याची निष्ठादेखील, येशूसोबतच्या त्याच्या संलग्नतेवरच आधारित होती. मनुष्याने देवावर प्रेम करावे, यासाठी देव माणसांमध्ये आला आहे आणि माणसांसोबत राहत आहे, आणि तो मनुष्याला जे काही दाखवतो आणि अनुभवू देतो आहे, ती सर्व देवाची वास्तविकता आहे.
देव लोकांना परिपूर्ण बनवण्यासाठी वास्तविकता आणि तथ्यांचा वापर करतो; देवाची वचने म्हणजे लोकांना परिपूर्ण करण्याच्या त्याच्या कार्याचा एक भाग आहेत आणि हे कार्य म्हणजे मार्ग दाखवण्याचे आणि मार्ग खुला करण्याचे कार्य आहे. म्हणजे, देवाच्या वचनांमध्ये तुला आचरणाचा मार्ग आणि दृष्टीचे ज्ञान सापडले पाहिजे. या गोष्टी समजून घेतल्याने, मनुष्याला त्याच्या प्रत्यक्ष आचरणाचा मार्ग आणि दृष्टी प्राप्त होईल आणि तो देवाच्या वचनांद्वारे ज्ञान प्राप्त करू शकेल; या गोष्टी देवाकडून आल्या आहेत हे त्याला समजेल आणि त्याला बरेच काही उमजेल. समजून घेतल्यानंतर, मनुष्याने ताबडतोब या वास्तविकतेचे भान बाळगले पाहिजे आणि त्याच्या प्रत्यक्ष जीवनात देवाला संतुष्ट करण्यासाठी देवाच्या वचनांचा वापर केला पाहिजे. देव तुला सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन करेल आणि तुला आचरणाचा मार्ग दाखवेल, तो विशेषतः सुंदर आहे याची तुला जाणीव होईल आणि तुझ्यासाठी देवाने केलेल्या कार्याची प्रत्येक पायरी ही तुला परिपूर्ण बनवण्याच्या उद्देशानेच आहे, हेही तुला दिसून येईल. जर तुला देवाचे प्रेम पाहायचे असेल, देवाच्या प्रेमाचा खरोखर अनुभव घ्यायचा असेल, तर वास्तविकतेत खोलवर जायला हवे, वास्तविक जीवनात खोलवर जाऊन हे पाहायला हवे, की देव जे काही कार्य करत असतो ते प्रेम आणि मोक्ष असतो, देव जे काही करतो ते लोकांनी अशुद्ध गोष्टी सोडून द्याव्यात आणि देवाला संतुष्ट करण्यास सक्षम नसलेल्या मनुष्यामधील गोष्टी सुधाराव्यात, यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी करत असतो. देव वचनांच्या मदतीने मनुष्याला पुरवत असतो; तो लोकांना अनुभव देण्यासाठी प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीला आकार देत असतो आणि जेव्हा लोक देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करतील, ती वचने आचरणात आणतील, तेव्हा ते देवाच्या अनेक वचनांच्या मदतीने त्यांच्या जीवनातील सर्व अडीअडचणी सोडवू शकतील. याचा अर्थ असा, की तुला सत्यामध्ये खोलवर जायचे असेल, तर तुझ्याकडे देवाची वचने असणे आवश्यक आहे; जर तू देवाच्या वचनांचे सेवन किंवा प्राशन करत नसशील आणि देवाच्या कार्यापासून वंचित असशील, तर तुला प्रत्यक्ष जीवनात मार्ग सापडणार नाही. जर तू कधीच देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करत नसशील, तर तुझ्या बाबतीत काही घडले, की तू गोंधळून जाशील. तुला फक्त हेच माहीत असेल, की देवावर प्रेम केले पाहिजे, परंतु तू कोणताही भेद ओळखण्यास असमर्थ असशील आणि तुला आचरणाचा मार्ग सापडणार नाही; तू गोंधळलेला आणि संभ्रमित असशील आणि कधीकधी तुझा असादेखील विश्वास असेल, की देहाला संतुष्ट करून तू देवाला संतुष्ट करत आहेस—हा सर्व देवाच्या शब्दांचे प्राशन आणि सेवन न करण्याचा परिणाम आहे. याचा अर्थ असा आहे, की जर तू देवाच्या वचनांच्या साह्यापासून वंचित असशील आणि केवळ वास्तविकतेतच रमत असशील, तर तू आचरणाचा मार्ग शोधण्यास मूलभूतपणे अक्षम असशील. अशा लोकांना देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय, हे बिलकुल समजत नाही, तर देवावर प्रेम करणे म्हणजे काय हे समजणे तर दूरची बाब. जर, देवाच्या वचनांमधील ज्ञान आणि मार्गदर्शन यांचा वापर करून, तू अनेकदा प्रार्थना करत असशील, शोध घेत असशील, माग काढत असशील आणि याद्वारे तुम्ही जे आचरणात आणले पाहिजे त्याचा शोध घेत असशील, पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी संधी शोधत असशील, देवाला खऱ्या अर्थाने सहकार्य करत असशील आणि गोंधळात किंवा संभ्रमात पडत नसशील, तर तुला प्रत्यक्ष जीवनात मार्ग सापडेल आणि तू खऱ्या अर्थाने देवाला संतुष्ट करशील. जेव्हा तू देवाला संतुष्ट करतोस, तेव्हा तुला तुझ्या अंतःकरणात देवाचे मार्गदर्शन मिळेल आणि तुला देवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल, जो तुला आनंदाची अनुभूती देईल: तू देवाला संतुष्ट केले आहेस, याचा तुला विशेष गौरव वाटेल, तुला अंतःकरणातून विशेष तेजस्वी वाटेल आणि तुझ्या अंतःकरणात तू सुस्पष्ट आणि शांत असशील. तुझ्या सद्सद्विवेकबुद्धीला दिलासा मिळेल आणि ती आरोपांपासून मुक्त होईल आणि तुझे भाऊ आणि बहिणी पाहून तुला मनापासून आनंद वाटेल. देवाच्या प्रेमाचा आनंद घेण्याचा अर्थ हाच आहे आणि फक्त हेच खऱ्या अर्थाने देवाचा आनंद घेणे आहे. लोकांना देवाबद्दलच्या प्रेमाचा आनंद अनुभवाने प्राप्त होतो: कष्ट अनुभवून आणि सत्य आचरणात आणण्याचा अनुभव घेऊन, त्यांना देवाचे आशीर्वाद मिळतात. जर तू फक्त असे म्हणत असशील, की देव खरोखर तुझ्यावर प्रेम करतो, देवाने खरोखर लोकांच्या भल्यासाठी खूप मोठी किंमत मोजली आहे, त्याने धीराने आणि दयाळूपणे अनेक वचने बोलली आहेत आणि देव नेहमी लोकांना वाचवतो, तर तू ही वचने उच्चारणे म्हणजे देवाने संतुष्ट होण्याची केवळ एक बाजू आहे. तरीही, जेव्हा लोक त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात सत्य आचरणात आणतात, तोच याहून मोठा आनंद—खरा आनंद असतो. त्यानंतर त्यांना अंतःकरणात शांत आणि स्पष्ट वाटते. त्यांना अंतःकरणातून खूप उचंबळून येते आणि त्यांना वाटते की देव सर्वात प्रिय आहे. तुला वाटेल, की तू मोजलेली किंमत खूपच रास्तपेक्षा अधिक आहे. प्रयत्नांच्या रूपाने मोठी किंमत मोजल्यानंतर तू आतून विशेष तेजस्वी होशील: तुला असे वाटेल, की तू देवाच्या प्रेमाचा खऱ्या अर्थाने आनंद घेत आहेस आणि तुला समजेल, की देवाने लोकांसाठी तारणाचे कार्य केले आहे, त्याने लोकांचे शुद्धीकरण करणे हे त्यांना शुद्ध करण्यासाठी आहे आणि लोक देवावर खरोखर प्रेम करतात की नाही हे तपासण्याचा प्रयत्न देव करत असतो. जर तू अशा प्रकारे सदैव सत्याने आचरण केलेस, तर तुला हळुहळू देवाच्या बर्याच कार्याचे सुस्पष्ट ज्ञान प्राप्त होईल आणि त्यावेळी तुला असे वाटेल, की देवाची वचने तुझ्यासमोर स्फटिकासारखी स्पष्ट आहेत. जर तू अनेक सत्ये स्पष्टपणे समजू शकत असशील, तर तुला असे वाटेल, की आवश्यक असलेल्या सर्व बाबी आचरणात आणणे सोपे आहे, तू कोणत्याही समस्येवर आणि कोणत्याही प्रलोभनावर मात करू शकशील आणि तुला लक्षात येईल, की कोणतीही गोष्ट ही तुझ्यासाठी समस्या नाही. त्यामुळे तू मुक्त होशील आणि स्वतंत्र होशील. या क्षणी, तू देवाच्या प्रेमाचा आनंद घेत असशील आणि देवाचे खरे प्रेम तुला प्राप्त झालेले असेल. ज्यांच्याकडे दृष्टी आहे, ज्यांच्याकडे सत्य आहे, ज्यांना ज्ञान आहे आणि जे त्याच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांना देव आशीर्वाद देतो. जर लोकांना देवाचे प्रेम पहायचे असेल, तर त्यांनी प्रत्यक्ष जीवनात सत्याने आचरण केले पाहिजे आणि देवाला संतुष्ट करण्यासाठी वेदना सहन करण्याची आणि प्रिय गोष्टी सोडून देण्याची त्यांची तयारी असायला हवी आणि डोळ्यांत अश्रू असले तरीही त्यांनी देवाचे अंतःकरण संतुष्ट करायला हवे. असे केले, तर देव तुला नक्कीच आशीर्वाद देईल आणि जर तू अशा प्रकारचे कष्ट सहन केलेस, तर पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे अनुसरण केले जाईल. प्रत्यक्ष जीवनाद्वारे आणि देवाच्या वचनांचा अनुभव घेतल्याने, लोक देवाची प्रेमळता पाहण्यास सक्षम होतात आणि त्यांनी देवाच्या प्रेमाचा आस्वाद घेतला, तरच ते त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतात.
जे देवावर प्रेम करतात ते सत्यावर प्रेम करतात, आणि जे सत्यावर प्रेम करतात ते जितके जास्त ते आचरणात आणतात, तितके सत्य त्यांच्याकडे अधिक असते; ते जितके जास्त सत्य आचरणात आणतात, तितकेच त्यांना देवाचे प्रेम मिळते; आणि ते जितके जास्त सत्य आचरणात आणतात, तितकेच त्यांना देवाचे आशीर्वाद मिळतात. जर तू नेहमी अशाप्रकारे आचरण करत असशील, तर देवाचे तुझ्यावरील प्रेम हळुहळू तुला दृष्टी देईल, जसे पेत्राने देवाला ओळखले: पेत्राने म्हटले, की देवाकडे केवळ आकाश आणि पृथ्वी आणि इतर सर्व गोष्टींची निर्मिती करण्याचे शहाणपण आहे, एवढेच नव्हे, तर लोकांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचे शहाणपणही त्याच्याकडे आहे. पेत्राने म्हटले, की तो आकाश आणि पृथ्वी आणि सर्व गोष्टींच्या निर्मिती करतो, या कारणामुळे नव्हे, तर मनुष्य निर्माण करण्याच्या, मनुष्याचे तारण करण्याच्या, त्याला परिपूर्ण बनवण्याच्या आणि मनुष्यावरील त्याच्या प्रेमाचे वचन देण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे तो लोकांच्या प्रेमास पात्र आहे. म्हणून, पेत्राने असेदेखील म्हटले, की त्याच्यामध्ये असे बरेच काही आहे, जे मनुष्याच्या प्रेमास पात्र आहे. पेत्र येशूला म्हणाला: “आकाश आणि पृथ्वी आणि सर्व गोष्टी निर्माण करणे या एकमेव कारणामुळे तू लोकांच्या प्रेमास पात्र आहेस का? तुझ्यामध्ये प्रेम करण्यासारखे बरेच काही आहे. तू प्रत्यक्ष जीवनात कृती करतोस आणि वावरतोस, तुझा आत्मा मला अंतःकरणात स्पर्श करतो, तू मला शिस्त लावतोस, तू माझी निंदा करतोस—या गोष्टी लोकांच्या प्रेमाला अधिक पात्र आहेत.” जर तुला देवाचे प्रेम पहायचे आणि अनुभवायचे असेल, तर तू प्रत्यक्ष जीवनात शोध घेतला पाहिजेस आणि स्वतःचा देह बाजूला ठेवण्यास तयार असले पाहिजेस. तू हा संकल्प केला पाहिजेस. आळशी न होता किंवा देहभोगाचा लोभ न ठेवता, देहासाठी नव्हे तर देवासाठी जगत, सर्व गोष्टींमध्ये देवाला संतुष्ट करण्याचा संकल्प असायला हवा. असे काही वेळा होऊ शकते, की तू देवाला संतुष्ट करत नाहीस. कारण तुला देवाची इच्छा समजत नाही; पुढच्या वेळी, जरी यासाठी अधिक प्रयत्न करावे लागले, तरी देहाला नव्हे, तर देवाला संतुष्ट केले पाहिजे. जेव्हा तू असा अनुभव घेशील तेव्हा तुला देवाची ओळख झालेली असेल. तुला दिसेल, की देव आकाश आणि पृथ्वी आणि सर्व गोष्टी निर्माण करू शकतो, त्याने देह धारण केला आहे जेणेकरून, लोक त्याला प्रत्यक्ष पाहू शकतील आणि त्याच्याशी खरोखर संलग्न होऊ शकतील; तुला दिसेल, की तो मनुष्यांमध्ये फिरण्यास सक्षम आहे आणि त्याचा आत्मा लोकांना प्रत्यक्ष जीवनात परिपूर्ण बनवू शकतो, जेणेकरून त्यांना त्याचे प्रेम पाहता येईल आणि त्याची शिस्त, त्याचे ताडण आणि त्याचे आशीर्वाद अनुभवता येतील. जर तू सदैव असाच अनुभव घेत असशील, तर प्रत्यक्ष जीवनात तू देवापासून अविभाज्य होशील आणि जर एखाद्या दिवशी तुझे देवासोबतचे सामान्य नाते संपुष्टात आले, तर तुला निंदा आणि पश्चात्ताप यांचा सामना करावा लागेल. जर तुझे देवाशी सामान्य नाते असेल, तर तू कधीही देवाला सोडून जाऊ इच्छिणार नाहीस आणि जर एखाद्या दिवशी देव म्हणाला की तो तुला सोडून जाईल, तर तू घाबरशील आणि म्हणशील, की देवाने एकटे सोडण्यापेक्षा तू मरण पत्करशील. या भावना जाणवताच, तुला असे वाटेल, की तू देवाला सोडून देण्यास असमर्थ आहेस आणि अशा प्रकारे, तुला एक आधार मिळेल आणि तू खऱ्या अर्थाने देवाच्या प्रेमाचा आनंद अनुभवशील.
लोक अनेकदा देवाला आपले जीवन वाहण्याविषयी बोलतात, परंतु त्यांचा अनुभव अद्याप त्या टप्प्यावर आलेला नाही. तू फक्त असे म्हणत आहेस, की देव तुझे जीवन आहे, तो तुला दररोज मार्गदर्शन करतो, तू दररोज त्याच्या वचनांचे प्राशन आणि सेवन करतोस आणि तू दररोज त्याची प्रार्थना करतोस, म्हणून तो तुझे जीवन बनला आहे. असे म्हणणाऱ्यांचे ज्ञान अगदी वरवरचे असते. अनेक लोकांना काही पायाच नसतो; त्यांच्यामध्ये देवाची वचने रुजलेली असतात, परंतु त्यांना अद्याप अंकुरदेखील फुटलेले नसतात, तर फळ येणे ही दूरची बाब. आज, तुझा अनुभव किती आहे? आताच, देवाने तुला इतके दूर येण्यास भाग पाडल्यानंतर, तुला असे वाटते, की तू देवाला सोडून देऊ शकत नाहीस. एके दिवशी, जेव्हा तुझा अनुभव एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचला असेल आणि जर देव तुला सोडून देणार असेल, तर तू ते करू शकणार नाहीस. तुला सदैव असेच वाटेल, की तू तुझ्या अंतःकरणातील देवाशिवाय राहू शकत नाहीस; तू पती, पत्नी किंवा मुलांशिवाय, कुटुंबाशिवाय, आई किंवा वडिलांशिवाय, देहभोगाशिवाय राहू शकतोस, परंतु देवाशिवाय राहू शकत नाहीस. देवाशिवाय राहणे म्हणजे तुझे जीवन गमावल्यासारखे होईल; तू देवाशिवाय जगू शकणार नाहीस. जेव्हा तू इथपर्यंत अनुभव घेतला असशील, तेव्हा तू तुझ्या देवावरील विश्वासावर शिक्कामोर्तब केले असशील आणि अशा प्रकारे, देव तुझे जीवन बनेल, तो तुझ्या अस्तित्वाचा पाया बनला असेल. तू पुन्हा कधीही देवाला सोडून देऊ शकणार नाहीस. जेव्हा तू या मर्यादेपर्यंत अनुभव घेतला असशील, तेव्हा तू खरोखरच देवाच्या प्रेमाचा आनंद घेतला असशील आणि जेव्हा तुझे देवाशी पुरेसे जवळचे नाते असेल, तेव्हा तो तुझे जीवन असेल, तुझे प्रेम असेल, आणि त्यावेळी तू देवाला प्रार्थना करशील आणि म्हणशील: “हे देवा! मी तुला सोडून देऊ शकत नाही. तू माझे जीवन आहेस. मी इतर सर्व गोष्टींशिवाय जगू शकतो—परंतु तुझ्याशिवाय, मी जगू शकत नाही.” हे लोकांचे खरे मोठेपण आहे; ते खरे जीवन आहे. काही लोकांना आजपर्यंत येण्यास भाग पाडले गेले आहे: त्यांची इच्छा असो वा नसो, त्यांना पुढे जावेच लागते आणि त्यांना सदैव असे वाटत असते, की ते खडक आणि कठीण जागा यांच्यामध्ये अडकले आहेत. तुला असा अनुभव आला पाहिजे, की देव तुझे जीवन आहे, जणू तुझ्या ह्रदयातून देवाला काढून टाकले तर ते तुझे जीवन गमावल्यासारखे होईल; देव हे तुझे जीवन असायला हवे आणि तू त्याला सोडण्यास असमर्थ असायला हवे. अशाप्रकारे, तू प्रत्यक्ष देवाचा अनुभव घेतला असशील आणि यावेळी जेव्हा तू देवावर प्रेम करशील, तेव्हा तू देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करशील आणि ते विलक्षण, शुद्ध प्रेम असेल. एके दिवशी, जेव्हा तुझे अनुभव असे असतील, की तुझे जीवन एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचले असेल, जेव्हा तू देवाची प्रार्थना करशील आणि देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करशील, तेव्हा तुझ्या अंतःकरणातील देवाला सोडून देऊ शकणार नाहीस आणि तुला वाटले तरीही तू त्याला विसरू शकणार नाहीस. देव तुझे जीवन बनलेला असेल; तू जगाला विसरू शकशील, पत्नी, पती किंवा मुलांना विसरू शकशील, परंतु तुला देवाला विसरणे कठीण जाईल—असे करणे अशक्य होईल, हे तुझे खरे जीवन आणि देवावरील खरे प्रेम आहे. जेव्हा लोकांचे देवावरील प्रेम एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचते, तेव्हा इतर कोणत्याही गोष्टीवरील त्यांचे प्रेम हे देवावरील प्रेमाच्या तोडीचे नसते; त्यांचे देवावरील प्रेम प्रथम असते. अशा प्रकारे तुम्ही इतर सर्व गोष्टींचा त्याग करण्यास सक्षम असता आणि देवाकडून सर्व व्यवहार आणि छाटणी स्वीकारण्यास तयार असता. जेव्हा तुझे देवावरील प्रेम हे इतर सर्व गोष्टींपेक्षा वरचढ असेल, तेव्हा तू वास्तविकतेत आणि देवाच्या प्रेमात जगशील.
देव लोकांचे आयुष्य बनला, की लोक देवाला सोडू शकत नाहीत. हे देवाचेच कृत्य नाही का? यापेक्षा मोठी साक्ष नाही! देवाने एका विशिष्ट टप्प्यापर्यंत कार्य केले आहे; लोकांनी सेवा करावी, ताडण भोगावे किंवा मरण पत्करावे, असे त्याने म्हटले आहे आणि लोक मागे हटले नाहीत, यावरून हे दिसते, की देवाने त्यांना जिंकले आहे. ज्यांच्याकडे सत्य आहे ते असे लोक आहेत, जे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवात, त्यांच्या साक्षीवर ठाम राहू शकतात, त्यांच्या स्थितीवर ठाम राहू शकतात, कधीही मागे न हटता देवाच्या बाजूने उभे राहू शकतात आणि जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्याशी सामान्य नाते ठेवू शकतात. असे लोक जेव्हा त्यांच्या बाबतीत घटना घडतात, तेव्हा देवाच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन करण्यास सक्षम असतात आणि ते आमरण देवाच्या आज्ञेचे पालन करू शकतात. प्रत्यक्ष जीवनातील तुझे आचरण आणि प्रकटीकरण ही देवाचीच साक्ष आहे, ते मनुष्याचे जीवन आणि देवाची साक्ष आहेत आणि हे खऱ्या अर्थाने देवाच्या प्रेमाचा आनंद घेणे आहे; जेव्हा तू या टप्प्यापर्यंत अनुभव घेतला असशील, तेव्हा योग्य परिणाम साधला जाईल. तुझ्याकडे प्रत्यक्ष जगण्याची क्षमता असेल आणि तुझ्या प्रत्येक कृतीकडे इतर लोक कौतुकाने पाहतील. तुझा पेहराव आणि बाह्य रूप फारसे लक्षणीय नसेल, परंतु तू अत्यंत धार्मिक जीवन जगत असशील आणि देवाच्या वचनांचे पालन करत असशील, तर तुला त्याच्याकडून मार्गदर्शन आणि ज्ञान प्राप्त होते. तू तुझ्या शब्दांद्वारे देवाची इच्छा बोलू शकतोस, सत्य सांगू शकतोस आणि अंतःकरणापासून सेवा करण्याबद्दल तुला बरेच काही समजते. तुझे बोलणे प्रांजळ आहे, तू सभ्य आणि प्रामाणिक आहेस, वादावादी न करणारा आणि शालीन आहेस, देवाच्या व्यवस्थांचे पालन करण्यास सक्षम आहेस आणि अडीअडचणीतही साक्षीवर ठाम उभे राहतोस आणि कशाचाही सामना करत असलास, तरी शांत आणि संयमित असतोस. अशा व्यक्तीने खऱ्या अर्थाने देवाचे प्रेम पाहिलेले असते. काही लोक अद्याप तरुण असतात, परंतु ते मध्यमवयीन व्यक्तीप्रमाणे वर्तन करतात; ते प्रगल्भ असतात, सत्याने आचरण करत असतात आणि इतर लोक त्यांची प्रशंसा करतात—याच लोकांकडे साक्ष असते आणि हेच लोक देवाचे प्रकटीकरण आहेत. याचा अर्थ असा, की जेव्हा त्यांना एका विशिष्ट टप्प्यापर्यंत अनुभव येतो, तेव्हा त्यांना आतून देवाविषयीची दृष्टी प्राप्त होते आणि त्यांची बाह्य प्रवृत्ती देखील स्थिर होते. पुष्कळ लोक सत्य आचरणात आणत नाहीत आणि त्यांच्या साक्षीवर ठाम राहत नाहीत. अशा लोकांचे देवावर प्रेम नाही किंवा ते देवाची साक्ष देत नाहीत आणि या लोकांचा देव सर्वात जास्त तिरस्कार करतो. ते सभासंमेलनांमध्ये देवाची वचने वाचतात, परंतु त्यांचे जगणे सैतानासारखे असते आणि हा देवाचा अवमान आहे, हे देवाची निंदा करणे आहे. अशा लोकांमध्ये, देवाच्या प्रेमाचे कोणतेही लक्षण नसते आणि त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य बिलकुल नसते. त्यामुळे, अशा लोकांचे शब्द आणि कृती सैतानाचे प्रतिनिधित्व करतात. जर तुझे हृदय देवासमोर नेहमी शांत असेल आणि तू तुझ्या सभोवतालच्या लोकांकडे आणि गोष्टींकडे आणि सभोवताली काय चालले आहे, याकडे सदैव लक्ष देत असशील आणि जर तू देवाच्या ओझ्याकडे लक्ष देत असशील आणि तुझ्या हृदयात नेहमी देवाविषयी आदर असेल, मग देव तुला वारंवार ज्ञान देईल. चर्चमध्ये असे लोक असतात जे “पर्यवेक्षक” असतात: ते इतरांचे अपयश पाहण्यासाठी निघतात आणि नंतर त्यांचे अनुकरण करतात. ते भेद करण्यास असमर्थ असतात, ते पापाचा तिरस्कार करत नाहीत आणि सैतानाच्या गोष्टींचा तिरस्कार किंवा तिटकारा बाळगत नाहीत. असे लोक सैतानाच्या गोष्टींनी भरलेले असतात आणि अखेर देव त्यांना पूर्णपणे सोडून देतो. तुमचे अंतःकरण देवासमोर नेहमीच आदरयुक्त असले पाहिजे, तुमचे शब्द आणि कृती यांमध्ये संयम असला पाहिजे आणि तुम्ही देवाला विरोध करू नये किंवा नाराज करू नये. तुझ्यामध्ये देवाचे कार्य किंवा तू सहन केलेले सर्व कष्ट आणि तुझे संपूर्ण आचरण तू व्यर्थ ठरू देऊ नयेस. पुढील वाटचालीत तू अधिक मेहनत करण्यास आणि देवावर अधिक प्रेम करण्यास तयार असले पाहिजेस. हे असे लोक आहेत, ज्यांची दृष्टी हा त्यांचा पाया आहे. हे प्रगती शोधणारे लोक आहेत.
जे लोक देवावर विश्वास ठेवतात आणि देवाचा आदर करणार्या अंतःकरणाने देवाची वचने अनुभवतात, अशा लोकांमध्ये देवाचे तारण आणि देवाचे प्रेम दिसून येते. हे लोक देवाची साक्ष देण्यास सक्षम असतात; ते सत्याने जगतात आणि देव काय आहे आणि देवाची प्रवृत्ती याविषयी सत्याचीच साक्ष देतात. ते देवाच्या प्रेमात राहतात आणि त्यांनी देवाचे प्रेम पाहिलेले असते. जर लोकांना देवावर प्रेम करायचे असेल, तर त्यांनी देवाच्या प्रेमाचा आस्वाद घेतला पाहिजे आणि देवाचे प्रेम पाहिले पाहिजे; तरच त्यांच्यामध्ये देवावर प्रेम करणारे हृदय जागृत होऊ शकेल, असे हृदय जे लोकांना एकनिष्ठपणे स्वतःला देवासाठी अर्पण करण्यास प्रेरित करेल. देव वचने आणि अभिव्यक्तीद्वारे किंवा त्यांच्या कल्पनेद्वारे लोकांना त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडत नाही आणि त्याच्यावर प्रेम करण्यासाठी तो लोकांवर बळजबरीही करत नाही. त्याउलट, तो त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेने त्याच्यावर प्रेम करू देतो आणि तो त्यांना त्याच्या कार्यामधील आणि वचनांमधील त्याचा प्रेमळपणा पाहू देतो, त्यानंतर त्यांच्यामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण होते. केवळ अशा प्रकारे लोक खऱ्या अर्थाने देवाची साक्ष देऊ शकतात. इतरांनी सांगितले म्हणून लोक देवावर प्रेम करतात असे नाही किंवा तो क्षणिक भावनिक आवेगदेखील नाही. ते देवावर प्रेम करतात कारण त्यांनी त्याचा प्रेमळपणा पाहिला आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या प्रेमास पात्र असे बरेच काही आहे हे त्यांनी पाहिले आहे, कारण त्यांनी देवाचे तारण, शहाणपण आणि आश्चर्यकारक कृत्ये पाहिली आहेत—आणि परिणामी, ते खरोखरच देवाची प्रसंशा करतात आणि त्याच्यासाठी त्यांच्या मनात खरोखर तळमळ आहे आणि त्यांच्यामध्ये अशी उत्कटता जागृत झाली आहे, की ते देवाला प्राप्त केल्याशिवाय राहू शकत नाहीत. जे लोक खरोखरच देवाची साक्ष देतात, ते एक निर्णायक साक्ष देण्यास सक्षम आहेत याचे कारण म्हणजे त्यांची साक्ष खरे ज्ञान आणि देवाबद्दलची खरी तळमळ या पायावर उभी आहे. अशी साक्ष भावनिक आवेग म्हणून दिली जात नाही, तर देव आणि त्याची प्रवृत्ती याबद्दलच्या ज्ञानानुसार दिली जाते. त्यांना देवाची ओळख झालेली असते, म्हणून त्यांना असे वाटते, की त्यांनी निश्चितपणे देवाची साक्ष दिली पाहिजे आणि ज्यांना देवाची तळमळ आहे त्यांना देवाची ओळख करून दिली पाहिजे आणि देवाच्या प्रेमाची आणि त्याच्या सत्यतेची जाणीव करून दिली पाहिजे. लोकांच्या देवावरील प्रेमाप्रमाणेच त्यांची साक्षदेखील उत्स्फूर्त असते; ती खरीखुरी असते आणि खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान असते. ती निष्क्रिय किंवा पोकळ आणि निरर्थक नसते. जे लोक खऱ्या अर्थाने देवावर प्रेम करतात केवळ त्यांच्या जीवनात सर्वात जास्त मोल आणि अर्थ असतो, केवळ तेच देवावर खरोखर विश्वास ठेवतात, याचे कारण म्हणजे, हे लोक देवाच्या प्रकाशात जगण्यास सक्षम असतात आणि देवाच्या कार्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी जगण्यास सक्षम असतात. ते अंधारात नव्हे, तर प्रकाशात राहतात; म्हणूनच ते निरर्थक जीवन जगत नाहीत, तर देवाने आशीर्वाद दिलेले जीवन जगतात. जे देवावर प्रेम करतात तेच देवाविषयी साक्ष देऊ शकतात, फक्त तेच देवाचे साक्षीदार असतात, फक्त त्यांनाच देवाचा आशीर्वाद मिळतो आणि फक्त तेच देवाची वचने प्राप्त करण्यास सक्षम असतात. जे देवावर प्रेम करतात ते देवाचे अंतरंग असतात; ते देवाचे प्रिय लोक आहेत आणि ते देवासोबत मिळून आशीर्वाद घेऊ शकतात. केवळ असे लोकच अनंतकाळ जगतील आणि केवळ तेच सदैव देवाची काळजी आणि संरक्षण याच्या छत्राखाली राहतील. देव हा लोकांनी त्याच्यावर प्रेम करावे, यासाठी आहे आणि तो सर्व लोकांच्या प्रेमास पात्र आहे, परंतु सगळेच लोक देवावर प्रेम करण्यास सक्षम नाहीत आणि सगळेच लोक देवाची साक्ष देऊ शकत नाहीत आणि देवाशी सामर्थ्य ठेवू शकत नाहीत. जे खऱ्या अर्थाने देवावर प्रेम करतात, ते देवाची साक्ष देण्यास सक्षम असतात आणि त्यांचे सर्व प्रयत्न देवाच्या कार्यासाठी समर्पित करतात, म्हणूनच कोणीही त्यांना विरोध करण्याची हिंमत करत नाही आणि ते पृथ्वीतलावर कुठेही चालू शकतात त्याचप्रमाणे ते पृथ्वीवर सत्ता गाजवू शकतात आणि देवाच्या सर्व लोकांवर राज्य करू शकतात. हे लोक जगभरातून एकत्र आले आहेत. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि त्यांच्या त्वचेचा वर्णही वेगवेगळा असतो, परंतु त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ एकच असतो; त्या सर्वांकडे देवावर प्रेम करणारे हृदय असते, ते सर्वजण समान साक्ष देतात आणि त्यांचा संकल्प आणि इच्छा समान असतात. जे देवावर प्रेम करतात ते जगभर मुक्तपणे फिरू शकतात आणि जे देवाची साक्ष देतात ते संपूर्ण विश्वात प्रवास करू शकतात. हे लोक देवाचे प्रिय आहेत, त्यांना देवाचा आशीर्वाद आहे आणि ते सदैव त्याच्या प्रकाशात राहतील.