ख्रिस्ताचे सुरुवातीचे उच्चारण—अध्याय १०३

संपूर्ण विश्वाला हादरवणारा, गर्जना करणारा एक आवाज निघतो. तो इतका बधिर करणारा आहे, की लोक वेळेत मार्गातून बाजूला होऊ शकत नाहीत. काही मारले जातात, काही नष्ट होतात आणि काहींचा न्याय केला जातो. हे खरोखरच एक लक्ष वेधून घेणारे दृश्य असते, असे कोणीही कधीही पाहिलेले नाही. लक्षपूर्वक ऐका: मेघगर्जनाबरोबर रडण्याचा आवाज येतो आणि हा आवाज अधोलोकातून येतो; तो नरकातून येतो. हा त्या बंडखोर पुत्रांचा कडवट आवाज आहे ज्यांचा मी न्याय केला आहे. ज्यांनी माझे म्हणणे ऐकले नाही व ज्यांनी माझी वचने आचरणात आणली नाहीत, त्यांचा कठोरपणे न्याय केला गेला आणि त्यांना माझ्या क्रोधाचा शाप प्राप्त झाला. माझा आवाज न्याय व क्रोध आहे; मी कोणाशीही सौम्यपणे वागत नाही आणि कोणावरही दया दाखवत नाही, कारण मी स्वतः नीतिमान देव आहे आणि माझ्यामध्ये क्रोध आहे; माझ्यामध्ये ज्वलंतपणा, शुद्धीकरण व विनाश आहे. माझ्यामध्ये काहीही लपलेले किंवा भावनिक नाही, परंतु त्याउलट, सर्व काही खुले, नीतिमान आणि निष्पक्ष आहे. कारण माझे ज्येष्ठ पुत्र माझ्याबरोबर आधीच सिंहासनावर आहेत, सर्व राष्ट्रांवर व सर्व लोकांवर राज्य करत आहेत, त्या गोष्टी आणि लोक जे पक्षपाती व अधर्मी आहेत त्यांचा न्याय आता होऊ लागला आहे. मी त्यांची एक-एक करून कसून तपासणी करेन, काहीही चुकणार नाही आणि त्यांना पूर्णपणे उघडकीस आणेन. कारण माझा न्याय पूर्णपणे प्रकट व पूर्णपणे उघड झाला आहे आणि मी काहीही मागे ठेवले नाही; माझ्या इच्छेनुसार नसलेल्या सर्व गोष्टी मी फेकून देईन व अथांग खड्ड्यात ते अनंतकाळ नष्ट होऊ देईन. तेथे मी ते कायमचे जळू देईन. हे माझे नीतिमत्त्व आहे आणि हा माझा सरळपणा आहे. हे कोणीही बदलू शकत नाही आणि सर्वांनी माझ्या आज्ञेचे पालन केले पाहिजे.

वचने ही फक्त नावापुरती वचनेच आहेत आणि तथ्ये ही केवळ तथ्ये आहेत, असे समजून बहुतेक लोक माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. ते आंधळे आहेत! मी स्वतः श्रद्धाळू देव आहे हे त्यांना माहीत नाही का? माझी वचने व तथ्ये एकाच वेळी घडतात. हे खरेच तसे नाही का? लोकांना माझ्या वचनांचे आकलनच होत नाही आणि ज्यांना ज्ञान प्राप्त झाले आहे तेच खरोखर समजू शकतात. हे तथ्य आहे. लोक माझी वचने पाहताच, ते त्यांच्या आत्म्यापासून इतके घाबरतात की ते लपण्यासाठी सर्वत्र धावपळ करतात. जेव्हा मी न्याय करतो, तेव्हा तर हे अधिकच घडते. जेव्हा मी सर्व काही निर्माण करतो, जेव्हा मी जगाचा नाश करतो व जेव्हा मी ज्येष्ठ पुत्रांना परिपूर्ण करतो—या सर्व गोष्टी माझ्या मुखातून निघालेल्या एका वचनाने पूर्ण होतात. कारण माझे वचन हेच अधिकार आहे; ते वचनच न्याय आहे. असे म्हणता येईल, की मी न्याय आणि वैभव असलेली व्यक्ती आहे; हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे. माझ्या प्रशासकीय आदेशांचा हा एक पैलू आहे; तो फक्त एक मार्ग आहे ज्याद्वारे मी लोकांचा न्याय करतो. माझ्या नजरेत, सर्व काही—सर्व लोक, सर्व व्यवहार व सर्व गोष्टी—माझ्या हातात आणि माझ्या न्यायांतर्गत आहे. कोणीही व काहीही बेशिस्तपणे किंवा हेतूपुरस्सर वागण्याची हिम्मत करत नाही आणि सर्व काही मी उच्चारलेल्या वचनांनुसार साध्य केले पाहिजे. मानवी धारणांमध्ये, मी असा व्यक्ती आहे ज्याच्या वचनांवर प्रत्येकजण विश्वास ठेवतो. जेव्हा माझा आत्मा आवाज देतो, तेव्हा प्रत्येकजण संशय बाळगतो. लोकांना माझ्या सर्वशक्तिमानतेचे थोडेसेही ज्ञान नसते व ते माझ्यावर आरोपही करतात. आता मी तुला सांगतो, जो कोणी माझ्या वचनांवर संशय घेतो आणि जो कोणी माझ्या वचनांना तुच्छ मानतो, त्यांचा नाश होईल. ते विनाशाचे शाश्वत पुत्र आहेत. यावरून असे दिसून येते, की ज्येष्ठ पुत्र असणारे फार थोडे आहेत, कारण मी असेच कार्य करतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, मी बोटदेखील न हलवता सर्व काही साध्य करतो; मी फक्त माझी वचने वापरतो. तर, येथेच माझा सर्वशक्तिमानपणा आहे. माझ्या वचनांमध्ये, मी जे बोलतो त्याचा स्त्रोत व हेतू कोणालाही सापडत नाही. लोक हे साध्य करू शकत नाहीत आणि ते फक्त माझ्या नेतृत्वाचे अनुसरण करून कृती करू शकतात व माझ्या नीतिमत्त्वानुसार माझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू शकतात जेणेकरून, माझे कुटुंब नीतिमान आणि शांतीपूर्ण असेल, त्यांना सदैव जगता येईल व चिरंतन कणखर आणि स्थिर राहता येईल.

मी प्रत्येकाचा न्याय करतो, माझे प्रशासकीय आदेश सर्वांसाठी आहेत आणि माझी वचने व माझे व्यक्तित्व प्रत्येकासमोर प्रकट होते. ही माझ्या आत्म्याच्या महान कार्याची वेळ आहे (या वेळी, ज्यांना आशीर्वाद मिळेल आणि ज्यांना दुर्दैवी त्रास होईल ते एकमेकांपासून वेगळे केलेले आहेत). माझी वचने समोर येताच, ज्यांना आशीर्वाद मिळेल, तसेच ज्यांना दुर्दैवी त्रास सहन करावा लागेल, त्यांना मी वेगळे केले आहे. हे सर्व स्पष्ट आहे आणि मी हे सर्व एका दृष्टिक्षेपात पाहू शकतो. (मी हे माझ्या मानवतेच्या संदर्भात म्हणत आहे; म्हणूनच, ही वचने माझ्या पूर्वनिश्चितीच्या व निवडीच्या विरोधात नाहीत.) मी पर्वत, नद्या आणि सर्व गोष्टींमध्ये, विश्वाच्या अंतराळात फिरतो, प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण व शुद्धीकरण करतो जेणेकरून, ती अस्वच्छ ठिकाणे आणि त्या अस्वच्छ भूमीचे अस्तित्व नाहीसे होईल व माझ्या वचनांचा परिणाम म्हणून त्यांना जाळून नष्ट केले जाईल. माझ्यासाठी, सर्व काही सोपे आहे. जर मी आताची वेळ जगाच्या विनाशासाठी आधीच ठरवली असती, तर मी केवळ एक वचन उच्चारून ते गिळून टाकू शकलो असतो. मात्र, आता ती वेळ नाही. मी हे कार्य करण्यापूर्वी सर्वांनी तयार असले पाहिजे जेणेकरुन, माझी योजना विस्कळीत होणार नाही आणि माझ्या व्यवस्थापनात व्यत्यय येणार नाही. हे योग्यरीत्या कसे करायचे हे मला माहीत आहे: माझ्याकडे माझे शहाणपण आहे व माझ्या स्वतःच्या व्यवस्था आहेत. लोकांनी एक बोटदेखील हलवू नये; माझ्या हातून मारले जाणार नाही याची काळजी घावी. यात आधीच माझ्या प्रशासकीय आदेशांचा विचार करण्यात आलेला आहे. यावरून माझ्या प्रशासकीय आदेशांचा कठोरपणा, तसेच त्यामागील तत्त्वे दिसून येतात, ज्यांच्या दोन बाजू आहेत: एकीकडे, जे माझ्या इच्छेनुसार नाहीत आणि जे माझ्या प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करतात त्यांना मी मारतो; दुसरीकडे, माझ्या क्रोधामुळे मी माझ्या प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांना शाप देतो. हे दोन पैलू अपरिहार्य आहेत व माझ्या प्रशासकीय आदेशांमागील कार्यकारी तत्त्वे आहेत. एखादी व्यक्ती कितीही निष्ठावान असली तरी, कोणत्याही भावनेशिवाय, प्रत्येकाला या दोन तत्त्वांनुसार हाताळले जाते. माझे नीतिमत्त्व, माझे वैभव आणि माझा क्रोध दर्शवण्यासाठी हे पुरेसे आहे, जे पृथ्वीवरील सर्व गोष्टी, सर्व सांसारिक गोष्टी व माझ्या इच्छेशी सुसंगत नसलेल्या सर्व गोष्टी जाळून टाकेल. माझ्या वचनांमध्ये रहस्ये लपलेली आहेत जी लपलेली आहेत आणि माझ्या वचनांमध्ये अशी काही रहस्ये आहेत जी उघडही झाली आहेत. अशा प्रकारे, मानवी धारणांनुसार व मानवी अंतःकरणात, माझी वचने कायम अगम्य आहेत आणि माझे हृदय कायम अथांग आहे. म्हणजेच, मी मनुष्यांना त्यांच्या धारणा आणि विचारातून बाहेर काढले पाहिजे. माझ्या व्यवस्थापन योजनेतील ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. माझ्या ज्येष्ठ पुत्रांना प्राप्त करण्यासाठी आणि मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्य करण्यासाठी मी हे अशाप्रकारे केले पाहिजे.

जगातील अनर्थ दिवसेंदिवस वाढत आहेत आणि माझ्या घरात, आपत्तीजनक अनर्थ अधिक शक्तिशाली होत आहेत. लोकांकडे खरोखर लपण्यासाठी कोणतीही जागा नाही, स्वतःला लपवण्यासाठी कोणतीही जागा नाही. कारण सध्या स्थित्यंतर घडत आहे, लोक त्यांचा पुढचा टप्पा कुठे पार करतील हे त्यांना माहीत नाही. हे माझ्या न्यायनिवाड्यानंतरच स्पष्ट होईल. लक्षात ठेवा! हे माझ्या कार्याचे टप्पे आहेत व मी याच पद्धतीने कार्य करतो. मी माझ्या सर्व ज्येष्ठ पुत्रांचे एक एक करून सांत्वन करेन आणि त्यांना एक एक पायरी उन्नत करेन; सेवा करणार्‍यांसाठी, मी त्या सर्वांना एक एक करून बाहेर काढून टाकेन आणि त्यांचा त्याग करेन. हा माझ्या व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. सर्व सेवा करणारे प्रकट झाल्यावर माझे ज्येष्ठ पुत्रही प्रकट होतील. (माझ्यासाठी, हे अत्यंत सोपे आहे. त्यांनी माझी वचने ऐकल्यानंतर, ते सर्व सेवा करणारे माझ्या वचनांच्या न्यायापुढे व धमकीपुढे हळूहळू माघार घेतील आणि फक्त माझे ज्येष्ठ पुत्रच राहतील. ही काही ऐच्छिक गोष्ट नाही किंवा मानवी इच्छेने बदलू शकेल अशी ही गोष्ट नाही; उलट, हा माझा आत्मा वैयक्तिकरीत्या कार्य करत आहे.) ही काही दूरची घटना नाही व माझ्या कार्याच्या आणि माझ्या वचनांच्या या टप्प्यातून तुम्हाला ते काही प्रमाणात जाणवले पाहिजे. मी इतके का बोलेन, तसेच माझ्या उच्चारांचे अप्रत्याशित स्वरूप, लोकांसाठी अनाकलनीय आहे. मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांशी सांत्वन, दया व प्रेमाच्या स्वरात बोलतो (कारण मी या लोकांना नेहमी ज्ञान देतो आणि मी त्यांना सोडणार नाही, कारण मी त्यांना पूर्वनिश्चित केले आहे), तर मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांव्यतिरिक्त इतर लोकांशी कठोर न्यायाने वागतो, धमक्या देतो आणि दहशतीमध्ये ठेवतो, त्यांना सतत इतकी भीती वाटू लागते की ते नेहमी सतर्क असतात. परिस्थिती काही प्रमाणात विकसित झाल्यानंतर, ते या अवस्थेतून सुटतील (जेव्हा मी जगाचा नाश करेन, तेव्हा हे लोक अथांग खड्ड्यात असतील), तरीही ते माझ्या न्यायाच्या पंज्यातून सुटणार नाहीत किंवा या परिस्थितीतून मुक्त होणार नाहीत. तर, हा त्यांचा निर्णय आहे; ही त्यांची सुधारणूक आहे. ज्या दिवशी परदेशी लोक येतील, त्या दिवशी मी या लोकांना एक-एक करून उघडकीस आणेन. हे माझ्या कार्याचे टप्पे आहेत. त्या वचनांच्या मागील माझ्या उच्चारांचा हेतू आता तुम्हाला समजला आहे का? माझ्या मते, अपूर्ण असलेली एखादी गोष्टदेखील पूर्ण झाली आहे, परंतु जी गोष्ट पूर्ण झाली आहे ती काही साध्य झाली आहे असे नाही. याचे कारण असे आहे, की माझ्याकडे माझे शहाणपण व माझी कार्यपद्धती आहे, जी मनुष्य सहज समजू शकत नाही. मी या टप्प्यावर परिणाम साध्य केल्यानंतर (माझा विरोध करणार्‍या सर्व दुष्टांना मी उघडकीस आणेन तेव्हा), मी पुढचा टप्पा सुरू करेन, कारण माझी इच्छा निर्विघ्न आहे आणि कोणीही माझ्या व्यवस्थापन योजनेत अडथळा आणण्याचे धाडस करत नाही व कोणतेही अडथळे समोर आणण्याचे धाडस करत नाही—त्या सर्वांनी मार्ग मोकळा केला पाहिजे! महान अग्निवर्ण अजगराच्या पुत्रांनो, माझे ऐका! मी सियोनामधून आलो आणि माझ्या ज्येष्ठ पुत्रांना प्राप्त करण्यासाठी, तुमच्या वडिलांचा अपमान करण्यासाठी (ही वचने अग्निवर्ण अजगराच्या वंशजांना उद्देशून आहेत), माझ्या ज्येष्ठ पुत्रांना आधार देण्यासाठी व माझ्या ज्येष्ठ पुत्रांवर झालेल्या अन्यायाचा न्यायनिवाडा करण्यासाठी मी जगात देहधारी झालो. म्हणूनच, पुन्हा क्रूर होऊ नका; मी माझ्या ज्येष्ठ पुत्रांना तुमच्याशी व्यवहार करू देईन. भूतकाळात, माझ्या पुत्रांवर अत्याचार झाला आणि त्यांच्यावर दडपण आणले होते व पित्याने त्याच्या पुत्रांसाठी सत्ता चालवल्यामुळे, माझे पुत्र माझ्या प्रेमळ मिठीत परत येतील, यापुढे त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत आणि दडपण आणले जाणार नाही. मी अनीतिमान नाही; हे माझे नीतिमत्त्व दाखवते व ते खरोखरच “मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर प्रेम करणे आणि मी ज्यांचा द्वेष करतो त्यांचा द्वेष करणे” आहे. मी अनीतिमान आहे असे म्हणाल, तर तुम्ही त्वरा करावी व बाहेर निघून जावे. माझ्या घरात निर्लज्ज आणि फुकटे होऊ नका. तू घाईने तुझ्या घरी परत गेले पाहिजेस जेणेकरून, मला तुला पुन्हा पाहावे लागणार नाही. अथांग खड्डा हे तुमचे गंतव्यस्थान आहे व तुम्ही तिथेच विश्रांती घ्याल. जर तुम्ही माझ्या घरात असाल, तर तुमच्यासाठी जागा राहणार नाही, कारण तुम्ही ओझे असलेले प्राणी आहात, मी वापरत असलेली साधने आहात. जेव्हा मला तुमचा काही उपयोग राहणार नाही, तेव्हा तुम्हाला जाळून टाकण्यासाठी मी तुम्हाला आगीत टाकेन. हा माझा प्रशासकीय आदेश आहे; मी हे अशा प्रकारे केले पाहिजे आणि केवळ हेच मी ज्या पद्धतीने कार्य करतो ते दर्शवते व माझे नीतिमत्त्व आणि माझे वैभव प्रकट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केवळ अशा प्रकारे माझ्या ज्येष्ठ पुत्रांना माझ्याबरोबर सत्तेवर राज्य करण्याची अनुमती दिली जाईल.

मागील:  ख्रिस्ताचे सुरुवातीचे उच्चारण—अध्याय ८८

पुढील:  संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय ४

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger