अध्याय १०८
माझ्या अंतःकरणात, सर्वांना विश्रांती मिळू शकते आणि सर्वांना स्वातंत्र्य मिळू शकते. जे माझ्या बाहेर आहेत त्यांना स्वातंत्र्य किंवा आनंद मिळू शकत नाही, कारण माझा आत्मा त्यांच्यासोबत नाही. अशा लोकांना आत्माहीन मृत म्हटले जाते, तर जे माझ्यामध्ये आहेत त्यांना मी “आत्म्याने युक्त जिवंत प्राणी” म्हणतो. ते माझे आहेत व ते माझ्या सिंहासनाकडे परत येतील. जे सेवा करतात आणि जे सैतानाचे आहेत ते आध्यात्मिक मृत आहेत व त्या सर्वांना नष्ट केले पाहिजे व शून्य केले पाहिजे. हे माझ्या व्यवस्थापन योजनेचे रहस्य आहे व माझ्या व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे जो मानवजात समजू शकत नाही; तथापि, त्याच वेळी, मी हे सर्वांसाठी सार्वजनिक केले आहे. जे माझे नाहीत ते माझ्या विरुद्ध आहेत. जे माझे आहेत तेच माझ्याशी सुसंगत आहेत. हे पूर्णपणे निर्विवाद आहे व सैतानाच्या माझ्या न्यायामागील हेच तत्त्व आहे. हे तत्त्व सर्वांना माहीत असले पाहिजे, जेणेकरून ते माझे नीतिमत्व आणि न्याय पाहू शकतील. सैतानाकडून आलेल्या प्रत्येकाचा न्याय केला जाईल, त्याला जाळले जाईल व त्याची राख होईल. हादेखील माझा क्रोध आहे आणि यावरून माझी प्रवृत्ती आणखी स्पष्ट केली जाते. यापुढे माझी प्रवृत्ती उघडपणे जाहीर केली जाईल; ती हळूहळू सर्व लोकांसमोर व सर्व राष्ट्रे, सर्व धर्म, सर्व संप्रदाय आणि सर्व स्तरातील व्यक्तींसमोर प्रकट केली जाईल. काहीही लपून राहणार नाही; सर्व उघड होईल. कारण माझी प्रवृत्ती व माझ्या कृतींमागील तत्त्व हे मानवजातीसाठी सर्वात गुप्त रहस्य आहे, त्यामुळे मी हे केलेच पाहिजे (जेणेकरून ज्येष्ठ पुत्र माझ्या प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणार नाहीत आणि सर्व लोकांचा व सर्व राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी माझ्या प्रकट प्रवृत्तीचा वापर करता येईल). ही माझी व्यवस्थापन योजना आहे आणि हे माझ्या कार्याचे टप्पे आहेत. कोणीही ते सहजासहजी बदलू नयेत. मी माझ्या मानवतेमध्ये माझ्या देवत्वाची संपूर्ण प्रवृत्ती आधीच जगली आहे, म्हणूनच मी कोणालाही माझ्या मानवतेला अपमानित करण्याची अनुमती देत नाही. (मी जे काही जगतो ती दैवी प्रवृत्ती आहे; याच कारणामुळे मी पूर्वी सांगितले आहे, की मी स्वतः देव आहे जो सामान्य मानवतेच्या पलीकडे गेला आहे.) जो कोणी मला दुखावतो त्याला मी नक्कीच क्षमा करणार नाही व मी त्याचा अनंतकाळासाठी नाश करेन! लक्षात ठेवा! हे मी ठरवले आहे; दुसऱ्या शब्दांत, माझ्या प्रशासकीय आदेशांचा हा एक अपरिहार्य भाग आहे. प्रत्येकाने हे पहावे: मी जी व्यक्ती आहे तो देव आहे आणि त्याशिवाय, स्वतः देव आहे. हे आतापर्यंत स्पष्ट झाले पाहिजे! मी निष्काळजीपणे काही बोलत नाही. जोपर्यंत तुला पूर्ण समज प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी सर्व काही स्पष्टपणे उच्चारतो व दाखवतो.
परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे; केवळ माझ्या घरातच नाही, तर त्याहूनही अधिक, माझ्या घराच्या बाहेर, तुम्ही माझ्या नावाचे साक्षीदार व्हावे, माझ्यासाठी जगावे आणि सर्व बाबींमध्ये माझे साक्षीदार व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. कारण ही शेवटची वेळ आहे, आता सर्वकाही तयार आहे व प्रत्येक गोष्ट त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवते आणि यापैकी काहीही कधीही बदलणार नाही. ज्यांना काढून टाकले पाहिजे ते काढून टाकले जातील व ज्यांना ठेवले पाहिजे ते ठेवले जातील. जबरदस्तीने धरून ठेवण्याचा किंवा दूर ढकलण्याचा प्रयत्न करू नका; माझ्या व्यवस्थापनात व्यत्यय आणण्याचा अथवा माझी योजना नष्ट करण्याचा प्रयत्न करू नका. मानवी दृष्टिकोनातून, मी मानवजातीबद्दल नेहमीच प्रेमळ आणि दयाळू असतो, परंतु माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या कार्याच्या टप्प्यांनुसार माझी प्रवृत्ती वेगळी आहे, कारण मी स्वतः व्यावहारिक देव आहे; मी स्वतः अद्वितीय देव आहे! मी अपरिवर्तनीय व सतत बदलणारा दोन्ही आहे. ही अशी गोष्ट आहे जी कोणीही समजू शकत नाही. जेव्हा मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन आणि तुम्हाला ते समजावून सांगेन, तेव्हाच तुम्हाला ते स्पष्टपणे समजेल व ते समजण्यास तुम्ही सक्षम व्हाल. माझ्या पुत्रांसाठी, मी प्रेमळ, दयाळू, नीतिमान आणि शिस्तप्रिय आहे, परंतु न्याय करणारा नाही (आणि याचा अर्थ असा आहे, की मी ज्येष्ठ पुत्रांचा नाश करत नाही). माझ्या पुत्रांव्यतिरिक्त इतर लोकांसाठी, मी युगांच्या बदलानुसार कधीही बदलतो: मी प्रेमळ, दयाळू, नीतिमान, उदात्त, न्याय करणारा, क्रोध करणारा, शाप देणारा, ज्वलंत व शेवटी, त्यांच्या देहाचा विनाश करणारा असू शकतो. ज्यांचा नाश केला जातो, ते त्यांच्या आत्म्यासह आणि सत्वासह नष्ट होतील. तथापि, जे सेवा करतात त्यांच्यासाठी, फक्त त्यांचे आत्मे व सत्व राखले जातील (आणि मी हे कसे आचरणात आणले याबद्दलच्या तपशीलांबद्दल, मी तुम्हाला नंतर सांगेन, जेणेकरून तुम्हाला समजेल). तथापि, त्यांना कधीही स्वातंत्र्य मिळणार नाही आणि त्यांना कधीही सोडले जाणार नाही, कारण ते माझ्या लोकांच्या खाली आहेत व माझ्या लोकांच्या नियंत्रणात आहेत. मी सेवेकऱ्यांचा इतका तिरस्कार करण्याचे कारण म्हणजे, ते सर्व अग्निवर्ण अजगराचे वंशज आहेत आणि जे सेवेकरी नाहीत तेदेखील अग्निवर्ण अजगराचे वंशज आहेत. दुसऱ्या शब्दांत, सर्व लोक जे ज्येष्ठ पुत्र नसतात ते अग्निवर्ण अजगराचे वंशज आहेत. जेव्हा मी म्हणतो, की नरकवासातील लोक माझी अनंत स्तुती करतात, तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होतो, की ते सर्वकाळ माझी सेवा करतील. ही दगडावरची रेघ आहे. ते लोक नेहमी गुलाम, गुरेढोरे व घोडे राहतील. मी त्यांचा कधीही वध करू शकतो आणि माझ्या इच्छेनुसार मी त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकतो, कारण ते अग्निवर्ण अजगराचे वंशज आहेत व त्यांच्यात माझी प्रवृत्ती नाही. तसेच ते अग्निवर्ण अजगराचे वंशज असल्यामुळे त्यांची प्रवृत्तीही तशीच आहे; म्हणजे, त्यांच्याकडे पशूंची प्रवृत्ती आहे. हे अगदी खरे आहे आणि कायम अपरिवर्तनीय आहे! कारण हे सर्व माझ्याकडून पूर्वनियोजित होते. कोणीही ते बदलू शकत नाही (म्हणजेच, मी कोणालाही या नियमाविरुद्ध वागू देणार नाही); तू प्रयत्न केलास तर मी तुला मारून टाकेन!
माझी व्यवस्थापन योजना आणि माझे कार्य कोणत्या टप्प्यावर पोहोचले आहे हे पाहण्यासाठी मी उघड केलेले रहस्य तुम्ही पाहिले पाहिजे. मी माझ्या हातांनी काय करतो ते पहा व माझे न्याय आणि माझा क्रोध कोणत्या लोकांवर पडतो ते पहा. हे माझे नीतिमत्व आहे. मी माझ्या कार्याची मांडणी आणि माझ्या योजनेचे व्यवस्थापन मी उघड केलेल्या रहस्यांनुसार करतो. हे कोणीही बदलू शकत नाही; ते माझ्या इच्छेनुसार, टप्प्याटप्प्याने केले पाहिजे. रहस्ये म्हणजे माझे कार्य ज्या मार्गावर चालते ते मार्ग आहेत आणि ते माझ्या व्यवस्थापन योजनेतील पायऱ्या दर्शवणारे संकेत आहेत. माझ्या रहस्यांमध्ये कोणीही काहीही जोडू किंवा वजा करू नये, कारण जर रहस्य चुकीचे असेल, तर मार्ग चुकीचा आहे. मी माझी रहस्ये तुमच्यासमोर का प्रकट करत आहे? काय कारण आहे? तुमच्यापैकी कोण स्पष्टपणे सांगू शकेल? शिवाय, मी म्हटले आहे, की रहस्ये हाच मार्ग आहे, तर या मार्गाचा अर्थ काय? ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही देहातून शरीरात जात असता व हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मी माझी रहस्ये उघड केल्यानंतर, लोकांच्या धारणा हळूहळू काढून टाकल्या जातात आणि त्यांचे विचार हळूहळू कमकुवत होतात. ही आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे, मी म्हणतो की माझे कार्य टप्प्याटप्प्याने होते व ते अस्पष्ट नाही; ही वास्तविकता आहे आणि ही माझी कार्य करण्याची पद्धत आहे. हे कोणीही बदलू शकत नाही किंवा इतर कोणीही ते साध्य करू शकत नाही, कारण मी स्वतः अद्वितीय देव आहे! माझे कार्य मी वैयक्तिकरीत्या पूर्ण केले आहे. संपूर्ण ब्रम्हांडाचे नियंत्रण मी एकटा करतो व मी एकट्याने त्याची व्यवस्था करतो. माझे बोलणे न ऐकण्याचे धाडस कोण करतो? (“मी एकटा” म्हणजे स्वतः देव असे मला म्हणायचे आहे, कारण मी जो मनुष्य आहे तो स्वतः देव आहे—म्हणून तुमच्या स्वतःच्या धारणांना इतके घट्ट धरून राहू नका.) माझ्याविरुद्ध जाण्याची कोणाची हिंमत आहे? त्यांना कठोर शिक्षा होईल! तुम्ही अग्निवर्ण अजगराचा परिणाम पाहिला आहे! तो त्याचा शेवट आहे, पण ती एक अपरिहार्यताही आहे. हे कार्य मी स्वतः केले पाहिजे, जेणेकरून अग्निवर्ण अजगर लज्जित होईल. तो पुन्हा कधीही उठू शकणार नाही आणि तो अनंतकाळासाठी नष्ट होईल! आता मी रहस्ये उघड करू लागलो आहे. (लक्षात ठेवा! उलगडून दाखवलेली बहुतेक रहस्ये म्हणजे अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही अनेकदा बोलता पण ते कोणालाच समजत नाही). मी असे म्हटले आहे, की लोकांच्या नजरेला ज्या गोष्टी अपूर्ण दिसतात त्या माझ्या नजरेत पूर्ण झाल्या आहेत व ज्या गोष्टी मला नुकत्याच सुरू झाल्यासारख्या वाटतात, त्या लोकांना आधीच पूर्ण झाल्यासारख्या वाटतात. हे विरोधाभासी आहे का? तसे नाही. लोक स्वतःच्या धारणा आणि विचार यामुळे अशा प्रकारे विचार करतात. मी ज्या गोष्टींची योजना आखली आहे त्या माझ्या वचनांद्वारे पूर्ण केल्या जातात (जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या स्थापित होतात व जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्या पूर्ण होतात). तथापि, मी सांगितलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत असे मला वाटत नाही. कारण मी करत असलेल्या गोष्टींना कालमर्यादा असते. अशा प्रकारे, मला या गोष्टी अपूर्ण वाटतात, जरी लोकांच्या दैहिक नजरेत (त्यांच्या काळाच्या संकल्पनेतील फरकांमुळे) या गोष्टी आधीच पूर्ण झाल्या असतात. मी उघड केलेल्या रहस्यांमुळे आजकाल बहुतेक लोक माझ्यावर संशय घेतात. वास्तविकतेची सुरुवात झाल्यामुळे व माझे हेतू लोकांच्या धारणांशी जुळत नसल्यामुळे, ते मला विरोध करतात आणि मला नाकारतात. हा स्वतःच्याच डावपेचांमध्ये अडकणारा सैतान आहे. (त्यांना आशीर्वाद प्राप्त करायचे असतात, परंतु देव त्यांच्या स्वतःच्या धारणांच्या मर्यादेच्या इतक्या बाहेर असेल अशी त्यांना अपेक्षा नव्हती, म्हणून ते माघार घेतात.) हादेखील माझ्या कार्याचा परिणाम आहे. सर्व लोकांनी माझी स्तुती केली पाहिजे, माझा जयजयकार केला पाहिजे व माझा गौरव केला पाहिजे. सर्व काही माझ्या हातात आहे आणि सर्व काही माझ्या न्यायामध्ये आहे. जेव्हा सर्व लोक माझ्या पर्वतावर येतील व जेव्हा ज्येष्ठ पुत्र विजयी होऊन परततील, तेव्हा माझ्या व्यवस्थापन योजनेचा शेवटचा भाग असेल. माझ्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेला पूर्ण करण्याचा हा क्षण असेल. सर्व काही मी वैयक्तिकरीत्या व्यवस्थापित केले आहे; हे मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. तुम्ही अजूनही तुमच्या धारणांमध्ये राहत असल्याने, मी यावर वारंवार जोर देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्ही येथे माझ्या योजनेत व्यत्यय आणू शकणार्या कोणत्याही चुका करणार नाहीत. लोक मला मदत करू शकत नाहीत किंवा ते माझ्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण तुम्ही सध्या रक्तामांसाचे आहात (जरी तुम्ही माझे आहात, तरीही तुम्ही देहात जगता). म्हणूनच, मी म्हणतो की जे रक्तामांसाचे आहेत त्यांना माझा वारसा मिळू शकत नाही. तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करवण्याचे हेदेखील मुख्य कारण आहे.
जगात भूकंप होणे ही आपत्तीची सुरुवात आहे. प्रथम, मी जगाला—म्हणजेच पृथ्वीला बदलतो, आणि नंतर प्लेग आणि उपासमार येतात. ही माझी योजना आहे व हे माझे टप्पे आहेत आणि माझी व्यवस्थापन योजना पूर्ण करण्यासाठी मी सर्व काही माझ्या सेवेसाठी एकत्रित करेन. अशा प्रकारे, संपूर्ण ब्रम्हांडाचा, अगदी माझ्या थेट हस्तक्षेपाशिवाय नाश होईल. जेव्हा मी प्रथम देह धारण केला व मला वधस्तंभावर खिळले गेले, तेव्हा पृथ्वी प्रचंड हादरली आणि जेव्हा शेवट येईल, तेव्हाही तेच होईल. ज्या क्षणी मी देहातून आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करेन त्याच क्षणी भूकंप सुरू होतील. अशा प्रकारे, ज्येष्ठ पुत्रांना आपत्तीचा मुळीसुद्धा सामना करावा लागणार नाही, तर जे ज्येष्ठ पुत्र नाहीत त्यांना आपत्तींमध्ये त्रास सहन करावा लागेल. म्हणूनच, मानवी दृष्टिकोनातून, प्रत्येकजण ज्येष्ठ पुत्र बनण्यास इच्छुक आहे. लोकांच्या अशुभ संकेतांमध्ये, हे आशीर्वादाचा आनंद घेण्यासाठी नाही, तर आपत्तीच्या दुःखापासून वाचण्यासाठी आहे. हे अग्निवर्ण अजगराचे षड्यंत्र आहे. तथापि, मी त्याला कधीही सोडणार नाही; मी त्याला माझी कठोर शिक्षा भोगायला लावेन व नंतर माझी सेवा करून घेईन (याचा अर्थ माझ्या पुत्रांना आणि माझ्या लोकांना परिपूर्ण बनवेन), ज्यामुळे तो कायमचा स्वतःच्याच षड्यंत्रामध्ये अडकेल, कायमचा माझा न्याय स्वीकारेल व माझ्याकडून कायमचा जाळला जाईल. सेवेकऱ्यांनी माझी स्तुती करणे (म्हणजे माझी महान शक्ती प्रकट करण्यासाठी त्यांचा वापर करणे) याचा हा खरा अर्थ आहे. मी अग्निवर्ण अजगराला माझ्या राज्यात डोकावू देणार नाही किंवा मी त्याला माझी स्तुती करण्याचा अधिकार देणार नाही! (कारण तो त्यासाठी योग्य नाही; तो कधीही योग्य होणार नाही!) मी फक्त अनंतकाळपर्यंत माझ्यासाठी अग्निवर्ण अजगराची सेवा स्वीकारेन! मी त्याला फक्त माझ्यापुढे दंडवत घालू देईन. (जे लोक नरकवासात आहेत त्यांच्यापेक्षा ज्यांचा नाश झाला आहे ते चांगले आहेत; विनाश हा फक्त तात्पुरता गंभीर शिक्षेचा प्रकार आहे, तर जे लोक नरकवासात आहेत त्यांना अनंतकाळपर्यंत कठोर शिक्षा भोगाव्या लागतील. या कारणास्तव, मी “दंडवत” हा शब्द वापरतो. कारण हे लोक माझ्या घरात घुसतात आणि माझ्या कृपेचा भरपूर आनंद घेतात व माझ्याबद्दल काही ज्ञान घेतात, त्यामुळे मी कठोर शिक्षा वापरतो. माझ्या घराबाहेरील लोकांसाठी, तुम्ही म्हणू शकता, की अज्ञानी लोकांना त्रास होणार नाही). लोकांच्या धारणांनुसार, त्यांना असे वाटते की जे लोक नाश पावले आहेत ते नरकवासात असलेल्या लोकांपेक्षा वाईट आहेत, परंतु याउलट, नरकवासातल्या लोकांना कायमची कठोर शिक्षा दिली जाणे आवश्यक आहे आणि ज्यांचा नाश झाला आहे ते अनंतकाळासाठी शून्यात परत येतील.