ख्रिस्ताचे सुरुवातीचे उच्चारण—अध्याय ३

विजयी राजा त्याच्या गौरवशाली सिंहासनावर विराजमान आहे. त्याने सुटका प्राप्त केली आहे आणि त्याच्या सर्व लोकांना गौरवात प्रकट करण्यासाठी नेले आहे. त्याने हे विश्व त्याच्या हातात धरले आहे व त्याच्या दैवी शहाणपणाने आणि सामर्थ्याने त्याने सियोन बांधले आहे व मजबूत केले आहे. त्याच्या वैभवाने तो पापी जगाचा न्याय करतो; त्याने सर्व राष्ट्रे आणि सर्व लोक, पृथ्वी व समुद्र आणि त्यांतील सर्व सजीवांचा न्याय केला आहे, तसेच जे लोक व्यभिचाराच्या द्राक्षरसाच्या नशेत आहेत त्यांचाही न्याय केला आहे. देव त्यांचा निश्‍चितच न्याय करेल व तो निश्चितच त्यांच्यावर रागावेल आणि त्यात देवाचे वैभव प्रकट होईल, ज्याचा न्याय तात्काळ व विलंब न करता केला जाईल. त्याच्या क्रोधाचा अग्नी त्यांच्या अत्यंत गर्हणीय अपराधांना नक्कीच भस्मसात करेल आणि कोणत्याही क्षणी त्यांच्यावर संकट कोसळेल; त्यांना पळून जाण्याचा कोणताही मार्ग कळणार नाही व त्यांना लपण्याची जागा उरणार नाही, ते रडतील आणि क्रोधाने दातओठ खातील व ते स्वतःचाच नाश करतील.

विजयी पुत्र, देवाचे प्रिय, नक्कीच सियोनामध्ये राहतील, ते कधीही तेथून दूर जाणार नाहीत. बहुसंख्य लोक त्याचा आवाज लक्षपूर्वक ऐकतील, ते त्याच्या कृतीकडे काळजीपूर्वक लक्ष देतील आणि त्यांच्या स्तुतीचा नाद कधीही थांबणार नाही. एकच खरा देव प्रकट झाला आहे! आम्ही त्याच्या आत्म्याबद्दल खात्री बाळगू व त्याचे जवळून अनुसरण करू; आम्ही आमच्या सर्व शक्तीने पुढे जाऊ आणि यापुढे संकोच करणार नाही. जगाचा अंत आमच्यासमोर उलगडत आहे; एक योग्य चर्च जीवन तसेच लोक, घडामोडी व आमच्या सभोवतालच्या गोष्टींमुळे आता आमचे प्रशिक्षण अधिक तीव्र होत आहे. जगावर इतके प्रेम करणारी आमची हृदये परत घेण्याची घाई करू या! अस्पष्ट असलेली आमची दृष्टी परत घेण्याची घाई करू या! आम्ही आमची पावले थांबवू, जेणेकरून आम्ही सीमा ओलांडणार नाही. आम्ही आमचे तोंड बंद करू जेणेकरून आम्ही देवाच्या वचनाचे अनुसरण करू शकू आणि यापुढे आमच्या स्वतःच्या नफ्या—तोट्याची स्पर्धा करणार नाही. अरे, लौकिक जगासाठी व संपत्तीसाठी तुझी लोभी आवड सोडून दे! अहो, पती आणि पुत्री व पुत्र यांच्याबद्दलच्या तुझ्या भावनिक ओढीपासून स्वतःला मुक्त कर! अरे, तुझे दृष्टिकोन आणि पूर्वग्रह यांकडे पाठ फिरव! अहो, जागे व्हा; वेळ कमी आहे! वर पाहा, आत्म्याच्या आतून वर पहा व देवाला नियंत्रण घेऊ द्या. काहीही झाले तरी लोटाची दुसरी पत्नी बनू नका. बाजूला काढून टाकणे किती दयनीय आहे! खरंच किती दयनीय! अहो, जागे व्हा!

मागील:  ख्रिस्ताचे सुरुवातीचे उच्चारण—अध्याय २

पुढील:  ख्रिस्ताचे सुरुवातीचे उच्चारण—अध्याय ५

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger