देवच मनुष्याच्या जीवनाचा स्रोत आहे
ज्या क्षणी तू रडत रडत या जगात येतोस, त्या क्षणापासून तू तुझे कर्तव्य पार पाडू लागतोस. देवाच्या योजनेकरिता आणि त्याच्या अधिपत्याखाली, तू तुझी भूमिका पार पाडतोस आणि तुझ्या जीवनाचा प्रवास सुरू करतोस. तुझी पार्श्वभूमी काहीही असो आणि तुझ्या पुढे प्रवास कोणताही असो, स्वर्गाने केलेली रचना आणि व्यवस्था यांपासून कोणीही सुटू शकत नाही आणि कोणीही स्वतःच्या दैवावर नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण सर्व गोष्टींवर राज्य करणारा देवच हे कार्य करण्यास सक्षम आहे. ज्या दिवसापासून मनुष्य अस्तित्वात आला, त्या दिवसापासून देवाने नेहमीच विश्वाचे व्यवस्थापन करणे, सर्व गोष्टींसाठी बदलाचे नियम आणि त्यांच्या हालचालींचे मार्ग निर्देशित करणे, अशा प्रकारे कार्य केले आहे. सर्व गोष्टींप्रमाणे, शांतपणे आणि नकळतपणे, देवाचा गोडवा, पाऊस आणि दव यांद्वारे मनुष्याचे पोषण केले जात असते; सर्व गोष्टींप्रमाणे, मनुष्य नकळत देवाच्या हाताच्या संरचनेखाली जगत असतो. मनुष्याचे हृदय आणि आत्मा देवाने हाती धरलेला असतो, त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाच्या नजरेत असते. तुझा यावर विश्वास असो वा नसो, याची पर्वा न करता, सर्व जिवंत वा मृत गोष्टी, देवाच्या विचारांनुसार बदलतील, परिवर्तित होतील, नवीन रूप घेतील आणि अदृश्य होतील. अशा प्रकारे देव सर्व गोष्टींचे नियंत्रण करत असतो.
जसजशी रात्र हळुहळू जवळ येते, मनुष्य मात्र अनभिज्ञ असतो, कारण रात्र कशी जवळ येते किंवा ती कोठून येते, हे माणसाच्या हृदयाला समजू शकत नाही. रात्र जशी शांतपणे निसटून जाते, तसा माणूस दिवसाच्या प्रकाशाचे स्वागत करतो, पण प्रकाश कोठून आला आणि त्याने रात्रीचा अंधार कसा दूर केला, याबद्दल माणसाला अगदी कमी माहिती आणि जाणीव तर त्याहूनही कमी असते. दिवस आणि रात्रीचे हे सततचे बदल माणसाला एका कालखंडातून दुसर्या कालखंडात, एका ऐतिहासिक संदर्भातून पुढच्या ऐतिहासिक संदर्भाकडे नेतात, त्याचप्रमाणे प्रत्येक कालखंडात देवाचे कार्य आणि प्रत्येक युगासाठी त्याची योजना सुरु राहिल याचीही खातरजमा करतात. मनुष्य या कालखंडांतून देवाच्या बरोबर एकत्र चालला आहे, तरीही देव सर्व गोष्टींच्या आणि सजीवांच्या दैवावर राज्य करतो याची किंवा देव सर्व गोष्टींची मांडणी आणि मार्गदर्शन कसे करतो, याची त्याला कल्पना नसते. अनादी काळापासून आजपर्यंत मानव हे समजण्यास अपयशी झाला आहे. यामुळे नव्हे की, देवाची कृत्ये दिसून येत नाहीत किंवा देवाची योजना अजून अपूर्ण आहे; तर यामुळे की, मनुष्य हृदयाने आणि आत्म्याने देवापासून खूप दूर आहे, एवढा की, मनुष्य देवाचे अनुसरण करत असला, तरी सैतानाची सेवा करतो—आणि तरीही त्याला हे माहित नसते. कोणीही सक्रियपणे देवाच्या पाऊलखुणा आणि देवाचे स्वरूप यांचा शोध घेत नाही आणि कोणीही देवाची काळजी आणि देखरेख यामध्ये राहण्यास तयार नाही. त्याऐवजी, ते या जगाशी जुळवून घेण्यासाठी आणि दुष्ट मानवजात पालन करत असलेल्या अस्तित्वाच्या नियमांचा अनुसार करण्यासाठी सैतानावर, दुष्टावर अवलंबून राहू इच्छितात. या टप्प्यावर, मनुष्याचे हृदय आणि आत्मा हे सैतानाला मानवाकडून आदरांजली बनले आहेत आणि सैतानाचे अन्न बनले आहेत. एवढेच नव्हे, मानवी हृदय व आत्मा हे सैतानाचे निवासस्थान आणि कारवायांचे ठिकाण बनले आहे. अशाप्रकारे माणूस नकळतपणे मानव असण्याच्या तत्त्वांबद्दलचे आणि मानवी अस्तित्वाचे मूल्य आणि अर्थ गमावून बसतो. देवाचे नियम आणि देव आणि मनुष्य यांच्यातील करार हळुहळू माणसाच्या हृदयातून नाहीसा होतो आणि तो देवाचा शोध घेणे किंवा त्याच्याकडे लक्ष देणे सोडून देतो. कालांतराने, देवाने आपल्याला का निर्माण केले हेच मनुष्याला समजत नाही किंवा देवाच्या मुखातून आलेले शब्द आणि देवाकडून आलेल्या सर्व गोष्टी त्याला समजत नाहीत. मग मनुष्य देवाच्या नियमांना आणि नियमनांना विरोध करू लागतो आणि त्याचे हृदय आणि आत्मा मृत होतो…. देव त्याने मुळात निर्माण केलेल्या मनुष्याला गमावतो आणि मनुष्य त्याचे मूळ गमावतो: हेच या मानवजातीचे दु:ख आहे. खरं तर, अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत, देवाने मानवजातीसाठी एक शोकांतिका घडवून आणली आहे, ज्यामध्ये माणूस नायक आणि पिडीत दोन्ही आहे. या शोकांतिकेचा दिग्दर्शक कोण आहे याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.
जगाच्या विशाल विस्तारामध्ये, पुन्हा पुन्हा महासागर शेतात झिरपत आहेत, शेते महासागरात घुसखोरी करत आहेत. सर्व गोष्टींमध्ये सर्व गोष्टींचे नियमन करणाऱ्या देवाशिवाय अन्य कोणीही या मानवजातीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्यास समर्थ नाही. या मानवजातीसाठी परिश्रम किंवा तयारी करण्यासाठी कोणीही शक्तिशाली नाही, या मानवजातीला प्रकाशाच्या गंतव्यस्थानाकडे नेणारा आणि पृथ्वीवरील अन्यायांपासून मुक्त करणारा तर अगदीच कोणीही नाही. देव मानवजातीच्या भविष्याबद्दल शोक व्यक्त करतो, मानवजातीच्या पतनाबद्दल तो दुःख करतो आणि मानवजात क्षयाच्या आणि परत फिरता येणार नाही अशा मार्गावर एक एक पाऊल पुढे जात असल्याबद्दल त्याला वेदना होतात. देवाच्या मनावर आघात करून, देवाचा त्याग करून, दुष्टाचा शोध घेणारी ही मानवजात कोणत्या दिशेने जाते आहे, याचा विचार कोणीही केलेला नाही. नेमक्या याच कारणामुळे कोणालाच देवाचा क्रोध जाणवत नाही, कोणी देवाला संतुष्ट करण्याचा मार्ग शोधत नाही किंवा देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत नाही. एवढेच नव्हे, तर कोणीही देवाचे दुःख आणि वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. देवाचा आवाज ऐकूनही, माणूस स्वतःच्या मार्गावर चालत राहतो, देवापासून भरकटत राहतो, देवाची कृपा आणि काळजी टाळतो आणि त्याच्या सत्यापासून दूर राहतो आणि देवाच्या शत्रूला, म्हणजेच सैतानाला जवळ करण्यास प्राधान्य देतो आहे. आणि कोणी विचार केला आहे की—जर मनुष्याने हा आडमुठेपणा कायम ठेवला—तर देव या मानवजातीशी कसे वागेल, ज्या मानवजातीने मागे वळून न पाहता त्याला दूर सारले आहे? देव वारंवर स्मरण आणि उपदेश का करतो आहे, याचे कारण कोणालाच माहित नाही की देवाने मानवाच्या देहाला आणि आत्माला सहन करता येणार नाही असे यापुर्वी कधीही न आलेले संकट आधीच त्याच्या हातात तयार करून ठेवले आहे. ही आपत्ती म्हणजे केवळ देहासाठीच नव्हे, तर आत्म्यासाठीही शिक्षा आहे. तुला हे माहित असणे आवश्यक आहे: जेव्हा देवाची योजना अयशस्वी होते, जेव्हा त्याने करून दिलेल्या आठवणींकडे आणि उपदेशांकडे लक्ष दिले जात नाही, तेव्हा तो कोणत्या प्रकारे संताप व्यक्त करेल? तो कोणत्याही निर्मित जीवाने यापुर्वी कधीही अनुभवला अथवा ऐकलेला नाही, असा असेल. म्हणून मी म्हणतो, ही आपत्ती पूर्वी कधीही आलेली नव्हती आणि तिची कधीही पुनरावृत्ती होणार नाही. कारण देवाची योजना मानवजातीला फक्त एकदाच निर्माण करण्याची आहे आणि मानवजातीला फक्त एकदाच वाचवण्याची आहे. ही पहिलीच वेळ आहे आणि ती शेवटचीदेखील आहे. म्हणून, या वेळी देव मानवजातीला ज्या कष्टपूर्वक हेतूने आणि उत्कट अपेक्षेने वाचवत आहे, हे कोणीही समजू शकत नाही.
देवाने हे जग निर्माण केले आणि माणसाला, एका जिवंत प्राण्याला या जगात आणले, त्याला जीवन दिले. पुढे, माणसाला आई-वडील आणि नातेवाईक आले. त्यानंतर तो कधीच एकटा राहिला नाही. मनुष्याने सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा या भौतिक जगाकडे नजर टाकली, तेव्हापासून तो परमेश्वराच्या अधिपत्याखाली राहणार हे निश्चित झाले. देवाकडून प्राप्त झालेला जीवनाचा श्वास प्रत्येक जिवंत प्राण्याला त्याच्या प्रौढत्वापर्यंतच्या वाढीदरम्यान आधार देतो. मात्र या प्रक्रियेदरम्यान, मनुष्य देवाच्या देखरेखीखाली वाढत आहे, याची कोणालाही जाणीव नसते; उलट, त्यांना असे वाटते की, माणूस आपल्या पालकांच्या प्रेमळ देखभालीखाली वाढत आहे आणि त्याची स्वतःची जीवनप्रवृत्ती त्याच्या वाढीला दिशा देत आहे. कारण, आपल्याला जीवन कोणी दिले किंवा ते कोठून आले, हे मनुष्याला बिलकुल माहीत नसते आणि जीवनाची प्रवृत्ती ज्या मार्गांनी चमत्कार घडवते त्याबद्दल त्याला फारच कमी माहिती असते. त्याला एवढेच माहीत असते की, अन्नाच्या आधारावरच त्याचे जीवन सुरु आहे, चिकाटीमुळेच तो टिकून आहे आणि त्याच्या मनातील श्रद्धेच्या बळावरच त्याचे जगणे अवलंबून आहे. देवाची कृपा आणि त्याने दिलेल्या गोष्टींबद्दल मनुष्य पूर्णपणे अनभिज्ञ असतो आणि अशा प्रकारे तो देवाने दिलेले जीवन व्यर्थ घालवतो…. देव ज्या मानवजातीची रात्रंदिवस काळजी घेतो, त्यापैकी एकही जण देवाची उपासना करण्याची जबाबदारी स्वत:वर घेत नाही. देव केवळ त्याच्या योजनेनुसार मनुष्यावर काम करत राहतो, त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. कधी तरी मनुष्य आपल्या स्वप्नातून जागा होईल आणि त्याला अचानक जीवनाचे मोल आणि त्याचा अर्थ जाणवेल, देवाने त्याला जे काही दिले आहे, त्यासाठी मोजलेली किंमत त्याच्या लक्षात येईल, या आशेवर तो हे कार्य सुरू ठेवतो आणि देव आतुरतेने मनुष्य आपल्याकडे परत वळण्याची वाट पाहत आहे. मनुष्याच्या जीवनाची उत्पत्ती आणि सातत्य यांचे नियंत्रण करणार्या रहस्यांकडे कोणीही कधीही लक्ष दिलेले नाही. मात्र हे सर्व ज्ञात असणारा देव मनुष्याकडून मिळणाऱ्या जखमा आणि वार केवळ शांतपणे सहन करतो, देवाकडूनच सर्व काही प्राप्त करूनही देणाऱ्याबद्दल मनुष्य कृतज्ञ नाही. मनुष्य त्याच्या आयुष्यात आलेल्या सर्व गोष्टींचा स्वाभाविकपणे आनंद घेतो आणि तितक्याच “स्वाभाविकपणे” देवाचा विश्वासघात करतो, त्याला विसरतो, त्याला लुटतो. असे असेल का, की देवाची योजना खरोखरच इतकी महत्त्वाची आहे? असे असेल का, की मनुष्य, देवानेच घडवलेला हा जीव, खरोखरच एवढा महत्त्वाचा आहे? देवाची योजना निश्चितच महत्त्वाची आहे; परंतु, देवाने निर्माण केलेला हा जीवदेखील देवाच्या योजनेकरिताच अस्तित्वात आहे. त्यामुळे, मानवजातीच्या द्वेषापोटी देव स्वतःचीच योजना वाया घालवू शकत नाही. आपल्या योजनेसाठी आणि आपण सोडलेल्या श्वासासाठी देव या सर्व यातना सहन करतो, मनुष्याच्या देहासाठी नव्हे तर मनुष्याच्या जीवनासाठी तो सर्व यातना सहन करतो. मनुष्याचा देह परत घेण्यासाठी नव्हे, तर त्याच्या उच्छ्वासाने दिलेल्या जीवनासाठी तो असे करतो. ही त्याची योजना आहे.
या जगात येणाऱ्या सगळ्यांना जीवन आणि मृत्यू यातून जावे लागते आणि त्यापैकी बहुतेक जण मृत्यू आणि पुनर्जन्म या चक्रातून गेले आहेत. जे जिवंत आहेत ते लवकरच मरण पावतील आणि मरण पावलेले लवकरच परत येतील. हे सर्व चक्र म्हणजे प्रत्येक जीवासाठी देवाने आखलेला जीवनक्रम आहे. तरीही, देवाची अशी इच्छा आहे की हा मार्ग आणि हे चक्र, हे नेमके सत्य मनुष्याने पाहावे: देवाने मानवाला दिलेले जीवन असीम आहे, भौतिकता, काळ किंवा अवकाश यांच्या बंधनातून मुक्त आहे. देवाने मानवाला दिलेल्या जीवनाचे हे रहस्य आहे आणि जीवन त्याच्याकडून आले आहे याचा हा पुरावा आहे. जीवन देवाने दिले, यावर अनेक जण कदाचित विश्वास ठेवत नाहीत, त्याचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास असो वा नसो पण देवाने दिलेल्या सर्व गोष्टींचा मनुष्य अपरिहार्यपणे आनंद घेत असतो. जर एखाद्या दिवशी देवाचा विचार अचानक बदलला आणि त्याने जगात अस्तित्वात असलेले सर्व काही परत घेण्याचे ठरवले, त्याने दिलेले जीवन परत घेण्याचे ठरवले, तर काहीच उरणार नाही. सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टी पुरवण्यासाठी देव त्याचे जीवन वापरतो, आपल्या सामर्थ्याने आणि अधिकाराने सर्व काही सुव्यवस्थित करतो. या सत्याची कोणी कल्पना करू शकत नाही किंवा कोणी ते समजू शकत नाही. ही अनाकलनीय सत्ये हीच देवाच्या जीवन शक्तीचे प्रकटीकरण आणि पुरावा आहेत. आता मी तुला एक गुपित सांगतो: देवाच्या जीवनाची महानता आणि त्याच्या जीवनाची शक्ती यांचा थांग कोणत्याही प्राण्याला लागत नाही. भूतकाळात हे असेच होते, तसेच आताही आहे आणि येणाऱ्या काळातही ते तसेच असेल. मी सांगणार असलेले दुसरे रहस्य हे आहे: देवाने निर्मिलेल्या सर्व जीवांसाठी जीवनाचा स्रोत देवाकडून येतो, मग जीवनाचे स्वरूप किंवा रचना याबाबतीत ते जीव परस्परांपासून कितीही भिन्न असोत; तू कोणत्याही प्रकारचा सजीव असलास, तरी देवाने ठरवलेल्या जीवन मार्गाच्या विरोधात जाऊ शकत नाहीस. कोणत्याही परिस्थितीत, माणसाने हे समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे: देवाने काळजी, देखरेख केली नाही, काही दिले नाही, तर मनुष्याला जे प्राप्त करायचे असेल, ते सर्व प्राप्त करता येणार नाही, त्याने कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरीही. देवाने जीवन दिले नाही, तर मनुष्याच्या जगण्यातील मुल्याची जाणीव हरवते आणि जीवनाचा अर्थाची जाणीव देखील हरवून बसतो. माणूस आपल्या जीवनातील मूल्य फूकाफुकी हरवून बसतो, पण देव त्याला इतके बेफिकीर कसे होऊ देईल? मी आधी म्हटल्याप्रमाणे: देवच तुझ्या जीवनाचा स्त्रोत आहे, हे विसरू नकोस. देवाने दिलेल्या सर्व गोष्टींची कदर मनुष्याने केली नाही, तर देवाने सुरुवातीला जे दिले तेच तो परत घेईल, एवढेच नव्हे, तर त्याने मनुष्याला दिलेल्या सर्व गोष्टी दामदुप्पटीने परतफेड करायला लावेल.
२६ मे २००३