तुम्ही तुमच्या कृत्यांचा विचार केला पाहिजे

तुमचे जीवनातील प्रत्येक कृत्य आणि कृती दर्शविते की, तुम्हाला परिपूर्ण बनवण्यासाठी माझ्या वचनांच्या उताऱ्याने तुम्हाला दररोज पुन्हा भरण्यात आले पाहीजे, कारण तुमच्यात खूप कमतरता आहे आणि ज्ञान आणि प्राप्त करण्याची तुमची क्षमता खूपच कमी आहे. दैनंदिन जीवनात, तुम्ही अशा वातावरणात आणि परिसरात जगता ज्यामध्ये सत्य किंवा सद्बुद्धीचा अभाव आहे. तुमच्याकडे जगण्यासाठी भांडवल नाही आणि मला किंवा सत्याला जाणून घेण्याचा आधारदेखील नाही. तुमचा विश्वास हा केवळ अस्पष्ट आणि अमूर्त विश्वास किंवा अत्यंत अभिनिवेषी ज्ञान आणि धार्मिक विधी यावर रचला गेला आहे. मी दररोज तुमच्या हालचाली पाहतो, तुमचे हेतू आणि वाईट फळे तपासतो. पण मला असा एकही माणूस सापडलेला नाही, जो माझ्या कायम अढळ असलेल्या वेदीवर खऱ्या अर्थाने त्याचे हृदय आणि आत्मा ठेवेल. त्यामुळे अशा मानवजातीसमोर मी व्यक्त करू इच्छित असलेले सर्व शब्द ओतून वेळ वाया घालवण्याची माझी इच्छा नाही; माझ्या हृदयातील योजना या केवळ माझ्या अपूर्ण कार्यासाठी आणि मानवजातीपैकी ज्यांना मला अद्याप वाचवायचे आहे, अशांसाठी आहेत. तरीसुद्धा, जे माझे अनुसरण करतात, त्यांना माझे तारण आणि माझ्या वचनांनी मानवाला दिलेली सत्ये प्राप्त व्हावीत, अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की, एके दिवशी जेव्हा तू डोळे बंद करशील, तेव्हा तुला एक असे क्षेत्र दिसेल जिथे हवेत सुगंध भरला आहे आणि जिवंत पाण्याचे प्रवाह वाहत आहेत—हे काही अंधुक, थंड जग नाही, जिथे काळे ढग आकाशाला दूषित करतात आणि रडण्याचे आवाज कधीही थांबत नाहीत.

प्रत्येक दिवशी, प्रत्येक व्यक्तीचे कृत्य आणि विचार त्या एकाच्या डोळ्यांनी पाहिले जातात आणि त्याच वेळी ते त्यांच्या स्वतःच्या भविष्याच्या तयारीत असतात. हा तोच मार्ग आहे ज्यावरून जगणाऱ्या प्रत्येकाने चालले पाहिजे; हाच मार्ग मी सर्वांसाठी पूर्वनियोजित केला आहे आणि त्यातून कोणीही सुटू किंवा मुक्त होऊ शकत नाही. मी जे शब्द बोललो, ते मोजलेले नाहीत आणि मी जे कार्य केले आहे, त्याचे कसलेही मोजमाप नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या अंगभूत स्वभावाला अनुसरून आणि त्यांच्या स्वभावाच्या विकासाला अनुसरून जे काही करायचे आहे ते नैसर्गिकरित्या पार पाडताना मी दररोज पाहतो. बरेच जण नकळत आधीच “योग्य मार्गावर” आले आहेत, जो मी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना स्पष्ट करण्यासाठी ठेवला आहे. हे विविध प्रकारचे लोक, ज्यांना मी खूप पूर्वीपासून वेगवेगळ्या वातावरणात आणि त्यांच्या संबंधित ठिकाणी ठेवले आहे, त्या प्रत्येकाने त्यांचे अंगभूत गुणधर्म व्यक्त केले आहेत. त्यांना बांधून घालायला कोणी नाही, त्यांना फूस लावायला कोणी नाही. ते पूर्णपणे मुक्त आहेत आणि ते जे व्यक्त करतात ते नैसर्गिकरित्या येते. फक्त एक गोष्ट त्यांना नियंत्रणात ठेवते: माझे शब्द. त्यामुळे काही लोक माझे शब्द कानकुन करतच वाचतात, ते कधीही आचरणात आणत नाहीत, ते केवळ मृत्यू टाळण्यासाठी हे करतात. त्याचवेळी इतरांना मात्र मार्गदर्शन आणि पुरवठ्यासाठी माझे शब्द नसतील, तर दिवस काढणेदेखील कठीण जाते आणि म्हणून ते नेहमीच माझे शब्द घट्ट धरून ठेवतात. जसजसा काळ पुढे सरकतो, तसतसे त्यांना मानवी जीवनाचे रहस्य उमगते, मानवजातीचे गंतव्यस्थान आणि मानव असण्याचे मूल्य कळते. माझ्या शब्दांच्या सान्निध्यात मानवजात अशीच आहे आणि मी फक्त गोष्टी घडतात तशा घडू देतो. माझ्या शब्दांना आपल्या अस्तित्वाचा पाया बनवण्यास लोकांना भाग पाडते, असे कोणतेही काम मी करत नाही. म्हणूनच, ज्यांच्या ठायी कधीच विवेक नव्हता आणि ज्यांच्या अस्तित्वाला कधीच किंमत नव्हती, ते परिस्थिती पाहून माझे शब्द निर्ढावलेपणाने बाजूला सारतात आणि त्यांना हवे तेच करतात. ते सत्याचा आणि माझ्याकडून आलेल्या सर्व गोष्टींचाही तिरस्कार करू लागतात. एवढेच नव्हे, तर त्यांना माझ्या घरात राहणेही आवडत नाही. त्यांच्या गंतव्यस्थानासाठी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी, हे लोक सेवा करत असले, तरीही काही काळ माझ्या घरात राहतात. मात्र, त्यांचे हेतू आणि कृती कधीही बदलत नाहीत. यामुळे त्यांची आशीर्वादांची इच्छा वाढते आणि देवाच्या राज्यात एकदा प्रवेश करून त्यानंतरही कायमस्वरूपी तिथे राहण्याची—त्याहीपुढे जाऊन शाश्वत स्वर्गात प्रवेश करण्याची—त्यांची इच्छा प्रबळ होते. माझा दिवस लवकर यावा याची त्यांना जितकी तळमळ वाटते, तितकेच सत्य हे आपल्या मार्गातील एक अडथळा आहे, असेही त्यांना अधिकाधिक वाटू लागते. स्वर्गाच्या राज्यातील आशीर्वादांचा कायमचा आनंद घेण्यासाठी, ते या राज्यात पाऊल ठेवण्यासाठी कमालीचे उत्सुक असतात—तेही सत्याचा पाठपुरावा करण्याची किंवा न्यायनिवाडा आणि शिक्षा यांचा स्वीकार करण्याची गरज न पडता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या घरात घुटमळण्याची आणि माझ्या आज्ञांचे पालन करण्याची गरज न पडता. हे लोक माझ्या घरात प्रवेश करतात, ते सत्य शोधण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा माझ्या व्यवस्थापनास सहकार्य करण्यासाठी नव्हे; तर येत्या युगात ज्यांचा नाश होणार नाही अशांपैकी असणे हेच त्यांचे यामागे उद्दिष्ट असते. त्यामुळे, सत्य काय आहे किंवा त्याचा स्वीकार कसा करावा, हे त्यांच्या अंतःकरणाला कधीच कळले नाही. याच कारणामुळे अशा लोकांनी कधीही सत्याचे आचरण केले नाही किंवा स्वतःच्या भ्रष्टपणाची तीव्रताही त्यांच्या लक्षात आली नाही. तरीही त्यांनी संपूर्ण काळ माझ्या घरी “सेवक” म्हणून वास्तव्य केले. ते “संयमाने” माझा दिवस येण्याची वाट पाहत असतात आणि माझ्या कामाच्या पद्धतीमुळे भिरकावले जातानाही ते अथक असतात. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले किंवा त्यांना कितीही किंमत मोजावी लागली, तरी सत्यासाठी दु:ख सहन करताना किंवा माझ्यासाठी कशाचाही त्याग करताना ते कधीही दिसत नाहीत. मी ज्या दिवशी म्हातारपणाचा अंत करेन तो दिवस पाहण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात ते अपार उत्सुक आहेत, एवढेच नव्हे, तर माझी शक्ती आणि अधिकार किती महान आहेत, हे शोधण्यास ते कमालीचे उत्सुक आहेत. एका बाबतीत त्यांनी कधीही घाई केली नाही, ते म्हणजे स्वतःला बदलणे आणि सत्याचा पाठपुरावा करणे. मला ज्याचा वीट येतो, नेमक्या त्याच गोष्टी त्यांना प्रिय असतात आणि मला जे प्रिय आहे, त्याचा त्यांना वीट येतो. मला ज्याचा तिरस्कार वाटतो त्यासाठी ते आतुर असतात, पण मला ज्याची घृणा वाटते, ते गमावण्याची त्यांना भीती वाटते. ते या दुष्ट जगात राहतात, त्याचा कधीही तिरस्कार करत नाहीत आणि तरीही मी त्याचा नाश करीन, याची त्यांना आतून भीती वाटते. त्यांच्या परस्परविरोधी हेतूंमध्ये, ज्याची मला घृणा वाटते त्या या जगावर ते प्रेम करतात. त्याचवेळी ते याची उत्कंठा बाळगतात की, त्यांचा विनाशाच्या दुःखापासून त्यांचा बचाव व्हावा आणि पुढील युगाच्या स्वामींमध्ये त्यांचे रूपांतर व्हावे यासाठी ते सत्य मार्गापासून भरकटण्यापूर्वी मी ते त्वरेने नष्ट करावे, कारण, ते सत्यावर प्रेम करत नाहीत आणि माझ्याकडून आलेल्या सर्व गोष्टींचा त्यांना वीट आलेला आहे. आशीर्वाद गमावू नये म्हणून ते थोड्या काळासाठी “आज्ञाधारक” बनतीलही, परंतु त्यांची आशीर्वाद मिळवण्याची चिंता, नष्ट होण्याची आणि जळत्या अग्नीच्या सरोवरात प्रवेश करण्याची भीती ही कधीही लपून राहत नाही. जसजसा माझा दिवस जवळ येतो, तसतशी त्यांची इच्छा अधिकाधिक प्रबळ होत जाते. आपत्ती जितकी मोठी, तितकीच ती त्यांना असहाय्य बनवते, मला आनंद देण्यासाठी आणि ज्या आशीर्वादांची ते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते ते गमावू नये, यासाठी कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नाही. माझ्या हाताने कार्य सुरू करताच अग्रेसर म्हणून कार्य करण्यास ते उत्सुक असतात. ते फक्त सैन्याच्या अगदी पुढच्या रांगेत जाण्याचा विचार करतात, मला ते दिसणार नाहीत, याची त्यांना मनापासून भीती वाटते. त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात आणि तेच बोलतात. त्यांचे कृत्य आणि कृती कधीच सत्याशी सुसंगत नाही आणि त्यांची कृत्ये माझ्या योजनेत केवळ व्यत्यय आणतात आणि हस्तक्षेप करतात, हे त्यांना माहीत नसते. त्यांनी खूप प्रयत्न केले असतील आणि संकटे झेलण्याची त्यांची इच्छा आणि त्यांचा हेतू खराही असेल, परंतु त्यांचे कोणतेही कार्य माझ्याशी संबंधित नाही. कारण त्यांच्या कृत्यामागे चांगला हेतू असल्याचे मी कधीही पाहिले नाही, माझ्या वेदीवर काहीही ठेवताना तर मी त्यांना कधीही पाहिले नाही. एवढ्या वर्षात त्यांनी माझ्यासमोर केलेली अशीच ही कृत्ये आहेत.

मुळात, मी तुम्हाला अधिक सत्य सांगू इच्छित होतो, परंतु मला ते टाळावे लागले, कारण सत्याविषयी तुमचा दृष्टिकोन खूप थंड आणि उदासीन आहे; माझे प्रयत्न वाया जावेत अशी माझी इच्छा नाही, किंवा लोक माझे शब्द सोबत घेऊन आणि तरीही मला विरोध करत असल्याचे, माझी बदनामी आणि माझी निंदा करत असल्याचे पाहण्याची माझी इच्छा नाही. तुमच्या वृत्तीमुळे आणि तुमच्या मानवतेमुळे, मी तुम्हाला फक्त एक छोटासा आणि तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला माझ्या शब्दांचा एक भाग पुरवतो, जो मानवजातीमध्ये माझे चाचणी कार्य म्हणून काम करतो. फक्त आताच मी खऱ्या अर्थाने पुष्टी केली आहे की, मी घेतलेले निर्णय आणि योजना तुमच्या गरजा पूर्ण करतात आणि मानवजातीबद्दलचा माझा दृष्टिकोन योग्यच आहे. माझ्यासमोरच्या तुमच्या अनेक वर्षांच्या वर्तनाने मला उदाहरणाविना उत्तर दिले आहे आणि या उत्तराचा प्रश्न आहे: “सत्य आणि खरा देव यांच्यासमोर माणसाचा दृष्टिकोन नेमका काय आहे?” मी माणसासाठी केलेले प्रयत्न हे माणसावरील माझ्या प्रेमाचे सार सिद्ध करतात आणि माणसाची माझ्यासमोरील प्रत्येक कृती ही त्याची सत्याविषयीची घृणा आणि मला असलेला विरोध सिद्ध करते. जे माझे अनुसरण करतात त्यांच्यासाठी मी सदैव चिंतित असतो, तरीही जे माझे अनुसरण करतात ते माझे शब्द स्वीकारू शकत नाहीत; ते माझ्या सूचनांचा स्वीकार करण्यासही सक्षम नसतात. याचेच मला सगळ्यात जास्त वाईट वाटते. कोणीही मला समजू शकले नाही. एवढेच नव्हे, तर माझी वृत्ती प्रामाणिक असूनही आणि माझे शब्द सौम्य असूनही कोणीही मला स्वीकारू शकले नाही. मी त्यांच्यावर सोपवलेले काम प्रत्येकजण आपापल्या कल्पनेनुसार करण्याचा प्रयत्न करतो; ते माझे हेतू शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत, मग मला त्यांच्याकडून काय हवे आहे ते विचारणे तर दूरच राहिले. प्रत्यक्षात ते माझ्याविरुद्ध बंड करत असले तरीही ते अजूनही माझी निष्ठेने सेवा करत असल्याचा दावा करतात. जे सत्य त्यांना मान्य नाही किंवा जे ते आचरणात आणू शकत नाहीत ते सत्यच नाही, असे अनेक जण मानतात. अशा लोकांमध्ये, माझे सत्य नाकारले जाते, बाजूला सारले जाते. त्याच वेळी, लोक मला शब्दाने देव म्हणून ओळखतात, तरीही मला एक बाहेरची व्यक्ती असल्याचे मानतात, जो सत्य, मार्ग किंवा जीवन नाही: माझे शब्द म्हणजे कायमचे, न बदलणारे सत्य आहे. मी माणसासाठी जीवनाचा स्रोत आहे आणि मानवजातीसाठी एकमेव मार्गदर्शक आहे. माझ्या शब्दांचे मूल्य आणि अर्थ हे मानवजातीने त्यांना मान्यता दिली आहे का किंवा स्वीकारले आहे का, यावर अवलंबून नाही, तर ते शब्दांच्या मूलतत्त्वाने ठरवले जाते. या पृथ्वीवरील एकाही व्यक्तीला माझे शब्द स्वीकारता आले नाहीत, तरी माझ्या शब्दांचे मूल्य आणि मानवजातीसाठी त्यांची मदत कोणत्याही माणसासाठी अमूल्य आहे. म्हणून, माझ्या शब्दांविरुद्ध बंड करणाऱ्या, त्यांचे खंडन करणाऱ्या किंवा पूर्णपणे तुच्छतेने वागणाऱ्या अनेक लोकांचा सामना जेव्हा करावा लागतो, तेव्हा माझी भूमिका एवढीच असते: वेळ आणि तथ्ये हेच माझे साक्षीदार असू द्या आणि माझे शब्द हे सत्य, मार्ग आणि जीवन आहेत, हे त्यांनाच दाखवू द्या. त्यांना दाखवू द्या की, मी जे काही बोललो ते बरोबर आहे, माणसाने यांसह सज्ज असले पाहिजे, एवढेच नव्हे, तर ते स्वीकारलेदेखील पाहिजे. जे माझे अनुसरण करतात त्यांना ही वस्तुस्थिती मी कळू देईन: जे माझे शब्द पूर्णपणे स्वीकारू शकत नाहीत, जे माझे शब्द आचरणात आणू शकत नाहीत, ज्यांना माझ्या शब्दांमध्ये उद्देश सापडत नाही आणि ज्यांना माझ्या शब्दांमुळे मोक्ष मिळू शकत नाही, ते असे लोक आहेत ज्यांना माझ्या शब्दांनी दोषी ठरवले आहे आणि एवढेच नव्हे, तर त्यांनी माझे तारण गमावले आहे. माझी काठी त्यांच्यापासून कधीही दूर जाणार नाही.

१६ एप्रिल २००३

मागील:  एक अतिशय गंभीर समस्या: विश्वासघात (२)

पुढील:  देवच मनुष्याच्या जीवनाचा स्रोत आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger