जे देवाच्या इच्छेनुरूप कार्य करतात त्यांना देव परिपूर्ण करतो
देवाला आता, त्याच्याशी सहकार्य करण्यासाठी झटणार्यांचा, त्याच्या कार्याचे पालन करणार्यांचा, देवाची वचने सत्य मानणार्यांचा आणि देवाला आवश्यक वाटणार्या गोष्टी आचरणात आणणार्यांचा समावेश असलेला अशा विशिष्ट लोकांचा समूह प्राप्त करायचा आहे; ते असे लोक आहेत ज्यांच्या हृदयात खरी समज आहे, ज्यांना परिपूर्ण केले जाऊ शकते आणि ते नेहमीची सवय असल्याप्रमाणे परिपूर्णतेच्या मार्गावर चालू शकतील. ज्या लोकांना परिपूर्ण केले जाऊ शकत नाही ते असे लोक असतात की ज्यांना देवाच्या कार्याची स्पष्ट समज नाही, जे देवाची वचने सेवन अथवा प्राशन करत नाहीत, जे त्याच्या वचनांकडे लक्ष देत नाहीत आणि ज्यांच्या अंतःकरणात देवाबद्दल प्रेम नाही. जे देहधारी देवावर संशय घेतात त्यांना त्याच्याबद्दल नेहमी अनिश्चिचता वाटत असते, ते त्याची वचने कधीच गंभीरपणे घेत नाहीत आणि ते त्याला नेहमी फसवतात, हे असे लोक जे देवाचा विरोध करतात ते सैतानाच्या बाजूचे असतात; अशा लोकांना परिपूर्ण करण्याचा कुठलाही मार्ग नसतो.
जर तुला परिपूर्ण व्हायची इच्छा असेल, तर प्रथमतः तुला देवाने त्यासाठी अनुकूल मानायला हवे, कारण ज्यांच्यावर त्याची मर्जी असते आणि जे त्याच्या इच्छेनुरूप कार्य करतात त्यांनाच तो परिपूर्ण करतो. जर देवाच्या इच्छेनुरूप कार्य करायचे असेल, तर त्याच्या कार्याचे पालन करणारे हृदय हवेच, सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी झटायलाच हवे आणि सर्व बाबतीत देवाने केलेली छाननी स्वीकारायलाच हवी. जे काही तू केले आहे ते देवाच्या छाननीला खरे उतरले आहे का? तुझा हेतू योग्य आहे का? जर तुझा हेतू योग्य असेल, तर देव तुझी प्रशंसा करेल; जर तुझा हेतू चुकीचा असेल, तर त्यातून दिसेल, की तुझे हृद्य ज्या गोष्टीवर प्रेम करते तो देव नाही, तर तो केवळ देह आणि सैतान आहे. म्हणूनच, सर्व गोष्टींमध्ये देवाची छाननी स्वीकारण्याचा मार्ग म्हणून प्रार्थनेचा वापर केलाच पाहिजे. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा, मी तुझ्यासमोर प्रत्यक्षात उभा नसलो तरीही, पवित्र आत्मा तुझ्याबरोबर असतो आणि तेव्हा तू माझी आणि पवित्र आत्मा अशा दोघांचीही प्रार्थना करत असतोस. तू या देहावर विश्वास का ठेवतोस? तू विश्वास ठेवतोस, कारण त्याच्याकडे देवाचा आत्मा आहे. जर त्याच्याकडे देवाचा आत्मा नसेल, तर तू त्या मनुष्यावर विश्वास ठेवशील का? जेव्हा तू या व्यक्तीवर विश्वास ठेवतोस, तेव्हा तू देवाच्या आत्म्यावर विश्वास ठेवत असतोस. जेव्हा तुला या व्यक्तीची भीती वाटते, तेव्हा तुला देवाच्या आत्म्याची भीती वाटत असते. देवाच्या आत्म्यावर विश्वास म्हणजे या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि या व्यक्तीवरील विश्वासही देवाच्या आत्म्यावरील विश्वास आहे. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुला वाटते, की देवाचा आत्मा तुझ्याबरोबर आहे व देव तुझ्यासमोर आहे आणि म्हणून तू त्याच्या आत्म्याची प्रार्थना करतोस. आज, बहुसंख्य लोकांना त्यांच्या कृती देवासमोर ठेवण्याची फारच भीती वाटते; तू त्याच्या देहाला कदाचित फसवू शकशील, परंतु त्याच्या आत्म्याला फसवू शकत नाहीस. कोणतीही गोष्ट जी देवाच्या छाननीला तोंड देऊ शकत नाही, ती सत्याशी विसंगत आहे आणि ती बाहेर काढून टाकली पाहिजे; अन्य काहीही करणे म्हणजे देवाविरुद्ध पाप करणे आहे. म्हणून, जेव्हा तू प्रार्थना करतोस, जेव्हा तू आपल्या बंधु भगिनींबरोबर काही बोलतोस आणि सहभागिता करतोस आणि जेव्हा तू तुझे कर्तव्य पार पाडत तुझ्या कामात असतोस तेव्हा, तुझे हृदय पूर्ण वेळ देवासमोर समर्पित केलेच पाहिजे. जेव्हा तू तुझे कार्य पूर्ण करतोस, तेव्हा देव तुझ्याबरोबर असतो आणि जोवर तुझा हेतू योग्य आणि देवाच्या घराच्या कार्याबाबत असतो, तोवर तू जे काही करशील ते तो स्वीकारेल; तू स्वतःला तुझ्या कार्याप्रति प्रामाणिकपणे वाहून घ्यायला हवे. जेव्हा तू प्रार्थना करतोस, तेव्हा जर तुझ्या हृदयात देवाबद्दल प्रेम असेल आणि तू देवाकडून संगोपन, संरक्षण आणि छाननी शोधत असशील, जेव्हा या सर्व गोष्टी तुझ्या हेतूमध्ये अंतर्भूत असतील, तेव्हा तुझी प्रार्थना परिणामकारक ठरेल. उदाहरणार्थ, सभांमध्ये प्रार्थना करताना, जर तू मनापासून देवाची प्रार्थना करत असशील आणि खोटे न बोलता तुझ्या हृदयात काय आहे हे त्याला सांगत असशील, तेव्हा तुझ्या प्रार्थना नक्कीच परिणामकारक ठरतील. जर तू मनापासून देवावर प्रेम करत असशील, तर देवासमोर एक शपथ घे: “स्वर्गात, पृथ्वीवर आणि चराचरात असलेल्या देवा, मी शपथपूर्वक सांगतो: मी जे काही करेन, तुझ्या आत्म्याला त्याची छाननी करू दे आणि सदासर्वदा माझे रक्षण आणि संगोपन कर आणि मी जे काही करेन ते तुझ्यापुढे उभे करता येऊ दे. जर कधी काळी माझ्या हृदयाने तुझ्यावर प्रेम करणे थांबवले किंवा त्याने कधीही तुझी फसवणूक केली, तर माझे कठोर ताडण कर आणि शाप दे. मला या जगात किंवा नंतरच्या जगात क्षमा करू नकोस!” तुझ्याकडे अशी शपथ घेण्याचे धाडस आहे का? जर नसेल, तर असे दिसते, की तू घाबरट आहेस आणि तू अजूनही स्वतःवरच प्रेम करत आहेस. तुझ्याकडे असा निश्चय आहे का? हा तुझा खरोखरचा निश्चय असेल, तर तू अशी शपथ घ्यावी. जर तुझ्याकडे अशी शपथ घ्यायचा निश्चय असेल, तर देव तुझा निश्चय पूर्ण करेल. जेव्हा तू देवासमोर एखादी शपथ घेतोस, तेव्हा तो ऐकत असतो. तुझी प्रार्थना आणि वागणूक यांचे मूल्यमापन करून तो तू पापी आहात की नीतिमान हे ठरवतो. आता तुम्हाला परिपूर्ण केले जाण्याची हीच प्रक्रिया आहे आणि तुझा परिपूर्ण बनण्यावर खरा विश्वास असेल, तर तू जे काही करतोस ते देवासमोर सादर करशील आणि त्याच्या छाननीचा स्वीकार करशील; जर तू काहीतरी भयंकर बंडखोरी केलीस किंवा देवाला फसवलेस, तर तो तुझी शपथ खरी करेल आणि मग तुझे काहीही होवो, तुझा विनाश होवो की तुझे ताडण केले जावो, ते तुझे स्वतःचेच कर्म असेल. तू शपथ घेतलीस, तर मग ती पाळली पाहिजे. जर तू शपथ घेतलीस पण ती पाळली नाहीस, तर तुझा विनाश होईल. ही शपथ तुझीच असल्यामुळे, देव तुझी शपथ खरी करेल. काहीजण प्रार्थना केल्यावर घाबरतात आणि शोक करतात, “सगळे संपले! माझी अनीतीने वागण्याची संधी हुकली; वाईट गोष्टी करायची संधी गेली; माझ्या भौतिक इच्छांचा उपभोग घेण्याची माझी संधी गेली!” असे लोक अजूनही लौकिकता आणि पापकृत्यांवर प्रेम करत राह्तात आणि त्यांना नक्कीच विनाश सहन करावा लागतो.
आस्तिक असणे याचा अर्थ असा, की तू जे काही करतोस ते त्याच्यासमोर सादर झालेच पाहिजे आणि त्याच्या छाननीला सामोरे जायला पाहिजे. जर तू जे करतोस ते देवाच्या आत्म्यासमोर सादर करणे शक्य झाले पण त्याच्या देहासमोर सादर करणे शक्य झाले नाही, तर त्यातून दिसते, की तू त्याच्या छाननीला सामोरे गेलेला नाहीस. देवाचा आत्मा कोण आहे? ज्याला देव साक्षी असतो ती व्यक्ती कोण आहे? ते दोन्ही एकच नव्हेत का? बहुतेक लोकांना ती दोन वेगळी अस्तित्वे वाटतात, त्यांना वाटते देवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा, आणि देव ज्याला साक्षी आहे तो केवळ एक मनुष्य आहे. परंतु तुझे इथे चुकले नाही का? ही व्यक्ती कुणाच्या वतीने काम करत असते? ज्यांना देवाच्या देहस्वरूपाची ओळख नाही, त्यांच्याकडे आध्यात्मिक समज नसते. देवाचा आत्मा आणि त्याचे देहस्वरूप एकच असतात, कारण देवाचा आत्मा देहातून व्यक्त होतो. जर ही व्यक्ती तुझ्याप्रति निष्ठुर असेल, तर देवाचा आत्मा दयाळू राहिल का? तुझा गोंधळ झालेला नाही का? आज, जे कुणी देवाची छाननी स्वीकारू शकत नाहीत, त्यांना त्याची मान्यता मिळू शकत नाही आणि जे देवाच्या देहस्वरूपाला ओळखत नाहीत ते परिपूर्ण केले जाऊ शकत नाहीत. तू जे काही करतोस त्यावर नजर टाक आणि ते देवासमोर सादर करता येते का ते पहा. जर तू जे काही करतोस ते देवासमोर सादर करता येत नसेल, तर त्यातून दिसते, की तू कुकर्मी आहेस. कुकर्मींना परिपूर्ण करता येईल का? तू जे काही करतोस, ती प्रत्येक कृती, प्रत्येक हेतू आणि प्रत्येक प्रतिक्रिया देवासमोर सादर करायला हवी. तुझे दैनंदिन आध्यात्मिक जीवनसुद्धा—तुझ्या प्रार्थना, देवाशी तुझी जवळीक, तू देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करतोस ते, तुझ्या बंधु भगिनींबरोबरची तुझी सहभागिता आणि तुझे चर्चमधील जीवन—आणि तुझी भागीदारीतील सेवा, सर्व काही देवासमोर छाननीसाठी सादर केले जाऊ शकते. ही अशी प्रक्रिया आहे जी तुला जीवनात प्रगती साध्य होण्यासाठी मदत करेल. देवाची छाननी स्वीकारण्याची प्रक्रिया म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. तू जितकी त्याची छाननी स्वीकारशील तितके तू अधिक शुद्ध होत राहशील आणि तितकेच देवाच्या इच्छेशी जुळणारा होत राहशील, म्हणजे मग तू दुराचाराकडे ओढला जाणार नाहीस आणि तुझे हृदय त्याच्या सहवासात राहील. तू जितकी त्याची छाननी स्वीकारशील, तितका सैतानाचा अधिक अवमान होईल आणि तुझी देहत्यागाची क्षमता तितकी अधिक होईल. म्हणजेच लोकांनी देवाच्या छाननीचा स्वीकार हाच नित्यक्रमाचा मार्ग म्हणून अनुसरावा. तू काहीही करीत असलास तरी, तुमच्या बंधु भगिनींबरोबर संवाद-सहवास साधत असताना देखील तुझ्या कृती देवासमोर सादर करू शकतोस, त्याच्याकडून छाननी मिळवू शकतोस आणि प्रत्यक्ष देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे ध्येय ठेवू शकतोस; तुझी जीवन पद्धती यामुळे अधिक योग्य बनेल. तू जे काही करतोस ते सर्व देवासमोर सादर केले तरच आणि देवाच्या छाननीचा स्वीकार केला तरच तू देवाच्या सहवासात राहणारा कुणीतरी होऊ शकशील.
देवाचे आकलन नसलेले लोक कधीच देवाची आज्ञा पूर्णपणे पाळू शकत नाहीत. अशा प्रकारचे लोक अवज्ञेचे पुत्र असतात. ते अतिशय महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांच्यात अतिशय बंडखोर वृत्ती असते, म्हणून ते देवापासून दूर राहतात आणि त्याच्याकडून छाननी करून घ्यायला तयार नसतात. अशा प्रकारच्या लोकांना सहजपणे परिपूर्ण करणे शक्य नसते. काही लोक देवाच्या वचनांच्या सेवनाबाबत व प्राशनाबाबत आणि त्यांच्या स्वीकाराबाबत चिकित्सक असतात. ते देवाच्या वचनातील स्वतःच्या धारणांशी जुळणारा काही विशिष्ट भाग स्वीकारतात आणि जे जुळत नाहीत त्यांना नाकारतात. ही खरोखर देवाविरुद्ध केलेली सर्वात उघडउघड बंडखोरी आणि विरोधी कृत्ये नव्हेत का? जर देवाची किंचितही समज प्राप्त न करता कुणी त्याच्यावर वर्षानुवर्षे विश्वास ठेवत असेल, तर ते अश्रद्ध आहेत. जे लोक देवाची छाननी स्वीकारायला तयार असतात ते, त्याचे आकलन व्हावे याचा पाठपुरावा करत असतात, त्याची वचने स्वीकारायला तयार असतात. त्यांनाच देवाचा वारसा आणि आशीर्वाद मिळतो आणि तेच सर्वात जास्त अनुग्रहित असतात. ज्यांच्या हृदयात देवासाठी जागा नाही त्यांना तो शाप देतो आणि त्यांचे ताडण करतो, त्यांचा त्याग करतो. जर तुझे देवावर प्रेम नसेल तर तो तुला सोडून देईल आणि जर माझे म्हणणे ऐकले नाही तर मी नक्की सांगू शकेन, की देवाचा आत्मा तुझा त्याग करेल. यावर तुझा विश्वास नसेल तर तसे करून बघ! आज मला तुझ्यासाठी आचरणाचा एक मार्ग स्पष्ट करून सांगायचा आहे, परंतु, तो प्रत्यक्षात आणायचा की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. जर तुझा यावर विश्वास नसेल, जर तू ते प्रत्यक्षात आणले नाहीस, तर तुला स्वतःलाच दिसेल, की पवित्र आत्मा तुझ्यात कार्यरत आहे की नाही! जर तू देवाच्या आकलनाचा पाठपुरावा केला नाहीस, तर पवित्र आत्मा तुझ्यात कार्य करणार नाही. जे देवाच्या वचनांचे अनुसरण करतात आणि त्यांना मौल्यवान समजतात त्यांच्यामध्ये देव कार्य करतो. तू देवाच्या वचनांचा जितका आदर करशी, तितका पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्यरत राहील. माणूस देवाच्या वचनांचा जितका आदर करेल, तितकी त्याला देवाकडून परिपूर्ण बनवले जाण्याची अधिक संधी मिळेल. जे देवावर खरेखुरे प्रेम करतात त्यांना तो परिपूर्ण करतो आणि त्याच्या सान्निध्यात ज्यांचे हृदय शांत असते त्यांना तो परिपूर्ण करतो. देवाचे सर्व कार्य जपणे, त्याच्याकडून आलेले प्रबोधन जपणे, त्याच्या अस्तित्वाचे जतन करणे, त्याचे संगोपन आणि त्याने दिलेले संरक्षण मानणे, देवाची वचने ज्या पद्धतीने तुझे वास्तव ठरतात आणि तुझ्या जीवनासाठीची तरतूद ठरतात ते लक्षात ठेवणे—हे सर्व काही देवाच्या हृदयाला अतिशय उत्तम प्रकारे अनुरूप असते. जर तू देवाचे कार्य जपत असशील, म्हणजे, जर त्याने तुझ्यासाठी केलेल्या सर्व कार्याची जपणूक करत असशील, तर तो तुला आशीर्वाद देईल आणि तुझ्याकडे जे काही आहे त्याची वृद्धी करेल. जर तू त्याच्या वचनांचा आदर केला नाहीस, तर तो तुझ्यावर कार्य करणार नाही, तर तुझ्या अशा विश्वासासाठी तो तुझ्यावर मामुली कृपा करेल अथवा तुला तुटपुंजी संपत्ती आणि तुझ्या कुटुंबाला अत्यल्प सुरक्षा प्रदान करील. तू देवाच्या वचनांना तुझे वास्तव बनवण्याचा प्रयत्न करायला हवास आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी समर्थ बनण्याचा व त्याच्या हृदयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवास; तू फक्त त्याच्या कृपेचा आनंद घ्यायचा प्रयत्न करू नयेस. देवाचे कार्य प्राप्त करणे, परिपूर्णता मिळवणे आणि देवाची इच्छा पूर्ण करणारे बनणे यापेक्षा दुसरे काहीही श्रद्धावानांना अधिक महत्वाचे नसते. तू याच ध्येयाचा पाठपुरावा करायला हवास.
कृपेच्या युगात मनुष्याने ज्याचा पाठपुरावा केला होता, ते आता कालबाह्य झाले आहे, कारण सध्याच्या काळात अधिक उच्च प्रकारची साधना प्रचलित आहे, जी साधना केली जात आहे ती अधिक भव्य आणि व्यवहार्य आहे; जी साधना केली जाते ती मनुष्याला अंतःकरणात हवे आहे ते सर्व देऊन अधिक समाधान देणारी आहे, देव आज ज्या प्रकारे लोकांवर कार्य करत आहे त्याप्रमाणे मागील युगांमध्ये कार्य करत नव्हता; तो आज जेवढे लोकांशी बोलतो तेवढे बोलत नव्हता किंवा त्याच्या अपेक्षा आज आहेत तेवढ्या उच्च नव्हत्या. आज देव तुम्हाला या गोष्टी सांगत असतो त्यातून दिसते, की देवाचे अंतिम उद्दिष्ट तुमच्यावर, या लोकांच्या समूहावर केंद्रित आहे. जर तुला खरोखर देवाकडून परिपूर्ण बनण्याची इच्छा असेल, तर ते तुझे मध्यवर्ती ध्येय आहे असे समजून त्याचा पाठपुरावा कर. कितीही धावपळ होत असेल, त्रास घ्यावा लागत असेल, किंवा देवाने एखादे कार्य दिले असेल—ते काहीही असो, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, तुझे ध्येय हे कायमच परिपूर्ण बनण्याचे, देवाच्या इच्छेची पूर्तता करण्याचे, असले पाहिजे. जर कुणी असे म्हणत असेल, की ते देवाकडून परिपूर्ण बनण्याचा किंवा जीवनात प्रवेश करण्याचा पाठपुरावा करत नाहीत, तर फक्त शारीरिक आनंद आणि शांती शोधत आहेत, तर ते मानवजातीतील सर्वात अंध लोक आहेत. जे जीवनाची वास्तविकता अनुसरत नाहीत, पण फक्त येणाऱ्या जगातील शाश्वत आयुष्य आणि ह्या जगातील सुरक्षितता यांचा पाठपुरावा करतात, ते मानवजातीतील सर्वात अंध लोक आहेत. म्हणून, तू जे काही करायला हवेस ते देवाकडून परिपूर्ण बनण्याच्या आणि देवाकडून प्राप्त केले जाण्याच्या हेतूने असावे.
देव लोकांसाठी जे कार्य करतो ते त्यांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार त्यांच्यासाठी तरतूद करण्यासाठी करतो. एखाद्या व्यक्तीचे आयुष्य जितके जास्त, तितक्या त्याच्या गरजा जास्त आणि तितक्या जास्त गोष्टींचा ते पाठपुरावा करतात. जर या टप्प्यावर तुझा कुठलाच पाठपुरावा नसेल, तर त्यातून सिद्ध होते, की पवित्र आत्म्याने तुझा त्याग केला आहे. जे जीवनाचा पाठपुरावा करतात, त्यांना पवित्र आत्मा कधीच सोडून देणार नाही; असे लोक नेहमीच पाठपुरावा करतात आणि त्यांच्या हृदयात नेहमीच उत्कट इच्छा असतात. असे लोक सध्या अस्तित्वात असलेल्या गोष्टींबद्दल कधीच समाधानी नसतात. पवित्र आत्म्याच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्याचा हेतू, तुझ्यामध्ये बदल घडवणे हाच असतो, परंतु जर तू आत्मसंतुष्ट बनलास, जर तुला आता काही गरजा नसतील, जर तू पवित्र आत्म्याचे कार्य आता स्वीकारत नसशील, तर तो तुझा त्याग करेल. लोकांना दररोज देवाकडून छाननीची आवश्यकता असते; त्यांना दररोज देवाकडून भरपूर प्रमाणात तरतुदीची आवश्यकता असते. दररोज देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन केल्याशिवाय लोक राहू शकतील का? जर कुणाला नेहमीच असे वाटत असेल, की त्यांना देवाच्या वचनांचे पुरेसे सेवन किंवा प्राशन करता येत नाही, जर ते नेहमी त्याचा शोध घेत असतील, आणि त्यासाठी, भुकेले आणि तहानलेले राहत असतील, तर पवित्र आत्मा सतत त्यांच्यासाठी कार्य करेल. जितकी जास्त उत्कट इच्छा असेल, तितक्या प्रमाणात त्यांच्या सहभागितेतून अधिक व्यवहार्य अशा गोष्टी बाहेर पडू शकतील. जितक्या जास्त तीव्रतेने सत्याचा शोध घेतील, तितक्या जलद गतीने जीवनात त्यांची प्रगती घडू शकेल, त्याद्वारे ते अनुभव समृद्ध होतील आणि देवाच्या घरातील ऐश्वर्यसंपन्न निवासी होतील.