जे सच्च्या अंतःकरणाने देवाची आज्ञा पाळतात, त्यांना देव नक्कीच प्राप्त करतो

पवित्र आत्म्याचे कार्य दररोज बदलत असते. प्रत्येक पावलागणिक ते वृद्धिंगत होत जाते, उद्याचे प्रकटीकरण आजच्यापेक्षा वरचढ असते, पावलागणिक सतत वृद्धिंगत होत जाते. अशाच कार्याद्वारे देव मनुष्याला परिपूर्ण करतो. जर लोक या वेगाशी जुळवून घेऊ शकले नाहीत, तर कधीही बाहेर फेकले जाऊ शकतील. जर त्यांच्या अंतःकरणात आज्ञाधारकपणा नसेल, तर ते शेवटपर्यंत अनुसरण करू शकणार नाहीत. पूर्वीचे युग निघून गेले आहे; हे नवीन युग आहे. आणि नवीन युगात नवीन काम केले पाहिजे. विशेषत: जेथे लोक परिपूर्ण होतात, त्या या अंतिम युगात देव नवीन कार्य आणखी झटपट करेल, म्हणूनच जर लोकांच्या अंतःकरणात आज्ञाधारकपणा नसेल, तर त्यांना देवाच्या पावलांचे अनुसरण करणे कठीण होईल. देव कोणत्याही नियमांचे पालन करत नाही किंवा आपल्या कार्याचा कोणताही टप्प्याला अढळ आहे, असेही तो मानत नाही. त्याउलट, त्याचे कार्य हे नेहमीच अधिक नवीन आणि असते. प्रत्येक टप्प्यावर, त्याचे कार्य अधिकाधिक व्यावहारिक होत जाते आणि माणसाच्या प्रत्यक्ष गरजांच्या अधिकाधिक अनुसार होत जाते. लोकांना अशा कार्याचा अनुभव आला, तरच ते त्यांच्या प्रवृत्तीत अंतिम परिवर्तन करू शकतात. मनुष्याचे जीवनविषयक ज्ञान सातत्याने उच्च स्तरावर पोहोचत असते आणि त्याचप्रमाणे, देवाचे कार्यदेखील सातत्याने उच्च स्तरावर पोहोचत असते. केवळ अशा प्रकारे मनुष्य परिपूर्ण होऊ शकतो आणि देवाच्या सेवाकार्यासाठी योग्य बनू शकतो. देव एकीकडे माणसाच्या धारणांचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्या बदलण्यासाठी आणि दुसरीकडे माणसाला उच्च आणि अधिक वास्तववादी स्थितीत, देवावरील विश्वासाच्या सर्वोच्च क्षेत्रात नेण्यासाठी अशा प्रकारे कार्य करतो, जेणेकरून अखेर, देवाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. अवज्ञाकारी प्रवृत्तीचे सर्वजण जे जाणूनबुजून विरोध करतात, त्यांना देवाच्या जलद आणि तीव्रतेने प्रगती करणार्‍या कार्याच्या या टप्प्यापर्यंत बाहेर फेकले जाईल; केवळ जे स्वेच्छेने आज्ञा पाळतात आणि आनंदाने स्वतःला विनम्र ठेवतात, तेच या मार्गाच्या अंतापर्यंत प्रगती करू शकतील. या प्रकारच्या कार्यात, तुम्ही सर्वांनी कसे आज्ञापालन कसे करावे आणि तुमच्या धारणा कशा दूर साराव्यात, हे शिकले पाहिजे. तुम्ही प्रत्येक पाऊल उचलताना सावध असले पाहिजे. जर तुम्ही निष्काळजी राहिलात, तर तुम्ही नक्कीच पवित्र आत्म्याने नाकारलेले, देवाच्या कार्यात व्यत्यय आणणारे ठराल. कार्याच्या या टप्प्यात प्रवेश करण्याआधी, मनुष्याचे जुने नियम आणि कायदे इतके असंख्य होते, की तो दूर गेला आणि परिणामी, तो गर्विष्ठ झाला आणि स्वतःला विसरून गेला. हे सर्व अडथळे मनुष्याला देवाचे नवीन कार्य स्वीकारण्यापासून रोखतात; ते मनुष्याच्या देवाविषयीच्या ज्ञानाचे शत्रू आहेत. लोकांच्या अंतःकरणात आज्ञाधारकपणा किंवा सत्यासाठी तळमळ नसेल, तर हे धोकादायक आहे. जर तू फक्त साधे कार्य आणि वचने यांच्या अधीन असशील आणि अधिक सखोल काहीही स्वीकारण्यास असमर्थ असशील, तर याचा अर्थ तू जुन्या मार्गांना चिकटून राहतोस आणि पवित्र आत्म्याच्या कार्याच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाहीस. देवाने केलेले कार्य प्रत्येक कालखंडात वेगवेगळे असते. जर तू एका टप्प्यावर देवाच्या कार्याप्रति खूप आज्ञाधारक असशील, परंतु पुढच्या टप्प्यावर त्याच्या कार्याप्रती तुझी आज्ञाधारकता कमी झाली किंवा तू आज्ञापालन करण्यास असमर्थ ठरलास, तर देव तुझा त्याग करेल. देव हे पाऊल उचलत असताना तू त्याच्या वेगाशी जुळवून घेत असशील, तर जेव्हा तो पुढची चढण चढेल, तेव्हादेखील तू हा वेग राखणे गरजेचे आहे; तरच तू पवित्र आत्म्याच्याआज्ञांचा पालनकर्ता ठरशील. तुझा देवावर विश्वास असल्यामुळे, तुम्ही सातत्याने आज्ञापालन करणे आवश्यक आहे. केवळ इच्छा असेल, तेव्हा आज्ञापालन केले आणि इच्छा नसेल, तेव्हा अवज्ञा केली, असे चालत नाही. अशा प्रकारच्या आज्ञाधारकतेची देव प्रशंसा करणार नाही. मी सहभागिता करत असलेल्या नवीन कार्याच्या वेगाशी जर तू जुळवून घेऊ शकत नसशील आणि पूर्वीच्या वचनांनाच चिकटून राहत असशील, तर तुझ्या जीवनात प्रगती कशी होईल? आपल्या वचनांद्वारे तुला काही देणे हे देवाचे कार्य आहे. जर तू त्याच्या वचनांचे पालन केलेस आणि त्यांचा स्वीकार केलास, तर पवित्र आत्मा तुझ्यामध्ये नक्कीच कार्य करेल. मी बोलत असताना, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा कार्य करतो; त्यामुळे मी सांगितले तसे कर आणि पवित्र आत्मा त्वरित तुझ्यामध्ये कार्य करेल. मी तुम्हाला दृष्टी मिळावी, यासाठी एक नवीन प्रकाश सोडत आहे, तुम्हाला वर्तमानाच्या प्रकाशात आणत आहे आणि जेव्हा तू या प्रकाशाच्या झोतात येशील तेव्हा, पवित्र आत्मा त्वरित तुझ्यामध्ये कार्य करेल. काही लोक आडमुठेपणा करत असे म्हणतील, की “तू म्हणतोस ते मी करणार नाही.” अशा परिस्थितीत, माझे तुला सांगणे आहे, की तू आता मार्गाच्या अंताकडे आला आहेस; सुकून गेला आहेस आणि तुझ्यामध्ये जीव उरलेला नाही. त्यामुळे, तुझ्या प्रवृत्तीतील परिवर्तनाचा अनुभव घेण्यासाठी, सध्याच्या प्रकाशाशी ताळमेळ राखण्यापेक्षा अन्य काहीही महत्त्वाचे नाही. पवित्र आत्मा केवळ देवाच्या सेवाकार्यातील लोकांमध्येच कार्य करतो असे नाही, तर त्याशिवाय, तो चर्चमध्येही कार्य करतो. तो कोणामध्येही कार्य करू शकतो. सध्याच्या काळात तो तुझ्यामध्ये कार्य करू शकतो आणि तुला हे कार्य अनुभवता येईल. पुढील काळात, तो दुसर्‍या कोणात तरी कार्य करू शकतो, अशा परिस्थितीत तू त्याचे अनुसरण करण्यासाठी घाई केली पाहिजेस; तू सध्याच्या प्रकाशाचे जितके बारकाईने अनुसरण करशील, तितके तुझे आयुष्य वृद्धिंगत होईल. एखादी व्यक्ती कशीही असो, जर पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत असेल, तर तू अनुसरण केलेच पाहिजेस. त्यांचे अनुभव तू स्वतःही घे, म्हणजे तुला आणखी उच्च गोष्टी प्राप्त होतील. असे केल्याने तुझी प्रगती झपाट्याने होईल. हा मनुष्यासाठी परिपूर्णतेचा मार्ग आहे आणि त्याद्वारे त्याचे आयुष्य वृद्धिंगत होते. परिपूर्ण होण्याचा मार्ग पवित्र आत्म्याच्या कार्याप्रति असलेल्या तुझा आज्ञाधारकतेद्वारे साध्य करता येईल. तुला हे माहीत नाही, की देव तुला परिपूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीद्वारे कार्य करेल किंवा कोणती व्यक्ती, घटना किंवा गोष्ट यांद्वारे तो तुला काही साध्य करण्याची किंवा पाहण्याची परवानगी देईल. जर तू या योग्य मार्गावर पाऊल ठेवू शकलास, तर त्यावरून हे दिसते, की तू देवाकडून परिपूर्ण होण्याची मोठी आशा आहे. जर तुला हे जमणार नसेल, तर असे दिसते, की तुझे भविष्य अंधकारमय, प्रकाश नसलेले आहे. एकदा तू योग्य मार्गावर आलास, की तुला सर्व गोष्टींमध्ये प्रकटीकरण प्राप्त होईल. पवित्र आत्मा इतरांसमोर काय प्रकट करतो हे महत्त्वाचे नाही, जर तू त्यांच्या ज्ञानाच्या आधारावर स्वतःच गोष्टी अनुभवण्यासाठी पुढे गेलास, तर हा अनुभव तुझ्या जीवनाचा एक भाग बनेल आणि या अनुभवातून तू इतरांना काही देण्यास सक्षम होशील. इतरांसमोर केवळ पोपटपंची करणाऱ्यांना स्वतःला कोणताही अनुभव आलेला नसतो; स्वतःचे प्रत्यक्ष अनुभव आणि ज्ञान याविषयी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी, इतरांच्या ज्ञानातून आणि प्रदीपनातून सरावाचा मार्ग शोधायला शिकले पाहिजे. याचा स्वतःच्या जीवनात जास्त फायदा होईल. देवाकडून येणार्‍या सर्व गोष्टींचे पालन करून तू असा अनुभव घ्यावा. तू सर्व गोष्टींमध्ये देवाची इच्छा शोधली पाहिजेस आणि सर्व गोष्टींमध्ये धडे घेतले पाहिजेस, जेणेकरून तुझे आयुष्य वृद्धिंगत होईल. अशा कृतीने सर्वात जलद प्रगती होते.

पवित्र आत्मा व्यावहारिक अनुभवांद्वारे तुला ज्ञान देतो आणि तुझ्या श्रद्धेद्वारे तुला परिपूर्ण करतो. तू खरोखरच परिपूर्ण होण्यास इच्छुक आहेस का? जर तू खरोखरच देवाकडून परिपूर्ण होण्यास इच्छुक असशील, तर तुझ्यामध्ये स्वतःचा देह दूर सारण्याचे धैर्य असेल, तू देवाची वचने पूर्ण करण्यास सक्षम असशील आणि तू निष्क्रीय किंवा कमकुवत होणार नाहीस. तू देवाकडून आलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास सक्षम असशील आणि तुझ्या सर्व कृती, मग त्या सार्वजनिक असोत वा खाजगी, देवासमोर सादर करता येईल. जर तू प्रामाणिक असशील आणि सर्व गोष्टींमध्ये सत्याने आचरण करत असशील, तर तू परिपूर्ण होशील. फसवे लोक जे इतरांसमोर एक प्रकारे वागतात आणि त्यांच्या पाठीमागे वेगळे वागतात, ते परिपूर्ण होऊ इच्छित नाहीत. ते सर्व नाश व विनाशाचे पुत्र आहेत; ते देवाचे नव्हे तर सैतानाचे आहेत. ते देवाने निवडलेले लोक नाहीत! जर तुझ्या कृती आणि वर्तन देवासमोर सादर करता येत नसेल किंवा देवाच्या आत्म्याकडून कमी लेखले जात असेल, तर तुझे काहीतरी चुकत आहे, हेच यावरून सिद्ध होते. जर तू देवाचा न्याय आणि ताडण स्वीकारत असशील आणि तुझ्या स्वभावातील परिवर्तनाची पर्वा करत असशील, तरच तू परिपूर्ण होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवू शकशील. जर तू खरोखर देवाद्वारे परिपूर्ण होण्यास आणि देवाच्या इच्छेनुसार वागण्यास इच्छुक असशील, तर तू कोणतीही तक्रार न करता किंवा देवाच्या कार्याचे मूल्यमापन किंवा न्याय करण्याचा विचार न करता देवाच्या सर्व कार्यांचे आज्ञापालन केले पाहिजेस. देवाकडून परिपूर्ण व्हायचे असेल, तर या किमान आवश्यकता आहेत. जे देवाकडून परिपूर्ण होऊ इच्छितात त्यांच्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत: सर्व गोष्टींमध्ये देवावर प्रेमाच्या भावनेने वर्तन करा. देवावर प्रेमाच्या भावनेने वर्तन करणे म्हणजे काय? याचा अर्थ असा, की तुझ्या सर्व कृती आणि वर्तन देवासमोर सादर करता येईल. आणि तुझा हेतू योग्य असल्यामुळे तुझ्या कृती बरोबर असो वा चूक, तू त्या देवाला किंवा तुमच्या भाऊ-बहिणींना दाखवायला घाबरत नाहीस आणि देवासमोर शपथ घेण्याचे धाडस करता. प्रत्येक हेतू, विचार आणि कल्पना देवासमोर त्याच्या तपासणीसाठी मांडली पाहिजे; जर तू या मार्गाचे अनुसरण केलेस आणि प्रवेश केलास, तर तुझी जीवनात प्रगती झपाट्याने होईल.

तुझा देवावर विश्वास असल्यामुळे तू देवाच्या सर्व वचनांवर आणि त्याच्या सर्व कार्यांवर श्रद्धा ठेवली पाहिजेस. याचा अर्थ असा, की तुझा देवावर विश्वास आहे म्हणून तू त्याची आज्ञा पाळली पाहिजेस. जर हे करू शकत नसाल, तर देवावर विश्वास आहे की नाही हे महत्त्वाचे ठरणार नाही. जर तू अनेक वर्षांपासून देवावर विश्वास ठेवला असशील आणि तरीही त्याची आज्ञा कधीच पाळली नसेल, त्याची वचने पूर्णपणे स्वीकारली नसतील आणि उलट देवानेच तुझ्या अधीन राहावे आणि तुझ्या धारणांनुसार वागावे अशी विनंती करत असशील, तर तू सर्वात बंडखोर आहेस, अश्रद्ध आहेस. जे लोक मनुष्याच्या धारणांना अनुरूप नाहीत असे लोक देवाचे कार्य आणि वचने पाळण्यास सक्षम कसे असतील? जे जाणूनबुजून देवाचा अवमान करतात आणि त्याचा प्रतिकार करतात ते सर्वात बंडखोर आहेत. ते देवाचे शत्रू, ख्रिस्तविरोधी आहेत. देवाच्या नवीन कार्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन नेहमी शत्रुत्वाचा असतो; देवाच्या अधीन होण्याचा त्यांचा किंचितही कल नसतो किंवा त्यांनी कधीही खुशीने स्वतःला अधीन व विनम्र केलेले नसते. ते इतरांसमोर मान ताठ करून उभे राहतात आणि कधीही कोणापुढे झुकत नाहीत. देवासमोर, ते जगाला उपदेश करण्यासाठी स्वतःला सर्वोत्तम समजतात आणि इतरांवर कार्य करण्यात स्वतःला सर्वात कुशल समजतात. ते त्यांच्या ताब्यातील “खजिने” कधीही टाकून देत नाहीत, परंतु उपासनेसाठी, इतरांना उपदेश करण्यासाठी हा कौटुंबिक वारसा असल्यासारखे वर्तन करतात आणि त्यांना मानणाऱ्या मुर्खांना उपदेश करण्यासाठी त्याचा वापर करतात. चर्चमध्ये असे काही लोक निश्चितच आहेत. असे म्हणता येईल, की ते “अजिंक्य नायक” आहेत आणि ते पिढ्यानपिढ्या देवाच्या घरी वास्तव्य करतात. ते वचनांचा (सिद्धांत) प्रचार करणे हे त्यांचे सर्वोच्च कर्तव्य मानतात. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, ते त्यांचे “पवित्र आणि अभेद्य” कर्तव्य जोमाने पार पाडतात. कोणीही त्यांना हात लावण्याची हिंमत करत नाही, कोणीही उघडपणे त्यांची निंदा करण्याचे धाडस करत नाही. ते देवाच्या घरातील “राजे” बनतात, इतरांवर युगानुयुगे सर्रास जुलूम करतात. भुतांचा हा जमाव एकत्र येऊन माझ्या कार्याचा विनाश करू पाहतो आहे; मी या जिवंत भूतांना माझ्या डोळ्यासमोर कसे राहू देईन? जे केवळ अर्धे आज्ञाधारक आहेत, तेदेखील शेवटपर्यंत टिकून राहू शकत नाहीत, मग बिलकुल आज्ञाधारक नसलेले हे जुलमी लोक कसे टिकून राहतील! देवाचे कार्य मनुष्याला सहजासहजी प्राप्त होत नाही. मनुष्याकडे असलेली सर्व शक्ती वापरली, तरीही लोक त्याचा फक्त एक अंशच प्राप्त करू शकतात, ज्यायोगे अखेर त्यांना परिपूर्ण बनणे शक्य होते. मग, देवाचे कार्य नष्ट करू पाहणाऱ्या मुख्य देवदूताच्या मुलांचे काय? त्यांना देवाकडून प्राप्त होण्याची आशा आणखी कमी नाही का? विजयाचे कार्य करण्यामागे माझा उद्देश केवळ जिंकण्यासाठी जिंकणे हा नाही. तर नीतिमत्ता आणि अधर्म प्रकट करण्यासाठी, मनुष्याच्या शिक्षेसाठी पुरावा मिळवण्यासाठी, दुष्टांचा निषेध करण्यासाठी आणि त्याशिवाय, स्वेच्छेने आज्ञा पाळतात त्यांना परिपूर्ण करण्यासाठी विजय मिळवणे हा माझा उद्देश आहे. अंततः, सर्वांना त्यांच्या प्रवृत्तीनुसार वेगळे केले जाईल आणि ज्यांच्या विचारांमध्ये आणि कल्पनांमध्ये आज्ञाधारकपणा असेल, त्यांनाच परिपूर्ण केले जाईल. हे कार्य अखेरीस पूर्णत्वास जाईल. दरम्यान, ज्यांची प्रत्येक कृती बंडखोर आहे, त्यांना शिक्षा केली जाईल आणि अग्नीमध्ये भस्मसात करण्यासाठी धाडले जाईल, ते अनंतकाळासाठी शापाचे धनी ठरतील. जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा भूतकाळातील ते “महान आणि अदम्य नायक” सर्वात सामान्य आणि सर्वाधिक दूर सारलेले “कमकुवत आणि नपुंसक भ्याड” बनतील. केवळ हीच गोष्ट देवाच्या नीतिमत्तेचा प्रत्येक पैलू आणि ज्याला मनुष्य धक्का लावू शकत नाही, अशी त्याची प्रवृत्ती करते, केवळ हेच माझ्या हृदयातील द्वेष शांत करू शकते. हे पूर्णपणे वाजवी आहे, हे तुम्हाला पटत नाही का?

जे लोक पवित्र आत्म्याच्या कार्याचा अनुभव घेतात किंवा जे या प्रवाहात आहेत, त्या सर्वांनाच जीवन मिळत नाही. जीवन ही सर्व मानवतेची सामायिक मालमत्ता नाही आणि स्वभावातील बदल सर्व लोक सहजासहजी साध्य करू शकत नाहीत. देवाच्या कार्यापुढे अधीनता खरी आणि वास्तविक असली पाहिजे आणि ती जगली पाहिजे. केवळ वरवरच्या अधीनतेने देवाकडून प्रशंसेचा लाभ होणार नाही आणि स्वतःच्या स्वभावात बदल न करता केवळ देवाच्या वचनांमधील केवळ वरवरच्या पैलूंचे पालन करणे हे देवाच्या अंतःकरणासाठी नाही. देवाची आज्ञा पाळणे आणि देवाच्या कार्याच्या अधीन राहणे हे एकच आहे. जे केवळ देवाच्या अधीन असतात परंतु त्याच्या कार्यास नकार देतात, त्यांना आज्ञाधारक मानले जाऊ शकत नाही, जे खऱ्या अर्थाने अधीन होत नाहीत, परंतु बाह्यतः गूढ आहेत, त्यांना तर बिलकूलच नाही. जे खरोखर देवाच्या अधीन असतात, ते सर्व कार्यातून लाभ घेऊ शकतात आणि देवाच्या स्वभावाची आणि कार्याची जाणीव त्यांना असते. केवळ असे लोकच खऱ्या अर्थाने देवाच्या अधीन होतात. असे लोक नवीन कार्यातून नवीन ज्ञान प्राप्त करण्यास आणि नवीन बदल घडवून आणण्यास सक्षम असतात. देव केवळ याच लोकांची प्रशंसा करतो, केवळ हेच लोक परिपूर्ण होतात आणि केवळ याच लोकांच्या स्वभावात परिवर्तन होते. देव ज्यांची प्रशंसा करतो, ते आनंदाने देवाला आणि त्याच्या वचनाला व कार्याला अधीन होतात. फक्त अशाच व्यक्ती योग्य असतात, फक्त अशाच व्यक्ती मनापासून देवाला प्राप्त करू इच्छितात आणि देवाचा मनापासून शोध घेतात. जे लोक केवळ तोंडाने देवावरील आपल्या श्रद्धेबद्दल बोलतात, परंतु प्रत्यक्षात त्याला शिव्याशाप देतात, असे लोक मुखवटा धारण करणारे आहेत, जे सापाचे विष धारण करतात; ते सर्वात विश्वासघातकी आहेत. कधी ना कधी, या बदमाशांचे नीच मुखवटे फाडून टाकले जातील. हेच कार्य आज होत नाही का? दुष्ट लोक कायम दुष्टच राहतील आणि शिक्षेच्या दिवसापासून ते कधीही सुटणार नाहीत. चांगले लोक नेहमीच चांगले असतील आणि जेव्हा देवाचे कार्य पूर्ण होईल तेव्हा ते प्रकट होतील. दुष्टांपैकी एकालाही नीतिमान समजले जाणार नाही किंवा नीतिमानांपैकी कोणीही दुष्ट समजला जाणार नाही. मी कोणत्याही माणसावर चुकीचा आरोप ठेवू देईन का?

तुमचे जीवन जसजसे प्रगती करते, तसतसे तुमच्याकडे कायम नवीन प्रवेश आणि नवीन, उच्च दृष्टी असणे आवश्यक आहे, जी पावलोपावली अधिक सखोल होते. समस्त मानवतेने यामध्ये प्रवेश केला पाहिजे. संवाद साधणे, प्रवचने ऐकणे, देवाच्या वचनांचे वाचन करणे किंवा काही विषय हाताळणे, याद्वारे तुला नवीन दृष्टी आणि नवीन ज्ञान प्राप्त होईल आणि तू जुन्या नियमांमध्ये आणि जुन्या काळामध्ये अडकून राहणार नाहीस; नेहमी नवीन प्रकाशात जगशील आणि देवाच्या वचनांपासून भरकटणार नाहीस. योग्य मार्गावर चालणे म्हणजे हेच. केवळ वरवर किंमत मोजून चालणार नाही; दिवसेंदिवस, देवाची वचने उच्च क्षेत्रात प्रवेश करतात आणि दररोज नवीन गोष्टी दिसून येतात. त्याचप्रमाणे मनुष्यानेदेखील दररोज नवीन प्रवेश केला पाहिजे. देव जसे बोलतो, त्याचप्रमाणे त्याच्या बोलण्याचे फलित देतो. जर तू त्याचे पालन करू शकला नाहीस, तर मागे पडशील. प्रार्थनेत खोलवर गेले पाहिजे; देवाच्या वचनांचे प्राशन आणि सेवन केवळ अधूनमधून करता येणार नाही. प्राप्त होणारे ज्ञान आणि प्रकाश अधिक सखोल करा, जेणेवरून तुमच्या धारणा आणि कल्पना हळुहळू कमी होतील. तुम्ही तुमचा निर्णयदेखील बळकट करायला हवा आणि तुम्हाला ज्याला समोर जावे लागेल, त्याविषयी तुमचे स्वतःचे विचार आणि दृष्टिकोन असायला हवा. आत्म्याच्या काही गोष्टी समजून घेऊन, तुम्ही बाह्य गोष्टींबद्दल दृष्टी प्राप्त केली पाहिजे आणि कोणत्याही मुद्द्याचे सार समजून घेतले पाहिजे. जर तू या गोष्टींनी सुसज्ज नसशील, तर चर्चचे नेतृत्व कसे करू शकशील? जर तू कोणत्याही सत्यतेशिवाय आणि सरावाच्या मार्गाशिवाय केवळ शब्दशः आणि सिद्धांतांबद्दल बोलत असशील, तर तू केवळ अल्पकाळासाठी सक्षम व्हाल. नव्याने विश्वास ठेवणाऱ्यांशी बोलताना ते काही अंशी स्वीकारले जाईल, परंतु काही काळानंतर, नव्याने विश्वास ठेवणाऱ्यांना जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येईल, तेव्हा तू त्यांना पुरे पडणार नाहीस. मग तू देवाच्या सेवाकार्यासाठी कसे योग्य असशील? नवीन ज्ञानाशिवाय, तू कार्य करू शकत नाहीस. नवीन ज्ञान नसलेल्या लोकांना अनुभव कसा घ्यावा हे कळत नाही आणि अशा लोकांना कधीही नवीन ज्ञान किंवा नवीन अनुभव मिळत नाही. आणि, जीवन पुरवण्याच्या बाबतीत, ते कधीही त्यांचे कार्य करू शकत नाहीत किंवा ते देवाच्या कार्यासाठीदेखील योग्य होऊ शकत नाहीत. या प्रकारची व्यक्ती निव्वळ व्यर्थ आहे. खरे तर, असे लोक त्यांचे कार्य पूर्ण करण्यास असमर्थ असतात, ते सर्व काहीच कामाचे नसतात. ते केवळ त्यांचे कार्य पार पाडण्यात अयशस्वी होत नाहीत, तर ते चर्चवर खूप अनावश्यक ताणदेखील देतात. मी या “आदरणीय वृद्धांना” तातडीने चर्च सोडण्याचे आवाहन करत आहे, जेणेकरून इतरांना तुझ्याकडे बघावे लागणार नाही. अशा लोकांना नवीन कार्याची समज नसते आणि त्यांच्यामध्ये अनंत धारणा ठासून भरलेल्या असतात. ते चर्चमध्ये कोणतेही कार्य करत नाहीत; उलट, ते दुष्प्रचार करतात आणि सर्वत्र नकारात्मकता पसरवतात, अगदी चर्चमध्ये सर्व प्रकारचे गैरवर्तन आणि अशांतता निर्माण करेपर्यंत त्यांची मजल जाते, परिणामी सदसद्विवेकबुद्धी नसलेले गोंधळात आणि संभ्रमात सापडतात. ही जिवंत भुते, या दुष्ट आत्म्यांनी शक्य तितक्या लवकर चर्च सोडले पाहिजे, नाही तर चर्च तुझ्यामुळे खराब होईल. तुला कदाचित आजच्या कार्याची भीती वाटत नसेल, पण तुला उद्याच्या न्याय्य शिक्षेची भीती वाटत नाही का? चर्चमध्ये भरपूर ऐतखाऊ लोक आहेत आणि देवाच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू पाहणारे पुष्कळ लांडगेदेखील आहेत. या सर्व गोष्टी म्हणजे राक्षस राजाने पाठवलेली भुते आहेत, निष्पाप कोकरांना गिळंकृत करू पाहणारे दुष्ट लांडगे आहेत. या तथाकथित लोकांची हकालपट्टी केली नाही, तर ते चर्चवर बांडगुळासारखे जगतील, अर्पणे फस्त करणारे पतंग बनतील. आज न उद्या, तो दिवस येईल, जेव्हा या तिरस्करणीय, अज्ञानी, सामान्य आणि किळसवाण्या अळ्यांना शिक्षा होईल!

मागील:  जे देवाच्या इच्छेनुरूप कार्य करतात त्यांना देव परिपूर्ण करतो

पुढील:  राज्याचे युग म्हणजेच वचनाचे युग आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger