अध्याय १०
अखेरीस, राज्याचे युग हे भूतकाळापेक्षा वेगळे आहे. मानवजात कशी वागते याच्याशी ते संबंधित नाही; उलट, मी माझे कार्य पार पाडण्यासाठी व्यक्तिशः पृथ्वीवर उतरलो आहे, जे असे काहीतरी आहे ज्याची मनुष्य कल्पना करू शकत नाही किंवा ते साध्य करू शकत नाही. जगाच्या निर्मितीपासून इतकी वर्षे, केवळ चर्च उभारण्याचे कार्य केले जात आहे, परंतु कोणीही राज्य उभारल्याचे ऐकिवात नाही. हे जरी मी माझ्या तोंडून बोलत असलो, तरी त्याचे सार जाणणारा कोणी आहे का? मी एकदा मनुष्यांच्या जगात उतरलो आणि त्यांचे दुःख अनुभवले व पाहिले, परंतु हे मी माझ्या देहधारणेचा उद्देश पूर्ण न करता केले. राज्याची उभारणी सुरू झाल्यावर, माझ्या देहधारणेने औपचारिकपणे माझे सेवाकार्य करण्यास सुरुवात केली; म्हणजेच, राज्याच्या राजाने औपचारिकपणे त्याची सार्वभौम सत्ता हातात घेतली. यावरून हे स्पष्ट होते, की मानवी जगामध्ये राज्याचे अवतरण—केवळ शाब्दिक प्रकटीकरण नाही—ही खरी वास्तविकता आहे; “अनुसरणाची वास्तविकता” या अर्थाचा हा एक पैलू आहे. मनुष्यांनी माझ्या कोणत्याही कृती पाहिलेल्या नाहीत किंवा त्यांनी माझे कोणतेही उच्चार ऐकलेले नाहीत. जरी त्यांनी माझ्या कृती पाहिल्या असत्या, तरी त्यांना काय सापडले असते? आणि त्यांनी माझे बोलणे ऐकले असते, तर त्यांना काय समजले असते? संपूर्ण जगात, प्रत्येकजण माझी करुणा व प्रेमळपणा यामध्ये अस्तित्वात आहे, परंतु तसे तर संपूर्ण मानवजात माझ्या न्यायाच्यादेखील अधीन आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या कसोट्यांच्या अधीन आहे. जरी सर्व लोक काही प्रमाणात भ्रष्ट झाले असले तरी मी लोकांच्या बाबतीत दयाळू व प्रेमळ राहिलो आहे; जरी ते सर्व माझ्या सिंहासनाच्या अधीन गेले असले तरी मी त्यांचे ताडण केले आहे. तथापि, असा कोणी मनुष्य आहे का जो मी पाठवलेले दुःख आणि परिष्करण यांच्यात सापडलेला नाही? बरेच लोक अंधारातून प्रकाशात जाण्यासाठी झटत आहेत व बरेच लोक त्यांच्या कसोट्यांशी कडवटपणे झगडत आहेत. ईयोबाच्या ठायी श्रद्धा होती, पण तो स्वतःच्या सुटकेसाठी मार्ग शोधत नव्हता का? जरी माझे लोक कसोट्यांना तोंड देत खंबीरपणे उभे राहू शकत असले, तरी असा कोणी आहे का जो मोठ्याने न बोलता, खोलवर श्रद्धा बाळगेल? उलट लोक अजूनही त्यांच्या मनात शंका ठेवून त्यांचा विश्वास व्यक्त करतात असे नाही का? असा कोणताही मनुष्य नाही जो कसोट्यांमध्ये भक्कमपणे उभा राहिला आहे किंवा कसोटीला सामोरे जाताना ख-या अर्थी अधीन ग झाला आहे. जर मी या जगाकडे बघणे टाळण्यासाठी माझा चेहरा झाकून ठेवला नसता, तर संपूर्ण मानवजात माझ्या जळजळीत नजरेने कोसळून पडली असती, कारण मी मानवजातीकडून काहीही मागत नाही.
जेव्हा राज्याची सलामी दुमदुमते—जेव्हा सात मेघगर्जना होतात तेव्हा—हा आवाज स्वर्ग आणि पृथ्वीला हादरवून टाकतो, स्वर्गातील सर्वोच्च भागाला हादरवतो व प्रत्येक मनुष्याच्या हृदयामधील अंतर्गत भावनांना कंपन करतो. अग्निवर्ण अजगराच्या भूमीत राज्याचे राष्ट्रगीत समारंभपूर्वक वाजवले जाते आणि हे सिद्ध होते, की मी त्या राष्ट्राचा विनाश करून माझे राज्य स्थापित केले आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, पृथ्वीवर माझे राज्य स्थापन झाले आहे. या क्षणी, मी माझ्या देवदूतांना जगातील प्रत्येक राष्ट्रात पाठवण्यास सुरुवात करत आहे, जेणेकरून ते माझ्या पुत्रांचे, माझ्या लोकांचे पालनपोषण करतील; हे माझ्या कार्याच्या पुढील टप्प्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठीदेखील आहे. तथापि, मी व्यक्तिशः त्या ठिकाणी येतो जेथे अग्निवर्ण अजगर वेटोळे घालून बसला आहे आणि त्याच्याशी स्पर्धा करतो. संपूर्ण मानवजातीने मला देहात ओळखल्यावर व देहातील माझी कृत्ये पाहण्यास ती सक्षम झाल्यावर, अग्निवर्ण अजगराची गुहा राख होऊन जाईल आणि कोणतेही नामोनिषाण न राहता नाहीशी होईल. माझ्या राज्याचे लोक या नात्याने, तुम्हाला अग्निवर्ण अजगराचा प्रचंड द्वेष असल्यामुळे, तुम्ही तुमच्या कृतींनी माझे हृदय संतुष्ट केले पाहिजे व अशा प्रकारे अजगराला लज्जित केले पाहिजे. अग्निवर्ण अजगर तिरस्करणीय आहे असे तुम्हाला खरोखर वाटते का? तो राज्याच्या राजाचा शत्रू आहे असे तुम्हाला खरेच वाटते का? तुम्ही माझ्यासाठी अद्भूत साक्ष देऊ शकता असा तुमचा खरोखर विश्वास आहे का? तुम्हाला खरोखर विश्वास आहे, की तुम्ही अग्निवर्ण अजगराला पराभूत करू शकता? माझे तुमच्याकडे हेच मागणे आहे; तुम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम व्हावे एवढेच मला हवे आहे. तुम्ही हे करू शकाल का? तुम्ही हे साध्य करू शकाल असा तुम्हाला विश्वास आहे का? मनुष्य नेमके काय करू शकतो? उलट ते मी स्वतः का करू नये? ज्या ठिकाणी लढाई सुरू आहे त्या ठिकाणी मी व्यक्तिशः उतरलो, असे मी का म्हणतो? मला तुमची श्रद्धा हवी आहे, तुमची कृत्ये नाही. सर्व मनुष्य माझी वचने सरळ रीतीने स्वीकारण्यास असमर्थ आहेत आणि त्याऐवजी ते फक्त एक कटाक्ष टाकतात. यामुळे तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्यात मदत झाली आहे का? तुम्ही मला अशा प्रकारे ओळखू शकलात का? प्रामाणिकपणे सांगायचे तर, पृथ्वीवरील मनुष्यांपैकी कोणीही माझ्या नजरेला नजर मिळवण्यास सक्षम नाही आणि कोणीही माझ्या वचनांचा शुद्ध व निर्मळ अर्थ प्राप्त करण्यास सक्षम नाही. म्हणून मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी आणि लोकांच्या हृदयात स्वतःची खरी प्रतिमा स्थापित करण्यासाठी पृथ्वीवर एक अभूतपूर्व प्रकल्प सुरू केला आहे. अशा प्रकारे, मी त्या युगाचा अंत करेन ज्यामध्ये धारणा लोकांवर वर्चस्व गाजवतात.
आज, मी अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात उतरत आहे, तसेच मी संपूर्ण विश्वाला तोंड देण्यासाठी पुढेदेखील जात आहे, ज्यामुळे स्वर्गातील सर्वोच्च भाग संपूर्ण हादरला आहे. माझ्या न्यायाच्या अधीन नसलेली एक तरी जागा कुठेही आहे का? अशी एकही जागा आहे का जी मी पाठवलेल्या आपत्तींच्या अंतर्गत नाही? मी जेथे जातो तेथे मी सर्व प्रकारच्या “आपत्तीची बीजे” विखुरली आहेत. हा माझा कार्य करण्याचा एक मार्ग आहे आणि निःसंशयपणे मानवजातीच्या तारणाची कृती आहे आणि मी त्यांना जे देतो तेदेखील एक प्रकारचे प्रेमच आहे. माझी इच्छा आहे, की मी आणखी लोकांना मला ओळखू द्यावे आणि मला पाहू द्यावे व अशा प्रकारे, अशा देवाचा आदर करू द्यावा ज्याला ते इतकी वर्षे पाहू शकले नाहीत परंतु जो सध्या खरा आहे. मी जगाची निर्मिती कोणत्या कारणासाठी केली? मनुष्ये भ्रष्ट झाल्यानंतर मी त्यांचा समूळ नायनाट का केला नाही? कोणत्या कारणास्तव संपूर्ण मानवजात आपत्तींमध्ये जगते? देहधारण करण्याचा माझा उद्देश काय होता? जेव्हा मी माझे कार्य करत असतो, तेव्हा मानवजात केवळ कडूच नव्हे, तर गोड गोष्टींचीही चव शिकते. जगातील सर्व लोकांमध्ये, असा कोण आहे जो माझ्या कृपेत राहत नाही? जर मी मनुष्यांना भौतिक आशीर्वाद दिले नसते, तर जगात भरपूर आनंद कोण घेऊ शकला असता? माझे लोक म्हणून तुम्हाला तुमची जागा घेण्याची परवानगी देणे हाही आशीर्वाद असू शकतो का? तुम्ही माझे लोक नसून सेवेकरी असता, तर माझ्या आशीर्वादात तुम्ही अस्तित्वात नसता का? तुमच्यापैकी कोणीही माझ्या वचनांचे मूळ शोधण्यास सक्षम नाही. मानवजातीने—मी त्यांना बहाल केलेल्या उपाधींचा मान राखणे तर दूरच, त्यांच्यापैकी अनेक जण “सेवेकरी” या उपाधीमुळे हृदयात द्वेष बाळगतात आणि बरेच जण “माझे लोक” या उपाधीमुळे त्यांच्या हृदयात माझ्याबद्दल प्रेम बाळगतात. कोणीही मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये; माझे डोळे सर्व पाहत आहेत! तुमच्यापैकी कोण स्वेच्छेने स्वीकारतो, तुमच्यापैकी कोण पूर्ण आज्ञाधारक आहे? जर राज्याची सलामी दुमदुमली नाही, तर तुम्ही खरोखरच शेवटपर्यंत अधीन राहू शकाल का? मनुष्य काय करण्यास आणि कसा विचार करण्यास सक्षम आहे व तो किती पुढे जाण्यास सक्षम आहे—या सर्व गोष्टी मी खूप पूर्वीपासून ठरवल्या होत्या.
बहुसंख्य लोक माझ्या चेह-यावरून माझे जळणे स्वीकारतात. बहुसंख्य लोक, माझ्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन, शोधासाठी पुढे जाण्यासाठी स्वतःला जागृत करतात. जेव्हा सैतानाच्या शक्ती माझ्या लोकांवर हल्ला करतात, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी मी तेथे असतो; जेव्हा सैतानाच्या कारस्थानांनी त्यांच्या जीवनात विध्वंस होतो, तेव्हा मी ते कधीही परत येणार नाही, अशा रीतीने पळवून लावतो. पृथ्वीवर, सर्व प्रकारचे दुष्ट आत्मे सदैव विश्रांतीसाठी जागा शोधत असतात आणि मानवी प्रेतांचा अविरतपणे शोध घेत असतात जे ते खाऊ शकतात. माझे लोक! तुम्ही माझ्या काळजी आणि संरक्षणात राहिले पाहिजे. कधीही दुर्गुणी होऊ नका! कधीही निष्काळजीपणे वागू नका! तू माझ्या घरात तुझी निष्ठा अर्पण केली पाहिजेस व केवळ निष्ठेनेच तू सैतानाच्या डावपेचांचा प्रतिकार करू शकतोस. कोणत्याही परिस्थितीत तू पूर्वीप्रमाणे वागू नकोस, माझ्यासमोर एक आणि माझ्या मागे दुसरे असे करू नकोस; जर तू असे वागलास तर तू आधीच सुटकेच्या पलीकडे आहेस. मी यासारखी पुरेशी वचने उच्चारलेली नाहीत का? याचे मुख्य कारण हेच आहे, की मानवजातीचा जुना स्वभाव इतका कोडगा आहे की मला लोकांना वारंवार आठवण करून द्यावी लागली. कंटाळू नका! मी जे काही म्हणतो ते तुमच्या नशिबाची खात्री करण्यासाठी आहे! घाण आणि मलीन जागा हेच सैतानाला हवे आहे; तुम्ही जितके अधिक हताशपणे सुटकेयोग्य नसाल व जितके अधिक दुर्गुणी असाल, संयम बाळगण्यास नकार द्याल, तितकेच ते अशुद्ध आत्मे तुमच्यात घुसखोरी करण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतील. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, तर तुमची निष्ठा निष्फळ बडबड करण्याशिवाय काहीही नसेल, त्यात कोणतीही वास्तविकता नसेल आणि अशुद्ध आत्मे तुमचा संकल्प खोडून काढतील व त्याचे रूपांतर अवज्ञा आणि सैतानी कारस्थानांमध्ये करतील जे माझ्या कार्यात अडथळा आणण्यासाठी वापरले जातील. तेथून, मी तुम्हाला कधीही फटकारू शकतो. या परिस्थितीचे गांभीर्य कोणालाच कळत नाही; सर्व लोक जे ऐकतात त्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करतात आणि किंचितही सावध नसतात. भूतकाळात काय केले होते ते मला आठवत नाही; तू खरोखरच मी पुन्हा एकदा “विसरून” तुझ्या बाबतीत सौम्य होण्याची वाट पाहत आहेस का? मनुष्यांनी माझा विरोध केला असला, तरी मी त्यांचा विरोध करणार नाही, कारण त्यांची पातळी फारच कमी आहे आणि म्हणून मी त्यांच्याकडून फार मोठ्या मागण्या केल्या नाहीत. मला फक्त एवढीच अपेक्षा आहे, की त्यांनी दुर्गुणी होऊ नये व त्यांनी संयम बाळगावा. ही एक अट पूर्ण करणे तुमच्या क्षमतेपलीकडे नक्कीच नाही, बरोबर ना? बहुतेक लोक मी त्यांच्या डोळ्यांना मेजवानी द्यावी यासाठी मी आणखी रहस्ये प्रकट करण्याची वाट पाहत आहेत. तथापि, जरी तुला स्वर्गातील सर्व रहस्ये समजली, तरी तू त्या ज्ञानाचे नेमके काय करू शकतोस? त्यामुळे तुझे माझ्यावरील प्रेम वाढेल का? यामुळे तुझे माझ्यावरील प्रेम जागृत होईल का? मी मनुष्यांना कमी लेखत नाही किंवा मी त्यांच्याबद्दल सहजच निर्णय घेत नाही. जर ही मनुष्यांची वास्तविक परिस्थिती नसती, तर मी त्यांना इतक्या सहज असे शिक्के लावले नसते. भूतकाळाचा विचार करा: मी किती वेळा तुमची निंदा केली? मी तुम्हाला किती वेळा कमी लेखले आहे? तुमची वास्तविक परिस्थिती कशीही असली तरी मी तुमच्याकडे किती वेळा पाहिले आहे? किती वेळा माझे उच्चार तुम्हाला मनापासून जिंकण्यात अपयशी ठरले आहेत? तुमच्यात खोलवर गुंजत असलेल्या गोष्टींवर प्रहार न करता मी किती वेळा बोललो? मी तुम्हाला अथांग खड्ड्यात मारून टाकेन अशी भीती निर्माण करणारी माझी वचने तुमच्यापैकी कोणी न घाबरता, न थरथरता वाचली आहेत? माझ्या वचनांद्वारे कोण कसोट्यांना सामोरे जात नाही? माझ्या उच्चारांमध्ये अधिकार आहे, परंतु हे मनुष्यांविषयी प्रासंगिक न्याय देण्यासाठी नाही; त्याऐवजी, त्यांची वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन, मी त्यांच्यासमोर सतत माझ्या वचनांमध्ये अंतर्निहित असलेला अर्थ प्रकट करतो. खरे तर, माझ्या वचनांमधील माझी सर्वशक्तिमान शक्ती ओळखण्यास सक्षम असा कोणी आहे का? माझी वचने ज्याच्यापासून बनलेली आहेत ते सर्वात शुद्ध सोने मिळवू शकणारा कोणी आहे का? मी किती वचने उच्चारली आहेत? कोणी कधी त्या वचनांचा खजिना ठेवला आहे का?
३ मार्च १९९२