अध्याय ८
जेव्हा माझी प्रकटीकरणे त्यांच्या कळसावर पोहोचतील आणि जेव्हा माझा न्याय पूर्ण होईल, तेव्हा ती वेळ माझे सर्व लोक उघडकीस आणण्याची व पूर्ण केले जाण्याची वेळ असेल. जे माझ्या उद्देशाशी जुळवून घेतात आणि माझ्या वापरासाठी योग्य आहेत त्यांच्या शोधात मी विश्वामधील जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात प्रवास करतो. कोण उठून मला सहकार्य करू शकेल? मनुष्याचे माझ्यावरचे प्रेम अत्यल्प आहे आणि त्यांचा माझ्यावरील विश्वासही दयनीय म्हणावा एवढा अल्प आहे. जर मी माझ्या वचनांचा आघात लोकांच्या कमकुवतपणावर केला नाही, तर जणू ते पृथ्वीवरील गोष्टींबद्दल सर्वज्ञ व सर्वज्ञानी आहेत अशा रीतीने बढाई मारतील व अतिशयोक्ती करतील, हटवादी आणि पोकळ सिद्धांतांचे भाष्य करतील. जे भूतकाळात माझ्याशी “एकनिष्ठ” होते आणि जे आज माझ्यासमोर “ठाम उभे आहेत”, त्यांच्यापैकी कोण अजूनही बढाई मारून बोलण्याचे धाडस करते? कोण गुप्तपणे त्यांच्या स्वतःच्या संधींमध्ये आनंदित नाही? जेव्हा मी लोकांना थेट उघडकीस आणले नाही, तेव्हा त्यांना लपण्यासाठी कोठेही जागा नव्हती व त्यांना लाज वाटली. मी वेगळ्या पद्धतीने बोललो तर ते आणखी किती होईल? लोकांमध्ये कृतज्ञतेची भावना अधिक असेल, त्यांना विश्वास असेल की त्यांना काहीही बरे करू शकत नाही आणि ते सर्व त्यांच्या निष्क्रियतेने घट्ट बांधलेले असतील. जेव्हा लोक निराश होतात, तेव्हा राज्याची सलामी अधिकृतपणे वाजवली जाते, म्हणजे लोकांनी म्हटल्याप्रमाणे, “ज्या वेळी सातपट सामर्थ्यवान आत्मा कार्य करण्यास सुरुवात करतो.” दुसऱ्या शब्दांत, जेव्हा पृथ्वीवर राज्याचे जीवन अधिकृतपणे सुरू होते; जेव्हा माझे देवत्व थेट कार्य करण्यासाठी पुढे येते (कोणत्याही मानसिक “प्रक्रिया” याशिवाय). सर्व लोक व्यस्ततेने धावतात, जणू काही त्यांना स्वप्नातून पुनरुज्जीवित केले आहे किंवा जागृत केले आहे आणि जागृत झाल्यावर, अशा परिस्थितीत स्वतःला पाहून आश्चर्यचकित होतात. पूर्वी, मी चर्चच्या इमारतीबद्दल बरेच काही सांगितले; मी अनेक रहस्ये उलगडून दाखवली, पण जेव्हा ते कार्य शिगेला पोहोचले तेव्हा ते अचानक बंद झाले. राज्याची उभारणी मात्र वेगळी आहे. जेव्हा आध्यात्मिक जगातील युद्ध अंतिम टप्प्यात पोहोचते तेव्हाच मी पृथ्वीवर माझे कार्य पुन्हा सुरू करतो. म्हणजेच, जेव्हा सर्व मानवजात माघार घेण्याच्या मार्गावर असते तेव्हाच मी औपचारिकपणे माझे नवीन कार्य सुरू करतो आणि उभारतो. राज्याची उभारणी व चर्चची उभारणी यातील फरक हा आहे, की चर्चची उभारणी करताना, मी देवत्वाद्वारे शासित असलेल्या मानवजातीद्वारे कार्य केले; मी मनुष्यांच्या जुन्या स्वभावाशी थेट व्यवहार केला, त्यांचे कुरूप स्वभाव उघड केले आणि त्यांचे सार उघड केले. परिणामी, या आधारावर त्यांनी स्वतःला ओळखले व त्यांच्या अंतःकरणात आणि त्यांच्या वचनांमध्ये त्यांना ते पटले. राज्य निर्माण करताना, मी थेट माझ्या देवत्वाद्वारे कार्य करतो व माझ्या वचनांबाबत त्यांच्या ज्ञानाच्या पायावर माझ्याजवळ काय आहे आणि मी कोण आहे हे जाणून घेण्याची सर्व लोकांना अनुमती देतो, शेवटी देहधारी म्हणून माझे ज्ञान प्राप्त करण्यास त्यांना अनुमती देतो. अशाप्रकारे सर्व मानवजातीचा अस्पष्ट देवाचा पाठपुरावा संपतो व अशाप्रकारे ते स्वर्गातील देवासाठी त्यांच्या हृदयात स्थान राखून ठेवणे थांबवतात; म्हणजेच, मी देहधारी असताना केलेली कृत्ये मी मानवजातीला कळू देतो जेणेकरून पृथ्वीवरील माझा काळ संपेल.
राज्याच्या उभारणीचे उद्दिष्ट थेटपणे आध्यात्मिक जगावर निर्देशित केलेले आहे. म्हणजेच, आध्यात्मिक जगाच्या लढाईची स्थिती थेटपणे माझ्या सर्व लोकांमध्ये स्पष्ट केली गेली आहे आणि दाखवण्यासाठी म्हणून हे पुरेसे आहे, की केवळ चर्चमध्येच नाही, तर राज्याच्या युगातही, प्रत्येक व्यक्ती सतत युद्धात जगत आहे. त्यांचे भौतिक शरीर असूनही, आध्यात्मिक जग थेटपणे प्रकट होते व ते आध्यात्मिक जगाच्या जीवनाशी संपर्कात येतात. अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही श्रद्धा बाळगण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही माझ्या कार्याच्या पुढील भागासाठी योग्य तयारी केलीच पाहिजे. तुम्ही तुमच्या अंतःकरणातील सर्व काही दिले पाहिजे; तरच तुम्ही माझे हृदय संतुष्ट करू शकाल. चर्चमध्ये पूर्वी काय घडले याची मला यत्किंचितही पर्वा नाही; आज, ते राज्यात आहे. माझ्या योजनेत, सैतान प्रत्येक पावलामागे लपूनछपून येत आहे आणि माझ्या मूळ योजनेत व्यत्यय आणण्यासाठी, माझा शहाणपणाला विरोध म्हणून नेहमीच वेगवेगळे मार्ग व पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही मी त्याच्या फसव्या योजनांना बळी पडू शकेन का? स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट माझी सेवा करते; सैतानाच्या फसव्या योजना काही वेगळ्या असू शकतात का? नेमके इथेच माझे शहाणपण त्याला छेद देते; माझ्या कृतींबद्दल हीच आश्चर्यकारक बाब आहे, व तेच माझ्या संपूर्ण व्यवस्थापन योजनेच्या कार्यवाहीचे तत्त्व आहे. राज्याच्या उभारणीच्या काळादरम्यान, मी अजूनही सैतानाच्या फसव्या योजनांना टाळत नाही, परंतु मला आवश्यकच आहे ते कार्य करत राहतो. संपूर्ण विश्व व सर्व गोष्टींमधून, मी सैतानाची कृत्ये विरोध म्हणून निवडली आहेत. हे माझ्या शहाणपणाचे आविष्करण नाही का? माझ्या कार्याबद्दल जे आश्चर्यकारक आहे ते हेच नाही का? राज्याच्या युगात प्रवेश करण्याच्या प्रसंगी, स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींमध्ये पूर्णपणे परिवर्तन होते व ते उत्सव आणि आनंद साजरा करतात. तुम्ही काही वेगळे आहात का? कोणाच्या हृदयात मधाचा गोडवा नाही? आनंदाने कोण उल्हसित होत नाही? कोण आनंदाने नाचत नाही? स्तुतीचे शब्द कोण उच्चारत नाहीत?
मी वर जे काही बोललो आणि जी चर्चा केली त्या सर्वांची उद्दिष्टे व मूळ तुम्हाला समजले आहे की नाही? जर मी हे विचारले नसते, तर बहुतेक लोकांना असे वाटेल, की मी फक्त बडबड करत होतो व माझ्या वचनांचा स्रोत समजू शकणार नाही. जर तुम्ही त्यांचा काळजीपूर्वक विचार केलात, तर तुम्हाला त्यांचे महत्त्व कळेल. तू ते बारकाईने वाचलेस तर चांगले होईल: माझी कोणती वचने तुझ्यासाठी फायदेशीर नाहीत? कोणत्या गोष्टी तुझ्या जीवनात प्रगती करत नाहीत? आध्यात्मिक जगाच्या वास्तविकतेबद्दल कोण बोलत नाहीत? बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे, की वचनांचे कोणतेही यमक किंवा कारण नाही, त्यांच्याकडे स्पष्टीकरण व अर्थ नाही. माझी वचने खरोखर इतकी अवास्तविक आणि अस्पष्ट आहेत का? तुम्ही खरोखर माझ्या वचनांच्या अधीन आहात का? माझी वचने तुम्हाला खरोखरच मान्य आहेत का? तुम्ही त्यांचा खेळ करत नाही का? तुझे कुरूप स्वरूप झाकण्यासाठी तू त्यांचा वापर कपडे म्हणून करत नाहीस का? या विशाल जगात, मी वैयक्तिकरीत्या कोणाचे परीक्षण केले आहे? माझ्या आत्म्याची वचने वैयक्तिकरीत्या कोणी ऐकली आहेत? बरेच लोक अंधारात चाचपडतात व शोधत राहतात; अनेक लोक संकटात प्रार्थना करतात; बरेच लोक, भुकेले आणि थंडीने गारठलेले आहेत, ते आशेने पाहतात; व अनेकांना सैतानाने बांधून ठेवले आहे; तरीही अनेकांना कोठे जावे हे माहीत नाही, बरेच लोक त्यांच्या आनंदात माझा विश्वासघात करतात, बरेच कृतघ्न आहेत आणि बरेच जण सैतानाच्या फसव्या योजनांशी एकनिष्ठ आहेत. तुमच्यापैकी ईयोब कोण आहे? पेत्र कोण आहे? मी वारंवार ईयोबाचा उल्लेख का केला आहे? मी इतक्या वेळा पेत्राचा उल्लेख का केला आहे? माझ्या तुमच्याबद्दलच्या आशा काय आहेत हे तुम्ही कधी तपासले आहे का? अशा गोष्टींवर विचार करण्यात तुम्ही जास्त वेळ घालवला पाहिजे.
पेत्राने अनेक वर्षे माझ्यावर श्रद्धा ठेवली, तरीही त्याने कधीही कुरकुर केली नाही किंवा तक्रार केली नाही; ईयोबही त्याच्या बरोबरीचा नव्हता आणि युगानुयुगे, सर्व संतही पेत्राच्या तुलनेत खूप कमी पडले आहेत. त्याने मला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच सैतान त्याच्या कपटी योजना आखत होता त्या काळात त्याने मला ओळखले. यामुळे पेत्राने अनेक वर्षे, नेहमी माझ्या इच्छेनुसार माझी सेवा केली व या कारणास्तव, सैतानाने त्याचे कधीही शोषण केले नाही. पेत्राने ईयोबाच्या श्रद्धेतून शिकवण घेतली, तरीही त्याला ईयोबाच्या उणिवाही स्पष्टपणे जाणवल्या. ईयोबाच्या ठायी प्रचंड श्रद्धा असली तरी, त्याला आध्यात्मिक जगातील बाबींचे ज्ञान नव्हते, म्हणून त्याने अनेक वचने उच्चारली जी वास्तविकतेशी सुसंगत नव्हती; यावरून हे दिसून येते की ईयोबाचे ज्ञान उथळ आणि परिपूर्णतेसाठी असमर्थ होते. म्हणून, पेत्राने नेहमी आत्म्याची समज प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले व आध्यात्मिक जगाच्या गतिशीलतेचे निरीक्षण करण्याकडे नेहमी लक्ष दिले. परिणामी, तो माझ्या इच्छांबद्दल काहीतरी निश्चित करू शकला तसेच तो सैतानाच्या फसव्या योजनांची थोडीशी माहितीदेखील प्राप्त करू शकला. यामुळे, इतर कोणापेक्षाही त्याचे माझ्याबद्दलचे ज्ञान युगानुयुगे वाढत गेले.
पेत्राच्या अनुभवावरून, हे पाहणे कठीण नाही, की जर मनुष्यांना मला जाणून घ्यायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या आत्म्यात काळजीपूर्वक विचार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू माझ्यासाठी बाहेरून काही “समर्पण” कर असे मी तुला सांगत नाही; हे महत्त्वाचे नाही. जर तू मला ओळखत नसशील, तर तू ज्या श्रद्धेबद्दल, प्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल बोलत आहेस ते केवळ भ्रम आहेत; ते वायफळ बोलणे आहे व तू नक्कीच माझ्यासमोर मोठा अभिमान बाळगणारा पण स्वत:ला ओळखत नसलेला ठरशील. यामुळे, तू पुन्हा एकदा सैतानाच्या जाळ्यात अडकशील आणि स्वतःला बाहेर काढण्यात असमर्थ ठरशील; तुम्ही अधोगतीचा पुत्र होशील व विनाशाची वस्तू बनशील. तथापि, जर तू माझ्या वचनांविषयी अलिप्त आणि निष्काळजी असशील तर तू निःसंशयपणे माझा विरोध करतोस. ही वस्तुस्थिती आहे व तू आध्यात्मिक जगाच्या प्रवेशद्वारातून माझ्याकडून ताडण झालेल्या अनेक आणि विविध आत्म्यांकडे पाहिलेस तर तुझे भले होईल. त्यांच्यापैकी कोण माझ्या वचनांना तोंड देत, निष्क्रीय, बेफिकीर व अस्वीकार्य नव्हते? त्यांच्यापैकी कोण माझ्या वचनांबद्दल निंदक नव्हते? त्यांच्यापैकी कोणी माझ्या वचनांमध्ये दोष शोधण्याचा प्रयत्न केला नाही? त्यांच्यापैकी कोणी स्वतःचे “संरक्षण” करण्यासाठी माझी वचने “संरक्षणात्मक शस्त्रे” म्हणून वापरली नाहीत? त्यांनी मला जाणून घेण्याचा मार्ग म्हणून माझ्या वचनांमधील आशयाचा वापर केला नाही, तर केवळ खेळ केला. यात ते मला थेट विरोध करत नव्हते का? माझी वचने कोणती आहेत? माझा आत्मा कोण आहे? मी तुम्हाला असे प्रश्न अनेक वेळा विचारले आहेत, तरीही तुम्हाला त्यांच्याबद्दल काही उच्च आणि स्पष्ट अंतर्दृष्टी प्राप्त झाली आहे का? तुम्ही त्यांचा खरोखर अनुभव घेतला आहे का? मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो: जर तुम्हाला माझी वचने माहीत नाहीत, ती स्वीकारली नाहीत किंवा ती आचरणात आणली नाहीत, तर तुम्ही नक्कीच माझ्या ताडणाची वस्तू व्हाल! तुम्ही नक्कीच सैतानाचे बळी व्हाल!
२९ फेब्रुवारी १९९२