अध्याय २६

माझ्या घरी कोण राहिले आहे? माझ्यासाठी कोण उभे ठाकले आहे? माझ्या वतीने कोणी त्रास भोगला आहे? माझ्या वचनाची प्रतिज्ञा कोणी घेतली आहे? आजपर्यंत माझे अनुसरण कोणी केले आहे आणि तरीही बेपर्वा झालेले नाही? सर्व मनुष्य भावनाशून्य आणि निष्ठूर का आहेत? मानवजातीने मला का त्यागले आहे? मनुष्याला माझा कंटाळा का आला आहे? मानवी जगात जिव्हाळा का नाही? सियोनामध्ये असताना, मी स्वर्गात असतो तो जिव्हाळा अनुभवला आहे आणि सियोनामध्ये असताना मी स्वर्गातील आशीर्वाददेखील अनुभवला आहे. पुन्हा, मी मानवजातीमध्ये राहिलो आहे, मानवी जगातील कडवटपणा चाखला आहे आणि मनुष्यांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध अवस्था मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. मी “बदललो” आहे तसाच मनुष्य नकळत बदलला आहे आणि केवळ याच प्रकारे तो आजच्या दिवसापर्यंत आला आहे. मनुष माझ्यासाठी काही करण्यास सक्षम व्हावा याची मला आवश्यकता नाही, तसेच माझ्यासाठी त्याने काही वाढवावे याचीही मला आवश्यकता नाही. त्याने माझ्या योजनेनुसार कृती करण्यास सक्षम व्हावे आणि माझी अवज्ञा करू नये किंवा माझ्यावर कलंक होऊ नये, तर माझ्यासाठी ठोस साक्ष व्हावे इतकेच मला हवे आहे. मनुष्यांमध्ये असे काही आहेत ज्यांनी माझ्यासाठी चांगली साक्ष दिली आहे आणि माझ्या नावाचा महिमा गायला आहे, पण मनुष्याचे आचरण आणि वर्तन माझ्या हृदयाचे संभवतः समाधान कसे करू शकतात? तो माझ्या हृदयाशी कसा जुळू शकतो किंवा माझ्या इच्छेचे समाधान कसे करू शकतो? पृथ्वीवरील पर्वत आणि जलाशये आणि फुले, गवत आणि झाडे, यांवर माझ्या हाताने केलेल्या कार्याच्या खुणा दिसतात, सर्व माझ्या नामासाठी अस्तित्वात आहेत. तरीही मनुष्य माझ्या मागण्यांचे मानदंड का साध्य करू शकत नाही? हे त्याच्या अतिशय हीनपणामुळे असावे का? मी तुम्हाला वाढवले म्हणून असावे का? मी त्याच्याशी फारच निष्ठुरपणे वागतो असे असेल का? मनुष्याला माझ्या मागण्यांचे कायम भय का वाटते? आज, राज्यातील अनेक लोकांमध्ये, तुम्ही माझा फक्त आवाज ऐकता पण माझा चेहरा पाहू इच्छित नाही असे का? माझ्या वचनांची माझ्या आत्म्याशी सांगड न घालता तुम्ही त्याकडे का पाहता? स्वर्ग आणि पृथ्वी येथे मला तुम्ही वेगवेगळे का ठेवता? पृथ्वीवर असताना मी स्वर्गापेक्षा वेगळा असतो असे असेल का? मी स्वर्गात असताना पृथ्वीवर येऊ शकत नाही असे असेल का? पृथ्वीवर असताना मी स्वर्गात घेऊन जाण्यास अपात्र आहे असे असेल का? हे म्हणजे जणू काही मी पृथ्वीवर असताना कुणी हीन प्राणी असतो, हे म्हणजे मी स्वर्गात असताना कुणीतरी उच्च प्राणी असतो, आणि जणू काही स्वर्ग आणि पृथ्वीदरम्यान सांधता न येणारी दरी असते. तरीही मनुष्याच्या जगात त्यांना या गोष्टींच्या मुळाबद्दल काही माहीत असल्याचे दिसत नाही, पण तरीही ते कायम माझ्याविरुद्ध मते मांडतात, जणू काही माझ्या वचनांना फक्त आवाज आहे आणि काहीही अर्थ नाही. सर्व मानवजात माझ्या वचनांवर ताकद खर्च करते, माझ्या बाह्य साधर्म्यावर स्वतःच तपास हाती घेते, पण ते सर्व अपयशी ठरतात, त्यांच्या प्रयत्नांना काहीही फळ येत नाही आणि त्याऐवजी ते माझ्या वचनांनी खाली कोसळतात आणि पुन्हा उठण्याचे त्यांना धाडस होत नाही.

जेव्हा मी मानवजातीच्या श्रद्धेची परीक्षा घेतो, तेव्हा एकही मनुष्य खरी साक्ष देत नाही, एकही मनुष्य त्याचे सर्वस्व देऊ शकत नाही; किंबहुना, मनुष्य लपत राहतो आणि स्वतःला उघड करण्याचे नाकारतो, जणू काही मी त्याचे हृदय उद्ध्वस्त करणार आहे. अगदी ईयोबसुद्धा त्याच्या कसोटीमध्ये कधीही खऱ्या अर्थाने ठामपणे उभा राहिला नाही, तसेच त्याने संकटात असताना माधुर्य प्रसारित केले नाही. वसंत ऋतूच्या उबदारपणामध्ये सर्वच लोकांमध्ये हिरवाईची छटा दिसते; पण शिशिर ऋतूच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ते कधीही हिरवे राहात नाहीत. त्याच्या हडकुळ्या आणि दुबळ्या अवस्थेमुळे मनुष्य माझा उद्देश पूर्ण करू शकत नाही. सर्व मानवजातीमध्ये, इतरांसाठी आदर्श ठरू शकेल असा एकही नाही, कारण सर्व मनुष्य मूलतः एकसारखेच असतात आणि एकमेकांपेक्षा वेगळे नसतात. या कारणामुळे, आजही मनुष्य माझे कार्य अद्यापही पूर्णतः जाणू शकलेला नाही. जेव्हा माझे ताडण सर्व मानवजातीला त्यांच्याही नकळत भोगावे लागते, केवळ तेव्हाच त्यांना माझ्या कार्यांची जाणीव होईल आणि मी काहीही न करता किंवा कोणालाही भाग न पाडताच मनुष्य मला जाणेल आणि त्याद्वारे माझ्या कार्यांचा साक्षी होईल. ही माझी योजना आहे, माझ्या कार्यांचा हा प्रकट केलेला पैलू आहे आणि हे मनुष्याला माहीत असले पाहिजे. राज्यामध्ये, सृष्टीतील अगणित गोष्टी पुनरुज्जीवित होऊ लागतात आणि त्यांची जीवनशक्ती परत येते. पृथ्वीच्या स्थितीतील बदलांमुळे, दोन भूप्रदेशांमधील सीमादेखील बदलू लागतात. मी भविष्यवाणी केली आहे, की जेव्हा एक भूप्रदेश दुसऱ्या भूप्रदेशापासून विलग होतो आणि एक भूप्रदेश दुसऱ्या भूप्रदेशाशी एकत्र येतो, त्या वेळी मी सर्व राष्ट्रांचे तुकडे करेन. यावेळी, मी सर्व सृष्टी पुन्हा नव्याने निर्माण करेन आणि संपूर्ण विश्वाचे पुन्हा विभाजन करेन आणि त्याद्वारे विश्वात सुव्यवस्था प्रस्थापित करेन आणि जुन्या गोष्टींचे नव्यामध्ये परिवर्तन घडवून आणेन—ही माझी योजना आहे आणि ही माझी कार्ये आहेत. जेव्हा सर्व राष्ट्रे आणि जगातील सर्व लोक माझ्या सिंहासनासमोर परततील, तेव्हा मी स्वर्गाचे सर्व ऐश्वर्य घेऊन ते मनुष्यावर उधळेन, जेणेकरून, माझ्या कृपेमुळे जग अतुलनीय ऐश्वर्याने ओतप्रोत भरेल. पण जोवर जुने जग अस्तित्वात आहे, तोवर मी त्यातील राष्ट्रांवर माझ्या संतापाचा मारा करेन, विश्वभरात माझ्या प्रशासकीय आदेशांचा उघडपणे प्रचार करेन आणि जो कोणी त्यांचे उल्लंघन करेल, त्याला ताडण करेन:

मी जेव्हा बोलण्यासाठी विश्वाकडे पाहतो, तेव्हा सर्व मानवजात माझा आवाज ऐकते आणि त्यानंतर मी विश्वभरात साकारलेली सर्व कार्ये पाहते. जे माझ्या इच्छेविरुद्ध वागतात, म्हणजे जे मनुष्याच्या कृत्यांनी मला विरोध करतात, त्यांना माझ्या ताडणाचा सामना करावा लागतो. मी आकाशातील असंख्य तारे घेऊन ते नवे करेन आणि माझ्या कृपेने सूर्य आणि चंद्र नवे होतील—आकाश आत्तापर्यंत होते तसे राहणार नाही, पृथ्वीवरील अनेक गोष्टी नव्या होतील. माझ्या वचनांनी सर्व काही परिपूर्ण होईल. विश्वातील अनेक राष्ट्रे नव्याने विभाजित होतील आणि त्या जागी माझे राज्य येईल, जेणेकरून पृथ्वीवरील राष्ट्रे कायमची अदृश्य होतील आणि सर्व काही माझी उपासना करणारे राज्य होईल; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे नष्ट केली जातील आणि त्यांचे अस्तित्व उरणार नाही. विश्वातील मनुष्यांमध्ये, सैतानाचे असणारे लोक नष्ट केले जातील आणि जे सैतानाची उपासना करतात असे सर्वजण माझ्या प्रज्वलित अग्नीमध्ये त्रास भोगतील—म्हणजे, आता जे प्रवाहात आहेत त्यांच्याव्यतिरिक्त इतर सर्वजण भस्मसात होतील. जेव्हा मी अनेक लोकांचे ताडण करेन, तेव्हा जे धार्मिक जगात आहेत ते विविध प्रमाणात माझ्या राज्यात परततील, माझ्या कार्यांनी त्यांच्यावर विजय मिळवला जाईल, कारण पांढऱ्या मेघावर आरूढ होऊन येणाऱ्या पवित्र व्यक्तीचे आगमन त्यांनी पाहिलेले असेल. आपापल्या प्रकारानुसार सर्व लोक वेगवेगळे होतील आणि त्यांना त्यांच्या कृत्यांच्या प्रमाणात ताडण प्राप्त होईल. माझ्याविरुद्ध उभे राहिलेले सर्वजण नष्ट होतील; ज्यांच्या पृथ्वीवरील कृत्यांमध्ये मी समाविष्ट नव्हतो त्यांच्याबद्दल बोलायचे तर, ज्याप्रकारे त्यांनी स्वतःला मुक्त केले आहे त्यामुळे, माझ्या पुत्रांच्या आणि माझ्या लोकांच्या शासनाखाली पृथ्वीवर राहतील. मी अगणित लोकांसमोर आणि अगणित राष्ट्रांमध्ये स्वतःला प्रकट करेन आणि माझ्या स्वतःच्या आवाजाने, मी पृथ्वीवर ध्वनित होऊन, माझ्या महान कार्याच्या पूर्ततेची घोषणा करेन जेणेकरून, सर्व मानवजात त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहू शकेल.

माझा आवाज अधिक घनगंभीर होतो, त्यावेळी मी विश्वाच्या स्थितीचे निरीक्षणही करतो. माझ्या वचनांद्वारे सृष्टीतील अगणित गोष्टी नवीन झाल्या आहेत. स्वर्ग बदलतो त्याचप्रमाणे पृथ्वीही बदलते. मानवजात आपल्या मूळ रूपात उघड होते आणि, हळूहळू प्रत्येक व्यक्ती आपापल्या प्रकारानुसार वेगळी होते आणि नकळत त्यांच्या कुटुंबांच्या हृदयात परतण्याचा मार्ग शोधते. याचा मला फार आनंद होईल. मी विध्वंसमुक्त आहे आणि नकळत, माझे महान कार्य साध्य होते आणि सृष्टीतील सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन घडून येते. मी जेव्हा जग निर्माण केले, तेव्हा मी सर्व गोष्टी त्यांच्या प्रकारानुसार तयार केल्या, सर्व गोष्टी त्यांच्या प्रकारानुसार एकत्र ठेवल्या. माझ्या व्यवस्थापन योजनेचा शेवट जवळ येईल, तशी मी सृष्टीची पूर्वीची स्थिती पुनर्संचयित करेन; सर्व काही जसे मूलतः होते, तसेच करेन, सर्व काही आमूलाग्र बदलेन, जेणेकरून सर्व काही माझ्या योजनेच्या गाभ्यात परतेल. आता ती वेळ आली आहे! माझ्या योजनेचा शेवटचा टप्पा साध्य होऊ घातला आहे. हे अस्वच्छ जुने जगा! तुझी नक्कीच माझ्या वचनांखाली अधोगती होईल! माझ्या योजनेमुळे तू नक्कीच नेस्तनाबूत होशील! हे सृष्टीतील असंख्य गोष्टींनो! माझ्या वचनांमध्ये तुम्हाला सर्वांना नवीन जीवन मिळेल—तुम्हाला तुमचा सार्वभौम प्रभू मिळेल! हे शुद्ध आणि निष्कलंक नव्या जगा! तू नक्कीच माझ्या महिम्यामध्ये पुनरुज्जीवित होशील! हे सियोन पर्वता! आता मूक राहू नकोस—मी विजयी होऊन परतलो आहे! सृष्टीच्या मधून मी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण करतो. पृथ्वीवर मानवजातीने नवे जीवन सुरू केले आहे आणि नवीन आशा प्राप्त केली आहे. हे माझ्या लोकांनो! माझ्या प्रकाशामध्ये तुम्ही कसे काय जीवनात परतणार नाही? माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आनंदविभोर कसे होणार नाही? भूप्रदेश आनंदाने जल्लोष करत आहेत, जलाशये उल्हासाने खळखळाट करत आहेत! हे पुनरुत्थित इस्रायल! माझ्या पूर्वनियोजनामुळे तुला अभिमान कसा वाटणार नाही? कोणी शोक केला आहे? कोण रडले आहे? जुन्या इस्रायलचे अस्तित्व संपले आहे आणि आजचे इस्रायल ताठ आणि उंच मानेने जगात उभे राहिले आहे आणि सर्व मानवजातीच्या हृदयात उभे राहिले आहे. आजचे इस्रायल माझ्या लोकांच्या माध्यमातून नक्कीच अस्तित्वाचा स्रोत प्राप्त करेल! हे द्वेषपूर्ण इजिप्त! तू नक्कीच अद्याप माझ्याविरुद्ध उभा ठाकला नाहीस? तू माझ्या दयेचा फायदा कसा घेऊ शकतोस आणि माझ्या ताडणातून निसटण्याचा प्रयत्न कसा करू शकतोस? माझ्या ताडणामध्ये तुझे अस्तित्व कसे असू शकत नाही? ज्यांच्यावर माझे प्रेम आहे ते सर्वजण नक्कीच अनंतकाळ जगतील आणि जे माझ्याविरुद्ध उभे राहतात त्या सर्वांचे मी अनंतकाळ ताडण करेन. कारण मी ईर्ष्यापूर्ण देव आहे आणि त्या मनुष्यांनी जे केले आहे त्यासाठी मी त्यांना हलक्यात सोडणार नाही. मी संपूर्ण पृथ्वीवर लक्ष ठेवेन, नीतिमत्त्व, वैभव, क्रोध आणि ताडण यांसह जगाच्या पूर्वेकडे प्रकट होईन, मी स्वतःला मानवतेच्या अनेक धारकांसमोर प्रकट करेन!

२९ मार्च १९९२

मागील:  लोक हो, आनंदित व्हा!

पुढील:  अध्याय २९

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger