लोक हो, आनंदित व्हा!
माझ्या प्रकाशात लोकांना पुन्हा प्रकाश दिसतो. लोक ज्या गोष्टींमध्ये रमतात त्या त्यांना माझ्या वचनामध्ये सापडतात. मी पूर्वेकडून आलो आहे, मी पूर्वेकडचा आहे. माझा महिमा जेव्हा झळकतो, तेव्हा सर्व राष्ट्रे प्रकाशित होतात, सर्व काही प्रकाशित होते, एकही गोष्ट अंधारात राहात नाही. राज्यामध्ये, देवाचे लोक देवासोबत जे जीवन जगतात ते अपरंपार आनंदाचे असते. लोकांच्या कृपाप्राप्त जीवनांमुळे जल आनंदाने नाचू लागते, पर्वत लोकांसह माझ्या विपुलतेचा आनंद घेतात. सर्व मनुष्य संघर्ष करत आहेत, मेहनत करत आहेत, माझ्या राज्याप्रति त्यांची निष्ठा दाखवत आहेत. राज्यामध्ये आता बंड नाही, प्रतिरोध नाही; स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांवर अवलंबून आहेत, मनुष्य आणि मी जीवनाच्या मधुर आनंदांच्या द्वारे गाढ भावनेने जवळ येतो, एकमेकांवर अवलंबतो…. यावेळी, मी माझ्या स्वर्गातील जीवनाचा औपचारिक प्रारंभ करतो. आता सैतानाचा व्यत्यय उरलेला नाही आणि लोक विश्रांतीमध्ये प्रवेश करू लागतात. विश्वभरात, मी निवडलेले लोक माझ्या महिम्यामध्ये राहतात, त्यांना अजोड वरदान मिळाले आहे, लोकांमध्ये राहणारे लोक म्हणून नव्हे, तर देवासह राहणारे लोक म्हणून. संपूर्ण मानवजातीने सैतानाचा भ्रष्टाचार अनुभवला आहे आणि जीवनाचे कडू-गोड घोट चाखले आहेत. आता, माझ्या प्रकाशात जगताना, मनुष्य आनंदी कसा होणार नाही? हा सुंदर क्षण तो सहजपणे कसा जाऊ देईल आणि हातून निसटू देईल? लोक हो! माझ्यासाठी हृदयपूर्वक गाणे गा आणि आनंदाने नृत्य करा! तुमची प्रामाणिक हृदये उचला आणि ती मला द्या! ढोल वाजवा आणि माझ्यासाठी आनंदाने वादन करा! संपूर्ण विश्वातून मी माझा हर्ष प्रस्फुटित करतो! लोकांसमोर मी माझा उज्ज्वल चेहरा उघड करतो! मी मोठ्या आवाजात साद घालेन! मी विश्वाच्या पार जाईन! आधीच मी लोकांमध्ये राज्य करतो! लोकांमुळे मी हर्षभरित होतो! वरच्या निळ्या नभात मी तरंगतो आणि लोक माझ्यासह चालतात. मी लोकांमधून चालतो आणि माझे लोक माझ्याभोवती जमतात! लोकांची हृदये आनंदी आहेत, त्यांची गीते विश्वाला हलवून टाकत आहेत, आकाशाला छेदीत आहेत! विश्व आता धुक्यात वेढलेले नाही; आता कुठे चिखल नाही, आता कचरा साठलेला नाही. विश्वातील पवित्र लोकांनो! माझ्या निरीक्षणाखाली तुम्ही तुमचा खरा चेहरा दाखवा. तुम्ही मलिनतेने भरलेले मनुष्य नाही, तर पाचूसारखे शुद्ध संत आहात, तुम्ही सर्वजण मला प्रिय आहात, तुम्ही सर्वजण माझा आनंद आहात! सर्व गोष्टींना पुनर्जीवन मिळाले आहे! सर्व संत माझी सेवा करण्यासाठी स्वर्गात परतले आहेत, माझ्या प्रेमळ आलिंगनात प्रवेश करत आहेत, ते आता शोक करत नाहीत, चिंतातुर नाहीत, ते स्वतःला मला अर्पण करत आहेत, माझ्या घरी परत येत आहेत आणि त्यांच्या मातृभूमीत ते माझ्यावर अखंड प्रेम करतील! चिरकाल हे असेच राहील! कुठे आहे दुःख! कुठे आहेत अश्रू! कुठे आहे देह! पृथ्वी जाते, पण स्वर्ग चिरकाल असतात. मी सर्व लोकांसमोर प्रकट होतो आणि सर्व लोक माझी स्तुती करतात. हे जीवन, हे सौंदर्य अनादि काळापासून अनंत काळापर्यंत बदलणार नाही. हेच राज्याचे जीवन आहे.