अध्याय ६

आत्म्याच्या गोष्टींकडे, माझ्या वचनाकडे लक्ष द्या आणि माझा आत्मा व माझे अस्तित्व आणि माझे वचन व माझे अस्तित्व हे परस्परांपासून अविभाज्य आहेत हे समजण्यास खरोखर सक्षम व्हा, जेणेकरून सर्व लोक माझ्या उपस्थितीत मला संतुष्ट करू शकतील. मी तिथे असलेल्या सर्व गोष्टींवर पाऊल ठेवले आहे, मी विश्वाचा विशाल विस्तार पाहिला आहे आणि मी सर्व लोकांमध्ये फिरलो आहे, मनुष्यामधील गोडवा व कडवटपणा चाखला आहे—तरीही मनुष्याने मला खऱ्या अर्थाने ओळखलेले नाही, त्याने माझ्या प्रवासादरम्यान माझ्याकडे कधीही लक्ष दिलेले नाही. मला कोणीही खरोखर पाहिले नाही, कारण मी शांत होतो आणि कधीही अलौकिक कृत्ये केली नाहीत. आजचा दिवस भूतकाळापेक्षा वेगळा आहे: मी सृष्टीच्या निर्मितीच्या काळापासून कधीही न पाहिलेल्या गोष्टी करेन, युगानुयुगे कधीही न ऐकलेली वचने उच्चारेन, कारण सर्व लोकांनी मला देहामध्ये ओळखावे अशी माझी इच्छा आहे. हे माझ्या व्यवस्थापनाचे टप्पे आहेत, पण मनुष्याला याची पुसटशीही कल्पना नाही. मी स्पष्ट बोललो तरी लोक गोंधळलेले राहतात; त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे. हा मनुष्याचा कनिष्ठ दर्जा नाही का? मला जो तोडगा काढायचा आहे तो नेमका हाच नाही का? वर्षानुवर्षे, मी मनुष्यात काहीही केले नाही; वर्षानुवर्षे, माझ्या अवतारी देहाच्या थेट संपर्कात असूनही, माझ्या दैवत्वाचा थेट आवाज कोणीही ऐकला नाही. युगानुयुगे माझ्यावर केलेल्या प्रेमावर याचा परिणाम झालेला नसला तरी अशाप्रकारे लोकांमध्ये अपरिहार्यपणे माझ्याबद्दलच्या ज्ञानाचा अभाव आहे. तथापि, आज मी तुमच्यामध्ये चमत्कृतीपूर्ण कार्य केले आहे, अथांग आणि अगणित कार्य केले आहे व मी बरीच वचने उच्चारली आहेत. आणि तरीही, अशा परिस्थितीत, माझ्या उपस्थितीत मला थेट विरोध करणारे अजूनही बरेच आहेत. आता मी तुला काही उदाहरणे देतो.

तुम्ही दररोज अस्पष्ट देवाची प्रार्थना करता, माझी इच्छा समजून घेण्याचा आणि जगण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करता. तरीही माझ्या वचनांचा सामना करताना तुम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहता; तुम्ही माझी वचने व आत्मा यांना पूर्णपणे विचारात घेता, तरीही माझे अस्तित्व बाजूला ठेवता, माझ्यासारखी व्यक्ती अशी वचने उच्चारण्यास मूलभूतपणे असमर्थ आहे आणि ती माझ्या आत्म्याद्वारे निर्देशित आहेत, असे तुम्हाला वाटते. अशा परिस्थितीत तुझ्या ज्ञानाचे काय? तू माझ्या वचनांवर एका मर्यादेपर्यंत विश्वास ठेवतोस, तरीही मी ज्या देहाचा पोशाख धारण करतो त्या देहाबद्दल विविध तीव्र धारणा बाळगतोस. तू दररोज त्याचा अभ्यास करण्यात घालवतोस आणि म्हणतोस, “तो अशाप्रकारे गोष्टी का करतो? ते खरोखर देवाकडून आले आहेत का? अशक्य! तो माझ्यापेक्षा फारसा वेगळा नाही—तोदेखील एक सामान्य, साधारण मनुष्य आहे.” अशा परिस्थितीचे स्पष्टीकरण कसे दिले जाऊ शकते?

तुमच्यापैकी कोणाकडे वरील गोष्टी नाहीत? अशा गोष्टींमध्ये कोणाचे मन गुंतून पडलेले नाही? त्या अशा वस्तू वाटतात, ज्या तुझ्या वैयक्तिक मालमत्तेच्या तुकड्यांसारख्या असतात, ज्या तू कधीही सोडायला तयार नसतोस. तू वैयक्तिक प्रयत्न तर आणखी कमी करतोस; त्याऐवजी, मी स्वतः ते करण्याची तू वाट पाहतोस. खरे सांगायचे तर, पाठपुरावा न करणारी एकही व्यक्ती मला सहज ओळखू शकत नाही. मी तुम्हाला शिकवत असलेली वचने क्षुल्लक नाहीत. कारण मी तुझ्या माहितीसाठी दुसर्‍या दृष्टिकोनातून आणखी एक उदाहरण देऊ शकतो.

पेत्राचा उल्लेख केल्यानंतर, लोक त्याच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी बोलताना थकत नाहीत. त्यांना लगेच आठवते, की त्याने तीन वेळा देवाला नाकारले, त्याने कशी सैतानाची सेवा करून देवाची परीक्षा घेतली आणि शेवटी देवासाठी त्याला कसे वधस्तंभावर उलटे खिळले व बरेच काही. आता पेत्राने मला कसे ओळखले आणि त्याचा शेवट काय झाला याचे वर्णन तुम्हाला सांगण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. पेत्र चांगल्या क्षमतेचा होता, परंतु त्याची परिस्थिती पौलासारखी नव्हती: त्याच्या पालकांनी माझा छळ केला, ते दानव होते ज्यांना सैतानाने पछाडले होते परिणामी, त्यांनी पेत्राला देवाबद्दल काहीही शिकवले नाही. पेत्र लहानपणापासूनच हुशार, प्रतिभासंपन्न आणि त्याच्या पालकांचा लाडका होता. तरीही प्रौढ झाल्यानंतर, तो त्यांचा शत्रू बनला कारण त्याने माझ्याविषयीच्या ज्ञानाचा पाठपुरावा करणे कधीही सोडले नाही व नंतर त्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली. याचे इतर कोणत्याही गोष्टीहून महत्त्वाचे कारण असे, की त्याचा असा विश्वास होता की स्वर्ग आणि पृथ्वी व सर्व गोष्टी सर्वशक्तिमानाच्या हातात आहेत आणि सर्व सकारात्मक गोष्टी देवाकडून येतात व सैतानाद्वारे प्रक्रिया न करता थेट त्याच्याकडून जारी केल्या जातात. पेत्राच्या पालकांच्या विरोधाभासामुळे त्याला माझ्या प्रेमळ दयाळूपणाबद्दल आणि करुणेबद्दल अधिक ज्ञान मिळाले, त्यामुळे माझा पाठपुरावा करण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली. त्याने माझ्या वचनांचे सेवन व प्राशन करण्यावर, एवढेच नव्हे तर माझी इच्छा जाणून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आणि तो त्याच्या अंतःकरणात सदैव जागृत होता. परिणामी, तो त्याच्या आत्म्यामध्ये नेहमी संवेदनशील होता व म्हणूनच त्याने जे काही केले त्यामध्ये तो माझ्या स्वतःच्या हृदयाचा पाठपुरावा करत होता. स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अपयशाच्या जाळ्यात अडकण्याची तीव्र भीती असल्यामुळे त्याने भूतकाळातील लोकांच्या अपयशांवर सतत लक्ष केंद्रित केले. म्हणूनच, त्यानेही युगानुयुगे देवावर प्रेम करणाऱ्या सर्वांची श्रद्धा व प्रेम आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित केले. अशा प्रकारे—केवळ नकारात्मक पैलूंमध्येच नाही, तर महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक पैलूंमध्ये—तो अधिक वेगाने वाढला, अशा प्रकारे की त्याचे ज्ञान माझ्या उपस्थितीत सर्वांत मोठे झाले. मग, त्याने त्याच्याकडे असलेले सर्व काही माझ्या हातात कसे दिले, अन्न, वस्त्र, झोपणे आणि तो कुठे राहतो याविषयीच्या निर्णयांचा त्याने कसा त्याग केला व त्याऐवजी सर्व गोष्टींमध्ये मला संतुष्ट करण्याच्या आधारावर माझ्या समृद्धीचा आनंद कसा घेतला, याची कल्पना करणे कठीण नाही. मी त्याला अगणित कसोट्यांना सामोरे जाण्यास भाग पाडले—कसोट्यांमुळे स्वाभाविकच तो अर्धमेला झाला—परंतु या शेकडो कसोट्यांमध्ये, त्याने कधीही माझ्यावरील श्रद्धा गमावली नाही किंवा माझ्याबद्दल निराश झाला नाही. मी त्याला त्यागले आहे असे म्हटल्यावरही तो निराश झाला नाही आणि व्यावहारिक मार्गाने व आचरणाच्या भूतकाळातील तत्त्वांनुसार माझ्यावर प्रेम करत राहिला. मी त्याला सांगितले, की तो माझ्यावर प्रेम करत असला तरीही मी त्याची स्तुती करणार नाही आणि शेवटी मी त्याला सैतानाच्या हातात सोडेन. परंतु अशा प्रकारच्या कसोट्यांमध्ये, ज्या कसोट्या त्याच्या देहाशी नाही परंतु वचनांशी संबंधित होत्या, त्या कसोट्यांमध्येदेखील त्याने माझी प्रार्थना केली आणि म्हणाला, “हे देवा! स्वर्ग व पृथ्वी आणि सर्व गोष्टींमध्ये, कोणीही मनुष्य, कोणता प्राणीमात्र किंवा कोणती गोष्ट आहे जी तुझ्या, सर्वशक्तिमानाच्या हातात नाही? जेव्हा तू माझ्याबाबतीत दयाळू असतोस तेव्हा तुझ्या दयाळूपणाने माझे हृदय खूप आनंदित होते. जेव्हा तू माझा न्याय करतोस, तेव्हा मी जरी अयोग्य असलो तरी, मला तुझ्या कृत्यांच्या अथांगपणाची अधिक जाणीव होते, कारण तू अधिकार व शहाणपणाने भरलेला आहेस. माझ्या देहाला त्रास होत असला, तरी माझ्या आत्म्याला समाधान मिळते. मी तुझ्या शहाणपणाची आणि कृत्यांची प्रशंसा कशी करणार नाही? तुला ओळखल्यानंतर जरी मला मरण आले, तरी मी ते आनंदाने व उल्हासाने का पत्करणार नाही? हे सर्वशक्तिमान! तुला मला खरोखरच तुझी भेट घेऊ द्यायची नाही का? मी खरोखर तुझा न्याय प्राप्त करण्यास अयोग्य आहे का? माझ्यामध्ये असे काही आहे का की जे पाहण्याची तुला इच्छा नाही?” अशा कसोट्यांदरम्यान, जरी पेत्र माझ्या इच्छेचे अचूक आकलन करू शकला नसला तरी, हे स्पष्ट होते की तो माझ्याद्वारे वापरल्याचा अभिमान बाळगत होता आणि त्याच्यासाठी ते सन्मानाचे होते (मनुष्याने माझे वैभव व क्रोध पाहावा यासाठी त्याला माझा न्याय प्राप्त झाला असला तरीही) आणि या कसोट्यांमुळे तो व्यथित झाला नाही. माझ्याविषयी असलेल्या त्याच्या निष्ठेमुळे व त्याच्यावर असलेल्या माझ्या आशीर्वादामुळे, तो हजारो वर्षांपासून मनुष्यासाठी एक उदाहरण आणि आदर्श राहिला आहे. तुम्ही अगदी याचेच अनुकरण करू नये का? मी पेत्राचा इतका लांबलचक अहवाल का दिला आहे याचा दीर्घकाळ विचार करा; तुम्ही या तत्त्वांद्वारे कार्य केले पाहिजे.

कमी लोक मला ओळखत असले तरी, मी माझा राग मनुष्यावर काढत नाही, कारण लोकांमध्ये खूप अपुरेपण आहेत आणि मला त्यांच्याकडून अपेक्षित असलेली पातळी गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. अशाप्रकारे, मी हजारो वर्षांपासून आजपर्यंत मनुष्याबद्दल सहनशील राहिलो आहे, तरीही मला आशा आहे की माझ्या सहनशीलतेमुळे तुम्ही निष्काळजीपणे वागणार नाही. पेत्राद्वारे, तुम्ही मला ओळखले पाहिजे आणि माझा शोध घेतला पाहिजे; त्याच्या सर्व पराक्रमांमधून, तुम्ही पूर्वी कधीही न केलेले ज्ञान प्राप्त केले पाहिजे व अशा प्रकारे मनुष्याने यापूर्वी कधीही न पोहोचलेले क्षेत्र प्राप्त केले पाहिजे. संपूर्ण ब्रह्मांड आणि अंतराळात, स्वर्गात व पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीमध्ये, पृथ्वीवर आणि स्वर्गातील सर्व गोष्टी माझ्या कार्याच्या अंतिम टप्प्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. सैतानाच्या सैन्याने आदेश दिलेला प्रेक्षक बनण्याची तुमची इच्छा नक्कीच नाही ना? सैतान सदैव लोकांच्या अंतःकरणातील माझ्याबद्दलच्या ज्ञानाचा नाश करत असतो, दातओठ खात असतो व त्याचे पंजे त्याच्या अंतिम मृत्यूच्या वेळी वाकवतो. यावेळी तुम्हाला त्याच्या धूर्त योजनांना बळी पडायचे आहे का? माझे कार्य अखेरीस पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे आयुष्य उध्वस्त करायचे आहे का? मी पुन्हा एकदा माझी सहनशीलता दाखवण्याची तुम्ही वाट पाहत आहात का? माझ्याबद्दलचे ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे, परंतु आचरणावर लक्ष केंद्रित करणे अपरिहार्य आहे. माझी वचने तुमच्यासमोर थेट प्रकट केली आहेत आणि मला आशा आहे, की तुम्ही माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण कराल व यापुढे तुमच्या स्वतःसाठी योजना आणि महत्वाकांक्षा नसतील.

२७ फेब्रुवारी १९९२

मागील:  अध्याय ५

पुढील:  अध्याय ८

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger