देवाचे कार्य आणि मनुष्याचे कार्य

मनुष्याच्या कार्यामध्ये पवित्र आत्म्याचे कार्य किती आहे आणि मनुष्याचा अनुभव किती आहे? असे म्हटले जाऊ शकते, की लोकांना हे प्रश्न अजूनही समजलेले नाहीत व त्याचे कारण म्हणजे त्यांना पवित्र आत्म्याच्या कार्याची तत्त्वे समजत नाहीत. जेव्हा मी “मनुष्याचे कार्य” म्हणतो, तेव्हा मी अर्थातच, अशा लोकांच्या कार्याविषयी बोलतो ज्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य आहे किंवा ज्यांचा पवित्र आत्म्याने उपयोग केला आहे. मनुष्याच्या इच्छेपासून उद्भवलेल्या कार्याविषयी नाही, तर पवित्र आत्म्याच्या कार्याच्या कक्षेत येणारे प्रेषित, सेवेकरी अथवा सामान्य बंधू आणि भगिनींच्या कार्याविषयी बोलतो. येथे, “मनुष्याचे कार्य” म्हणजे देहधारी देवाचे कार्य नाही, तर ते पवित्र आत्मा लोकांवर करत असलेल्या कार्याच्या व्याप्ती व तत्त्वांशी संबंधित आहे. ही तत्त्वे पवित्र आत्म्याच्या कार्याची तत्त्वे आणि व्याप्ती असली, तरी ती देहधारी देवाच्या कार्याची तत्त्वे व व्याप्तीसारखी नाहीत. मनुष्याच्या कार्यात मनुष्याचे सार आणि तत्त्वे आहेत व देवाच्या कार्यात देवाचे सार आणि तत्त्वे आहेत.

पवित्र आत्म्याच्या प्रवाहातील कार्य, मग ते देवाचे स्वतःचे कार्य असो किंवा उपयोग केल्या जाणाऱ्या लोकांचे कार्य असो, ते पवित्र आत्म्याचे कार्य आहे. स्वतः देवाचे मूलतत्त्व आत्मा आहे, ज्याला पवित्र आत्मा अथवा सातपट तीव्र आत्मा म्हटले जाऊ शकते. एकंदरीत, देवाच्या आत्म्याला वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या नावांनी संबोधले गेले, तरी ते देवाचे आत्मे आहेत. तरीही त्यांचे मूलतत्त्व एकच आहे. म्हणूनच, स्वतः देवाचे कार्य हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे, तर देहधारी देवाचे कार्य हे पवित्र आत्म्याच्या कार्यापेक्षा जराही कमी नाही. ज्या लोकांचा उपयोग केला जातो त्या लोकांचे कार्यदेखील पवित्र आत्म्याचे कार्य आहे. तरीही देवाचे कार्य हे पवित्र आत्म्याची पूर्ण अभिव्यक्ती आहे, जे पूर्णपणे सत्य आहे, तर उपयोग केल्या जाणाऱ्या लोकांच्या कार्यात अनेक मानवी गोष्टी मिसळलेल्या आहेत आणि ते पवित्र आत्म्याची थेट अभिव्यक्ती नाही, मग त्याची संपूर्ण अभिव्यक्ती असणे तर दूरच. पवित्र आत्म्याचे कार्य वैविध्यपूर्ण असते व ते कोणत्याही परिस्थितीत मर्यादित नसते. पवित्र आत्म्याचे कार्य वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळे असते; ते भिन्न मूलतत्त्वे प्रकट करते आणि ते युगानुसार तसेच देशानुसार भिन्न असते. अर्थात, पवित्र आत्मा विविध मार्गांनी व अनेक तत्त्वांनुसार कार्य करत असला, तरी त्याचे मूलतत्त्व नेहमीच वेगळे असते मग ते कार्य कसेही केलेले असो किंवा कोणत्याही प्रकारच्या लोकांवर केलेले असो; वेगवेगळ्या लोकांवर केलेल्या सर्व कार्यांची आपली अशी तत्त्वे असतात आणि ते सर्व ज्याचे त्याचे मूलतत्त्व दर्शवू शकतात. याचे कारण असे, की पवित्र आत्म्याचे कार्य व्याप्तीमध्ये अगदी विशिष्ट व मोजके आहे. देहधारी देहात केलेले कार्य लोकांवर केलेल्या कार्यासारखे नसते आणि कार्य ज्या व्यक्तीवर केले जाते त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसारदेखील ते भिन्न असते. देहधारी देहात केलेले कार्य लोकांवर केले जात नाही व ते लोकांवर केल्या जाणाऱ्या कार्यासारखे नाही. थोडक्यात, ते कसे केले जाते हे महत्त्वाचे नाही, वेगवेगळ्या व्यक्तींवर केलेले कार्य कधीही एकसारखे नसते आणि तो ज्या तत्त्वांद्वारे कार्य करतो ती तत्त्वे वेगवेगळ्या लोकांच्या स्थिती व स्वभावांनुसार भिन्न असतात. पवित्र आत्मा वेगवेगळ्या लोकांवर त्यांच्या अंतर्भूत मूलतत्त्वाच्या आधारे कार्य करतो आणि त्या मूलतत्त्वापेक्षा जास्त त्यांच्याकडून मागणी करत नाही अथवा तो त्यांच्या अंतर्निहित क्षमता ओलांडणाऱ्या गोष्टींवरदेखील कार्य करत नाही. म्हणूनच, पवित्र आत्म्याने लोकांवर केलेले कार्य लोकांना त्या कार्याच्या लक्ष्याचे मूलतत्त्व पाहण्याची अनुमती देते. मनुष्याचे अंतर्निहित मूलतत्त्व बदलत नाही; त्याची अंतर्निहित क्षमता मर्यादित असते. पवित्र आत्मा लोकांच्या क्षमतांनुसार त्यांचा वापर करतो किंवा त्यांच्यावर कार्य करतो, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल. जेव्हा पवित्र आत्मा उपयोग केल्या जाणार्‍या लोकांवर कार्य करतो, तेव्हा त्या लोकांची प्रतिभा व अंतर्निहित क्षमता उघड केली जाते, ती रोखली जात नाही. त्यांच्या अंतर्निहित क्षमतेचा कार्यासाठी वापर केला जातो. असे म्हटले जाऊ शकते, की तो त्या कार्यात परिणाम साध्य करण्यासाठी, मनुष्याच्या त्या भागाचा वापर करतो, ज्यांचा त्याच्या कार्यात वापर करता येईल. याउलट, अवतारी देहात केलेले कार्य हे आत्म्याचे कार्य थेट व्यक्त करते आणि ते मानवी मन व विचारांची भेसळ झालेली नसते; मनुष्याची प्रतिभा, मनुष्याचा अनुभव किंवा मनुष्याची जन्मजात स्थिती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पवित्र आत्म्याचे सर्व असंख्य कार्य हे मनुष्याच्या फायद्यासाठी आणि त्याला शिक्षित करण्यासाठी आहे. तथापि, काही लोक परिपूर्ण होऊ शकतात तर इतरांकडे परिपूर्णतेसाठीची पात्रता नसते, त्यामुळे त्यांना परिपूर्ण केले जाऊ शकत नाहीत व त्यांना क्वचितच वाचवले जाऊ शकते आणि जरी त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य असले, तरीही त्यांना शेवटी बाहेर काढून टाकले जाते. म्हणजेच जरी पवित्र आत्म्याचे कार्य लोकांना शिक्षित करणे हे आहे, तरीही ज्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य आहे त्या सर्वांना पूर्णतः परिपूर्ण केले जाईल असे म्हणता येणार नाही, कारण अनेक लोक त्यांच्या पाठपुराव्यामध्ये ज्या मार्गाचा अवलंब करतात तो मार्ग परिपूर्ण होण्याचा मार्ग नाही. त्यांच्याकडे केवळ पवित्र आत्म्याचे एकतर्फी कार्य आहे, व्यक्तिनिष्ठ मानवी सहकार्य अथवा योग्य मानवी प्रयत्न नाही. अशा प्रकारे, या लोकांवरील पवित्र आत्म्याचे कार्य हे परिपूर्ण होत असलेल्यांची सेवा करण्यासाठी येते. पवित्र आत्म्याचे कार्य लोक थेट पाहू शकत नाहीत किंवा लोक स्वतःच त्याला स्पर्श करू शकत नाहीत. हे केवळ कार्य करण्याची प्रतिभा असलेले लोकच व्यक्त करू शकतात, याचा अर्थ असा आहे, की पवित्र आत्म्याचे कार्य लोकांच्या अभिव्यक्तीद्वारे अनुयायांना प्रदान केले जाते.

पवित्र आत्म्याचे कार्य अनेक प्रकारचे लोक आणि अनेक भिन्न परिस्थितींद्वारे साध्य व पूर्ण केले जाते. जरी देहधारी देवाचे कार्य संपूर्ण युगाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करू शकते आणि संपूर्ण युगातील लोकांच्या प्रवेशाचे प्रतिनिधित्व करू शकते, तरीही लोकांच्या प्रवेशाच्या तपशीलांवर कार्य करणे पवित्र आत्म्याद्वारे उपयोग केल्या जाणार्‍या मनुष्यांनी करणे आवश्यक आहे, देहधारी देवाने नाही. म्हणूनच, देवाचे कार्य किंवा देवाचे स्वतःचे सेवाकार्य, हे देवाच्या अवतारी देहाचे कार्य आहे, त्याच्या जागी मनुष्य ते करू शकत नाही. पवित्र आत्म्याचे कार्य अनेक प्रकारच्या लोकांद्वारे पूर्ण केले जाते; कोणतीही एक व्यक्ती ती पूर्णपणे साध्य करू शकत नाही व कोणतीही एक व्यक्ती ती पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही. जे लोक चर्चचे नेतृत्व करतात, तेदेखील पवित्र आत्म्याच्या कार्याचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत; ते फक्त नेतृत्वाचे काही कार्य करू शकतात. अशा प्रकारे, पवित्र आत्म्याचे कार्य तीन भागात विभागले जाऊ शकते: देवाचे स्वतःचे कार्य, उपयोग केल्या जाणाऱ्या लोकांचे कार्य आणि पवित्र आत्म्याच्या प्रवाहात असलेल्या सर्वांवर केलेले कार्य. देवाचे स्वतःचे कार्य संपूर्ण युगाचे नेतृत्व करणे हे आहे; वापरल्या गेलेल्यांचे कार्य म्हणजे देवाने स्वतःचे कार्य केल्यानंतर, आदेश पाठवून किंवा प्राप्त करून, देवाच्या सर्व अनुयायांचे नेतृत्व करणे हे आहे तेच लोक देवाच्या कार्यात सहकार्य करतात; प्रवाहात असलेल्यांवर पवित्र आत्म्याने केलेले कार्य म्हणजे त्याचे स्वतःचे सर्व कार्य राखणे हे आहे, म्हणजे त्याचे संपूर्ण व्यवस्थापन आणि त्याची साक्ष राखणे, त्याच वेळी ज्यांना परिपूर्ण केले जाऊ शकते त्यांना परिपूर्ण करणे हे आहे. हे तीन भाग मिळून पवित्र आत्म्याचे पूर्ण कार्य आहे, परंतु स्वतः देवाच्या कार्याशिवाय, व्यवस्थापनाचे कार्य संपूर्णपणे थांबून राहील. स्वतः देवाच्या कार्यात संपूर्ण मानवजातीच्या कार्याचा समावेश आहे व ते संपूर्ण युगाच्या कार्याचेही प्रतिनिधित्व करते, याचा अर्थ असा की देवाचे स्वतःचे कार्य पवित्र आत्म्याच्या कार्याच्या प्रत्येक गतीचे आणि प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करते, तर प्रेषितांचे कार्य देवाच्या स्वतःच्या कार्यानंतर येते व त्याचे अनुसरण करते आणि ते युगाचे नेतृत्व करत नाही किंवा संपूर्ण युगातील पवित्र आत्म्याच्या कार्याच्या प्रवृत्तीचेही प्रतिनिधित्व करत नाही. ते फक्त ते कार्य करतात जे मनुष्याने केले पाहिजे, ज्याचा व्यवस्थापनाच्या कार्याशी काहीही संबंध नाही. जे कार्य देव स्वतः करतो तो व्यवस्थापनाच्या कार्यातील एक प्रकल्प आहे. मनुष्याचे कार्य हे फक्त कर्तव्य आहे जे उपयोग केले जाणारे लोक पूर्ण करतात आणि ते व्यवस्थापनाच्या कार्याशी संबंधित नाही. ते दोन्ही पवित्र आत्म्याचे कार्य असले तरी, ओळख व कार्याच्या प्रतिनिधित्वातील फरकांमुळे, देवाचे स्वतःचे कार्य व मनुष्याचे कार्य यामध्ये स्पष्ट आणि आवश्यक फरक आहेत. शिवाय, वेगवेगळ्या ओळखी असलेल्या व्यक्तींवर पवित्र आत्म्याने केलेल्या कार्याची व्याप्ती बदलते. ही पवित्र आत्म्याच्या कार्याची तत्त्वे व व्याप्ती आहेत.

मनुष्याचे कार्य त्याचा अनुभव आणि त्याची मानवता दर्शवते. मनुष्य काय पुरवतो व जे कार्य करतो ते त्याचे प्रतिनिधित्व करते. मनुष्याची अंतर्दृष्टी, मनुष्याची तर्कबुद्धी, मनुष्याचे तर्कशास्त्र आणि त्याची समृद्ध कल्पनाशक्ती या सर्व गोष्टी त्याच्या कार्यात समाविष्ट असतात. मनुष्याचा अनुभव त्याचे कार्य दर्शवण्यास विशेषत्वाने सक्षम असतो व एखाद्या व्यक्तीचे अनुभव त्याच्या कार्याचे घटक बनतात. मनुष्याचे कार्य त्याचा अनुभव व्यक्त करू शकते. जेव्हा काही लोक नकारात्मक अनुभव घेतात, तेव्हा त्यांच्या सहभागितेतील बहुतांश भाषा नकारात्मक घटकांनी युक्त असते. जर त्यांचा काही काळासाठीचा अनुभव सकारात्मक असेल आणि त्यांच्याकडे विशेषतः सकारात्मक पैलूचा मार्ग असेल, तर त्यांची सहभागिता खूप उत्साहवर्धक असते व लोक त्यांच्याकडून सकारात्मक तरतुदी मिळवू शकतात. जर एखादा सेवेकरी काही काळासाठी नकारात्मक झाला, तर त्याच्या सहभागितेत नेहमीच नकारात्मक घटक असतील. अशा प्रकारची सहभागिता निराशाजनक असते आणि त्याच्या सहभागितेनंतर इतर लोक नकळतपणे उदास होतील. पुढाऱ्याच्या स्थितीनुसार अनुयायांची स्थिती बदलते. सेवेकरी अंतर्मनातून जसा असतो, तेच तो व्यक्त करतो व पवित्र आत्म्याचे कार्य अनेकदा मनुष्याच्या स्थितीनुसार बदलते. तो लोकांच्या अनुभवानुसार कार्य करतो आणि त्यांना जबरदस्ती करत नाही, परंतु त्यांच्या अनुभवाच्या सामान्य मार्गानुसार लोकांकडून मागण्या करतो. म्हणजेच, मनुष्याची सहभागिता देवाच्या वचनापेक्षा वेगळी आहे. लोक ज्याची सहभागिता करतात त्यानुसार त्यांची वैयक्तिक अंतर्दृष्टी व अनुभव व्यक्त होतो, देवाच्या कार्याच्या आधारावर त्यांची अंतर्दृष्टी आणि अनुभव व्यक्त होतो. देवाने कार्य केल्यानंतर किंवा बोलल्यानंतर त्यांनी त्यातील काय आचरणात आणले पाहिजे अथवा कशात प्रवेश केला पाहिजे हे शोधणे व नंतर ते अनुयायांपर्यंत पोहोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच, मनुष्याचे कार्य त्याच्या प्रवेशाचे आणि आचरणाचे प्रतिनिधित्व करते. अर्थात, अशा कार्यात मानवी धडे व अनुभव किंवा काही मानवी विचार मिसळलेले असतात. पवित्र आत्म्याने कसेही कार्य केले, मनुष्यावर असो किंवा देहधारी देवावर असो, सेवेकरी नेहमीच ते काय आहेत हे व्यक्त करतात. जरी कार्य करणारा पवित्र आत्मा असला, तरी मनुष्य जन्मजात जसा आहे त्यावर कार्य आधारित असते, कारण पवित्र आत्मा आधाराशिवाय कार्य करत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, कार्य शून्यातून होत नाही, परंतु ते नेहमी प्रत्यक्ष बाबी आणि वास्तविक परिस्थितीनुसार केले जाते. केवळ अशा प्रकारे मनुष्याच्या प्रवृत्तीत बदल होऊ शकतो व त्याच्या जुन्या धारणा आणि जुने विचार बदलता येऊ शकतात. मनुष्य जे काही पाहतो, अनुभवतो व कल्पना करू शकतो, तेच तो व्यक्त करतो आणि जरी ते सिद्धांत किंवा धारणा असल्या तरीही त्या मनुष्याच्या विचाराने साध्य होतात. मनुष्याच्या कार्याचे प्रमाण कितीही असो, ते कार्य मनुष्याच्या अनुभवाच्या व्याप्तीपेक्षा जास्त असू शकत नाही, मनुष्य काय पाहतो अथवा मनुष्य काय कल्पना किंवा विचार करू शकतो त्यापेक्षादेखील ते जास्त असू शकत नाही. देव जे काही व्यक्त करतो जे तो स्वतः आहे व हे मनुष्याला अप्राप्य आहे—म्हणजेच, मनुष्याच्या विचारांच्या आवाक्याबाहेर आहे. तो सर्व मानवजातीचे नेतृत्व करण्याचे त्याचे कार्य व्यक्त करतो आणि हे मानवी अनुभवाच्या तपशीलांशी संबंधित नाही, परंतु त्याच्या स्वतःच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. मनुष्य जे व्यक्त करतो तो त्याचा अनुभव असतो, तर देव जे व्यक्त करतो ते त्याचे व्यक्तित्व आहे, जी त्याची अंतर्निहित प्रवृत्ती असते, हे मनुष्याच्या आवाक्याबाहेर असते. मनुष्याचा अनुभव म्हणजे त्याची अंतर्दृष्टी व देवाच्या व्यक्तित्वाबद्दल त्याच्या अभिव्यक्तीच्या आधारावर प्राप्त केलेले ज्ञान. अशी अंतर्दृष्टी आणि ज्ञानाला मनुष्याचे व्यक्तित्व म्हटले जाते आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा आधार ही मनुष्याची अंतर्निहित प्रवृत्ती व क्षमता असते—म्हणूनच त्यांना मनुष्याचे व्यक्तित्वदेखील म्हटले जाते. मनुष्य जे अनुभवतो व पाहतो त्याची सहभागिता करण्यास तो सक्षम असतो. ज्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या नाहीत, पाहिलेल्या नाहीत किंवा त्यांचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ज्या गोष्टी त्यांच्या अंतर्मनात नसतात, त्यांची कोणीही सहभागिता करू शकत नाही. मनुष्य जे काही व्यक्त करतो ते जर त्याच्या अनुभवातून येत नसेल, तर ती त्याची कल्पना अथवा सिद्धांत असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्याच्या बोलण्यात काहीही वास्तविकता नसते. जर तू समाजासंबंधी गोष्टींच्या कधीही संपर्कात आला नसतास, तर तू समाजातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधांबद्दल स्पष्टपणे सहभागिता करू शकला नसतास. जर तुझे कुटुंब नसते, तर इतरांचे कौटुंबिक समस्यांबद्दल बोलणे तुला समजणार नाही. म्हणूनच, मनुष्य ज्या गोष्टींची सहभागिता करतो आणि तो जे कार्य करतो ते त्याच्या आंतरिक व्यक्तित्वाचे प्रतिनिधित्व करते. जर एखाद्याने ताडण व न्याय याबद्दल त्याच्या समजुतीबद्दल सहभागिता केली, परंतु तुला त्याचा अनुभव नसेल, तर तू त्याचे ज्ञान नाकारण्याचे धाडस करणार नाहीस, मग त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवण्याचे धाडस तर दूरच. याचे कारण असे, की त्यांची सहभागिता अशी गोष्ट आहे जी तू कधीही अनुभवलेली नाहीस, जी तुला कधीच माहीत नाही आणि तुझे मन त्याची कल्पना करू शकत नाही. त्यांच्या ज्ञानावरून, भविष्यात ताडण व न्याय भोगण्याचा मार्ग तुला प्राप्त होऊ शकतो. परंतु हा मार्ग केवळ सैद्धांतिक ज्ञानाचा असू शकतो; तो तुझ्या स्वतःच्या समजुतीची जागा घेऊ शकत नाही, मग तुझ्या अनुभवाची जागा घेणे तर दूरच. कदाचित तुला असे वाटते, की ते जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे, परंतु तुझ्या स्वतःच्या अनुभवानुसार, तुला ते अनेक प्रकारे अव्यवहार्य वाटते. कदाचित तुला वाटत असेल, की तू जे काही ऐकतोस त्यापैकी काही पूर्णपणे अव्यवहार्य आहे; त्यावेळेस तू त्याबद्दल धारणा बाळगतोस आणि ते स्वीकारले तरी ते अनिच्छेनेच करतोस. परंतु तू स्वतः अनुभव घेतलास, तर, तू ज्या ज्ञानातून धारणा प्राप्त केल्या आहेस तो तुझा आचरणाचा मार्ग बनतो व तू जितके जास्त आचरण करतोस तितके तू ऐकलेल्या वचनांचे खरे मूल्य आणि अर्थ समजते. तू स्वतःचा अनुभव घेतल्यानंतर, तू जे अनुभवले त्याबद्दल तुला जे ज्ञान असले पाहिजे त्याबद्दल तू बोलू शकतोस. याव्यतिरिक्त, तू अशा लोकांमध्ये फरक करू शकतोस, ज्यांचे ज्ञान वास्तविक व व्यावहारिक आहे आणि ज्यांचे ज्ञान सिद्धांतावर आधारित व व्यर्थ आहे. त्यामुळे, तू ज्या ज्ञानाचा दावा करतोस ते सत्याशी सुसंगत आहे की नाही, हे मुख्यतः तुला त्याचा व्यावहारिक अनुभव आहे की नाही यावर अवलंबून आहे. तुझ्या अनुभवात सत्य असेल तरच तुझे ज्ञान व्यावहारिक आणि मौल्यवान असेल. तुझ्या अनुभवाद्वारे, तू विवेक व अंतर्दृष्टीदेखील मिळवू शकतोस, तुझे ज्ञान वाढवू शकतोस आणि तू स्वतः कसे वागावेस याबद्दल तुझे शहाणपण व सामान्य ज्ञान वाढवू शकतोस. सत्य माहीत नसलेल्या लोकांद्वारे व्यक्त केलेले ज्ञान हे कितीही उदात्त असले तरीही ते सिद्धांत आहे. या प्रकारची व्यक्ती देहाच्या बाबतीत खूप हुशार असू शकते, परंतु आध्यात्मिक बाबींमध्ये फरक करू शकत नाही. याचे कारण असे, की अशा लोकांना आध्यात्मिक गोष्टींचा कोणताही अनुभव नसतो. हे लोक अध्यात्मिक बाबींमध्ये ज्ञानी नाहीत आणि त्यांना आध्यात्मिक गोष्टी समजत नाहीत. तू कोणतेही ज्ञान व्यक्त केलेस, तरीही जोपर्यंत ते तुझे व्यक्तित्व आहे, तोपर्यंत तो तुझा वैयक्तिक अनुभव आहे, तुझे खरे ज्ञान आहे. जे लोक केवळ सिद्धांताविषयी बोलतात—ज्या लोकांना सत्य किंवा वास्तविकता माहीत नसते—ज्याची चर्चा करतात त्यांना त्यांचे व्यक्तित्वदेखील म्हणता येईल, कारण ते त्यांच्या सिद्धांतापर्यंत केवळ सखोल चिंतनातूनच पोहोचले आहेत व ते त्यांच्या सखोल विचारसरणीचे फलित आहे. तरीही तो केवळ सिद्धांत आहे, कल्पनेपेक्षा अधिक काही नाही! सर्व प्रकारच्या लोकांचे अनुभव त्यांच्यातील गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. कोणताही आध्यात्मिक अनुभव नसलेली व्यक्ती सत्याच्या ज्ञानाबद्दल अथवा विविध आध्यात्मिक गोष्टींच्या योग्य ज्ञानाबद्दल बोलू शकत नाही. मनुष्य जे व्यक्त करतो ते त्याच्या अंतर्मनात असते—हे निश्चित आहे. जर एखाद्याला आध्यात्मिक गोष्टींचे ज्ञान आणि सत्याचे ज्ञान मिळवायचे असेल तर वास्तविक अनुभव असणे आवश्यक आहे. जर तू मानवी जीवनातील सामान्य ज्ञानाबद्दल स्पष्टपणे बोलू शकत नसशील, तर आध्यात्मिक गोष्टींबद्दल किती कमी बोलू शकशील? जे लोक चर्चचे नेतृत्व करू शकतात, लोकांना जीवन देऊ शकतात व लोकांचे प्रेषित बनू शकतात त्यांना प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे; त्यांना आध्यात्मिक गोष्टींची योग्य समज आणि सत्याची योग्य जाण व अनुभव असणे आवश्यक आहे. केवळ असे लोकच चर्चचे नेतृत्व करणारे सेवेकरी किंवा प्रेषित होण्यास पात्र आहेत. अन्यथा, ते जेमतेम अनुसरण करू शकतात आणि नेतृत्व करू शकत नाहीत, मग लोकांना जीवन प्रदान करण्यास सक्षम असणारे प्रेषित होणे तर दूरच. याचे कारण असे, की प्रेषितांचे कार्य घाई करणे किंवा भांडणे करणे नाही; तर जीवनाचे सेवाकार्य करणे व इतरांना त्यांच्या प्रवृत्तींमधील बदल घडवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आहे. जे हे कार्य करतात त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाते, जी कोणीच सहजासहजी घेऊ शकत नाही. अशा प्रकारचे कार्य केवळ तेच करू शकतात ज्यांना जीवन आहे, म्हणजेच ज्यांना सत्याचा अनुभव आहे. केवळ त्याग करू शकणार्‍या, धावाधाव करू शकणार्‍या किंवा स्वतः कष्ट करण्यास तयार असणारी कोणीही व्यक्ती ते हाती घेऊ शकत नाही; ज्या लोकांना सत्याचा अनुभव नाही, ज्यांची छाटणी अथवा न्याय केला गेला नाही, ते या प्रकारचे कार्य करण्यास असमर्थ आहेत. अनुभव नसलेले लोक, ज्या लोकांना वास्तविकता माहीत नाही, ते वास्तविकता स्पष्टपणे पाहू शकत नाहीत कारण ते स्वतः या प्रकारच्या व्यक्तित्वाशिवाय आहेत. म्हणून, या प्रकारची व्यक्ती नेतृत्व कार्य करण्यास असमर्थ आहे, तसेच ती व्यक्ती दीर्घकाळ सत्याशिवाय राहिल्यास, बाहेर काढून टाकण्यात येणारी व्यक्ती बनेल. तू व्यक्त केलेली अंतर्दृष्टी, तू जीवनात अनुभवलेल्या संकटांचा, ज्या गोष्टींसाठी तुझे ताडण झाले आहे आणि ज्या मुद्द्यांसाठी तुझा न्याय झाला आहे त्याचा पुरावा म्हणून गृहीत धरली जाऊ शकते. हे कसोट्यांच्या बाबतीतही खरे आहे: एखादी व्यक्ती शुद्ध असते, तर दुसरी कमकुवत असते—ही अशी क्षेत्रे आहेत ज्यामध्ये एखाद्याला अनुभव आहे, ज्यामध्ये मार्ग आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला वैवाहिक जीवनात निराशेचा सामना करावा लागला, तर ती व्यक्ती वारंवार सहभागिता करते, “देवाचे आभार, देवाचा जयजयकार हो, मी देवाच्या मनाची इच्छा पूर्ण केली पाहिजे व माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले पाहिजे आणि मी माझे लग्न पूर्णपणे देवाच्या हातात दिले पाहिजे. मी माझे संपूर्ण आयुष्य देवाला गहाण ठेवण्यास तयार आहे.” सहभागितेद्वारे मनुष्यामधील सर्व गोष्टी तो काय आहे हे दाखवू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा वेग, मग ती व्यक्ती मोठ्याने बोलत असो किंवा शांतपणे—अशा बाबी अनुभवाच्या बाबी नसतात व त्यांच्याकडे काय आहे आणि ते काय आहे हे दर्शवू शकत नाही. या गोष्टी फक्त मनुष्याचे चारित्र्य चांगले की वाईट अथवा त्याचा स्वभाव चांगला की वाईट हे सांगू शकतात, पण एखाद्या व्यक्तीला अनुभव आहे की नाही याची बरोबरी करता येत नाही. बोलताना व्यक्त होण्याची क्षमता किंवा बोलण्याचे कौशल्य अथवा गती ही केवळ सरावाची बाब आहे व एखाद्याच्या अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. जेव्हा तू तुमच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलतोस, तेव्हा तुला जे महत्त्वाचे वाटते त्याची आणि तुझ्यातील सर्व गोष्टींची तू सहभागिता करतोस. माझे बोलणे माझ्या व्यक्तित्वाचे प्रतिनिधित्व करते, परंतु मी जे बोलतो ते मनुष्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. मी जे बोलतो ते मनुष्याला अनुभवायला मिळत नाही व ती मनुष्याला दिसणारी गोष्ट नाही; ती अशीदेखील गोष्ट नाही जिला मनुष्य स्पर्श करू शकतो, पण तेच मी आहे. काही लोक फक्त हेच कबूल करतात, की मी जे अनुभवले आहे ती सहभागिता आहे, परंतु ते हे ओळखत नाहीत, की ही आत्म्याची थेट अभिव्यक्ती आहे. अर्थात मी जे सांगतो ते मी अनुभवले आहे. सहा हजार वर्षे व्यवस्थापनाचे कार्य मीच केले आहे. मानवजातीच्या निर्मितीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सर्व काही मी अनुभवले आहे; मी त्यावर चर्चा कशी नाही करू शकत? जेव्हा मनुष्याच्या स्वभावाचा विषय येतो, तेव्हा मी स्पष्टपणे पाहिले आहे; मी खूप पूर्वी निरीक्षण केले होते. मी याबद्दल स्पष्टपणे कसे बोलू शकत नाही? मी मनुष्याचे सार स्पष्टपणे पाहिले असल्याने, मी मनुष्याचे ताडण करण्यास आणि त्याचा न्याय करण्यास पात्र आहे, कारण सर्व मनुष्य माझ्याकडून आले आहेत परंतु सैतानाने भ्रष्ट केले आहे. अर्थात, मी केलेल्या कार्याचे मूल्यमापन करण्यासही मी पात्र आहे. जरी हे कार्य माझ्या देहाद्वारे केले जात नसले, तरी ते थेट आत्म्याची अभिव्यक्ती आहे व माझ्याकडे हेच आहे आणि मी हेच आहे. म्हणून, मी ते व्यक्त करण्यास व मी जे कार्य केले पाहिजे ते करण्यास पात्र आहे. लोकांनी जे अनुभवले आहे त्याबद्दल ते बोलतात. त्यांनी तेच पाहिले आहे, त्यांचे मन तेथेच पोहोचू शकते आणि त्यांची तर्कशक्ती तेच शोधू शकते. ते याचीच सहभागिता करू शकतात. देवाच्या अवतारी देहाद्वारे उच्चारलेली वचने आत्म्याची थेट अभिव्यक्ती आहेत व ती वचने आत्म्याने केलेले कार्य व्यक्त करतात, देहाने जे अनुभवले नाही किंवा पाहिले नाही, तरीही तो त्याचे व्यक्तित्व व्यक्त करतो, कारण देहाचे मूलतत्त्व आत्मा आहे आणि तो आत्म्याचे कार्य व्यक्त करतो. जरी ते देहाच्या आवाक्याबाहेर असले, तरी हे आत्म्याने आधीच केलेले कार्य आहे. देहधारणेनंतर, देहाच्या अभिव्यक्तीद्वारे, तो लोकांना देवाचे व्यक्तित्व जाणून घेण्यास सक्षम करतो व लोकांना देवाची प्रवृत्ती आणि त्याने केलेले कार्य पाहण्याची अनुमती देतो. मनुष्याचे कार्य लोकांनी कशात प्रवेश करावा आणि त्यांना काय समजले पाहिजे याबद्दल अधिक स्पष्टता देते; यात लोकांना सत्य समजून घेण्यास व अनुभवण्यास मार्गदर्शन करणे समाविष्ट आहे. मनुष्याचे कार्य लोकांना आधार देणे आहे; देवाचे कार्य मानवजातीसाठी नवीन मार्ग आणि नवीन युगे उघडणे व नश्वरांना ज्ञात नसलेल्या गोष्टी लोकांसमोर प्रकट करणे, त्यांना त्याची प्रवृत्ती जाणून घेण्यास सक्षम करणे आहे. देवाचे कार्य संपूर्ण मानवजातीचे नेतृत्व करणे आहे.

पवित्र आत्म्याचे सर्व कार्य लोकांच्या फायद्यासाठी केले जाते. हे सर्व लोकांना मानसिकदृष्ट्या सुधारण्यासाठी आहे; असे कोणतेही कार्य नाही ज्याचा लोकांना फायदा होत नाही. सत्य खोल असो अथवा उथळ असो आणि जे सत्य स्वीकारतात त्यांची क्षमता काहीही असो, पवित्र आत्मा जे काही करतो, त्याचा लोकांना फायदा होतो. परंतु पवित्र आत्म्याचे कार्य प्रत्यक्षपणे करता येत नाही; ते त्याला सहकार्य करणाऱ्या लोकांद्वारे व्यक्त केले पाहिजे. केवळ अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या कार्याचे परिणाम मिळू शकतात. अर्थात, जेव्हा पवित्र आत्मा थेट कार्य करतो तेव्हा त्यात अजिबात भेसळ नसते; परंतु जेव्हा पवित्र आत्मा मनुष्याद्वारे कार्य करतो तेव्हा ते खूप कलंकित होते व ते पवित्र आत्म्याचे मूळ कार्य नसते. असे असल्याने, सत्य वेगवेगळ्या प्रमाणात बदलते. अनुयायांना पवित्र आत्म्याचा मूळ हेतू प्राप्त होत नाही, तर पवित्र आत्म्याचे कार्य आणि मनुष्याचे अनुभव व ज्ञान यांचे संयोजन प्राप्त होते. अनुयायांना जे प्राप्त होते त्यातील पवित्र आत्म्याचे कार्य असलेला भाग योग्य आहे, तर त्यांना मिळणारे मनुष्याचे अनुभव आणि ज्ञान वेगवेगळे आहे कारण सेवेकरी वेगवेगळे असतात. पवित्र आत्म्याचे ज्ञान व मार्गदर्शन असलेले सेवेकरी या ज्ञान आणि मार्गदर्शनावर आधारित अनुभव घेतील. या अनुभवांमध्‍ये, मनुष्याचे मन व अनुभव, तसेच मानवतेचे व्यक्तित्व एकत्रित केले जाते आणि नंतर, त्यांच्याकडे जे असायला हवे ते ज्ञान किंवा अंतर्दृष्टी ते प्राप्त करतात. सत्याचा अनुभव घेतल्यानंतर, मनुष्याची ही आचरण करण्याची पद्धत आहे. आचरण करण्याचा हा मार्ग नेहमीच सारखा नसतो, कारण लोकांचा अनुभव वेगवेगळा असतो व लोक अनुभवत असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. अशा प्रकारे, पवित्र आत्म्याच्या समान ज्ञानाचा परिणाम वेगवेगळे ज्ञान आणि आचरण यामध्ये होतो, कारण ज्यांना ज्ञान प्राप्त होते ते वेगवेगळे असतात. काही लोक आचरण करताना किरकोळ चुका करतात तर काही मोठ्या चुका करतात व काही चुकण्याशिवाय काहीच करत नाहीत. याचे कारण असे, की लोकांच्या समजण्याच्या क्षमतेत फरक असतो आणि त्यांच्या अंतर्निहित क्षमतांमध्येही फरक असतो. काही लोकांना संदेश ऐकल्यानंतर एक प्रकारची समज असते व काही लोकांना सत्य ऐकल्यानंतर दुसरी समज असते. काही लोक किंचित विचलित होतात, तर काहींना सत्याचा खरा अर्थ अजिबात समजत नाही. म्हणूनच, एखाद्याचे आकलन हे ठरवते, की एखादी व्यक्ती इतरांचे नेतृत्व कसे करेल; हे अगदी खरे आहे, कारण एखाद्याचे कार्य हे फक्त त्याच्या व्यक्तित्वाची अभिव्यक्ती असते. ज्यांना सत्याची योग्य समज आहे त्यांच्या नेतृत्वाखालील लोकांनाही सत्याची योग्य समज असेल. जरी समजण्यात चूक झालेले लोक असले तरी असे लोक फारच कमी आहेत आणि प्रत्येकामध्ये चुका असतीलच असे नाही. जर एखाद्याच्या सत्याच्या आकलनात चुका असतील, तर जे त्याचे अनुसरण करतात ते निःसंशयपणे चुकीचे असतील व हे लोक वचनाच्या प्रत्येक अर्थाने चुकीचे असतील. अनुयायांना सत्य किती प्रमाणात समजते ते सेवेकऱ्यांवर अवलंबून असते. अर्थात, देवाकडून आलेले सत्य बरोबर आणि अचूक असते व ते निश्चित असते. सेवेकरी मात्र पूर्णपणे बरोबर नसतात आणि ते पूर्णपणे विश्वासार्ह आहेत असे म्हणता येणार नाही. जर सेवेकऱ्यांकडे सत्य प्रत्यक्षात आणण्याचा अतिशय व्यावहारिक मार्ग असेल, तर अनुयायांकडेदेखील आचरण करण्याचा मार्ग असेल. जर सेवेकऱ्यांकडे सत्य आचरणात आणण्याचा मार्ग नसेल, पण त्यांच्याकडे केवळ सिद्धांत असेल, तर अनुयायांकडे वास्तविकता नसेल. अनुयायांची क्षमता व स्वभाव जन्मानुसार निर्धारित केला जातो आणि तो सेवेकऱ्यांशी संबंधित नसतो, परंतु अनुयायी किती सत्य समजतात व देवाला किती प्रमाणात ओळखतात हे सेवेकऱ्यांवर अवलंबून असते (हे फक्त काही लोकांसाठी आहे). सेवेकरी जसा असेल, तसेच त्याच्या नेतृत्वाखालचे अनुयायीही असतील. सेवेकरी जे व्यक्त करतो ते त्याचे स्वतःचे व्यक्तित्व आहे, काहीही राखून न ठेवता. त्याचे अनुसरण करणाऱ्यांकडून तो ज्या मागण्या करतो त्या मागण्या तो स्वतः पूर्ण करण्यास किंवा साध्य करण्यास सक्षम आहे. बहुतेक सेवेकरी त्यांच्या अनुयायांच्या मागण्यांसाठी ते स्वतः जे करतात त्याचा आधार म्हणून वापर करतात, जरी त्यांचे अनुयायी बरेच काही साध्य करू शकत नाहीत—आणि जे साध्य करू शकत नाही ते एखाद्याच्या प्रवेशात अडथळा बनते.

ज्यांची छाटणी केली गेली आहे, ज्यांना हाताळले गेले आहे, न्याय आणि ताडण झाले आहे त्यांच्या कार्यात फारच कमी विचलन असते व त्यांच्या कार्याची अभिव्यक्ती अधिक अचूक असते. जे लोक कार्य करण्यासाठी त्यांच्या नैसर्गिकतेवर अवलंबून असतात ते मोठ्या चुका करतात. परिपूर्ण न केलेल्या लोकांच्या कार्यात त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिकतेची खूप जास्त अभिव्यक्ती असते, जे पवित्र आत्म्याच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण करते. एखाद्या व्यक्तीची क्षमता कितीही चांगली असली, तरी देवाच्या आदेशाचे कार्य करण्याआधी त्यांना छाटणी, हाताळणी आणि न्याय यातून पार पडणे आवश्यक आहे. जर ते अशा न्यायातून पार पडले नसतील, तर त्यांचे कार्य, कितीही चांगले केले असले तरीही, सत्याच्या तत्त्वांशी जुळत नाही व ते नेहमीच त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिकतेचा आणि मानवी चांगुलपणाचा परिणाम असते. ज्यांची छाटणी केली गेली आहे, ज्यांना हाताळले गेले आहे आणि ज्यांचा न्याय केला गेला आहे त्यांचे कार्य ज्यांची छाटणी केली गेली नाही, ज्यांना हाताळले गेले नाही व ज्यांचा न्याय केला गेला नाही त्यांच्या कार्यापेक्षा जास्त अचूक असते. ज्यांचा न्याय केला गेला नाही ते मानवी शरीर आणि विचारांशिवाय काहीही व्यक्त करत नाहीत, ज्यात मानवी बुद्धिमत्ता व जन्मजात प्रतिभा मिसळली असते. ही मनुष्याकडून देवाच्या कार्याची अचूक अभिव्यक्ती नाही. जे अशा लोकांचे अनुसरण करतात ते त्यांच्या जन्मजात क्षमतेने त्यांच्यासमोर आणले जातात. ते मनुष्याची अंतर्दृष्टी आणि अनुभव खूपच जास्त व्यक्त करतात, तसेच देवाच्या मूळ हेतूपासून जवळजवळ तुटलेले आहेत व त्यापासून खूप दूर गेलेले असतात, त्यामुळे या प्रकारच्या व्यक्तीचे कार्य लोकांना देवासमोर आणू शकत नाही, परंतु त्यांना मनुष्यासमोर आणते. म्हणूनच, ज्यांनी न्याय आणि ताडण भोगले नाही ते देवाच्या आदेशाचे कार्य पार पाडण्यास अपात्र आहेत. पात्र सेवेकऱ्याचे कार्य लोकांना योग्य मार्गावर आणू शकते व त्यांना सत्यात अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश देऊ शकते. त्याचे कार्य लोकांना देवासमोर आणू शकते. याशिवाय, तो करत असलेले कार्य प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकते आणि ते नियमांनी बांधलेले नसते, त्यामुळे लोकांना मुक्तता व स्वातंत्र्य मिळते आणि जीवनात हळूहळू प्रगती करण्याची व सत्यामध्ये अधिक सखोल प्रवेश करण्याची क्षमता मिळते. अपात्र सेवेकऱ्याचे कार्य फार कमी पडते. त्याचे कार्य मूर्खपणाचे असते. तो लोकांसाठी फक्त नियम लागू करू शकतो आणि तो लोकांकडून त्याच्या अपेक्षा व्यक्तीनुसार वेगवेगळ्या नसतात; तो लोकांच्या वास्तविक गरजांनुसार कार्य करत नाही. या प्रकारच्या कार्यामध्ये, बरेच नियम व बरेच सिद्धांत असतात आणि ते लोकांना वास्तविकतेत आणू शकत नाहीत किंवा जीवनातील प्रगतीच्या सामान्य व्यवहारात आणू शकत नाही. हे केवळ लोकांना काही निरुपयोगी नियमांचे पालन करण्यास सक्षम करू शकते. असे मार्गदर्शनच लोकांना भरकटवू शकते. तो तुला त्याच्यासारखे होण्यासाठी मार्गदर्शन करतो; तो तुला त्याच्याकडे जे आहे व तो जे आहे त्यात आणू शकतो. नेतृत्व करणारे पात्र आहेत की नाही हे अनुयायांना समजण्यासाठी, ते कोणत्या मार्गावर नेतात आणि त्यांच्या कार्याचे परिणाम काय होतात व अनुयायांना सत्यानुसार तत्त्वे प्राप्त होतात की नाही आणि त्यांचे परिवर्तन करण्याकरिता त्यांना आचरणाचे योग्य मार्ग प्राप्त होत आहेत का हे पाहणे आहे. तू वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या कार्यांमध्ये फरक केला पाहिजे; मूर्ख अनुयायी होऊ नयेस. हे लोकांच्या प्रवेशासंबंधी बाबींर प्रकाश टाकते. कोणत्या व्यक्तीच्या नेतृत्वाला मार्ग आहे आणि कोणता नाही हे तू ओळखू शकत नसशील, तर तुझी सहज फसवणूक होईल. या सगळ्याचा थेट परिणाम तुझ्या स्वतःच्या आयुष्यावर होतो. परिपूर्ण न झालेल्या लोकांच्या कार्यात खूपच नैसर्गिकता असते; त्यात मानवी इच्छाशक्ती खूप जास्त प्रमाणात मिसळलेली असते. त्यांचे व्यक्तित्व नैसर्गिक अशते—ते ज्यासह जन्माला आलेले असतात. ते हाताळले गेल्यानंतरचे जीवन किंवा परिवर्तन झाल्यानंतरचा वास्तविकता नसते. अशी व्यक्ती जीवनाच्या मागे धावणाऱ्यांना आधार कसा देऊ शकेल? मुळात मनुष्याला मिळालेले जीवन म्हणजे त्याची जन्मजात बुद्धिमत्ता अथवा प्रतिभा. या प्रकारची बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा ही देवाच्या मनुष्याकडून असलेल्या नेमक्या अपेक्षांपासून खूप दूर आहे. जर मनुष्याला परिपूर्ण केले नाही व त्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीची छाटणी केली नाही आणि त्याला हाताळले नाही, तर त्याची अभिव्यक्ती व सत्य यात खूप अंतर असेल; त्याच्या अभिव्यक्तीमध्ये त्याची कल्पनाशक्ती आणि एकतर्फी अनुभवासारख्या अस्पष्ट गोष्टी मिसळलेल्या असतील. शिवाय, त्याने कसेही कार्य केले, तरी लोकांना असे वाटते की सर्व लोकांच्या प्रवेशासाठी कोणतेही एकंदर ध्येय नाही व कोणतेही सत्य त्यामध्ये नाही. लोकांकडून केलेल्या अपेक्षांपैकी बहुतेक त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे, जणू काही ते बदके आहेत जे डबक्यात बसून आहेत. हे मानवी इच्छेचे कार्य आहे. मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती, त्याचे विचार आणि त्याच्या धारणा त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांमध्ये व्याप्त असतात. मनुष्य सत्य आचरणात आणण्याच्या वृत्तीने जन्माला येत नाही किंवा सत्य प्रत्यक्ष समजून घेण्याची वृत्ती त्याच्यात नसते. त्या मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीत भर म्हणजे—जेव्हा या प्रकारची नैसर्गिक व्यक्ती कार्य करते, तेव्हा ती व्यत्यय आणत नाही का? परंतु परिपूर्ण झालेल्या मनुष्याला सत्याचा अनुभव व त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तींचे ज्ञान असते जे लोकांना समजले पाहिजे, जेणेकरून त्याच्या कार्यातील अस्पष्ट आणि अवास्तविक गोष्टी हळूहळू कमी होत जातील, मानवी भेसळ कमी होईल व त्याचे कार्य आणि सेवा देवाला अपेक्षित असलेल्या मानकांच्या जवळपास येईल. त्यामुळे त्याचे कार्य सत्याच्या वास्तविकतेत उतरले आहे व ते वास्तववादीही झाले आहे. मनुष्याच्या मनातील विचार विशेषतः पवित्र आत्म्याचे कार्य अवरोधित करतात. मनुष्याकडे समृद्ध कल्पनाशक्ती आणि वाजवी तर्कशास्त्र असते व त्याला व्यवहार हाताळण्याचा दीर्घ अनुभव असतो. जर मनुष्याच्या या पैलूंची छाटणी आणि सुधारणा होत नसेल, तर ते सर्व कार्यात अडथळे निर्माण करतात. म्हणूनच, मनुष्याचे कार्य अचूकतेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, विशेषतः परिपूर्ण न झालेल्या लोकांचे कार्य.

मनुष्याचे कार्य ठरावीक व्याप्तीत राहते आणि मर्यादित असते. एक व्यक्ती केवळ एखाद्या विशिष्ट टप्प्याचे कार्य करू शकते व संपूर्ण युगाचे कार्य करू शकत नाही—अन्यथा, तो लोकांना नियमांच्या मध्ये नेईल. मनुष्याचे कार्य केवळ विशिष्ट काळ किंवा टप्प्यावर लागू होऊ शकते. कारण मनुष्याच्या अनुभवाला त्याची व्याप्ती असते. मनुष्याच्या कार्याची देवाच्या कार्याशी तुलना करता येत नाही. मनुष्याचे आचरणाचे मार्ग आणि त्याचे सत्याचे ज्ञान हे सर्व विशिष्ट व्याप्तीपुरतेच लागू होते. तुम्ही असे म्हणू शकत नाही, की मनुष्य ज्या मार्गावर चालतो तो पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार आहे, कारण मनुष्य केवळ पवित्र आत्म्याकडूनच ज्ञानप्राप्ती करू शकतो व तो पवित्र आत्म्याने पूर्णपणे परिपूर्ण होऊ शकत नाही. मनुष्य ज्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो त्या सर्व सामान्य मानवतेच्या कक्षेत आहेत आणि त्या सामान्य मानवी मनातील विचारांच्या मर्यादेपेक्षा जास्त असू शकत नाहीत. जे लोक सत्याची वास्तविकता जगू शकतात ते या मर्यादेतील अनुभव घेतात. जेव्हा त्यांना सत्याचा अनुभव येतो, तेव्हा तो नेहमी पवित्र आत्म्याकडून ज्ञानप्राप्ती झालेल्या सामान्य मानवी जीवनाचा अनुभव असतो; अनुभव घेण्याचा हा मार्ग सामान्य मानवी जीवनापासून विचलित होणारा मार्ग नाही. ते त्यांच्या मानवी जीवन जगण्याच्या पायावर पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त केलेले सत्य अनुभवतात. शिवाय, हे सत्य व्यक्तीनुरूप बदलते व त्याची खोली व्यक्तीच्या स्थितीशी संबंधित असते. एखादी व्यक्ती फक्त असे म्हणू शकते, की ते ज्या मार्गावर चालतात ते सत्याचा पाठपुरावा करणार्‍या व्यक्तीचे सामान्य मानवी जीवन आहे आणि याला पवित्र आत्म्याने ज्ञान दिलेल्या सामान्य व्यक्तीने चाललेला मार्ग म्हटले जाऊ शकते. कोणी असे म्हणू शकत नाही, की ते ज्या मार्गावर चालतात तो पवित्र आत्म्याने चाललेला मार्ग आहे. सामान्य मानवी अनुभवानुसार, पाठपुरावा करणारे लोक एकसमान नसल्यामुळे, पवित्र आत्म्याचे कार्यदेखील समान नसते. याव्यतिरिक्त, लोक अनुभवत असलेले वातावरण व त्यांच्या अनुभवाच्या व्याप्ती एकसारख्या नसल्यामुळे आणि त्यांचे मन व विचार यांच्या मिश्रणामुळे, त्यांचे अनुभव वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले जातात. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या भिन्न, वैयक्तिक परिस्थितीनुसार सत्य समजून घेते. सत्याच्या खऱ्या अर्थाची त्यांची समज पूर्ण नसते आणि ते फक्त एक किंवा अनेक पैलू असतात. मनुष्याने अनुभवलेल्या सत्याची व्याप्ती प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीनुसार व्यक्तीनुरुप वेगळी असते. म्हणूनच, एकाच सत्याचे ज्ञान, जे वेगवेगळ्या लोकांद्वारे व्यक्त केले जाते, ते समान नसते. म्हणजेच, मनुष्याच्या अनुभवाला नेहमीच मर्यादा असतात व तो पवित्र आत्म्याच्या इच्छेचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकत नाही किंवा मनुष्याचे कार्य हे देवाचे कार्य म्हणून समजले जाऊ शकत नाही, मनुष्याने जे व्यक्त केले आहे ते देवाच्या इच्छेशी अगदी जवळून जुळत असले, तरीही आणि मनुष्याचा अनुभव पवित्र आत्मा करत असलेल्या परिपूर्ण करण्याच्या कार्याच्या अगदी जवळ असला तरीही. मनुष्य फक्त देवाचा सेवक होऊ शकतो, तो केवळ देवाने त्याच्यावर सोपवलेले कार्य करतो. मनुष्य केवळ पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त केलेले ज्ञान व त्याच्या वैयक्तिक अनुभवांमधून प्राप्त केलेली सत्ये व्यक्त करू शकतो. मनुष्य अपात्र आहे आणि पवित्र आत्म्याची अभिव्यक्ती होण्याच्या अटी पूर्ण करत नाही. त्याचे कार्य हे देवाचे कार्य आहे असे म्हणण्याचा त्याला अधिकार नाही. मनुष्याकडे मनुष्याची कार्यतत्त्वे आहेत व सर्व मनुष्यांचे अनुभव वेगळे आहेत आणि परिस्थिती वेगळ्या आहेत. मनुष्याच्या कार्यामध्ये पवित्र आत्म्याच्या ज्ञानाखाली त्याचे सर्व अनुभव समाविष्ट असतात. हे अनुभव केवळ मनुष्याच्या व्यक्तित्वाचे प्रतिनिधित्व करू शकतात व ते देवाचे व्यक्तित्व किंवा पवित्र आत्म्याच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. म्हणूनच, मनुष्य ज्या मार्गाने चालतो तो पवित्र आत्म्याने चाललेला मार्ग असे म्हणता येणार नाही, कारण मनुष्याचे कार्य देवाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाही आणि मनुष्याचे कार्य व मनुष्याचा अनुभव ही पवित्र आत्म्याची पूर्ण इच्छा नाही. मनुष्याचे कार्य नियमांच्या अधीन असू शकते आणि त्याच्या कार्याची पद्धत सहजपणे मर्यादित व्याप्तीमध्ये सीमित असते व ती लोकांना स्वतंत्र मार्गाकडे नेण्यास असमर्थ असते. बहुतेक अनुयायी मर्यादित व्याप्तीमध्ये राहतात आणि त्यांचा अनुभव घेण्याच्या मार्गाची व्याप्तीदेखील मर्यादित आहे. मनुष्याचा अनुभव नेहमीच मर्यादित असतो; त्याच्या कार्याची पद्धतदेखील काही प्रकारांपुरती मर्यादित असते व त्याची तुलना पवित्र आत्म्याच्या कार्याशी किंवा स्वतः देवाच्या कार्याशी होऊ शकत नाही. कारण शेवटी मनुष्याचा अनुभव मर्यादित असतो. देवाने त्याचे कार्य कसेही केले तरी त्याला नियमांचे बंधन नसते; ते कसेही केले, तरी ते एका पद्धतीपुरते मर्यादित नसते. देवाच्या कार्यासाठी कोणतेही नियम नाहीत—त्याचे सर्व कार्य मुक्त आणि स्वतंत्र आहे. मनुष्य त्याचे अनुसरण करण्यात कितीही वेळ घालवत असला, तरी तो देवाच्या कार्यपद्धतींवर नियंत्रण ठेवणारे कोणतेही नियम लागू करू शकत नाही. जरी त्याचे कार्य तत्त्वनिष्ठ असले, तरी ते नेहमी नवीन मार्गांनी केले जाते आणि ते नेहमीच विकसित होत राहते व ते मनुष्याच्या आवाक्याबाहेर असते. एकाच कालखंडात, देवाकडे विविध प्रकारचे कार्य आणि लोकांचे नेतृत्व करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, ज्यामुळे लोक नेहमी नवीन प्रवेश व बदल करत असतात. तू त्याच्या कार्याची नियमशास्त्रे स्पष्टपणे ओळखू शकत नाहीस कारण तो नेहमी नवीन मार्गांनी कार्य करतो आणि केवळ अशा प्रकारे देवाचे अनुयायी नियमांच्या अधीन नसतात. स्वतः देवाचे कार्य नेहमी लोकांच्या धारणा टाळते व त्यांचा प्रतिकार करते. जे सच्च्या हृदयाने त्याचे अनुसरण करतात आणि त्याचा पाठपुरावा करतात, तेच त्यांच्या प्रवृत्तींमध्ये बदल घडवून आणू शकतात व मुक्तपणे जगू शकतात, ते कोणत्याही नियमांच्या अधीन नसतात किंवा कोणत्याही धार्मिक धारणांनी प्रतिबंधित नसतात. मनुष्याचे कार्य त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर आणि तो स्वतः काय साध्य करू शकतो यावर आधारित लोकांकडून मागणी करते. या अपेक्षांचे मानक विशिष्ट व्याप्तीत मर्यादित असते व आचरणाच्या पद्धतीदेखील खूप मर्यादित असतात. अनुयायी अशा प्रकारे नकळतपणे या मर्यादित व्याप्तीत राहतात; जसजसा काळ पुढे सरकतो तसतसे या गोष्टी नियम आणि आचारपद्धती बनतात. जर एका युगातील कार्याचे नेतृत्व एखाद्या व्यक्तीने केले ज्याने देवाच्या वैयक्तिक परिपूर्णतेचा सामना केलेला नाही व त्याला न्याय मिळालेला नाही, तर त्याचे सर्व अनुयायी धर्मवादी आणि देवाचा प्रतिकार करण्यात तज्ज्ञ बनतील. म्हणूनच, जर कोणी योग्य पुढारी असेल, तर त्या व्यक्तीने न्यायाचा सामना करून परिपूर्ण होणे स्वीकारले असेल. ज्यांना न्याय मिळाला नाही, त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य असले, तरीही ते केवळ अस्पष्ट आणि अवास्तविक गोष्टी व्यक्त करतात. कालांतराने, ते लोकांना अस्पष्ट व अलौकिक नियमांकडे नेतील. देव जे कार्य करतो ते मनुष्याच्या देहाला अनुरूप नसते. ते मनुष्याच्या विचारांशी सुसंगत नसते, तर ते मनुष्याच्या धारणांना विरोध करते; ते अस्पष्ट धार्मिक रंगांनी कलंकित नसते. देवाच्या कार्याचे परिणाम अशा व्यक्तीद्वारे प्राप्त होऊ शकत नाहीत जो त्याच्याद्वारे परिपूर्ण झाला नाही; ते मनुष्याच्या विचाराच्या आवाक्याबाहेर आहे.

मनुष्याच्या मनातील कार्य साध्य करणे मनुष्याला खूप सोपे आहे. उदाहरणार्थ, धार्मिक जगामधील पाद्री आणि पुढारी त्यांचे कार्य करण्यासाठी त्यांची प्रतिभा व पदांवर अवलंबून असतात. जे लोक दीर्घकाळ त्यांचे अनुसरण करतात ते त्यांच्या प्रतिभेद्वारे आणि त्यांच्या काही व्यक्तित्वामुळे प्रभावित होतील. ते लोकांच्या प्रतिभा, क्षमता व ज्ञानावर लक्ष केंद्रित करतात आणि ते अलौकिक गोष्टींकडे व अनेक गहन, अवास्तविक सिद्धांतांकडे लक्ष देतात (अर्थातच, हे गहन सिद्धांत अप्राप्य असतात). ते लोकांच्या प्रवृत्तींमधील बदलांवर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर लोकांना प्रचार आणि कार्य करण्यासाठी, लोकांचे ज्ञान व त्यांच्या विपुल धार्मिक सिद्धांतांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतात. लोकांची प्रवृत्ती किती बदलली आहे किंवा लोकांना सत्य किती समजते याकडे ते लक्ष केंद्रित करत नाहीत. ते लोकांच्या मूलतत्त्वाची चिंता करत नाहीत आणि ते लोकांच्या सामान्य व असामान्य अवस्था जाणून घेण्याचा खूप कमी प्रयत्न करतात. ते लोकांच्या धारणांना विरोध करत नाहीत किंवा ते त्यांच्या धारणा प्रकट करत नाहीत, लोकांच्या कमतरता अथवा भ्रष्टाचारासाठी त्यांनी त्यांची छाटणी करणे तर दूरच. त्यांचे अनुसरण करणारे बहुतेक लोक त्यांच्या प्रतिभेने सेवा करतात आणि ते फक्त धार्मिक धारणा व धर्मशास्त्रीय सिद्धांत प्रकट करतात, ज्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नसतो आणि लोकांना जीवन प्रदान करण्यास पूर्णपणे असमर्थ असतात. खरे पाहता, त्यांच्या कार्याचे मूलतत्त्व म्हणजे प्रतिभेचे संगोपन करणे, प्रतिभाशून्य व्यक्तीला एक प्रतिभावान विद्यालयीन पदवीधर बनवणे हे आहे, जो नंतर कार्य करतो व नेतृत्व करतो. देवाच्या सहा हजार वर्षांच्या कार्यातील कोणतीही नियमशास्त्रे तू स्पष्टपणे ओळखू शकतोस का? मनुष्य करत असलेल्या कार्यात अनेक नियम आणि बंधने असतात व मनुष्याचा मेंदू खूप हटवादी असतो. म्हणून मनुष्य त्याच्या अनुभवाच्या कक्षेत असलेले ज्ञान व अनुभूती व्यक्त करतो. मनुष्य याशिवाय काहीही व्यक्त करू शकत नाही. मनुष्याचे अनुभव किंवा ज्ञान त्याच्या जन्मजात प्रतिभा अथवा त्याच्या अंतःप्रेरणेतून उद्भवत नाही; ते देवाच्या मार्गदर्शनामुळे आणि थेट पालनपोषणामुळे उद्भवते. मनुष्याकडे फक्त हे पालनपोषण स्वीकारण्यासाठी कार्यक्षमता आहे व दैवत्व म्हणजे काय ते थेट व्यक्त करू शकणारी कोणतीही कार्यक्षमता मनुष्यामध्ये नाही. मनुष्य स्त्रोत होण्यास असमर्थ आहे; तो फक्त एक असे पात्र असू शकतो जो स्त्रोतातून पाणी स्वीकारतो. ही मानवी अंतःप्रेरणा आहे, एक मनुष्य म्हणून त्याच्याकडे असायला हवी अशी ही कार्यक्षमता आहे. जर एखाद्या व्यक्तीने देवाचे वचन स्वीकारणारी कार्यक्षमता गमावली आणि मानवी अंतःप्रेरणा गमावली, तर ती व्यक्ती सर्वात मौल्यवान वस्तूदेखील गमावते व निर्माण केलेल्या मनुष्याचे कर्तव्य गमावते. जर एखाद्या व्यक्तीला देवाच्या वचनाचे किंवा त्याच्या कार्याचे ज्ञान अथवा अनुभव नसेल तर ती व्यक्ती त्याचे कर्तव्य गमावते, निर्मिलेला प्राणी म्हणून त्याने पार पाडले पाहिजे असे कर्तव्य ती गमावते आणि निर्मिलेल्या प्राण्याची प्रतिष्ठा गमावते. देवत्व काय आहे हे व्यक्त करणे ही देवाची अंतःप्रेरणा आहे, मग ती देहातून व्यक्त केलेली असो किंवा थेट आत्म्याद्वारे; हे देवाचे सेवाकार्य आहे. मनुष्य देवाच्या कार्यादरम्यान किंवा नंतर स्वतःचे अनुभव अथवा ज्ञान व्यक्त करतो (म्हणजे, तो जे आहे ते व्यक्त करतो); ही मनुष्याची अंतःप्रेरणा व मनुष्याचे कर्तव्य आहे व मनुष्याने ते साध्य केले पाहिजे. जरी देव व्यक्त करतो त्यापेक्षा मनुष्याची अभिव्यक्ती फारच कमी असली आणि जरी मनुष्याची अभिव्यक्ती अनेक नियमांच्या अधीन असली तरी, मनुष्याने जे कर्तव्य पार पाडले पाहिजे ते पूर्ण केले पाहिजे व त्याने जे करायला हवे ते केलेच पाहिजे. मनुष्याने त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी जे काही करता येईल ते केले पाहिजे व त्याने बिलकुल किंतु बाळगू नये.

वर्षानुवर्षे कार्य केल्यानंतर, मनुष्य त्याच्या अनेक वर्षांच्या कार्याचा अनुभव, तसेच त्याने मिळवलेले शहाणपण आणि नियम यांचा सारांश काढेल. ज्याने बऱ्याच काळापासून कार्य केले आहे त्याला पवित्र आत्म्याच्या कार्याची गती कशी जाणावी, हे माहीत आहे; पवित्र आत्मा केव्हा कार्य करतो व तो केव्हा कार्य करत नाही हे त्याला माहीत आहे; एखाद्या गोष्टीची जबाबदारी वाहून नेत असताना सहभागिता कशी करायची हे त्याला माहीत आहे; आणि त्याला पवित्र आत्म्याच्या कार्याची सामान्य स्थिती व लोकांच्या जीवनातील प्रगतीच्या सामान्य स्थितीची जाणीव आहे. ही अशी व्यक्ती आहे जिने वर्षानुवर्षे कार्य केले आहे आणि त्याला पवित्र आत्म्याचे कार्य माहीत आहे. ज्यांनी दीर्घकाळ कार्य केले आहे ते खात्रीपूर्वक व घाई न करता बोलतात; त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नसतानाही ते शांत राहतात. अंतर्मनात, ते पवित्र आत्म्याचे कार्य शोधण्यासाठी प्रार्थना करणे पुढे सुरू ठेवू शकतात. ते कार्य करण्यात अनुभवी असतात. ज्या व्यक्तीने दीर्घकाळ कार्य केले आहे, ज्याला खूप अनुभव आहे आणि ज्याने अनेक धडे घेतले आहेत, त्या व्यक्तीच्या अंर्तमनात बरेच काही असते जे पवित्र आत्म्याच्या कार्यात अडथळा आणते; हा त्याच्या दीर्घकालीन कार्याचा दोष आहे. ज्या व्यक्तीने नुकतेच कार्य करण्यास सुरुवात केली आहे ती व्यक्ती मानवी धडे किंवा अनुभवाने भ्रष्ट झालेली नसते व विशेषतः पवित्र आत्मा कसे कार्य करतो याबद्दल त्या व्यक्तीला काहीच माहीत नसते. तथापि, कार्याच्या दरम्यान, तो हळूहळू पवित्र आत्मा कसा कार्य करतो हे समजून घेण्यास शिकतो आणि पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त करण्यासाठी काय करावे लागेल, इतरांच्या कमतरतांवर नेमके प्रहार करण्यासाठी काय करावे लागेल व कार्य करत असलेल्या व्यक्तीकडे आवश्यक अशा इतर सामान्य ज्ञानाच्या गोष्टींची त्याला जाणीव होते. कालांतराने, त्याला शहाणपण आणि कुशलतेने कार्य करण्याचे सामान्य ज्ञान प्राप्त होते व कार्य करताना ते सहजपणे वापरले जात असल्याचे दिसते. तथापि, जेव्हा पवित्र आत्मा त्याची कार्यपद्धती बदलतो, त्यानंतरही तो त्याच्या कार्याच्या जुन्या ज्ञानाला आणि जुन्या नियमांना चिकटून राहतो व त्याला कार्याच्या नवीन पद्धतींबद्दल फारच कमी माहिती असते. अनेक वर्षांचे कार्य आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने परिपूर्ण असण्यामुळे त्याला कार्याचे अधिक धडे व अधिक अनुभव मिळतात. अशा गोष्टी त्याला अहंकार नसलेल्या अशा आत्मविश्वासाने भरतात. दुसऱ्या शब्दांत, तो त्याच्या स्वतःच्या कार्यावर खूश असतो आणि पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल त्याला मिळालेल्या सामान्य ज्ञानाने तो समाधानी असतो. विशेषतः, इतरांनी ज्या गोष्टी प्राप्त किंवा साध्य केलेल्या नाहीत त्या केल्याने त्याला आणखी आत्मविश्वास प्राप्त होतो; असे दिसते की त्याच्यातील पवित्र आत्म्याचे कार्य कधीही नाहीसे होऊ शकत नाही, तर इतर लोक या विशेष वागणूकीसाठी पात्र नसतात. केवळ त्याच्यासारखे लोक, ज्यांनी वर्षानुवर्षे कार्य केले आहे व ज्यांचा उपयोग करून घेणे महत्त्वपूर्ण आहे, तेच त्याचा आनंद घेण्यास पात्र आहेत. या गोष्टी त्याने पवित्र आत्म्याचे नवीन कार्य स्वीकारण्यातील मोठा अडथळा ठरतात. तो नवीन कार्य स्वीकारू शकत असला, तरी तो ते अचानक करू शकत नाही. ते स्वीकारण्याआधी त्याला नक्कीच अनेक खाचखळग्यांमधून जावे लागते. त्याच्या जुन्या धारणा हाताळल्यानंतर आणि त्याच्या जुन्या प्रवृत्तीचा न्याय केल्यानंतरच ही परिस्थिती हळूहळू उलट होऊ शकते. या पायऱ्या पार न करता, तो सहजपणे जाऊ देत नाही व त्याच्या जुन्या धारंणाशी सुसंगत नसलेल्या नवीन शिकवण्या आणि कार्य सहजपणे स्वीकारत नाही. मनुष्यामध्ये ही सर्वात कठीण गोष्ट आहे व ती बदलणे सोपे नाही. जर, सेवेकरी म्हणून, तो लगेचच पवित्र आत्म्याच्या कार्याची समज प्राप्त करण्यास आणि त्याची गतीशीलता सारांशित करण्यास सक्षम असेल व जर त्याला त्याच्या कार्याच्या अनुभवांच्या मर्यादा पडत नसतील आणि तो जुन्या कार्याच्या प्रकाशात नवीन कार्य स्वीकारण्यास सक्षम असेल, तर मग तो शहाणा मनुष्य व योग्य सेवेकरी आहे. लोक सहसा असे असतात: ते त्यांच्या कार्याचा अनुभव सारांशित न करता अनेक वर्षे कार्य करतात किंवा, कार्याशी संबंधित त्यांच्या अनुभवाचा सारांश आणि शहाणपण सांगितल्यानंतर, त्यांना नवीन कार्य स्वीकारण्यात अडथळा येतो व ते जुने आणि नवीन कार्य योग्यरीत्या समजू शकत नाहीत किंवा योग्यरीत्या हाताळू शकत नाहीत. लोकांना हाताळणे खरोखर कठीण आहे! तुमच्यापैकी बहुतेक असे आहेत. ज्यांनी पवित्र आत्म्याच्या कार्याचा वर्षानुवर्षे अनुभव घेतला आहे त्यांना नवीन कार्य स्वीकारणे कठीण जाते व ते नेहमी अशा धारणांनी भरलेले असतात, की ज्या ते बाजूला ठेवू शकत नाहीत, तर नुकतेच कार्य सुरू केलेल्या मनुष्याच्या कार्याबद्दल सामान्य ज्ञान नसते आणि काही सोप्या गोष्टीदेखील कशा हाताळायच्या हे त्याला माहीत नसते. तुम्ही लोक खरोखर तापदायक आहात! काही ज्येष्ठता असलेले लोक इतके गर्विष्ठ आणि घमेंडखोर आहेत, की ते कोठून आले हेच विसरले आहेत. ते नेहमी तरुण लोकांकडे तुच्छतेने पाहतात, तरीही ते नवीन कार्य स्वीकारण्यास व त्यांनी एकत्रित केलेल्या आणि वर्षानुवर्षे बाळगलेल्या धारणा सोडून देण्यास असमर्थ असतात. जरी हे तरुण, अज्ञानी लोक पवित्र आत्म्याचे थोडेसे नवीन कार्य स्वीकारण्यास सक्षम असले व ते खूप उत्साही असले, ते नेहमी गोंधळलेले असतात आणि जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा त्यांना काय करावे हे माहीत नसते. ते उत्साही पण अज्ञानी असतात. त्यांना पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल थोडेसेच ज्ञान असते व ते त्यांच्या जीवनात वापरण्यास असमर्थ असतात; ते पूर्णपणे निरुपयोगी सिद्धांत असतात. तुमच्यासारखे बरेच लोक आहेत; वापरासाठी किती लोक योग्य आहेत? असे किती जण आहेत जे पवित्र आत्म्याच्या ज्ञानाचे आणि प्रकाशाचे पालन करू शकतात व देवाच्या इच्छेशी सुसंगत राहू शकतात? असे दिसते, की तुमच्यापैकी जे आतापर्यंत अनुयायी आहेत ते खूप आज्ञाधारक आहेत, परंतु, खरे तर, तुम्ही तुमच्या धारणा सोडून दिलेल्या नाहीत, तुम्ही अजूनही बायबलमध्ये शोध घेत आहात, अस्पष्टतेवर विश्वास ठेवत आहात किंवा धारणांमध्ये भटकत आहात. आजच्या प्रत्यक्ष कार्याचा बारकाईने अभ्यास करणारा अथवा त्यामध्ये खोलवर जाणारा कोणीही नाही. तुम्ही तुमच्या जुन्या धारणांसह आजचा मार्ग स्वीकारत आहात. अशा विश्वासाने तुम्ही काय मिळवू शकता? असे म्हणता येईल, की तुमच्यामध्ये अनेक धारणा लपलेल्या आहेत ज्या उघड झालेल्या नाहीत व तुम्ही त्या सहजपणे उघड न करता त्यांना लपवण्याचा सर्वोच्च प्रयत्न करत आहात. तुम्ही नवीन कार्य मनापासून स्वीकारत नाही आणि तुमच्या जुन्या धारणा सोडण्याची तुमची योजना नाही; तुमच्याकडे जगण्यासाठी अनेक तत्त्वज्ञाने आहेत व ती खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही तुमच्या जुन्या धारणा सोडत नाही आणि तुम्ही नवीन कार्याला स्वेच्छेने सामोरे जात नाही. तुमची हृदये खूप पापी आहेत व तुम्ही नवीन कार्याची पावले मनापासून उचलत नाही. तुमच्यासारखे वांडगे सुवार्ता पसरवण्याचे कार्य करू शकतात का? ती संपूर्ण विश्वात पसरवण्याचे कार्य तुम्ही हाती घेऊ शकता का? तुमच्या या पद्धती तुम्हाला तुमची प्रवृत्ती बदलण्यापासून आणि देवाला जाणण्यापासून रोखत आहेत. तुम्ही असेच चालू ठेवल्यास, तुम्हाला बाहेर काढून टाकले जाईल.

देवाचे कार्य आणि मनुष्याचे कार्य यामध्ये फरक कसा ओळखावा हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. मनुष्याच्या कार्यात तू काय पाहू शकतोस? मनुष्याच्या कार्यात त्याच्या अनुभवाचे अनेक घटक असतात; मनुष्य जे व्यक्त करतो तेच तो असतो. देवाचे स्वतःचे कार्यदेखील तो काय आहे हे व्यक्त करते, परंतु त्याचे व्यक्तित्व मनुष्यापेक्षा वेगळे असते. मनुष्याचे व्यक्तित्व हे मनुष्याच्या अनुभवाचे व जीवनाचे प्रतिनिधित्व करते (मनुष्य त्याच्या जीवनात काय अनुभवतो किंवा कशाला सामोरे जातो अथवा त्याच्या जगण्याची तत्त्वज्ञाने) आणि वेगवेगळ्या वातावरणात राहणारे लोक वेगवेगळे व्यक्तित्व व्यक्त करतात. तुला समाजाचे अनुभव आहेत की नाही व तू तुझ्या कुटुंबात प्रत्यक्षात कसे राहतोस आणि त्यामध्ये कसे अनुभव घेतोस, हे तू जे व्यक्त करतोस त्यातून दिसते. तर देहधारी देवाच्या कार्यात त्याला सामाजिक अनुभव आहेत की नाही हे तू पाहू शकत नाहीस. त्याला मनुष्याच्या साराची चांगली जाण आहे आणि तो सर्व प्रकारच्या लोकांशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रथा प्रकट करू शकतो. तो मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती व बंडखोर वर्तन अधिक चांगल्या पद्धतीने उघड करतो. तो सांसारिक लोकांमध्ये राहत नाही, परंतु त्याला नश्वरांचे स्वरूप आणि सांसारिक लोकांच्या सर्व भ्रष्टाचारांची जाणीव आहे. हे त्याचे व्यक्तित्व आहे. तो जगाशी व्यवहार करत नसला, तरी त्याला जगाशी व्यवहार करण्याचे नियम माहीत आहेत, कारण त्याला मानवी स्वभाव पूर्णपणे कळतो. त्याला आत्म्याच्या आजच्या व भूतकाळामधील कार्याबद्दल माहिती आहे, जे मनुष्याच्या डोळ्यांना दिसत नाही आणि मनुष्याच्या कानांना ऐकू येत नाही. यात शहाणपणाचा समावेश आहे जे जगण्याचे तत्वज्ञान व लोकांना समजण्यास कठीण अशा आश्चर्यकारक गोष्टी नाहीत. हे त्याचे व्यक्तित्व आहे, ते लोकांसाठी खुले आहे आणि लोकांपासून लपलेलेदेखील आहे. तो जे व्यक्त करतो ते असामान्य व्यक्तीचे व्यक्तित्व नसून आत्म्याचे अंतर्निहित गुणधर्म व व्यक्तित्व आहे. तो जगभर फिरत नाही, परंतु त्याला त्याबाबत सर्व काही माहीत आहे. तो “वन—मनुष्यांशी” संपर्क साधतो ज्यांना ज्ञान किंवा अंतर्दृष्टी नसते, परंतु तो ज्ञानापेक्षा उच्च आणि महापुरुषांपेक्षा बरीच वचने व्यक्त करतो. तो माणुसकी नसलेल्या व ज्यांना मानवजातीच्या रुढी आणि जीवन समजत नाहीत, अशा मंदबुद्धी व संवेदनाशून्य लोकांच्या गटात राहतो, परंतु तो मानवजातीला सामान्य मानवतेनुसार जगण्यास सांगू शकतो, त्याच वेळी मानवजातीची नीच आणि अधम पातळी प्रकट करू शकतो. हे सर्व त्याचे व्यक्तित्व आहे, कोणत्याही रक्तामांसाच्या व्यक्तीपेक्षा ते उच्च आहे. त्याच्यासाठी, त्याला आवश्यक असलेले कार्य करण्यासाठी व भ्रष्ट मानवजातीचे सार पूर्णपणे प्रकट करण्यासाठी गुंतागुंतीचे, त्रासदायक आणि क्षुद्र सामाजिक जीवन अनुभवणे अनावश्यक आहे. क्षुद्र सामाजिक जीवन त्याच्या देहाची उन्नती करत नाही. त्याचे कार्य व वचने केवळ मनुष्याची अवज्ञा प्रकट करतात आणि जगाशी व्यवहार करण्यासाठी मनुष्याला अनुभव व धडे देत नाहीत. जेव्हा तो मनुष्याला जीवन देतो, तेव्हा त्याला समाजाची किंवा मनुष्याच्या कुटुंबाची चौकशी करण्याची गरज नसते. मनुष्याला उघड करणे आणि त्याचा न्याय करणे ही त्याच्या देहाच्या अनुभवांची अभिव्यक्ती नाही; मनुष्याच्या अवज्ञांबाबत दीर्घकाळ जाणून घेतल्यानंतर व मानवजातीच्या भ्रष्टतेचा तिरस्कार केल्यावर मनुष्याच्या अनीतीचे प्रकटीकरण करणे आहे. तो जे कार्य करतो ते सर्व मनुष्यासमोर त्याची प्रवृत्ती प्रकट करण्यासाठी आणि त्याचे व्यक्तित्व व्यक्त करण्यासाठी आहे. हे कार्य फक्त तोच करू शकतो; हे रक्तामांसाची व्यक्ती साध्य करू शकत नाही. त्याच्या कार्यावरून, मनुष्य तो कोणत्या प्रकारचा आहे हे सांगू शकत नाही. मनुष्य त्याच्या कार्याच्या आधारावर त्याला निर्माण केलेली व्यक्ती म्हणून वर्गीकृत करण्यासदेखील असमर्थ आहे. त्याचे व्यक्तित्वदेखील त्याला निर्माण केलेली व्यक्ती म्हणून वर्गीकृत करू शकत नाही. मनुष्य केवळ त्याला अमानवी मानू शकतो, परंतु त्याला कोणत्या श्रेणीत ठेवायचे हे त्याला माहीत नाही, म्हणून मनुष्याला त्याला देवाच्या श्रेणीत ठेवणे भाग आहे. मनुष्याने असे करणे अवाजवी नाही, कारण देवाने लोकांमध्ये बरेच कार्य केले आहे जे मनुष्य करू शकत नाही.

देव जे कार्य करतो ते त्याच्या देहाच्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करत नाही; मनुष्य जे कार्य करतो ते त्याच्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करत असते. प्रत्येकजण त्यांच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलतो. देव सत्य थेट व्यक्त करू शकतो, तर मनुष्य फक्त सत्याचा अनुभव घेतल्यानंतर तोच अनुभव व्यक्त करू शकतो. देवाच्या कार्याला कोणतेही नियम नाहीत आणि ते वेळ किंवा भौगोलिक सीमांच्या मर्यादांनी बांधलेला नाही. तो जे आहे ते तो कधीही, कुठेही व्यक्त करू शकतो. तो त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करतो. मनुष्याच्या कार्याला अटी व संदर्भ असतात; त्यांच्याशिवाय, तो कार्य करू शकणार नाही आणि देवाबद्दलचे त्याचे ज्ञान अथवा सत्याचा अनुभव व्यक्त करू शकणार नाही. एखादी गोष्ट देवाचे स्वतःचे कार्य आहे की मनुष्याचे कार्य आहे हे सांगण्यासाठी, तू फक्त दोघांमधील फरकांची तुलना केली पाहिजेस. जर एखादे कार्य स्वतः देवाने केलेले नसेल व ते केवळ मनुष्याचे कार्य असेल, तर तुला हे समजेल की मनुष्याच्या शिकवण्या इतर कोणाच्याही क्षमतेच्या पलीकडे आहेत; त्यांचे बोलण्याचे स्वर, गोष्टी हाताळण्याची त्यांची तत्त्वे व कार्य करण्याची त्यांची अनुभवी आणि स्थिर कार्यपद्धत इतरांच्या आवाक्याबाहेर आहे. तुम्ही सर्वजण या चांगल्या क्षमतेच्या व उच्च ज्ञानाच्या लोकांची प्रशंसा करता, परंतु देवाच्या कार्यातून आणि वचनांतून त्याची मानवता किती उच्च आहे हे तू पाहू शकत नाहीस. त्याऐवजी, तो सामान्य असतो व कार्य करताना, तो सामान्य आणि वास्तविक असतो, परंतु नश्वरांसाठी अमाप आहे, ज्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारचा आदर वाटतो. कदाचित एखाद्या व्यक्तीचा त्याच्या कार्याचा अनुभव विशेषतः उच्च असेल किंवा त्याची कल्पनाशक्ती व तर्कबुद्धी विशेषतः उच्च असेल आणि त्याची मानवता विशेषतः चांगली असेल; अशा गुणधर्मांमुळे केवळ लोकांची प्रशंसा प्राप्त होऊ शकते, परंतु त्यांच्या मनात श्रद्धा व भीती निर्माण होत नाही. जे लोक चांगले कार्य करू शकतात, ज्यांना विशेषतः सखोल अनुभव आहे आणि जे सत्याने आचरण करू शकतात त्यांची सर्व लोक प्रशंसा करतात, परंतु असे लोक कधीही श्रद्धा प्राप्त करू शकत नाहीत, केवळ प्रशंसा व मत्सर प्राप्त करू शकतात. परंतु ज्या लोकांनी देवाच्या कार्याचा अनुभव घेतला आहे ते देवाची प्रशंसा करत नाहीत; त्याऐवजी, त्यांना असे वाटते, की त्याचे कार्य मानवी आवाक्याबाहेरचे आहे आणि मनुष्यासाठी अथांग आहे, ते तजेल व अद्भूत आहे. जेव्हा लोक देवाच्या कार्याचा अनुभव घेतात, तेव्हा त्यांचे त्याच्याविषयीचे प्रथम ज्ञान हे असते की तो अथांग, शहाणा आणि अद्भूत आहे व ते नकळतपणे त्याचा आदर करतात आणि तो करत असलेल्या कार्याचे रहस्य अनुभवतात, जे मनुष्याच्या ज्ञानाच्या कक्षेपलीकडे आहे. लोकांना फक्त त्याच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात; ते त्याच्याहून सरस होऊ इच्छित नाहीत, कारण तो जे कार्य करतो ते मनुष्याच्या विचार व कल्पनेच्या पलीकडचे असते आणि त्याच्या जागी मनुष्य ते करू शकत नाही. मनुष्याला स्वतःच्या कमतरतादेखील माहीत नाहीत, तरीही देवाने एक नवीन मार्ग तयार केला आहे व मनुष्याला नवीन आणि अधिक सुंदर जगात आणण्यासाठी तो आला आहे व त्यामुळे मानवजातीने नवीन प्रगती केली आहे आणि नवीन सुरुवात केली आहे. लोकांना देवाबद्दल जे वाटते ते प्रशंसा नाही किंवा उलट, ती केवळ प्रशंसा नाही. त्यांचा सखोल अनुभव म्हणजे श्रद्धा व प्रेम आहे; देव खरोखरच अद्भूत आहे ही त्यांची भावना आहे. मनुष्य करू शकत नाही असे कार्य तो करतो आणि मनुष्याला सांगता येत नाही अशा गोष्टी तो सांगतो. ज्या लोकांनी देवाच्या कार्याचा अनुभव घेतला आहे त्यांना नेहमीच एक अवर्णनीय भावना जाणवते. पुरेसा सखोल अनुभव असलेले लोक देवाचे प्रेम समजू शकतात; ते त्याचा प्रेमळपणा अनुभवू शकतात, त्याचे कार्य इतके शहाणपणाचे, इतके अद्भूत असते की त्यामुळे त्यांच्यामध्ये असीम शक्ती निर्माण होते. हे भय किंवा अध्येमध्ये निर्माण होणारे प्रेम आणि आदर नाही, तर मनुष्याबद्दल देवाची सखोल करुणा व त्याच्याबद्दलची सहिष्णुता आहे. तथापि, ज्या लोकांनी त्याचे ताडण आणि न्याय अनुभवला आहे त्यांना त्याचा महिमा जाणवतो व तो कोणताही गुन्हा सहन करत नाही. ज्या लोकांनी त्याचे बरेचसे कार्य अनुभवले आहे तेदेखील त्याला ओळखू शकत नाहीत; जे लोक त्याचा खरोखर आदर करतात त्यांना हे माहीत असते, की त्याचे कार्य लोकांच्या धारणांशी सुसंगत नाही, परंतु नेहमी त्यांच्या धारणांच्या विरोधात जाते. लोकांनी त्याची पूर्ण प्रशंसा करण्याची किंवा त्याच्या अधीनतेचा देखावा करण्याची त्याला गरज नाही; त्याऐवजी, त्यांनी सच्चा आदर आणि सच्ची अधीनता साधली पाहिजे. त्याच्या बर्‍याच कार्यात, खरा अनुभव असलेल्या कोणालाही त्याच्याबद्दल आदर वाटतो, जो कौतुकापेक्षा जास्त आहे. त्याच्या ताडणाच्या व न्यायाच्या कार्यामुळे लोकांनी त्याची प्रवृत्ती पाहिली आहे आणि म्हणून ते त्यांच्या हृदयात त्याचा आदर करतात. देव हा आदर करण्यासाठी व त्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आहे, कारण त्याचे व्यक्तित्व आणि त्याची प्रवृत्ती निर्मिलेल्या प्राण्यासारखी नसून निर्मिलेल्या प्राण्यापेक्षा वरचढ आहे. देव स्वयं-अस्तित्वात व शाश्वत आहे, तो निर्मिलेला प्राणी नाही आणि फक्त देव आदर करण्यायोग्य व त्याच्या आज्ञा पाळण्यायोग्य आहे; मनुष्य यासाठी पात्र नाही. म्हणून, ज्यांनी त्याचे कार्य अनुभवले आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने ओळखले आहे त्यांना त्याच्याबद्दल आदर वाटतो. तथापि, जे लोक त्याच्याबद्दलच्या त्यांच्या धारणा सोडत नाहीत—जे त्याला देव मानतच नाहीत—ज्यांना त्याच्याबद्दल आदर नाही व ते त्याचे अनुसरण करत असले तरी त्यांच्यावर विजय मिळवला जात नाही; ते स्वभावाने अवज्ञाकारी लोक आहेत. अशा प्रकारे कार्य करून त्याला जे साध्य करायचे आहे ते म्हणजे सर्व निर्मिलेल्या प्राण्यांनी निर्माणकर्त्याबद्दल आदर बाळगावा, त्याची उपासना करावी आणि बिनशर्त त्याच्या प्रभुत्वास अधीन राहावे. हा अंतिम परिणाम आहे जो त्याचे सर्व कार्य साध्य करण्यासाठी आहे. ज्या लोकांनी असे कार्य अनुभवले आहे त्यांनी जर देवाचा किंचितही आदर केला नाही, व जर त्यांची पूर्वीची अवज्ञा अजिबात बदलली नाही, तर ते निश्चितपणे बाहेर काढून टाकले जातील. जर एखाद्या व्यक्तीची देवाबद्दलची वृत्ती केवळ त्याची प्रशंसा करणे किंवा दुरूनच त्याचा आदर करण्याची असेल आणि त्याच्यावर किंचितही प्रेम न करण्याची असेल, तर ती व्यक्ती या परिस्थितीत पहोचली आहे की, तिचे देवावर प्रेम नाही व त्या व्यक्तीमध्ये परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक गोष्टी नाहीत. जर इतके कार्य एखाद्या व्यक्तीचे खरे प्रेम प्राप्त करण्यासाठी असमर्थ असेल, तर त्या व्यक्तीने देवाला प्राप्त केलेले नाही आणि खऱ्या अर्थाने सत्याचा पाठपुरावा केला नाही. जी व्यक्ती देवावर प्रेम करत नाही, ती सत्यावर प्रेम करत नाही व त्यामुळे देवाला प्राप्त करू शकत नाही, देवाची स्वीकृती मिळते तर दूरच. असे लोक, पवित्र आत्म्याच्या कार्याचा अनुभव घेत असले आणि न्यायाचा अनुभव घेत असले तरी, ते देवाचा आदर करू शकत नाहीत. हे असे लोक आहेत ज्यांचा स्वभाव अपरिवर्तनीय आहे व ज्यांच्या प्रवृत्ती अत्यंत दुष्ट आहेत. जे देवाचा आदर करत नाहीत अशा सर्वांना बाहेर काढून टाकले जाईल, ते शिक्षेसाठी पात्र बनतील आणि जे वाईट कृत्य करतात त्यांच्याप्रमाणेच शिक्षा भोगावी लागेल, ज्यांनी अनीतिमान कृत्ये केली आहेत त्यांच्यापेक्षा अधिक दुःख भोगावे लागेल.

मागील:  यश किंवा अपयश हे मनुष्य कोणत्या मार्गावर चालतो यावर अवलंबून असते

पुढील:  देवाच्या कार्याचे तीन टप्पे जाणून घेणे हा देवाला जाणून घेण्याचा मार्ग आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger