यश किंवा अपयश हे मनुष्य कोणत्या मार्गावर चालतो यावर अवलंबून असते
बहुतेक लोक त्यांच्या भावी गंतव्यस्थानासाठी किंवा तात्पुरत्या आनंदासाठी देवावर विश्वास ठेवतात. ज्यांनी कोणत्याही परिस्थितीचा सामना केलेला नाही, ते स्वर्गात प्रवेश करण्याच्या, बक्षिसे प्राप्त करण्याच्या उद्देशाने देवावर विश्वास ठेवतात. परिपूर्ण व्हावे किंवा देवाची निर्मिती म्हणून करावयाचे आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी ते देवावर विश्वास ठेवत नाहीत. ज्याचा अर्थ असा, की बहुतेक लोक त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात किंवा त्यांचे कर्तव्य पूर्ण करावे, या उद्देशाने देवावर विश्वास ठेवत नाहीत. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी लोक क्वचितच देवावर विश्वास ठेवतात, मनुष्य जिवंत आहे म्हणून त्याने देवावर प्रेम केले पाहिजे, कारण ते स्वर्गाने निश्चित केले आहे आणि पृथ्वीनेही तसे करणे मान्य केले आहे व हे मनुष्याचे नैसर्गिक जीवितकार्य आहे, असे मानणारेही कोणी नाही. अशाप्रकारे, जरी वेगवेगळे लोक आपापल्या ध्येयांचा पाठपुरावा करत असले, तरी त्यांच्या पाठपुराव्याचे उद्दिष्ट आणि त्यामागील प्रेरणा हे सर्व सारखेच असते व एवढेच नव्हे, तर त्यांच्यापैकी बहुतेकांच्या उपासनेचे लक्ष्य सारखेच असते. गेल्या हजारो वर्षांमध्ये, अनेक श्रद्धाळू मरण पावले आहेत आणि अनेक जण मरण पावून पुन्हा जन्माला आले आहेत. केवळ एक किंवा दोन लोक देवाचा शोध घेतात असे नाही किंवा एक किंवा दोन हजारदेखील नाहीत, तरीही यातील बहुतेक लोक त्यांच्या स्वतःच्या भविष्यातील संधी किंवा त्यांच्या उज्ज्वल आशांसाठी पाठपुरावा करतात. जे ख्रिस्ताला समर्पित आहेत ते फार कमी आहेत. पुष्कळ श्रद्धाळू तर त्यांच्या स्वतःच्या जाळ्यात अडकून मरण पावले आहेत, एवढेच नव्हे तर विजय प्राप्त केलेल्या लोकांची संख्या अगदी कमी आहे. आजपर्यंत, लोक अयशस्वी का होतात याची कारणे किंवा त्यांच्या विजयाची रहस्ये त्यांना अद्याप अज्ञात आहेत. ज्यांना ख्रिस्ताचा शोध घेण्याचे वेड आहे, त्यांना अद्याप अचानक अंतर्दृष्टीचा क्षण लाभलेला नाही, ते या रहस्यांच्या तळापर्यंत पोहोचले नाहीत, कारण त्यांना काही माहीतच नाही. जरी ते त्यांच्या पाठपुराव्यासाठी कठोर परिश्रम करत असले, तरी ते ज्या मार्गावर चालतात तो एकेकाळी त्यांच्या पूर्वसुरींनी चाललेला अपयशाचा मार्ग आहे, तो यशाचा मार्ग नाही. अशा प्रकारे, ते कोणत्याही प्रकारे शोध घेत असले, तरी ते अंधाराकडे नेणाऱ्या मार्गानेच चालत नाहीत का? त्यांना जे लाभते ते कडू फळच नाही का? भूतकाळात यशस्वी झालेल्या लोकांचे अनुकरण करणाऱ्या लोकांना अखेर समृद्धी लाभेल की संकट याचे अनुमान बांधणे बरेच कठीण आहे. अपयशी झालेल्यांच्या पावलावर पाऊल टाकून शोध घेणाऱ्या लोकांसाठी तर शक्यता किती वाईट आहेत? त्यांच्यासाठी अपयशाची शक्यता आणखी मोठी नाही का? ते ज्या वाटेवर चालले आहेत त्या वाटेला काय मोल आहे? ते त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत का? थोडक्यात सांगायचे, तर लोक त्यांच्या पाठपुराव्यात यशस्वी होवोत किंवा अयशस्वी, त्यांनी असे करण्यामागे काही कारण आहे व त्यांचे यशापयश हे त्यांना वाटेल त्या प्रकारे शोध घेऊन ठरवले जाते, असेही नाही.
मनुष्याच्या देवावरील विश्वासाची सर्वात मूलभूत आवश्यकता म्हणजे त्याचे हृदय प्रामाणिक असणे आणि त्याने स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे व खरोखर आज्ञा पाळणे. मनुष्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे खऱ्या विश्वासाच्या बदल्यात त्याचे संपूर्ण आयुष्य प्रदान करणे, ज्याद्वारे तो संपूर्ण सत्य प्राप्त करू शकतो आणि देवाची निर्मिती म्हणून करावयाचे त्याचे कर्तव्य पूर्ण करू शकतो. जे अपयशी होतात त्यांच्यासाठी हे अप्राप्य आहे व जे ख्रिस्ताला शोधू शकत नाहीत त्यांच्यासाठी तर ते अधिकच अप्राप्य आहे. कारण मनुष्य स्वतःला देवाला पूर्णपणे समर्पित करण्यात पारंगत नाही, कारण मनुष्य निर्मात्याप्रति त्याचे कर्तव्य बजावण्यास तयार नाही, कारण मनुष्याने सत्य पाहिले आहे परंतु ते टाळतो आणि स्वतःच्याच मार्गाने चालतो, कारण मनुष्य सदैव अपयशी झालेल्यांच्याच मार्गावर चालत शोध घेतो, कारण मनुष्य सदैव स्वर्गाचा अवमान करतो, अशा प्रकारे, मनुष्य सदैव अपयशी ठरतो, सदैव सैतानाच्या फसवणुकीत अडकतो व स्वतःच्या जाळ्यात अडकतो. कारण मनुष्य ख्रिस्ताला ओळखत नाही, कारण मनुष्य सत्य समजण्यात आणि अनुभवण्यात पारंगत नाही, कारण मनुष्य पौलाची खूपच उपासना करतो व स्वर्गाची हाव धरतो, कारण मनुष्य सदैव ख्रिस्ताने त्याची आज्ञा पाळण्याची आणि देवाला आज्ञा देण्याची मागणी करत असतो, अशा प्रकारे त्या महान व्यक्ती व ज्यांनी जगाचे चढ-उतार अनुभवले आहे, तरीही ते मर्त्य आहेत आणि तरीही ते देवाच्या ताडणामध्ये मरण पावतात. अशा लोकांबद्दल मी एवढेच म्हणू शकतो, की त्यांचा मृत्यू करुणामय होतो व त्यांना लाभणारे फलित—त्यांचा मृत्यू—हा औचित्याखेरीज नसतो. त्यांचे अपयश हे स्वर्गीय नियमापेक्षाही असह्य नाही का? सत्य हे मनुष्याच्या जगातून येते, तरीही मनुष्यातील सत्य हे ख्रिस्ताद्वारे दिले जाते. त्याची उत्पत्ती ख्रिस्तापासून, म्हणजेच स्वतः देवाकडून झाली आहे आणि मनुष्य त्यासाठी समर्थ नाही. तरीही ख्रिस्त केवळ सत्य प्रदान करतो; मनुष्य सत्याचा पाठपुरावा करण्यात यशस्वी होईल की नाही हे ठरवण्यासाठी तो येत नाही. अशाप्रकारे असे दिसून येते, की सत्यात यश किंवा अपयश हे सर्व मनुष्याच्या पाठपुरवठ्यावर अवलंबून आहे. मनुष्याला सत्यामध्ये लाभलेले यश किंवा अपयशाचा ख्रिस्ताशी कधीच संबंध नाही, उलट त्याच्या पाठपुराव्याने हे निश्चित केले जाते. मनुष्याचे गंतव्यस्थान व त्याचे यश किंवा अपयश हे देवाच्या डोक्यावर रचले जाऊ शकत नाही, जेणेकरुन ते स्वत: देवाला सहन करावे लागेल, कारण ही बाब स्वतः देवाची नाही, तर देवाने निर्मिलेल्यांनी जे कर्तव्य बजावले पाहिजे त्याच्याशी थेट संबंधित आहे. बहुतेक लोकांना पौल आणि पेत्र यांच्या पाठपुराव्याविषयी व गंतव्यस्थानाविषयी थोडेसे ज्ञान असते, तरीही लोकांना पेत्र आणि पौलाच्या फलिताखेरीज काहीही माहीत नसते, पेत्राच्या यशामागील रहस्य किंवा पौलाच्या अपयशास कारणीभूत ठरलेल्या कमतरता यांबद्दल ते अनभिज्ञ असतात. आणि म्हणून, जर तुम्ही त्यांच्या पाठपुराव्याचे मूलतत्त्व पाहण्यास पूर्णपणे असमर्थ असाल, तरीही तुमच्यापैकी बहुतेकांचा पाठपुरावा अपयशी ठरेल व तुमच्यापैकी थोडे जण जरी यशस्वी झाले, तरी ते पेत्राच्या बरोबरीचे होऊ शकणार नाहीत. जर पाठपुरावा करण्याचा तुझा मार्ग योग्य असेल, तर तुला यश प्राप्त करण्याची आशा आहे; जर तू सत्याचा पाठपुरावा करताना धरलेला मार्ग चुकीचा असेल, तर तू सदैव अपयशी ठरशील आणि तुझा अंत पौलासारखा होईल.
पेत्र हा एक मनुष्य होता ज्याला परिपूर्ण बनवले होते. केवळ ताडण आणि न्यायाचा अनुभव घेतल्यानंतर व त्याद्वारे देवाप्रति शुद्ध प्रेम प्राप्त केल्यानंतरच, तो पूर्णपणे परिपूर्ण बनला होता; तो ज्या मार्गाने चालला तो परिपूर्ण बनण्याचा मार्ग होता. ज्याचा अर्थ असा, की अगदी सुरुवातीपासूनच, पेत्र ज्या मार्गावर चालला होता तो योग्य मार्ग होता आणि देवावर विश्वास ठेवण्याची त्याची प्रेरणा ही योग्य होती व म्हणून तो परिपूर्ण बनवला गेला आणि मनुष्याने ज्यावर पूर्वी कधीही पाऊल ठेवले नव्हते, त्यावर त्याने मार्गक्रमण केले. मात्र, पौल सुरुवातीपासून ज्या मार्गावर चालला होता तो मार्ग ख्रिस्ताच्या विरोधाचा मार्ग होता व केवळ पवित्र आत्म्याने त्याचा उपयोग करून घेण्याची आणि त्याच्या दानांचा व त्याच्या कार्यासाठी त्याच्या सर्व गुणवत्तेचा फायदा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळेच त्याने अनेक दशके ख्रिस्तासाठी कार्य केले. तो केवळ पवित्र आत्म्याद्वारे वापरला गेलेला मनुष्य होता, येशू त्याच्या मानवतेकडे अनुकूलतेने पाहत असल्यामुळे नव्हे, तर त्याच्या दानामुळे त्याचा वापर केला गेला होता. तो येशूसाठी कार्य करू शकला, ते त्याला तडाखा दिला होता म्हणून, असे करण्यात तो आनंदी होता म्हणून नव्हे. पवित्र आत्म्याच्या ज्ञानामुळे आणि मार्गदर्शनामुळे तो असे कार्य करू शकला व त्याने केलेले कार्य कोणत्याही प्रकारे पाठपुरावा किंवा त्याच्या मानवतेचे प्रतिनिधित्व करत नव्हते. पौलाचे कार्य हे सेवकाचे कार्य होते, म्हणजेच त्याने प्रेषिताचे कार्य केले असे म्हणता येईल. पेत्र मात्र वेगळा होता: त्यानेही काही कार्य केले; हे कार्य पौलाच्या कार्याप्रमाणे महान नव्हते, परंतु त्याने स्वतःच्या प्रवेशाचा पाठपुरावा करताना कार्य केले आणि त्याचे कार्य पौलाच्या कार्यापेक्षा वेगळे होते. पेत्राचे कार्य म्हणजे देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य पार पाडणे होते. त्याने प्रेषिताच्या भूमिकेत कार्य केले नाही, तर देवावरील प्रेमाचा पाठपुरावा करताना कार्य केले. पौलाच्या कार्याच्या मार्गात त्याचा वैयक्तिक पाठपुरावादेखील समाविष्ट होता: त्याचा पाठपुरावा हा भविष्यासाठी त्याच्या आशा व चांगल्या गंतव्यस्थानाची इच्छा यापेक्षा अधिक कशासाठीही नव्हता. त्याने त्याच्या कार्याच्या दरम्यान परिष्करण स्वीकारले नाही किंवा त्याने छाटणी आणि व्यवहारदेखील स्वीकारले नाहीत. त्याचा असा विश्वास होता, की जोपर्यंत त्याने केलेल्या कार्यामुळे देवाची इच्छा पूर्ण होत आहे व त्याने जे काही केले ते देवाला आनंद देणारे होते, तोपर्यंत एक बक्षीस त्याची वाट पाहत होते. त्याच्या कार्यात कोणतेही वैयक्तिक अनुभव नव्हते—हे सर्व त्याच्या स्वतःसाठी होते आणि बदलाच्या पाठपुराव्यात केले गेलेले नव्हते. त्याच्या कार्यातील प्रत्येक गोष्ट हा एक व्यवहार होता, त्यात देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य किंवा अधीनता नव्हती. त्याच्या कार्यादरम्यान, पौलाच्या जुन्या प्रवृत्तीत कोणताही बदल घडला नाही. त्याचे कार्य केवळ इतरांच्या सेवेचे होते व त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यास ते असमर्थ होते. पौलाने त्याचे कार्य परिपूर्ण न बनवले जाता किंवा व्यवहार न करता, प्रत्यक्षपणे पार पाडले आणि तो बक्षिसाने प्रेरित झाला होता. पेत्र वेगळा होता: तो असा होता, जो छाटणीतून व व्यवहारातून पार पडला होता, परिष्करणातूनही पार पडला होता. पेत्राच्या कार्याचे उद्दिष्ट आणि प्रेरणा पौलाच्या कार्यापेक्षा मूलभूतपणे भिन्न होत्या. पेत्राने मोठ्या प्रमाणावर कार्य केले नसले तरी, त्याच्या प्रवृत्तीत बरेच बदल घडले व त्याने ज्याचा पाठपुरावा केला, ते सत्य आणि वास्तविक बदल होते. त्यांचे कार्य केवळ कार्यासाठी म्हणून केले नव्हते. जरी पौलाने बरेच कार्य केले असले, तरी ते सर्व पवित्र आत्म्याचे कार्य होते व जरी या कामात पौलाने सहकार्य केले, तरी त्याने त्याचा अनुभव घेतला नाही. पेत्राने खूप कमी कार्य केले, कारण पवित्र आत्म्याने त्याच्या माध्यमातून इतके कार्य केले नाही. त्यांना परिपूर्ण बनवण्यात आले आहे की नाही, हे त्यांच्या कार्याच्या प्रमाणावरून निश्चित केले जात नाही; एकाचा पाठपुरावा बक्षिसे प्राप्त करण्यासाठी होता आणि दुसर्याचा पाठपुरावा हा देवावरील अंतिम प्रेम प्राप्त करण्यासाठी व देवाची निर्मिती म्हणून करावयाचे त्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी होता, जेणेकरून देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो एक सुंदर प्रतिमा व्यवस्थित जगू शकेल. बाह्यतः ते वेगळे होते आणि त्याचप्रमाणे त्यांचे अंतरंगही वेगळे होते. त्यांनी किती कार्य केले, याच्या आधारे त्यांच्यापैकी कोणाला परिपूर्ण बनवले गेले, हे तू सांगू शकत नाहीस. पेत्राने देवावर प्रेम करणार्या व्यक्तीची प्रतिमा जगण्याचा प्रयत्न केला व देवाची आज्ञा पाळणारी, व्यवहार आणि छाटणी स्वीकारणारी व देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य पार पाडणारी व्यक्ती होण्याचा प्रयत्न केला. तो स्वतःला देवाला समर्पित करू शकला, स्वतःचे सर्वस्व देवाच्या हाती देऊ शकला आणि मरेपर्यंत त्याची आज्ञा पाळू शकला. त्याने तेच करण्याचा संकल्प केला होता, एवढेच नव्हे, तर त्याने ते साध्यदेखील केले. अखेर, त्याचा अंत पौलापेक्षा वेगळा असण्याचे हेच मूलभूत कारण आहे. पवित्र आत्म्याने पेत्रामध्ये जे कार्य केले, ते त्याला परिपूर्ण बनवण्याचे होते व पवित्र आत्म्याने पौलामध्ये जे कार्य केले ते त्याचा वापर करून घेण्याचे होते. कारण त्यांचे स्वभाव आणि त्यांचा पाठपुरावा करण्याचा दृष्टिकोन एकसारखा नव्हता. दोघांकडे पवित्र आत्म्याचे कार्य होते. पेत्राने हे कार्य स्वतःला लागू केले व ते इतरांनाही दिले; तर दुसरीकडे पौलाने पवित्र आत्म्याचे संपूर्ण कार्य केवळ इतरांना प्रदान केले आणि यातून स्वत: काहीही प्राप्त केले नाही. अशाप्रकारे, पवित्र आत्म्याच्या कार्याचा इतक्या वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर, पौलामध्ये घडलेले बदल जवळजवळ शून्यवत होते. तो अजूनही जवळजवळ त्याच्या नैसर्गिक अवस्थेत राहिला व तो अजूनही पूर्वीचा पौल होता. हे केवळ इतकेच होते, की अनेक वर्षांच्या कष्टाचा सामना केल्यानंतर, तो “कार्य” कसे करावे हे शिकला होता आणि सहनशीलता शिकला होता, परंतु त्याचा जुना स्वभाव—त्याचा अत्यंत स्पर्धात्मक व भाडोत्री स्वभाव—अजूनही कायम होता. इतकी वर्षे कार्य करूनही त्याला त्यांची भ्रष्ट प्रवृत्ती कळली नाही किंवा त्याने ही जुनी प्रवृत्ती दूरदेखील सारली नाही आणि ते त्यांच्या कार्यातही स्पष्टपणे दिसत होते. त्याच्याकडे केवळ अधिक कार्याचा अनुभव होता, परंतु केवळ इतका कमी अनुभव त्याच्यामध्ये बदल घडवण्यास असमर्थ होता, तसेच तो त्याची अस्तित्वाबद्दलची मते किंवा त्याच्या शोधाचे महत्त्वही बदलू शकला नाही. जरी त्याने ख्रिस्तासाठी बरीच वर्षे कार्य केले व प्रभू येशूचा पुन्हा कधीही छळ केला नाही, तरीही त्याच्या अंतःकरणात देवाबद्दलच्या त्याच्या ज्ञानात कोणताही बदल घडला नाही. याचा अर्थ असा, की त्याने जे कार्य केले ते स्वतःला देवासाठी समर्पित करण्यासाठी नाही, तर त्याला त्याच्या भावी गंतव्यस्थानासाठी कार्य करणे भाग पडले. कारण, सुरुवातीला, त्याने ख्रिस्ताचा छळ केला आणि तो ख्रिस्ताच्या अधीन झाला नाही; तो जन्मजातच एक बंडखोर होता व त्याने जाणूनबुजून ख्रिस्ताला विरोध केला आणि त्याला पवित्र आत्म्याच्या कार्याची माहिती नव्हती. जेव्हा त्याचे कार्य जवळजवळ पूर्ण झाले होते, तरीही त्याला पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नव्हते व त्याने पवित्र आत्म्याच्या इच्छेकडे किंचितही लक्ष न देता केवळ त्याच्या स्वतःच्या स्वभावानुसार कार्य केले. आणि म्हणून ख्रिस्ताप्रति त्याचा स्वभाव शत्रुत्वाचा होता व त्याने सत्याचे पालन केले नाही. अशी व्यक्ती, ज्याचा पवित्र आत्म्याच्या कार्याने त्याग केला होता, ज्याला पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नव्हते आणि ज्याने ख्रिस्तालादेखील विरोध केला होता—अशा व्यक्तीला कसे वाचवले जाईल? मनुष्याला वाचवले जाऊ शकते की नाही हे तो किती कार्य करतो किंवा स्वतःला किती समर्पित करतो यावर अवलंबून नसते, तर उलट त्याला पवित्र आत्म्याचे कार्य माहीत आहे की नाही, तो सत्य आचरणात आणू शकतो की नाही व पाठपुरावा करण्याविषयीचे त्याचे विचार सत्याशी सुसंगत आहेत की नाही, यावर अवलंबून असते.
जरी पेत्राने येशूचे अनुसरण करण्यास प्रारंभ केल्यानंतर नैसर्गिक प्रकटीकरण झाले असले, तरी स्वभावतः अगदी सुरुवातीपासूनच, तो पवित्र आत्म्याच्या अधीन होऊन ख्रिस्ताचा शोध घेण्यास इच्छुक होता. त्याची पवित्र आत्म्याप्रति असलेली आज्ञाधारकता शुद्ध होती: त्याने प्रसिद्धी आणि संपत्ती यांचा पाठपुरावा केला नाही, उलट तो सत्याप्रति आज्ञाधारकतेने प्रेरित होता. जरी पेत्राने तीन वेळा ख्रिस्ताला ओळखण्यास नकार दिला व जरी त्याने प्रभू येशूला मोहात पाडले असले, तरी अशा किरकोळ मानवी दुर्बलतेचा त्याच्या स्वभावाशी काहीही संबंध नव्हता, त्याचा त्याच्या भविष्यातील पाठपुराव्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याचा मोह ही ख्रिस्तविरोधी कृती होती, हे सिद्ध होण्यासही ते पुरेसे नव्हते. सामान्य मानवी दुर्बलता ही जगातील सर्व लोकांमध्ये असते—पेत्राने यापेक्षा वेगळे असावे अशी तुझी अपेक्षा आहे का? पेत्राने मूर्खपणे अनेक चुका केल्या म्हणून लोक त्याच्याबद्दल काही विशिष्ट विचार करत नाहीत का? व पौलाने केलेल्या सर्व कार्यांमुळे आणि त्याने लिहिलेल्या सर्व पत्रांमुळे लोक त्याला पसंत करत नाहीत का? मनुष्याच्या वस्तुस्थितीकडे पाहण्यास मनुष्य कसा समर्थ असेल? ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने शहाणपण आहे ते असे काही क्षुल्लक पाहू शकतात का? पेत्राचे अनेक वर्षांचे वेदनादायक अनुभव बायबलमध्ये नोंदवलेले नसले, तरी पेत्राला खरे अनुभव आले नव्हते किंवा पेत्र परिपूर्ण बनला नव्हता, हे यावरून हे सिद्ध होत नाही. देवाच्या कार्याचा मनुष्याला पूर्णपणे कसा थांग लागू शकतो? बायबलमधील नोंदी येशूने वैयक्तिकरीत्या निवडलेल्या नाहीत, तर त्या नंतरच्या पिढ्यांनी संकलित केलेल्या आहेत. असे असताना, बायबलमध्ये जे काही लिहिले आहे ते सर्व मनुष्याच्या कल्पनांनुसार निवडलेले नाही का? एवढेच नव्हे, तर पत्रात पेत्र व पौलाचा अंत स्पष्टपणे सांगितलेला नाही, म्हणून मनुष्य स्वतःच्या समजुतीनुसार आणि स्वतःच्या आवडीनुसार पेत्र व पौलाबद्दल मत बनवतात. आणि पौलाने खूप कार्य केल्यामुळे, तसेच त्याचे “योगदान” खूप मोठे असल्यामुळे, त्याने जनतेचा विश्वास संपादन केला. मनुष्य केवळ वरवरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत नाही का? मनुष्याच्या वस्तुस्थितीकडे पाहण्यास मनुष्य कसा समर्थ असेल? पौल हा हजारो वर्षांपासून उपासनेचा विषय आहे हे लक्षात घेता, त्याचे कार्य अविचारीपणे नाकारण्याचे धाडस कोण करेल? पेत्र हा केवळ मच्छिमार होता, मग त्याचे योगदान पौलाइतके महान कसे असू शकते? त्यांनी केलेल्या योगदानाच्या संदर्भात, पौलाला पेत्राच्या आधी बक्षीस मिळायला हवे होते व देवाची स्वीकृती मिळविण्यासाठी तो अधिक पात्र असायला हवा होता. अशी कल्पना कोणी केली असती, की देवाने पौलाशी वर्तन करताना त्याला केवळ त्याच्या दानाद्वारे कार्य करायला लावले, त्याउलट देवाने पेत्राला परिपूर्ण बनवले. प्रभू येशूने अगदी सुरुवातीपासूनच पेत्र आणि पौल यांच्यासाठी योजना बनवल्या होत्या असे नाही: तर त्यांच्या जन्मजात स्वभावानुसार त्यांना परिपूर्ण केले गेले किंवा कार्य करायला लावले. आणि म्हणून, लोकांना जे दिसते ते केवळ मनुष्याचे बाह्य योगदान असते, तर देव जे पाहतो ते मनुष्याचे अंतरंग, तसेच मनुष्य सुरुवातीपासून ज्या मार्गाचा पाठपुरावा करतो तो मार्ग व मनुष्याच्या पाठपुराव्यामागील प्रेरणा असते. लोक मनुष्याला त्यांच्या स्वतःच्या धारणांनुसार आणि त्यांच्या स्वतःच्या आकलनानुसार मोजतात, तरीही मनुष्याचा अंत त्याच्या हा बाह्यतेनुसार ठरत नाही. आणि म्हणून मी म्हणतो, की जर तू सुरुवातीपासून जो मार्ग स्वीकारतोस तो यशाचा मार्ग असेल व पाठपुरावा करण्यामागचा तुझा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच योग्य असेल, तर तू पेत्रासारखे आहेस; तू ज्या मार्गावर चालत आहेस तो अपयशाचा मार्ग असेल, तर तू कितीही किंमत मोजलीस, तरी तुझा अंत पौलासारखाच असेल. काहीही असो, तुझे गंतव्यस्थान आणि तू यशस्वी व्हाल किंवा अयशस्वी, या दोन्ही बाबी तू शोधत असलेला मार्ग योग्य आहे की नाही, यावरून ठरतात, तुझे समर्पण किंवा मोजलेली किंमत यावरून नाही. पेत्रा व पौलाची मूलतत्त्वे आणि त्यांनी पाठपुरावा केलेली ध्येये वेगवेगळी होती; मनुष्य या गोष्टी शोधण्यास असमर्थ आहे. केवळ देवच त्या पूर्णपणे ओळखू शकतो. कारण देव जे पाहतो ते मनुष्याचे तत्त्व आहे, तर मनुष्य स्वतःचे मूलतत्त्व ही जाणत नाही. मनुष्य मनुष्यामध्ये किंवा त्याच्या वास्तविक पातळीचे मूलतत्त्वे पाहण्यास असमर्थ असतो व त्यामुळे तो पौल आणि पेत्र यांच्या यशापयशाची कारणे ओळखण्यास असमर्थ असतो. बहुतेक लोक पौलाची उपासना करतात व पेत्राची नाही याचे कारण म्हणजे, पौलाचा वापर सार्वजनिक कार्यासाठी केला गेला होता, मनुष्य हे कार्य समजण्यास समर्थ आहे आणि म्हणूनच लोक पौलाने “साध्य केलेल्या गोष्टींना” मान्यता देतात. दुसरीकडे, पेत्राचे अनुभव मनुष्याला दिसत नाहीत व त्याने ज्याचा शोध घेतला, ते मनुष्यासाठी अप्राप्य आहे. म्हणून मनुष्याला पेत्रामध्ये रस नाही.
व्यवहार आणि परिष्करणाच्या अनुभवांतून पार पडल्यानंतरच पेत्र परिपूर्ण बनला होता. तो म्हणाला, “मी सदैव देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. मी जे काही करतो त्यामध्ये मी केवळ देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो व मला ताडण प्राप्त झाले किंवा न्याय मिळाला, तरीही मला ते करण्यात आनंद आहे.” पेत्राने आपले सर्वस्व देवाला वाहिले आणि त्याचे कार्य, वचने व संपूर्ण जीवनच देवावर प्रेम करण्यासाठी होते. तो पवित्रतेचा शोध घेणारा मनुष्य होता आणि तो जितक्या अधिक अनुभवांतून पार पडला तितकेच त्याच्या हृदयातील देवाविषयीचे प्रेम वृद्धिंगत झाले. दुसरीकडे, पौलाने केवळ बाह्य कार्य केले व जरी त्याने कठोर परिश्रम केले असले तरी, त्याचे श्रम हे केवळ त्याचे कार्य योग्यरीत्या करण्यासाठी आणि त्यायोगे बक्षीस मिळविण्यासाठी होते. त्याला बक्षीस मिळणार नाही हे माहीत असते, तर त्याने आपले कार्य सोडून दिले असते. पेत्राला ज्याची पर्वा होती ती म्हणजे त्याच्या अंतःकरणातील खरे प्रेम, जे व्यावहारिक होते व ते साध्य केले जाऊ शकत होते. त्याला बक्षीस मिळेल की नाही याची नव्हे, तर त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवता येईल का, याची त्याला पर्वा होती. पौलाला अधिक कठोर परिश्रम करण्याची काळजी होती, त्याला बाह्य कार्य आणि भक्ती याविषयी व सामान्य लोकांनी न अनुभवलेल्या सिद्धांतांची काळजी होती. त्याच्या अंतःकरणात खोलवर घडलेल्या बदलांची किंवा देवावरील खऱ्या प्रेमाची त्याला पर्वा नव्हती. पेत्राचे अनुभव देवाविषयीचे खरे प्रेम आणि खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी होते. त्याचे अनुभव देवाशी जवळचे नाते साध्य करण्यासाठी व व्यावहारिक जीवन जगण्यासाठी होते. पौलाचे कार्य येशूने त्याच्यावर सोपवलेल्या गोष्टींमुळे आणि त्याला ज्या गोष्टींची आकांक्षा होती त्या साध्य करण्यासाठी केले होते, तरीही त्याच्या स्वतःबद्दलच्या व देवाबद्दलच्या ज्ञानाशी त्यांचा संबंध नव्हता. त्याचे कार्य केवळ ताडण आणि न्यायापासून वाचण्यासाठी होते. पेत्राने ज्याचा शोध घेतला ते शुद्ध प्रेम होते व पौलाने जे शोधले ते नीतिमत्त्वाचे मुकुट होते. पेत्राने पवित्र आत्म्याच्या कार्याचा अनेक वर्षांचा अनुभव घेतला, त्याला ख्रिस्ताविषयीचे व्यावहारिक ज्ञान तसेच स्वतःविषयीचे सखोल ज्ञान होते. आणि म्हणून, त्याचे देवावरील प्रेम शुद्ध होते. अनेक वर्षांच्या परिष्करणाने त्याचे येशू व जीवनाबद्दलचे ज्ञान उंचावले होते आणि त्याचे प्रेम हे बिनशर्त प्रेम होते, ते उत्स्फूर्त प्रेम होते व त्याने त्या बदल्यात काहीही मागितले नाही किंवा त्याने कोणत्याही लाभांची आशा धरली नाही. पौलाने बरीच वर्षे कार्य केले, तरीही त्याला ख्रिस्ताबद्दल फारसे ज्ञान नव्हते आणि त्याचे स्वतःबद्दलचे ज्ञानदेखील दयनीयपणे कमी होते. त्याचे ख्रिस्तावर बिलकुल प्रेम नव्हते व त्याचे कार्य आणि त्याने चालवलेला मार्ग अंतिम मुकुट प्राप्त करण्यासाठी होता. त्याने ज्यांचा शोध घेतला ते सर्वोत्तम मुकुट होते, शुद्ध प्रेम नव्हे. त्याने सक्रियपणे नाही, तर निष्क्रियपणे शोध घेतला; तो आपले कर्तव्य पार पाडत नव्हता, तर पवित्र आत्म्याच्या कार्याने ताब्यात घेतल्यानंतर त्याला पाठपुरावा करणे भाग पडले. आणि म्हणून, त्याचा पाठपुरावा हे सिद्ध करत नाही, की तो देवाने निर्मिलेला एक पात्र प्राणी होता. तर पेत्र हा देवाने निर्मिलेला पात्र प्राणी होता, ज्याने त्याचे कर्तव्य पार पाडले. मनुष्याला असे वाटते, की जे लोक देवासाठी योगदान देतात त्या सर्वांना बक्षीस मिळायला हवे व हे योगदान जितके मोठे असेल तितके त्यांना देवाची कृपा मिळावी असे गृहीत धरले जाते. मनुष्याच्या दृष्टिकोनाचे मूलतत्त्व व्यवहारात्मक आहे आणि तो देवाची निर्मिती म्हणून असलेले त्याचे कर्तव्य सक्रियपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. देवासाठी, लोक देवावर जितके अधिक खरे प्रेम व देवाप्रति पूर्ण आज्ञाधारकता यांचा शोध घेतात, म्हणजेच देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतात, तितके ते देवाची मान्यता प्राप्त करण्यास समर्थ होतात. मनुष्याने त्याचे मूळ कर्तव्य आणि दर्जा परत प्राप्त व्हावा अशी मागणी करणे हा देवाचा दृष्टिकोन आहे. मनुष्य हा देवाने निर्मिलेला आहे व म्हणून मनुष्याने देवाकडे कोणत्याही मागण्या करून स्वतःची मर्यादा ओलांडू नये आणि देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य पार पाडण्यापलीकडे काहीही करू नये. पौला व पेत्रा यांच्या गंतव्यस्थानांचे मोजमाप ते देवाची निर्मिती म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडू शकतात की नाही, यानुसार केले गेले, त्यांच्या योगदानाच्या आकारानुसार हे मोजले गेले नाही. त्यांनी सुरुवातीपासून ज्यांचा शोध घेतला त्या गोष्टींनुसार त्यांचे गंतव्यस्थान ठरवले गेले, त्यांनी किती कार्य केले यावरून किंवा इतर लोकांच्या त्यांच्याविषयीच्या अनुमानावरून हे ठरवले गेले नाही. आणि म्हणून, देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य सक्रियपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणे हा यशाचा मार्ग आहे; देवावरील खऱ्या प्रेमाचा मार्ग शोधणे हा सर्वात योग्य मार्ग आहे; एखाद्याच्या जुन्या प्रवृत्तीत बदल घडवण्याचा प्रयत्न करणे व देवावरील शुद्ध प्रेमाचा शोध घेणे हा यशाचा मार्ग आहे. यशाचा असा मार्ग म्हणजे मूळ कर्तव्य तसेच देवाची निर्मिती म्हणून असलेले मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त करण्याचा मार्ग आहे. हा पुनर्प्राप्तीचा मार्ग आहे आणि देवाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतच्या सर्व कार्याचा तो उद्देशदेखील आहे. जर मनुष्याकडून केला जाणारा पाठपुरावा हा वैयक्तिक भरमसाठ मागण्या व तर्कहीन इच्छांनी कलंकित असेल, तर त्यामुळे मनुष्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल होण्याचा परिणाम साध्य होणार नाही. हे पुनर्प्राप्तीच्या कार्याशी विसंगत आहे. हे निःसंशयपणे पवित्र आत्म्याने केलेले कार्य नाही आणि म्हणूनच हे सिद्ध होते, की अशा प्रकारचा पाठपुरावा करणे देवाला मंजूर नाही. देवाला जे मान्य नाही, असा शोध घेण्याचे महत्त्व ते काय?
पौलाने केलेले कार्य मनुष्यासमोर प्रदर्शित केले होते, परंतु त्याचे देवावरील प्रेम किती शुद्ध होते आणि त्याने त्याच्या अंतःकरणात देवावर किती प्रेम केले—या गोष्टी मनुष्य पाहू शकत नाही. मनुष्य केवळ त्याने केलेले कार्य पाहू शकतो, ज्यावरून मनुष्याला हे ठाऊक असते, की पवित्र आत्म्याने त्याचा निश्चितपणे उपयोग केला होता व म्हणून मनुष्याला वाटते, की पौला हा पेत्रापेक्षा चांगला होता, त्याचे कार्य अधिक महान होते, कारण तो चर्चच्या आवश्यकता पुरवण्यास समर्थ होता. पेत्राने केवळ त्याच्या वैयक्तिक अनुभवांकडे पाहिले आणि त्याने अधूनमधून कार्य करताना काही लोक प्राप्त केले. त्याच्याकडून काही कमी ज्ञात असलेली पत्रे आहेत, परंतु त्याच्या अंतःकरणात देवावरील प्रेम किती मोठे होते हे कोणास ठाऊक आहे? दिवसेंदिवस, पौलाने देवासाठी कार्य केले: जोपर्यंत कार्य करायचे होते तोपर्यंत त्याने ते केले. त्याला असे वाटले, की अशा प्रकारे तो मुकुट प्राप्त करू शकेल व देवाला संतुष्ट करू शकेल, तरीही त्याने त्याच्या कार्याद्वारे स्वतःमध्ये बदल घडवण्याचे मार्ग शोधले नाहीत. पेत्राच्या जीवनातील देवाची इच्छा पूर्ण न करणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे त्याला अस्वस्थ वाटू लागले. जर त्याने देवाची इच्छा पूर्ण केली नाही, तर त्याला पश्चात्ताप वाटेल आणि तो देवाचे हृदय संतुष्ट करण्यासाठी योग्य मार्ग शोधेल. त्याच्या जीवनातील अगदी लहान व सर्वात कमी महत्त्वाच्या पैलूंमध्येही, त्याने देवाची इच्छा पूर्ण करणे आवश्यक होते. त्याच्या जुन्या प्रवृत्तींचा विचार करता, तो कमी कठोर नव्हता, सत्यात खोलवर जाण्यासाठी त्याच्या स्वतःच्या गरजांमध्येही सदैव कठोर होता. पौलाने केवळ वरवरची प्रतिष्ठा आणि दर्जा यांचा शोध घेतला. त्याने मनुष्यासमोर स्वतःला दाखविण्याचा प्रयत्न केला व जीवनाच्या प्रवेशामध्ये कोणतीही सखोल प्रगती करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याला केवळ सिद्धांताची पर्वा होती, वास्तविकतेची नाही. काही लोक म्हणतात, “पौलाने देवासाठी इतके कार्य केले, तर देवाला त्याची आठवण का झाली नाही? पेत्राने देवासाठी केवळ थोडेच कार्य केले आणि चर्चसाठीही फार मोठे योगदान दिले नाही, मग त्याला परिपूर्ण का केले गेले?” पेत्राचे देवावर एका विशिष्ट बिंदूपर्यंत प्रेम होते, जे देवाला आवश्यक होते; केवळ अशा प्रकारच्या लोकांकडे साक्ष असते. आणि पौलाचे काय? पौलाचे देवावर किती प्रेम होते? तुला माहीत आहे का? पौलाचे कार्य कशासाठी केले गेले? आणि पेत्राचे कार्य कशासाठी केले गेले? पेत्राने जास्त कार्य केले नाही, परंतु त्याच्या अंतःकरणात काय होते हे तुला माहीत आहे का? पौलाचे कार्य चर्चसाठी तरतूद करणे व चर्चला सहाय्य करणे हे होते. पेत्राने जे अनुभवले ते त्याच्या जीवन प्रवृत्तीमधील बदल होते; त्याने देवावरील प्रेम अनुभवले. आता तुला त्यांच्या मूलतत्त्वांमधील फरक माहीत झाले आहेत, त्यामुळे अखेरीस, कोण देवावर खरा विश्वास ठेवतो आणि कोण देवावर खरा विश्वास ठेवत नाही, हे तुला कळेल. त्यांच्यापैकी एकाचे देवावर खरे प्रेम होते व दुसऱ्याचे देवावर खरे प्रेम नव्हते; एकाने त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणले आणि दुसऱ्याने ते केले नाही; एकाने नम्रपणे सेवा केली व ते लोकांच्या लगेच लक्षात आले नाही आणि दुसऱ्याची लोकांनी पूजा केली व त्याची प्रतिमा महान होती; एकाने पावित्र्याचा शोध घेतला आणि दुसर्याने ते केले नाही व जरी तो अपवित्र नसला तरी त्याच्या ठायी शुद्ध प्रेम नव्हते; एकाच्या ठायी खरी माणुसकी होती आणि दुसऱ्याकडे नव्हती; एकाला देवाने निर्मिलेले असल्याची जाणीव होती व दुसऱ्याला नव्हती. पौला आणि पेत्राच्या मूलतत्त्वांमध्ये असे फरक आहेत. पेत्र ज्या मार्गावर चालला होता तो यशाचा मार्ग होता, जो सामान्य मानवतेच्या पुनर्प्राप्तीचा व देवाने निर्मिलेल्या प्राण्याचे कर्तव्य पूर्ण करण्याचा मार्गदेखील होता. पेत्रा यशस्वी झालेल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतो. पौला ज्यावर चालला, तो अपयशाचा मार्ग होता आणि जे केवळ वरवरच स्वतःला सादर करतात व वाहतात आणि देवावर मनापासून प्रेम करत नाहीत. पौला त्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतो ज्यांच्याठायी सत्य नाही. देवावरील त्याच्या विश्वासात, पेत्राने प्रत्येक गोष्टीत देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला व देवाकडून आलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्याचा प्रयत्न केला. तो किंचितही तक्रार न करता, ताडण आणि न्याय, तसेच परिष्करण, क्लेश व त्याच्या जीवनात न जाणे स्वीकारण्यास समर्थ होता, यापैकी कोणतीही गोष्ट देवावरील त्याचे प्रेम बदलू शकत नव्हती. हे देवावरचे अंतिम प्रेम नव्हते का? ही देवाची निर्मिती म्हणून असलेली कर्तव्यपूर्ती नाही का? ताडण, न्याय किंवा संकट, तू मृत्यूपर्यंत सदैव आज्ञाधारकता प्राप्त करण्यास समर्थ आहात आणि हेच देवाच्या निर्मितीने प्राप्त करायला हवे, हीच देवावरील प्रेमाची शुद्धता आहे. जर मनुष्य एवढे साध्य करू शकत असेल, तर तो देवाने निर्मिलेला पात्र प्राणी आहे व निर्मात्याची इच्छा पूर्ण करणारी याहून चांगली कोणतीही गोष्ट नाही. कल्पना कर, की तू देवासाठी कार्य करण्यास समर्थ आहेस, तरीही तू देवाच्या आज्ञांचे पालन करत नाहीस आणि देवावर खरे प्रेम करण्यास असमर्थ आहेस. अशाप्रकारे, तू केवळ देवाची निर्मिती म्हणून असलेले कर्तव्य पार पाडले नाहीस एवढेच नव्हे, तर तुझी देवाकडून निंदाही होईल. कारण तू असा आहेस ज्याच्याठायी सत्य नाही, जो देवाची आज्ञा पाळण्यास असमर्थ आहे व जो देवाची अवज्ञा करणारा आहे. तुला केवळ देवासाठी कार्य करण्याची काळजी आहे आणि सत्य आचरणात आणण्याची किंवा स्वतःला जाणून घेण्याची काळजी नाही. तू निर्मात्याला जाणत नाहीस किंवा ओळखत नाहीस व निर्मात्याच्या आज्ञांचे पालन किंवा त्याच्यावर प्रेम करत नाहीस. तू अशी व्यक्ती आहेस, जी जन्मजात देवाची अवज्ञाकारी आहे आणि म्हणून असे लोक निर्मात्याला प्रिय नाहीत.
काही लोक म्हणतात, “पौलाने खूप मोठे कार्य केले आणि त्याने चर्चसाठी खूप मोठा भार उचलला व त्यांच्यासाठी खूप योगदान दिले. पौलाच्या तेरा पत्रांनी कृपेच्या युगाची २,००० वर्षे कायम ठेवली आणि चार सुवार्तांनंतर ती दुसऱ्या स्थानी आहेत. त्याच्याशी कोण तुलना करू शकेल? योहानाच्या प्रकटीकरणाचा कोणीही उलगडा करू शकत नाही, तर पौलाची पत्रे जीवन प्रदान करतात व त्याने केलेले कार्य चर्चसाठी फायदेशीर होते. अशा गोष्टी आणखी कोणाला साध्य करता आल्या असतील? आणि पेत्राने कोणते कार्य केले?” जेव्हा मनुष्य इतरांचे मोजमाप करतो, तेव्हा तो त्यांच्या योगदानानुसार करतो. जेव्हा देव मनुष्याचे मोजमाप करतो, तेव्हा तो मनुष्याच्या स्वभावानुसार करतो. जीवनाचा शोध घेणाऱ्यांमध्ये, पौला हा एक असा होता ज्याला स्वतःचे सार माहीत नव्हते. तो कोणत्याही प्रकारे नम्र किंवा आज्ञाधारक नव्हता किंवा त्याला त्याचे मूलतत्त्व माहीत नव्हते व हे देवाच्या विरोधात होते. आणि म्हणून, तो असा होता जो तपशीलवार अनुभवातून पार पडला नव्हता व तो असा होता ज्याने सत्य आचरणात आणले नव्हते. पेत्र वेगळा होता. त्याला त्याच्या अपूर्णता, दुर्बलता आणि देवाची निर्मिती म्हणून त्याची भ्रष्ट प्रवृत्ती माहीत होती व म्हणून ज्याद्वारे त्याची प्रवृत्ती बदलणे शक्य आहे असा अनुसरणाचा मार्ग त्याच्याकडे होता; ज्यांच्याकडे केवळ शिकवणूक आहे परंतु वास्तविकता नाही, अशांपैकी तो होता. ज्यांच्यामध्ये बदल घडतात ते नवीन लोक आहेत, ज्यांना वाचवण्यात आले आहे, ते असे आहेत जे सत्याचा पाठपुरावा करण्यास पात्र आहेत. जे लोक स्वतःमध्ये बदल घडवत नाहीत, ते आपोआपच कालबाह्य ठरतात; ज्यांना वाचवले जात नाही, म्हणजेच ज्यांचा देवाकडून त्यांचा तिरस्कार केला जातो आणि त्यांना नाकारले जाते. त्यांचे कार्य कितीही मोठे असले, तरी ते देवाला आठवणार नाहीत. जेव्हा तू तुमच्या पाठपुराव्याशी याची तुलना करतोस, तेव्हा तू अखेरीस पेत्रासारखा आहेस की पौलासारखा हे आपणहून स्पष्ट होईल. तू जे शोधत आहेस त्यात जर अजूनही सत्य नसेल व तू आजही पौलासारखे गर्विष्ठ आणि उद्धट असशील व त्याच्यासारखेच दिखाऊ आणि बढाईखोर असशील, तर तू निःसंशयपणे अयशस्वी होणारा अधःपतनी आहेस. जर तू पेत्राप्रमाणे शोध घेत असशील, जर आचरण व खरे बदल यांचा शोध घेत असशील आणि गर्विष्ठ किंवा जाणीवपूर्वक काही करणारा नसशील, उलट तुझे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असशील, तर तू विजय प्राप्त करू शकणारी देवाची निर्मिती ठरशील. पौलाला त्याचे स्वतःचे मूलतत्त्व किंवा भ्रष्टाचार माहीत नव्हता, त्याला त्याच्या स्वतःच्या अवज्ञेबद्दल तर फारच कमी माहिती होती. त्याने कधीही ख्रिस्ताविषयी त्याच्या घृणास्पद अवहेलनाचा उल्लेख केला नाही किंवा त्याला कधी जास्त पश्चात्तापही झाला नाही. त्याने केवळ थोडक्यात स्पष्टीकरण दिले व त्याच्या अंतःकरणात, तो पूर्णपणे देवाच्या अधीन झाला नाही. तो दमास्कसच्या वाटेवर पडला असला, तरी त्याने त्याच्या अंतःकरणात कधीही पाहिले नाही. तो केवळ कार्य करत राहण्यात समाधानी राहिला आणि स्वतःला जाणून घेणे व त्याच्या जुन्या प्रवृत्तीत बदल घडवणे हे त्याने कधीही सर्वात महत्त्वाचे मुद्दे मानले नाहीत. तो केवळ सत्य बोलण्यामध्ये समाधानी होता, इतरांना स्वतःच्या विवेकासाठी तारण म्हणून प्रदान करणे आणि स्वतःला सांत्वन देण्यासाठी व त्याच्या मागील पापांची क्षमा करण्यासाठी येशूच्या शिष्यांचा यापुढे छळ न करणे एवढ्यातच तो समाधानी होता. त्याने ज्या ध्येयाचा पाठपुरावा केला ते भविष्यातील मुकुट आणि क्षणभंगुर कार्याखेरीज दुसरे काही नव्हते, त्याने ज्या ध्येयाचा पाठपुरावा केला ती विपुल कृपा होती. त्याने सत्याचा पुरेसा शोध घेतला नाही किंवा पूर्वी न समजलेल्या सत्यात खोलवर जाण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून त्याचे स्वतःबद्दलचे ज्ञान खोटे आहे असे म्हटले जाऊ शकते व त्याने ताडण किंवा न्याय स्वीकारला नाही. तो कार्य करण्यास समर्थ होता याचा अर्थ त्याला त्याच्या स्वतःच्या स्वभावाचे किंवा मूलतत्त्वाचे ज्ञान होते असे नाही; त्याचे लक्ष केवळ बाह्य आचरणावर होते. शिवाय, त्याने बदलासाठी नव्हे, तर ज्ञानासाठी प्रयत्न केले. त्याचे कार्य म्हणजे पूर्णतः दमास्कसच्या रस्त्यावर येशूच्या दर्शनाचा परिणाम होता. त्याने मुळात हे करण्याचा संकल्प केला नव्हता किंवा त्याच्या जुन्या प्रवृत्तीची छाटणी स्वीकारल्यानंतरही हे कार्य झाले नव्हते. त्याने कसेही कार्य केले, तरीही त्याची जुनी प्रवृत्ती बदलली नाही आणि त्यामुळे त्याच्या कार्याने त्याच्या भूतकाळातील पापांचे प्रायश्चित्त केले नाही, तर त्यावेळच्या चर्चमध्ये केवळ एक विशिष्ट भूमिका बजावली. अशा व्यक्तीसाठी, ज्याची जुनी प्रवृत्ती बदलली नाही—म्हणजेच, ज्याला तारण प्राप्त झाले नाही व एवढेच नव्हे तर जो सत्यापासून वंचित आहे—तो प्रभू येशूने स्वीकारलेल्यांपैकी एक होण्यास पूर्णपणे असमर्थ होता. तो येशू ख्रिस्ताबद्दल प्रेम आणि आदराने भरलेला नव्हता किंवा तो सत्य शोधण्यात पारंगत नव्हता, देहधारी देवाचे रहस्य शोधणाराही नव्हता. तो केवळ अत्याधुनिक शास्त्रात निपुण होता व जो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या किंवा सत्य ठायी असलेल्या कुणापुढेही झुकणारा नव्हता. तो त्याच्या विरुद्ध असलेल्या किंवा त्याच्याशी शत्रुत्व असलेल्या लोकांचा किंवा सत्यांचा मत्सर करत असे, तर उत्कृष्ट प्रतिमा सादर करणाऱ्या आणि सखोल ज्ञान असलेल्या प्रतिभावान लोकांना प्राधान्य देत असे. खरा मार्ग शोधणार्या व सत्याखेरीज कशाचीही पर्वा न करणार्या गरीब लोकांशी संवाद साधणे त्याला आवडत नव्हते. त्याऐवजी केवळ सिद्धांतांबद्दल बोलणार्या आणि विपुल ज्ञान असलेल्या धार्मिक संस्थांमधील ज्येष्ठ व्यक्तींशी त्यांचा संबंध होता. त्याला पवित्र आत्म्याच्या नवीन कार्याबद्दल प्रेम नव्हते व पवित्र आत्म्याच्या नवीन कार्याच्या हालचालींची त्याला पर्वा नव्हती. त्याऐवजी, त्याने त्या नियमांना आणि सिद्धांतांना अनुकूलता दिली, जे सामान्य सत्यांपेक्षा उच्च होते. त्याच्या जन्मजात सारामध्ये व त्याने ज्याचा शोध घेतला त्याच्या संपूर्णतेमध्ये, तो ख्रिश्चन म्हणवून घेण्यास पात्र नाही, ज्याने सत्याचा पाठपुरावा केला, मग देवाच्या घरातील विश्वासू सेवक असणे तर दूरच, कारण त्याचा ढोंगीपणा खूप होता आणि त्याची अवज्ञा फारच मोठी होती. जरी तो प्रभू येशूचा सेवक म्हणून ओळखला जातो, तरी तो स्वर्गाच्या राज्याच्या द्वारात प्रवेश करण्यास बिलकुल योग्य नव्हता, कारण त्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतच्या कृती नीतिमान म्हणण्यास योग्य नव्हत्या. तो केवळ दांभिक होता व अनीतीने वागला, तरीही त्याने ख्रिस्तासाठीही कार्य केले म्हणून पाहिले जाऊ शकते. त्याला दुष्ट म्हणता येत नसले, तरी अनीतिमान कार्य करणारा मनुष्य असे त्याला म्हणता येईल. त्याने बरेच कार्य केले, तरीही त्याने केलेल्या कार्याच्या प्रमाणावर नव्हे, तर केवळ त्याच्या गुणवत्तेवर आणि मूलतत्त्वावर त्याचा न्याय केला जावा. केवळ अशा प्रकारे या प्रकरणाच्या तळाशी जाणे शक्य आहे. त्याचा सदैव विश्वास होता: “मी कार्य करण्यास समर्थ आहे, मी बहुतेक लोकांपेक्षा चांगला आहे; मी प्रभूवरील ओझ्याबद्दल इतर कोणापेक्षाही अधिक विचार करतो व माझ्याइतका खोलवर पश्चात्ताप कोणीही करत नाही, कारण माझ्यावर मोठा प्रकाश पडला आणि मी तो महान प्रकाश पाहिला आहे व म्हणून माझा पश्चात्ताप इतरांपेक्षा सखोल आहे.” त्यावेळी त्याच्या मनात हाच विचार आला. त्याच्या कार्याच्या अखेरीस, पौला म्हणाला: “मी लढा दिला आहे, मी माझा मार्ग पूर्ण केला आहे आणि माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे.” त्याचा लढा, कार्य व मार्ग पूर्णपणे नीतिमत्वाच्या मुकुटासाठी होता आणि तो सक्रियपणे पुढे गेला नाही. जरी तो त्याच्या कार्यात ढिसाळ नसला, तरी असे म्हणता येईल की त्याचे कार्य केवळ त्याच्या चुकांची भरपाई करण्यासाठी, त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीवरील आरोपांची भरपाई करण्यासाठी केले गेले होते. त्याला केवळ त्याचे कार्य पूर्ण करण्याची, त्याचा मार्ग पूर्ण करण्याची व शक्य तितक्या लवकर त्याची लढाई लढण्याची आशा होती, जेणेकरून त्याला दीर्घकाळ आस असलेला त्याच्या नीतिमत्त्वाचाचा मुकुट लवकर मिळू शकेल. प्रभू येशूला त्याच्या अनुभवांनी आणि खऱ्या ज्ञानाने भेटण्याची त्याला आस नव्हती, तर त्याचे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्याची त्याला इच्छा होती, जेणेकरून त्याने प्रभू येशूला भेटल्यावर त्याच्या कार्यामुळे त्याला लाभलेले बक्षीस त्याला मिळावे. त्याने त्याचे कार्य स्वतःला सांत्वन देण्यासाठी व भविष्यातील मुकुटाच्या बदल्यात करार करण्यासाठी वापरले. त्याने ज्याचा शोध घेतला, ते सत्य किंवा देव नव्हते, तर केवळ मुकुट होता. असा पाठपुरावा प्रमाण कसा असू शकतो? त्याची प्रेरणा, त्याचे कार्य, त्याने मोजलेली किंमत आणि त्याचे सर्व प्रयत्न—त्याच्या अद्भूत कल्पनांनी सर्व व्यापून टाकले व त्याने पूर्णपणे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार कार्य केले. त्याच्या संपूर्ण कार्यात, त्याने मोजलेल्या किंमतीत किंचितही राजीखुशी नव्हती; तो केवळ सौदा करण्यात गुंतला होता. त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याने स्वेच्छेने प्रयत्न केले नाहीत, तर कराराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वेच्छेने केले गेले. अशा प्रयत्नांना काही किंमत आहे का? त्याच्या अशुद्ध प्रयत्नांची प्रशंसा कोण करणार? अशा प्रयत्नांमध्ये कोणाला रस आहे? त्याचे कार्य भविष्यासाठी स्वप्नांनी परिपूर्ण होते, आश्चर्यकारक योजनांनी परिपूर्ण होते आणि मानवी प्रवृत्तीत बदल घडवण्यासाठी कोणताही मार्ग त्यामध्ये नव्हता. त्याचे परोपकार हे बहुतांश ढोंग होते; त्याच्या कार्याने जीवन दिले नाही, परंतु सभ्यतेचा लबाडी होते; तो केवळ एक करार होता. यासारखे कार्य मनुष्याला त्याचे मूळ कर्तव्य पुन्हा प्राप्त करण्याच्या मार्गावर कसे नेईल?
पेत्र जे काही शोधत होता ते सर्व देवाच्या हृदयासाठी होते. त्याने देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि दुःख व संकटांची पर्वा न करता, तो देवाची इच्छा पूर्ण करण्यास तयार होता. देवावर विश्वास ठेवणाऱ्याचा यापेक्षा मोठा शोध नाही. पौलाने जे शोधले ते त्याच्या स्वतःच्या देहामुळे, त्याच्या स्वतःच्या धारणांमुळे आणि त्याच्या स्वतःच्या योजनांमुळे कलंकित होते. तो कोणत्याही प्रकारे देवाची निर्मिती असलेला पात्र प्राणी नव्हता, देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा तो नव्हता. पेत्राने देवाच्या नियोजनाच्या अधीन होण्याचा प्रयत्न केला व जरी त्याने केलेले कार्य मोठे नव्हते, तरीही त्याच्या पाठपुराव्यामागील प्रेरणा आणि तो चाललेला मार्ग योग्य होता; तो अनेक लोकांना प्राप्त करू शकला नसला तरी तो सत्याच्या मार्गाचा पाठपुरावा करू शकला. यामुळे असे म्हणता येईल, की तो देवाचा एक पात्र प्राणी होता. आज, जरी तू कामगार नसलास, तरी तू देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य पार पाडण्यास व देवाच्या सर्व नियोजनाच्या अधीन राहण्यास समर्थ असशील. तू देव जे काही सांगतो त्याचे पालन करण्यास समर्थ असावेस आणि सर्व प्रकारच्या क्लेशांचा व परिष्करणाचा अनुभव घ्यावास आणि तू दुर्बल असलास तरीही तुझ्या अंतःकरणात तू देवावर प्रेम करण्यास समर्थ असावेस. जे स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेतात ते देवाची निर्मिती म्हणून असलेले कर्तव्य पार पाडण्यास तयार असतात व अशा लोकांचा पाठपुरावा करण्याबद्दलचा दृष्टिकोन योग्य असतो. अशाच लोकांची देवाला गरज आहे. जर तू खूप कार्य केले असशील आणि इतरांना तुझी शिकवणूक मिळाली अशेल, परंतु तू स्वतः बदलला नाहीस व कोणतीही साक्ष दिली नाहीस किंवा कोणताही खरा अनुभव घेतला नाहीस, जसे की तुझ्या आयुष्याच्या अखेरीस, तरीही तू जे काही केले आहेस त्याची कोणही साक्ष देत नाही, तर मग तू बदललेला आहेस का? तू सत्याचा पाठपुरावा करणारा आहेस का? त्यावेळी, पवित्र आत्म्याने तुझा वापर केला, परंतु जेव्हा त्याने तुझा वापर केला, तेव्हा त्याने तुझ्यातील त्या भागाचा वापर केला जो कार्य करण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि त्याने तुझ्यातील तो भाग वापरला नाही जो वापरला जाऊ शकत नाही. जर तू बदल घडवू इच्छित असशील, तर वापरण्याच्या प्रक्रियेदरम्यान तू हळुहळू परिपूर्ण बनू शकशील. तरीही तुला अखेरीस प्राप्त केले जाईल की नाही, याची कोणतीही जबाबदारी पवित्र आत्मा स्वीकारत नाही व हे तुझ्या पाठपुरावा करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जर तुझ्या वैयक्तिक प्रवृत्तीत काही बदल होत नसतील, तर याचे कारण तुझ्या पाठपुराव्याबाबतचा दृष्टिकोन चुकीचा आहे. जर तुला कोणतेही बक्षीस मिळत नसेल, तर ती तुझी स्वतःची समस्या आहे, तू स्वतः सत्य आचरणात आणले नाहीस आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ आहेस, हे याचे कारण आहे. आणि म्हणून, तुझ्या वैयक्तिक अनुभवांपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही व तुझ्या वैयक्तिक नोंदीपेक्षा काहीही महत्त्वाचे काहीही नाही! काही लोक असे म्हणतील की, “मी तुझ्यासाठी खूप कार्य केले आहे आणि जरी मी कोणतीही प्रसिद्ध कामगिरी केली नसली तरीही, मी माझ्या प्रयत्नांमध्ये परिश्रम घेतले आहेत. जीवनाचे फळ खाण्यासाठी तू मला स्वर्गात प्रवेश देऊ शकत नाहीस का?” मला कोणत्या प्रकारचे लोक हवे आहेत हे तुला माहीत असले पाहिजे; जे अपवित्र आहेत त्यांना राज्यामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही, जे अपवित्र आहेत त्यांना पवित्र भूमीला कलंक लावण्याची परवानगी नाही. जरी तू खूप कार्य केले असशील व बरीच वर्षे कार्य केले असशील, तरीही जर तू अजूनही अत्यंत मलिन असशील, तर तू माझ्या राज्यात प्रवेश करू इच्छितोस हे स्वर्गाच्या कायद्याला असह्य होईल! जगाच्या स्थापनेपासून आजपर्यंत, माझी खुशामत करणार्यांना मी कधीही माझ्या राज्यात सहज प्रवेश दिलेला नाही. हा स्वर्गीय नियम आहे आणि तो कोणीही मोडू शकत नाही! तू जीवन शोधले पाहिजेस. आज, ज्यांना परिपूर्ण केले जाईल ते पेत्रासारखेच आहेत: ते असे आहेत जे त्यांच्या प्रवृत्तीत बदल शोधतात व जे देवाची साक्ष द्यायला आणि देवाची निर्मिती म्हणून त्यांचे कर्तव्य बजावण्यास तयार असतात. अशा लोकांनाच परिपूर्ण केले जाईल. जर तू केवळ बक्षीसाकडे पाहत असशील व तुझी स्वतःची जीवन प्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करत नसशील, तर तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील—हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे!
पेत्र आणि पौलाच्या मूलतत्त्वांमधील फरकावरून तू समजून घेतले पाहिजेस, की जे लोक जीवनाचा पाठपुरावा करत नाहीत, ते सर्व व्यर्थ श्रम करतात! तू देवावर विश्वास ठेवतोस व देवाचे अनुसरण करतोस आणि म्हणून तुझ्या अंतःकरणात तू देवावर प्रेम केले पाहिजेस. तू तुझी भ्रष्ट प्रवृत्ती बाजूला टाकली पाहिजेस, तू देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजेस व तू देवाची निर्मिती म्हणून तुझे कर्तव्य पार पाडले पाहिजेस. तू देवावर विश्वास ठेवतोस आणि त्याचे अनुसरण करतोस, त्यामुळे तू त्याला सर्व काही अर्पण केले पाहिजेस व वैयक्तिक निवडी किंवा मागण्या करू नयेस आणि तू देवाच्या इच्छेची पूर्तता केली पाहिजेस. तुला निर्माण केले आहे, त्यामुळे तुला निर्माण करणाऱ्या प्रभूची आज्ञा तू पाळली पाहिजेस, कारण तुला स्वतःवर प्रभुत्व नाही व तुझ्या दैवावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता नाही. तू देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती असल्याने तू पावित्र्य आणि बदलाचा शोध घेतला पाहिजेस. तू देवाची निर्मिती असल्याने, तू तुझ्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस व तुझे स्थान राखले पाहिजे आणि तू तुझ्या कर्तव्याची मर्यादा ओलांडू नयेस. हे तुझ्यावर निर्बंध घालण्यासाठी किंवा सिद्धांताद्वारे तुला दडपण्यासाठी नाही, तर उलट हा तू तुझ्या कर्तव्याचे पालन करू शकशील असा मार्ग आहे व तो साध्य करता येऊ शकतो—आणि तो नीतिमत्वाने वर्तन करणाऱ्या सर्वांनी साध्य केला पाहिजे. जर तू पेत्र व पौलाच्या मूलतत्त्वांची तुलना केलीस, तर तुला कळेल की तू कसे शोधले पाहिजेस. पेत्र आणि पौल यांनी चाललेल्या मार्गांपैकी, एक परिपूर्ण बनण्याचा मार्ग आहे व एक बाहेर काढून टाकले जाण्याचा मार्ग आहे; पैत्र आणि पौल हे दोन भिन्न मार्गांचे प्रतिनिधित्व करतात. जरी प्रत्येकाला पवित्र आत्म्याचे कार्य लाभले व प्रत्येकाने पवित्र आत्म्याचे ज्ञान आणि प्रकाश प्राप्त केला व प्रत्येकाने प्रभू येशूने त्यांच्याकडे जे सोपवले ते स्वीकारले आहे, तरी प्रत्येकामध्ये लाभलेले फळ सारखे नव्हते: एकाला खरोखरच फळ मिळाले आणि दुसऱ्याला मिळाले नाही. त्यांची मूलतत्त्वे, त्यांनी केलेले कार्य, जे त्यांच्याद्वारे बाह्यरीत्या व्यक्त केले गेले व त्यांचा अखेरचा अंत, यातून तुला समजले पाहिजे, की तू कोणता मार्ग धरावास, चालण्यासाठी कोणता मार्ग निवडावास. त्यांनी दोन स्पष्टपणे भिन्न मार्गांवर मार्गक्रमण केले. पौल आणि पेत्र हे त्या प्रत्येक मार्गाचे सार होते व म्हणून सुरुवातीपासूनच ते या दोन मार्गांचे वर्णन करण्यासाठी गृहीत धरले गेले. पौलाच्या अनुभवांचे मुख्य मुद्दे कोणते आणि त्याला ते का जमले नाही? पेत्राच्या अनुभवांचे मुख्य मुद्दे कोणते व त्याला परिपूर्ण बनण्याचा अनुभव कसा आला? या दोघांपैकी प्रत्येकाला कशाची पर्वा आहे याची जर तू तुलना केलीस, तर तुला कळेल, की देवाला नेमकी कोणती व्यक्ती हवी आहे, देवाची इच्छा काय आहे, देवाची प्रवृत्ती काय आहे, अखेर कोणत्या प्रकारची व्यक्ती परिपूर्ण होईल आणि कोणत्या प्रकारची व्यक्ती परिपूर्ण केली जाणार नाही; ज्यांना परिपूर्ण बनवले जाईल त्यांची प्रवृत्ती कशी आहे व ज्यांना परिपूर्ण केले जाणार नाही त्यांची प्रवृत्ती कशी आहे हेही तुला कळेल—हे मूलतत्त्वाचे मुद्दे पेत्र आणि पौलाच्या अनुभवांमध्ये पाहिले जाऊ शकतात. देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या व म्हणून तो सर्व सृष्टीला त्याच्या अधिपत्याखाली आणतो आणि अधीन होण्यास भाग पाडतो; तो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवेल, जेणेकरून सर्व गोष्टी त्याच्या हातात असतील. देवाची सर्व निर्मिती, प्राणी, वनस्पती, मानवजात, पर्वत व नद्या आणि तलावांसह—सर्व त्याच्या अधिपत्याखाली आले पाहिजेत. आकाशातील व जमिनीवरील सर्व गोष्टी त्याच्या अधिपत्याखाली आल्या पाहिजेत. त्यांच्याकडे कोणताही पर्याय असू शकत नाही आणि सर्वांनी त्याच्या नियोजनाच्या अधीन असायला हवे. हे देवाने निश्चित केले होते व हा देवाचा अधिकार आहे. देव प्रत्येक गोष्टीची आज्ञा देतो आणि प्रत्येक गोष्टीचा क्रम व क्रमवारी लावतो, प्रत्येकाला प्रकारानुसार वर्गीकृत केले जाते आणि देवाच्या इच्छेनुसार त्यांचे स्वतःचे स्थान दिले जाते. ते कितीही महान असले तरी, कोणतीही गोष्ट देवाला मागे टाकू शकत नाही, सर्व गोष्टी देवाने निर्माण केलेल्या मानवजातीची सेवा करतात व कोणतीही गोष्ट देवाची आज्ञा मोडण्याचे किंवा देवाकडे कोणतीही मागणी करण्याचे धाडस करत नाही. म्हणून मनुष्याने, देवाची निर्मिती म्हणून, मनुष्याचे कर्तव्यदेखील पार पाडले पाहिजे. तो सर्व गोष्टींचा स्वामी किंवा काळजीवाहू असला तरीही, सर्व गोष्टींमध्ये मनुष्याचा दर्जा कितीही उच्च असला तरीही, तो देवाच्या अधिपत्याखाली असलेला एक छोटासा मनुष्य आहे आणि तो एक क्षुल्लक मनुष्यापेक्षा अधिक नाही, तो देवाची निर्मिती आहे व तो कधीही देवाच्या वर असू शकत नाही. देवाची निर्मिती म्हणून, मनुष्याने देवाच्या निर्मितीचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतर पर्याय न निवडता देवावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण देव मनुष्याच्या प्रेमास पात्र आहे. जे देवावर प्रेम करू पाहतात त्यांनी कोणत्याही वैयक्तिक लाभांची आशा धरू नये किंवा त्यांना ज्याची आस आहे त्याचा शोध घेऊ नये; हे शोध घेण्याचे सर्वात योग्य साधन आहे. जर तू जे शोधत आहेस ते सत्य असेल, जे आचरणात आणतोस ते सत्य असेल व जे साध्य करतोस तो तुझ्या प्रवृत्तीमधील बदल असेल, तर तू ज्या मार्गावर चालत आहेस तोच योग्य मार्ग आहे. जर तू जे शोधत आहेस ते देहाचे आशीर्वाद असतील आणि तू जे आचरणात आणतोस ते तुझ्या स्वतःच्या धारणांचे सत्य असेल व तुझ्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नसेल आणि तू देहात देवाप्रति आज्ञाधारक नसशील व तू अजूनही अस्पष्टतेत जगत असशील, तर मग तू जे शोधत आहेस ते तुला नक्कीच नरकात घेऊन जाईल, कारण तू ज्या मार्गावर चालत आहेस तो अपयशाचा मार्ग आहे. तुला परिपूर्ण बनवले जाईल की बाहेर काढून टाकले जाईल हे तुझ्या स्वतःच्या पाठपुराव्यावर अवलंबून आहे, ज्याचा अर्थ असा, की यश किंवा अपयश हे मनुष्य कोणत्या मार्गावर चालतो त्यावर अवलंबून असते.