एक अतिशय गंभीर समस्या: विश्वासघात (२)

मनुष्याचा स्वभाव माझ्या मूलतत्त्वापेक्षा खूप वेगळा आहे, कारण मनुष्याचा भ्रष्ट स्वभाव पूर्णपणे सैतानापासून उद्भवतो; मनुष्याच्या स्वभावावर सैतानाने प्रक्रिया केली आहे आणि त्याला भ्रष्ट केले आहे. म्हणजेच, मनुष्य त्याच्या दुष्ट व कुरूप प्रभावाखाली जगतो. मनुष्य सत्याच्या जगात किंवा पवित्र वातावरणात वाढत नाही आणि मनुष्य प्रकाशात जगणे तर दूरच. म्हणूनच, जन्माच्या क्षणापासून कोणाच्याही स्वभावात सत्य असणे शक्य नाही व देवाची भीती बाळगणारे आणि त्याचे आज्ञापालन करणारे मूलतत्त्व घेऊन जन्माला येणे तर दूरच. याउलट, लोकांमध्ये देवाचा प्रतिकार करणारा, देवाची आज्ञा मोडणारा आणि सत्यावर प्रेम नसलेला स्वभाव असतो. या स्वभावाच्या समस्येबद्दल मला चर्चा करायची आहे—विश्वासघात. विश्वासघात हा प्रत्येक व्यक्तीच्या देवाच्या प्रतिकाराचा स्रोत आहे. ही अशी समस्या आहे जी फक्त मनुष्यामध्ये आहे, माझ्यामध्ये नाही. काही जण विचारतील: ख्रिस्ताप्रमाणे सर्व लोक त्याच जगात राहतात, तर सर्व लोकांमध्ये देवाचा विश्वासघात करणारे स्वभाव का आहेत आणि ख्रिस्तामध्ये तो का नाही? ही अशी समस्या आहे जी तुम्हाला स्पष्टपणे समजावून सांगणे आवश्यक आहे.

मानवजातीच्या अस्तित्वाचा आधार हा आत्म्याचा पुनरावृत्ती पुनर्जन्म आहे. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक व्यक्तीचा आत्मा पुनर्जन्म घेतो तेव्हा त्याला देहात मानवी जीवन मिळते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा जन्म झाल्यानंतर, देह अंतिमतः त्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे जीवन पुढे सुरू राहते, जेव्हा आत्मा त्याचे कवच सोडतो, तेव्हा तो शेवटचा क्षण असतो. ही प्रक्रिया पुनःपुन्हा होत राहते, एखाद्या व्यक्तीचा आत्मा सतत येतो आणि जातो व अशा प्रकारे मानवजातीचे अस्तित्व टिकून राहते. देहाचे जीवन हे मनुष्याच्या आत्म्याचेदेखील जीवन आहे आणि मनुष्याचा आत्मा मनुष्याच्या देहाच्या अस्तित्वाचे समर्थन करतो. म्हणजेच, प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्यांच्या आत्म्यापासून येते व जीवन हे जन्मजात देहात नसते. अशा प्रकारे, मनुष्याचा स्वभाव देहातून नव्हे तर आत्म्यातून येतो. केवळ प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यालाच माहीत असते, की त्यांनी सैतानाची प्रलोभने, संकटे आणि भ्रष्टाचार कसा अनुभवला आहे. या गोष्टी मनुष्याच्या शरीराला माहीत नसतात. म्हणूनच, मानवजात नकळत अधिक अंधःकारमय, अधिक मलीन आणि अधिक वाईट होत जाते, मनुष्य व माझ्यातील अंतर अधिकाधिक वाढत जाते आणि मानवजातीसाठी जीवन अधिक अंधःकारमय होत जाते. सैतान मानवजातीच्या आत्म्याला त्याच्या मुठीत धरून ठेवतो, म्हणून अर्थातच, मनुष्याच्या देहावरही सैतानाने कब्जा केलेला असतो. असा देह व अशी मानवजात देवाचा प्रतिकार कसा करू शकत नाही? ते त्याच्याशी जन्मजात अनुरूप कसे असू शकतात? मी सैतानाला हवेत खाली टाकण्याचे कारण म्हणजे त्याने माझा विश्वासघात केला. मग, मनुष्य त्यांच्या सहभागापासून मुक्त कसा होऊ शकतो? म्हणूनच विश्वासघात हा मानवी स्वभाव आहे. मला विश्वास आहे, की तुम्हाला हे तर्क समजल्यानंतर, तुमचा ख्रिस्ताच्या मूलतत्त्वावर काही प्रमाणात विश्वास बसेल. देवाच्या आत्म्याने धारण केलेला देह हे देवाचे स्वतःचे शरीर आहे. देवाचा आत्मा सर्वोच्च आहे; तो सर्वशक्तिमान, पवित्र आणि नीतिमान आहे. त्याचप्रमाणे, त्याचा देहदेखील सर्वोच्च, सर्वशक्तिमान, पवित्र व नीतिमान आहे. असा देह फक्त तेच करू शकतो जे नीतिमान आणि मानवजातीसाठी हितकारक आहे, जे पवित्र, तेजस्वी व पराक्रमी आहे; सत्याचे उल्लंघन करणारे, नैतिकतेचे आणि न्यायाचे उल्लंघन करणारे काहीही करण्यास तो असमर्थ आहे, मग देवाच्या आत्म्याचा विश्वासघात करणारी कोणतीही गोष्ट करणे तर दूरच. देवाचा आत्मा पवित्र आहे आणि अशा प्रकारे त्याचा देह सैतानाद्वारे भ्रष्ट केला जाऊ शकत नाही; त्याच्या देहाचे सार मनुष्याच्या देहापेक्षा वेगळे आहे. कारण सैतानाने मनुष्याला भ्रष्ट केले आहे, देवाला नाही; सैतान शक्यतो देवाच्या देहाला भ्रष्ट करू शकत नाही. अशाप्रकारे, मनुष्य व ख्रिस्त एकाच जागेत राहतात हे तथ्य असूनही, केवळ मनुष्यच सैतानाच्या ताब्यात आहे, वापरला जात आहे व अडकला आहे. याउलट, ख्रिस्त हा सैतानाच्या भ्रष्टतेपासून कायमचा अभेद्य आहे, कारण सैतान कधीही सर्वोच्च स्थानावर जाण्यास सक्षम होणार नाही आणि कधीही देवाच्या जवळ येऊ शकणार नाही. आज, तुम्ही सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे, की मानवजात, जिला सैतानाने भ्रष्ट केले आहे, ती माझा विश्वासघात करते. विश्वासघात ही अशी समस्या कधीही होणार नाही ज्यामध्ये ख्रिस्ताचा सहभाग असेल.

सैतानाने भ्रष्ट केलेले सर्व आत्मे सैतानाच्या ताब्यात आहेत. केवळ जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनाच वेगळे केले गेले आहे, सैतानाच्या छावणीतून वाचवले गेले आहे आणि आजच्या राज्यात आणले गेले आहे. हे लोक आता सैतानाच्या प्रभावाखाली राहत नाहीत. असे असले तरी, मनुष्याचा स्वभाव अजूनही मनुष्याच्या देहात रुजलेला आहे, म्हणजेच, जरी तुमचे आत्मे वाचवले गेले असले तरीही, तुमचा स्वभाव पूर्वीसारखाच आहे व तुम्ही माझा विश्वासघात कराल ही शक्यता शंभर टक्के तशीच राहते. म्हणूनच माझे कार्य इतके दिवस टिकते, कारण तुमचा स्वभाव नियंत्रित करण्यासारखा नाही. आता, तुम्ही तुमची कर्तव्ये पार पाडत असताना तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही सर्व संकटांना सामोरे जात आहात, तरीही तुमच्यापैकी प्रत्येकजण माझा विश्वासघात करण्यास आणि सैतानाच्या कार्यक्षेत्रात, त्याच्या छावणीत परत जाण्यास व तुमच्या जुन्या जीवनात परत जाण्यास सक्षम आहे—ही निर्विवाद वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस, आताच्या प्रमाणे माणुसकी किंवा मानवी समानतेचा अंश सादर करणे तुम्हाला शक्य होणार नाही. गंभीर प्रकरणांमध्ये, तुमचा नाश होईल एवढेच नव्हे, तर अनंतकाळासाठी सर्वनाश होईल, कठोर शिक्षा होईल, पुन्हा कधीही पुनर्जन्म होणार नाही. ही समस्या तुमच्यासमोर ठेवलेली आहे. मी तुम्हाला अशा प्रकारे आठवण करून देत आहे, सर्वप्रथम माझे कार्य व्यर्थ जाऊ नये म्हणून व दुसरे म्हणजे, तुम्ही सर्व प्रकाशाच्या दिवसात जगावे म्हणून. खरे तर, माझे कार्य व्यर्थ आहे की नाही ही महत्त्वाची समस्या नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही आनंदी जीवन आणि एक अद्भूत भविष्य जगण्यास सक्षम असावे. माझे कार्य लोकांच्या आत्म्याला वाचवण्याचे कार्य आहे. जर तुझा आत्मा सैतानाच्या हातात पडला, तर तुझे शरीर शांततेत राहणार नाही. जर मी तुझ्या शरीराचे रक्षण करत असेन, तर तुझा आत्मादेखील निश्चितच माझ्या देखरेखीखाली असेल. जर मी खरोखरच तुझा तिरस्कार केला, तर तुझे शरीर व आत्मा एकाच वेळी सैतानाच्या हातात पडेल. त्यावेळच्या तुझ्या परिस्थितीची तू कल्पना करू शकतोस का? जर, एके दिवशी तुम्ही माझी वचने गमावली, तर मी एकतर तुम्हाला संपूर्णपणे सैतानाच्या स्वाधीन करेन, जो माझा राग पूर्णपणे विरून जाईपर्यंत तुम्हाला भयंकर यातना देईल किंवा वाचवता न येणाऱ्या तुम्हा मानवांना मी वैयक्तिकरीत्या शिक्षा करेन, कारण विश्वासघात करणारी तुमची हृदये कधीही बदलणार नाहीत.

तुमच्यामध्ये माझ्यासाठी किती विश्वासघात आहे हे पाहण्याकरिता तुम्ही सर्वांनी आता लवकरात लवकर स्वतःमध्ये डोकावून पाहावे. मी तुमच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पाहत आहे. माझ्याशी व्यवहार करताना उदासीन राहू नका. मी कधीच लोकांशी खेळ खेळत नाही. मी काही करेन असे म्हटले, तर नक्कीच करेन. मला आशा आहे, की तुमच्यापैकी प्रत्येकजण माझी वचने गांभीर्याने घेईल आणि ते विज्ञान कथा असल्यासारखे विचारकरणार नाहीत. मला तुमच्याकडून ठोस कृती हवी आहे, तुमच्या कल्पना नाही. पुढे, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, जे पुढीलप्रमाणे आहेत:

१. जर तू खरोखरच सेवेकरी असशील, तर कोणतीही हलगर्जी किंवा नकारात्मकतेशिवाय तू माझी सेवा निष्ठेने करू शकतोस का?

२. जर तुला असे आढळले, की मी तुझे कधीही कौतुक केले नाही, तरीही तू आयुष्यभर माझी सेवा करत राहशील का?

३. जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही मी तुझ्यासाठी काहीच केले नाही, तर तू माझ्यासाठी अस्पष्टतेत काम करणे सुरू ठेवू शकशील का?

४. जर तू माझ्यासाठी खर्च केल्यानंतर, मी तुझ्या क्षुल्लक मागण्या पूर्ण केल्या नाहीस, तर तू माझ्याबद्दल निराश आणि हताश होशील का किंवा अगदी रागावून शिवीगाळ करशील का?

५. जर तू नेहमीच खूप निष्ठावान राहिला असशील, माझ्यावर खूप प्रेम करत असशील, तरीही तू आजारपण, दारिद्र्य व तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या त्यागाचा त्रास सहन करत असशील अथवा जीवनात इतर कोणतेही दुर्दैव सहन करत असशील, तर तुझी निष्ठा व प्रेम माझ्यासाठी अजूनही तसेच राहील का?

६. जर तू तुझ्या हृदयात केलेल्या कल्पना मी केलेल्या गोष्टींशी जुळत नसतील, तर तू तुझ्या भावी मार्गावर कसा चालशील?

७. जर तुला अपेक्षित असलेल्या कोणत्याही गोष्टी मिळाल्या नाहीत, तरीही तू माझा अनुयायी राहशील का?

८. जर तुला माझ्या कार्याचा उद्देश आणि महत्त्व कधीच समजले नसेल, तर तू आज्ञाधारक व्यक्ती होऊ शकतोस का जो स्वैरपणे निर्णय घेत नाही व निष्कर्ष काढत नाही?

९. मी सांगितलेली सर्व वचने आणि मी मानवजातीसोबत एकत्र असताना केलेले सर्व कार्य तू सांभाळून ठेवू शकतोस का?

१०. जरी तुला काहीही मिळाले नाही, तरीही तू माझा एकनिष्ठ अनुयायी होऊ शकतोस का, माझ्यासाठी आयुष्यभर दुःख सहन करण्यास तयार आहेस का?

११. माझ्यासाठी, तू तुझ्या भविष्यातील जगण्याच्या मार्गाचा विचार, नियोजन किंवा तयारी करणे सोडून देऊ शकतोस का?

हे प्रश्न मला तुमच्याकडून असलेल्या शेवटच्या आवश्यकता दर्शवतात व मला आशा आहे, की तुम्ही सर्व मला उत्तरे देऊ शकाल. हे प्रश्न तुला विचारत असलेल्या एक किंवा दोन गोष्टी तू पूर्ण केल्या असतील, तर तू प्रयत्नशील राहायला हवेस. जर तू यापैकी एकही आवश्यकता पूर्ण करू शकत नसशील, तर तू निश्चितच अशा प्रकारचा व्यक्ती आहेस ज्यांना नरकात टाकले जाईल. अशा लोकांसाठी, मला अधिक काही सांगण्याची गरज नाही, कारण ते नक्कीच माझ्याशी सहमत होऊ शकणारे लोक नाहीत. कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासघात करू शकणाऱ्या व्यक्तीला मी माझ्या घरात कसे ठेवू शकतो? जे अजूनही कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासघात करू शकतात, मी इतर व्यवस्था करण्यापूर्वी त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करेन. तथापि, कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वासघात करण्यास सक्षम असलेल्या सर्व लोकांना मी कधीही विसरणार नाही; मी त्यांना माझ्या हृदयात लक्षात ठेवेन आणि त्यांच्या वाईट कृत्यांची परतफेड करण्याच्या संधीची वाट पाहेन. मी मांडलेल्या आवश्यकता या सर्व अशा समस्या आहेत ज्या तुम्ही स्वतःमध्ये तपासल्या पाहिजेत. मला आशा आहे, की तुम्ही सर्वजण त्यांचा गांभीर्याने विचार कराल व माझ्याशी बेफिकीरपणे वागणार नाही. नजीकच्या भविष्यात, मी माझ्या आवश्यकतांनुसार तुम्ही मला दिलेली उत्तरे तपासेन. तोपर्यंत, मला तुमच्याकडून आणखी कशाचीही आवश्यकता नाही आणि तुम्हाला अधिक कळकळीची सूचना देणार नाही. त्याऐवजी, मी माझा अधिकार वापरेन. ज्यांना ठेवले पाहिजे त्यांना ठेवले जाईल, ज्यांना पुरस्कार द्यायला हवे त्यांना पुरस्कृत केले जाईल, ज्यांना सैतानाच्या स्वाधीन केले पाहिजे ते सैतानाच्या स्वाधीन केले जातील, ज्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल व ज्यांचा नाश झाला पाहिजे त्यांचा नाश केला जाईल. अशा प्रकारे, माझ्या दिवसात मला त्रास देणारे कोणीही राहणार नाही. माझ्या वचनांवर तुझा विश्वास आहे का? तुझा प्रतिशोधावर विश्वास आहे का? मला फसवणाऱ्या आणि विश्वासघात करणाऱ्या सर्व दुष्टांना मी शिक्षा करेन यावर तुझा विश्वास आहे का? तो दिवस लवकर येण्याची किंवा नंतर येण्याची तुला आशा आहे का? तू शिक्षेची भीती वाटणारा आहेस की शिक्षा भोगावी लागली तर मला विरोध करणारा आहेस? जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा तू आनंदी आणि हसून जगशील की रडून दात खात राहाशील, याची तू कल्पना करू शकतोस का? तुला कोणत्या प्रकारचा शेवट लाभण्याची आशा आहे? तुझा माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे की माझ्यावर शंभर टक्के संशय आहे, याचा तू कधी गांभीर्याने विचार केला आहेस का? तुझ्या कृती व वर्तणुकीमुळे तुझ्यावर कोणत्या प्रकारचे प्रभाव आणि परिणाम होतील याचा तू कधी काळजीपूर्वक विचार केला आहेस का? माझी सर्व वचने आलटून पालटून पूर्ण होतील अशी तुला खरोखर आशा आहे की माझी वचने शेवटी पूर्ण होतीलच अशी तुला भीती आहे? माझी वचने पूर्ण करण्यासाठी मी लवकरच निघून जाईन अशी तुला आशा असेल, तर तू तुझ्या स्वतःच्या शब्दांशी आणि कृतींशी कसे वागले पाहिजेस? जर तुला माझ्या जाण्याची आशा नसेल व माझी सर्व वचने त्वरित पूर्ण होतील अशी आशा नसेल तर तू माझ्यावर विश्वास तरी का ठेवतोस? तू माझे अनुसरण का करत आहेस हे तुला खरोखर माहीत आहे का? जर तुला केवळ तुझी क्षितिजे रुंदावायची असतील, तर तुला स्वतःला त्रास देण्याची गरज नाही. जर आशीर्वाद घ्यायचे असतील व येणार्‍या आपत्तीपासून दूर राहायचे असेल, तर तुला स्वतःच्या आचरणाची काळजी का नाही? तू माझ्या आवश्यकता पूर्ण करू शकतोस की नाही हे तू स्वतःला का विचारत नाहीस? तू येणारे आशीर्वाद घेण्यास पात्र आहेस का हेदेखील तू स्वतःला का विचारत नाहीस?

मागील:  एक अतिशय गंभीर समस्या: विश्वासघात (१)

पुढील:  तुम्ही तुमच्या कृत्यांचा विचार केला पाहिजे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger