देवाच्या वचनाने सर्व काही साध्य होते
देव वेगवेगळ्या युगांनुसार त्याची वचने उच्चारतो आणि त्याचे कार्य करतो व वेगवेगळ्या युगांमध्ये, तो वेगवेगळी वचने उच्चारतो. देव नियमांचे पालन करत नाही किंवा त्याच कार्याची पुनरावृत्ती करत नाही अथवा त्याला भूतकाळातील गोष्टींबद्दल ओढ वाटत नाही; तो असा देव आहे जो नेहमी नवीन नसतो आणि कधीही जुना नसतो व तो दररोज नवीन वचने उच्चारतो. तू आज ज्याचे पालन केले पाहिजेस ते आजच केले पाहिजेस; ही मनुष्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. सध्याच्या काळात देवाच्या प्रकाशात आणि वचनांभोवती आचरण केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. देव नियमांचे पालन करत नाही व त्याचे शहाणपण आणि सर्वशक्तिमानत्व स्पष्ट करण्यासाठी तो अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलण्यास सक्षम आहे. तो आत्म्याच्या दृष्टिकोनातून बोलत असो किंवा मनुष्याच्या अथवा तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बोलत असो यामुळे काही फरक पडत नाही—देव नेहमी देव असतो आणि तो मनुष्याच्या दृष्टिकोनातून बोलत असल्यामुळे तो देव नाही असे तू म्हणू शकत नाहीस. देव वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलत असल्यामुळे, काही लोकांमध्ये धारणा निर्माण झाल्या आहेत. अशा लोकांना देवाचे आणि त्याच्या कार्याचे ज्ञान नसते. जर देव नेहमी एका दृष्टिकोनातून बोलत असता, तर मनुष्याने देवाबद्दल नियम घातले नसते का? देव मनुष्याला अशा प्रकारे वागण्याची परवानगी देऊ शकतो का? देव कोणत्याही दृष्टिकोनातून बोलत असला तरी, त्याच्याकडे असे करण्याची कारणे आहेत. जर देव नेहमी आत्म्याच्या दृष्टिकोनातून बोलत असेल, तर तू त्याच्याशी संलग्न होऊ शकशील का? अशा प्रकारे, तुला त्याची वचने पुरवण्यासाठी आणि वास्तविकतेत मार्गदर्शन करण्यासाठी, तो काही वेळा तृतीय पुरुषी संबोधनात बोलतो. देव जे काही करतो ते योग्य आहे. थोडक्यात, हे सर्व देवाने केले आहे व तू याबद्दल शंका घेऊ नयेस. तो देव आहे आणि अशा प्रकारे तो कोणत्याही दृष्टिकोनातून बोलत असला तरी तो नेहमीच देव असेल. हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे. त्याने कार्य कसेही केले तरीही तो देवच आहे आणि त्याचे मूलतत्त्व बदलणार नाही! पेत्राचे देवावर इतके प्रेम होते व तो देवाच्या हृदयाशी अनुकूल असलेला मनुष्य होता, परंतु देवाने त्याला प्रभू किंवा ख्रिस्त म्हणून पाहिले नाही, कारण ते एखाद्याच्या अस्तित्वाचे मूलतत्त्व असते आणि ते कधीही बदलू शकत नाही. देव त्याच्या कार्यात नियमांचे पालन करत नाही, परंतु त्याचे कार्य प्रभावी करण्यासाठी आणि त्याच्याबद्दलचे मनुष्याचे ज्ञान वाढवण्यासाठी विविध पद्धती वापरतो. त्याची प्रत्येक कार्यपद्धत त्याला ओळखण्यात मनुष्याला मदत करते व मनुष्याला परिपूर्ण बनवते. तो कोणती कार्यपद्धती वापरतो हे महत्त्वाचे नाही, प्रत्येक पद्धत मनुष्याला घडवण्यासाठी आणि मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी असते. जरी त्याची एखादी कार्यपद्धत खूप काळ चाललेली असू शकेल तरी, हे मनुष्याची त्याच्यावर श्रद्धा राहण्यासाठी आहे. त्यामुळे तुमच्या अंतःकरणात शंका नसावी. हे सर्व देवाच्या कार्याचे टप्पे आहेत आणि तुम्ही त्यांचे पालन केले पाहिजे.
आज जे बोलले जाते ते वास्तविकतेमध्ये प्रवेश करणे आहे—स्वर्गात जाणे किंवा राजे म्हणून राज्य करणे नाही; जे काही बोलले जाते ते वास्तविकतेत प्रवेश करण्याचा पाठपुरावा आहे. यापेक्षा व्यावहारिक दुसरा कोणताही पाठपुरावा नाही आणि राजे म्हणून राज्य करण्याची चर्चा ही व्यावहारिक नाही. मनुष्याला प्रचंड कुतूहल आहे व तो आजही देवाच्या कार्याचे मूल्यमापन त्याच्या धार्मिक धारणांनी करतो. देवाच्या अनेक कार्यपद्धतींचा अनुभव घेतल्यानंतर, मनुष्याला अजूनही देवाचे कार्य माहीत नाही, तरीही तो संकेत आणि चमत्कार शोधतो व तरीही देवाच्या वचनांची पूर्तता झाली की नाही हे पाहतो. हे विलक्षण अज्ञान नाही का? देवाच्या वचनांची पूर्तता झाल्याशिवाय, तो देव आहे यावर तू अजूनही विश्वास ठेवशील का? आज, चर्चमधील असे बरेच लोक संकेत आणि चमत्कार पाहण्याची वाट पाहत आहेत. ते म्हणतात, की जर देवाच्या वचनांची पूर्तता झाली तर तो देव आहे; जर देवाच्या वचनांची पूर्तता झाली नाही तर तो देव नाही. मग, तू देवाच्या वचनांच्या पूर्ततेमुळे त्याच्यावर विश्वास ठेवतोस की तो स्वतः देव आहे म्हणून विश्वास ठेवतोस? देवावर विश्वास ठेवण्याचा मनुष्याचा दृष्टिकोन योग्य असलाच पाहिजे! जेव्हा तू पाहतोस की देवाच्या वचनांची पूर्तता झालेली नाही, तेव्हा तू पळ काढतोस—हा देवावरील विश्वास आहे का? जेव्हा तू देवावर विश्वास ठेवतोस, तेव्हा तू सर्व काही देवाच्या दयेवर सोडूनच देवाच्या सर्व कार्यांचे पालन केले पाहिजेस. जुन्या करारामध्ये देवाने बरीच वचने उच्चारली आहेत—त्यापैकी तू स्वतःच्या डोळ्यांनी कोणत्या वचनांची पूर्तता होताना पाहिली आहेस? तू असे म्हणू शकतोस का, की यहोवा खरा देव नाही कारण तू त्याला पाहिले नाहीस? जरी बऱ्याच वचनांची पूर्तता झालेली असू शकेल तरी देखील, मनुष्य ते स्पष्टपणे पाहण्यास असमर्थ आहे कारण मनुष्याकडे सत्य नाही आणि त्याला काहीच समजत नाही. काहींना देवाच्या वचनांची पूर्तता झालेली नाही असे वाटते, तेव्हा ते पळून जाऊ इच्छितात. हे करून पहा. तू पळून जाऊ शकतोस का ते पहा. पळून गेल्यानंतरही तू परत येशीलच. देव तुला त्याच्या वचनांनी नियंत्रित करतो आणि जर तू चर्च व देवाचे वचन सोडलेस तर जगण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही. जर तुझा यावर विश्वास नसेल, तर स्वतः प्रयत्न करून पहा—तुला वाटते का, की तू असेच निघून जाऊ शकतोस? देवाचा आत्मा तुला नियंत्रित करतो. तू जाऊ शकत नाहीस. हा देवाचा प्रशासकीय आदेश आहे! काही लोकांना प्रयत्न करून पाहायचे असतील तर ते करू शकतात! तू म्हणतोस, की ही व्यक्ती देव नाही, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाप कर आणि तो काय करतो ते पहा. हे शक्य आहे, की तुझा देह मरणार नाही आणि तुझ्याकडे अन्नवस्त्रही असेल, परंतु मानसिकदृष्ट्या ते असह्य असेल; तुला तणाव आणि त्रास जाणवेल; यापेक्षा अधिक वेदनादायक काहीही नसेल. मनुष्य मानसिक यातना आणि विध्वंस सहन करू शकत नाही—कदाचित तू देहाचे दुःख सहन करण्यास सक्षम असशील, परंतु तू मानसिक तणाव व दीर्घकाळच्या यातना सहन करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेस. आज, काही लोक नकारात्मक होतात, कारण त्यांना कोणतेही संकेत आणि चमत्कार दिसत नाहीत, तरी सुद्धा, त्यांना कितीही नकारात्मक वाटले तरी कोणी पळून जाण्याचे धाडस करत नाही, कारण देव त्याच्या वचनाने मनुष्यावर नियंत्रण ठेवतो. कोणतीही वस्तुस्थिती समोर आली नसतानाही, कोणीही पळून जाऊ शकत नाही. या देवाच्या कृती नाहीत का? आज मनुष्याला जीवन देण्यासाठी देव पृथ्वीवर आला आहे. लोकांच्या कल्पनेप्रमाणे तो देव आणि मनुष्य यांच्यात शांतीपूर्ण नातेसंबंध सुनिश्चित करण्यासाठी संकेत व चमत्कार दाखवून तुला लाडीगोडी लावत नाही. ज्यांची जीवनावर एकाग्रता नाही आणि त्याऐवजी जे देवाकडून संकेत व चमत्कार घडवले जाण्यावर लक्ष केंद्रित करतात ते सर्व परुशी आहेत! आणि परुश्यांनीच येशूला वधस्तंभावर खिळले. जर तू देवावर विश्वास ठेवण्याच्या तुझ्या स्वतःच्या दृष्टिकोनानुसार देवाचे मूल्यमापन केलेस, त्याच्या वचनांची पूर्तता झाली तरच देवावर विश्वास ठेवलास आणि पूर्तता नाही झाली तर संशय बाळगलास व देवाची निंदा केलीस, तर याचा अर्थ त्याला वधस्तंभावर खिळले असा होत नाही का? असे लोक त्यांच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतात आणि लोभीपणाने आरामात मौजमजा करत राहतात!
एकीकडे, मनुष्याची सर्वात मोठी समस्या ही आहे, की त्याला देवाचे कार्य माहीत नाही. जरी मनुष्याची वृत्ती नाकारण्याची नसली तरी ती संशयाची आहे. मनुष्य नाकारत नाही, पण तो पूर्णपणे मान्यही करत नाही. जर लोकांना देवाच्या कार्याचे सखोल ज्ञान असेल, तर ते पळून जाणार नाहीत. दुसरी अडचण अशी आहे, की मनुष्याला वास्तविकता काय आहे ते कळत नाही. आज, प्रत्येक व्यक्ती देवाच्या वचनात गुंतलेली आहे; खरोखरच, भविष्यात, तू संकेत आणि चमत्कार पाहण्याचा विचार करू नये. मी तुला स्पष्टपणे सांगत आहे: सध्याच्या टप्प्यादरम्यान, तू फक्त देवाची वचने पाहण्याइतकाच सक्षम आहेस आणि सत्य बाबी नसल्या तरीही, मनुष्यामध्ये अजूनही देवाचा वास राहू शकतो. हेच सहस्राब्दी राज्याचे मुख्य कार्य आहे आणि जर तू हे कार्य ओळखू शकला नाहीस, तर तू अशक्त होऊन खाली पडशील; तुम्ही कसोट्यांमध्ये खाली उतरशील व अधिकच दुःखदायी म्हणजे सैतान तुला आणखी घट्टपणे जखडून ठेवेल. देव मुख्यतः त्याची वचने उच्चारण्यासाठी पृथ्वीवर आला आहे; तू ज्यामध्ये गुंततोस ते देवाचे वचन आहे, तू जे पाहतोस ते देवाचे वचन आहे, जे ऐकतोस ते देवाचे वचन आहे, जे पाळतोस ते देवाचे वचन आहे, जे अनुभवतोस ते देवाचे वचन आहे आणि हा देहधारी देव मुख्यतः मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी देवाचे वचन वापरतो. तो संकेत आणि चमत्कार दाखवत नाही व विशेषतः येशूने भूतकाळात केले ते कार्य करत नाही. जरी ते देव असले आणि दोन्ही देहधारी असले, तरीही त्यांचे सेवाकार्य समान नाही. जेव्हा येशू आला, तेव्हा त्यानेदेखील देवाचे काही कार्य केले आणि काही वचने उच्चारली—परंतु त्याने पूर्ण केलेले मुख्य कार्य कोणते होते? त्याने प्रामुख्याने वधस्तंभावर खिळण्याचे कार्य केले. वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि सर्व मानवजातीची सुटका करण्यासाठी तो पापी देहाचे प्रतिरूप बनला व सर्व मानवजातीच्या पापांसाठी त्याने पापार्पण केले. हे त्याने पूर्ण केलेले मुख्य कार्य आहे. शेवटी, नंतर आलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याने वधस्तंभाचा मार्ग प्रदान केला. जेव्हा येशू आला, तेव्हा तो मुख्यतः सुटकेचे कार्य पूर्ण करण्यासाठी आला होता. त्याने सर्व मानवजातीची सुटका केली आणि मनुष्याकडे स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता आणली व त्याशिवाय, त्याने स्वर्गाच्या राज्याचा मार्ग पुढे आणला. परिणामी, नंतर आलेल्या सर्वांनी सांगितले, “तुम्ही वधस्तंभाच्या मार्गाने चालले पाहिजे आणि वधस्तंभासाठी स्वतःचे बलिदान दिले पाहिजे.” अर्थात, सुरुवातीला, येशूने इतर काही कार्यदेखील केले आणि मनुष्याने पश्चात्ताप करून त्याच्या पापांची कबुली द्यावी यासाठी काही वचने उच्चारली. पण त्याचे सेवाकार्य वधस्तंभावर खिळण्याचेच होते आणि त्याने उपदेश करण्यात जी साडेतीन वर्षे व्यतीत केली ती नंतर वधस्तंभावर खिळण्याच्या तयारीसाठी होती. येशूने अनेक वेळा प्रार्थना केली तीदेखील वधस्तंभावर खिळण्यासाठी होती. त्याने जे सामान्य मनुष्याप्रमाणे आयुष्य जगले आणि तो जी साडेतेहत्तीस वर्षे पृथ्वीवर राहिला ती प्रामुख्याने वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठीच होती; त्यांना हे कार्य हाती घेण्याचे सामर्थ्य त्याला द्यायचे होते, ज्याचा परिणाम म्हणून देवाने त्याच्यावर वधस्तंभावर खिळण्याचे कार्य सोपवले. देहधारी देव आज कोणते कार्य पूर्ण करेल? आज, देवाने देह धारण केला आहे तो मुख्यतः “देहात प्रकट होणारे वचन” हे कार्य पूर्ण करण्यासाठी, वचनांच्या वापराने मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी आणि मनुष्याने वचनाला सामोरे जावे व वचनाचे शुद्धीकरण स्वीकारावे यासाठी. त्याच्या वचनांमधून, तो तुला तरतूद मिळवून देतो आणि जीवन मिळवून देतो; त्याच्या वचनांमध्ये, तुला त्याचे कार्य व कृती दिसते. देव तुझे ताडण करण्यासाठी आणि परिष्करण करण्यासाठी वचन वापरतो व अशा प्रकारे, जर तुला त्रास होत असेल तर ते देवाच्या वचनामुळेदेखील आहे. आज, देव तथ्यांसह नाही तर वचनांसह कार्य करतो. त्याचे वचन तुझ्यापर्यंत आल्यानंतरच पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्य करू शकतो आणि तुला वेदना सहन करण्यास किंवा चांगले वाटण्यास भाग पाडू शकतो. केवळ देवाचे वचनच तुला वास्तविकतेत आणू शकते आणि केवळ देवाचे वचनच तुला परिपूर्ण बनवण्यास सक्षम आहे. आणि म्हणून, किमान तू हे तरी समजून घेतलेच पाहिजेस: शेवटच्या दिवसांत देवाने केलेले कार्य म्हणजे मुख्यतः त्याचे वचन वापरून प्रत्येक व्यक्तीला परिपूर्ण बनवणे आणि मनुष्याला मार्गदर्शन करणे. तो जे काही कार्य करतो ते वचनाद्वारे करतो; तो तुझे ताडण करण्यासाठी तथ्ये वापरत नाही. काही वेळा, काही लोक देवाला विरोध करतात. देव तुला फार त्रास देत नाही, देहाचे ताडण करत नाही किंवा तुला दुःख होत नाही—परंतु त्याचे वचन तुझ्यापर्यंत येते तेव्हा आणि तुझे परिष्करण करते तेव्हा, ते तुझ्यासाठी असह्य असते. नाही का? सेवेकर्यांच्या काळात, देवाने मनुष्याला अथांग डोहात टाकण्यास सांगितले. मनुष्य खरोखरच अथांग डोहात आला का? मनुष्याला परिष्कृत करण्यासाठी वचनांचा वापर करून, मनुष्य अथांग डोहात शिरला. आणि म्हणूनच, शेवटच्या दिवसांत, जेव्हा देव देह धारण करतो, तेव्हा तो मुख्यतः सर्व काही साध्य करण्यासाठी व सर्व स्पष्ट करण्यासाठी वचन वापरतो. तो काय आहे हे तू फक्त त्याच्या वचनांमध्ये पाहू शकतोस; तो स्वतः देव आहे हे तू फक्त त्याच्या वचनांमध्ये पाहू शकतोस. जेव्हा देहधारी देव पृथ्वीवर अवतरतो, तेव्हा तो वचने उच्चारण्याशिवाय दुसरे कोणतेही कार्य करत नाही—त्यामुळे तथ्यांची आवश्यकता नसते; वचने पुरेशी असतात. कारण तो मुख्यतः, मनुष्याला त्याच्या वचनांमध्ये त्याची शक्ती आणि वर्चस्व पाहण्याची परवानगी देणे, मनुष्याला त्याच्या वचनांमधून तो नम्रपणे स्वतःला कसा लपवतो हे पाहण्याची परवानगी देणे आणि मनुष्याला त्याच्या वचनांमध्ये त्याचे संपूर्णत्व जाणून घेण्याची परवानगी देणे हे कार्य करण्यासाठी आला आहे. त्याच्याकडे जे काही आहे आणि तो जे काही आहे ते सर्व त्याच्या वचनांमध्ये आहे. त्याचे शहाणपण आणि अद्भुतता त्याच्या वचनांमध्ये आहे. यामध्ये, तुला अनेक पद्धती पहायला मिळतात ज्याद्वारे देव त्याची वचने उच्चारतो. या सर्व काळात देवाचे बहुतेक कार्य हे तरतूद, प्रकटीकरण आणि मनुष्याशी व्यवहार करणे हे आहे. तो एखाद्या व्यक्तीला सहजासहजी शाप देत नाही आणि त्याने जरी शाप दिला तरी तो वचनांद्वारेच देतो. आणि म्हणून, देहधारी देवाच्या या युगात, देवाने आजारी लोकांना बरे केले व भुते काढली हे पाहण्याचा प्रयत्न करू नका आणि सतत संकेत शोधणे थांबवा—याला काहीही अर्थ नाही! ते संकेत मनुष्याला परिपूर्ण बनवू शकत नाहीत! स्पष्टपणे बोलायचे झाले तर: आज, खरा देहधारी देव स्वतः कार्य करत नाही; तो फक्त बोलतो. हे सत्य आहे! तो तुला परिपूर्ण बनवण्यासाठी वचने वापरतो आणि तुला अन्न व पाणी देण्यासाठी वचने वापरतो. तो कार्य करण्यासाठीदेखील वचने वापरतो आणि तुला त्याची वास्तविकता कळवण्यासाठी, तो तथ्यांच्या जागी वचने वापरतो. जर तू देवाच्या कार्याची ही पद्धत जाणून घेण्यास सक्षम असशील, तर नकारात्मक राहणे कठीण आहे. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तू फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजेस—म्हणजेच, देवाची वचने पूर्ण होवोत किंवा न होवोत अथवा त्यामध्ये तथ्य असोत किंवा नसोत, देव त्याच्या वचनांमधून जीवन प्राप्त करण्यासाठी मनुष्याला घडवतो आणि हा सर्व संकेतांमध्ये सर्वात मोठा संकेत आहे; व त्याहीपेक्षा, हे एक निर्विवाद सत्य आहे. देवाला जाणून घेण्याचा हा सर्वोत्तम पुरावा आहे आणि हा कोणत्याही संकेतांपेक्षाही मोठा संकेत आहे. फक्त ही वचने मनुष्याला परिपूर्ण बनवू शकतात.
राज्याचे युग सुरू होताच, देवाने त्याची वचने प्रकट करण्यास सुरुवात केली. भविष्यात, ही वचने हळूहळू पूर्ण होतील आणि त्या वेळी, मनुष्याचे जीवन प्रगल्भ होईल. मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती उघड करण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर अधिक वास्तविक आणि अधिक आवश्यक आहे व मनुष्याचा विश्वास परिपूर्ण करण्यासाठी तो त्याचे कार्य करण्यास वचनाशिवाय काहीही वापरत नाही, कारण आज वचनाचे युग आहे आणि त्यासाठी मनुष्याची श्रद्धा, संकल्प व सहकार्य आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांमधील देहधारी देवाचे कार्य म्हणजे त्याच्या वचनाचा वापर करून मनुष्याची सेवा करणे आणि त्यांच्यासाठी कार्य करणे आहे. देहधारी देवाने त्याची वचने उच्चारणे पूर्ण केल्यावरच त्यांची पूर्तता होते. त्याची वचने, त्याने उच्चारलेल्या काळात पूर्ण होत नाहीत, कारण जेव्हा तो देहधारी असतो तेव्हा त्याच्या वचनांची पूर्तता होऊ शकत नाही. हे यासाठी, की देव हा देह आहे, आत्मा नाही हे मनुष्याला समजावे; जेणेकरून, मनुष्याला स्वतःच्या डोळ्यांनी देवाची वास्तविकता पाहता येईल. ज्या दिवशी त्याचे कार्य पूर्ण होईल, जेव्हा पृथ्वीवर त्याच्याकडून उच्चारली जावीत अशी सर्व वचने उच्चारली जातील, तेव्हा त्याच्या वचनांची पूर्तता सुरू होईल. सध्या, देवाच्या वचनांच्या पूर्ततेचे युग नाही, कारण त्याने अद्याप त्याची वचने उच्चारणे पूर्ण केलेले नाही. म्हणून, जेव्हा तू पाहतोस, की देव अजूनही पृथ्वीवर त्याची वचने उच्चारत आहे, तेव्हा त्याच्या वचनांच्या पूर्ततेची वाट पाहू नकोस; जेव्हा देव त्याची वचने उच्चारणे थांबवतो आणि जेव्हा त्याचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होते, तेव्हा त्याच्या वचनांची पूर्तता होण्यास सुरुवात होईल. तो पृथ्वीवर उच्चारत असलेल्या वचनांमध्ये, एका बाबतीत, जीवनाची तरतूद आहे आणि दुसर्या बाबतीत, भविष्यवाणी आहे—ज्या गोष्टी पुढे येणार आहेत, ज्या गोष्टी केल्या जातील व भविष्यातील ज्या गोष्टींची पूर्तता करणे अजून बाकी आहे अशा गोष्टींची भविष्यवाणी. येशूच्या वचनांमध्येदेखील भविष्यवाणी होती. एका बाबतीत, त्याने जीवन दिले आणि दुसऱ्या बाबतीत, त्याने भविष्यवाणी केली. आज, एकाच वेळी वचने आणि तथ्ये पार पाडण्याची चर्चा होत नाही कारण मनुष्याच्या स्वतःच्या डोळ्यांना दिसू शकणारे आणि देवाने केलेले कार्य यामध्ये खूप फरक आहे. केवळ असे म्हणता येऊ शकेल की, एकदा देवाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर, त्याच्या वचनांची पूर्तता होईल आणि वचनांनंतर तथ्ये समोर येतील. शेवटच्या दिवसांत, देहधारी देव पृथ्वीवर वचनाचे सेवाकार्य करतो आणि वचनाचे सेवाकार्य करताना, तो फक्त वचने उच्चारतो व इतर गोष्टींची पर्वा करत नाही. देवाचे कार्य बदलले की त्याच्या वचनांची पूर्तता होण्यास सुरुवात होते. आज, तुला परिपूर्ण बनवण्यासाठी सर्वप्रथम वचनांचा वापर केला जातो; जेव्हा त्याला संपूर्ण विश्वात गौरव प्राप्त होईल, तेव्हा त्याचे कार्य पूर्ण होईल—जी वचने उच्चारली पाहिजेत ती सर्व उच्चारली जातील आणि सर्व वचने सत्य बनतील. देव शेवटच्या दिवसांत वचनाच्या सेवेचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आला आहे जेणेकरून, मानवजात त्याला ओळखू शकेल आणि जेणेकरून मानवजातीला तो काय आहे ते पाहता येईल व त्याचे शहाणपण आणि त्याची सर्व आश्चर्यकारक कृत्ये त्याच्या वचनातून पाहता येऊ शकतील. राज्याच्या युगात, देव मुख्यतः सर्व मानवजातीवर विजय मिळवण्यासाठी वचन वापरतो. भविष्यात, त्याचे वचन प्रत्येक धर्म, क्षेत्र, राष्ट्र आणि संप्रदायापर्यंतदेखील येईल. देव विजय प्राप्त करण्यासाठी, त्याच्या वचनात अधिकार आणि सामर्थ्य आहे हे सर्व मनुष्यांना दाखवण्यासाठी, वचन वापरतो—आणि म्हणून आज, तुम्हाला फक्त देवाच्या वचनाला सामोरे जावे लागते.
या युगात देवाने उच्चारलेली वचने नियमशास्त्राच्या युगात उच्चारलेल्या वचनांपेक्षा वेगळी आहेत आणि म्हणूनच, ती कृपेच्या युगात उच्चारलेल्या वचनांपेक्षा सुद्धा वेगळी आहेत. कृपेच्या युगात, देवाने वचनाचे कार्य केले नाही, परंतु सर्व मानवजातीची सुटका करण्यासाठी केवळ वधस्तंभावर खिळण्याचे वर्णन केले. बायबलमध्ये फक्त येशूला वधस्तंभावर का खिळले जावे आणि त्याला वधस्तंभावर कोणते दुःख सहन करावे लागले आणि देवासाठी मनुष्याला वधस्तंभावर कसे खिळले जावे याचे वर्णन केले आहे. त्या युगात, देवाने केलेले सर्व कार्य वधस्तंभावर केंद्रित होते. राज्याच्या युगात, देहधारी देव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी वचने उच्चारतो. हे “देहात प्रकट होणारे वचन” आहे; हे कार्य करण्यासाठी देव शेवटच्या दिवसांत आला आहे, म्हणजेच तो देहात प्रकट होणाऱ्या वचनाचे प्रत्यक्ष महत्त्व साध्य करण्यासाठी आला आहे. तो फक्त वचने उच्चारतो आणि त्यावेळी तथ्य क्वचितच दिसते. हे देहात वचन प्रकट होण्याचे मूलतत्त्व आहे आणि जेव्हा देहधारी देव त्याची वचने उच्चारतो, तेव्हा देहात प्रकट होणारे वचनाचे स्वरूप हेच आहे आणि देहात येणारे वचन आहे. “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, शब्द देही झाला” हे (देहात वचनाच्या प्रकटीकरणाचे कार्य) कार्य जे देव शेवटच्या दिवसांत पूर्ण करेल आणि हा त्याच्या संपूर्ण व्यवस्थापन योजनेचा अंतिम अध्याय आहे व म्हणून देवाला पृथ्वीवर येऊन त्याची वचने देहात प्रकट करावी लागतील. आज जे केले आहे, जे भविष्यात केले जाणार आहे, जे देवाद्वारे पूर्ण केले जाईल, मनुष्याचे अंतिम गंतव्यस्थान, ज्यांना तारले जाणार आहे, ज्यांचा नाश होणार आहे आणि असेच काही—हे सर्व कार्य जे शेवटी साध्य व्हायला हवे ते सर्व स्पष्टपणे सांगितले गेले आहे व हे सर्व देहात दिसणाऱ्या वचनाचे प्रत्यक्ष महत्त्व पूर्ण करण्याच्या दृष्टीने आहे. पूर्वी जारी केलेले प्रशासकीय आदेश आणि संविधान, जे नष्ट होतील, जे विश्रांती घेतील—ही सर्व वचने पूर्ण केलीच पाहिजेत. देहधारी देवाने शेवटच्या दिवसांत हे मुख्यतः पूर्ण केलेले कार्य आहे. तो लोकांना समजावून सांगतो, की देवाने पूर्वनियोजित केलेल्यांची जागा कोठे आहे आणि देवाने पूर्वनियोजित न केलेले कोठे आहेत, त्याचे लोक आणि पुत्र यांचे वर्गीकरण कसे केले जाईल, इस्रायलचे काय होईल, इजिप्तचे काय होईल—भविष्यात यातील प्रत्येक वचनाची पूर्तता केली जाईल. देवाच्या कार्याची गती वाढत आहे. प्रत्येक युगात काय करायचे आहे, देहधारी देवाद्वारे शेवटच्या दिवसांत काय करायचे आहे आणि त्याचे जे सेवाकार्य केले जाणार आहे, हे सांगण्यासाठी देव वचन वापरतो व ही सर्व वचने देहात प्रकट होणाऱ्या वचनाचे वास्तविक महत्त्व पूर्ण करण्यासाठी वापरली जातात.
मी पूर्वी असे म्हटले आहे, की “जे संकेत आणि चमत्कार पाहण्यावर लक्ष केंद्रित करतात त्या सर्वांना सोडून दिले जाईल; त्यांना परिपूर्ण केले जाणार नाही.” मी बरीच वचने उच्चारली आहेत, तरीही मनुष्याला या कार्याचे किंचितही ज्ञान नाही व या टप्प्यावर आल्यावरदेखील, लोक संकेत आणि चमत्कारांबद्दल विचारतात. तुझा देवावरील विश्वास हा संकेत आणि चमत्कारांचा पाठपुरावा करण्यापेक्षा अधिक काही नाही का किंवा तो जीवन प्राप्त करण्यासाठी आहे का? येशूने देखील पुष्कळ वचने उच्चारली आणि त्यापैकी काहींची पूर्तता अद्यापही व्हायची आहे. येशू देव नाही असे तू म्हणू शकतोस का? देवाने साक्ष दिली, की तो ख्रिस्त होता आणि देवाचा प्रिय पुत्र होता. हे तू नाकारू शकतोस का? आज, देव फक्त वचने उच्चारतो आणि जर तुला हे पूर्णपणे माहीत नसेल, तर तू स्थिर राहू शकत नाहीस. तो देव आहे म्हणून तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस, की त्याच्या वचनांची पूर्तता होते की नाही यावर आधारून तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस? तू संकेत आणि चमत्कारांवर विश्वास ठेवतोस की देवावर विश्वास ठेवतोस? आज, तो संकेत आणि चमत्कार दाखवत नाही—तो खरोखर देव आहे का? त्याने उच्चारलेली वचने पूर्ण होत नसतील, तर तो खरोखर देव आहे का? त्याने उच्चारलेल्या वचनांची पूर्तता होते की नाही यावर देवाचे मूलतत्त्व ठरते का? देवावर विश्वास ठेवण्याआधी काही लोक नेहमी देवाच्या वचनांच्या पूर्ततेची वाट का पाहत असतात? याचाच अर्थ ते त्याला ओळखत नाहीत असा होत नाही का? ज्यांच्याकडे अशा धारणा आहेत ते सर्व देवाला नाकारणारे आहेत. ते देवाचे मूल्यमापन करण्यासाठी धारणांचा वापर करतात; जर देवाच्या वचनांची पूर्तता झाली, तर ते त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि जर त्यांची पूर्तता झाली नाही, तर ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत; व ते नेहमी संकेत आणि चमत्कारांचा पाठपुरावा करतात. हे लोक आधुनिक काळातील परुशी नाहीत का? तू ठामपणे उभे राहण्यास सक्षम आहेस की नाही हे तू खऱ्या देवाला ओळखू शकतोस की नाही यावर अवलंबून आहे—हे महत्त्वाचे आहे! तुझ्यामध्ये देवाच्या वचनाची वास्तविकता जितकी जास्त असेल, तितकेच देवाच्या वास्तविकतेबद्दल तुझे ज्ञान जास्त असेल आणि परीक्षेच्या वेळी तू धीराने उभे राहण्यास सक्षम असशील. तू संकेत आणि चमत्कार पाहण्यावर जितके जास्त लक्ष केंद्रित करशील, तितके ठामपणे उभे राहण्यास असमर्थ असशील व परीक्षेच्या वेळी टिकणार नाही. संकेत आणि चमत्कार हा पाया नाही; फक्त देवाची वास्तविकता हेच जीवन आहे. काही लोकांना देवाच्या कार्यामुळे साध्य होणारे परिणाम माहीत नसतात. ते देवाच्या कार्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करता गोंधळात त्यांचे दिवस घालवतात. देवाने त्यांच्या इच्छा पूर्ण करणे हेच केवळ त्यांच्या पाठपुराव्याचे उद्दिष्ट असते आणि तेव्हाच ते गंभीरपणे विश्वास ठेवतात. ते म्हणतात, की जर देवाच्या वचनांची पूर्तता झाली तर ते जीवनाचा पाठपुरावा करतील, परंतु जर देवाच्या वचनांची पूर्तता झाली नाही तर त्यांनी जीवनाचा पाठपुरावा करण्याची कोणतीही शक्यता नसते. मनुष्याला वाटते, की देवावरील विश्वास म्हणजे संकेत आणि चमत्कार पाहण्याचा पाठपुरावा करणे व स्वर्ग आणि तिसऱ्या स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्यापैकी कोणीही असे म्हणत नाही, की त्यांचा देवावरील विश्वास म्हणजे वास्तविकतेत प्रवेश करणे, जीवनाचा पाठपुरावा करणे आणि देवाकडून प्राप्त केले जाण्याचा प्रयत्न करणे आहे. अशा पाठपुराव्याचे काय मूल्य आहे? जे देवाचे ज्ञान आणि देवाच्या समाधानाचा पाठपुरावा करत नाहीत, तेच देवावर विश्वास ठेवत नाहीत; तेच देवाची निंदा करतात!
आता देवावर विश्वास म्हणजे काय हे तुम्हाला समजले का? देवावर विश्वास ठेवण्याचा अर्थ संकेत आणि चमत्कार पाहणे असा होतो का? याचा अर्थ स्वर्गात जाणे असा होतो का? देवावर विश्वास ठेवणे बिलकुल सोपे नाही. त्या धार्मिक प्रथा शुद्ध केल्या पाहिजेत; आजारी लोकांना बरे करणे आणि सैतानांना बाहेर काढणे, संकेत व चमत्कारांवर लक्ष केंद्रित करणे, देवाच्या कृपेची, शांतीची आणि आनंदाची अधिक लालसा करणे, देहाच्या आशा व सुखसोयींचा पाठपुरावा करणे—या धार्मिक प्रथा आहेत आणि अशा धार्मिक प्रथा म्हणजे अस्पष्ट प्रकारचा विश्वास आहे. आज देवावर खरा विश्वास ठेवणे म्हणजे काय आहे? तर जीवनातील सत्य म्हणून देवाच्या वचनाचा स्वीकार करणे आणि त्याचे खरे प्रेम मिळवण्यासाठी त्याच्या वचनातून देवाला जाणून घेणे. स्पष्टपणे सांगायचे तर: देवावरील विश्वास म्हणजे तू देवाची आज्ञा पाळतोस, देवावर प्रेम करतोस आणि देवाद्वारे निर्मित जीवमात्राने केलेले कर्तव्य पार पाडतोस. देवावर विश्वास ठेवण्याचे हेच उद्दिष्ट आहे. तुला देवाच्या प्रेमाचे ज्ञान प्राप्त झालेच पाहिजे, देव किती आदरास पात्र आहे, देव त्याच्या निर्मितीमध्ये तारणाचे कार्य कसे करतो आणि त्यांना परिपूर्ण कसे बनवतो—देवावरील विश्वासाच्या या अगदी आवश्यक गोष्टी आहेत. देवावरील विश्वास म्हणजे मुख्यतः दैहिक जीवनापासून देवावरील प्रेमाच्या जीवनाकडे वळणे आहे; भ्रष्टाचारात जगण्यापासून ते देवाच्या वचनांच्या जीवनात जगण्याकडे वळणे आहे; हे सैतानाच्या नियंत्रणामधून बाहेर पडणे आहे आणि देवाच्या देखरेखीखाली व संरक्षणाखाली जगणे आहे; हे म्हणजे देहाची नव्हे, तर देवाची आज्ञाधारकता प्राप्त करण्यास सक्षम असणे आहे; हे देवाला तुझे संपूर्ण अंतःकरण प्राप्त करू देणे आहे, देवाला तुला परिपूर्ण बनवू देणे आहे आणि भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीपासून स्वतःला मुक्त करणे आहे. देवावर विश्वास मुख्यतः यासाठी आहे की, जेणेकरून, देवाची शक्ती आणि गौरव तुझ्यामध्ये प्रकट होऊ शकेल, जेणेकरून तू देवाची इच्छा पूर्ण करू शकशील व देवाची योजना पूर्ण करू शकशील आणि सैतानासमोर देवाची साक्ष देऊ शकशील. देवावरील विश्वास हा संकेत आणि चमत्कार पाहण्याच्या इच्छेभोवती फिरू नये किंवा तो वैयक्तिक देहाच्या फायद्यासाठी नसावा. तो देवाला जाणून घेण्याच्या प्रयत्नांबद्दल असावा आणि देवाची आज्ञा पाळण्यास सक्षम करण्यासाठी असावा व पेत्राप्रमाणे, मृत्यूपर्यंत देवाची आज्ञा पाळण्यासाठी असावा. ही देवावर विश्वास ठेवण्याची मुख्य उद्दिष्टे आहेत. देवाला ओळखण्यासाठी आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी, एखादी व्यक्ती देवाचे वचन सेवन आणि प्राशन करते. देवाच्या वचनाचे सेवन आणि प्राशन केल्यामुळे तुला देवाबाबत जास्त ज्ञान मिळते, त्यानंतरच तू त्याची आज्ञा पाळू शकतोस. केवळ देवाबद्दलच्या ज्ञानानेच तू त्याच्यावर प्रेम करू शकतोस आणि मनुष्याने याच उद्दिष्टाने देवावर विश्वास ठेवला पाहिजे. जर, देवावरील तुझ्या विश्वासामध्ये, नेहमी संकेत आणि चमत्कार पाहण्याचा प्रयत्न केला, तर देवावरील विश्वासाचा हा दृष्टिकोन चुकीचा आहे. देवावरील विश्वास हा मुख्यतः देवाच्या वचनाला जीवनाची वास्तविकता म्हणून स्वीकारणे आहे. देवाचे उद्दिष्ट केवळ त्याच्या मुखातून आलेली वचने आचरणात आणणे आणि ते तुमच्या स्वतःमध्ये रुजवणे हे आहे. देवावर विश्वास ठेवताना, मनुष्याने देवाद्वारे परिपूर्ण बनण्याचा, देवाच्या अधीन होण्याचा आणि देवाची संपूर्ण आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तू तक्रार न करता देवाची आज्ञा पाळू शकतोस, देवाच्या इच्छा लक्षात ठेवू शकतोस, पेत्राची पातळी प्राप्त करू शकतोस आणि देवाने सांगितलेली पेत्राची शैली मिळवू शकतोस, तर हे तेव्हाच होईल जेव्हा तू देवावर विश्वास ठेवण्यात यशस्वी होशील आणि हे सिद्ध होईल, की देवाने तुला प्राप्त केले आहे.
देव संपूर्ण विश्वात त्याचे कार्य करतो. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांनी त्याचे वचन स्वीकारले पाहिजे आणि त्याच्या वचनाचे सेवन व प्राशन केले पाहिजे; देवाने दाखवलेले संकेत आणि चमत्कार पाहून कोणीही देवाद्वारे प्राप्त केले जाऊ शकत नाही. युगानुयुगे, मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी देवाने नेहमीच वचन वापरले आहे. अशा प्रकारे, तुम्ही तुमचे सर्व लक्ष संकेत आणि चमत्कारांकडे न वळवता, देवाकडून परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नियमशास्त्राच्या जुन्या कराराच्या युगात, देवाने काही वचने उच्चारली आणि कृपेच्या युगात, येशूनेदेखील बरीच वचने उद्गारली. येशूने बरीच वचने उच्चारल्यानंतर, नंतरच्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी लोकांना येशूने जारी केलेल्या आज्ञांनुसार आचरण करण्यास प्रवृत्त केले व येशूने उच्चारलेल्या वचनांनुसार आणि तत्त्वांनुसार अनुभव घेतला. शेवटच्या दिवसांत, देव मुख्यतः मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी वचनाचा वापरत करतो. तो मनुष्यावर अत्याचार करण्यासाठी किंवा मनुष्याला पटवून देण्यासाठी संकेत आणि चमत्कारांचा वापर करत नाही; त्या चमत्कारांमधून देवाची शक्ती स्पष्ट होऊ शकत नाही. जर देवाने फक्त संकेत आणि चमत्कार दाखवले, तर देवाची वास्तविकता स्पष्ट करणे अशक्य होईल आणि त्यामुळे मनुष्याला परिपूर्ण बनवणे अशक्य होईल. देव संकेत आणि चमत्कारांद्वारे मनुष्याला परिपूर्ण बनवत नाही, परंतु मनुष्याला पाणी देण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी वचन वापरतो, ज्यानंतर मनुष्याची पूर्ण आज्ञाधारकता आणि मनुष्याला देवाविषयीचे ज्ञान प्राप्त होते. तो करत असलेल्या कार्याचे आणि तो उच्चारत असलेल्या वचनांचे हे उद्दिष्ट आहे. देव मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी संकेत आणि चमत्कार दाखवण्याची पद्धत वापरत नाही—तो वचने वापरतो आणि मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी विविध कार्यपद्धती वापरतो. परिष्करण, व्यवहार, छाटणी किंवा वचनांची तरतूद असो, देव मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आणि मनुष्याला देवाच्या कार्याचे, शहाणपणाचे व अद्भुततेचे अधिक ज्ञान देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलतो. जेव्हा देव शेवटच्या दिवसात युगाची समाप्ती करतो, तेव्हा मनुष्य परिपूर्ण होतो, तेव्हा तो संकेत आणि चमत्कार पाहण्यास पात्र होईल. जेव्हा तू देवाला ओळखतोस आणि त्याने काहीही केले तरी, देवाची आज्ञा पाळण्यास सक्षम होतोस, जेव्हा तू संकेत व चमत्कार पाहशील तेव्हा तुला त्याच्याबद्दल कोणत्याही धारणा राहणार नाहीत. या क्षणी, तू भ्रष्ट असतोस व देवाच्या संपूर्ण आज्ञापालनास असमर्थ असतोस—तू या स्थितीत संकेत आणि चमत्कार पाहण्यास पात्र आहेस असे वाटते का? जेव्हा देव मनुष्याला शिक्षा करतो व जेव्हा युग बदलते आणि शिवाय, जेव्हा युग समाप्त होते तेव्हाच देव मनुष्याला संकेत आणि चमत्कार दाखवतो. जेव्हा देवाचे कार्य सामान्यपणे केले जात असते तेव्हा तो संकेत आणि चमत्कार दाखवत नाही. त्याच्यासाठी, संकेत आणि चमत्कार दाखवणे हे हास्यापद वाटावे इतके साधे-सोपे आहे, पण देवाच्या कार्याचे ते तत्त्व नाही व देवाच्या मनुष्यासाठीच्या व्यवस्थापनाचे ते ध्येयच नाही. जर मनुष्याने संकेत आणि चमत्कार पाहिले, आणि देवाचे आत्मिक स्वरूप मनुष्यापुढे प्रकट व्हायचे असेल तर, सर्व लोक देवावर विश्वास ठेवणार नाहीत का? मी पूर्वी म्हटले आहे, की विजय मिळवणार्यांचा एक गट पूर्वेकडून प्राप्त होतो, जे मोठ्या संकटातून येतात. या वचनांचा अर्थ काय आहे? त्यांचा अर्थ असा आहे, की हे लोक ज्यांना न्याय आणि ताडण, आणि व्यवहार व छाटणी व सर्व प्रकारच्या परिष्करणानंतरच प्राप्त केले गेले आहे, त्यांनी खरोखरच आज्ञापालन केले. या लोकांचा विश्वास अस्पष्ट आणि अमूर्त नसून वास्तविक आहे. त्यांनी कोणतेही संकेत, चमत्कार किंवा कोणत्याही अद्भुत गोष्टी पहिल्या नाहीत; ते अस्पष्ट अक्षरे आणि सिद्धांत अथवा सखोल अंतर्दृष्टींबद्दल बोलत नाहीत; त्याऐवजी, त्यांच्याकडे वास्तविकता आहे आणि देवाची वचने आहेत व देवाच्या वास्तविकतेचे एक खरेखुरे ज्ञान आहे. असा हा गट देवाची शक्ती स्पष्ट करण्यास अधिक सक्षम नाही का? शेवटच्या दिवसांतील देवाचे कार्य हे खरे कार्य आहे. येशूच्या युगात, तो मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आला नव्हता, तर मनुष्याची सुटका करण्यासाठी आला होता आणि म्हणून त्याने काही चमत्कार दाखवले जेणेकरून, लोक त्याचे अनुसरण करतील. कारण तो मुख्यतः वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आला होता आणि संकेत दाखवणे हा त्याच्या सेवाकार्याचा भाग नव्हता. असे संकेत आणि चमत्कार हे असे कार्य होते की जे त्याचे कार्य प्रभावी करण्यासाठी केले गेले होते; ते अतिरिक्त कार्य होते व त्या कार्याने संपूर्ण युगाच्या कार्याचे प्रतिनिधित्व केलेले नाही. नियमशास्त्राच्या जुन्या कराराच्या युगात, देवाने काही संकेत आणि चमत्कारदेखील दाखवले—परंतु आज देव जे कार्य करतो आहे ते खरे कार्य आहे व तो आता निश्चितपणे संकेत आणि चमत्कार दाखवणार नाही. जर त्याने संकेत आणि चमत्कार दाखवले, तर त्याचे खरे कार्य अस्ताव्यस्त होईल व तो आणखी कोणतेही कार्य करू शकणार नाही. जर देवाने मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी वचन वापरले असे सांगितले, परंतु संकेत आणि चमत्कारदेखील दाखवले, तर मनुष्य खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही हे स्पष्ट केले जाऊ शकते का? त्यामुळे देव अशा गोष्टी करत नाही. मनुष्यामध्ये धर्माचे मोठे प्राबल्य आहे; शेवटच्या दिवसांत देव मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व धार्मिक धारणा आणि अलौकिक गोष्टी काढून टाकण्यासाठी व मनुष्याला देवाची वास्तविकता दाखवण्यासाठी आलेला आहे. तो अमूर्त आणि काल्पनिक असलेल्या देवाची प्रतिमा काढून टाकण्यासाठी आलेला आहे—दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, अशा देवाची प्रतिमा, ज्याचे कोणतेही अस्तित्व नाही. आणि म्हणूनच, आता फक्त एकच गोष्ट मौल्यवान आहे ती म्हणजे तुला वास्तविकतेचे ज्ञान असणे! सत्य इतर सर्व गोष्टींवर मात करते. आज तुझ्याकडे किती सत्य आहे? जे संकेत आणि चमत्कार दाखवते, ते सर्व देव आहे का? दुष्ट आत्मेदेखील संकेत आणि चमत्कार दाखवू शकतात; ते सर्व देव आहेत का? मनुष्याच्या देवावरील विश्वासामध्ये, संकेत आणि चमत्कारांपेक्षा, जे मनुष्य शोधतो ते सत्य आहे आणि तो ज्याचा पाठपुरावा करतो ते जीवन आहे. देवावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे हेच उद्दिष्ट असले पाहिजे.