राज्याचे युग म्हणजेच वचनाचे युग आहे

राज्याच्या युगात, नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी, देव ज्या माध्यमांद्वारे कार्य करतो त्यांमध्ये बदल करण्यासाठी आणि संपूर्ण युगाचे कार्य पूर्ण करण्यासाठी देव वचनांचा वापर करतो. वचनाच्या युगात देव याच तत्त्वानुसार कार्य करतो. त्याने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलण्यासाठी देह धारण केला जेणेकरून, ज्याचे वचन देहस्वरूपात प्रकट होत आहे असा देव मनुष्याला खरोखरच दिसेल आणि मनुष्य देवाचे ज्ञान व अद्भुतता पाहू शकेल. मनुष्यावर विजय मिळवणे, मनुष्याला परिपूर्ण करणे आणि मनुष्याला बाहेर काढून टाकणे ही उद्दिष्टे अधिक चांगल्या पद्धतीने साध्य करण्यासाठी असे कार्य केले जाते, वचनाच्या युगात कार्य करण्यासाठी वचनांचा वापर करण्याचा खरा अर्थ हाच आहे. या वचनांमधून, लोकांना देवाचे कार्य कळते, देवाची प्रवृत्ती कळते, मनुष्याच्या आयुष्याचे सार कळते आणि मनुष्याने कशात प्रवेश करायला हवा ते कळते. वचनाच्या युगात देवाला जे कार्य करायची इच्छा आहे ते वचनांमधून यशस्वीपणे पूर्ण होते. या वचनांमधून, काही लोकांना उघडकीस आणले जाते, बाहेर काढून टाकले जाते आणि त्यांची कसोटी घेतली जाते. लोकांनी देवाची वचने पाहिली आहेत, ऐकली आहेत आणि या वचनांचे अस्तित्व मान्य केले आहे. परिणामतः त्यांचा देवाच्या अस्तित्वावर, त्याच्या सर्वशक्तिमत्वावर आणि शहाणपणावर, तसेच त्याच्या मनुष्यावरील प्रेमावर व मनुष्याला वाचवण्याच्या इच्छेवर विश्वास बसू लागला आहे. “वचने” हा शब्द साधा आणि सरळ वाटत असेल, पण देहधारी देवाच्या मुखातून उच्चारलेली वचने संपूर्ण विश्वाला हादरवून टाकतात, लोकांचे हृदयपरिवर्तन करतात, त्यांच्या कल्पना आणि प्रवृत्ती यात परिवर्तन घडवतात व सारे जग आधी जसे दिसत होते त्यात परिवर्तन घडवतात. युगायुगातून फक्त आजच्या देवाने अशा प्रकारे कार्य केले आहे आणि फक्त तोच अशा प्रकारे बोलत आहे व मनुष्याला वाचवत आहे. या काळापासून, मनुष्य देवाच्या वचनांतून दिशा आणि व्यवस्था प्राप्त करत त्याच्या मार्गदर्शनानुसार जगत आला आहे. लोक देवाच्या वचनांतील शाप व आशीर्वादांसमवेत त्या वचनांच्या जगात राहत आहेत आणि त्याहूनही अधिक लोक त्याच्या वचनाच्या न्याय व ताडणाच्या अधीन आहेत. ही वचने आणि हे कार्य सर्व काही मनुष्याच्या तारणासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी व पुरातन काळात निर्मित जगाचे मूळ स्वरूप बदलण्यासाठी आहेत. देवाने वचनांचा वापर करून जगाची निर्मिती केली, तो वचनांचा वापर करून संपूर्ण विश्वातील लोकांना मार्ग दाखवतो आणि वचनांचा वापर करूनच तो त्यांच्यावर विजय मिळवतो व त्यांना वाचवतो. सरते शेवटी, तो जुने जग संपुष्टात आणण्यासाठी वचनांचा वापर करेल, अशा प्रकारे तो त्याची व्यवस्थापन योजना पूर्ण करेल. राज्याच्या संपूर्ण युगात, देव त्याचे कार्य करण्यासाठी व त्याच्या कार्याचे परिणाम साध्य करण्यासाठी वचनांचा वापर करतो. तो चमत्कार किंवा कोणतीही जादू करत नाही, परंतु तो केवळ वचनांच्या माध्यमातूनच त्याचे कार्य करतो. कारण या वचनांतून, मनुष्याचे पोषण होते, त्याला विविध तरतुदी प्राप्त होतात आणि त्याला ज्ञान व खराखुरा अनुभव मिळतो. वचनाच्या युगात, मनुष्य असाधारणपणे आशिषित राहिलेला आहे. त्याला शारीरिक वेदना होत नाही आणि तो केवळ देवाच्या विपुल पुरवठ्याचा आनंद घेतो; आंधळेपणाने शोधत किंवा पुढे जाण्याची गरज न पडता त्याच्या या सुस्थितीत, त्याला देवाचे स्वरूप दिसते, तो स्वमुखातून बोलत असल्याचे दिसते, देव जे देतो ते तो प्राप्त करत असतो व तो त्याचे कार्य स्वतःच करत असल्याचे पाहत असतो. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा पूर्वीच्या युगांमधील लोक आस्वाद घेऊ शकत नव्हते आणि हे असे आशीर्वाद आहेत जे त्यांना कधीच मिळू शकत नव्हते.

देवाने मनुष्याला परिपूर्ण बनवण्याचा संकल्प केला आहे आणि तो कोणत्याही दृष्टिकोनातून बोलत असला तरीही, हे सर्व मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आहे. आत्म्याच्या दृष्टिकोनातून उच्चारलेली वचने लोकांना समजणे कठीण आहे; त्यांच्याकडे आचरणाचा मार्ग शोधण्याचे कोणतेही साधन नाही, कारण त्यांची समज मर्यादित आहे. देवाच्या कार्याचे वेगवेगळे परिणाम होतात व प्रत्येक पाऊल उचलताना त्याचा काही उद्देश असतो. शिवाय, त्याने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलणे अत्यावश्यक आहे, कारण असे केल्यानेच तो मनुष्याला परिपूर्ण करू शकतो. जर त्याने केवळ आत्म्याच्या दृष्टिकोनातून त्याचा आवाज उच्चारला असेल, तर देवाच्या कार्याचा हा टप्पा पूर्ण करण्याचा कोणताही मार्ग नसेल. तो ज्या स्वरात बोलतो त्यावरून तू पाहू शकतोस, की त्याने लोकांच्या या समूहाला पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. तर ज्यांना परिपूर्ण बनवायचे आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाची पहिली पायरी कोणती असावी? सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाचे कार्य माहीत असले पाहिजे. आज, देवाच्या कार्यात एक नवीन पद्धत सुरू झाली आहे; युग बदलले आहे, देवाची कार्यपद्धतीही बदलली आहे आणि देव ज्या पद्धतीने बोलतो ती पद्धत वेगळी आहे. आज केवळ त्याच्या कार्याची पद्धतच बदललेली नाही, तर युगदेखील बदलले आहे. आता राज्याचे युग आहे. हे देवावर प्रेम करण्याचेही युग आहे. ही सहस्राब्दी राज्याच्या युगाची पूर्वसूचना आहे—जे वचनाचे युगदेखील आहे आणि ज्यामध्ये देव मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी बोलण्यासाठीच्या अनेक माध्यमांचा वापर करतो व मनुष्याला तरतुदी पुरवण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोलतो. सहस्राब्दी राज्याच्या युगात प्रवेश केल्यावर, देव मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी वचने वापरण्यास सुरवात करेल, मनुष्याला जीवनाच्या वास्तविकतेमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देईल व त्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल. देवाच्या कार्याचे अनेक टप्पे अनुभवल्यानंतर, मनुष्याने पाहिले आहे, की देवाचे कार्य अपरिवर्तित राहत नाही, परंतु सतत विकसित आणि गहन होत जाते. इतके दिवस लोकांनी ते अनुभवल्यानंतर, कार्य सातत्याने वेगवेगळे होत आहे, पुन्हा पुन्हा बदलत आहे. ते कितीही बदलत असले तरी, मानवतेला तारण प्राप्त करून देण्याच्या देवाच्या उद्देशापासून ते कधीही विचलित होत नाही. दहा हजार बदलांनंतरही ते मूळ उद्देशापासून कधीच भरकटत नाही. देवाच्या कार्याची पद्धत कितीही बदलली तरी हे कार्य सत्यापासून किंवा जीवनापासून कधीही दूर जात नाही. ज्या पध्दतीने कार्य केले जाते त्या पद्धतीतील बदलांमध्ये केवळ कार्याच्या स्वरूपामध्ये व देव ज्या दृष्टिकोनातून बोलतो त्यात बदल होतो; देवाच्या कार्याच्या मध्यवर्ती उद्दिष्टात कोणताही बदल होत नाही. परिणाम साध्य करण्यासाठी, देवाच्या आवाजाच्या स्वरात आणि त्याच्या कार्याच्या पद्धतीत बदल केले जातात. आवाजाच्या स्वरात बदल याचा अर्थ कार्यामागील उद्देश किंवा तत्त्व बदलणे असा होत नाही. लोक देवावर मुख्यतः जीवन शोधण्यासाठी विश्वास ठेवतात; तुझा देवावर विश्वास असला आणि तरीही तू जीवनाचा शोध घेत नसशील किंवा सत्य अथवा देवाच्या ज्ञानाचा पाठपुरावा करत नसशील, तर हा देवावरील विश्वास नाही! आणि तरीही राजा होण्यासाठी राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे वास्तववादी आहे का? जीवनाचा शोध घेऊन देवावरील खरे प्रेम प्राप्त करणे—केवळ हीच वास्तविकता आहे; सत्याचा पाठपुरावा व आचरण—ही सर्व वास्तविकता आहे. देवाची वचने वाचून आणि या वचनांचा अनुभव घेतल्यामुळे, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवादरम्यान देवाचे ज्ञान प्राप्त होईल व पाठपुरावा करण्याचा हाच खरा अर्थ आहे.

आता राज्याचे युग आहे. तू या नवीन युगात प्रवेश केला आहे की नाहीस, हे तू देवाच्या वचनांच्या वास्तविकतेत प्रवेश केला आहे की नाहीस यावर अवलंबून आहे, त्याची वचने तुझ्या जीवनाची वास्तविकता बनली आहे की नाही यावर अवलंबून आहे. देवाची वचने प्रत्येक व्यक्तीला ज्ञात केली जातात जेणेकरून, अंततः सर्व लोक देवाच्या वचनांच्या जगात राहतील आणि त्याची वचने प्रत्येक व्यक्तीला अंतःकरणातून प्रबुद्ध व प्रकाशित करतील. जर या काळात तू देवाचे वचन वाचण्यात निष्काळजी असशील आणि त्याच्या वचनांमध्ये तुला स्वारस्य नसेल, तर यावरून तुझी अवस्था चुकीची असल्याचे दिसून येते. जर तू वचनाच्या युगात प्रवेश करू शकत नसशील, तर पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्य करत नाहीत; जर तू या युगात प्रवेश केला असशील तर तो त्याचे कार्य करेल. पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त करण्यासाठी वचनाच्या युगाच्या प्रारंभी तू काय करू शकतोस? या युगात आणि तुमच्यामध्ये, देव पुढील गोष्टी साध्य करेल: प्रत्येक व्यक्ती देवाच्या वाचनांनुसार जगेल, सत्य आचरणात आणण्यास सक्षम असेल व देवावर मनापासून प्रेम करेल; सर्व लोक देवाची वचने पाया म्हणून आणि त्यांची वास्तविकता म्हणून वापरतील व त्यांना देवाचा आदर करणारे अंतःकरण असेल; आणि देवाच्या वचनांचा सराव करून, मनुष्य नंतर देवासोबत राजेशाही शक्तीचा वापर करेल. हे देवाने साध्य करायचे कार्य आहे. देवाची वचने न वाचता तू जगू शकतोस का? आज, असे अनेक आहेत ज्यांना असे वाटते, की देवाची वचने वाचल्याशिवाय ते एक-दोन दिवसही व्यतीत करू शकत नाहीत. त्यांनी दररोज त्याची वचने वाचली पाहिजेत आणि वेळ न मिळाल्यास, ती ऐकणे पुरेसे आहे. पवित्र आत्मा हीच भावना लोकांना देतो व तो याच मार्गाने त्यांना हलवण्यास सुरुवात करतो. म्हणजेच, तो लोकांवर वचनांद्वारे शासन करतो जेणेकरून, ते देवाच्या वचनांच्या वास्तविकतेत प्रवेश करू शकतील. जर, फक्त एक दिवस देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन न करून, तुला अंधकार व तहान जाणवत असेल आणि तू ते सहन करू शकत नसशील, तर हे दर्शवते की तू पवित्र आत्म्याने प्रेरित आहेस व तो तुझ्यापासून दूर गेलेला नाही. तर, तू या प्रवाहात असलेले एक आहात. तथापि, जर एक किंवा दोन दिवस देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन न करून, तुला काहीही जाणवत नसेल, जर तुला तीव्र ओढ नसेल व अजिबात हालचाल नसेल, तर हे दर्शवते की पवित्र आत्मा तुझ्यापासून दूर गेला आहे. याचा अर्थ असा, की तुझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी सुरू आहे; तू वचनाच्या युगात प्रवेश केलेला नाहीस आणि मागे पडलेल्यांपैकी एक आहेस. देव लोकांवर शासन करण्यासाठी वचनांचा वापर करतो; जर तुला देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करून चांगले वाटत असेल आणि जर तसे केले नाही तर तुला अनुसरण करण्याचा कोणताही मार्ग नाही. देवाची वचने लोकांचे अन्न बनतात आणि त्यांना पुढे नेणारी शक्ती बनतात. बायबलमध्ये असे म्हटले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या वचनाने जगेल” (मत्तय ४:४). आज, देव हे कार्य पूर्ण करेल आणि तो तुमच्यामध्ये ही वस्तुस्थिती साध्य करेल. पूर्वीच्या काळी लोक देवाचे वचन न वाचता बरेच दिवस जगू शकत होते व तरीही नेहमीप्रमाणे जेवण्यास आणि काम करण्यास सक्षम होते, परंतु आज ही स्थिती नाही, असे का? या युगात, देव सर्वांवर शासन करण्यासाठी मुख्यतः वचनांचा वापर करतो. देवाच्या वचनांद्वारे, मनुष्याचा न्याय केला जातो व त्याला परिपूर्ण केले जाते, नंतर शेवटी राज्यात नेले जाते. केवळ देवाची वचनेच मनुष्याला जीवन देऊ शकतात आणि केवळ देवाची वचनेच मनुष्याला प्रकाश व आचरणाचा मार्ग देऊ शकतात, विशेषतः राज्याच्या युगात. जोपर्यंत तू देवाच्या वचनांच्या वास्तविकतेपासून भटकत नाहीस, जोपर्यंत तू दररोज त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करत आहेस, तोपर्यंत देव तुला परिपूर्ण बनवू शकेल.

जीवनाचा पाठपुरावा करणे ही घाईने करता येण्यासारखी गोष्ट नाही; जीवनाची वाढ केवळ एक-दोन दिवसांत होत नाही. देवाचे कार्य सामान्य आणि व्यावहारिक आहे व ते कार्य एका प्रक्रियेमधून पूर्ण होणे आवश्यक आहे. देहधारी येशूला त्याचे वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी साडे तेहतीस वर्षे लागली—मग मनुष्याला शुद्ध करणे व त्याचे जीवन बदलणे अशा अत्यंत कठीण कार्याचे काय? देवाचे दर्शन घडवणारा सामान्य माणूस बनवणे सोपे कार्य नाही. हे विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे महान अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात जन्मलेले आहेत, ज्यांच्याकडे कमी क्षमता आहेत आणि त्यांना देवाची वचने व कार्य दीर्घकाळासाठी आवश्यक आहे. त्यामुळे परिणाम पाहण्यासाठी उतावळेपणा करू नका. तू देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन केले पाहिजेस व देवाची वचने समजून घेण्याचा अधिक प्रयत्न केला पाहिजेस. जेव्हा तू त्याची वचने वाचून पूर्ण करतोस, तेव्हा तू ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यास सक्षम असशील, देवाच्या वचनांमधील ज्ञान, अंतर्दृष्टी, विवेक आणि शहाणपणात तुझी वाढ होईल. याद्वारे, तू नकळतच बदलू शकशील. देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करणे, ती वाचणे, जाणून घेणे, अनुभवणे आणि आचरणात आणणे हे तत्त्व म्हणून तू स्वीकारू शकलास, तर तुझ्या लक्षातही येणार नाही आणि तू परिपक्व होशील. देवाची वचने वाचूनही आचरणात आणता येत नाहीत, असे म्हणणारेही आहेत. तुला काय घाई आहे? जेव्हा तू एका विशिष्ट पातळीवर पोहोचतोस तेव्हा तू त्याची वचने आचरणात आणण्यास सक्षम होशील. चार किंवा पाच वर्षांचे मूल असे म्हणेल का, की ते त्यांच्या पालकांना पाठिंबा देऊ शकत नाहीत किंवा त्यांचा आदर करू शकत नाहीत? तुझी सध्याची पातळी किती मोठी आहे हे तुला माहीत असले पाहिजे. जे शक्य आहे ते आचरणात आणा आणि देवाच्या व्यवस्थापनात व्यत्यय आणणारी व्यक्ती होणे टाळा. फक्त देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करा आणि आतापासून ते तत्व म्हणून स्वीकारा. देव तुला पूर्ण करू शकेल की नाही याची सध्या काळजी करू नकोस. अजून त्यामध्ये डोकावू नकोस. देवाची वचने जशी तुझ्यापर्यंत पोहोचत आहेस, तसे त्यांचे सेवन आणि प्राशन करा व देव तुला नक्कीच परिपूर्ण करेल. तथापि, एका विशिष्ट तत्त्वाद्वारेच त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन केले पाहिजे. असे आंधळेपणाने करू नका. देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करताना, एकीकडे, तुला जी वचने कळायला हवीत—म्हणजे दृष्टांतांशी संबंधित आहेत ती शोध—आणि दुसरीकडे, तू जी प्रत्यक्ष व्यवहारात आणली पाहिजेस—म्हणजेच, तू कशामध्ये प्रवेश केला पाहिजेस ते शोध. एक पैलू ज्ञानाशी व दुसरा प्रवेशाशी संबंधित आहे. काय माहीत असले पाहिजे आणि काय आचरणात आणले पाहिजे हे तुला समजल्‍यावर—तुला देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करावे हे समजेल.

पुढे जाऊन, तू ज्या तत्त्वाद्वारे बोलतोस ती देवाची वचने असली पाहिजेत. साधारणपणे, जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा देवाच्या वचनांबद्दल सहभागिता नोंदवली पाहिजे, देवाची वचने परस्परसंवादाचा आशय असला पाहिजे, या वचनांबद्दल काय माहिती आहे, ते कसे आचरणात आणता आणि पवित्र आत्मा कसे कार्य करतो याबद्दल बोलले पाहिजे. जोपर्यंत तू देवाच्या वचनांची सहभागिता करशील तोपर्यंत पवित्र आत्मा तुला प्रकाशित करेल. देवाच्या वचनांचे जग साध्य करण्यासाठी मनुष्याचे सहकार्य आवश्यक आहे. जर तू यात प्रवेश केला नाहीस, तर देवाला कार्य करण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही; जर तू तुझे तोंड बंद ठेवलेस आणि त्याच्या वचनांबद्दल बोलले नाहीस, तर त्याच्याकडे तुला प्रकाशित करण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही. तू व्यस्त नसशील, तेव्हा देवाच्या वचनांबद्दल बोल आणि फक्त निरर्थक गप्पा मारू नकोस! तुझे जीवन देवाच्या वचनांनी भरलेले असू दे—तरच तू श्रद्धावान होशील. सहभागिता वरवरची असली तरी हरकत नाही. उथळपणाशिवाय खोली असू शकत नाही. काहीतरी प्रक्रिया असली पाहिजे. तुझ्या प्रशिक्षणाद्वारे, तू तुझ्यावर असलेल्या पवित्र आत्म्याचे प्रदीपन समजून घेशील आणि देवाच्या वचनांचे प्रभावीपणे सेवन व प्राशन कसे करावे हे समजून घेशील. तपासणीच्या मध्यांतरानंतर, तू देवाच्या वचनांच्या वास्तविकतेत प्रवेश करशील. जर तू सहकार्य करण्याचा संकल्प केलास तरच पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त होऊ शकेल.

देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्याच्या तत्त्वांपैकी एक तत्त्व ज्ञानाशी संबंधित आहे व दुसरे प्रवेशाशी संबंधित आहे. तुम्हाला कोणती वचने समजली पाहिजेत? दृष्टांतांशी संबंधित वचने ओळखली पाहिजेत (जसे की, देवाचे कार्य आता कोणत्या युगात आले आहे, देव आता काय साध्य करू इच्छितो, देहधारण म्हणजे काय, इत्यादींशी संबंधित वचने ओळखली पाहिजेत; ही सर्व वचने दृष्टांतांशी संबंधित आहेत). मनुष्याने ज्या मार्गात प्रवेश केला पाहिजे त्याचा अर्थ काय आहे? हे सूचित करते, की मनुष्याने देवाची वचने आचरणात आणली पाहिजेत आणि त्यात प्रवेश केला पाहिजे. देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करण्याचे वरील दोन पैलू आहेत. आतापासून, अशा प्रकारे देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करा. जर तुम्हाला त्याची दृष्टांताबद्दलची वचने स्पष्टपणे समजले असतील, तर पूर्ण वेळ वाचत राहण्याची आवश्यकता नाही. प्रवेश करताना अधिकाधिक वचनांचे सेवन व प्राशन करणे सर्वात महत्त्वाचे आहे, जसे की तुमचे अंतःकरण देवाकडे कसे वळवावे, तुमचे अंतःकरण देवासमोर कसे शांत करावे आणि देहाचा त्याग कसा करावा. तुम्ही या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन कसे करावे हे जाणून घेतल्याशिवाय, खरी सहभागिता अशक्य आहे. त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करावे हे तुम्हाला कळल्यानंतर, जेव्हा तुम्ही मुख्य गोष्ट समजून घ्याल, तेव्हा सहभागिता मुक्त होईल व कोणताही मुद्दा उपस्थित केला गेला तरी, तुम्ही सहभागिता करण्यास आणि वास्तविकता समजून घेण्यास सक्षम असाल. जर, देवाच्या वचनांची सहभागिता करताना, वास्तविकता नसेल, तर तुला मुख्य गोष्ट समजली नाही, जे दर्शवते की तुला देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करावे हे माहीत नाही. काही लोकांना देवाची वचने वाचताना कंटाळा येऊ शकतो, जी सामान्य स्थिती नाही. देवाची वचने वाचण्यात कधीही कंटाळा न येणे, नेहमी त्यांच्यासाठी तीव्र ओढ असणे आणि देवाची वचने नेहमी चांगली असण्याचे जाणवणे हे सामान्य आहे. अशाप्रकारे ज्या व्यक्तीने खरोखर प्रवेश केला आहे ती व्यक्ती देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करते. जेव्हा तुला असे वाटते, की देवाची वचने अत्यंत व्यावहारिक आहेत आणि मनुष्याने त्यात प्रवेश केला पाहिजे; जेव्हा तुला असे वाटते, की त्याची वचने मनुष्यासाठी खूप उपयुक्त व फायदेशीर आहेत आणि ते मनुष्याच्या जीवनाची तरतूद आहेत—तर तुला ही भावना पवित्र आत्माच देत असतो व पवित्र आत्माच तुला प्रेरित करत असतो. यावरून हे सिद्ध होते, की पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्यरत आहे आणि देव तुझ्यापासून दूर गेलेला नाही. देव नेहमी बोलत असतो हे पाहून, काही लोक त्याच्या वचनांना कंटाळतात आणि त्यांनी ती वाचो अथवा न वाचो याचा कोणताही परिणाम होणार नाही असा विचार करतात—ही सामान्य स्थिती नाही. त्यांच्यात वास्तविकतेत प्रवेश करण्यासाठी तीव्र ओढ असलेले अंतःकरण नसते आणि अशा लोकांना परिपूर्ण होण्याची तीव्र ओढ नसते किंवा ते त्याला महत्त्वही देत नाहीत. जेव्हा तुला आढळते, की तुला देवाच्या वचनांची तीव्र ओढ नाही, तेव्हा हे दर्शवते की तू सामान्य स्थितीत नाहीस. भूतकाळात, देव तुझ्यापासून दूर गेला होता की नाही हे तुझ्या अंतःकरणात शांतता होती की नाही आणि तू आनंद अनुभवला आहेस की नाही यांवरून निर्धारित केले जाऊ शकते. तुला देवाच्या वचनांची तीव्र ओढ आहे की नाही, त्याची वचने तुझी वास्तविकता आहेत की नाही, तुझी त्याच्यावर नितांत श्रद्धा आहे की नाही आणि तू देवासाठी जे काही करू शकतोस ते करण्यास सक्षम आहेस की नाही हे आता महत्त्वाचे आहे. दुसऱ्या शब्दांत, देवाच्या वचनांच्या वास्तविकतेनुसार मनुष्याचा न्याय केला जातो. देव त्याची वचने सर्व मानवजातीसाठी निर्देशित करतो. जर तू ती वाचण्यास तयार असशील, तर तो तुला ज्ञान प्राप्त करून देईल, परंतु तू तयार नसल्यास, तो असे करणार नाही. धार्मिकतेसाठी भुकेलेल्या आणि तीव्र ओढ असलेल्यांना देव प्रकाश देतो आणि जे त्याला शोधतात त्यांना तो ज्ञान देतो. काही जण म्हणतात, की काही लोकांनी देवाची वचने वाचल्यानंतरदेखील देवाने त्यांना ज्ञान दिलेले नाही. पण तू ही वचने कोणत्या प्रकारे वाचली आहेस? तू एका क्षणभंगुर दृष्टिक्षेपात आणि वास्तविकतेला महत्त्व न देता त्याची वचने वाचली असतील, तर देव तुम्हाला ज्ञान कसे देईल? जी व्यक्ती देवाच्या वचनांचा सन्मान करत नाही ती व्यक्ती त्याच्याद्वारे परिपूर्ण कशी होऊ शकते? जर तू देवाच्या वचनांचा सन्मान केला नाहीस, तर तुझ्याकडे सत्य किंवा वास्तविकता राहणार नाही. जर तू त्याच्या वचनांचा सन्मान केलास, तर तू सत्य आचरणात आणू शकशील व तेव्हाच तुला वास्तविकता प्राप्त होईल. म्हणूनच तू व्यस्त असशील किंवा नसशील, परिस्थिती प्रतिकूल असो वा नसो आणि तुझी कसोटी पाहिली जात असो वा नसो, देवाच्या वचनांचे नेहमी सेवन व प्राशन करणे आवश्यक आहे. एकंदरीत, देवाची वचने मनुष्याच्या अस्तित्वाचा पाया आहेत. त्याच्या वचनांपासून कोणीही दूर जाऊ शकत नाही, परंतु दिवसाच्या तीन वेळच्या जेवणाप्रमाणे त्याच्या वचनांचे सेवन करणे आवश्यक आहे. देवाने परिपूर्ण बनवणे आणि प्राप्त करणे इतके सोपे असू शकते का? सद्यस्थितीत तुला समजत असो वा नसो व देवाच्या कार्याची अंतर्दृष्टी असो वा नसो, तू देवाच्या वचनांचे शक्य तितके सेवन आणि प्राशन करावे. हे सक्रिय मार्गाने प्रवेश करणे आहे. देवाची वचने वाचल्यानंतर, तू ज्यामध्ये प्रवेश करू शकतोस ते आचरणात आणण्यासाठी त्वरा कर आणि तू जे करू शकत नाहीस ते या क्षणासाठी बाजूला ठेव. तुला सुरुवातीला देवाची अनेक वचने समजू शकत नाहीत, परंतु तुला ती दोन किंवा तीन महिन्यांनंतर, कदाचित एक वर्षानंतरदेखील समजतील. हे कसे असू शकते? कारण देव लोकांना एक-दोन दिवसांत परिपूर्ण बनवू शकत नाही. बहुतेक वेळा, जेव्हा तू त्याची वचने वाचतोस तेव्हा तुला लगेच समजत नाहीत. त्यावेळेस, त्यांना ती केवळ मजकुराशिवाय दुसरी काही भासत नाहीत; तू ती समजून घेण्यापूर्वी काही काळ त्यांचा अनुभव घ्यायला पाहिजेस. देवाने खूप काही बोलल्यानंतर, तू त्याची वचने सेवन व प्राशन करण्याचे पूर्ण प्रयत्न केले पाहिजेस आणि मग, नकळतच तुला ती समजतील व नकळतच पवित्र आत्मा तुला ज्ञान देईल. जेव्हा पवित्र आत्मा मनुष्याला ज्ञान देतो, तेव्हा सहसा मनुष्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा तुला तीव्र ओढ असते आणि तू शोध घेतोस तेव्हा तो तुला ज्ञान देतो व मार्गदर्शन करतो. पवित्र आत्मा ज्या तत्त्वाद्वारे कार्य करतो ते तू सेवन आणि प्राशन करत असलेल्या देवाच्या वचनांभोवती केंद्रित आहे. जे लोक देवाच्या वचनांना महत्त्व देत नाहीत आणि त्याच्या वचनांबद्दल नेहमीच वेगळा दृष्टिकोन ठेवतात—त्यांच्या गोंधळलेल्या विचारात, त्यांनी त्याची वचने वाचली आहेत की नाही हा उदासीनतेचा विषय आहे—ते असे आहेत ज्यांच्यामध्ये वास्तविकता नाही. अशा व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याचे कार्य किंवा त्याचे ज्ञान दिसून येत नाही. असे लोक केवळ तटबंदीचे, खऱ्या पात्रतेशिवाय ढोंग करणारे, बोधकथेतील श्री. नांगुओ यांच्यासारखे आहेत.[अ]

वास्तविकता म्हणून देवाच्या वचनांशिवाय खरी पातळी कोणतीही नाही. जेव्हा कसोटीची वेळ येईल तेव्हा तू नक्कीच पडशील आणि मग तुझी खरी पातळी उघड होईल. परंतु जे नियमितपणे वास्तविकतेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात ते जेव्हा कसोट्यांनी वेढले जातात तेव्हा त्यांना देवाच्या कार्याचा उद्देश समजेल. ज्याला कर्तव्याची जाणीव आहे आणि ज्याला देवाची तीव्र ओढ आहे, त्याने देवाला त्याच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी व्यावहारिक कृती करावी. ज्यांना वास्तविकतेचे भान नसते ते अगदी क्षुल्लक बाबींवरही ठाम राहू शकत नाहीत. वास्तविक पातळी असलेल्या व नसलेल्यांमध्ये हाच फरक आहे. असे का होते, की जरी ते दोघेही देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करतात, तरी कसोट्यांमध्ये काही ठामपणे उभे राहतात, तर काही पळून जातात? स्पष्ट फरक असा आहे, की काही लोकांमध्ये खऱ्या पातळीचा अभाव आहे; त्यांच्याकडे त्यांची वास्तविकता म्हणून सेवा करण्यासाठी देवाची वचने नाहीत आणि त्याची वचने त्यांच्यात रुजलेली नाहीत. कसोटीची वेळ येताच, त्यांचा मार्ग संपुष्टात येतो. तर मग, काही जण कसोट्यांमध्ये ठामपणे उभे राहण्यास सक्षम का असतात? कारण त्यांना सत्य समजले आहे आणि त्यांच्याकडे दृष्टिकोन आहे व त्यांना देवाची इच्छा आणि त्याच्या गरजा समजतात व अशा प्रकारे ते कसोट्यांमध्ये ठामपणे उभे राहण्यास सक्षम आहेत. ही खरी पातळी आहे आणि हेदेखील जीवन आहे. काही जण देवाची वचने वाचू शकतात, पण ती आचरणात आणत नाहीत, गांभीर्याने घेत नाहीत; जे त्यांना गांभीर्याने घेत नाहीत ते आचरणात आणण्याला महत्त्व देत नाहीत. ज्यांच्याकडे वास्तविकता म्हणून सेवा करण्यासाठी देवाची वचने नाहीत ते वास्तविक पातळी नसलेले आहेत आणि असे लोक कसोटीत ठामपणे उभे राहू शकत नाहीत.

जेव्हा देवाची वचने समोर येतात, तेव्हा तू ती ताबडतोब स्वीकारली पाहिजेस आणि त्यांचे सेवन व प्राशन केले पाहिजेस. तू कितीही समजून घेतलेस तरी, तू जो दृष्टिकोन दृढपणे धरून ठेवला पाहिजेस तो म्हणजे त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करणे, ती जाणून घेणे व ती आचरणात आणणे. हे असे काहीतरी आहे जे करण्यास तू सक्षम असले पाहिजेस. तुझी पातळी कितीही मोठी होऊ शकत असली तरीही; फक्त त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्यावर लक्ष केंद्रित कर. मनुष्याने यातच सहकार्य केले पाहिजे. तुझे आध्यात्मिक जीवन हे मुख्यतः देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करण्याच्या वास्तविकतेमध्ये प्रवेश करणे आणि ती आचरणात आणणे आहे. इतर कशावरही लक्ष केंद्रित करणे हे तुझे काम नाही. चर्चच्या नेत्यांनी त्यांच्या सर्व बंधुभगिनींना मार्गदर्शन करण्यास सक्षम असावे जेणेकरून, देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करावे हे त्यांना कळेल. ही जबाबदारी प्रत्येक चर्चच्या नेत्याची आहे. ते तरुण असोत वा वृद्ध, सर्वांनी देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले पाहिजे आणि त्याची वचने त्यांच्या अंतःकरणात असली पाहिजेत. या वास्तविकतेत प्रवेश करणे म्हणजे राज्याच्या युगात प्रवेश करणे आहे. आज, बहुतेक लोकांना असे वाटते, की ते देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन केल्याशिवाय जगू शकत नाहीत आणि त्यांना असे वाटते, की वेळ कोणतीही असली तरी त्याची वचने नवीनच आहेत. याचा अर्थ ते योग्य मार्गावर येऊ लागले आहेत. देव त्याचे कार्य करण्यासाठी व मनुष्याला तरतुदी पुरवण्यासाठी वचनांचा वापर करतो. जेव्हा प्रत्येकजण देवाच्या वचनांसाठी तळमळतो आणि तहानलेला असतो, तेव्हा मानवता त्याच्या वचनांच्या जगात प्रवेश करेल.

देव खूप काही बोलला आहे. तुला किती कळले आहे? तू त्यामध्ये किती प्रवेश केला आहे? जर एखाद्या चर्चच्या नेत्याने त्यांच्या बंधुभगिनींना देवाच्या वचनांच्या वास्तविकतेत मार्गदर्शन केले नाही, तर ते त्यांच्या कर्तव्यात चुकले असतील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाले असतील! तुझी समज प्रगल्भ असो वा वरवरची, समज कितीही असली तरी, तुला त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करावे हे माहीत असले पाहिजे, त्याच्या वचनांकडे खूप लक्ष दिले पाहिजे व ती सेवन आणि प्राशन करण्याचे महत्त्व व आवश्यकता समजून घेतली पाहिजे. देवाने इतके बोलूनही, जर तू त्याच्या वचनांचे सेवन आणि प्राशन केले नाहीस किंवा त्याच्या वचनांचा शोध घेण्याचा अथवा ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केला नाहीस, तर याला देवावर विश्वास ठेवणे म्हणता येणार नाही. तुझा देवावर विश्वास असल्यामुळे, तू त्याच्या वचनांचे सेवन व प्राशन केले पाहिजेस, त्याची वचने अनुभवली पाहिजेस आणि त्याची वचने जगली पाहिजेस. यालाच देवावरील विश्वास म्हणता येईल! जर तू तुझ्या तोंडाने म्हणत असशील, की तू देवावर विश्वास ठेवतोस आणि तरीही त्याची कोणतीही वचने आचरणात आणू शकत नाहीस किंवा कोणतीही वास्तविकता निर्माण करू शकत नाहीस, तर याला देवावर विश्वास ठेवणे म्हणत नाहीत. याउलट, हे म्हणजे “भूक भागवण्यासाठी भाकर शोधणे” आहे. अगदी क्षुल्लक साक्ष, निरुपयोगी गोष्टी व वरवरच्या गोष्टींबद्दल बोलणे, किंचितही वास्तविकता न बाळगणे: याला देवावर विश्वास ठेवणे म्हणत नाही आणि तुला देवावर विश्वास ठेवण्याचा योग्य मार्ग समजलेलाच नाही. शक्य तितके देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन का करावे? जर तुम्ही त्याच्या वचनांचे सेवन व प्राशन करत नसाल आणि फक्त स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचा अर्थ देवावर विश्वास ठेवणे आहे का? देवावर विश्वास ठेवणाऱ्याने पहिले पाऊल कोणते उचलले पाहिजे? देव कोणत्या मार्गाने मनुष्याला परिपूर्ण करतो? देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन केल्याशिवाय तुम्ही परिपूर्ण होऊ शकता का? तुमची वास्तविकता म्हणून सेवा करण्यासाठी देवाच्या वचनांशिवाय तुम्हाला राज्याचे व्यक्ती मानले जाऊ शकते? देवावर विश्वास ठेवण्याचा नेमका अर्थ काय आहे? देवावर विश्वास ठेवणाऱ्यांनी किमान बाहेरच्या बाजूने चांगले वागले पाहिजे; सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाच्या वचनांनी व्यापून गेले पाहिजे. काहीही असो, तुम्ही त्याच्या वचनांपासून कधीही दूर जाऊ शकत नाही. देवाला ओळखणे व त्याच्या इच्छा पूर्ण करणे हे सर्व त्याच्या वचनांतून साध्य होते. भविष्यात, देवाच्या वचनांद्वारे प्रत्येक राष्ट्र, संप्रदाय, धर्म आणि क्षेत्र यांवर विजय मिळवला जाईल. देव थेट बोलेल व सर्व लोक देवाची वचने त्यांच्या हातात धरतील आणि याद्वारे मानवता परिपूर्ण होईल. अंतःकरणात व त्याशिवाय, देवाची वचने सर्वव्यापी आहेत: मानवता त्यांच्या मुखाने देवाची वचने उच्चारेल, देवाच्या वचनांनुसार आचरण करेल आणि देवाची वचने अंतःकरणात ठेवेल, देवाच्या वचनांमध्ये अंतःकरणातून व बाहेर दोन्ही बाजूंनी अडकून राहील. त्यामुळे मानवता परिपूर्ण होईल. जे देवाच्या इच्छा पूर्ण करतात आणि त्याला साक्ष देण्यास सक्षम आहेत, ते असे लोक आहेत ज्यांच्याकडे देवाची वचने त्यांची वास्तविकता म्हणून आहे.

शब्दाच्या युगात—सहस्राब्दी राज्याच्या युगात—प्रवेश करणे हे कार्य आज साध्य केले जात आहे. आतापासून, देवाच्या वचनांबद्दल सहभागिता करण्याचा प्रयत्न करा. देवाच्या वचनांचे फक्त सेवन आणि प्राशन करून तसेच अनुभव घेतल्यानेच तू देवाची वचने जगू शकशील. इतरांना पटवून देण्यासाठी तू काही व्यावहारिक अनुभव निर्माण केला पाहिजेस. जर तू देवाच्या वचनांची वास्तविकता जगू शकत नसशील, तर तू कोणाचेही मन वळवू शकणार नाहीस! देवाने वापरलेले सर्व लोक देवाच्या वचनांची वास्तविकता जगू शकतात. जर तू ही वस्तुस्थिती निर्माण करू शकत नसशील आणि देवाची साक्ष देऊ शकत नसशील, तर हे दर्शवते, की पवित्र आत्म्याने तुझ्यामध्ये कार्य केलेले नाही व तू परिपूर्ण झालेला नाहीस. हे देवाच्या वचनांचे महत्त्व आहे. तुझ्याजवळ देवाच्या वचनांची तीव्र ओढ असणारे अंतःकरण आहे का? ज्यांना देवाच्या वचनांची तीव्र ओढ असते त्यांना सत्याची तीव्र ओढ असते आणि अशा लोकांनाच देवाचा आशीर्वाद मिळतो. भविष्यात, देव आणखी बरीच वचने सर्व धर्मांना व सर्व संप्रदायांना सांगेल. तो परराष्ट्रीयांवर विजय मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये बोलण्याआधी आणि त्याचा आवाज त्यांच्यामध्ये उच्चारण्याआधी तुम्हाला पूर्ण बनवण्यासाठी तुमच्यामध्ये बोलतो व त्याचा आवाज उच्चारतो. त्याच्या वचनांद्वारे, सर्वांची प्रामाणिकपणे आणि पूर्णपणे खात्री पटेल. देवाच्या वचनांद्वारे व त्याच्या प्रकटीकरणांद्वारे, मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती नाहीशी होते, त्याला मनुष्याचे स्वरूप प्राप्त होते आणि त्याची बंडखोर प्रवृत्ती कमी होते. वचने अधिकाराने मनुष्यावर कार्य करतात व देवाच्या प्रकाशात मनुष्यावर विजय मिळवतात. सध्याच्या युगात देव करत असलेले कार्य, तसेच त्याच्या कार्याचे मुख्य पैलू हे सर्व त्याच्या वचनांमध्ये आढळू शकतात. जर तू त्याची वचने वाचली नाहीस तर तुला काहीच समजणार नाही. तू स्वतः त्याच्या वचनांचे सेवन व प्राशन करून आणि तुझ्या बंधुभगिनींसोबत सहभागिता करून व तुझ्या वास्तविक अनुभवांमधून तुला देवाच्या वचनांचे संपूर्ण ज्ञान मिळेल. तरच तू त्यांची वास्तविकता खऱ्या अर्थाने जगू शकशील.

तळटीप:

अ. मूळ मजकुरात “उ बोधकथेचा” असा शब्दप्रयोग नाही.

मागील:  जे सच्च्या अंतःकरणाने देवाची आज्ञा पाळतात, त्यांना देव नक्कीच प्राप्त करतो

पुढील:  देवाच्या वचनाने सर्व काही साध्य होते

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger