“सहस्राब्दी राज्याचा काळ आला आहे” याबद्दल संक्षिप्त चर्चा
सहस्राब्दी राज्याच्या दृष्टांताबद्दल तुम्हाला काय वाटते? काही लोक याबद्दल खूप विचार करतात आणि ते म्हणतात: “सहस्राब्दी राज्य पृथ्वीवर एक हजार वर्षे टिकेल, मग जर चर्चचे वयस्कर सदस्य अविवाहित असतील, तर त्यांना लग्न करावे लागेल का? माझ्या कुटुंबाकडे पैसे नाहीत, मी पैसे कमवायला सुरुवात करावी का? …” सहस्राब्दी राज्य म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे का? लोकांमध्ये सारासार विचार करण्याची क्षमता नाही आणि त्यांना खूप त्रास होतो. खरे तर, सहस्राब्दी राज्य अधिकृतपणे येणे अद्याप बाकी आहे. लोकांना परिपूर्ण बनवण्याच्या टप्प्यावर, सहस्राब्दी राज्य ही अगदी नवीन कल्पना आहे; देवाने सांगितलेल्या सहस्राब्दी राज्याच्या वेळी, मनुष्य परिपूर्ण बनलेला असेल. पूर्वी, असे म्हटले जात असे, की लोक संतांसारखे असतील आणि सिनिमच्या भूमीत खंबीरपणे उभे राहतील. जेव्हा लोक परिपूर्ण बनतील—जेव्हा ते देवाने सांगितलेले संत बनतील—फक्त तेव्हाच सहस्राब्दी राज्याचा काळ येईल. जेव्हा देव लोकांना परिपूर्ण बनवतो, तेव्हा तो त्यांना शुद्ध करतो आणि ते जितके शुद्ध असतात तितकेच देव त्यांना परिपूर्ण बनवतो. जेव्हा तुझ्यातील अशुद्धता, बंडखोरपणा, विरोध आणि देहाच्या गोष्टी काढून टाकल्या जातील, जेव्हा तुझी शुद्धी होईल, तेव्हा तू देवाचा प्रिय होशील (दुसऱ्या शब्दांत, तू संत होशील); जेव्हा देव तुला परिपूर्ण बनवेल आणि तू संत बनशील, तेव्हा तू सहस्राब्दी राज्यात असशील. आता राज्याचे युग आहे. सहस्राब्दी राज्याच्या युगात लोक जगण्यासाठी देवाच्या शब्दांवर अवलंबून असतील आणि सर्व राष्ट्रे देवाच्या नावाखाली येतील व सर्व लोक देवाची वचने वाचतील. त्या वेळी, काही टेलिफोनवरून कॉल करतील, काही फॅक्स करतील … ते देवाच्या वचनांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करतील आणि तुम्हीदेखील देवाच्या वचनांच्या अंतर्गत याल. लोक परिपूर्ण झाल्यानंतर हे सर्व घडते. आज, लोकांना वचनांद्वारे परिपूर्ण, शुद्ध, ज्ञानी केले जाते आणि त्यांना मार्गदर्शन दिले जाते; हे राज्याचे युग आहे, हा लोकांना परिपूर्ण बनवण्याचा टप्पा आहे व याचा सहस्राब्दी राज्याच्या युगाशी काहीही संबंध नाही. सहस्राब्दी राज्याच्या युगात, लोक आधीच परिपूर्ण बनलेले असतील आणि त्यांच्यातील भ्रष्ट प्रवृत्ती शुद्ध केलेली असेल. त्यावेळी, देवाने सांगितलेली वचने लोकांना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करतील आणि सृष्टीच्या निर्मितीच्या काळापासून ते आजपर्यंत देवाच्या कार्याची सर्व रहस्ये प्रकट करतील व त्याची वचने प्रत्येक युगातील आणि प्रत्येक दिवसाच्या देवाच्या कृतींविषयी, तो लोकांना मार्गदर्शन कसे करतो, त्याने आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य याविषयी आणि आध्यात्मिक क्षेत्राच्या गतिशीलतेबद्दल त्यांना सांगतील. फक्त तेव्हाच ते खऱ्या अर्थाने वचनाचे युग असेल; आता ते अगदी नवीन अवस्थेत आहे. जर लोकांना परिपूर्ण आणि शुद्ध केले नाही, तर त्यांना पृथ्वीवर एक हजार वर्षे जगण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही व त्यांचा देह अपरिहार्यपणे नष्ट होईल; जर लोक अंतःकरणातून शुद्ध झाले आणि ते यापुढे सैतान व देहाचे राहिले नाहीत, तर ते पृथ्वीवर जिवंत राहतील. या टप्प्यामध्ये तू अजूनही सारासार विचार करू शकत नाहीस आणि देवावर प्रेम करणे व पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी त्याची साक्ष देणे एवढेच तुम्ही अनुभवू शकता.
“सहस्राब्दी राज्याचा काळ आला आहे” ही भविष्यवाणी आहे, ती एका संदेष्ट्याच्या भविष्यवाणीशी सादृश्य आहे, ज्यामध्ये देव भविष्यात काय घडेल याची भविष्यवाणी करतो. देव भविष्यात उच्चारतो ती वचने आणि त्याने आज उच्चारलेली वचने सारखी नाहीत: भविष्यातील वचने युगाला मार्गदर्शन करतील, तर त्याने आज उच्चारलेली वचने लोकांना परिपूर्ण बनवतात, त्यांना परिष्कृत करतात आणि त्यांना सांभाळतात. भविष्यातील वचनाचे युग हे आजच्या वचनाच्या युगापेक्षा वेगळे आहे. आज, देवाने कोणत्याही माध्यमातून उच्चारलेली सर्व वचने—लोकांना परिपूर्ण बनवण्यासाठी, त्यांच्यातील मलिनता शुद्ध करण्यासाठी, त्यांना पवित्र करण्यासाठी आणि त्यांना देवासमोर नीतिमान बनवण्यासाठी आहेत. आज उच्चारलेली वचने आणि भविष्यात उच्चारलेली वचने या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राज्याच्या युगात उच्चारलेली वचने लोकांना सर्व प्रशिक्षणात प्रवेश करण्यासाठी, त्यांना प्रत्येक गोष्टीत योग्य मार्गावर आणण्यासाठी, त्यांच्यातील सर्व अशुद्धता काढून टाकण्यासाठी आहेत. देव या युगात हेच करतो. तो प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याच्या वचनांचा पाया तयार करतो, तो त्याच्या वचनांना प्रत्येक व्यक्तीचे जीवन बनवतो आणि तो सतत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या वचनांचा वापर करतो. आणि जेव्हा ते देवाच्या इच्छेकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा त्यांना धाकात ठेवण्यासाठी व शिस्त लावण्यासाठी देवाची वचने त्यांच्या अंतःकरणात असतील. आजची वचने हे माणसाचे जीवन असावे; ते थेट मनुष्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतात, तुझ्या अंतःकरणात असलेल्या सर्व कमतरता देवाच्या वचनांद्वारे पुरवल्या जातात आणि जे देवाची वचने स्वीकारतात, त्या सर्वांना देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करून ज्ञानप्राप्ती होते. भविष्यात देवाने उच्चारलेली वचने संपूर्ण विश्वातील लोकांना मार्गदर्शन करतात; आज, ही वचने फक्त चीनमध्ये उच्चारली जात आहेत आणि ती संपूर्ण विश्वात उच्चारल्या जाणार्या वचनांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. जेव्हा सहस्राब्दी राज्य येईल फक्त तेव्हाच देव संपूर्ण विश्वाशी बोलेल. हे जाणून घ्या, की देवाने आज उच्चारलेली वचने सर्व लोकांना परिपूर्ण बनवण्यासाठी आहेत; या टप्प्यावर देवाने उच्चारलेली वचने लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आहेत, तुला देवाची रहस्ये जाणून घेण्याची किंवा त्याचे चमत्कार पाहण्याची परवानगी देण्यासाठी नाहीत. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तो अनेक माध्यमांतून बोलतो. सहस्राब्दी राज्याचे युग येणे अद्याप बाकी आहे—ज्याबद्दल बोलले जात आहे ते सहस्राब्दी राज्याचे युग म्हणजे देवाच्या गौरवाचा दिवस आहे. यहुदीयात येशूचे कार्य पूर्ण झाल्यानंतर, देवाने त्याचे कार्य चीनच्या मुख्य भूमीमध्ये हस्तांतरित केले आणि दुसरी योजना तयार केली. तो त्याच्या कार्याचा आणखी एक भाग तुमच्यामध्ये करतो, तो लोकांना वचनांनी परिपूर्ण बनवण्याचे कार्य करतो आणि तो वचने वापरून लोकांना खूप वेदना सहन करण्यास भाग पडतो तसेच देवाची कृपादेखील मिळवू देतो. कार्याच्या या टप्प्यावर, विजय मिळवणार्यांचा गट तयार होईल आणि त्याने विजय मिळवणार्यांचा हा गट बनवल्यानंतर, ते त्याच्या कृत्यांची साक्ष देण्यास सक्षम होतील, ते वास्तविकतेत जगू शकतील व ते खरोखर त्याला संतुष्ट करतील आणि मृत्यूपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहतील व अशा प्रकारे, देव गौरव प्राप्त करेल. जेव्हा देव गौरव प्राप्त करतो—म्हणजेच, जेव्हा तो लोकांच्या या गटाला परिपूर्ण बनवतो—तेव्हा ते सहस्राब्दी राज्याचे युग असेल.
येशू साडेतेहतीस वर्षे पृथ्वीवर होता, तो वधस्तंभावर चढण्याचे कार्य करण्यासाठी आला आणि वधस्तंभाच्या माध्यमातून देवाला त्याच्या गौरवाचा एक भाग मिळाला. जेव्हा देवाने देह धारण केला, तेव्हा तो नम्र आणि लपून राहण्यास सक्षम होता व प्रचंड दुःख सहन करू शकला. जरी तो स्वतः देव असला, तरीही त्याने सर्व अपमान आणि मानहानी सहन केली व सुटकेचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्याने वधस्तंभावर चढून खूप वेदना सहन केल्या. कार्याचा हा टप्पा संपल्यानंतर, जरी लोकांनी पाहिले, की देवाला मोठा गौरव प्राप्त झाला आहे, तरी हा त्याचा संपूर्ण गौरव नव्हता; तो त्याच्या गौरवाचा फक्त एक भाग होता, जो त्याने येशूकडून मिळवला होता. जरी येशू प्रत्येक त्रास सहन करण्यास, नम्र आणि लपून राहण्यास, देवासाठी वधस्तंभावर चढण्यास सक्षम असला, तरी देवाने केवळ त्याच्या गौरवाचा एक भाग मिळवला व त्याने इस्रायलमध्ये गौरव प्राप्त केला. देवाकडे गौरवाचा आणखी एक भाग अजूनही आहे: व्यावहारिकरित्या कार्य करण्यासाठी आणि लोकांचा गट परिपूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर येणे. येशूच्या कार्याच्या टप्प्यावर, त्याने काही अलौकिक गोष्टी केल्या, परंतु कार्याचा टप्पा कोणत्याही प्रकारे केवळ संकेत आणि चमत्कार करण्यासाठी नव्हता. ते प्रामुख्याने हे दाखवण्यासाठी होते, की येशू दुःख सहन करू शकतो आणि देवासाठी वधस्तंभावर चढू शकतो, येशूला प्रचंड वेदना सहन करणे शक्य होते कारण त्याचे देवावर प्रेम होते आणि जरी देवाने त्याला सोडले, तरीही तो देवाच्या इच्छेसाठी त्याचे जीवन अर्पण करण्यास तयार होता. देवाने इस्रायलमध्ये त्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर आणि येशूला वधस्तंभावर चढवल्यानंतर, देवाला गौरव प्राप्त झाला व त्याने सैतानासमोर साक्ष दिली. चीनमध्ये देव देहधारी कसा झाला आहे हे तुम्हाला माहीतही नाही किंवा तुम्ही ते पाहिलेही नाही, मग देवाला गौरव प्राप्त झाला तुम्ही कसे पाहू शकता? जेव्हा देव तुमच्यामध्ये विजयाचे बरेच कार्य करतो आणि तुम्ही खंबीरपणे उभे राहता, तेव्हा देवाच्या कार्याचा हा टप्पा यशस्वी होतो व हा देवाच्या गौरवाचा भाग असतो. तुम्ही फक्त हेच पाहता आणि देवाने अद्याप तुम्हाला परिपूर्ण बनवायचे आहे, तुमचे हृदय अद्याप पूर्णपणे देवाला द्यायचे आहे. तुम्हाला अजून हे वैभव पूर्णपणे दिसायचे आहे; तुम्ही फक्त हे पाहता, की देवाने तुमचे हृदय आधीच जिंकले आहे, तुम्ही त्याला कधीही सोडू शकत नाही आणि तुम्ही शेवटपर्यंत देवाचे अनुसरण कराल व तुमचे हृदय बदलणार नाही आणि हा देवाचा गौरव आहे. तुम्हाला देवाचा गौरव कशात दिसतो? लोकांमधील त्याच्या कार्याच्या प्रभावामध्ये. लोक पाहतात, की देव खूप प्रेमळ आहे, त्यांच्या अंतःकरणात देव असतो आणि ते त्याला सोडण्यास तयार नसतात व हा देवाचा गौरव असतो. जेव्हा चर्चमधील बंधू-भगिनींचे सामर्थ्य निर्माण होते आणि ते त्यांच्या अंतःकरणातून देवावर प्रेम करू शकतात, देवाने केलेल्या कार्याचे सर्वोच्च सामर्थ्य, त्याच्या वचनांचे अतुलनीय सामर्थ्य पाहू शकतात, जेव्हा ते पाहतात, की त्याच्या वचनांमध्ये अधिकार आहे आणि तो चीनच्या मुख्य भूमीमध्ये, कोणीही राहत नसलेल्या गावात त्याचे कार्य सुरू करू शकतो, जेव्हा लोक अशक्त असले तरी त्यांची अंतःकरणे देवासमोर नतमस्तक होतात आणि ते देवाची वचने स्वीकारण्यास तयार असतात व जेव्हा ते अशक्त आणि अयोग्य असले, तरी ते देवाची वचने किती प्रेमळ आहेत व त्यांच्या प्रेमास किती पात्र आहेत हे पाहण्यास सक्षम असतात, तेव्हा हा देवाचा गौरव असतो. जेव्हा देवाने लोकांना परिपूर्ण बनवण्याचा दिवस येईल आणि लोक त्याच्यापुढे शरण जाण्यास सक्षम असतील व पूर्णपणे देवाची आज्ञा पाळू शकतील आणि त्यांच्या अपेक्षा व भविष्य देवाच्या हातात सोडू शकतील, तेव्हा देवाच्या गौरवाचा दुसरा भाग पूर्णपणे प्राप्त झालेला असेल. याचा अर्थ असा, की जेव्हा व्यावहारिक देवाचे संपूर्ण कार्य पूर्ण होईल, तेव्हा चीनच्या मुख्य भूमीतील त्याचे कार्य समाप्त होईल. दुसऱ्या शब्दांत, देवाने ज्यांना आधीपासूनच निश्चित केले होते आणि ज्यांना निवडले होते ते जेव्हा परिपूर्ण केले जातात, तेव्हा देवाला गौरव प्राप्त होईल. देव म्हणाला, की त्याने त्याच्या गौरवाचा दुसरा भाग पूर्वेकडे आणला आहे, तरीही हे केवळ डोळ्यांना दिसत नाही. देवाने त्याचे कार्य पूर्वेकडे आणले आहे: तो आधीच पूर्वेला आला आहे आणि हा देवाचा गौरव आहे. आज, जरी त्याचे कार्य अद्याप पूर्ण व्हायचे असले, देवाने कार्य करण्याचे ठरवले असल्यामुळे, ते निश्चितपणे पूर्ण होईल. देवाने ठरवले आहे, की तो हे कार्य चीनमध्ये पूर्ण करेल आणि त्याने तुम्हाला परिपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. अशा प्रकारे, तो तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग देत नाही—त्याने तुमची अंतःकरणे आधीच जिंकली आहेत आणि हवे असो किंवा नसो, तुला पुढे जात राहावे लागेल व जेव्हा देव तुम्हाला प्राप्त करतो, तेव्हा देवाला गौरव प्राप्त होतो. आज, देवाला अद्याप पूर्ण गौरव मिळवायचा आहे, कारण तुम्हाला अद्याप परिपूर्ण बनवायचे आहे. जरी तुमची अंतःकरणे देवाकडे परत आली असली तरी, तुमच्या देहात अजूनही बराच अशक्तपणा आहे, तुम्ही देवाला संतुष्ट करण्यास असमर्थ आहात, तुम्ही देवाच्या इच्छेकडे लक्ष देण्यास असमर्थ आहात आणि तुमच्याकडे अजूनही अनेक नकारात्मक गोष्टी आहेत ज्यापासून तुम्ही स्वतःला मुक्त केले पाहिजे व तुम्ही अजूनही अनेक चाचण्या आणि परिष्करणांना सामोरे गेले पाहिजे. केवळ अशा प्रकारे तुमची जीवनप्रवृत्ती बदलू शकते आणि देव तुम्हाला प्राप्त करू शकतो.