जे देवाला ओळखतात तेच देवाची साक्ष देऊ शकतात
देवावर विश्वास ठेवणे आणि देवाला जाणून घेणे हे स्वर्गाद्वारे नियुक्त केले गेले आहे आणि पृथ्वीद्वारे मान्य केले गेले आहे आणि आजचे युग—ज्या युगात देह धारण केलेला देव त्याचे कार्य व्यक्तिशः करत आहे—देवाला जाणून घेण्याची ही विशेषत्वाने चांगली वेळ आहे. देवाला संतुष्ट करणे हे देवाची इच्छा समजून घेण्याच्या पायावर साध्य करता येते आणि देवाची इच्छा समजून घेण्यासाठी, देवाविषयी काही ज्ञान असणे आवश्यक असते. देवाविषयीचे हे ज्ञान म्हणजे देवावर विश्वास ठेवणाऱ्याला असणारी दृष्टीच होय; तो मनुष्याच्या देवावरील विश्वासाचा आधार असतो. हे ज्ञान नसेल, तर मनुष्याचा देवावरील विश्वास अस्पष्ट अवस्थेत, पोकळ सिद्धांतांमध्ये अस्तित्वात असेल. देवाचे अनुसरण करण्याचा अशा लोकांचा संकल्प असला, तरी त्यांना काहीही लाभ होणार नाही. या प्रवाहात ज्यांना काहीही मिळत नाही त्या सर्वांना बाहेर काढून टाकले जाईल—ते सर्व दुसऱ्यांवर अवलंबून असतात. देवाच्या कार्याचा कोणताही टप्पा तू अनुभवत असशील, तरी तुझ्यासोबत एक पराक्रमी दृष्टी असायला हवी. अन्यथा, नवीन कार्याची प्रत्येक पायरी स्वीकारणे तुझ्यासाठी कठीण होईल, कारण देवाचे नवीन कार्य हे मनुष्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे आणि त्याच्या कल्पनेच्या मर्यादेबाहेर आहे. म्हणून, मनुष्याकडे लक्ष ठेवणाऱ्या मेंढपाळाशिवाय, दृष्टीबद्दल सहभागिता राखण्यात गुंतलेल्या मेंढपाळाशिवाय, मनुष्य हे नवीन कार्य स्वीकारण्यास असमर्थ आहे. जर मनुष्याला दृष्टांत मिळू शकत नसेल, तर तो देवाचे नवीन कार्य प्राप्त करू शकत नाही आणि जर मनुष्य देवाच्या नवीन कार्याचे पालन करू शकत नसेल, तर तो देवाची इच्छा समजून घेण्यास असमर्थ ठरेल आणि म्हणून देवाबद्दलचे त्याचे ज्ञान व्यर्थ ठरेल. मनुष्याने देवाचे वचन पूर्ण करण्याआधी, त्याला देवाचे वचन माहीत असले पाहिजे; म्हणजेच, त्याने देवाची इच्छा समजून घेतली पाहिजे. केवळ अशा प्रकारे देवाचे वचन अचूकपणे आणि देवाच्या इच्छेनुसार पूर्ण करता येईल. ही गोष्ट सत्याचा शोध घेणार्या प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे आणि देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येकाने ही प्रक्रिया पार पाडली पाहिजे. देवाचे वचन जाणून घेण्याची प्रक्रिया म्हणजे देव आणि देवाचे कार्य जाणून घेण्याची प्रक्रिया. म्हणून, दृष्टांत जाणून घेणे म्हणजे केवळ देहधारी देवाची मानवता जाणून घेणे नव्हे, तर त्यामध्ये देवाचे वचन आणि कार्य जाणून घेणे हेदेखील समाविष्ट आहे. देवाच्या वचनावरून लोकांना देवाची इच्छा समजते आणि देवाच्या कार्यातून त्यांना देवाची प्रवृत्ती आणि देव काय आहे हे कळते. देवावर विश्वास ही देवाला जाणण्याची पहिली पायरी आहे. देवावरील या प्रारंभिक विश्वासापासून त्याच्यावरील सर्वात गहन विश्वासापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया म्हणजे देवाला ओळखण्याची प्रक्रिया, देवाच्या कार्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया. जर तू केवळ देवावर विश्वास ठेवायचा म्हणून ठेवत असशील आणि त्यामागे देवाला जाणून घेण्याचा हेतू नसेल, तर तुझी श्रद्धा काही खरी नाही आणि ही श्रद्धा शुद्ध होऊ शकत नाही—आणि यात काहीही शंका नाही. मनुष्याने देवाच्या कार्याचा अनुभव घेण्याच्या प्रक्रियेत जर त्याला हळुहळू देवाची ओळख झाली, तर त्याची प्रवृत्ती हळुहळू बदलत जाईल आणि त्याचा विश्वास अधिकाधिक खरा होईल. अशा रीतीने, जेव्हा मनुष्य देवावरील त्याच्या विश्वासामध्ये यश प्राप्त करतो, तेव्हा त्याला पूर्णपणे देव प्राप्त झालेला असतो. देवाने त्याचे कार्य व्यक्तिशः करण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा देह धारण करण्यासाठी इतके परिश्रम घेतले याचे कारण म्हणजे मनुष्याने त्याला ओळखण्यास आणि पाहण्यास सक्षम व्हावे. देवाला ओळखणे[अ] हा देवाच्या कार्याच्या समाप्तीनंतर प्राप्त करण्याचा अंतिम परिणाम आहे; देवाने मानवजातीकडून केलेली ती शेवटची अपेक्षा आहे. याचे कारण म्हणजे, तो हे त्याच्या अंतिम साक्षीसाठी करतो; मनुष्याने शेवटी आणि पूर्णपणे त्याच्याकडे वळावे म्हणून तो हे कार्य करतो. मनुष्याने देवाला ओळखले तरच तो देवावर प्रेम करू शकतो आणि देवावर प्रेम करण्यासाठी त्याने देवाला ओळखले पाहिजे. त्याने कसेही आणि काहीही प्राप्त केले, तरी त्याने देवाचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. केवळ अशा प्रकारे मनुष्य देवाच्या हृदयाला संतुष्ट करू शकतो. देवाला जाणून घेतल्यानेच मनुष्य देवावर खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवू शकतो आणि देवाला जाणून घेतल्यानेच तो खऱ्या अर्थाने देवाचा आदर करू शकतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करू शकतो. जे देवाला ओळखत नाहीत ते कधीही खऱ्या अर्थाने देवाचे आज्ञापालन आणि आदर करण्यापर्यंत पोहोचणार नाहीत. देवाला जाणून घेणे म्हणजे त्याची प्रवृत्ती जाणून घेणे, त्याची इच्छा समजून घेणे आणि तो काय आहे हे जाणून घेणे आहे. तरीही, मनुष्याने कोणताही पैलू जाणला, त्या प्रत्येकासाठी मनुष्याला किंमत मोजावी लागते आणि आज्ञा पाळण्याची इच्छा आवश्यक असते, त्याशिवाय कोणीही शेवटपर्यंत अनुसरण करू शकणार नाही. देवाचे कार्य मनुष्याच्या कल्पनेशी खूप विसंगत आहे. देवाची प्रवृत्ती आणि देव काय आहे हे जाणून घेणे मनुष्यासाठी खूप कठीण आहे आणि देव जे काही बोलतो आणि करतो ते मनुष्याच्या आकलनाबाहेरचे आहे: जर मनुष्य देवाचे अनुसरण करू इच्छित असेल आणि तरीही त्याची आज्ञा पाळण्यास तयार नसेल, तर मनुष्याला काहीही मिळणार नाही. जगाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत, देवाने असे बरेच कार्य केले आहे जे मनुष्यासाठी अनाकलनीय आहे आणि ते स्वीकारणे मनुष्याला कठीण आहे आणि देवाने बरेच काही सांगितले आहे, ज्यामुळे मनुष्याच्या धारणांना दुरुस्त करणे कठीण होते. परंतु मनुष्याला खूप अडचणी आल्या म्हणून त्याने आपले कार्य कधीच थांबवले नाही; त्याउलट, त्याने कार्य करणे आणि बोलणे चालू ठेवले आहे आणि जरी मोठ्या संख्येने “योद्धे” रस्त्याच्या कडेला कोसळले असले, तरीही तो त्याचे कार्य करत आहे आणि त्याच्या नवीन कार्याच्या अधीन होण्यास इच्छुक असलेल्या लोकांचे एकामागून एक गट निवडण्याचे कार्य तो विना-व्यत्यय चालू ठेवतो. त्याला त्या कोसळलेल्या “नायकांबद्दल” दया वाटत नाही, त्याउलट जे त्याचे नवीन कार्य आणि वचने स्वीकारतात, त्यांना जवळ करतो. पण तो अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने का कार्य करत असावा? तो सदैव काही लोकांना का बाहेर काढून टाकत असावा आणि इतरांना का निवडत असावा? तो नेहमी अशी पद्धत का वापरत असावा? त्याच्या कार्याचे उद्दिष्ट हे आहे, की मनुष्याने त्याला ओळखावे आणि अशा प्रकारे त्याच्याकडून प्राप्त करून घ्यावे. जे लोक तो आज करत असलेल्या कार्याच्या अधीन राहू शकतात, त्यांच्यावर कार्य करणे आणि तो आज करत असलेल्या कार्याला विरोध करत त्याने भूतकाळात केलेल्या कार्याच्या अधीन असलेल्यांवर कार्य न करणे हेच त्याच्या कार्याचे तत्त्व आहे. याच कारणामुळे तो इतक्या लोकांना बाहेर काढून टाकत आहे.
देवाला ओळखण्याच्या धड्याचे परिणाम एक किंवा दोन दिवसात साध्य होऊ शकत नाहीत: मनुष्याने अनुभव जमा केले पाहिजेत, दुःख सहन केले पाहिजे आणि खरी अधीनता प्राप्त केली पाहिजे. सर्वप्रथम, देवाच्या कार्यापासून आणि वचनांपासून सुरुवात करा. देवाच्या ज्ञानात काय समाविष्ट आहे, हे ज्ञान कसे मिळवायचे आणि अनुभवांमध्ये देवाला कसे पाहायचे हे तू समजून घेणे अत्यावश्यक आहे. ज्याने अद्याप देवाला ओळखलेले नाही, त्या प्रत्येकाने हेच केले पाहिजे. कोणालाही देवाचे कार्य आणि वचने क्षणार्धात आत्मसात करता येत नाहीत आणि कोणालाही देवाचे संपूर्ण ज्ञान अल्पावधीत प्राप्त करता येत नाही. अनुभवाची एक आवश्यक प्रक्रिया आहे, त्याशिवाय कोणीही देवाला ओळखू शकणार नाही किंवा प्रामाणिकपणे त्याचे अनुसरण करू शकणार नाही. देव जितके जास्त कार्य करतो, तितका माणूस त्याला अधिक ओळखतो. देवाचे कार्य माणसाच्या धारणेशी जितके अधिक विसंगत, तितकेच मनुष्याला त्याच्याबद्दलचे ज्ञान नव्याने होते आणि ते सखोल होते. जर देवाचे कार्य कायमस्वरूपी निश्चित आणि अपरिवर्तनीय राहिले असते, तर मनुष्याला त्याचे फारसे ज्ञान नसते. निर्मितीचा काळ आणि वर्तमान काळाच्या दरम्यान, देवाने कायद्याच्या युगात काय केले, त्याने कृपेच्या युगात काय केले आणि राज्याच्या युगात तो काय करत आहे—या दृष्टीबद्दल तुम्हाला स्पष्ट माहिती असली पाहिजे. तुम्हाला देवाचे कार्य माहीत असणे आवश्यक आहे. येशूचे अनुसरण केल्यानंतरच, आत्म्याने येशूमध्ये केलेल्या बर्याच कार्यांबद्दल पेत्राला हळुहळू कळले. तो म्हणाला, “संपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी मनुष्याच्या अनुभवांवर विसंबून राहणे पुरेसे नाही; देवाच्या कार्यामधील अनेक नवीन गोष्टींमुळे आपल्याला त्याला ओळखण्यास मदत होईल.” सुरुवातीला, पेत्राचा असा विश्वास होता, की येशू हा देवाने पाठवलेला एक प्रेषित आहे आणि त्याने येशूला ख्रिस्त म्हणून पाहिले नाही. यावेळी, जेव्हा तो येशूचे अनुसरण करू लागला, तेव्हा येशूने त्याला विचारले, “सायमन बारजोना, तू माझे अनुसरण करशील का?” पेत्र म्हणाला, “स्वर्गीय पित्याने ज्याला पाठवले आहे, त्याचे मी अनुसरण केले पाहिजे. ज्याला पवित्र आत्म्याने निवडले आहे, त्याला मी कबूल केले पाहिजे. मी तुझे अनुसरण करेन.” हे दिसून येते, की पेत्राला येशूबद्दल काहीच ज्ञान नव्हते; त्याने देवाची वचने अनुभवली होती, स्वतःचा सामना केला होता आणि देवासाठी त्रास सहन केला होता, परंतु त्याला देवाच्या कार्याचे बिलकुल ज्ञान नव्हते. अनुभवाच्या कालावधीनंतर, पेत्राने येशूमध्ये देवाची अनेक कृत्ये पाहिली, त्याने देवाचा प्रेमळपणा पाहिला आणि त्याने येशूमध्ये देवाचा बराच अंश पाहिला. येशूने जी वचने उच्चारली ती मनुष्य बोलू शकला नसता आणि जे कार्य येशूने केले ते कोणाही मनुष्याला करता आले नसते, हेही त्याने पाहिले. एवढेच नव्हे, तर येशूच्या वचनांमध्ये आणि कृतींमध्ये पेत्राने देवाचे बरेच शहाणपण आणि दैवी स्वरूपाचे बरेच कार्य पाहिले. त्याच्या अनुभवांदरम्यान, त्याने स्वतःला तर ओळखलेच, तसेच त्याने येशूच्या प्रत्येक कृतीकडे बारीक लक्ष देखील दिले, त्यातून त्याने अनेक नवीन गोष्टी शोधून काढल्या, म्हणजे, देवाने येशूद्वारे केलेल्या कार्यात प्रत्यक्ष देवाच्या अनेक अभिव्यक्ती होत्या आणि येशूने त्याच्या वचनांमध्ये आणि त्याने केलेल्या कृतींमध्ये, तसेच ज्या पद्धतीने त्याने चर्चचे पालनपोषण केले आणि त्याने केलेले कार्य यामध्ये तो सामान्य माणसापेक्षा वेगळा होता. म्हणून, पेत्राने येशूकडून अनेक धडे घेतले, जे त्याने शिकायला हवे होते आणि येशूला वधस्तंभावर खिळले जाईपर्यंत, त्याला येशूचे विशिष्ट ज्ञान प्राप्त झाले होते—हे ज्ञान येशूवरील त्याच्या आजीवन निष्ठेचा आधार बनले आणि वधस्तंभावर त्याला उलट खिळण्याचे कारण बनले, जे त्याने प्रभूसाठी सहन केले. जरी प्रारंभी त्याच्या काही धारणा होत्या आणि त्याला येशूबद्दल स्पष्ट ज्ञान नव्हते, तरीही अशा गोष्टी अपरिहार्यपणे भ्रष्ट माणसाचा भाग असतात. जेव्हा येशू निघणार होता, तेव्हा त्याने पेत्राला सांगितले, की त्याला वधस्तंभावर खिळणे म्हणजेच तो जे कार्य करायला आला होता तेच आहे: हे आवश्यक होते, की त्याला वयामुळे सोडले जावे आणि या अपवित्र आणि वृद्धत्वामुळे त्याला वधस्तंभावर खिळले पाहिजे; तो पापविमोचनाचे कार्य पूर्ण करण्यासाठी आला होता आणि हे कार्य पूर्ण केल्यावर, त्याची सेवा समाप्त होणार होती. हे ऐकून पेत्र दु:खाने ग्रासला आणि तो येशूशी आणखीनच जोडला गेला. जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा पेत्र एकांतात खूप रडला. त्याआधी त्याने येशूला विचारले होते, “माझ्या प्रभू! तू म्हणतोस, की तुला वधस्तंभावर खिळले जाईल. तू गेल्यानंतर, आम्ही तुला पुन्हा कधी भेटू?” त्यांच्या बोलण्यात भ्रष्ट घटक नव्हता का? त्यामध्ये काही धारणा मिसळलेल्या नव्हत्या का? त्याच्या अंतःकरणात, त्याला माहीत होते, की येशू देवाच्या कार्याचा एक भाग पूर्ण करण्यासाठी आला होता आणि येशू गेल्यानंतर आत्मा त्याच्याबरोबर असेल; जरी त्याला वधस्तंभावर खिळले जाईल आणि तो स्वर्गात जाईल, तरीही देवाचा आत्मा त्याच्याबरोबर असेल. त्या वेळी, पेत्राला येशूबद्दल काही ज्ञान होते: त्याला माहीत होते की येशूला देवाच्या आत्म्याने पाठवले होते, देवाचा आत्मा त्याच्यामध्ये होता आणि येशू स्वतः देव होता, तो ख्रिस्त होता. तरीसुद्धा, येशूवरील त्याच्या प्रेमामुळे आणि त्याच्या मानवी अशक्तपणामुळे, पेत्राने असे वचन उच्चारले. देवाच्या कार्याच्या प्रत्येक पायरीवर, जर एखाद्याने निरीक्षण केले आणि परिश्रमपूर्वक अनुभव घेतला, तर मनुष्याला हळुहळू देवाचे प्रेम आढळून येईल. आणि पौलाने त्याच्या दृष्टीसाठी काय घेतले? जेव्हा येशूने त्याला दर्शन दिले, तेव्हा पौला म्हणाला, “प्रभू, तू कोण आहेस?” येशू म्हणाला, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.” ही पौलाची दृष्टी होती. पेत्राने येशूचे पुनरुत्थान, त्याचे ४० दिवस दिसणे आणि येशूच्या जीवनकाळातील शिकवण यांचा त्याच्या प्रवासाच्या अंतापर्यंत दृष्टांत म्हणून स्वीकार केला.
मनुष्य देवाच्या कार्याचा अनुभव घेतो, स्वत:ला ओळखू लागतो, स्वतःची भ्रष्ट प्रवृत्ती दूर करतो आणि जीवनात वृद्धी शोधतो, हे सर्व देवाला जाणून घेण्यासाठी करतो. जर तू फक्त स्वतःला जाणून घ्यायचा आणि स्वतःच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा सामना करू इच्छित असशील, परंतु देव मनुष्यावर काय कार्य करतो, त्याचे तारण किती महान आहे किंवा तू देवाच्या कार्याचा अनुभव कसा घेतोस आणि त्याची कृत्ये कशी पाहतोस, याचे तुला ज्ञान नसेल, तर मग तुझा हा अनुभव फसवा आहे. जर तुला असे वाटत असेल, की एखाद्या व्यक्तीने सत्य आचरणात आणल्याने आणि सहन करण्यास सक्षम असल्यामुळेच जीवन परिपक्व झाले आहे, तर याचा अर्थ असा, की तू अद्यापही जीवनाचा खरा अर्थ किंवा मनुष्याला परिपूर्ण करण्याचा देवाचा उद्देश जाणलेलाच नाहीस. एखाद्या दिवशी, तू धार्मिक चर्चमध्ये, पश्चात्ताप चर्चच्या सदस्यांमध्ये किंवा लाइफ चर्चच्या सदस्यांमध्ये असशील, तेव्हा अनेक श्रद्धाळू लोक भेटतील, ज्यांच्या प्रार्थनांमध्ये “दृष्टांत” असतील आणि जे जीवन जगताना वचनांमुळे भारावून जातात आणि त्याद्वारे त्यांना मार्गदर्शन केले जाते. शिवाय, ते बऱ्याच बाबतीत सहन करण्यास आणि स्वतःचा त्याग करण्यास सक्षम असतात आणि ते देहाचे ऐकत नाहीत. त्या वेळी, तुला फरक सांगता येणार नाही: तुझा विश्वास असेल, की ते जे काही करतात ते बरोबर आहे, ही जीवनाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे आणि ते ज्या नावावर विश्वास ठेवतात, ते चुकीचे आहे ही मोठी खेदजनक गोष्ट आहे. अशी मते मूर्खपणाची नाहीत का? अनेकांमध्ये जीवच नसतो, असे का म्हणतात? कारण ते देवाला ओळखत नाहीत आणि म्हणून असे म्हणतात, की त्यांच्या अंतःकरणात देव नाही आणि त्यांना जीवन नाही. जर तुझा देवावरील विश्वास अशा टप्प्यावर पोहोचला असेल, जिथे तू देवाची कृत्ये, देवाची वास्तविकता आणि देवाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा पूर्णपणे जाणून घेऊ शकत असशील, तर तुला सत्य प्राप्त झाले आहे. जर तुला देवाचे कार्य आणि प्रवृत्ती माहीत नसेल, तर तुझ्या अनुभवात अजूनही काहीतरी उणीव आहे. येशूने त्याच्या कार्याचा तो टप्पा कसा पार पाडला, हा टप्पा कसा पार पाडला जात आहे, देवाने कृपेच्या युगात त्याचे कार्य कसे केले आणि कोणते कार्य केले, या टप्प्यात कोणते कार्य केले जात आहे—जर तुला या गोष्टींची सखोल माहिती नसेल, तर तुला कधीही खात्री वाटणार नाही आणि तू नेहमीच असुरक्षित राहशील. जर, अनुभवाच्या कालावधीनंतर, तू देवाने केलेले कार्य आणि त्याच्या कार्याची प्रत्येक पायरी जाणून घेण्यास सक्षम असशील आणि देवाची वचने बोलण्याचे उद्दिष्ट आणि त्याने बोललेली एवढी वचने का पूर्ण झाली नाहीत याचे संपूर्ण ज्ञान तुला प्राप्त झाले असेल, तर तू धैर्याने आणि न थांबता, चिंता आणि परिष्कृततेपासून मुक्त होऊन पुढच्या मार्गावर चालू शकतोस. देव त्याचे इतके कार्य कोणत्या माध्यमाद्वारे साध्य करतो, हे तुम्ही पाहायला हवे. तो बोलतो ती वचने तो वापरतो, अनेक प्रकारच्या शब्दांद्वारे तो माणसाला परिष्कृत करतो आणि त्याच्या धारणांमध्ये परिवर्तन घडवून आणतो. तुम्ही जे काही दु:ख सहन केले आहे, तुम्ही सहन केलेले सर्व परिष्करण, तुम्ही तुमच्यात स्वीकारलेले व्यवहार, तुम्ही अनुभवलेले ज्ञान—हे सर्व देवाने सांगितलेल्या वचनांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. मनुष्य देवाचे अनुकरण कोणत्या कारणाने करतो? देवाच्या वचनांमुळे तो अनुसरण करतो! देवाची वचने खूप गूढ आहेत आणि त्यांच्यामुळे माणसाचे हृदय हेलावून जाते, त्यामध्ये खोलवर दडलेल्या गोष्टी बाहेर येतात, भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्याला कळू शकतात आणि भविष्यात प्रवेश करू शकतात. म्हणून देवाच्या वचनांमुळे मनुष्य दुःख सहन करतो आणि देवाच्या वचनांमुळेच तो परिपूर्ण देखील होतो: केवळ यावेळी मनुष्य देवाचे अनुसरण करतो. या अवस्थेत मनुष्याने काय केले पाहिजे, ते म्हणजे देवाची वचने स्वीकारायला हवीत. आणि तो परिपूर्ण बनला असो वा नसो, परिष्कृत केला गेला असो वा नसो, देवाची वचने हीच मुख्य आहेत. हे देवाचे कार्य आहे आणि हीच दृष्टी आज माणसाला कळायला हवी.
देव माणसाला परिपूर्ण कसा बनवतो? देवाची प्रवृत्ती काय आहे? त्याच्या प्रवृत्तीमध्ये काय सामावलेले आहे? या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यासाठी: कोणी याला देवाच्या नावाचा प्रसार म्हणतो, कोणी त्याला देवाची साक्ष देणे म्हणतो आणि कोणी त्याला देवाचा गौरव म्हणतो. मनुष्य, देवाला जाणण्याच्या पायावर आधारित, शेवटी त्याच्या जीवनाच्या प्रवृत्तीत परिवर्तन घडवून आणेल. मनुष्य जितका अधिक हाताळला जातो आणि परिष्कृत होतो, तितका तो अधिक उत्साही होतो; देवाची पावले जितकी जास्त कार्य करतात तितका माणूस परिपूर्ण होतो. आज, मनुष्याच्या अनुभवात, देवाच्या कार्याची प्रत्येक पायरी त्याच्या धारणांवर प्रहार करते आणि सर्व काही मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आणि त्याच्या अपेक्षांच्या बाहेर आहे. देव मनुष्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवतो आणि प्रत्येक बाबतीत हे त्याच्या धारणांशी विसंगत आहे. तू अशक्त असताना देव त्याची वचने उच्चारतो; केवळ अशा प्रकारे तो तुला जीवन पुरवू शकतो. तुझ्या धारणांवर प्रहार करून, तो तुला देवाचा व्यवहार स्वीकारायला लावतो; केवळ अशा प्रकारे तू तुझ्या भ्रष्टाचारापासून मुक्त होऊ शकतोस. आज, देहधारी देव एका बाबतीत देवत्वाच्या स्थितीत कार्य करतो, परंतु दुसर्या बाबतीत तो सामान्य मनुष्याच्या स्थितीत कार्य करतो. जेव्हा तू देवाचे कोणतेही कार्य नाकारणे थांबवतोस, जेव्हा सामान्य मानवतेच्या स्थितीत देव काय म्हणतो किंवा करतो त्याची पर्वा न करता तू अधीन होऊ शकतोस आणि तो कोणत्या प्रकारची सामान्यता प्रकट करतो याची पर्वा न करता तू अधीन होऊ शकतोस आणि समजून घेऊ शकतोस आणि जेव्हा तुला प्रत्यक्ष अनुभव आला असेल, तेव्हाच तो देव आहे याची तू खात्री बाळगू शकतोस, तेव्हाच तू धारणा निर्माण करणे थांबवशील आणि तेव्हाच तू त्याचे अंतापर्यंत अनुसरण करू शकशील. देवाच्या कार्यात शहाणपण आहे आणि मनुष्य त्याच्या साक्षीत कसा उभा राहू शकतो, हेही त्याला माहीत आहे. मनुष्याची मोठी कमकुवत बाजू कोणती हे त्याला माहीत आहे आणि तो जी वचने बोलतो, ती तुझ्या या कमकुवत बाजूवर आघात करू शकतात, परंतु तो त्याच्या भव्य आणि शहाणपणाच्या वचनांचा वापर करून तुला त्याची साक्ष देण्यास ठाम ठेवतो. देवाची कृत्ये अशा चमत्कृतीपूर्ण आहेत. देव जे कार्य करतो ते मानवी बुद्धीला अकल्पनीय आहे. मनुष्याला, देहस्वरूपात, कोणत्या प्रकारच्या भ्रष्टाचाराने ग्रासले आहे आणि मनुष्याचे सार काय आहे—हे सर्व देवाच्या न्यायाने प्रकट झाले आहे, त्यामुळे मनुष्याला त्याच्या लज्जेपासून लपण्यास कोठेही स्थान नाही.
देव न्याय आणि ताडणाचे कार्य करतो, जेणेकरून मनुष्याला त्याच्याविषयी ज्ञान मिळावे आणि त्याची साक्ष देता यावी. मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीवर त्याने बोट ठेवले नाही, तर मनुष्याला स्वतःच्या नीतिमान प्रवृत्तीची ओळखच होणार नाही, त्यामध्ये कोणताही गुन्हा नाही आणि मनुष्य देवाबद्दलचे त्याचे जुने ज्ञान नवीन ज्ञानामध्ये बदलू शकणार नाही. त्याच्या साक्षीसाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी, तो स्वतःला संपूर्णपणे सार्वजनिक करतो, अशा प्रकारे सार्वजनिक दर्शन देऊन तो मनुष्याला देवाचे ज्ञान प्राप्त करण्यास, त्याच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यास आणि त्याच्या प्रवृत्तीची उत्कृष्ट साक्ष देण्यास सक्षम करतो. मनुष्याच्या प्रवृत्तीचे परिवर्तन हे देवाच्या अनेक प्रकारच्या कार्यांतून साध्य होते; त्याच्या प्रवृत्तीत अशा बदलांशिवाय, मनुष्य देवाची साक्ष देण्यासाठी आणि देवाच्या अंतःकरणाच्या ओढीसाठी असमर्थ असेल. मनुष्याच्या प्रवृत्तीतील परिवर्तन म्हणजे मनुष्य सैतानाच्या गुलामगिरीतून आणि अंधाराच्या प्रभावातून मुक्त झाला आहे आणि खरोखरच देवाच्या कार्याचा आदर्श, देवाचा साक्षीदार बनला आहे आणि त्याला देवाच्या अंतःकरणाची आस आहे. आज, देहधारी देव पृथ्वीवर त्याचे कार्य करण्यासाठी आला आहे आणि मनुष्याने त्याचे ज्ञान प्राप्त करायला हवे, त्याच्या आज्ञा पाळायला हव्यात, त्याची साक्ष द्यायला हवी, त्याचे प्रत्यक्ष आणि सामान्य कार्य जाणून घ्यायला हवे, मनुष्याच्या धारणांशी सुसंगत नसलेल्या त्याच्या सर्व वचनांचे आणि कार्यांचे पालन करायला हवे आणि माणसाला वाचवण्यासाठी तो करत असलेल्या सर्व कार्यांची, तसेच मनुष्याला जिंकून घेण्यासाठी त्याने केलेल्या सर्व कृत्यांची साक्ष द्यायला हवी. जे देवाची साक्ष देतात त्यांना देवाचे ज्ञान असले पाहिजे; केवळ या प्रकारची साक्ष अचूक आणि खरी आहे आणि केवळ अशा प्रकारची साक्ष सैतानाला लज्जित करेल. देव त्याची साक्ष देण्यासाठी त्यांनाच वापरतो, ज्यांनी देवाचा निर्णय आणि ताडण, व्यवहार आणि काटछाट यांतून पार होऊन देवाला जाणून घेतले आहे. तो त्याची साक्ष देण्यासाठी त्यांचा वापर करतो, ज्यांना सैतानाने भ्रष्ट केले आहे, त्याचप्रमाणे तो त्यांचा वापर करतो ज्यांनी आपल्या प्रवृत्तीत परिवर्तन घडवून त्याचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत. मनुष्याने आपल्या मुखाने त्याची प्रशंसा करण्याची त्याला गरज नाही किंवा ज्यांना त्याने तारले आहे अशा सैतानाच्या लोकांची स्तुती आणि साक्षही त्याला नको. केवळ जे देवाला ओळखतात तेच त्याची साक्ष देण्यास पात्र आहेत आणि ज्यांच्या प्रवृत्तीत परिवर्तन झाले आहे, तेच त्याची साक्ष देण्यास पात्र आहेत. देव मनुष्याला जाणीवपूर्वक आपल्या नावाला बट्टा लावू देणार नाही.
तळटीप:
अ. मूळ मजकुरामध्ये “देवाला जाणून घेण्याचे कार्य” असे म्हटले आहे.