तू भविष्यातील कामगिरीमध्ये कसे सहभागी व्हावे?
प्रत्येक युगात देवाने अभिव्यक्त केलेला स्वभाव, त्या युगाचे महत्त्व सुयोग्यपणे व्यक्त करणाऱ्या भाषेद्वारे, तू ठोसपणे सांगू शकतोस का? देवाच्या शेवटच्या दिवसांच्या कार्याचा अनुभव घेणारा तू देवाच्या नीतिमान प्रवृत्तीचे तपशीलवार वर्णन करण्यास सक्षम आहेस का? तू देवाच्या प्रवृत्तीविषयी स्पष्टपणे आणि अचूकपणे साक्ष देऊ शकतोस का? तू जे पाहिलेस व अनुभवलेस, ते नीतिमत्त्वाची भूक आणि तहान असलेल्या व पालनपोषण करण्यासाठी तुझी वाट पाहत असलेल्या दयनीय, गरीब आणि श्रद्धाळू धार्मिक विश्वासूंपर्यंत कसे पोहोचवशील? तू त्यांचे पालनपोषण करावेस यासाठी कोणत्या प्रकारचे लोक वाट पाहत आहेत? तू कल्पना करू शकतोस का? तुझ्या खांद्यावरचे ओझे, तुझ्यावर सोपवलेली कामगिरी आणि तुझी जबाबदारी याची तुला जाणीव आहे का? ऐतिहासिक कामगिरीची तुझी जाणीव कुठे आहे? पुढील युगात तू धनी म्हणून पुरेशी सेवा कशी करशील? तुमच्याकडे धनी बनण्याची तीव्र भावना आहे का? तू सर्व गोष्टींचा धनी कसा समजावून सांगशील? तो खरोखरच सर्व सजीव प्राण्यांचा व जगातील सर्व भौतिक गोष्टींचा धनी आहे का? कार्याच्या पुढील टप्प्याच्या प्रगतीसाठी तुझ्याकडे काय योजना आहेत? किती लोक तू त्यांचे पालनपोषण करावेस यासाठी वाट पाहत आहेत? तुझे कार्य प्रभावी आहे का? ते गरीब, दयनीय, आंधळे, आणि गोंधळलेले आहेत, अंधारात रडत आहेत—मार्ग कुठे आहे? इतक्या वर्षांपासून मनुष्यावर अत्याचार करणाऱ्या अंधाराच्या शक्तींना दूर करण्यासाठी एका तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे अचानक प्रकाश यावा यासाठी ते कसे तळमळत आहेत. त्यांच्यामध्ये किती उत्कंठ आशा असते आणि त्यासाठी ते रात्रंदिवस कसे झुरतात हे कोणाला माहीत असू शकते? ज्या दिवशी प्रकाश लोटतो त्या दिवशीही, हे अतोनात दुःख भोगणारे लोक सुटकेच्या आशेशिवाय अंधाऱ्या कोठडीत कैद असतात; ते आता रडायचे कधी थांबतील? या नाजूक आत्म्यांचे दुर्दैव आहे, की त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही व त्यांना या अवस्थेत निर्दयी बंधनांनी आणि गोठलेल्या इतिहासाने बरेच दिवस जखडून ठेवले आहे. आणि त्यांच्या रडण्याचा आवाज कोणी ऐकला आहे? त्यांची दयनीय अवस्था कोणी पाहिली? देवाचे अंतःकरण किती उदास व चिंताग्रस्त आहे असे कधी तुझ्या मनात आले आहे का? त्याने ज्या निर्दोष मानवजातीला स्वतःच्या हातांनी निर्माण केले तिला अशा यातना भोगताना तो कसा पाहू शकेल? शेवटी, मनुष्यालाच विषबाधा झाली आहे. आणि जरी मनुष्य आजपर्यंत टिकून राहिला असला, तरी मानवजातीला त्या दुष्टाने फार पूर्वीपासून विष दिले आहे हे कोणाला माहीत असेल? तू पीडितांपैकी एक आहेस हे तू विसरलास का? या वाचलेल्यांना वाचवण्यासाठी तू देवावरील तुझ्या प्रेमापोटी प्रयत्न करण्यास तयार नाहीस का? मानवजातीवर स्वतःच्या रक्तामांसाप्रमाणे प्रेम करणाऱ्या देवाची परतफेड करण्यासाठी तू तुझी सर्व शक्ती खर्च करण्यास तयार नाहीस का? सर्व विचार करता, तू तुझे असाधारण जीवन जगण्यासाठी देवाने वापरल्याचा अर्थ कसा घेशील? धार्मिक, देवाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचे अर्थपूर्ण जीवन जगण्याचा निश्चय आणि आत्मविश्वास तुझ्यामध्ये खरोखर आहे का?