विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (४)

परिपूर्ण होणे म्हणजे काय? विजयी होणे म्हणजे काय? लोकांवर विजय मिळवण्यासाठी कोणते निकष पूर्ण केले पाहिजेत? आणि ते परिपूर्ण होण्यासाठी कोणते निकष पूर्ण केले पाहिजेत? विजय मिळवणे आणि परिपूर्ण करणे या दोन्ही गोष्टी मनुष्याला परिपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आहेत, जेणेकरून तो त्याच्या मूळ प्रतिमेत परत येईल आणि त्याच्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीपासून आणि सैतानाच्या प्रभावापासून मुक्त होईल. हा विजय मनुष्याच्या कार्याच्या प्रक्रियेत लवकर येतो; खरंच, ही कार्याची पहिली पायरी आहे. परिपूर्ण होणे ही दुसरी पायरी आहे आणि ती कार्याची सांगता आहे. प्रत्येक मनुष्याला विजयी होण्याच्या प्रक्रियेतून जावे लागते. तसे न केल्यास, त्यांना देवाविषयी जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नसेल किंवा देव आहे याची त्यांना जाणीवही नसेल, म्हणजेच, देवाला मानणे त्यांना अशक्य होईल. आणि जर लोक देवाला मानत नसतील, तर देवाने त्यांना परिपूर्ण करणे देखील अशक्य आहे, कारण तू या पूर्णतेचे निकष पूर्ण करत नाहीस. जर तू देवाला मानतही नसशील, तर तू त्याला कसे ओळखू शकशील? तू त्याचे अनुसरण कसे करू शकशील? तू त्याचा साक्षीदार होऊ शकणार नाहीस आणि त्याला संतुष्ट करण्यासाठी तुझी श्रद्धा असणे तर दूरच. म्हणून, ज्याला परिपूर्ण बनवायचे आहे, त्याच्यासाठी पहिली पायरी म्हणजे विजयाचे कार्य करणे आवश्यक आहे. ही पहिली अट आहे. परंतु एखाद्यावर विजय मिळवणे आणि परिपूर्ण करणे या दोन्ही गोष्टी लोकांवर कार्य करण्यासाठी आणि त्यांना बदलण्यासाठी आहेत आणि यातील प्रत्येक गोष्ट मनुष्याच्या व्यवस्थापनाच्या कार्याचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीला परिपूर्ण करण्यासाठी दोन्ही पायऱ्या आवश्यक आहेत आणि त्यांपैकी कोणत्याही पायरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे खरे आहे, की “एखाद्यावर विजय मिळवणे” हे ऐकायला फार चांगले वाटत नाही, परंतु प्रत्यक्षात, एखाद्यावर विजय मिळवण्याची प्रक्रिया ही त्यांना बदलण्याची प्रक्रिया आहे. एकदा का तुझ्यावर विजय मिळवला की, तुझी भ्रष्ट प्रवृत्ती कदाचित पूर्णपणे नाहीशी झाली नाही, तरी तू ती ओळखलेली असशील. विजयाच्या कार्याद्वारे, तुला तुझी नीच माणुसकी, तसेच तुझी स्वतःची अवज्ञा कळली असेल. जरी विजयाच्या कार्याच्या अल्प कालावधीत तू या गोष्टी टाकून देऊ शकत नसशील किंवा बदलू शकत नसशील, तरी तू त्या ओळखू शकशील आणि यामुळे तुझ्या परिपूर्णतेचा पाया घातला जाईल. अशाप्रकारे, लोकांना बदलण्यासाठी, त्यांना त्यांच्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीपासून मुक्त करण्यासाठी विजय मिळवणे आणि परिपूर्ण करणे या दोन्ही गोष्टी केल्या जातात, जेणेकरून ते स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करू शकतील. विजय मिळवणे ही केवळ लोकांची प्रवृत्ती बदलण्याची पहिली पायरी आहे, तसेच लोकांनी स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करण्याची पहिली पायरी आहे आणि ती परिपूर्ण होण्याच्या पायरीपेक्षा कमी आहे. ज्याच्यावर विजय मिळवला त्या व्यक्तीच्या जीवनाची प्रवृत्ती परिपूर्ण केलेल्या व्यक्तीच्या तुलनेत खूपच कमी बदलते. विजय मिळवणे आणि परिपूर्ण होणे हे वैचारिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे आहेत, कारण ते कार्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि ते लोकांना वेगवेगळ्या मानकांमध्ये धरून ठेवतात; विजय लोकांना खालच्या दर्जावर ठेवतो, तर परिपूर्णता त्यांना उच्च दर्जावर ठेवते. परिपूर्ण लोक नीतिमान असतात, लोकांना पवित्र केले जाते; ते लोक मानवतेच्या व्यवस्थापनाचे स्फटीकरूप किंवा अंतिम उत्पादन आहेत. जरी ते परिपूर्ण मनुष्य नसले, तरी ते अर्थपूर्ण जीवन जगू पाहणारे लोक आहेत. तर दुसरीकडे, विजय मिळवलेले लोक केवळ वचनात देवाचे अस्तित्व मान्य करतात; ते मान्य करतात की देवाने देह धारण केला आहे, वचन देहात प्रकट झाले आहे आणि देव न्याय आणि ताडण देण्याचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. ते हेदेखील मान्य करतात, की देवाचा न्याय आणि ताडण आणि त्याचा मार आणि परिष्करण हे सर्व मनुष्यासाठी फायदेशीरच आहेत. त्यांना अलीकडेच काहीशी मानवी समानता मिळू लागली आहे. त्यांच्याकडे जीवनाबद्दल काही अंतर्दृष्टी आहे, परंतु तरीही ते त्यांच्यासाठी अस्पष्टच आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, ते नुकतेच माणुसकी बाळगू लागले आहेत. हे विजय मिळवण्याचे परिणाम आहेत. जेव्हा लोक परिपूर्णतेच्या मार्गावर पाऊल ठेवतात, तेव्हा त्यांच्या जुन्या प्रवृत्ती बदलण्यास सक्षम असतात. पुढे, त्यांचे जीवन वृद्धिंगत होत जाते आणि ते हळुहळू सत्यात अधिक खोलवर प्रवेश करतात. ते जगाचा आणि सत्याचा पाठलाग न करणाऱ्या सर्वांचा तिरस्कार करण्यास सक्षम असतात. ते विशेषतः स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु त्याहूनही अधिक ते स्वतःला स्पष्टपणे ओळखतात. ते सत्याने जगण्यास तयार असतात आणि सत्याचा पाठपुरावा करणे हे त्यांचे ध्येयच असते. ते त्यांच्या स्वतःच्या मेंदूने निर्माण केलेल्या विचारांमध्ये राहण्यास तयार नसतात आणि त्यांना मनुष्याची स्व-नीतिमानता, अहंकार आणि स्वाभिमानाचा तिरस्कार वाटतो. ते योग्यतेच्या तीव्र भावनेने बोलतात, समज आणि शहाणपणाने गोष्टी हाताळतात आणि देवाशी एकनिष्ठ व आज्ञाधारक असतात. जर त्यांच्यापुढे ताडण आणि न्यायाचा प्रसंग आला, तर ते निष्क्रीय किंवा कमकुवत होत नाहीत, एवढेच नव्हे तर देवाकडून मिळालेली ही ताडण आणि न्यायाबद्दल ते कृतज्ञ असतात. त्यांचा असा विश्वास असतो, की ते देवाची ताडण आणि न्यायाशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचे संरक्षण होते. ते शांती आणि आनंद देणाऱ्या श्रद्धेचा आणि भूक भागवण्यासाठी भाकर शोधण्याच्या पाठपुरावा करत नाहीत. ते क्षणभंगुर देहभोगांच्या मागे धावत नाहीत. जे परिपूर्ण आहेत त्यांच्या बाबतीत हेच घडते. लोकांवर विजय मिळवल्यानंतर, देव आहे हे मान्य करतात, परंतु ही पावती त्यांच्यामध्ये मर्यादित मार्गांनी प्रकट होते. देहात दिसणाऱ्या वचनाचा नेमका अर्थ काय? देहधारण म्हणजे काय? देहधारी देवाने काय केले आहे? त्याच्या कार्याचे ध्येय आणि महत्त्व काय आहे? त्याचे इतके कार्य अनुभवल्यानंतर, देहात त्याची कृत्ये अनुभवल्यानंतर, तुला काय मिळाले आहे? या सर्व गोष्टी समजून घेतल्यावरच तुझ्यावर विजय मिळवता येईल. जर तू केवळ देव आहे हे मान्य करत असल्याचे म्हणत असशील, परंतु ज्याचा त्याग करायला हवा, तो करत नसशील आणि जे देह सुख सोडले पाहिजे, ते सोडण्यास असमर्थ असशील, उलट नेहमीप्रमाणेच देह सुखाची लालसा चालू ठेवत असशील आणि जर भाऊ आणि बहिणींबद्दलचे पूर्वग्रह सोडून देऊ शकत नसशील आणि अनेक सोप्या पद्धती पार पाडण्यासाठी कोणतीही किंमत मोजू शकत नसशील, तर हे सिद्ध होते, की तुझ्यावर अद्याप विजय मिळवलेला नाही. अशावेळी, तुला खूप काही समजलेले असेल, तरी ते सर्व व्यर्थ ठरेल. ज्या लोकांनी काही प्रारंभिक बदल आणि प्रारंभिक प्रवेश साध्य केले आहेत त्याच लोकांवर विजय मिळवला जातो. देवाचा न्याय आणि ताडण अनुभवल्याने लोकांना देवाचे प्रारंभिक ज्ञान आणि सत्याची प्रारंभिक समज मिळते. तू सखोल, अधिक तपशीलवार सत्यांच्या वास्तविकतेत पूर्णपणे प्रवेश करण्यास असमर्थ असशील, परंतु वास्तविक जीवनात तू तुझे शारीरिक उपभोग किंवा वैयक्तिक स्थिती यांसारखी अनेक प्राथमिक सत्ये आचरणात आणू शकशील. हा सर्व विजय मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये साध्य झालेला प्रभाव आहे. विजय मिळवलेल्यांमध्येदेखील प्रवृत्तीतील बदल दिसून येतात; उदाहरणार्थ, त्यांचा पेहराव आणि स्वतःला सादर करण्याची पद्धत, ते कसे राहतात—हे सर्व बदलू शकते. देवावर विश्वास ठेवण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो, ते त्यांच्या प्रयत्नांच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट आहेत आणि त्यांच्या आकांक्षा उच्च असतात. विजयाच्या कार्यादरम्यान, त्यांच्या जीवनाच्या प्रवृत्तीतदेखील संबंधित बदल घडतात. तेथे बदल असतात, परंतु ते वरवरचे, प्राथमिक आणि परिपूर्ण झालेल्या व्यक्तींच्या प्रवृत्तीतील बदल आणि उद्दिष्टांपेक्षा खूपच कनिष्ठ असतात. जर, विजय मिळवण्याच्या ओघात, एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती अजिबात बदलली नाही, आणि त्यांना कोणतेही सत्य प्राप्त झाले नाही, तर ही व्यक्ती निव्वळ कचरा असते आणि पूर्णपणे निरुपयोगी असते! ज्या लोकांवर विजय मिळवलेला नाही, ते परिपूर्ण होऊ शकत नाहीत! जर एखाद्या व्यक्तीने फक्त विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तर, विजयाच्या कार्यादरम्यान त्यांच्या प्रवृत्तीत काही संबंधित बदल दिसून आले, तरीही ते परिपूर्ण होऊ शकत नाहीत. त्यांनी प्राप्त केलेली प्रारंभिक सत्येदेखील ते गमावतील. विजय मिळवलेल्या आणि परिपूर्ण झालेल्यांच्या प्रवृत्तीतील बदलांमध्ये खूप फरक आहे. पण विजय मिळवणे ही बदलाची पहिली पायरी आहे; तो पाया आहे. या प्रारंभिक बदलाचा अभाव म्हणजे त्या व्यक्तीला देव मुळीच माहित नाही, याचा पुरावा आहे, कारण हे ज्ञान न्यायातून येते आणि असा न्याय हा विजयाच्या कार्याचा एक प्रमुख भाग आहे. म्हणूनच, ज्यांना परिपूर्ण बनवले आहे त्यांच्यावर प्रथम विजय मिळवला पाहिजे; अन्यथा, त्यांना परिपूर्ण होण्याचा कोणताही मार्ग नाही.

तू म्हणतोस, की तू देहधारी देवाला स्वीकारतोस, आणि देहात प्रकट होणारे वचन मान्य करतोस, तरीही तू त्याच्या पाठीमागे काही गोष्टी करतोस, या गोष्टी त्याने सांगितलेल्या गोष्टींच्या विरुद्ध असतात आणि तुझ्या अंत:करणात त्याच्याबद्दल भीती नसते. हे देवाला मानणे आहे का? तो जे म्हणतो ते तू मान्य करतोस, परंतु जे करणे शक्य आहे ते तू आचरणात आणत नाहीस किंवा त्याच्या मार्गाचे पालन करत नाहीस. हे देवाला मानणे आहे का? आणि तू त्याला मान्य केलेस तरी, तुझी मानसिकता केवळ त्याच्याबद्दल सावधगिरीची असते, आदराची नाही. जर तू त्याचे कार्य पाहिले असशील आणि मान्य केले असशील आणि तो देव आहे हे तुला माहीत असेल, तरीही तू शांत आणि पूर्णपणे अपरिवर्तित राहिलास, तर तू अशा प्रकारची व्यक्ती आहेस ज्यांच्यावर अद्याप विजय मिळवलेला नाही. ज्यांच्यावर विजय मिळवला आहे, त्यांनी शक्य ते सर्व करणे आवश्यक आहे आणि जरी ते उच्च सत्यांमध्ये प्रवेश करू शकत नसतील आणि ही सत्ये त्यांच्या पलीकडे असली तरी, असे लोक त्यांच्या अंतःकरणात हे प्राप्त करण्यास इच्छुक असतात. कारण ते काय स्वीकारू शकतात याला मर्यादा आहेत, त्यामुळे त्यांच्या आचरणाला मर्यादा पडतात. मात्र त्यांनी किमान शक्य तितके केले पाहिजे आणि जर तू ते साध्य करू शकशील, तर हा विजयाच्या कार्यामुळे प्राप्त झालेला परिणाम असेल. समजा तू म्हणतोस, “मनुष्य मांडू शकत नाही, इतकी वचने तो मांडतो. जर तो देव नसेल, तर मग कोण आहे?” असे विचार म्हणजे तुम्ही देवाला मानता असे होत नाही. जर तुम्ही देवाला मानत असाल तर तुम्ही ते तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले पाहिजे. जर तुम्ही चर्चचे नेतृत्व करत असाल, तरीही धार्मिकतेने आचरण करत नसाल, जर तुम्हाला पैसा आणि संपत्ती हवी असेल आणि चर्चचा निधी सदैव स्वतःच्या खिशात टाकत असाल, तर हे देवाला मानणे आहे का? देव सर्वशक्तिमान आहे आणि तो पूज्य आहे. जर तू खरोखरच देव आहे हे मान्य करतोस तर तुला भीती कशी वाटत नाही? जर तू अशी घृणास्पद कृत्ये करत असशील, तर तू खरोखरच त्याला मानतोस का? तू ज्यावर विश्वास ठेवतोस, तो देव आहे का? तू ज्यावर विश्वास ठेवतोस तो अस्पष्ट देव आहे; म्हणूनच तू घाबरत नाहीस! जे देवाला खऱ्या अर्थाने मानतात आणि ओळखतात ते सर्व त्याला घाबरतात आणि त्याला विरोध करणारी किंवा त्यांच्या विवेकाचे उल्लंघन करणारी कोणतीही गोष्ट करण्याचे त्यांना भय वाटते; विशेषतः देवाच्या इच्छेविरुद्ध जाणणारे काहीही करण्यास ते घाबरतात. केवळ यालाच देवाचे अस्तित्व मान्य करणे म्हणता येईल. जेव्हा तुझे पालक तुला देवावर विश्वास ठेवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तू काय करावेस? तुझा अश्रद्ध पती तुझ्यासाठी चांगला असेल तेव्हा तू देवावर प्रेम कसे करावेस? आणि जेव्हा भाऊ आणि बहिणी तुझा तिरस्कार करतात तेव्हा तू देवावर प्रेम कसे करावेस? जर तू त्याला मानतोस, तर या बाबतीत तू योग्य रीतीने वागशील आणि वास्तविकतेत जगशील. जर तू ठोस कृती करण्यात अयशस्वी ठरलास, पण तू देवाचे अस्तित्व मान्य करतोस असे म्हणत असशील, तर तू फक्त बडबड करणारा आहेस! तू म्हणतोस, की तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस आणि त्याला मानतोस, परंतु तू त्याला कोणत्या प्रकारे मानतोस? तू त्याच्यावर कोणत्या प्रकारे विश्वास ठेवतोस? तुला त्याची भीती वाटते का? तू त्याचा आदर करतोस का? तू त्याच्यावर मनापासून प्रेम करतोस का? जेव्हा तू व्यथित असतोस आणि विसंबून राहण्यासाठी असे कोणीही नसते, तेव्हा तुला देवाच्या प्रेमाची जाणीव होते, परंतु नंतर तू ते सर्व विसरतोस. हे देवावरचे प्रेम नाही आणि देवावरचा विश्वासही नाही! शेवटी, मनुष्याने काय साध्य करावे अशी देवाची इच्छा असते? मी नमूद केलेल्या सर्व अवस्था, जसे की तुमचे स्वतःचे महत्त्व पाहून खूप प्रभावित होणे, नवीन गोष्टी त्वरित शिकत व समजून घेत असल्याची भावना, इतरांवर नियंत्रण ठेवणे, इतरांना तुच्छ लेखणे, दिसण्यावरून लोकांचा जोखणे, निर्दोष लोकांवर गुंडगिरी करणे, चर्चच्या पैशाची लालसा धरणे इत्यादी—या सर्व भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती, काही अंशी, तुझ्याकडून काढून टाकल्या जातील, तेव्हाच तुझ्यावरील विजय स्पष्ट होईल.

तुम्हा लोकांवर केलेले विजयाचे कार्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे: एका बाबतीत, या कार्याचा उद्देश लोकांच्या एका गटाला परिपूर्ण करणे हा आहे. याचा अर्थ असा, की त्यांना परिपूर्ण केले की ते मात करणारा गट बनतील—परिपूर्ण केलेल्या लोकांचा हा पहिला गट म्हणजे प्रथम फळ असेल. दुसर्‍या बाबतीत, सृष्टीतील निर्मितीला देवाच्या प्रेमाचा आनंद घेऊ देणे, देवाचे पूर्ण आणि महान तारण प्राप्त करणे, मनुष्याला केवळ दया आणि प्रेमळ दयाळूपणाच नव्हे तर अधिक महत्त्वाचे म्हणजे ताडण आणि न्यायाचा आनंद घेऊ देणे यासाठी आहे. जगाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत, देवाने त्याच्या कार्यात जे काही केले आहे ते म्हणजे प्रेम, मनुष्याचा द्वेष न करता. तू पाहिलेले ताडण आणि न्याय हेदेखील प्रेमच आहे, अधिक खरे प्रेम, जे लोकांना मानवी जीवनाच्या योग्य मार्गावर घेऊन जाते. आणखी एका बाबतीत, हे सैतानासमोर साक्ष देण्यासाठी आहे. आणि अजूनही एका बाबतीत म्हणजे, भविष्यातील सुवार्ता कार्याचा प्रसार करण्यासाठी पाया घालण्यासाठी हे आहे. त्याने केलेले सर्व कार्य हे लोकांना मानवी जीवनाच्या योग्य मार्गावर नेण्याच्या उद्देशाने आहे, जेणेकरून ते सामान्य लोकांसारखे जगू शकतील, कारण लोकांना कसे जगायचे हे माहीत नसते आणि या मार्गदर्शनाशिवाय, तू केवळ पोकळ जीवन जगशील; तुझे जीवन मूल्यहीन किंवा अर्थहीन असेल आणि तू सामान्य व्यक्ती बनण्यास पूर्णपणे असमर्थ असशील. मनुष्यावर विजय मिळवण्याचे हेच महत्त्व आहे. तुम्ही सर्व मवाबचे वंशज आहात; जेव्हा तुमच्यामध्ये विजयाचे कार्य चालते, तेव्हा ते मोठे तारण असते. तुम्ही सर्व पाप आणि उदारतेच्या भूमीत राहत आहात आणि तुम्ही सर्व पापी आहात. आज तुम्ही देवाकडे पाहण्यास सक्षम आहात, एवढेच नव्हे, तर अधिक महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला ताडण आणि न्याय लाभला आहे, तुम्हाला खरोखर तारण मिळाले आहे, म्हणजे तुम्हाला देवाचे सर्वात मोठे प्रेम मिळाले आहे. देव जे काही करतो, त्यात तो तुमच्यावर खरोखर प्रेम करतो. त्याचा कोणताही वाईट हेतू नसतो. तुमच्या पापांमुळे तो तुमचा न्याय करतो, जेणेकरून तुम्ही स्वतःचे परीक्षण कराल आणि हे प्रचंड तारण प्राप्त कराल. हे सर्व मनुष्याला परिपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने केले जाते. आरंभापासून अंतापर्यंत, देव मनुष्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि त्याने स्वतःच्या हातांनी निर्माण केलेल्या मनुष्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची त्याची इच्छा नाही. आज, तो तुमच्यामध्ये कार्य करण्यासाठी आला आहे; हे तारणच नाही का? जर त्याने तुमचा तिरस्कार केला असता, तर तो तुम्हाला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करण्यासाठी इतके मोठे कार्य करेल का? त्याने एवढे का सोसावे? देव तुमचा द्वेष करत नाही किंवा तुमच्याबद्दल त्याचा वाईट हेतू नाही. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की देवाचे प्रेम हे सर्वात खरे प्रेम आहे. लोक अवज्ञाकारी असल्यामुळेच त्याला न्याय करून त्यांना वाचवावे लागते; जर हे नसेल तर त्यांना वाचवणे अशक्य होईल. कारण तुम्हाला कसे जगायचे हे माहीत नाही आणि त्याची जाणीवही नाही आणि तुम्ही या निष्ठूर आणि पापी देशात राहत आहात आणि तुम्ही स्वतः निष्ठुर आणि घाणेरडे सैतान आहात, तुम्ही आणखी भ्रष्ट होणे तो सहन करू शकत नाही. या घाणेरड्या भूमीत तुम्ही आता राहत आहात, त्याप्रमाणे राहताना, सैतानाच्या इच्छेनुसार पायदळी तुडवले जाताना पाहणे तो सहन करू शकत नाही आणि तुम्हाला अधोलोकात पडू देणे तो सहन करू शकत नाही. त्याला फक्त लोकांचा हा गट प्राप्त करायचा आहे आणि तुम्हाला पूर्णपणे वाचवायचे आहे. तुमच्यावर विजयाचे कार्य करण्याचा हा मुख्य उद्देश आहे—हे केवळ तारणासाठी आहे. तुझ्यासाठी केलेले सर्व काही हे प्रेम आणि तारण आहे हे तुला दिसत नसेल आणि तुला असे वाटत असेल, की ती केवळ एक पद्धत आहे, मनुष्याला त्रास देण्याचा एक मार्ग आहे आणि काहीतरी अविश्वासू आहे, तर तू परत तुझ्या जगात जाऊन वेदना आणि त्रास सहन करणेच योग्य आहे! जर तू या प्रवाहात राहण्यासाठी आणि या न्यायाचा आणि या अफाट तारणाचा आनंद घेण्यासाठी, या सर्व आशीर्वादांचा, मानवी जगात कोठेही न मिळणाऱ्या आशीर्वादांचा आनंद घेण्यासाठी आणि या प्रेमाचा आनंद घेण्यासाठी तयार असशील, तर चांगला राहा: विजयाचे कार्य स्वीकारण्यासाठी या प्रवाहात राहा म्हणजे तू परिपूर्ण होऊ शकशील. आज, देवाच्या निर्णयामुळे तुला थोडी वेदना आणि परिष्करण सहन करावे लागेल, परंतु या वेदना सहन करण्याचेही काही मोल आणि अर्थ आहे. जरी लोक देवाची ताडण आणि न्यायाने परिष्कृत झाले असले आणि निर्दयीपणे उघड झाले असले तरी, त्यांच्या पापांसाठी त्यांना शिक्षा करणे, त्यांच्या देहाला शिक्षा देणे हे उद्दिष्ट असले, तरी त्यांच्या देहाचा नाश करण्याचा यापैकी कोणत्याही कार्याचा हेतू नाही. वचनांद्वारे केलेले गंभीर प्रकटीकरण हे तुला योग्य मार्गावर नेण्याच्या उद्देशानेच आहे. तुम्ही वैयक्तिकरित्या या कामाचा खूप अनुभव घेतला आहे आणि स्पष्टपणे, यामुळे तुम्ही वाईट मार्गाला लागला नाहीत! हे सर्व तुला सामान्य मानवतेतून जगता यावे यासाठी आहे आणि तुझ्या सामान्य मानवतेद्वारे साध्य करणे शक्य आहे. देवाच्या कार्याची प्रत्येक पायरी तुझ्या गरजांवर, तुझ्या अशक्तपणानुसार आणि तुझ्या वास्तविक उंचीनुसार असते आणि तुमच्यावर कोणताही असह्य भार टाकला जात नाही. हे आज तुला स्पष्ट होणार नाही आणि तुला असे वाटते, की मी तुझ्याबाबतीत कठोर होत आहे आणि तुला सदैव असेच वाटते, की मी तुझा तिरस्कार करतो म्हणून दररोज तुझे ताडण, न्याय आणि निंदा करतो. परंतु, जरी तू ताडण आणि न्याय सोसत असलास, तरी हे खरे तर तुझ्यावरचे प्रेमच आहे आणि ते सर्वात मोठे संरक्षण आहे. जर तुला या कामाचा सखोल अर्थ समजला नाही, तर तुझ्यासाठी अनुभव घेत राहणे अशक्य होईल. या तारणामुळे तुला सांत्वन मिळाले पाहिजे. शुद्धीवर येण्यास नकार देऊ नका. इथपर्यंत आल्यावर, विजयाच्या कार्याचे महत्त्व तुला स्पष्ट झाले पाहिजे आणि तू यापुढे त्याबद्दल या ना त्या प्रकारची मते ठेवू नयेत!

मागील:  विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (३)

पुढील:  तू भविष्यातील कामगिरीमध्ये कसे सहभागी व्हावे?

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger