श्रद्धेमध्ये, वास्तवावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे—धार्मिक कर्मकांडांमध्ये गुंतणे म्हणजे श्रद्धा नव्हे
तू किती धार्मिक प्रथा पाळतोस? तू किती वेळा देवाच्या वचनाविरुद्ध बंड केले आहेस आणि स्वतःच्या मार्गाने गेला आहेस? देव वाहत असलेल्या ओझ्यांबद्दल तू खरोखर विचार करत आहेस आणि त्याची इच्छा पूर्ण करत करण्याचा प्रयत्न करत आहेस या कारणांमुळे तू देवाचे वचन किती वेळा आचरणात आणले आहेस? तू देवाचे वचन समजून घेणे आणि त्यानुसार ते आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. तुझ्या सर्व कृती आणि कार्यांमध्ये तत्त्वनिष्ठ राहा, मात्र याचा अर्थ नियमांचे पालन करणे किंवा नाखुषीने केवळ दाखवण्यासाठी काहीतरी करणे असा होत नाही; उलट, याचा अर्थ सत्याने आचरण करणे आणि देवाच्या वचनानुसार जगणे असा होतो. अशा आचरणानेच देव संतुष्ट होतो. देवाला संतुष्ट करणारी कृती म्हणजे नियम नाही तर, ते सत्याचे आचरण आहे. काही लोकांचा फक्त स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याकडे कल असतो. त्यांचे बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत ते कदाचित असे म्हणतीलही की, ते देवाचे ऋणी आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे मात्र ते सत्याने आचरण करत नाहीत आणि पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागत असतात. हे धार्मिक परुशी नाहीत का? देवावर मनापासून प्रेम करणारी आणि ज्याच्यामध्ये सत्य वास करते अशी व्यक्ती तीच, जी देवाशी नेहमीच एकनिष्ठ असते परंतु बाह्य देखावा करत नाही. परिस्थिती उद्भवते तेव्हा, अशी व्यक्ती सत्याने आचरण करण्यास इच्छुक असते आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या विरोधात बोलत नाही किंवा वागत नाही. परिस्थिती उद्भवते तेव्हा, या प्रकारची व्यक्ती शहाणपणाचे प्रदर्शन करते आणि परिस्थितीची पर्वा न करता त्याच्या किंवा तिच्या कृतींमध्ये तत्वनिष्ठ राहते. अशा प्रकारची व्यक्तीच खरी सेवा देऊ शकते. काहीजण असे आहेत जे देवाप्रति तोंडदेखली कृतज्ञता वारंवार व्यक्त करतात; वातावरण दूषित व दयनीय झाल्याचे भासवून ते त्यांचे दिवस चिंतेत घालवतात. किती निंदनीय आहे हे! जर तू त्यांना विचारलेस की, “तू देवाचे ऋणी कसा आहेस हे तू मला सांगू शकतोस का?” तर ते मौन धारण करतात. जर तू देवाशी एकनिष्ठ असशील, तर ते बाहेर बोलून दाखवू नकोस; त्याऐवजी, देवावरील तुझे प्रेम प्रत्यक्ष आचरणातून दाखव आणि खऱ्या अंतःकरणाने त्याच्याकडे प्रार्थना कर. जे देवाशी फक्त तोंडदेखला आणि वरकरणी व्यवहार करतात, ते सगळे ढोंगी आहेत! काहीजण प्रार्थना करताना प्रत्येक वेळी देवाप्रति ऋणी असल्याचे सांगतात आणि प्रार्थना करताना प्रत्येक वेळी रडू लागतात, अगदी पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले नसतांनाही. असे लोक धार्मिक कर्मकांडे आणि धारणांनी पछाडलेले असतात; अशी कर्मकांडे आणि धारणा घेऊनच ते जगत असतात. त्यांचा नेहमी असा विश्वास असतो की अशा प्रकारची कृत्ये देवाला संतुष्ट करतात आणि देवाला अशा प्रकारची वरवरची देवभक्ती किंवा दुःखाचे अश्रू प्रिय असतात. अशा मूर्ख लोकांकडून काय भले होऊ शकते? नम्रता दाखवण्यासाठी, काही लोक इतरांच्या उपस्थितीत बोलताना दयाळूपणाचे ढोंग करतात. इतर लोकांच्या उपस्थितीत काहीजण मुद्दामहून गुलामासारखे, कणभरही बळ नसलेल्या कोकरासारखे वागतात. ही पद्धत देवाच्या राज्यातील लोकांना शोभणारी आहे का? देवाच्या राज्यातील लोक चैतन्यशील आणि मुक्त, निष्पाप आणि खुल्या मनाचे, प्रामाणिक आणि प्रेमळ आणि मुक्तपणे जगणारे असले पाहिजेत. त्यांच्या ठायी सचोटी आणि प्रतिष्ठा असली पाहिजे आणि ते जिथे जातील तिथे साक्षीदार म्हणून उभे राहण्यास सक्षम असले पाहिजेत; असे लोक देव आणि मनुष्य दोघांनाही प्रिय असतात. जे देवावरील विश्वासात नवखे आहेत ते, बरेच वेळा वरवरचे आचरण करतात; त्यांनी प्रथम बदलाच्या कालावधीतून जाणे महत्त्वाचे आहे. देवावर सखोल विश्वास ठेवणारे लोक बाह्यतः इतरांपेक्षा वेगळे दिसत नसतात, परंतु त्यांच्या कृती आणि कार्ये प्रशंसनीय असतात. केवळ असे लोकच देवाचे वचन जगत असल्याचे मानले जाऊ शकते. जर तू वेगवेगळ्या लोकांना तारण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दररोज ख्रिस्ताच्या सुवार्तेचा उपदेश करत असशील आणि तरीही अखेरीस अजूनही नियम आणि सिद्धांतांनुसारच जगत असशील, तर तू देवाला गौरव प्राप्त करून देऊ शकत नाहीस. असे लोक फक्त दाखवण्यापुरते धार्मिक, तसेच ढोंगीही असतात. जेव्हा जेव्हा धार्मिक लोक एकत्र येतात, तेव्हा ते कदाचित विचारतील, “भगिनी, तू आजकाल कशी आहेस?” ती कदाचित उत्तर देईल, “मला वाटते की, मी देवाची ऋणी आहे आणि त्याची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही.” दुसरा कदाचित म्हणेल, “मलादेखील वाटते की, मी देवाचा ऋणी आहे आणि मी त्याला संतुष्ट करू शकत नाही.” ही काही वाक्ये आणि शब्दच त्यांच्यामध्ये खोलवर वसलेल्या घाणेरड्या गोष्टी व्यक्त करतात; असे शब्द अत्यंत किळसवाणे आणि अतिशय घृणास्पद आहेत. अशा लोकांचा स्वभाव देवाच्या विरोधी आहे. जे वास्तविकतेवर लक्ष केंद्रित करतात, ते त्यांच्या मनांमध्ये जे काही असेल ते सांगतात आणि सहभागिता करून त्यांचे अंतःकरण मोकळे करतात. ते एखाद्या सुद्धा खोट्या बाबीत गुंतत नाहीत आणि अशा प्रकारच्या सौजन्याचे आणि पोकळ हास्य-विनोदाचे प्रदर्शनही मांडत नाहीत. ते नेहमीच सरळ असतात आणि कोणतेही ऐहिक नियम पाळत नाहीत. काही लोकांचा फक्त बाह्य प्रदर्शनाकडेच कल असतो, इतका की, कधी कधी त्याला काही अर्थच नसतो. कोणी कधी गात असला, तर ते नाचायला सुरूवात करतात, मग त्यांच्या भांड्यामधील भात केव्हाच जळाला याची जाणीवही त्यांना राहत नसते. अशा प्रकारचे लोक धर्मात्मा किंवा आदरणीय नव्हेत, तर ते खूपच क्षुल्लक आहेत. या सर्व गोष्टी म्हणजे वास्तविकतेच्या अभावाचे चिन्ह आहे. जेव्हा काही लोक आध्यात्मिक जीवनात सहभागिता करतात, तेव्हा ते देवाचे ऋणी असल्याचे बोलून दाखवत नसले, तरी देवाविषयी खरे प्रेम त्यांच्या अंतःकरणात खोलवर टिकवून ठेवत असतात. तुझ्या मनामधील देवाप्रति ऋणी असल्याच्या भावनेचे इतर लोकांशी काही देणेघेणे नाही; तू देवाचा ऋणी आहेस, मानवतेचा नाही. याविषयी सतत इतरांशी बोलण्याचा तुला काय फायदा? तू वास्तविकतेमध्ये प्रवेश करण्यास महत्त्व दिले पाहिजेस, बाह्य आवेशास किंवा प्रदर्शनास नव्हे. माणसांची वरवरची चांगली कृत्ये कशाचे प्रतिनिधित्व करतात? ती देहाचे प्रतिनिधित्व करतात. सर्वोत्तम असे बाह्य व्यवहारदेखील जीवनाचे प्रतिनिधित्व करत नाहीत; ते फक्त तुझा व्यक्तिगत स्वभाव दाखवू शकतात. मानवतेच्या बाह्य प्रथा देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. तू देवाप्रति तुझ्या ऋणबद्धतेविषयी सतत बोलत असतोस, तरीही तू इतरांच्या जीवनातील तरतुदी पुरवू शकत नाहीस किंवा देवावर प्रेम करण्यासाठी त्यांना प्रेरीत करू शकत नाहीस. तुझ्या तसल्या कृती देवाला संतुष्ट करू शकतील असा तुझा विश्वास आहे का? तुझ्या कृती देवाच्या इच्छेशी सुसंगत आहेत आणि त्या आत्म्याच्या आहेत असे तुला वाटते पण, सत्य हे आहे की त्या सर्व निरर्थक आहेत! ज्या गोष्टी तुला प्रसन्न करतात आणि ज्या गोष्टी करण्याची तुझी इच्छा आहे त्याच गोष्टींमध्ये देवाला आनंद मिळतो, असा तुझा विश्वास आहे. तुझ्या आवडी देवाचे प्रतिनिधित्व करू शकतात का? एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य देवाचे प्रतिनिधित्व करू शकते का? तुला आनंद देणाऱ्या त्या गोष्टी आहेत, ज्याचा नेमका देवाला तिटकारा आहे आणि तुझ्या सवयी अशा आहेत, ज्यांविषयी देव नाराज आहे आणि त्या तो नाकारतो. जर तू देवाचा ऋणी आहेस असे तुला वाटत असेल, तर जा आणि देवासमोर प्रार्थना कर; इतरांना ते सांगत बसण्याची गरज नाही. जर तू देवासमोर प्रार्थना करत नसशील आणि त्याऐवजी इतरांच्या उपस्थितीत सतत फक्त स्वतःकडेच लक्ष वेधत असशील, तर हे देवाची इच्छा पूर्ण करू शकते का? जर तुझ्या कृती नेहमी केवळ दिसण्यापुरत्याच अस्तित्वात असल्या, तर याचा अर्थ असा की तुझे जगणे व्यर्थ आहे. जे केवळ वरवरच्या चांगल्या कृती पार पाडतात, मात्र ज्यामध्ये वास्तविकता नाही ते कोणत्या प्रकारचे मानव आहेत? अशा प्रकारचे लोक म्हणजे केवळ ढोंगी परूशी तसेच धार्मिक व्यक्ती असतात. जर तुम्ही लोकांनी तुमच्या बाह्योपचारांचा त्याग केला नाही आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही, तर तुम्हा लोकांमधील ढोंगीपणाचे मूळ दोष अधिकच वाढतील. तुमच्यामधील ढोंगीपणाचे दोष जेवढे जास्त, तेवढाच देवाप्रति प्रतिकार जास्त. शेवटी, अशा लोकांना नाश निश्चित बाहेर काढून टाकले जाईल!