आपल्या देवावरील श्रद्धेनुसार देवाची आज्ञा पाळावी

तुम्ही देवावर विश्वास का ठेवता? बहुतेक लोक या प्रश्नावर गोंधळून जातात. त्यांच्या मनात व्यवहारातील देव आणि स्वर्गातील देव याबद्दल नेहमी दोन अगदी वेगवेगळे दृष्टिकोण असतात. त्यातून दिसते की देवाची आज्ञा पाळण्यासाठी नव्हे तर काही तरी लाभ मिळवण्यासाठी किंवा संकटातून निर्माण झालेल्या हाल अपेष्टा टाळण्यासाठी ते देवावर विश्वास टाकतात, आणि तेव्हाच फक्त ते काही प्रमाणात देवाची आज्ञा मानतात. त्यांचे आज्ञापालन सशर्त असते; त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी असते आणि असे आज्ञापालन त्यांच्यावर लादलेले असते. तर मग, तू देवावर का विश्वास ठेवतोस? जर लाभ आणि नशीब याकरताच विश्वास ठेवत असशील तर तू देवावर अजिबात विश्वास न ठेवलेलाच अधिक बरा. अशा प्रकारचा विश्वास म्हणजे स्वतःची फसवणूक, स्वतःला दिलेला दिलासा आणि आत्मप्रौढी होय. जर तुझा विश्वास देवाच्या आज्ञापालनावर आधारित नसेल तर त्याला विरोध करण्याबद्दल तुला शेवटी शिक्षा मिळेल. आपल्या श्रद्धेनुसार कोणी देवाची आज्ञा पाळत नाहीत ते देवाला विरोध करत असतात. देव लोकांना साग़तो की सत्याची कास ध्ररावी, लोकांनी त्याच्या शब्दांचे सेवन आणि प्राशन करावे, ते शब्द प्रत्यक्षात आचरणात आणावे म्हणजे त्यांना देवाच्या आज्ञेचे पालन साध्य होऊ शकेल. जर हीच तुझी खरीखुरी उद्दिष्टे असतील तर देव तुझा नक्कीच उद्धार करील आणि तुझ्यावर कृपा करील. हे अगदी निःसंशय आणि अपरिवर्तनीय सत्य आहे. जर देवाचे आज्ञापलन करणे हा तुझा हेतू नसेल आणि तुझी काही इतर उद्दिष्टे असतील तर तू जे काही बोलतोस, देवासमोर ज्या प्रार्थना करतोस आणि तुझ्या प्रत्येक कृतीसुद्धा त्याच्या विरोधातच असतील. तू जरी अत्यंत मृदु बोलत असलास, सौम्यपणे वागत असलास, तुझी प्रत्येक कृती आणि आविर्भाव योग्य वाटत असेल आणि तू आज्ञाधारक वाटत असलास पण तुझ्या देवावरील विश्वासाच्या बाबतीतील उद्दिष्टे आणि दृष्टिकोण यांचा विचार करता, तू जे काही करतोस ते देवाच्या विरुद्ध असेल, वाईटच असेल. शेळीसारखे आज्ञाधारक वाटणारे परंतु हृदयात वाईट हेतू असणारे लोक खरोखर शेळीच्या रूपातील लांडगेच होत. ते देवाचा थेटपणे अवमान करत असतात आणि देव त्यातील कुणालाच सोडणार नाही. तो पवित्र आत्मा त्यापैकी प्रत्येकाला उघडे पाडेल आणि सर्वांना दाखवून देईल की जे कोणी दांभिक आहेत त्यांना तो पवित्र आत्मा नक्कीच गर्हणीय मानेल आणि नाकारील. चिंता करू नका: देव त्यांच्यापैकी प्रत्येकाची एक एक करून दखल घेईल आणि त्यांचा समाचार घेईल.

जर तुला देवाकडून आलेला हा नवीन प्रकाश स्वीकारता येत नसेल आणि जर तुला देव आज काय करत आहे ते समजत नसेल आणि त्याचा शोध घेता येत नसेल किंवा अन्यथा त्यावर तुला शंका येत असेल, तू त्यावर काही शेरा देत असशील, किंवा त्याची छाननी आणि विश्लेषण करत असशील तर देवाची आज्ञा पाळण्याची तुझी मानसिकताच नाही. जर अगदी आताचा हा इथला दिव्य प्रकाश दिसू लागला असताना तू कालच्याच प्रकाशाला गौरवत असशील आणि देवाच्या नवीन निर्मितीला विरोध करत असशील तर तू दुसरे काही नाही तर केवळ अज्ञ आहेस—तू जाणूनबुजून देवाला विरोध करत आहेस. देवाची आज्ञा पाळण्यामागील मुख्य सूत्र म्हणजे या नवीन दिव्य प्रकाशाचे स्वागत करणे, तो स्वीकारू शकणे आणि त्याला प्रत्यक्षात अनुभवणे होय. हाच खरोखर आज्ञाधारकपणा होय. ज्यांच्याकडे देवाच्या प्राप्तीची कामना नाही ते स्वेच्छेने त्याला शरण जाऊ शकत नाहीत, आणि ते सद्य परिस्थितीत राहणे पसंत करत असल्यामुळे, देवाला केवळ विरोधच करू शकतात. असा माणूस आधी जे काही आले होते त्याच्या प्रभावाखाली असल्यामुळे देवाची आज्ञा पाळू शकत नाही. ज्या काही गोष्टी आधी आलेल्या होत्या त्यामुळे लोकांमध्ये देवाबद्दल अनेक प्रकारचे समज आणि कल्पना निर्माण झाल्या आणि त्यांच्या मनात त्याच प्रकारची देवाची प्रतिमा तयार झाली. म्हणजे असे की हे लोक फक्त त्यांचे स्वतःचे समज आणि कल्पनांच्या परिमाणांवर विश्वास ठेवतात. जर तू तुझ्या कल्पनेतला देव आणि आज प्रत्यक्षात कार्य करणारा देव यांची तुलना केलीस तर दिसेल की तुझी श्रद्धा सैतानातून निर्माण झाली आहे—त्यावर तुझ्या आवडीनिवडींचा स्पर्श झाला आहे—देवाला ही अशी श्रद्धा नको आहे. अशा लोकांची अर्हता कितीहि उच्च असो—जरी त्यांनी देवाच्या कामासाठी पूर्ण आयुष्य वेचले असो आणि त्यात आपले बलिदान दिलेले असो—देव असे विचार असणार्‍यांना स्वीकारत नाही. तो केवळ त्यांच्यावर थोडी कृपा दर्शवतो आणि काही काळ आनंद अनुभवू देतो. अशा प्रकारचे लोक जे काही सत्य आहे ते प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. पवित्र आत्मा अशा लोकांमध्ये कार्य करत नाही आणि देव एक एक करून त्यांना काढून टाकेल. लहान थोर कुणीही असो जे कोणी आपापल्या श्रद्धेनुसार देवाच्या आज्ञेचे पालन करत नाहीत, ज्यांचे हेतू चुकीचे आहेत असेच लोक देवाला विरोध करतात आणि व्यत्यय आणतात, आणि देवा त्यांना नक्कीच काढून टाकेल. जे देवाप्रति थोडेही आज्ञाधारक नसतात, जे केवळ त्याचे नाव मान्य करतात, ज्यांना देवाचे प्रेम आणि मोहकतेची थोडीफार जाणीव आहे आणि तरीहि जे पवित्र आत्म्याच्या पावलावर पाऊल टाकत नाहीत आणि पवित्र आत्म्याचे सध्याचे कार्य आणि वचनांचे पालन करत नाहीत—असे लोक केवळ त्याच्या कृपेखालीच राहतात, देव त्यांना कधीच स्वीकारणार नाही किंवा परिपूर्ण करणार नाही. जे देवाच्या शब्दांचे सेवन, प्राशन करून, त्या शब्दांचा आनंद घेऊन त्याची आज्ञा पळतात, त्यांना देव जीवनातील क्लेशातून आणि सुसंस्कृत करून परिपूर्ण बनवतो. केवळ अशा प्रकारच्या श्रद्धेतून लोकांची मानसिकता बदलू शकते आणि तेव्हाच त्यांना देवाचे खरेखुरे ज्ञान प्राप्त होते. केवळ देवाच्या कृपेत समाधानी न राहता, सतत सक्रियपणे सत्याची कास धरून त्याचा शोध घेणे आणि देवाकडून स्वीकार मिळवण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच जाणीवपूर्वक देवाची आज्ञा पाळणे, आणि त्यालाहि नेमकी अशाच प्रकारची श्रद्धा हवी असते. जे लोक देवाच्या कृपेचा लाभ घेण्यापलिकडे काहीच करत नाहीत त्यांना परिपूर्ण बनवणे किंवा बदलणे शक्य नसते; आणि त्यांची आज्ञाधारकता, देवाप्रति निष्ठा, प्रेम आणि सहनशीलता—सर्व काही वरवरचे असते. ज्यांना फक्त देवाच्या कृपेचा लाभच घ्यायचा असतो त्यांना देव खरोखर समजणे शक्य नाही, आणि जरी ते देव समजला असे म्हणतात तेव्हा, त्यांचे ज्ञान वरवरचे असते आणि ते ह्या अशा गोष्टी बोलू लागतात की; “देव माणसावर प्रेम करतो” किंवा “देवाला माणसाविषयी दया वाटते.” ह्यातून मानवाचे जीवन प्रतिबिंबित होत नाही आणि त्यातून दिसत नाही की लोकांना खरोखरच देव समजला आहे. जेव्हा कधी देवाची वचने त्यांना सुसंस्कृत करतात किवा जेव्हा देव त्यांची कसोटी घेतो, तेव्हा अशा लोकांना त्याच्या आज्ञेचे पालन करणे शक्य होत नाही—जर त्याऐवजी त्यांना शंका वाटू लागते आणि त्यांचे पतन होऊ लागते तेव्हा ते अजिबातच आज्ञाधारक होताना दिसत नाहीत. त्यांच्या मनात देवावरील श्रद्धेबाबत अनेक अटी आणि निर्बंध असतात, अनेक वर्षापासून धारण केलेल्या श्रद्धेतून निर्माण झालेले अनुभव असतात किंवा बायबलवर आधारित अनेक नियमांचा पगडा असतो. अशा प्रकारचे लोक देवाच्या आज्ञेचे पालन करू शकतील काय? या लोकांमध्ये पूर्णपणे मानवी पातळीचे स्वभाव विशेष असतात—ते कसे काय देवाच्या आज्ञेचे पालन करतील? त्यांची आज्ञाधारकता वैयक्तिक आवडीनिवडीमधून बनलेली असते—देवाला अशी आज्ञाधारकता हवी आहे का? ही आज्ञाधारकता नव्हे तर ते काही विशिष्ट नियमांचे पालन होय; ते त्यांचे स्वतःचे समाधान आणि स्व—संतुष्टीकरण होय. जर तू ह्याला देवाचे आज्ञापालन म्हणत असशील तर तू त्याची निंदा करत नाहीस का? तू इजिप्शियन फारोह आहेस. तू अनिष्टाशी कटिबद्ध आहेस आणि तू उघडउघड देवाला विरोध करण्याच्या कार्यात व्यग्र आहेस—तू अशा प्रकारे सेवा करावी अशीच देवाची इच्छा आहे का? म्हणून, तू आता लगेचच पश्चात्ताप करणे आणि स्वतःला थोडेफार जाणून घेणे योग्य ठरेल. तसे केले नाही तर तू घरी परत जाणेच अधिक योग्य होईल; त्याचा तुझ्या तथाकथित देवाच्या सेवेपेक्षा तुलाच जास्तच लाभ होईल. तू कुणाला त्रास देणार नाहीस किंवा कुणाच्या कामात व्यत्यय आणणार नाहीस; तुला तुझी जागा कळेल आणि तू आनंदात रहाशील—तेच अधिक योग्य होणार नाही का? आणि देवाला विरोध करण्यासाठी तुला शिक्षा होणार नाही.

मागील:  धार्मिक सेवांचे शुद्धीकरण आवश्यक आहे

पुढील:  ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे त्यांच्यासाठी वचने

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger