ज्यांना परिपूर्ण केले गेले आहे त्यांच्यासाठी वचने

देव मनुष्याला कोणत्या मार्गाने परिपूर्ण करतो? त्यामध्ये कोणकोणत्या पैलूंचा समावेश आहे? तू देवाकडून परिपूर्ण होण्यासाठी इच्छुक आहेस का? तू देवाचा न्याय आणि ताडण स्वीकारण्यास तयार आहेस का? अशा प्रश्नांबद्दल तुला काय माहिती आहे? तुला बोलण्यासारखे काही ज्ञान नसेल, तर हा पुरावा आहे, की तुला अजूनही देवाचे कार्य ज्ञात नाही, तुला त्या पवित्र आत्म्याकडून अजिबात ज्ञान मिळालेले नाही. अशा लोकांना परिपूर्ण करणे अशक्य असते. त्यांना थोडा काळ उपभोगता येईल एवढी कृपा त्यांच्यावर केली जाते व ती कृपा जास्त वेळ टिकणार नाही. लोकांनी केवळ देवाच्या कृपेचा आनंद घेतला, तर ते देवाद्वारे परिपूर्ण होऊ शकत नाहीत. जेव्हा देहाला शांतता आणि आनंद मिळतो, जीवन सहजसोपे असते व संकटे आणि दुर्दैव नसते—जेव्हा त्यांचे कुटुंब कोणत्याही भांडण—तंट्याविना किंवा विवादाविना जगत असते, तेव्हा काही लोक संतुष्ट असतात व ते कदाचित, यालाच देवाचा आशीर्वाद मानतात. खरे तर, ही केवळ देवाची कृपा आहे. तुम्ही लोकांनी केवळ देवाच्या कृपेच्या आनंदावर समाधानी नसावे. अशी विचारसरणी खूप अशिष्ट आहे. तू जरी देवाची वचने रोज वाचलीस आणि रोज प्रार्थना केलीस व तुझ्या आत्म्याला खूप आनंद वाटला आणि विशेषतः शांती मिळाली, तरी जर तुझ्याकडे देवाच्या ज्ञानाबद्दल व कार्याबद्दल सांगण्यासारखे काही नसेल आणि तू काहीही अनुभवले नसशील व तू देवाच्या वचनांचे कितीही सेवन आणि प्राशन केलेले असशील, तरी तुला केवळ आध्यात्मिक शांतता व आनंद वाटत असेल, तर देवाच्या वचनांमध्ये अतुलनीय माधुर्य आहे, इतके की, त्याचा तू पुरेसा आनंद घेऊ शकत नाहीस, परंतु जर तुला देवाच्या कोणत्याही वचनांचा व्यावहारिक अनुभव नसेल आणि तू त्या वास्तविकतेपासून पूर्णपणे अनभिज्ञ असशील, तर देवावर अशी श्रद्धा ठेवून तू काय प्राप्त करणार आहेस? जर तू देवाच्या वचनांमधील मूलतत्त्व जगू शकत नसशील, तर तू या वचनांचे सेवन व प्राशन करणे आणि तुझ्या प्रार्थना म्हणजे धार्मिक विश्वासाशिवाय दुसरे काही नाही. अशा लोकांना देवाकडून परिपूर्ण केले जाऊ शकत नाही व त्यांना देवाकडून प्राप्त केले जाऊ शकत नाही. जे लोक सत्याचे अनुसरण करतात, तेच देवाकडून प्राप्त केले जातात. यातून देव जे प्राप्त करतो ते म्हणजे मनुष्याचा देह नव्हे, त्याच्या मालकीच्या वस्तू नव्हे, तर त्याच्या हृदयात असलेला देवाचा अंश आहे. अशा प्रकारे, जेव्हा देव लोकांना परिपूर्ण करतो, तेव्हा तो त्यांचा देह परिपूर्ण करत नाही तर त्यांची हृदये परिपूर्ण करतो, जेणेकरून देव त्यांची हृदये प्राप्त करू शकेल; याचा अर्थ असा आहे, की देव मनुष्याला परिपूर्ण करतो म्हणजेच, देव मनुष्याचे हृदय परिपूर्ण करतो, जेणेकरून हे हृदय देवाकडे वळू शकेल आणि ते देवावर प्रेम करू शकेल.

मनुष्याचा देह नश्वर आहे. मनुष्याचा देह प्राप्त करण्याचा देवाचा कोणताही उद्देश नसतो, कारण मनुष्याचा देह नष्ट होणे अटळ आहे आणि तो देवाचा वारसा किंवा आशीर्वाद प्राप्त करू शकत नाही. जर केवळ मनुष्याचा देह प्राप्त करायचे उद्दिष्ट असेल, तर ते केवळ नाममात्र तसे झाले असते, त्याचे हृदय मात्र सैतानाच्या ताब्यात गेले असते. तसे झाले तर लोक देवासारखे बनू शकणार नाहीत, तसेच ते देवावर ओझे बनून राहतील व त्यामुळेच देवाने लोकांची निवड करणे हे निरर्थक ठरेल. देव ज्यांना परिपूर्ण करू इच्छितो, त्या सर्वांना देवाचा आशीर्वाद आणि वारसा प्राप्त होईल. म्हणजे देव जे आहे व देवाकडे जे आहे ते हे लोक घेतील आणि ते त्यांच्यातच भिनून जाईल; आता त्यांच्याकडे देवाची सर्व वचने येऊन पोहोचलेली आहेत; देव जसा आहे तसाच्या तसा स्वीकारण्यास तुम्ही लोक सक्षम आहात व त्याद्वारे तुम्ही सत्य जगू शकता. ही अशा प्रकारची व्यक्ती आहे जी देवाकडून परिपूर्ण झालेली आहे आणि देवाने प्राप्त करून घेतली आहे. केवळ या प्रकारचीच व्यक्ती देवाने दिलेले आशीर्वाद प्राप्त करण्यास पात्र ठरते:

१. देवाचे संपूर्ण प्रेम प्राप्त करणे.

२. सर्व बाबींमध्ये देवाच्या इच्छेनुसार वागणे.

३. देवाचे मार्गदर्शन मिळवणे, देवाच्या प्रकाशामध्ये जगणे आणि देवाकडील ज्ञान प्राप्त करणे.

४. देवाला आवडत असलेल्या प्रतिमेप्रमाणे पृथ्वीवर जगणे; पेत्राप्रमाणे देवावर खरे प्रेम करणे, देवाच्या प्रेमाच्या बदल्यात वधस्तंभावर चढून मरण पावण्यास योग्य असणे; पेत्राप्रमाणे किर्ती प्राप्त करणे.

५. पृथ्वीवरील सर्वांकडून प्रेम, आदर आणि प्रशंसा प्राप्त करणे.

६. मृत्यू आणि मृत्यूलोकाच्या बंधनाच्या प्रत्येक पैलूवर मात करणे, सैतानाला त्याचे कार्य करण्याची संधी न देणे, देवाच्या अधीन असणे, उत्साह आणि चैतन्याने जगणे, खचून न जाणे.

७. आयुष्यभर प्रत्येक वेळी आनंद आणि उत्साहाची अदम्य भावना असणे, जणू एखाद्याने देवाच्या किर्तीच्या आगमनाचा दिवस पाहिला आहे.

८. देवासोबत किर्ती प्राप्त करणे आणि देवाच्या प्रिय संतांसारखा चेहरा असणे.

९. पृथ्वीवर देवाला जे आवडते ते होणे, म्हणजेच देवाचा प्रिय पुत्र होणे.

१०. रूप बदलणे आणि देवासोबत तिसर्‍या स्वर्गाची पायरी चढणे व देहाच्या पलीकडे जाणे.

जे लोक देवाचे आशीर्वाद मिळवू शकतात तेच लोक देवाकडून परिपूर्ण केले जातात आणि प्राप्त केले जातात. तू सध्या काही प्राप्त केले आहे का? देवाने तुला किती प्रमाणात परिपूर्ण केले आहे? देव यादृच्छिक पद्धतीने मनुष्याला परिपूर्ण करत नाही; मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी काही अटी आहेत व त्याचे परिणाम स्पष्ट आणि दृश्यमान आहेत. मनुष्याची कल्पना आहे, की जोपर्यंत त्याची देवावर श्रद्धा आहे तोपर्यंत तो देवाकडून परिपूर्ण व प्राप्त केला जाऊ शकतो आणि त्याला पृथ्वीवर देवाचा आशीर्वाद व वारसा प्राप्त होऊ शकतो, पण तसे नाही. लोकांचे स्वरूप बदलण्यासंबंधी काहीही बोलणे—अशा गोष्टी अत्यंत कठीण असतात. सध्या, तुम्ही मुख्यत्वेकरून हे शोधले पाहिजे, की सर्व बाबींमध्ये देवाकडून परिपूर्ण कसे होता येईल आणि सर्व लोक, बाबी व तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करता त्यामधून देवाद्वारे कशी परिपूर्णता साधली जाईल, जेणेकरून तुम्हा लोकांमध्ये देव काय आहे आहे हे जास्तीत जास्त बाणवले जाईल. तुम्हाला प्रथम पृथ्वीवर देवाचा वारसा प्राप्त झालाच पाहिजे; तरच तुम्ही देवाकडून अधिक वारसा आणि व्यापक आशीर्वाद मिळवण्यास पात्र व्हाल. इतर कशाहीपूर्वी, या सर्व गोष्टींचा तुम्ही लोकांनी पाठपुरावा केला पाहिजे व या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तुम्ही सर्व गोष्टींमध्ये देवाकडून परिपूर्ण होण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल, तितकेच सर्व गोष्टींमध्ये देवाचा हात असल्याचे पाहण्यास तुम्ही सक्षम व्हाल, परिणामी तुम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आणि वेगवेगळ्या बाबींमध्ये देवाच्या वचनांमध्ये व त्याच्या वचनाच्या वास्तविकतेत सक्रियपणे प्रवेश करू पाहाल. केवळ, पाप न करणे, किंवा कोणत्याही धारणा नसणे, जगण्याचे कोणतेही तत्त्वज्ञान नसणे आणि मानवी इच्छा नसणे अशा निष्क्रिय अवस्थेत तुम्ही समाधानी राहू शकत नाही. देव मनुष्याला अनेक मार्गांनी परिपूर्ण करतो; सर्व बाबींमध्ये परिपूर्ण केले जाण्याची शक्यता असते, तुला गोष्टी विपुल प्रमाणात प्राप्त करता याव्यात, म्हणून तो तुला केवळ सकारात्मक दृष्टिनेच नव्हे तर नकारात्मक दृष्टिनेदेखील परिपूर्ण बनवू शकतो. प्रत्येक दिवशी परिपूर्ण केले जाण्याच्या संधी आहेत व देवाकडून प्राप्त केले जाण्याचे प्रसंग आहेत. काही काळ अशा प्रकारे अनुभव घेतल्यानंतर, तू पुष्कळ प्रमाणात बदलून जाशील आणि तू पूर्वी ज्याबद्दल अनभिज्ञ होतास अशा कितीतरी गोष्टी तुला स्वाभाविकपणे समजतील. तुला इतरांच्या सूचनांची आवश्यकता भासणार नाही; तुझ्या नकळत देव तुला ज्ञान देईल, जेणेकरून तुला सर्व गोष्टींमध्ये ज्ञान प्राप्त होईल व तू तुझ्या सर्व अनुभवांमध्ये तपशीलवार प्रवेश करशील. देव नक्कीच तुला मार्गदर्शन करेल म्हणजे तू तुझे मत बदलणार नाहीस आणि अशा प्रकारे त्याच्याकडून परिपूर्ण होण्याच्या दिशेने तू पाऊल टाकशील.

देवाकडून केली जाणारी परिपूर्णता ही देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करून येणाऱ्या परिपूर्णतेइतकी मर्यादित असू शकत नाही. असा अनुभव खूप एकतर्फी असेल, त्यात फारच थोड्या गोष्टींचा समावेश असेल व तो लोकांना अगदीच छोट्या कृती-कक्षेत रोखून धरू शकेल. असे असल्यामुळे, लोकांना आवश्यक असलेल्या आध्यात्मिक पोषणाची कमतरता भासेल. तुम्हाला देवाकडून परिपूर्ण व्हायचे असेल, तर तुम्ही सर्व बाबतीत अनुभव कसा घ्यायचा हे शिकलेच पाहिजे आणि तुम्ही तुमच्या बाबतीत घडणार्‍या प्रत्येक गोष्टीत ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम झाले पाहिजे. ते चांगले असो किंवा वाईट, ते तुला लाभदायक ठरले पाहिजे व त्याचा तुझ्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये. काहीही असले तरी, तू देवाच्या बाजूने उभे राहून इतर गोष्टींचा विचार करण्यास सक्षम असले पाहिजेस आणि मनुष्याच्या दृष्टिकोनातून त्याचे विश्लेषण किंवा अभ्यास करू नये (ते तुझ्या अनुभवातील विचलन असेल). तुला असा अनुभव आला तर, तुझे हृदय तुझ्या आयुष्याच्या ओझ्यांनी भरले जाईल; तू सतत देवाच्या कृपेच्या प्रकाशात असशील, तू तुझ्या आचरणात सहजपणे विचलित होणार नाहीस. अशा लोकांचे भविष्य उज्ज्वल असते. देवाकडून परिपूर्ण होण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. तुम्ही खरोखर देवावर प्रेम करणारी व्यक्ती आहात की नाही व देवाकडून परिपूर्ण होण्याचा, त्याच्याद्वारे प्राप्त केले जाण्याचा आणि त्याचे आशीर्वाद व वारसा प्राप्त करण्याचा तुमचा संकल्प आहे का यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. केवळ संकल्प पुरेसा नाही; तुमच्याकडे भरपूर ज्ञान असले पाहिजे, अन्यथा तुम्ही तुमच्या आचरणात नेहमी विचलित व्हाल. देव तुमच्यापैकी प्रत्येकाला परिपूर्ण करण्यास तयार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये, जरी बहुतेक लोकांनी देवाच्या कार्याचा आधीपासून स्वीकार केला असला, तरीही त्यांनी स्वतःला केवळ देवाच्या कृपेत झोकून देण्यापुरते मर्यादित ठेवले आहे व देवाने फक्त त्यांना दैहिक सुखसोयी प्राप्त करून द्याव्यात अशी त्यांची इच्छा असते, तरीदेखील यापेक्षा अधिक आणि उच्च ज्ञान प्राप्त करण्याची त्यांची तयारी नसते. यावरून असे दिसून येते, की मनुष्याचे हृदय अजूनही नेहमी बाहेरचाच विचार करत असते. जरी मनुष्याचे कार्य, त्याची सेवा व देवावर त्याच्या हृदयात असलेले प्रेम यात थोडीशीच अशुद्धता असली तरीही मनुष्याच्या मनातला ठोस विचार आणि त्याच्या मागासलेल्या विचारसरणीचा विचार करता, मनुष्य अजूनही सतत देहाची शांतता व आनंद यांच्या शोधात असतो आणि मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठीच्या देवाच्या अटी व हेतू काय असू शकतात याची त्याला पर्वा नसते. आणि म्हणूनच, बहुतेक लोकांचे जीवन अजूनही असभ्य व अवनत होत जाणारे आहे. त्यांच्या जीवनात थोडादेखील बदल झालेला नाही; ते देवावरील श्रद्धेला अजिबात महत्त्व देत नाहीत, जणू काही, केवळ इतरांना दाखवण्यासाठी म्हणून त्यांची देवावर श्रद्धा आहे, जसे की, काहीतरी मार्ग शोधण्याची हालचाल करत राहणे, बेपर्वाईने जगणे आणि एका उद्देश-हीन अस्तित्वात वाहून जाणे. मोजकेच लोक असे आहेत जे सर्व गोष्टींमध्ये देवाच्या वचनांमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग शोधण्यास सक्षम आहेत, ते अधिकाधिक व संपन्न गोष्टी मिळवू शकतात, आजमितीला देवाच्या घरातील जास्त संपत्ती मिळवणारे लोक बनतात आणि देवाचे जास्त आशीर्वाद प्राप्त करतात. तू सर्व गोष्टींमध्ये देवाकडून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असशील व देवाने पृथ्वीवर ज्याबाबतचे वचन दिले आहे ते प्राप्त करण्यास सक्षम असशील, सर्व गोष्टींमध्ये देवाकडून ज्ञान प्राप्त करू इच्छित असशील आणि वर्षानुवर्षे आळसात जाऊ देत नसशील, तर सक्रियपणे प्रवेश करण्याचा हा आदर्श मार्ग आहे. केवळ असे केल्यानेच तू देवाकडून परिपूर्ण होण्यास योग्य व पात्र ठरशील. तू खरोखरच देवाकडून परिपूर्ण होण्यासाठी इच्छुक आहेस का? तू खरोखरच या सर्व गोष्टींसाठी उत्सुक आहेस का? तुझ्या मनामध्ये पेत्राप्रमाणेच देवाप्रति प्रेमाची भावना आहे का? येशूप्रमाणेच देवावर प्रेम करण्याची तुझी इच्छा आहे का? तुझी अनेक वर्षांपासून येशूवर श्रद्धा आहे; येशूचे देवावर किती प्रेम होते ते तू पाहिले आहेस का? तुझा खरोखरच येशूवर विश्वास आहे का? आजच्या व्यावहारिक देवावर तुझा विश्वास आहे; देहधारी व्यावहारिक देव स्वर्गातील देवावर कसे प्रेम करतो हे तू पाहिले आहेस का? तुझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे; कारण मानवजातीची सुटका करण्याच्या हेतूने येशूला वधस्तंभावर खिळले जाणे आणि येशूने केलेले चमत्कार हे सामान्यतः स्वीकारले गेलेले सत्य आहे. तरीही, मनुष्याची श्रद्धा ही येशू ख्रिस्ताचे ज्ञान व खरी समज यातून प्राप्त होत नाही. तू केवळ येशूच्या नावावर विश्वास ठेवतोस, परंतु तू त्याच्या आत्म्यावर विश्वास ठेवत नाहीस, कारण येशूने देवावर कसे प्रेम केले याकडे तू लक्ष देत नाहीस. तुझा देवावर फारच भाबडा विश्वास आहे. अनेक वर्षांपासून येशूवर विश्वास असूनदेखील, तुला देवावर प्रेम कसे करावे हे माहीत नाही. हे कारण तुला जगातील सर्वात मोठे मूर्ख बनवत नाही का? हा पुरावा आहे, की तू वर्षानुवर्षे प्रभू येशू ख्रिस्ताचे अन्न व्यर्थ खात आहेस. मला असे लोक नापसंत तर आहेतच पण माझा असा विश्वास आहे, की प्रभू येशू ख्रिस्त—जे तुला पूजनीय आहेत—त्यांनादेखील असे लोक नापसंत असतील. अशा लोकांना कसे परिपूर्ण बनवले जाऊ शकते? तुम्ही शरमेने लाल होत नाही का? तुला याची लाज वाटत नाही का? तुझ्याकडे अजूनही तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला तोंड दाखवण्याचा उद्धटपणा आहे का? मी जे बोललो त्याचा अर्थ तुम्हा सर्वांना समजला आहे का?

मागील:  आपल्या देवावरील श्रद्धेनुसार देवाची आज्ञा पाळावी

पुढील:  दुष्टांना नक्कीच शिक्षा केली जाईल

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger