अध्याय १६
मानवी दृष्टिकोनातून, देव इतका महान, इतका विपुल, इतका अद्भूत, इतका अथांग आहे; लोकांच्या नजरेत, देवाची वचने सर्वोच्च आहेत आणि ते त्यांच्याकडे जगाची उत्कृष्ट कलाकृती म्हणून पाहतात. परंतु लोकांचे अपयश खूप असल्यामुळे व त्यांची मने खूप साधी असल्यामुळे आणि शिवाय, त्यांची स्वीकारण्याची क्षमता खूपच कमी असल्यामुळे, देव त्याची वचने कितीही स्पष्टपणे बोलला, तरीही ते बसलेले व गतिहीन राहतात, जणू काही ते मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना भूक लागली की खावे हे समजत नाही; ते तहानलेले असताना पाणी प्यायले पाहिजे हे त्यांना समजत नाही. ते फक्त ओरडत आणि किंचाळत राहतात, जणू काही ते त्यांच्या आत्म्याच्या खोलात अवर्णनीय त्रास अनुभवत आहेत, तरीही ते याबद्दल बोलू शकत नाहीत. जेव्हा देवाने मानवजातीची निर्मिती केली, तेव्हा त्याचा हेतू हा होता, की मनुष्याने सामान्य मानवतेमध्ये जगावे व देवाची वचने त्याच्या अंतःप्रेरणेनुसार स्वीकारावीत. परंतु, अगदी सुरुवातीस, मनुष्य सैतानाच्या मोहाला बळी पडल्यामुळे, आज तो स्वतःला बाहेर काढण्यास असमर्थ आहे आणि सैतानाने हजारो वर्षांपासून चालवलेल्या फसव्या योजनांना ओळखण्यास अद्यापही असमर्थ आहे. याव्यतिरिक्त, देवाची वचने पूर्णपणे जाणून घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये नाही—या सर्व गोष्टींमुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे. आजच्या परिस्थितीनुसार, लोक अजूनही सैतानाच्या प्रलोभनाच्या धोक्यात जगतात व त्यामुळे ते देवाच्या वचनांची योग्य रीतीने कदर करण्यास असमर्थ असतात. सामान्य लोकांच्या प्रवृतींमध्ये कुटिलपणा किंवा कपटीपणा नसतो, लोकांचे एकमेकांशी सामान्य नाते असते, ते एकटे राहत नाहीत आणि त्यांचे जीवन साधारण अथवा अधोगती होणारेही नसते. म्हणूनच, देव सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे; त्याची वचने मनुष्यामध्ये खोलवर पोहोचतात, लोक एकमेकांसोबत शांततेत राहतात व देवाचे संगोपन आणि संरक्षणाखाली, सैतानाच्या हस्तक्षेपाशिवाय पृथ्वी एकोप्याने भरलेली आहे आणि देवाच्या गौरवाला मनुष्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे. असे लोक देवदूतांसारखे आहेत: शुद्ध, चैतन्यशील, कधीही देवाबद्दल तक्रार करत नाहीत व देवाच्या पृथ्वीवरील गौरवासाठी त्यांचे सर्व प्रयत्न समर्पित करतात. आता काळया रात्रीची वेळ आली आहे—सर्वजण इकडे तिकडे फिरत आहेत आणि शोधत आहेत, काळ्या रात्रीमुळे त्यांच्या अंगावर शहारे येतात व ते थरथर कापत राहतात; बारकाईने ऐकताना, वायव्येकडून जोरात वाहत येणारा वारा, मनुष्याच्या शोकाचा आकांत सोबत घेऊन येत असल्याचे दिसते. लोक त्यांच्या नशिबाबद्दल शोक करतात आणि रडतात. ते देवाची वचने वाचतात, पण ती त्यांना समजत का नाहीत? जणू काही त्यांचे जीवन हताश होण्याच्या मार्गावर आहे, जणू काही त्यांचा मृत्यू येणार आहे, जणू काही त्यांचा शेवटचा दिवस त्यांच्या डोळ्यासमोर आहे. अशी दयनीय परिस्थिती म्हणजेच हा तो क्षण आहे जेव्हा नाजूक देवदूत एकामागून एक शोकाकुल आरोळ्या ठोकत त्यांच्या स्वतःच्या त्रासाबद्दल देवाला हाक मारतात. या कारणास्तव देवाच्या पुत्रांमध्ये व देवाच्या लोकांमध्ये कार्य करणारे देवदूत पुन्हा कधीही मनुष्यामध्ये अवतरणार नाहीत; हे त्यांना देहात असताना सैतानाच्या छळात अडकण्यापासून रोखण्यासाठी आहे, ते स्वतःला बाहेर काढू शकत नाहीत आणि म्हणूनच ते केवळ आध्यात्मिक जगात कार्य करतात जे मनुष्यासाठी अदृश्य आहे. म्हणूनच, जेव्हा देव म्हणतो, “जेव्हा मी मनुष्याच्या हृदयात सिंहासनावर आरूढ होईन, त्या क्षणी माझे पुत्र आणि माझे लोक पृथ्वीवर राज्य करतील,” तेव्हा तो त्या काळाचा संदर्भ देत असतो, जेव्हा पृथ्वीवरील देवदूत स्वर्गात देवाची सेवा करण्याच्या आशीर्वादाचा आनंद घेतील. कारण मनुष्य हा देवदूतांच्या आत्म्यांची अभिव्यक्ती आहे, देव म्हणतो, की मनुष्यासाठी पृथ्वीवर असणे हे स्वर्गात असण्यासारखे आहे; मनुष्यासाठी पृथ्वीवर देवाची सेवा करणे म्हणजे स्वर्गात देवदूतांनी थेट देवाची सेवा करण्यासारखे आहे—आणि अशा प्रकारे, पृथ्वीवरील त्याच्या दिवसांमध्ये, मनुष्याला तिसऱ्या स्वर्गाचे आशीर्वाद मिळतात. हेच खरे तर या वचनांमध्ये सांगितले जात आहे.
देवाच्या वचनांमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. “जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा लोक मला त्यांच्या अंतःकरणात खोलवर जाणतील व त्यांच्या विचारांमध्ये माझी आठवण ठेवतील.” ही वचने मनुष्याच्या आत्म्यासाठी आहेत. देवदूतांच्या कमकुवतपणामुळे, ते नेहमी सर्व गोष्टींमध्ये देवावर अवलंबून असतात आणि नेहमी देवाशी संलग्न असतात व देवावर प्रेम करतात. पण सैतानाच्या त्रासामुळे ते स्वतःला मदत करू शकत नाहीत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत; ते देवावर प्रेम करू इच्छितात परंतु मनापासून त्याच्यावर प्रेम करण्यास असमर्थ असतात आणि म्हणून त्यांना दुःख सहन करावे लागते. जेव्हा देवाचे कार्य एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचते, तेव्हाच या बिचाऱ्या देवदूतांची देवावर खरोखर प्रेम करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, म्हणूनच देवाने ती वचने उच्चारली. देवदूतांचा स्वभाव देवावर प्रेम करणे, त्याची काळजी घेणे व त्याचे पालन करणे आहे, तरीही ते पृथ्वीवर हे साध्य करण्यास असमर्थ आहेत आणि सध्याच्या काळापर्यंत संयम बाळगण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. तुम्ही आजच्या जगाकडे पाहू शकता: सर्व लोकांच्या हृदयात एक देव आहे, तरीही लोक त्यांच्या हृदयातील देव खरा देव आहे की खोटा देव आहे हे ओळखण्यास असमर्थ आहेत व जरी त्यांचे त्यांच्या या देवावर प्रेम असले, तरी ते खरोखर देवावर प्रेम करण्यास असमर्थ आहेत, ज्याचा अर्थ असा आहे, की त्यांचे स्वतःवर नियंत्रण नाही. देवाने प्रकट केलेला मनुष्याचा कुरूप चेहरा हा आध्यात्मिक क्षेत्रातील सैतानाचा खरा चेहरा आहे. मनुष्य मुळात निष्पाप होता आणि पापांपासून मुक्त होता आणि म्हणूनच मनुष्याचे सर्व भ्रष्ट आणि कुरूप आचरण हे आध्यात्मिक क्षेत्रात सैतानाचे कार्य आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रातील घडामोडींच्या विश्वसनीय नोंदी आहेत. “आज, लोकांमध्ये पात्रता आहे व त्यांना विश्वास आहे, की ते माझ्यासमोर फिरू शकतात आणि किंचितही संकोच न करता माझ्यासोबत हसू शकतात व विनोद करू शकतात आणि मला समान म्हणून संबोधू शकतात. तरीही मनुष्य मला ओळखत नाही, तरीही त्याचा असा विश्वास आहे, की आम्ही स्वभावाने समान आहोत, आम्ही दोघेही रक्तामांसाचे आहोत व दोघेही मानवी जगात राहतो.” सैतानाने मनुष्याच्या हृदयात हेच केले आहे. सैतान देवाला विरोध करण्यासाठी मनुष्याच्या धारणा आणि उघड्या डोळ्यांचा वापर करतो, तरीही देव मनुष्याला या घडामोडी कोणताही शब्दच्छल न करता सांगतो, जेणेकरून मनुष्य येथे आपत्तीपासून वाचू शकेल. सर्व लोकांची नश्वर दुर्बलता ही आहे, की लोकांना “फक्त रक्तामांसाचे शरीर दिसते आणि त्यांना देवाच्या आत्म्याचे ज्ञान होत नाही.” सैतानाने मनुष्याला प्रलोभन देण्याच्या एका पैलूचा हा आधार आहे. सर्व लोकांचा असा विश्वास आहे, की या देहातील केवळ आत्म्यालाच देव म्हणता येईल. आज, आत्मा देह झाला आहे व त्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात प्रकट झाला आहे यावर कोणीही विश्वास ठेवत नाही; लोक देवाला दोन भाग म्हणून पाहतात—“वस्त्र आणि देह”—आणि कोणीही देवाकडे आत्म्याची देहधारणा म्हणून पाहत नाही, कोणीही पाहत नाही, की देहाचे मूलतत्त्व ही देवाची प्रवृत्ती आहे. लोकांच्या कल्पनेत, देव विशेषतः सामान्य आहे, परंतु या सामान्यतेमध्ये देवाचा एक महत्त्वाचा पैलू दडलेला आहे हे त्यांना माहीत नाही का?
जेव्हा देवाने संपूर्ण जगाला आच्छादण्यास सुरुवात केली, तेव्हा ते अंधकारमय झाले आणि लोक झोपले, तेव्हा देवाने मनुष्यामध्ये उतरण्याची ही संधी घेतली व पृथ्वीच्या सर्व कानाकोपऱ्यात आत्म्याला अधिकृतपणे पाठवण्यास सुरुवात केली आणि मानवजातीला वाचवण्याचे कार्य सुरू केले. असे म्हटले जाऊ शकते, की जेव्हा देवाने देहाची प्रतिमा धारण करण्यास सुरुवात केली, तेव्हा देवाने व्यक्तिशः पृथ्वीवर कार्य केले. मग आत्म्याचे कार्य सुरू झाले आणि तेथे पृथ्वीवरील सर्व कार्य अधिकृतपणे सुरू झाले. दोन हजार वर्षांपासून, देवाचा आत्मा नेहमीच संपूर्ण विश्वात कार्यरत आहे. लोकांना हे कळत नाही किंवा जाणवतही नाही, परंतु शेवटच्या दिवसांत, ज्या वेळी हे युग लवकरच संपणार आहे, त्या वेळी देव व्यक्तिशः कार्य करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे. हा शेवटच्या दिवसांत जन्मलेल्यांचा आशीर्वाद आहे, जे देहात राहणाऱ्या देवाची प्रतिमा वैयक्तिकरीत्या पाहण्यास सक्षम आहेत. “जेव्हा महासागराचा संपूर्ण चेहरा अंधकारमय होता, तेव्हा मनुष्यामध्ये मला जगाबद्दलची कटुता दिसायला लागली. माझा आत्मा जगभर फिरतो व सर्व लोकांच्या हृदयाकडे पाहतो, तरीही मी माझ्या देहधारणेतून मानवजातीवर विजय प्राप्त करतो.” स्वर्गातील देव आणि पृथ्वीवरील देव यांच्यात असे सामंजस्यपूर्ण सहकार्य आहे. शेवटी, लोक त्यांच्या विचारांमध्ये असा विश्वास ठेवतील, की पृथ्वीवरील देव हा स्वर्गातील देव आहे, स्वर्ग व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही पृथ्वीवरील देवाने निर्माण केले आहे, मनुष्य पृथ्वीवरील देवाद्वारे नियंत्रित आहे, पृथ्वीवरील देव हा स्वर्गातील कार्य पृथ्वीवर करतो व स्वर्गातील देव देहात प्रकट झाला आहे. हे पृथ्वीवरील देवाच्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच, हा टप्पा देहाच्या कालावधीत कार्याचा सर्वोच्च टप्पा आहे; हे देवत्वात पार पाडले जाते व सर्व लोकांना मनापासून खात्री पटवून देते. लोक जितके त्यांच्या धारणांमध्ये देव शोधतात, तितकेच त्यांना असे वाटते की पृथ्वीवरील देव वास्तविक नाही. म्हणूनच, देव म्हणतो की लोक रिकाम्या वचनांमध्ये आणि सिद्धांतांमध्ये देवाचा शोध घेतात. लोक जितके जास्त त्यांच्या धारणांमध्ये देवाला ओळखतात, तितके ही वचने व सिद्धांत बोलण्यात पारंगत होतात आणि तितके ते अधिक प्रशंसनीय बनतात; लोक जितकी जास्त वचने व सिद्धांत बोलतात, तितके ते देवापासून दूर जातात, मनुष्याचे सार जाणून घेण्यास ते अधिक असमर्थ होतात, तितके जास्त ते देवाची अवज्ञा करतात आणि देवाच्या अपेक्षांपासून दूर जातात. देवाच्या मनुष्याकडून असलेल्या अपेक्षा लोकांच्या कल्पनेएवढ्या अलौकिक नाहीत, तरीही देवाची इच्छा कोणीही खरोखर समजून घेतली नाही व म्हणूनच देव म्हणतो, “लोक केवळ अमर्याद आकाशात किंवा दुथडी भरणाऱ्या समुद्रात अथवा शांत तलावात किंवा रिक्त लेखांमध्ये आणि सिद्धांतांमध्ये शोधतात.” देवाच्या मनुष्याकडून असलेल्या अपेक्षा जितक्या जास्त वाढतात, तितके लोकांना असे जास्त वाटते, की देव अगम्य आहे व देव महान आहे यावर त्यांचा अधिक विश्वास बसतो. अशा प्रकारे, त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीमध्ये, देवाच्या मुखातून उच्चारलेली सर्व वचने मनुष्यासाठी अप्राप्य आहेत, देवाला व्यक्तिशः कार्य करण्याशिवाय पर्याय नाही; दरम्यान, मनुष्यामध्ये देवाला सहकार्य करण्याची किंचितशी प्रवृत्ती नसते आणि तो फक्त त्याचे मस्तक झुकवून त्याच्या पापांची कबुली देत राहतो, नम्र व आज्ञाधारक होण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे, हे लक्षात न घेता, लोक नवीन धर्मात प्रवेश करतात, धार्मिक समारंभात प्रवेश करतात जो धार्मिक चर्चपेक्षाही अधिक टोकाचा असतो. यासाठी लोकांना त्यांच्या नकारात्मक स्थितीचे सकारात्मक स्थितीत रूपांतर करून सामान्य स्थितीत परत येणे आवश्यक आहे; तसे केले नाही तर मनुष्य आणखी खोलवर अडकत जाईल.
देव त्याच्या इतक्या उच्चारणांमध्ये पर्वत आणि पाण्याचे वर्णन करण्यावर लक्ष का केंद्रीत करतो? या वचनांमध्ये प्रतीकात्मक अर्थ आहे का? देव मनुष्याला त्याची कृत्ये त्याच्या देहातच पाहण्याची अनुमती देतो, तसेच मनुष्याला त्याच्या आकाशातील शक्ती समजून घेण्याचीही अनुमती देतो. अशा रीतीने, हा देहामधील देव आहे, असे निःसंशयपणे मानण्याबरोबरच, लोकांना व्यावहारिक देवाची कृत्येही कळतात व अशा प्रकारे पृथ्वीवरील देव स्वर्गात पाठवला जातो आणि स्वर्गातील देव पृथ्वीवर आणला जातो, त्यानंतरच लोक देवाचे स्वरूप पूर्णपणे पाहण्यास व देवाच्या सर्वशक्तिमानतेचे अधिक ज्ञान प्राप्त करण्यास सक्षम होतात. देव देहामध्ये मानवजातीवर विजय प्राप्त करण्यासाठी आणि देहाच्या पलीकडे जाऊन विश्वाच्या वर व संपूर्ण विश्वात दोन्ही ठिकाणी प्रवास करण्यास जितका सक्षम असतो, तितकेच लोक व्यावहारिक देव पाहण्याच्या आधारावर देवाची कृत्ये पाहण्यास सक्षम असतात आणि अशा प्रकारे संपूर्ण विश्वातील देवाच्या कार्याचे सत्य जाणून घेऊ शकतात, की—ते खोटे नसून वास्तविक आहे—आणि म्हणून त्यांना हे समजते, की आजचा व्यावहारिक देव हे आत्म्याचे मूर्त स्वरूप आहे व तो मनुष्यासारखा दैहिक शरीराचा नाही. म्हणूनच देव म्हणतो, “पण जेव्हा मी माझा क्रोध बाहेर काढतो, तेव्हा पर्वत लगेचच कोसळून पडतात, धरणी थरथरू लागते, पाणी लगेचच सुकून जाते आणि मनुष्य ताबडतोब आपत्तीने वेढला जातो.” जेव्हा लोक देवाची वचने वाचतात, तेव्हा ते त्यांना देवाच्या देहाशी जोडतात व अशा प्रकारे, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य आणि वचने थेट देहातील देवाकडे निर्देश करतात, ज्यामुळे अधिक प्रभावी परिणाम प्राप्त होतो. जेव्हा देव बोलतो, तेव्हा तो बहुतेकदा स्वर्गातून पृथ्वीवर बोलतो व नंतर पुन्हा एकदा पृथ्वीवरून स्वर्गात, ज्यामुळे सर्व लोक देवाच्या वचनांच्या प्रेरणा आणि उत्पत्ती समजून घेण्यास असमर्थ होतात. “मी स्वर्गात असताना, माझ्या उपस्थितीने तारे कधीही घाबरले नाहीत. उलट, ते त्यांची अंतःकरणे माझ्यासाठी त्यांच्या कार्यात ओततात.” अशी स्वर्गाची स्थिती आहे. देव तिसर्या स्वर्गात सर्व काही पद्धतशीरपणे व्यवस्थापित करतो, देवाच्या सेवेत असलेले सर्व सेवक देवासाठी स्वतःचे कार्य करतात. त्यांनी कधीही देवाची आज्ञा मोडून काहीही केले नाही, म्हणून ते देवाने सांगितलेल्या दहशतीमध्ये फेकले जात नाहीत, उलट ते त्यांचे अंतःकरण त्यांच्या कार्यात व्यस्त करतात; तिथे कधीही कोणताही गोंधळ होत नाही आणि अशा प्रकारे सर्व देवदूत देवाच्या प्रकाशात राहतात. दरम्यान, त्यांच्या अवज्ञेमुळे व ते देवाला ओळखत नसल्यामुळे, पृथ्वीवरील सर्व लोक अंधारात राहतात आणि ते जितके जास्त देवाला विरोध करतात तितकेच ते अंधारात राहतात. जेव्हा देव म्हणतो, “स्वर्ग जितके प्रकाशमान, खाली जग तितके अंधःकारमय असते,” तेव्हा तो देवाचा दिवस सर्व मानवजातीच्या जवळ कसा येत आहे याविषयी बोलत असतो. अशा प्रकारे, तिसऱ्या स्वर्गात देवाच्या ६,००० वर्षांच्या व्यस्ततेचा लवकरच समारोप होईल. पृथ्वीवरील सर्व गोष्टींनी अंतिम अध्यायात प्रवेश केला आहे व लवकरच प्रत्येक गोष्ट देवाच्या हातातून काढून टाकले जाईल. लोक जितके शेवटच्या दिवसांत जातात, तितकेच ते मनुष्याच्या जगातल्या भ्रष्टाचाराची चव चाखण्यास सक्षम होतात; ते जितके शेवटच्या दिवसांत जातात, तितकेच ते त्यांच्या स्वतःच्या देहाचा अधिक आनंद घेतात. जगाची दयनीय अवस्था बदलून टाकू इच्छिणारे बरेच लोक आहेत, परंतु देवाच्या कृत्यांमुळे त्यांची आशा त्यांच्या उसाशांमध्ये हरवली आहे. अशा प्रकारे, जेव्हा लोक वसंत ऋतूची उब अनुभवतात, तेव्हा देव त्यांचे डोळे झाकतो आणि म्हणून ते लोटणाऱ्या लाटांवर तरंगतात, त्यांच्यापैकी एकही जीवनाच्या दूरच्या जीवरक्षक नौकेपर्यंत पोहोचू शकत नाही. लोक जन्मतःच दुबळे असतात, त्यामुळे देव म्हणतो की असा कोणीही नाही जो परिस्थितीला बदलू शकेल. जेव्हा लोक आशा गमावतात, तेव्हा देव संपूर्ण विश्वाशी बोलू लागतो. तो सर्व मानवजातीला वाचवण्यास सुरुवात करतो व परिस्थिती बदलल्यानंतरच लोक नवीन जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम होतात. आजचे लोक आत्मवंचनेच्या टप्प्यावर आहेत. त्यांच्या समोरचा रस्ता खूप निर्जन आणि अस्पष्ट आहे व त्यांचे भविष्य “अमर्याद” आणि “सीमा नसलेले” आहे, त्यामुळे या युगातील लोकांना लढण्याची इच्छा नसते व ते फक्त हॅनाओ पक्ष्यासारखे त्यांचे दिवस घालवू शकतात.[अ] जीवनाचा आणि मनुष्याच्या अस्तित्वाच्या ज्ञानाचा गांभीर्याने पाठपुरावा करणारा कोणीही कधीच झालेला नाही; त्याऐवजी, ते त्या दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा स्वर्गातील तारणहार अचानक जगाची दयनीय अवस्था बदलण्यासाठी खाली येईल, त्यानंतरच ते मनापासून जीवन जगण्याचा प्रयत्न करतील. हीच सर्व मानवजातीची खरी अवस्था व सर्व लोकांची मानसिकता आहे.
आज, मनुष्याच्या वर्तमान मानसिकतेच्या प्रकाशात, देव मनुष्याच्या भावी नवीन जीवनाचे भाकीत करतो. ही प्रकाशाची चमक आहे, ज्याबद्दल देव बोलतो. देव जे भाकीत करतो, ते शेवटी तो पूर्ण करेल आणि ते सैतानावर देवाच्या विजयाचे फळ आहे. “मी सर्व मनुष्यांपेक्षा वरचढ आहे आणि सर्वत्र पाहत आहे. कोणतीही गोष्ट कधीही जुनी दिसत नाही व कोणतीही व्यक्ती पूर्वीसारखी नाही. मी सिंहासनावर विसावतो, मी संपूर्ण विश्वाच्या वर विराजमान आहे….” देवाच्या सध्याच्या कार्याचा हा परिणाम आहे. देवाने निवडलेले सर्व लोक त्यांच्या मूळ रूपात परत येतात, ज्यामुळे देवदूतांना, ज्यांनी इतकी वर्षे दुःख सहन केले आहे, त्यांना सोडण्यात आले आहे, जसे देव म्हणतो, “त्यांचा चेहरा मनुष्याच्या हृदयात असलेल्या पवित्रतेसारखा आहे.” देवदूत पृथ्वीवर कार्य करतात आणि पृथ्वीवर देवाची सेवा करतात व देवाचा गौरव जगभर पसरवतात, त्यामुळे स्वर्ग पृथ्वीवर आणला जातो व पृथ्वी स्वर्गात वर उचलली जाते. म्हणूनच, मनुष्य हा स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा दुवा आहे; स्वर्ग व पृथ्वी यापुढे वेगळे नाहीत, विभक्त नाहीत, परंतु एकमेकांशी जोडलेले आहेत. संपूर्ण जगात, फक्त देव आणि मनुष्य अस्तित्वात आहेत. तेथे कोणतीही धूळ किंवा घाण नाही व सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत, जसे आकाशाखाली हिरव्या गवताळ प्रदेशात पडलेले लहान कोकरू, देवाच्या सर्व कृपेचा आनंद घेत आहे. आणि हिरवळीच्या आगमनामुळेच जीवनाचा श्वास उजळून निघतो, कारण देव अनंतकाळासाठी मनुष्याच्या बरोबरीने जगण्यासाठी जगात येतो, जसे देवाच्या मुखातून असे म्हटले गेले होते, की “मी पुन्हा एकदा सियोनामध्ये शांततेने राहू शकतो.” हे सैतानाच्या पराभवाचे प्रतीक आहे, हा देवाच्या विश्रांतीचा दिवस आहे व या दिवसाचा सर्व लोकांद्वारे गौरव केला जाईल आणि त्याची घोषणा केली जाईल व सर्व लोक स्मरणोत्सव साजरा करतील. जेव्हा देव सिंहासनावर विसावतो, तेव्हाच देव पृथ्वीवर त्याचे कार्य पूर्ण करतो आणि त्याच क्षणी देवाची सर्व रहस्ये मनुष्याला दाखवली जातात; देव व मनुष्य सदैव एकोप्याने राहतील, कधीही वेगळे होणार नाहीत—ही राज्याची सुंदर दृश्ये आहेत!
रहस्यांमध्ये गूढ दडलेले असते; देवाची वचने खरोखरच गहन आणि अथांग आहेत!
तळटीप:
अ. हॅनाओ पक्ष्याची कहाणी इसापच्या मुंगी आणि नाकतोड्याच्या दंतकथेसारखी आहे. हॅनाओ पक्षी त्याच्या शेजाऱ्याने वारंवार इशारा देऊनही, हवामान उबदार असताना घरटे बांधण्याऐवजी झोपणे पसंत करतो. हिवाळा येतो तेव्हा पक्षी गारठून मरण पावतो.