देवाचे कार्य मनुष्याला वाटते तेवढे साधे आहे का?
देवावर विश्वास ठेवणारे या नात्याने, तुमच्यापैकी प्रत्येकाने या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे, की तू शेवटच्या दिवसात देवाचे कार्य आणि तो आज तुझ्यासाठी करत असलेल्या त्याच्या योजनेचे कार्य प्राप्त करून तुम्ही सर्वोच्च उदात्तता व मोक्ष मिळवला आहे. देवाने लोकांच्या या समूहाला संपूर्ण विश्वात त्याच्या कार्याचे केंद्रस्थान बनवले आहे. त्याने त्याच्या हृदयामधील सर्व रक्त तुमच्यासाठी अर्पण केले आहे; त्याने आत्म्याचे सर्व कार्य पुन्हा योग्य मार्गावर आणले आहे आणि तुम्हा सर्वांना दिले आहे. म्हणूनच तुम्ही भाग्यवान लोकांपैकी आहात. तसेच, त्याने त्याचा गौरव इस्रायलकडून, त्याच्या निवडलेल्या लोकांकडून तुमच्यापर्यंत आणला आहे आणि तो या समूहाद्वारे त्याच्या योजनेचा उद्देश पूर्णपणे प्रकट करेल. म्हणूनच, देवाचा वारसा मिळणारे तुम्हीच आहात आणि त्याहूनही अधिक म्हणजे, तुम्ही देवाच्या गौरवाचे वारस आहात. कदाचित तुम्हा सर्वांना हे शब्द आठवत असतील: “कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते.” तुम्ही सर्वांनी हे शब्द आधी ऐकले आहेत, तरीही तुमच्यापैकी कोणालाही त्यांचा खरा अर्थ समजला नाही. आज, तुम्हाला त्यांचे खरे महत्त्व प्रगल्भपणे जाणवले आहे. देव हे शब्द शेवटच्या दिवसात पूर्ण करेल आणि ते त्यांच्यासाठी पूर्ण केले जातील ज्यांच्या भूमीला मोठ्या अग्निवर्ण अजगराने विळखा घालून त्यांचा क्रूरपणे छळ केला आहे. मोठा अग्निवर्ण अजगर देवाचा छळ करतो व तो देवाचा शत्रू आहे आणि म्हणूनच, या भूमीमध्ये, जे देवावर विश्वास ठेवतात त्यांचा अशा प्रकारे अपमान व अत्याचार केला जातो आणि याचा परिणाम म्हणून हे शब्द तुमच्यासाठी, लोकांच्या या समूहासाठी पूर्ण केले जातात. कारण देवाला विरोध करणार्या भूमीवर ते सुरू झाले आहे, देवाच्या सर्व कार्यांमध्ये प्रचंड अडथळे येतात, आणि त्याचे बरेच शब्द पूर्ण होण्यास वेळ लागतो; अशाप्रकारे, देवाच्या शब्दांमुळे लोक सुसंस्कृत होतात, हादेखील दुःखाचा भाग आहे. मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या देशात, देवाला त्याचे कार्य पार पाडणे खूप कठीण आहे—परंतु या अडचणीतूनच देव त्याच्या कार्याचा एक टप्पा पूर्ण करतो, त्याचे ज्ञान आणि त्याची अद्भुत कृत्ये प्रकट करतो आणि लोकांचा समूह पूर्ण करण्यासाठी या संधीचा उपयोग करतो. देव लोकांची दुःखे, क्षमता आणि या घाणेरड्या भूमीतील लोकांच्या सर्व सैतानी प्रवृत्तींचे शुद्धीकरण व विजयाचे कार्य करतो जेणेकरून, यातून त्याला गौरव प्राप्त होऊ शकतो व जे त्याच्या कार्याचे साक्षीदार होऊ शकतात अशा लोकांना तो प्राप्त करू शकतो. देवाने लोकांच्या या समूहासाठी केलेल्या सर्व त्यागांचा हा संपूर्ण महिमा आहे. म्हणजेच, जे त्याला विरोध करतात त्यांच्याद्वारेच देव विजयाचे कार्य करतो आणि केवळ अशा प्रकारे देवाची महान शक्ती प्रकट होऊ शकते. दुसऱ्या शब्दात, फक्त अशुद्ध भूमीतील लोकच देवाच्या गौरवाचा वारसा घेण्यास पात्र आहेत आणि केवळ हेच देवाच्या महाशक्तीवर प्रकाश टाकू शकतात. म्हणूनच अशुद्ध भूमीतून आणि अशुद्ध भूमीत राहणारे यांच्यातूनच देवाचा गौरव प्राप्त होतो. अशीच देवाची इच्छा आहे. येशूच्या कार्याचा टप्पासुद्धा असाच होता: ज्यांनी त्याचा छळ केला त्या परुशांमध्येच तो गौरव मिळवू शकला; जर परुश्यांनी छळ केला नसता आणि यहूद्यांनी विश्वासघात केला नसता, तर येशूची थट्टा केली गेली नसती किंवा त्याची निंदा केली गेली नसती, वधस्तंभावर चढवून कधीच ठार मारले गेले नसते आणि त्यामुळे त्याला गौरव मिळू शकला नसता. देव प्रत्येक युगात जेथे कार्य करतो आणि तो देहस्वरूपात जेथे त्याचे कार्य करतो, तेथे त्याला गौरव प्राप्त होतो आणि तेथे ज्यांना तो प्राप्त करू इच्छितो त्यांना प्राप्त करतो. ही देवाच्या कार्याची योजना आहे आणि हे त्याचे व्यवस्थापन आहे.
देवाच्या अनेक हजार वर्षांच्या योजनेमध्ये, दोन प्रकारची कार्ये देहस्वरूपात केली जातात: पहिले वधस्तंभावर चढण्याचे कार्य आहे, ज्यासाठी त्याला गौरव प्राप्त होतो; दुसरे म्हणजे शेवटच्या दिवसात विजय आणि परिपूर्णतेचे कार्य आहे, ज्यासाठी त्याला गौरव प्राप्त होतो. हे देवाचे व्यवस्थापन आहे. म्हणूनच देवाचे कार्य किंवा देवाने तुमच्यावर दिलेली जबाबदारी याला साधी गोष्ट समजू नका. तुम्ही सर्व देवाच्या अत्युत्तम आणि शाश्वत गौरवाचे वारस आहात व हे देवाने विशेषतः नियुक्त केले आहे. त्याच्या गौरवाच्या दोन भागांपैकी एक भाग तुमच्यामध्ये व्यक्त केलेला आहे; देवाच्या गौरवाचा एक संपूर्ण भाग तुम्हाला दिलेला आहे; जेणेकरून, तो तुमचा वारसा असेल. ही देवाची तुमच्याप्रति उदात्तता आहे आणि हीदेखील त्याचीच योजना आहे जी त्याने खूप पूर्वीपासून योजली होती. मोठा अग्निवर्ण अजगर राहत असलेल्या भूमीत देवाने केलेल्या कार्याची महानता लक्षात घेता, जर हे कार्य इतरत्र हलवले गेले असते, तर त्याचे फार पूर्वीच मोठे फळ मिळाले असते आणि मनुष्याने ते सहजपणे स्वीकारले असते. तसेच, देवावर विश्वास ठेवणार्या पश्चिमेकडील पाद्रींसाठी हे कार्य स्वीकारणे खूप सोपे झाले असते, कारण येशूच्या कार्याचा टप्पा दाखला म्हणून काम करतो. त्यामुळे इतरत्र गौरव प्राप्त करण्याच्या कार्याची ही अवस्था देवाला प्राप्त होत नाही; जेव्हा लोकांचा कार्याला पाठिंबा असतो आणि राष्ट्रांनी मान्यता दिलेली असते, तेव्हा देवाला गौरव प्राप्त होण्यापासून थांबवले जाऊ शकत नाही. या भूमीमधील देवाच्या कार्याच्या या टप्प्याचे नेमके हेच विलक्षण महत्त्व आहे. तुमच्यामध्ये एकही व्यक्ती अशी नाही जी कायद्याने संरक्षित आहे—त्याऐवजी तुम्हाला कायद्याने मंजुरी दिलेली आहे. त्याहूनही मोठी समस्या ही आहे, की लोक तुम्हाला समजून घेत नाहीत: तुमचे नातेवाईक असोत, तुमचे पालक असोत, तुमचे मित्रमैत्रिणी असोत किंवा तुमचे सहकारी असोत, त्यांपैकी कोणीही तुम्हाला समजून घेत नाही. जेव्हा देव तुम्हाला सोडून देतो, तेव्हा तुमच्यासाठी पृथ्वीवर राहणे अशक्य होते. परंतु तरीही, लोक देवापासून दूर राहणे सहन करू शकत नाहीत, हेच देवाने लोकांवर विजय मिळवण्याचे महत्त्व आहे आणि हाच देवाचा गौरव आहे. आज तुम्हाला जो वारसा मिळाला आहे तो युगानुयुगातील प्रेषित आणि संदेष्ट्यांपेक्षा जास्त आहे व मोशे आणि पेत्रा यांच्यापेक्षाही मोठा आहे. देवाची कृपा एक-दोन दिवसांत मिळू शकत नाहीत; ती मोठ्या त्यागातून मिळवावी लागते. याचाच अर्थ असा आहे, की तुमच्याकडे परिष्कृत केलेले प्रेम असले पाहिजे, तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे आणि तुमच्याकडे अशी अनेक सत्ये असली पाहिजेत जी तुम्ही प्राप्त करावीत असे देवाला वाटते; एवढेच नव्हे तर, तुम्ही न घाबरता किंवा टाळाटाळ न करता न्यायाकडे वळले पाहिजे आणि देवावर असे प्रेम केले पाहिजे जे मृत्यूपर्यंत चिरंतन राहील. तुमच्यामध्ये संकल्प असला पाहिजे, तुमच्या जीवन प्रवृत्तीत बदल घडले पाहिजेत, तुम्ही भ्रष्टाचारामधून बाहेर पडले पाहिजे, तुम्ही देवाच्या सर्व योजना कोणत्याही तक्रारीशिवाय स्वीकारल्या पाहिजेत आणि तुम्ही मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहिले पाहिजे. हेच तुम्ही साध्य केले पाहिजे, हेच देवाच्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि लोकांच्या या समूहाकडून देवाला हेच हवे आहे. कारण तो तुम्हाला जे देतो, त्याच्या बदल्यात तो नक्कीच तुमच्याकडे काहीतरी मागेल आणि तुमच्याकडून नक्कीच योग्य मागण्या करेल. म्हणूनच, देव करत असलेल्या प्रत्येक कार्याला कारण आहे, जे दर्शवते की, देव वेळोवेळी उच्च मापदंड आणि कठोर आवश्यकता निर्धारित करणारी कार्ये का करतो. यामुळेच तुमच्या मनामध्ये देवाबद्दल भरभरून श्रद्धा असली पाहिजे. थोडक्यात, देवाचे सर्व कार्य तुमच्यासाठी केले जाते, जेणेकरून तुम्ही त्याचा वारसा घेण्यास पात्र व्हाल. हे देवाच्या स्वतःच्या गौरवासाठी नाही तर तुमच्या तारणासाठी आणि अस्वच्छ भूमीत अत्यंत पीडित झालेल्या लोकांच्या या समूहाला परिपूर्ण करण्यासाठी आहे. तुम्ही देवाची इच्छा समजून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच, कोणतीही अंतर्दृष्टी किंवा ज्ञान नसलेल्या अनेक अज्ञानी लोकांना मी उपदेश करत आहे: देवाची परीक्षा घेऊ नका आणि यापुढे प्रतिकार करू नका. कोणत्याही मनुष्याने कधीही सहन न केलेले दु:ख देवाने याआधीच सहन केले आहे आणि फार पूर्वीच मनुष्याची जागा घेऊन आणखी मोठा अपमान सहन केला आहे. तुम्ही आणखी काय सोडू शकत नाही? देवाच्या इच्छेपेक्षा महत्त्वाचे काय असू शकते? देवाच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ काय असू शकते? या अस्वच्छ भूमीत देवाला त्याचे कार्य पार पाडणे पुरेसे कठीण आहे; आणि त्यावरही, जर मनुष्याने हेतुपरस्पर आणि जाणूनबुजून उल्लंघन केले, तर देवाचे कार्य लांबले जाईल. थोडक्यात, हे कोणाच्याही हिताचे नाही, याने कोणाचेही हित होणार नाही. देवाला काळाचे बंधन नाही; त्याचे कार्य आणि त्याचा गौरव प्रथम येतो. म्हणूनच, कितीही वेळ लागला तरी तो त्याच्या कार्यासाठी कितीही किंमत मोजेल. ही देवाची प्रवृत्ती आहे: त्याचे कार्य पूर्ण होईपर्यंत तो विश्रांती घेणार नाही. जेव्हा त्याला त्याच्या गौरवाचा दुसरा भाग प्राप्त होईल तेव्हाच त्याचे कार्य संपेल. जर, संपूर्ण विश्वात, देवाने गौरव मिळवण्याच्या त्याच्या कार्याचा दुसरा भाग पूर्ण केला नाही, तर त्याचा दिवस कधीही येणार नाही, तो त्याच्या निवडलेल्या लोकांचा हात कधीही सोडणार नाही, त्याचा गौरव इस्रायलवर कधीही अवतरणार नाही आणि त्याची योजना कधीही समाप्त होणार नाही. तुम्हाला देवाची इच्छा पाहता आली पाहिजे आणि हे पाहिले पाहिजे की देवाचे कार्य आकाश व पृथ्वी आणि सर्व गोष्टींच्या निर्मितीइतके सोपे नाही. कारण आजचे कार्य अत्यंत सुन्न झालेल्या, सैतानाने निर्माण केलेल्या आणि त्यांच्यावर प्रक्रिया केलेल्या भ्रष्ट झालेल्यांचे परिवर्तन करण्याचे आहे, त्यांना शुद्ध करण्याचे आहे. ही आदाम किंवा हव्वा यांची निर्मिती नाही, त्याहूनही कमी म्हणजेच प्रकाशाची निर्मिती किंवा प्रत्येक वनस्पती आणि प्राण्याची निर्मिती आहे. सैतानाने भ्रष्ट केलेल्या गोष्टी देव शुद्ध करतो आणि नंतर त्या पुन्हा नव्याने प्राप्त करतो; त्या त्याच्या मालकीच्या वस्तू बनतात आणि ते त्याचे गौरव बनतात. हे मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे नाही, हे आकाश आणि पृथ्वी व त्यामधील सर्व गोष्टींची निर्मिती करण्याइतके किंवा सैतानाला अथांग खड्ड्याचा शाप देण्याच्या कामाइतके सोपे नाही; तर हे मनुष्याचे परिवर्तन करण्याचे, नकारात्मक आणि त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टींना सकारात्मक आणि त्याच्या मालकीच्या गोष्टींमध्ये बदलण्याचे कार्य आहे. हे देवाच्या कार्याच्या या टप्प्यामागील सत्य आहे. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे आणि गोष्टींना जास्त सोपे समजणे टाळले पाहिजे. देवाचे कार्य कोणत्याही सामान्य कार्यापेक्षा वेगळे आहे. त्याची अद्भुतता आणि ज्ञान मनुष्याच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कार्याच्या या टप्प्यावर देव सर्व गोष्टी निर्माण करत नाही, परंतु तो त्यांचा नाशही करत नाही. त्याऐवजी, तो त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे रूपांतर करतो आणि सैतानाने अपवित्र केलेल्या सर्व गोष्टी शुद्ध करतो. आणि अशा रीतीने देव एक महान उपक्रम सुरू करतो, हे देवाच्या कार्याचे संपूर्ण महत्त्व आहे. देवाचे कार्य खरोखर इतके सोपे आहे असे तुला या शब्दांत दिसते का?