देवाच्या कार्याचे तीन टप्पे जाणून घेणे हा देवाला जाणून घेण्याचा मार्ग आहे

मानवजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य तीन टप्प्यात विभागले गेले आहे, याचा अर्थ मानवजातीला वाचवण्याचे कार्य तीन टप्प्यात विभागले गेले आहे. या तीन टप्प्यांमध्ये जग निर्माण करण्याच्या कार्याचा समावेश नाही, तर त्याऐवजी हे नियमशास्त्राचे युग, कृपेचे युग आणि राज्याचे युग असे कार्याचे तीन टप्पे आहेत. जगाच्या निर्मितीचे कार्य म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या निर्मितीचे कार्य होते. हे मानवजातीला वाचवण्याचे कार्य नव्हते आणि मानवजातीला वाचवण्याच्या कार्याशी त्याचा काहीही संबंध नाही, कारण जेव्हा जगाची निर्मिती झाली, तेव्हा मानवजातीला सैतानाने भ्रष्ट केले नव्हते आणि त्यामुळे मानवजातीच्या तारणाचे कार्य करण्याची गरज नव्हती. मानवजातीला वाचवण्याचे कार्य तेव्हाच सुरू झाले, जेव्हा मानवजातीला सैतानाने भ्रष्ट केले आणि म्हणूनच मानवजातीचे व्यवस्थापन करण्याचे कार्यदेखील तेव्हाच सुरू झाले जेव्हा मानवजात भ्रष्ट झाली होती. दुसऱ्या शब्दांत, मनुष्याचे व्यवस्थापन करण्याचे देवाचे कार्य हे मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्याचा परिणाम म्हणून सुरू झाले आणि ते जगाच्या निर्मितीच्या कार्यातून उद्भवले नाही. मानवजातीने भ्रष्ट प्रवृत्ती आत्मसात केल्यानंतरच व्यवस्थापनाचे कार्य अस्तित्वात आले आणि म्हणूनच मानवजातीच्या व्यवस्थापनाच्या कार्यात चार टप्पे किंवा चार युगांऐवजी तीन भाग समाविष्ट आहेत. देवाच्या मानवजातीच्या व्यवस्थापनाचा संदर्भ देण्याचा हाच योग्य मार्ग आहे. जेव्हा अंतिम युग संपेल, तेव्हा मानवजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य पूर्णत्वास आलेले असेल. व्यवस्थापनाच्या कार्याचा समारोप म्हणजे संपूर्ण मानवजातीला वाचवण्याचे कार्य पूर्णतः संपले आहे आणि यापुढे मानवजातीसाठी हा टप्पा पूर्ण झालेला असेल. सर्व मानवजातीला वाचवण्याच्या कार्याशिवाय, मानवजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य अस्तित्त्वात येणार नाही, तसेच कार्याचे तीन टप्पेही असणार नाहीत. मानवजातीच्या नीतिभ्रष्टतेमुळे आणि मानवजातीला तारणाची एवढी तातडीची गरज असल्यामुळेच यहोवाने जगाची निर्मिती पूर्ण केली आणि नियमशास्त्राच्या युगाचे कार्य सुरू केले. तेव्हाच मानवजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य सुरू झाले, म्हणजे तेव्हाच मानवजातीला वाचवण्याचे कार्य सुरू झाले. “मानवजातीचे व्यवस्थापन करणे” याचा अर्थ पृथ्वीवरील नव्याने निर्माण केलेल्या मानवजातीच्या (म्हणजेच, अद्याप भ्रष्ट न झालेल्या मानवजातीच्या) जीवनाला मार्गदर्शन करणे असा होत नाही. उलट, याचा अर्थ सैतानाने भ्रष्ट केलेल्या मानवजातीचे तारण करणे असा आहे, म्हणजेच या भ्रष्ट मानवजातीचे परिवर्तन करणे असा आहे. हाच “मानवजातीचे व्यवस्थापन करणे” याचा अर्थ आहे. मानवजातीला वाचवण्याच्या कार्यामध्ये जग निर्माण करण्याच्या कार्याचा समावेश नाही आणि म्हणूनच मानवजातीचे व्यवस्थापन करण्याच्या कार्यामध्ये जगाच्या निर्मितीच्या कार्याचादेखील समावेश नाही, तर यामध्ये जगाच्या निर्मितीपेक्षा वेगळ्या असलेल्या केवळ तीन टप्प्यांचा समावेश आहे. मानवजातीच्या व्यवस्थापनाचे कार्य समजून घेण्यासाठी, कार्याच्या तीन टप्प्यांच्या इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे—वाचवले जाण्यासाठी प्रत्येकाला याची जाणीव असणे आवश्यक आहे. देवाने निर्मिलेले प्राणी म्हणून, तुम्ही हे ओळखले पाहिजे, की मनुष्याला देवाने निर्माण केले आहे आणि तुम्ही मानवजातीच्या भ्रष्टाचाराचे स्रोत ओळखले पाहिजे आणि त्याशिवाय मनुष्याच्या तारणाची प्रक्रिया ओळखली पाहिजे. जर तुम्हाला केवळ देवाची मर्जी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात शिकवणीनुसार कसे वागावे हे माहीत असेल, परंतु देव मानवजातीचे रक्षण कसे करतो किंवा मानवजातीच्या भ्रष्टतेचा स्रोत काय आहे याची कल्पना नसेल, तर देवाने निर्मिलेला प्राणी म्हणून ही तुमच्यातील कमतरता आहे. देवाच्या व्यवस्थापन कार्याच्या मोठ्या व्याप्तीबद्दल अनभिज्ञ राहून, केवळ प्रत्यक्ष व्यवहारात आणता येणारी सत्ये समजून घेण्यात तू समाधानी राहू नयेस—जर असे असेल तर तू खूप हटवादी आहेस. कार्याचे तीन टप्पे म्हणजे देवाच्या मनुष्याच्या व्यवस्थापनाची अंतर्गत कथा आहे, संपूर्ण जगाच्या सुवार्तेचे आगमन आहे, सर्व मानवजातीमधील सर्वात मोठे रहस्य आहे आणि ते सुवार्तेच्या प्रसाराचा पायादेखील आहेत. जर तू केवळ तुझ्या जीवनाशी संबंधित असलेली साधी सत्ये समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करत असशील आणि तुला सर्व मोठी रहस्ये आणि दृष्टांतांपैकी काहीही माहीत नसेल, तर तुझे जीवन सदोष उत्पादनासारखेच नाही का, ते पाहण्याखेरीज अन्य काहीच नाही का?

जर मनुष्याने केवळ आचरणावर लक्ष केंद्रीत केले आणि देवाचे कार्य पाहिले आणि ज्याला मनुष्याने दुय्यम समजले पाहिजे ते पाहिले, तर हे लहानसहान गोष्टींत सजग असणे मात्र मोठ्या बाबींमध्ये मुर्खपणा करणे नाही का? जे माहीत असायला हवे, ते तुला माहीत असलेच पाहिजे; जे आचरणात आणायला हवे, ते तू आचरणात आणलेच पाहिजेस. तरच तू सत्याचा पाठपुरावा कसा करायचा, हे जाणणारा होशील. जेव्हा तू सुवार्तेचा प्रसार करण्याचा दिवस येतो, तेव्हा जर तू केवळ असे म्हणू शकत असशील, की देव महान आणि नीतिमान देव आहे, तो सर्वोच्च देव आहे, कोणीही महान मनुष्य या देवाच्या तोडीचा नाही आणि या देवाच्या वर कोणीही नाही…, जर तू केवळ ही असंबद्ध आणि वरवरची वचने उच्चारू शकत असशील आणि अत्यंत महत्त्वाची आणि ज्यामध्ये मूलतत्त्व आहे अशी वचने उच्चारण्यास असमर्थ असशील; जर देवाला जाणून घेण्याबद्दल किंवा देवाच्या कार्याबद्दल तुझ्याकडे काहीही सांगण्यासारखे नसेल आणि त्याशिवाय, तुला सत्य समजावून सांगता येत नसेल किंवा मनुष्यामधील कमतरतांचा पुरवठा करता येत नसेल, तर तुझ्यासारखे कोणीही त्यांचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडण्यास असमर्थ आहे. देवाची साक्ष देणे आणि राज्याची सुवार्ता पसरवणे ही काही साधी गोष्ट नाही. तू प्रथम सत्याने सुसज्ज असले पाहिजेस आणि दृष्टांत जे समजून घेतले पाहिजेस. जेव्हा तू देवाच्या कार्याच्या विविध पैलूंच्या दृष्टांतांबद्दल आणि सत्याबद्दल स्पष्ट असशील आणि अंतःकरणात तुला देवाचे कार्य कळलेले असेल आणि देवाने काहीही केले तरीही—मग तो यथोचित न्याय असो किंवा मनुष्याचे परिष्करण असो—तुझा पाया म्हणून तुझ्याकडे सर्वात मोठा दृष्टांत असेल आणि आचरणात आणण्यासाठी योग्य सत्य असेल, तर तू देवाचे अखेरपर्यंत अनुसरण करू शकशील. तुला हे माहीत असले पाहिजे, की तो कितीही कार्य करत असला तरीही, देवाच्या कार्याचे उद्दिष्ट बदलत नाही, त्याच्या कार्याचा गाभा बदलत नाही आणि मनुष्याप्रति त्याची इच्छा बदलत नाही. त्याची वचने कितीही कठोर असली, वातावरण कितीही प्रतिकूल असले, तरी त्याच्या कार्याची तत्त्वे बदलणार नाहीत आणि मनुष्याला वाचवण्याचा त्याचा हेतू कधीही बदलणार नाही. जर हे मनुष्याचा अंत किंवा मनुष्याचे गंतव्यस्थान यांच्या प्रकटीकरणाचे कार्य नसेल आणि अंतिम टप्प्याचे कार्य नसेल किंवा देवाच्या व्यवस्थापनाची संपूर्ण योजना संपुष्टात आणण्याचे कार्य नसेल आणि जर तो ज्या काळात मनुष्यात कार्य करतो त्या काळात हे असेल, तर त्याच्या कार्याचा गाभा बदलणार नाही. हे सदैव मानवजातीचे तारण असेल. हा तुमच्या देवावरील विश्वासाचा पाया असावा. कार्याच्या तीन टप्प्यांचे उद्दिष्ट सर्व मानवजातीचे तारण—म्हणजेच सैतानाच्या नियंत्रणातून मनुष्याचे संपूर्ण तारण हाच आहे. कार्याच्या तीन टप्प्यांपैकी प्रत्येकाचे उद्दिष्ट आणि महत्त्व वेगळे असले तरी, प्रत्येक टप्पा हा मानवजातीला वाचवण्याच्या कार्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक टप्पा म्हणजे मानवजातीच्या गरजेनुसार केले जाणारे तारणाचे वेगळे कार्य आहे. कार्याच्या या तीन टप्प्यांच्या उद्दिष्टाची जाणीव झाल्यावर, कार्याच्या प्रत्येक टप्प्याचे महत्त्व कसे समजून घ्यायचे आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कसे कार्य करावे हे तुला कळेल. जर तू या टप्प्यावर पोहोचू शकलास, तर हा, सर्व दृष्टांतांपैकी सर्वात मोठा दृष्टांत, तुझ्या देवावरील विश्वासाचा पाया बनेल. तू केवळ आचरणाचे सोपे मार्ग किंवा सखोल सत्ये शोधू नयेस, तर आचरणासह दृष्टांतांची सांगड घालायला हवीस, जेणेकरून आचरणात आणले जाणारे सत्य आणि दृष्टांतांवर आधारित ज्ञान हे दोन्ही प्राप्त होऊ शकतील. तरच तू सत्याचा सर्वसमावेशकपणे पाठपुरावा करणारी व्यक्ती होशील.

कार्याचे तीन टप्पे देवाच्या संपूर्ण व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी असतात आणि त्यामध्ये देवाची प्रवृत्ती आणि तो काय आहे हे व्यक्त केले जाते. ज्यांना देवाच्या कार्याचे तीन टप्पे माहीत नसतात ते, देव त्याची प्रवृत्ती कशी व्यक्त करतो हे जाणून घेण्यास असमर्थ असतात किंवा त्यांना देवाच्या कार्यामागील शहाणपणदेखील माहीत नसते. तो मानवजातीला ज्या अनेक मार्गांनी वाचवतो त्या मार्गांबद्दल आणि संपूर्ण मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या इच्छेबद्दलही ते अनभिज्ञ राहतात. कार्याचे तीन टप्पे हे मानवजातीचे रक्षण करण्याच्या कार्याची पूर्ण अभिव्यक्ती असतात. ज्यांना कार्याचे तीन टप्पे माहीत नसतात, ते पवित्र आत्म्याच्या कार्याच्या विविध पद्धती आणि तत्त्वांबद्दल अनभिज्ञ राहतील आणि जे केवळ कार्याच्या एका विशिष्ट टप्प्यातून शिल्लक राहिलेल्या सिद्धांताला कट्टरपणे चिकटून राहतात, ते देवाला सिद्धांतापुरते मर्यादित करतात आणि त्यांचा देवावरील विश्वास अस्पष्ट आणि अनिश्चित असतो. अशा लोकांना देवाचे तारण कधीच प्राप्त होणार नाही. देवाच्या कार्याचे केवळ तीन टप्पे देवाची प्रवृत्ती पूर्णपणे व्यक्त करू शकतात आणि संपूर्ण मानवजातीला वाचवण्याचा देवाचा हेतू आणि मानवजातीच्या तारणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे व्यक्त करू शकतात. त्याने सैतानाचा पराभव केल्याचा आणि मानवजातीला प्राप्त केल्याचा हा पुरावा आहे; हा देवाच्या विजयाचा पुरावा आहे आणि देवाच्या संपूर्ण प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे. ज्यांना देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांपैकी केवळ एक टप्पा समजतो, त्यांना देवाच्या प्रवृत्तीचा केवळ एक भाग माहीत असतो. मनुष्याच्या धारणांमध्ये, कार्याचा हा एकच टप्पा हा सिद्धांत बनणे सोपे असते आणि अशीही शक्यता असते, की मनुष्य देवाबद्दल निश्चित नियम स्थापित करेल आणि देवाच्या प्रवृत्तीचा हा एकमेव भाग म्हणजेच देवाची संपूर्ण प्रवृत्ती आहे, असे मानेल. शिवाय, मनुष्याच्या कल्पनाशक्तीचा बराचसा भाग त्याच्या अंतःकरणात मिसळलेला आहे, एवढा की मनुष्य कट्टरपणे देवाची प्रवृत्ती, अस्तित्व आणि शहाणपण, तसेच देवाच्या कार्याची तत्त्वे यांना मर्यादित मापदंडांमध्ये बंदिस्त करतो, तो असा विश्वास ठेवतो, की जर देव एकदा असा होता, तर तो सर्व काळ सारखाच राहिल आणि कधीही बदलणार नाही. ज्यांना कार्याचे तीन टप्पे माहीत आहेत आणि जे त्यांची दखल घेतात, केवळ तेच देवाला पूर्णपणे आणि अचूकपणे ओळखू शकतात. कमीत कमी, ते देवाला इस्रायली किंवा यहुदी लोकांचा देव म्हणून मर्यादीत करणार नाहीत आणि मनुष्यासाठी सदैव वधस्तंभावर खिळलेला असा देव म्हणून त्याच्याकडे पाहणार नाहीत. जर एखादी व्यक्ती देवाच्या कार्याच्या केवळ एका टप्प्यातूनच देवाला ओळखत असेल, तर त्यांचे ज्ञान फारच कमी असते आणि ते महासागरातील एका थेंबापेक्षा जास्त नसते. तसे नसेल, तर अनेक धार्मिक वृद्ध रक्षकांनी देवाला वधस्तंभावर जिवंत का खिळले असते? मनुष्य देवाला काही ठरावीक मापदंडांमध्ये बंदिस्त करतो म्हणूनच हे होत नाही का? पुष्कळ लोक देवाचा विरोध करतात आणि पवित्र आत्म्याच्या कार्यात अडथळे आणतात, त्यांना देवाचे वैविध्यपूर्ण कार्य माहीत नसते आणि शिवाय, आत्म्याच्या कार्याचे मोजमाप करण्यासाठी त्यांचे ज्ञान आणि सिद्धांत अपुरेच असतात, हेच त्याचे कारण नव्हे का? जरी अशा लोकांचे अनुभव वरवरचे असले, तरी ते गर्विष्ठ आणि सुखलोलुप असतात आणि ते पवित्र आत्म्याच्या कार्याकडे तुच्छतेने पाहतात, पवित्र आत्म्याच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करतात आणि शिवाय, त्यांच्या पवित्र आत्म्याच्या कार्याची “पुष्टी” करण्यासाठी क्षुल्लक जुन्या युक्तिवादांचा वापर करतात. ते केवळ आव आणतात आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाची आणि पांडित्याची पूर्ण खात्री असते आणि त्यांना याचीही खात्री असते, की ते जगभर प्रवास करण्यास समर्थ आहेत. अशा लोकांना पवित्र आत्म्याने तुच्छ लेखलेले आणि नाकारलेले नाही का आणि ते नवीन युगात त्यांना काढून टाकले जाणार नाही का? जे देवासमोर येऊन उघडपणे त्याला विरोध करतात, ते अज्ञानी आणि अल्पज्ञानी खलनायकच नाहीत का, जे केवळ ते किती हुशार आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात? बायबलच्या तुटपुंज्या ज्ञानाआधारे ते जगाच्या “शिक्षण क्षेत्रात” गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करतात; लोकांना शिकवण्यासाठी केवळ वरवरच्या सिद्धांतासह, ते पवित्र आत्म्याचे कार्य उलटवण्याचा आणि ते त्यांच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेभोवती फिरत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते ऱ्हस्वदृष्टीचे असतात आणि ते देवाचे ६,००० वर्षांचे कार्य एका नजरेत पाहण्याचा प्रयत्न करतात. या लोकांकडे नमूद करण्याएवढीदेखील अक्कल नसते! किंबहुना, देवाबद्दलचे लोकांचे ज्ञान जितके अधिक असेल, तितकेच ते त्याच्या कार्याचा न्याय हळू करतील. शिवाय, ते आज देवाच्या कार्याबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल थोडेसे बोलतात, परंतु ते त्यांच्या निर्णयात उतावीळ नसतात. लोक देवाबद्दल जितके कमी जाणतात, तितके ते अधिक गर्विष्ठ आणि अतिआत्मविश्वासू असतात आणि ते जितक्या स्वैरपणे देवाच्या अस्तित्वाची घोषणा करतात—तरीही ते केवळ सिद्धांत बोलतात आणि कोणतेही वास्तविक पुरावे देत नाहीत. अशा लोकांना काहीच किंमत नसते. जे पवित्र आत्म्याचे कार्य केवळ एक खेळ म्हणून पाहतात ते थिल्लर असतात! जे लोक पवित्र आत्म्याचे नवीन कार्य समोर आल्यावर सावध नसतात, जे त्यांची तोंडे बंद करतात, त्वरीत मत बनवतात, जे पवित्र आत्म्याच्या कार्याची योग्यता नाकारण्याच्या त्यांच्या स्वभावाला लगाम घालत नाहीत आणि जे अपमान आणि निंदा करतात—असे अनादर करणारे लोक पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल अनभिज्ञ नाहीत का? शिवाय, ते प्रचंड गर्विष्ठ, स्वभावतःच अभिमानी आणि बेलगाम लोक नाहीत का? असे लोक पवित्र आत्म्याचे नवीन कार्य स्वीकारतील असा दिवस आला, तरीही देव त्यांना सहन करणार नाही. जे देवासाठी कार्य करतात त्यांना ते तुच्छतेने पाहतात तसेच ते स्वतः देवाची निंदाही करतात. अशा दुःसाहसी लोकांना या युगात किंवा येणाऱ्या युगातही क्षमा केली जाणार नाही आणि ते नरकात कायमचे नाश पावतील! असे अनादर करणारे, सुखलोलुप लोक देवावर विश्वास ठेवण्याचे ढोंग करतात आणि लोक असे जितके अधिक, तितकेच ते देवाच्या प्रशासकीय आदेशांचा अपमान करण्याची शक्यता अधिक असते. जन्मजात बेलगाम असलेले आणि कधीही कोणाची आज्ञा न मानणारे सर्व अहंकारी लोक याच मार्गावर चालत नाहीत का? ते दररोज देवाला विरोध करत नाहीत का, असा देव जो सदैव नवीन नसतो आणि कधीही जुना नसतो? तुम्हाला देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांचे महत्त्व का माहीत असले पाहिजे, हे तुम्हाला आज समजले पाहिजे. मी जी वचने उच्चारतो, ती तुमच्यासाठी फायदेशीर आहेत आणि ते केवळ पोकळ बोल नाहीत. जर तुम्ही एखाद्या घोड्यावरून दौडत जाताना दिसणाऱ्या फुलांचे कौतुक करावे, त्याप्रमाणे दूरूनच त्यांचे वाचन केले, तर माझे सगळे परिश्रम व्यर्थ ठरणार नाहीत का? तुमच्यापैकी प्रत्येकाला स्वतःचा स्वभाव माहीत असायला हवा. तुमच्यापैकी बरेच जण वाद घालण्यात तरबेज आहेत; तुमच्या जिभेतून सैद्धांतिक प्रश्नांची उत्तरे निघतात, परंतु मूलतत्त्वाशी संबंधित प्रश्नांबद्दल बोलण्यासारखे तुमच्याकडे काहीही नाही. आजही, तुम्ही अजूनही थिल्लर संभाषणात गुंतलेले आहात, तुमच्या जुन्या प्रवृत्ती बदलण्यास असमर्थ आहात आणि उच्च सत्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या मार्गाचा पाठपुरावा करता, त्यात बदल करण्याचा तुमच्यापैकी बहुतेकांचा कोणताही हेतू नाही, उलट तुम्ही तुमचे आयुष्य अर्धचित्ताने जगता. असे लोक अखेरपर्यंत देवाचे अनुसरण करण्यास समर्थ कसे असतील? जरी तुम्ही मार्गाच्या अंतापर्यंत पोहोचलात तरीही, त्याचा तुम्हाला काय लाभ होईल? खूप उशीर होण्याआधी, एकतर खरोखर पाठपुरावा करून किंवा लवकर माघार घेऊन आपल्या कल्पना बदलणे चांगले. जसजसा वेळ जाईल, तसतसे तुम्ही ऐतखाऊ परजीवी बनाल—तुम्ही इतकी कनिष्ठ आणि दुर्लक्षित भूमिका बजावण्यास तयार आहात का?

कार्याचे तीन टप्पे म्हणजे देवाच्या संपूर्ण कार्याची नोंद असते; देवाने केलेल्या मानवजातीच्या तारणाची ती नोंद असते आणि ते टप्पे काल्पनिक नसतात. जर तुम्हाला खरोखरच देवाच्या संपूर्ण प्रवृत्तीचे ज्ञान प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला देवाने केलेल्या कार्याचे तीन टप्पे माहीत असले पाहिजेत आणि त्याशिवाय, तुम्ही कोणताही टप्पा वगळता कामा नये. जे देवाला जाणून घेऊ पाहतात, त्यांनी किमान एवढे साध्य केले पाहिजे. मनुष्य स्वतः देवाविषयी खरे ज्ञान बनवू शकत नाही. मनुष्य स्वतः कल्पना करू शकेल अशी ही गोष्ट नाही किंवा पवित्र आत्म्याने एखाद्या व्यक्तीवर केलेल्या विशेष कृपेचादेखील हा परिणाम नाही. उलट, हे असे ज्ञान आहे जे मनुष्याने देवाच्या कार्याचा अनुभव घेतल्यानंतर प्राप्त होते आणि ते देवाविषयीचे ज्ञान आहे जे केवळ देवाच्या कार्यातील वास्तवाचा अनुभव घेतल्यानंतर प्राप्त होते. असे ज्ञान सहजासहजी प्राप्त करता येत नाही आणि ते शिकवताही येत नाही. हे पूर्णपणे वैयक्तिक अनुभवाशी संबंधित असते. देवाकडून मानवजातीचे तारण हे कार्याच्या या तीन टप्प्यांच्या केंद्रस्थानी आहे, तरीही तारणाच्या कार्यामध्ये कार्य करण्याच्या अनेक पद्धती आणि अनेक माध्यमांचा समावेश आहे ज्याद्वारे देवाची प्रवृत्ती व्यक्त केली जाते. हे ओळखणे हीच मनुष्यासाठी सर्वात कठीण बाब आहे आणि हेच मनुष्याला समजणे कठीण आहे. युगांमधील फरक, देवाच्या कार्यात होणारे बदल, कार्याच्या ठिकाणांमध्ये होणारे बदल, या कार्याच्या लाभार्थींमध्ये होणारे बदल, इत्यादी—हे सर्व कार्याच्या तीन टप्प्यांमध्ये समाविष्ट आहे. विशेषतः, पवित्र आत्म्याच्या कार्यपद्धतीतील फरक, तसेच देवाची प्रवृत्ती, प्रतिमा, नाव, ओळख यामधील बदल किंवा इतर बदल, हे सर्व कार्याच्या तीन टप्प्यांचे भाग आहेत. कार्याचा एक टप्पा केवळ एका भागाचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि तो एका विशिष्ट कार्यक्षेत्रात मर्यादित असतो. यात युगांमधील फरक किंवा देवाच्या कार्यातील बदलांचा समावेश नाही, मग इतर पैलूंबाबत तर शक्यता अगदीच कमी असते. हे स्पष्ट, उघड सत्य आहे. कार्याचे तीन टप्पे हे मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाचे संपूर्ण कार्य आहे. मनुष्याला तारणाच्या कार्यात देवाचे कार्य आणि देवाची प्रवृत्ती माहीत असणे आवश्यक आहे; या वस्तुस्थितीखेरीज, देवाविषयीचे तुमचे ज्ञान म्हणजे पोकळ वचनांखेरीज अन्य काहीही नाही, बसल्या जागी वल्गना करण्यापलीकडे अन्य काही नाही. असे ज्ञान मनुष्याला समजावू शकत नाही किंवा मनुष्यावर विजयदेखील मिळवू शकत नाही; ते वास्तविकतेशी विसंगत असते आणि ते सत्य नसते. हे ऐकायला खूप विपुल आणि आनंददायी असे वाटू शकते, परंतु जर ते देवाच्या अंतर्निहित प्रवृत्तीशी विसंगत असेल, तर देव तुला सोडणार नाही. तो तुझ्या ज्ञानाची प्रशंसा करणार नाही, एवढेच नव्हे तर त्याची निंदा करण्याचे पाप केल्याबद्दल तो तुझा बदलादेखील घेईल. देवाविषयीच्या ज्ञानाची वचने सहजपणे उच्चारली जात नाहीत. जरी तू वाक्पटू आणि बोलण्यात चतुर असशील आणि काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करण्याइतके बोलण्यात पटाईत असशील, तरीही देवाच्या ज्ञानाविषयी विचार केला, तर त्यामध्ये कोणतीही खोली नसते. देव म्हणजे असा कोणी नाही, की ज्याच्याविषयी तू अविचारीपणे मत बनवू शकतोस किंवा सहजच स्तुती करू शकतोस किंवा बेफिकीरपणे निंदा करू शकतोस. तू कोणाचीही स्तुती करू शकतोस, पण देवाच्या सर्वोच्च कृपेचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यासाठी तुला धडपडावे लागते—हेच प्रत्येक अपयशी व्यक्तीला जाणवते. देवाचे वर्णन करण्यास समर्थ असलेले अनेक भाषाप्रभू असले, तरीही त्यांनी केलेल्या वर्णनाची अचूकता ही देवाच्या लोकांनी उच्चारलेल्या सत्याच्या केवळ शंभरावा भाग असते, अशा लोकांकडे शब्दसंपत्ती मर्यादित असली, तरीही त्यांच्याकडे समृद्ध अनुभव असतो. त्यामुळे हे दिसून येते, की देवाचे ज्ञान हे अचूकतेमध्ये आणि वास्तविकतेमध्ये सामावलेले असते आणि ते चतुर वचने किंवा समृद्ध शब्दसंपत्तीत नसते आणि मनुष्याचे ज्ञान आणि देवाचे ज्ञान यांचा काहीही संबंध नसतो. देवाला जाणून घेण्याचा धडा हा मानवजातीच्या कोणत्याही नैसर्गिक विज्ञानापेक्षा उच्च आहे. हा असा धडा आहे जो देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार्‍या अगदी मोजक्या लोकांनाच साध्य होऊ शकतो, केवळ प्रतिभेच्या जोरावर तो प्राप्त करता येणार नाही. म्हणूनच, देवाला जाणून घेणे आणि सत्याचा पाठपुरावा करणे हे एखाद्या मुलालाही जमेल अशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहू नये. कदाचित तू तुझ्या कौटुंबिक जीवनात, करिअरमध्ये किंवा वैवाहिक जीवनात पूर्णपणे यशस्वी झाला असशील, परंतु जेव्हा सत्य आणि देवाला जाणून घेण्याच्या धड्याचा विषय येतो, तेव्हा तुझ्याकडे स्वतःला दाखवण्यासारखे काहीही नसते आणि तू काहीही साध्य केलेले नसतेस. असे म्हणता येईल, की सत्य आचरणात आणणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे, आणि देव जाणून घेणे ही त्याहूनही मोठी समस्या आहे. ही तुमची अडचण आहे आणि हीच संपूर्ण मानवजातीला भेडसावणारी अडचण आहे. ज्यांना देवाला जाणण्याच्या कार्यात काही यश प्राप्त झाले आहे, त्यांच्यापैकी जवळजवळ कोणीच दर्जेदार नाही. देवाला जाणणे म्हणजे काय किंवा देवाला जाणणे का आवश्यक आहे किंवा देव जाणण्यासाठी कोणती पातळी प्राप्त करणे आवश्यक आहे, हे मनुष्याला माहीत नाही. हीच गोष्ट मानवजातीला खूप गोंधळात टाकणारी असते आणि हे मानवजातीला पडलेले हे सर्वात मोठे कोडे आहे—या प्रश्नाचे उत्तर देण्यास कोणीही समर्थ नाही किंवा कोणी या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयारदेखील नाही, कारण आजपर्यंत या कार्याच्या अभ्यासात मानवजातीतील कोणालाही यश आलेले नाही. कदाचित, जेव्हा कार्याच्या तीन टप्प्यांचे कोडे मानवजातीला उलगडेल, तेव्हा देवाला जाणणाऱ्या एकामागोमाग एक प्रतिभावान लोकांचा समूह समोर येईल. अर्थात, मला आशा आहे की तेच होईल आणि त्याशिवाय, मी हे कार्य पार पाडण्याच्या प्रक्रियेत आहे आणि नजीकच्या भविष्यात असे अधिक प्रतिभावान लोक दिसतील, अशी मला आशा आहे. हे लोक कार्याच्या या तीन टप्प्यांच्या वस्तुस्थितीची साक्ष देतील आणि अर्थातच, कार्याच्या या तीन टप्प्यांची साक्ष देणारेदेखील तेच पहिले असतील. परंतु ज्या दिवशी देवाचे कार्य संपेल त्या दिवशी जर असे प्रतिभावान लोक उदयास आले नाहीत किंवा देहधारी देवाकडून परिपूर्णता स्वीकारलेले असे एक किंवा दोनच लोक असतील, तर यापेक्षा अधिक दुःखदायक आणि खेदजनक काहीही नसेल. मात्र, ही केवळ सर्वात वाईट परिस्थिती आहे. काहीही असले, तरी मला अजूनही आशा आहे, की जे खऱ्या अर्थाने पाठपुरावा करतात त्यांना हा आशीर्वाद मिळेल. काळाच्या सुरुवातीपासून, असे कार्य यापूर्वी कधीही झालेले नाही; मानवी विकासाच्या इतिहासात असे उपक्रम कधीच घडलेले नाहीत. जर तुम्ही खरोखरच देवाला ओळखणाऱ्या सुरुवातीच्या व्यक्तींपैकी बनू शकत असाल, तर हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वोच्च सन्मान ठरणार नाही का? मानवजातीतील कोणताही प्राणी देवाकडून याहून अधिक प्रशंसेला पात्र असेल का? असे कार्य साध्य करणे सोपे नाही, परंतु त्याचे बक्षीस अखेर मिळेलच. त्यांचे लिंग किंवा राष्ट्रीयत्व काहीही असले तरी, जे लोक देवाचे ज्ञान प्राप्त करण्यास समर्थ असतात, त्यांना अखेरीस, देवाकडून सर्वात मोठा सन्मान मिळेल आणि केवळ तेच लोक असतील ज्यांना देवाचा अधिकार प्राप्त असेल. हे आजचे कार्य आहे आणि हे भविष्याचेही कार्य आहे; ६,००० वर्षांच्या कार्यात पूर्ण केले जाणारे हे अंतिम आणि सर्वोच्च कार्य आहे आणि मनुष्याची प्रत्येक श्रेणी प्रकट करण्याच्या कार्याचा हाच मार्ग आहे. मनुष्याला देवाची ओळख करून देण्याच्या कार्याद्वारे, मनुष्याच्या विविध श्रेणी प्रकट होतात: जे देवाला ओळखतात ते देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास आणि त्याची वचने स्वीकारण्यास पात्र असतात, तर जे देवाला ओळखत नाहीत ते देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यास आणि त्याची वचने स्वीकारण्यास पात्र नसतात. जे देवाला जाणतात ते देवाचे जिवलग असतात आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांना देवाचे जिवलग म्हणता येणार नाही; देवाच्या जिवलगांना देवाचे सर्व आशीर्वाद लाभू शकतात, परंतु जे त्याचे जिवलग नसतात ते त्याच्या कोणत्याही कार्यास पात्र नसतात. क्लेश असोत, परिष्करण असो किंवा न्याय असो, या सर्व गोष्टी मनुष्याला अखेरीस देवाचे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठीच आहेत, जेणेकरून मनुष्य देवाच्या अधीन होऊ शकेल. हा एकमेव परिणाम अखेरीस साध्य होईल. कार्याच्या तीन टप्प्यांपैकी काहीही लपलेले नाही आणि मनुष्याच्या देवाच्या ज्ञानासाठी हे फायदेशीर आहे आणि मनुष्याला देवाचे अधिक संपूर्ण आणि परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते. हे सर्व कार्य मनुष्याच्या फायद्याचे आहे.

स्वतः देवाचे कार्य हा एक दृष्टांत आहे जो मनुष्याला माहीत असणे आवश्यक आहे, कारण देवाचे कार्य मनुष्याद्वारे साध्य होऊ शकत नाही आणि ते मनुष्याच्या ताब्यात नाही. कार्याचे तीन टप्पे हे संपूर्णपणे देवाचे व्यवस्थापन आहे आणि याहून मोठा कोणताही दृष्टांत नाही मनुष्याने ओळखला पाहिजे. जर मनुष्याला हा पराक्रमी दृष्टांत माहीत नसेल, तर देवाला ओळखणे सोपे नाही, देवाची इच्छा समजून घेणे सोपे नाही, एवढेच नव्हे तर, मनुष्य ज्या मार्गावर चालतो तो अधिकाधिक कठीण होत जाईल. दृष्टांत नसते, तर मनुष्य इतक्या दूरपर्यंत पोहोचू शकला नसता. आजपर्यंत दृष्टांतांनीच मनुष्याचे रक्षण केले आहे आणि ज्याने मानवाला सर्वात मोठे संरक्षण दिले आहे. भविष्यात, तुमचे ज्ञान सखोल झाले पाहिजे आणि कार्याच्या तीन टप्प्यांत तुम्हाला त्याची संपूर्ण इच्छा आणि त्याच्या ज्ञानी कार्याचे मूलतत्त्व कळले पाहिजे. केवळ हीच तुमची खरी पातळी आहे. कार्याचा अंतिम टप्पा हा स्वतंत्रपणे उभा राहत नाही, तर याआधीच्या दोन टप्प्यांसह तयार झालेल्या एकत्रित कार्याचा तो एक भाग आहे, याचा अर्थ असा की कार्याच्या तीन टप्प्यांपैकी केवळ एक पूर्ण करून तारणाचे संपूर्ण कार्य पूर्ण करणे अशक्य आहे. जरी कार्याचा शेवटचा टप्पा मनुष्याला पूर्णपणे वाचवण्यास समर्थ असला तरी, याचा अर्थ असा नाही, की केवळ हा एकमेव टप्पा पार करणे पुरेसे आहे आणि मनुष्याला सैतानाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी कार्याच्या मागील दोन टप्प्यांची आवश्यकता नाही. तीन टप्प्यांपैकी कोणताही एक टप्पा हा सर्व मानवजातीला माहीत असणे आवश्यक असलेला एकमेव दृष्टांत म्हणून धरता येत नाही, कारण तारणाचे संपूर्ण कार्य म्हणजे कार्याचे तीन टप्पे आहेत, त्यातील केवळ एक टप्पा नाही. जोपर्यंत तारणाचे कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत देवाचे व्यवस्थापन पूर्णत्वास येऊ शकत नाही. देवाचे अस्तित्व, त्याची प्रवृत्ती आणि त्याचे शहाणपण तारणाच्या कार्यात संपूर्णपणे व्यक्त केले जाते; ते मनुष्यासमोर अगदी सुरुवातीला प्रकट केले जात नाहीत, तर तारणाच्या कार्यात हळूहळू व्यक्त केले जातात. तारणाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा देवाच्या प्रवृत्तीचा एक भाग आणि त्याच्या अस्तित्वाचा एक भाग व्यक्त करतो; कार्याचा कोणताही एक टप्पा थेट आणि पूर्णपणे देवाचे अस्तित्व व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारे, कार्याचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतरच तारणाचे कार्य संपूर्णपणे पूर्ण केले जाऊ शकते आणि म्हणूनच मनुष्याचे देवाविषयीचे संपूर्ण ज्ञान हे देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांपासून अविभाज्य आहे. कार्याच्या एका टप्प्यातून मनुष्याला जे काही प्राप्त होते, ती केवळ देवाच्या कार्याच्या एका भागात व्यक्त होणारी देवाची प्रवृत्ती असते. ते आधीच्या किंवा नंतरच्या टप्प्यात व्यक्त केलेल्या प्रवृत्तीचे आणि अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. कारण मानवजातीला वाचवण्याचे कार्य केवळ एका कालखंडात किंवा एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही, तर वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी मनुष्याच्या विकासाच्या पातळीनुसार ते हळुहळू अधिक सखोल होत जाते. हे कार्य टप्प्याटप्प्याने केले जाते आणि ते एका टप्प्यात पूर्ण होत नाही. म्हणूनच, देवाचे संपूर्ण शहाणपण केवळ एका वैयक्तिक टप्प्यापुरते न राहता तीन टप्प्यांमध्ये प्रत्यक्षात येते. त्याचे संपूर्ण अस्तित्व आणि त्याचे संपूर्ण ज्ञान या तीन टप्प्यांमध्ये मांडले आहे आणि प्रत्येक टप्प्यात त्याचे अस्तित्व आहे आणि प्रत्येक टप्पा त्याच्या कार्याच्या शहाणपणाची नोंद आहे. या तिन्ही टप्प्यांमध्ये व्यक्त झालेली देवाची संपूर्ण प्रवृत्ती मनुष्याने जाणली पाहिजे. देवाचे हे सर्व अस्तित्व संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जेव्हा लोक देवाची उपासना करतात तेव्हा त्यांना हे ज्ञान नसेल, तर ते बुद्धाची उपासना करणाऱ्यांपेक्षा वेगळे नाहीत. मनुष्यामधील देवाचे कार्य मनुष्यापासून लपलेले नसते आणि जे देवाची उपासना करतात त्या सर्वांना ते माहीत असले पाहिजे. देवाने मनुष्यामध्ये तारणाच्या कार्याचे तीन टप्पे पार पाडले असल्याने, या तीन टप्प्यांदरम्यान मनुष्याने तो काय आहे आणि त्याच्याकडे काय आहे याची अभिव्यक्ती जाणून घेतली पाहिजे. हेच मनुष्याने केले पाहिजे. जे साध्य करण्यास मनुष्य असमर्थ आहे आणि जे मनुष्याला कळू नये, ते देव मनुष्यापासून लपवून ठेवतो आणि मनुष्याला जे कळले पाहिजे आणि मनुष्याकडे जे असले पाहिजे, जे देव मनुष्याला दाखवतो. कार्याच्या तीन टप्प्यांपैकी प्रत्येक टप्पा मागील टप्प्याच्या आधारावर पार पाडला जातो; तो तारणाच्या कार्यापासून वेगळा, स्वतंत्रपणे पार पाडला जात नाही. जरी युग आणि पार पाडले जाणारे कार्य यामध्ये खूप फरक असला, तरीही मानवजातीचे तारण हाच त्याचा गाभा आहे आणि तारणाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा आधीच्या टप्प्यापेक्षा अधिक सखोल आहे. कार्याचा प्रत्येक टप्पा आधीच्या पायावर सुरू असतो, जो रद्द केला जात नाही. अशा प्रकारे, त्याच्या कार्यात जे नित्य नवीन असते आणि कधीही जुने नसते, देव त्याच्या प्रवृत्तीचे पैलू निरंतर व्यक्त करत असतो, जे यापूर्वी कधीही मनुष्यासमोर व्यक्त केले गेलेले नाहीत आणि नेहमी मनुष्याला त्याचे नवीन कार्य आणि त्याचे नवीन अस्तित्व प्रकट करत असतो आणि जरी धार्मिक जुने रक्षक याचा प्रतिकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असले आणि त्याला उघडपणे विरोध करत असले, तरीही देव सदैव त्याला करायचे असलेले नवीन कार्य करतो. त्याचे कार्य सदैव बदलत असते आणि त्यामुळे त्याला मनुष्याच्या निरंतर विरोधाला सामोरे जावे लागत असते. त्याचप्रमाणे, त्याची प्रवृत्तीदेखील सदैव बदलत असते, तसेच युग आणि त्याच्या कार्याचे लाभार्थीही बदलत असतात. शिवाय, तो सदैव पूर्वी कधीही न केलेले कार्य करत असतो, तसेच मनुष्याला पूर्वी केलेल्या कार्याच्या विरोधाभासी वाटेल, त्याच्या विरुद्ध ठरेल, असे कार्यदेखील तो करत असतो. मनुष्य केवळ एक प्रकारचे कार्य किंवा आचरणाचा एकच मार्ग स्वीकारण्यास समर्थ असतो आणि त्याच्या विरोधातील किंवा त्यापेक्षा उच्च कार्य किंवा आचरण पद्धती स्वीकारणे त्याला कठीण असते. परंतु पवित्र आत्मा निरंतर नवीन कार्य करत असतो आणि म्हणून धार्मिक तज्ज्ञांचे गट एकापाठोपाठ एक समोर येऊन देवाच्या नवीन कार्याला विरोध करत असतात. हे लोक तज्ज्ञ बनलेले असतात याचे नेमके कारण म्हणजे देव नित्य नवीन असतो आणि कधीही जुना कसा नसतो, याचे ज्ञान मनुष्याला नसते आणि देवाच्या कार्याच्या तत्त्वांचे ज्ञान त्याला नसते तसेच देव मनुष्याला कोणत्या वेगवेगळ्या मार्गांनी वाचवतो याचेही ज्ञान त्याला नसते. म्हणूनच, हे पवित्र आत्म्याकडून आलेले कार्य आहे की नाही आणि ते स्वतः देवाचे कार्य आहे की नाही हे सांगण्यास मनुष्य पूर्णपणे असमर्थ असतो. जर एखादी गोष्ट आधी आलेल्या वचनांशी जुळत असेल, तरच ती स्वीकारावी आणि जर पूर्वीच्या कार्यापेक्षा वेगळी असेल, तर त्यास विरोध करावा आणि ती नाकारावी, अशा वृत्तीला पुष्कळ लोक चिकटून राहतात. आज, तुम्ही सर्वजण अशाच तत्त्वांचे पालन करत नाही का? तारणाच्या कार्याच्या तीन टप्प्यांचा तुमच्यावर फारसा प्रभाव पडलेला नाही आणि असेही काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे, की कार्याचे मागील दोन टप्पे हे निव्वळ भार आहे जो त्यांना माहीत असणे आवश्यक नाही. त्यांना वाटते, की हे टप्पे जनतेसमोर घोषित केले जाऊ नयेत आणि शक्य तितक्या लवकर मागे घेतले जावेत, जेणेकरून कार्याच्या तीन टप्प्यांपैकी आधीच्या दोन टप्प्यांमुळे लोकांवर दडपण येऊ नये. बहुतेकांचा असा विश्वास आहे, की कार्याच्या मागील दोन टप्प्यांची ओळख करून देणे हे खूपच दूरचे पाऊल आहे आणि देवाला जाणून घेण्याच्या कामी त्याचा काहीही उपयोग नाही—असे तुम्हाला वाटते. आज, तुम्हा सर्वांचा असा विश्वास आहे, की अशा प्रकारे वागणे योग्य आहे, परंतु एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला माझ्या कार्याचे महत्त्व समजेल: हे जाणून घ्या, की मी असे कोणतेही कार्य करत नाही, जे महत्त्वाचे नाही. मी तुमच्यासमोर कार्याचे तीन टप्पे घोषित करत असल्याने, ते तुमच्या फायद्याचे असले पाहिजेत; कार्याचे हे तीन टप्पे देवाच्या संपूर्ण व्यवस्थापनाच्या केंद्रस्थानी असल्याने, ते संपूर्ण विश्वातील प्रत्येकाच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत. एक दिवस तुम्हा सर्वांना या कार्याचे महत्त्व कळेल. हे जाणून घ्या, की तुम्ही देवाच्या कार्याला विरोध करता किंवा तुमच्या स्वतःच्या धारणांच्या आधारावर आजच्या कार्याचे मोजमाप करता, कारण तुम्हाला देवाच्या कार्याची तत्त्वे माहीत नाहीत आणि पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल तुम्ही अविचारी वर्तन करता. तुमचा देवाला असलेला विरोध आणि पवित्र आत्म्याच्या कार्यात अडथळे आणणे याला तुमच्या धारणा आणि अंतर्निहित अहंकार हेच कारणीभूत आहेत. देवाचे कार्य चुकीचे आहे हे नाही, तर तुम्ही स्वाभाविकपणे खूप अवज्ञाकारी आहात हे त्याचे कारण आहे. देवावरील त्यांचा विश्वास सापडल्यानंतर, काही लोक मनुष्य कोठून आला हेदेखील निश्चितपणे सांगू शकत नाहीत, तरीही ते पवित्र आत्म्याच्या कार्यातील योग्य आणि अयोग्य गोष्टींचे मूल्यमापन करणारी जाहीर भाषणे ठोकण्याचे धाडस करतात. ज्यांच्या ठायी पवित्र आत्म्याचे नवीन कार्य असते अशा प्रेषितांनाही ते व्याख्याने देतात, टिप्पणी करतात आणि मध्येमध्ये बोलतात; त्यांची माणुसकी खूप कनिष्ठ दर्जाची आहे आणि त्यांच्यामध्ये किंचितही शहाणपण नाही. असा दिवस येणार नाही का, जेव्हा अशा लोकांना पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे नाकारले जाईल आणि नरकाच्या अग्नीत भस्मसात केले जाईल? त्यांना देवाचे कार्य माहीत नाही, उलट ते त्याच्या कार्यावर टीका करतात आणि कार्य कसे करावे हे देवालाच शिकवण्याचा प्रयत्न करतात. असे अविचारी लोक देवाला कसे ओळखतील? शोधण्याच्या आणि अनुभवण्याच्या प्रक्रियेत मनुष्याला देवाची ओळख होते; पवित्र आत्म्याच्या ज्ञानाद्वारे मनुष्याला देवाची ओळख होते, आवेशाने टीका केल्याने नाही. देवाबद्दलचे लोकांचे ज्ञान जितके अचूक होईल, तितका त्यांचा त्याला असलेला विरोध कमी होईल. याउलट, देवाविषयी लोक जितके कमी जाणतील, तितकाच विरोध अधिक होण्याची शक्यता असते. तुझ्या धारणा, तुझा जुना स्वभाव आणि तुझी माणुसकी, चारित्र्य आणि नैतिक दृष्टिकोन या भांडवलाच्या आधारे तू देवाचा प्रतिकार करतोस आणि तुझी नैतिकता जितकी अधिक भ्रष्ट, तुझे गुण जितके अधिक खराब आणि तुझी मानवता जितकी कनिष्ठ दर्जाची, तू तितका अधिकाधिक देवाचा शत्रू बनतोस. ज्यांच्या मनात दृढ धारणा आहेत आणि ज्यांची प्रवृत्ती आत्मसंतुष्ट आहे, ते देहधारी देवाशी अधिकच वैर करतात; असे लोक ख्रिस्तविरोधी आहेत. जर तुझ्या धारणा दुरुस्त केल्या नाहीत, तर त्या सदैव देवाच्या विरुद्ध असतील; तुम्ही कधीही देवाशी अनुरूप असणार नाही आणि त्याच्यापासून सदैव दूर राहाल.

तुमच्या जुन्या धारणा बाजूला ठेवल्या ठेवूनच तुम्ही नवीन ज्ञान प्राप्त करू शकता, तरीही जुने ज्ञान जुन्या धारणांच्या बरोबरीचे असेलच असे नाही. “धारणा” म्हणजे मनुष्याने कल्पिलेल्या गोष्टी, ज्या वास्तविकतेशी विसंगत असतात. जर जुने ज्ञान याआधी जुन्या युगातच कालबाह्य झाले असेल आणि मनुष्याला नवीन कार्यात प्रवेश करण्यापासून रोखत असेल, तर असे ज्ञान हीदेखील निव्वळ धारणा आहे. जर मनुष्य अशा ज्ञानाविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास समर्थ असेल आणि जुन्या-नव्याची सांगड घालून अनेक वेगवेगळ्या पैलूंमधून देवाला ओळखू शकत असेल, तर जुने ज्ञान मनुष्याला सहाय्यकारी ठरते आणि मनुष्यासाठी नवीन युगात प्रवेश करण्याचा आधार बनते. देवाला जाणून घेण्याच्या धड्यासाठी तुला अनेक तत्त्वांवर प्रभुत्व मिळवण्याची आवश्यकता आहे: देवाला जाणून घेण्याच्या मार्गावर कसा प्रवेश करावा, देवाला जाणून घेण्यासाठी तू कोणती सत्ये जाणून घ्यावीत आणि तुझ्या धारणांपासून आणि जुन्या प्रवृत्तींपासून कसे मुक्त व्हावे, जेणेकरून तू देवाच्या नवीन कार्याच्या सर्व व्यवस्थेच्या अधीन होशील. जर तू देवाला जाणून घेण्याच्या धड्यात प्रवेश करण्यासाठी पाया म्हणून या तत्त्वांचा उपयोग केलास, तर तुझे ज्ञान अधिकाधिक सखोल होत जाईल. जर तुला कार्याच्या तीन टप्प्यांचे—म्हणजेच, देवाच्या व्यवस्थापनाच्या संपूर्ण योजनेचे—स्पष्ट ज्ञान असेल आणि जर तू देवाच्या कार्याच्या मागील दोन टप्प्यांचा सध्याच्या टप्प्याशी पूर्णपणे संबंध ओळखू शकत असशील आणि हे कार्य एका देवाने केले आहे हे पाहू शकत असशील, तर तुझा पाया अतुलनीयरीत्या मजबूत असेल. कार्याचे तीन टप्पे एकाच देवाने पार पाडले, हाच सर्वात मोठा दृष्टांत आहे आणि देवाला जाणण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. कार्याचे तीन टप्पे केवळ स्वतः देवच करू शकला असता आणि कोणीही मनुष्य त्याच्या वतीने असे कार्य करू शकला नसता—म्हणजेच असे म्हणायचे आहे, की सुरुवातीपासून आजपर्यंत केवळ स्वतः देवच त्याचे कार्य करू शकला असता. जरी देवाच्या कार्याचे तीन टप्पे वेगवेगळ्या युगात आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार पाडले गेले असले आणि प्रत्येकाचे कार्य वेगळे असले, तरी ते सर्व कार्य एकाच देवाने केलेले आहे. सर्व दृष्टांतांपैकी, हा सर्वांत मोठा दृष्टांत आहे जो मनुष्याने जाणलाच पाहिजे आणि जर तो मनुष्याला पूर्णपणे समजला तर तो खंबीरपणे उभा राहू शकेल. आज, विविध धर्म आणि संप्रदायांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या ही आहे, की त्यांना पवित्र आत्म्याचे कार्य माहीत नाही आणि ते पवित्र आत्म्याने केलेले कार्य आणि पवित्र आत्म्याचे नसलेले कार्य यांच्यात फरक करू शकत नाहीत—यामुळे, ते कार्याचा हा टप्पा, कार्याच्या याआधीच्या दोन टप्प्यांप्रमाणे, यहोवा देवानेच पार पाडलेला आहे की नाही, हे सांगू शकत नाहीत. लोक देवाचे अनुसरण करत असले तरी, तोच योग्य मार्ग आहे की नाही, हे अनेकजण सांगू शकत नाहीत. स्वतः देव या मार्गावर वैयक्तिकरीत्या चालला आहे की नाही आणि देहधारी देव ही वस्तुस्थिती आहे की नाही, याची चिंता मनुष्याला वाटते आणि बहुतेक लोकांना अजूनही अशा गोष्टी कशा ओळखायच्या याबद्दल काहीच माहिती नाही. जे देवाचे अनुसरण करतात, ते मार्ग निश्चित करण्यास असमर्थ असतात आणि बोलल्या जाणाऱ्या संदेशांचा अशा लोकांवर अल्पसा प्रभाव पडतो आणि ते पूर्णपणे प्रभावी ठरण्यास असमर्थ असतात, त्यामुळे अशा लोकांच्या जीवन प्रवेशावर परिणाम होतो. जर कार्याच्या तीन टप्प्यांत मनुष्याला हे समजले, की हे तीन टप्पे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांमध्ये स्वतः देवानेच पार पाडले; कार्य जरी वेगळे असले तरी ते सर्व एकाच देवाने केले आहे आणि ते एकाच देवाने केलेले कार्य असल्याने ते योग्य आणि अचूक असले पाहिजे आणि ते मनुष्याच्या धारणांशी विसंगत असले, तरी ते एकाच देवाचे कार्य आहे हे नाकारता येणार नाही—जर मनुष्य खात्रीपूर्वक सांगू शकला, की हे एकाच देवाचे कार्य आहे, तर मनुष्याच्या धारणा केवळ क्षुल्लक, अनुल्लेखनीय होतील. मनुष्याचे दृष्टांत अस्पष्ट असल्याने आणि मनुष्य केवळ यहोवाला देव म्हणून ओळखत असल्याने आणि येशूला प्रभू म्हणून ओळखत असल्याने आणि आजच्या काळातील देहधारी देवाबद्दल त्याच्या मनात शंका असल्याने, बरेच लोक यहोवा आणि येशूच्या कार्याप्रति समर्पित राहतात आणि आजच्या कार्याबद्दलच्या धारणांच्या विळख्यात सापडल्यामुळे, बहुतेक लोक सदैव संशयी असतात आणि आजचे कार्य गांभीर्याने घेत नाहीत. कार्याच्या याआधीच्या दोन टप्प्यांबद्दल, जे अदृश्य होते, मनुष्याच्या मनात कोणत्याही धारणा नाहीत. कारण मनुष्याला कार्याच्या मागच्या दोन टप्प्यांची वास्तविकता समजत नाही आणि त्याने ते प्रत्यक्ष पाहिलेले नाहीत. कार्याचे हे टप्पे दिसत नाहीत, म्हणून मनुष्य त्याच्या मर्जीनुसार त्यांच्याविषयी कल्पना करतो; त्याच्या हाती लागलेल्या वास्तवाची पर्वा न करता, अशा कल्पना सिद्ध करण्यासाठी कोणतीही तथ्ये उपलब्ध नाहीत आणि त्यांना दुरुस्त करणारे कोणीही नाही. मनुष्य त्याच्या स्वभावाला मोकाट सोडतो, सावधगिरी भिरकावून देतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीला मोकळे सोडतो; त्याच्या कल्पनेची पडताळणी करण्यासाठी कोणतीही तथ्ये नसतात आणि त्यामुळे मनुष्याच्या कल्पनाच “तथ्ये” बनतात, मग त्यांच्याकडे कोणताही पुरावा असो वा नसो. अशा रीतीने मनुष्य मनातल्या मनात आपल्या कल्पित देवावर विश्वास ठेवतो आणि वास्तविक देवाचा शोध घेत नाही. जर एखाद्या व्यक्तीचा एक प्रकारचा विश्वास असेल, तर शंभर लोकांचा शंभर प्रकारचा विश्वास असतो. मनुष्याच्या ठायी असा विश्वास असतो कारण त्याने देवाच्या कार्याची वास्तविकता पाहिलेली नाही, कारण त्याने त्याविषयी केवळ कानांनी ऐकलेले आहे आणि ते डोळ्यांनी पाहिलेले नाही. मनुष्याने दंतकथा आणि कथा ऐकल्या आहेत—परंतु देवाच्या कार्यातील तथ्यांविषयीचे ज्ञान त्याने क्वचितच ऐकले आहे. म्हणूनच हे असे आहे, की जे लोक केवळ एक वर्षापासून विश्वास ठेवतात, ते त्यांच्या स्वतःच्या धारणांद्वारे देवावर विश्वास ठेवतात. ज्यांनी आयुष्यभर देवावर विश्वास ठेवला, त्यांच्या बाबतीतही हेच सत्य आहे. जे लोक वस्तुस्थिती पाहू शकत नाहीत, ते कधीही देवाबद्दल धारणा बाळगणाऱ्या श्रद्धेपासून दूर होऊ शकणार नाहीत. मनुष्याचा असा विश्वास आहे, की त्याने जुन्या धारणांच्या बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे आणि नवीन प्रदेशात प्रवेश केला आहे. जे देवाचे खरे रूप पाहू शकत नाहीत, त्यांचे ज्ञान हे निव्वळ धारणा आणि ऐकीव गोष्टींखेरीज अन्य काही नाही, हे मनुष्याला माहीत नाही का? मनुष्याला असे वाटते, की त्याच्या धारणा योग्य आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत आणि त्याला वाटते, की या धारणा देवाकडून आलेल्या आहेत. आज, जेव्हा मनुष्य देवाच्या कार्याचा साक्षीदार होतो, तेव्हा तो अनेक वर्षांपासून तयार झालेल्या धारणांचा विळखा सैल करतो. भूतकाळातील धारणा आणि कल्पना या टप्प्याच्या कार्यासाठी अडथळा बनल्या आहेत आणि अशा धारणा सोडून देणे आणि अशा कल्पनांचे खंडन करणे मनुष्याला कठीण झाले आहे. ज्यांनी आजपर्यंत देवाचे अनुसरण केले त्यांच्यापैकी अनेकांच्या या टप्प्याटप्प्याच्या कार्याबद्दलच्या धारणा अधिकच भयंकर बनल्या आहेत आणि या लोकांनी हळुहळू देहधारी देवाशी एक दुराग्रही वैर निर्माण केले आहे. या द्वेषाचा उगम मनुष्याच्या धारणा आणि कल्पनांमध्ये आहे. मनुष्याच्या धारणा आणि कल्पना या आजच्या कार्याच्या शत्रू झाल्या आहेत, आजचे कार्य मनुष्याच्या धारणांशी विसंगत आहे. हे असे घडले आहे याचे कारण वस्तुस्थिती मनुष्याच्या धारणांच्या मोकाटपणाला लगाम घालू देत नाही आणि शिवाय मनुष्याला त्या सहजपणे नाकारता येत नाहीत आणि मनुष्याच्या धारणा आणि कल्पना वस्तुस्थितीच्या अस्तित्वाला छेद देत नाहीत आणि शिवाय, मनुष्य तथ्यांच्या शुद्धतेचा आणि सत्यतेचा विचार करत नाही आणि केवळ सरळपणे त्याच्या धारणा मोकाट सोडतो आणि स्वतःची कल्पनाशक्ती वापरतो. हा केवळ मनुष्याच्या धारणांचा दोष आहे असे म्हणता येईल आणि हा देवाच्या कार्याचा दोष आहे असे म्हणता येणार नाही. मनुष्य त्याच्या इच्छेनुसार कल्पना करू शकतो, परंतु तो देवाच्या कार्याच्या कोणत्याही टप्प्याविषयी किंवा त्यातील कोणत्याही भागाविषयी मुक्तपणे विवाद करू शकत नाही; देवाच्या कार्याची वस्तुस्थिती मनुष्याद्वारे अभेद्य आहे. तू तुझ्या कल्पनेला मोकळे सोडू शकतोस आणि यहोवा आणि येशूच्या कार्याबद्दलच्या उत्तम कथादेखील संकलित करू शकतोस, तू यहोवा आणि येशूच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यातील वस्तुस्थितीचे खंडन करू शकत नाहीस; हे एक तत्त्व आहे आणि तो एक प्रशासकीय आदेशदेखील आहे आणि तुम्हाला या मुद्द्यांचे महत्त्व समजले पाहिजे. मनुष्याचा असा विश्वास आहे, की कार्याचा हा टप्पा मनुष्याच्या कल्पनेशी विसंगत आहे आणि कार्याच्या आधीच्या दोन टप्प्यांसाठी हे लागू नाही. मनुष्याच्या कल्पनेनुसार, त्याचा असा विश्वास आहे, की मागील दोन टप्प्यांचे कार्य हे नक्कीच आजच्या कार्यासारखे नाही—परंतु तू कधी विचार केला आहे का, की देवाच्या कार्याची सर्व तत्त्वे समान आहेत, त्याचे कार्य नेहमीच व्यावहारिक असते आणि कोणत्याही युगात त्याच्या कार्याच्या वस्तुस्थितीला रोखणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या लोकांचा नेहमीच महापूर असेल? जे आज कार्याच्या या टप्प्याला रोखतात आणि विरोध करतात, त्यांनी निःसंशयपणे भूतकाळात देवाला विरोध केलेला असेल, कारण असे लोक नेहमीच देवाचे शत्रू असतील. ज्या लोकांना देवाच्या कार्याची वस्तुस्थिती माहीत असते, ते कार्याचे तिन्ही टप्पे हे एकाच देवाचे कार्य म्हणून पाहतील आणि त्यांच्या धारणांचा त्याग करतील. हे असे लोक आहेत जे देवाला ओळखतात आणि हे असे लोक आहेत जे खऱ्या अर्थाने देवाचे अनुसरण करतात. जेव्हा देवाचे संपूर्ण व्यवस्थापन समाप्तीच्या जवळ आलेले असते, तेव्हा देव सर्व गोष्टींचे प्रकारानुसार वर्गीकरण करेल. मनुष्य निर्मात्याच्या हातांनी बनवला गेला होता आणि शेवटी त्याने मनुष्याला त्याच्या अधिपत्याखाली पूर्णपणे परत केले पाहिजे; कार्याच्या तीन टप्प्यांचा हाच शेवट आहे. शेवटच्या दिवसांच्या कार्याचा टप्पा आणि इस्रायल आणि यहूदीयामधील याआधीचे दोन टप्पे, संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची देवाची योजना आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे देवाच्या कार्याचे सत्य आहे. जरी लोकांनी या कार्याचा फारसा अनुभव घेतला नाही किंवा ते पाहिलेले नाही, तरीही वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे आणि हे कोणत्याही मनुष्याला नाकारता येणार नाही. विश्वाच्या प्रत्येक भूमीत देवावर विश्वास ठेवणारे सर्व लोक कार्याच्या तीन टप्प्यांचा स्वीकार करतील. जर तुला कार्याचा केवळ एक विशिष्ट टप्पा माहीत असेल आणि कार्याचे इतर दोन टप्पे समजत नसतील, देवाचे भूतकाळातील कार्य समजत नसेल, तर तू देवाच्या संपूर्ण व्यवस्थापन योजनेचे सत्य उच्चारण्यास असमर्थ आहेस आणि तुझे देवाविषयीचे ज्ञान एकतर्फी आहे, कारण तुझ्या देवावरील विश्वासात तू त्याला ओळखत नाहीस किंवा समजूनही घेत नाहीस आणि त्यामुळे तू देवाची साक्ष देण्यास पात्र नाहीस. या गोष्टींबद्दलचे तुझे सध्याचे ज्ञान सखोल असो वा वरवरचे असो, शेवटी, तुमच्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तुमची पूर्ण खात्री असणे आवश्यक आहे आणि सर्व लोक देवाचे संपूर्ण कार्य पाहतील आणि देवाच्या प्रभुत्वाच्या अधीन होतील. या कार्याच्या शेवटी, सर्व धर्म एक होतील, सर्व प्राणिमात्र निर्मात्याच्या अधिपत्याखाली परत येतील, सर्व प्राणिमात्र एकाच खऱ्या देवाची उपासना करतील आणि सर्व दुष्ट धर्म नष्ट होतील, पुन्हा कधीही दिसणार नाहीत.

कार्याच्या तीन टप्प्यांचा सतत संदर्भ का? कालांतराने, सामाजिक विकास आणि निसर्गाचा बदलणारा चेहरा या सर्वांमध्ये कार्याच्या तीन टप्प्यांमध्ये बदल होत असतात. देवाच्या कार्यामुळे मानवजात काळानुसार बदलते आणि ती स्वतःहून विकसित होत नाही. देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांचा उल्लेख सर्व प्राणिमात्रांना आणि प्रत्येक धर्मातील आणि संप्रदायातील सर्व लोकांना एका देवाच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी केला जातो. तू कोणत्याही धर्माचा असलास तरीही, शेवटी तुम्ही सर्व देवाच्या अधिपत्याखाली जाल. हे कार्य केवळ देवच पार पाडू शकतो; हे कोणत्याही धर्मगुरूला करता येत नाही. जगात अनेक प्रमुख धर्म आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे प्रमुख किंवा नेते आहेत आणि त्यांचे अनुयायी जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत; जवळजवळ प्रत्येक देश, मग तो मोठा असो वा लहान, त्यामध्ये वेगवेगळे धर्म असतात. मात्र, जगभरात कितीही धर्म असले तरीही, विश्वातील सर्व लोक शेवटी एका देवाच्या मार्गदर्शनाखाली अस्तित्वात आहेत आणि त्यांचे अस्तित्व धार्मिक प्रमुख किंवा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नाही. म्हणजेच, मानवजातीला विशिष्ट धार्मिक प्रमुख किंवा नेत्याद्वारे मार्गदर्शन केले जात नाही; उलट, संपूर्ण मानवजातीचे नेतृत्व निर्माणकर्त्याद्वारे केले जाते, ज्याने आकाश आणि पृथ्वी आणि सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याने मानवजातीला निर्माण केले—हेच सत्य आहे. जगात अनेक प्रमुख धर्म असले तरी, ते कितीही महान असले तरीही, ते सर्व निर्मात्याच्या अधिपत्याखाली अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी कोणीही या अधिपत्याची व्याप्ती ओलांडू शकत नाही. मानवजातीचा विकास, समाजाचे अधिपत्य, नैसर्गिक विज्ञानांचा विकास—प्रत्येक गोष्ट निर्मात्याच्या व्यवस्थेपासून अविभाज्य आहे आणि हे कार्य कोणत्याही धार्मिक प्रमुखाद्वारे केले जाऊ शकत नाही. धार्मिक प्रमुख हा केवळ एका विशिष्ट धर्माचा नेता असतो आणि तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही किंवा स्वर्ग आणि पृथ्वी आणि सर्व काही ज्याने निर्माण केले त्या निर्मात्याचेही तो प्रतिनिधित्व करू शकत नाही. धार्मिक प्रमुख हा त्या संपूर्ण धर्मातील सर्वांचे नेतृत्व करू शकतो, परंतु ते स्वर्गाच्या खाली असलेल्या सर्व प्राण्यांना आज्ञा देऊ शकत नाहीत—हे सर्वमान्य सत्य आहे. धार्मिक प्रमुख हा केवळ एक नेता असतो आणि तो देवाच्या (निर्मात्याच्या) बरोबरीने उभा राहू शकत नाही. सर्व गोष्टी निर्मात्याच्या हातात आहेत आणि शेवटी ते सर्व निर्मात्याच्या हातात परत येतील. मानवजातीला देवाने निर्माण केले आहे आणि धर्म कोणताही असो, प्रत्येक व्यक्ती देवाच्या अधिपत्याखाली परत येईल—हे अपरिहार्य आहे. केवळ देव सर्व गोष्टींमध्ये सर्वोच्च आहे आणि सर्व प्राणिमात्रांमधील सर्वोच्च शासकदेखील त्याच्या अधिपत्याखाली परत आला पाहिजे. मनुष्याचा दर्जा कितीही उच्च असला, तरी तो मनुष्य मानवजातीला योग्य गंतव्यस्थानी नेऊ शकत नाही आणि कोणीही सर्व गोष्टींचे प्रकारानुसार वर्गीकरण करू शकत नाही. यहोवाने स्वतः मानवजातीची निर्मिती केली आणि प्रत्येकाला प्रकारानुसार वर्गीकृत केले आणि जेव्हा शेवटची वेळ येईल तेव्हा तो स्वतःचे कार्य स्वतःच करेल, सर्व गोष्टींचे प्रकारानुसार वर्गीकरण करेल—हे कार्य देवाखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. सुरुवातीपासून ते आजपर्यंत चाललेले कार्याचे तीन टप्पे हे सर्व स्वतः देवानेच पार पाडले आणि ते एकाच देवाने पार पाडले. कार्याच्या तीन टप्प्यांची वस्तुस्थिती ही सर्व मानवजातीच्या देवाच्या नेतृत्वाची वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. कार्याच्या तीन टप्प्यांच्या शेवटी, सर्व गोष्टी प्रकारानुसार वर्गीकृत केल्या जातील आणि देवाच्या अधिपत्याखाली परत येतील, कारण संपूर्ण विश्वात केवळ हा एकच देव आहे आणि इतर कोणतेही धर्म नाहीत. जो जग निर्माण करण्यास असमर्थ आहे तो त्याचा अंत करण्यास असमर्थ असेल, तर ज्याने जग निर्माण केले तो निश्चितपणे त्याचा अंत करण्यास समर्थ असेल. म्हणून, जर एखाद्याला युगाचा अंत करता येत नसेल आणि केवळ मनुष्याला त्याचे मन विकसित करण्यास मदत करता येत असेल, तर तो निश्चितच देव असणार नाही आणि तो मानवजातीचा प्रभूही होणार नाही. असे महान कार्य करण्यास तो असमर्थ असेल; असे कार्य केवळ एकच करू शकतो आणि जे हे कार्य करू शकत नाहीत ते सर्व देव नसून शत्रू आहेत. सर्व दुष्ट धर्म देवाशी विसंगत आहेत आणि ते देवाशी विसंगत असल्याने ते देवाचे शत्रू आहेत. सर्व कार्य या एका खर्‍या देवाकडून केले जाते आणि संपूर्ण विश्वाला याच देवाकडून आज्ञा दिली जात आहे. त्याचे कार्य इस्रायलमध्ये असो किंवा चीनमध्ये, ते कार्य आत्म्याद्वारे केले जात असो किंवा देहाद्वारे केले जात असो, ते सर्व देवाकडूनच पार पाडले जाते आणि इतर कोणीही ते करू शकत नाही. याचे कारण हेच, की तो संपूर्ण मानवजातीचा देव आहे की तो कोणत्याही अटींच्या निर्बंधांविना मुक्तपणे कार्य करतो—हा सर्व दृष्टांतांमध्ये सर्वात मोठा आहे. देवाने निर्मिलेला प्राणी या नात्याने, जर तुम्हाला देवाने निर्मिलेल्या प्राण्याचे कर्तव्य पार पाडायचे असेल आणि देवाची इच्छा समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला देवाचे कार्य समजले पाहिजे, तुम्हाला देवाची त्याने निर्मिलेल्या प्राण्यांसाठीची इच्छा समजली पाहिजे, तुम्हाला त्याची व्यवस्थापनाची योजना समजली पाहिजे आणि तो करत असलेल्या कार्याचे संपूर्ण महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्यांना हे समजत नाही ते देवाने निर्मिलेले प्राणी म्हणवण्यास पात्र नाहीत! देवाने निर्मिलेला प्राणी या नात्याने, जर तुम्ही कोठून आलात हे तुम्हाला समजत नसेल, मानवजातीचा इतिहास आणि देवाने केलेले सर्व कार्य समजत नसेल आणि त्याशिवाय, आजपर्यंत मानवजातीचा विकास कसा झाला हे समजत नसेल आणि संपूर्ण मानवजातीला कोण आज्ञा देतो हे समजत नसेल, तर तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहात. देवाने आजपर्यंत मानवजातीचे नेतृत्व केले आहे आणि त्याने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला तेव्हापासून त्याने त्याला कधीही सोडले नाही. पवित्र आत्मा कधीही कार्य करणे थांबवत नाही, मानवजातीचे नेतृत्व करणे त्याने कधीही थांबवलेले नाही आणि मानवजातीला कधीही सोडलेले नाही. पण देव आहे हे मानवजातीला कळत नाही, मग देवाला ओळखणे तर दूरच राहिले. देवाने निर्मिलेल्या सर्व प्राण्यांसाठी याहून अधिक अपमानास्पद काही आहे का? देव व्यक्तिशः मनुष्याला मार्गदर्शन करतो, परंतु मनुष्याला देवाचे कार्य समजत नाही. तू देवाने निर्मिलेला प्राणी आहेस, तरीही तुला स्वतःचा इतिहास समजत नाही आणि प्रवासात तुला कोणी मार्गदर्शन केले याविषयी तुला माहिती नाही, देवाने केलेल्या कार्याबद्दल तू अनभिज्ञ आहेस आणि त्यामुळे तू देवाला ओळखू शकत नाहीस. जर तुला हे अजूनही माहीत नसेल, तर तू देवाची साक्ष देण्यासाठी कधीही पात्र होणार नाहीस. आज, निर्माणकर्ता स्वतःहून सर्व लोकांचे पुन्हा एकदा नेतृत्व करत आहे आणि सर्व लोकांना त्याचे शहाणपण, सर्वशक्तिमानता, तारण आणि अद्भूतता पाहण्यास प्रवृत्त करत आहे. तरीही तुला अजूनही कळत नाही किंवा समजत नाही—मग, तू असा नाहीस का ज्यांना कधीच तारण प्राप्त होणार नाही? जे सैतानाचे आहेत त्यांना देवाची वचने समजत नाहीत, तर जे देवाचे आहेत ते देवाचा आवाज ऐकू शकतात. मी जी वचने उच्चारतो, ती ज्यांना समजतात आणि कळतात, त्या सर्वांना वाचवले जाईल ते देवाची साक्ष देतील; मी जी वचने उच्चारतो ती ज्यांना समजत नाहीत ते सर्व देवाची साक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांना बाहेर काढून टाकले जाईल. ज्यांना देवाची इच्छा समजत नाही आणि देवाच्या कार्याची जाणीव होत नाही, ते देवाचे ज्ञान प्राप्त करण्यास असमर्थ आहेत आणि असे लोक देवाची साक्ष देऊ शकत नाहीत. जर तुम्हाला देवाची साक्ष द्यायची असेल, तर तुम्ही देवाला ओळखले पाहिजे; देवाचे ज्ञान हे देवाच्या कार्याने साध्य होते. एकंदरीत, जर तुम्हाला देवाला जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही देवाचे कार्य जाणून घेतले पाहिजे: देवाचे कार्य जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा कार्याचे तीन टप्पे समाप्त होतील, तेव्हा देवाची साक्ष देणार्‍यांचा, देवाला ओळखणाऱ्यांचा एक गट तयार केला जाईल. हे सर्व लोक देवाला ओळखतील आणि सत्य आचरणात आणू शकतील. त्यांच्यात मानवता आणि शहाणपणा असेल आणि देवाच्या तारणाच्या कार्याचे तीन टप्पे त्यांना माहीत असतील. हे असे कार्य आहे जे शेवटी पूर्ण केले जाईल आणि हे लोक ६,००० वर्षांच्या व्यवस्थापनाच्या कार्याचे प्रत्यक्ष रूप असतील आणि सैतानाच्या अंतिम पराभवाची सर्वात शक्तिशाली साक्ष असतील. जे देवाची साक्ष देऊ शकतात ते देवाचे वचन आणि आशीर्वाद प्राप्त करण्यास समर्थ असतील आणि तो शेवटपर्यंत टिकणारा गट असेल, या गटाकडे देवाचा अधिकार असे आणि देवाची साक्ष देईल. कदाचित तुमच्यातील सर्व जण या गटाचे सदस्य होऊ शकतात किंवा कदाचित केवळ अर्धे किंवा केवळ काही लोक या गटाचे सदस्य होऊ शकतात—हे तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या पाठपुराव्यावर अवलंबून आहे.

मागील:  देवाचे कार्य आणि मनुष्याचे कार्य

पुढील:  भ्रष्ट मानवजातीला देहधारी देवाच्या तारणाची अधिक गरज आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger