देहधारी देवाचे सेवाकार्य आणि मनुष्याचे कर्तव्य यातील फरक

तुम्ही देवाच्या कार्याचे दृष्टांत जाणून घेतले पाहिजेत आणि त्याच्या कार्याची सामान्य दिशा समजून घेतली पाहिजे. हा सकारात्मक प्रवेश आहे. दृष्टांतांच्या सत्यतेवर अचूकपणे प्रभुत्व प्राप्त केल्यानंतर तुझा प्रवेश सुरक्षित असेल; देवाचे कार्य कसेही बदलत असले तरी, तू तुझ्या अंतःकरणात ठाम राहशील, दृष्टांतांबद्दल स्पष्ट असशील आणि तुझ्या प्रवेशासाठी आणि पाठपुराव्यासाठी ध्येय ठेवशील. अशा प्रकारे, तुझे सर्व अनुभव आणि ज्ञान अधिक सखोल होईल आणि अधिक तपशीलवार बनेल. व्यापक योजना संपूर्णपणे समजून घेतल्यानंतर जीवनात तुझे कोणतेही नुकसान होणार नाही किंवा तू भरकटणारही नाहीस. जर तुला कार्याच्या या पायऱ्या माहीत नसतील, तर प्रत्येक पायरीवर तुझे नुकसान होईल आणि परिस्थिती बदलण्यासाठी तुला काही दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल किंवा तू अगदी दोन आठवड्यांमध्येही योग्य मार्ग निश्चित करू शकणार नाही. यामुळे विलंब होणार नाही का? सकारात्मक प्रवेश आणि आचरणाच्या मार्गात बरेच काही आहे, ज्यावर तुम्ही प्रभुत्व प्राप्त केलेच पाहिजे. देवाच्या कार्याच्या दृष्टांतांबद्दल, तू पुढील मुद्दे समजून घेतलेच पाहिजेत: त्याच्या विजयाच्या कार्याचे महत्त्व, परिपूर्ण बनवले जाण्याचा भविष्यातील मार्ग, कसोट्या आणि यातना अनुभवून काय साध्य केले पाहिजे, न्याय आणि ताडण यांचे महत्त्व, पवित्र आत्म्याच्या कार्यामागील तत्त्वे, आणि परिपूर्णता व विजय यामागील तत्त्वे. हे सर्व दृष्टांतांच्या सत्याशी संबंधित आहेत. बाकी सर्व नियमशास्त्राचे युग, कृपेचे युग आणि राज्याचे युग तसेच भविष्यातील साक्ष यामधील कार्याचे तीन टप्पे आहेत. हे देखील, दृष्टांतांची सत्ये आहेत आणि ती सर्वात मूलभूत तसेच सर्वात निर्णायक आहेत. सध्या, तुम्ही ज्यात प्रवेश करायला हवा आणि आचरण करायला हवे असे बरेच काही आहे आणि आता ते अधिक स्तर असलेले आणि अधिक तपशीलवार आहे. जर तुला या सत्याचे ज्ञान नसेल, तर हेच सिद्ध होते की तू अद्याप प्रवेश साध्य करायचा आहे. बहुतेक वेळा, लोकांचे सत्याचे ज्ञान खूप उथळ असते; त्यांना काही मूलभूत सत्ये आचरणात आणता येत नाहीत आणि अगदी क्षुल्लक बाबी सुद्धा कशा हाताळायच्या हे त्यांना माहीत नसते. लोक सत्य आचरणात आणू शकत नाहीत, कारण त्यांची प्रवृत्ती बंडखोर आहे आणि आजच्या काळातील कार्याविषयी त्यांचे ज्ञान अतिशय वरवरचे आणि एकतर्फी आहे. त्यामुळे, लोकांना परिपूर्ण बनवणे हे सोपे कार्य नाही. तू खूप बंडखोर आहेस आणि तू तुझे जुने स्वत्व खूप राखून ठेवतोस; तू सत्याच्या बाजूने उभे राहण्यास असमर्थ आहेस आणि तू अगदी स्वयं-स्पष्ट सत्यानेही आचरण करू शकत नाहीस. अशा लोकांना वाचवले जाऊ शकत नाही आणि त्यांच्यावर विजय प्राप्त केला जाऊ शकलेला नाही. जर तुझ्या प्रवेशामध्ये तपशील किंवा उद्दिष्टे नसतील, तर तुझी प्रगती मंद असेल. जर तुझ्या प्रवेशामध्ये थोडीशीही वास्तविकता नसेल, तर तुझा पाठपुरावा व्यर्थ ठरेल. जर तुला सत्याचे मूलतत्त्व माहीत नसेल, तर तुझ्यामध्ये काहीही बदल होणार नाही. मनुष्याच्या जीवनातील प्रगती आणि त्याच्या प्रवृत्तीतील बदल हे वास्तविकतेत प्रवेश करून आणि त्याहून अधिक म्हणजे, तपशीलवार अनुभवांमध्ये प्रवेश करून प्राप्त केले जातात. तुझ्या प्रवेशादरम्यान तुझ्याकडे अनेक तपशीलवार अनुभव असतील आणि तुझ्याकडे बरेच प्रत्यक्ष ज्ञान आणि प्रवेश असेल, तर तुझी प्रवृत्ती लगेच बदलेल. जरी, सध्या तू आचरणाबद्दल पूर्णपणे स्पष्ट नसशील तरीही, तू कमीत कमी देवाच्या कार्याच्या दृष्टांतांबद्दल स्पष्ट असलेच पाहिजेस. अन्यथा, तू प्रवेश करण्यास असमर्थ असशील; तुला सत्याचे ज्ञान असेल तेव्हाच प्रवेश शक्य आहे. जर पवित्र आत्म्याने तुझे तुझ्या अनुभवातून प्रबोधन केले तरच तुला सत्याची सखोल समज आणि सखोल प्रवेश प्राप्त होईल. तू देवाचे कार्य जाणून घेतलेच पाहिजेस.

सुरुवातीला, मानवजातीच्या निर्मितीनंतर, देवाच्या कार्याचा आधार म्हणून सेवा केली ती इस्रायली लोकांनी. संपूर्ण इस्रायल हा पृथ्वीवरील यहोवाच्या कार्याचा पाया होता. यहोवाचे कार्य म्हणजे नियमशास्त्र ठरवून थेट मनुष्याचा सांभाळ करणे हे होते, जेणेकरून मनुष्य सामान्य जीवन जगू शकेल आणि पृथ्वीवर सर्वसामान्य पद्धतीने यहोवाची उपासना करू शकेल. नियमशास्त्राच्या युगात देव मनुष्याला दिसत नव्हता किंवा त्याला स्पर्शही करता येत नव्हता. कारण त्याने जे कार्य केले ते म्हणजे सैतानाने भ्रष्ट केलेल्या सुरुवातीच्या लोकांना मार्गदर्शन करणे, त्यांना शिकवणे आणि त्यांचा सांभाळ करणे, त्याच्या वचनांमध्ये नियमशास्त्र, कायदे आणि मानवी वर्तनाच्या रिवाजांखेरीज अन्य काहीही नव्हते आणि त्याने त्यांना जीवनातील सत्ये प्रदान केली नाहीत. त्याच्या नेतृत्वाखालील इस्रायली लोकांना सैतानाने खोलवर भ्रष्ट केले नव्हते. त्याचे नियमशास्त्राचे कार्य हे तारणाच्या कार्यातील केवळ पहिला टप्पा होता, तारणाच्या कार्याची अगदी सुरुवात होती आणि त्याचा मनुष्याच्या जीवन प्रवृत्तीमधील बदलांशी प्रत्यक्षतः काहीही संबंध नव्हता. म्हणून, तारणाच्या कार्याच्या सुरुवातीला त्याला इस्रायलमध्ये त्याच्या कार्यासाठी देह धारण करण्याची आवश्यकता नव्हती. म्हणूनच त्याला एका माध्यमाची आवश्यकता होती—एक साधनाची—ज्याद्वारे मनुष्याशी संबंध ठेवता येईल. त्यामुळे, निर्मिलेल्या जीवांमध्ये असे लोक निर्माण झाले ज्यांनी यहोवाच्या वतीने वचने उच्चारली आणि कार्य केले, ज्याद्वारे मनुष्याचे पुत्र आणि संदेष्टे हे मनुष्यांमध्ये कार्य करण्यास आले. मनुष्याच्या पुत्रांनी यहोवाच्या वतीने मनुष्यांमध्ये कार्य केले. यहोवाकडून “मनुष्याचे पुत्र” म्हणण्याचा अर्थ असा होतो, की असे लोक यहोवाच्या वतीने नियमशास्त्र मांडतात. ते इस्रायली लोकांमध्ये याजकही होते, असे याजक ज्यांच्यावर यहोवाचे लक्ष होते आणि ज्यांना यहोवाद्वारे संरक्षण लाभले होते आणि ज्यांच्यामध्ये यहोवाच्या आत्म्याने कार्य केले; ते लोकांमधील नेते होते आणि थेट यहोवाची सेवा करत होते. याउलट, संदेष्टे हे यहोवाच्या वतीने सर्व देशांच्या आणि जमातींच्या लोकांशी बोलण्यासाठी समर्पित होते. त्यांनी यहोवाच्या कार्याचीही भविष्यवाणी केली. मनुष्याचे पुत्र असोत वा संदेष्टे, या सर्वांना स्वतः यहोवाच्या आत्म्याने वाढवले होते आणि त्यांच्यामध्ये यहोवाचे कार्य होते. या लोकांमध्ये, हे थेट यहोवाचे प्रतिनिधित्व करणारे होते; त्यांनी त्यांचे कार्य केले कारण त्यांना यहोवाने त्या पातळीला नेलेले होते, पवित्र आत्म्याने स्वतः त्यांचा देह धारण केला होता म्हणून नव्हे. म्हणूनच, जरी ते देवाच्या वतीने बोलण्यात आणि कार्य करण्यात एकसारखे असले तरी, नियमशास्त्राच्या युगातील ते मनुष्याचे पुत्र आणि संदेष्टे हे देहधारी देवाचे देह नव्हते. कृपेच्या युगात आणि शेवटच्या टप्प्यात देवाचे कार्य अगदी विरुद्ध होते, कारण मनुष्याचे तारण आणि न्याय ही दोन्ही कार्ये स्वतः देवानेच केली होती आणि म्हणून त्याच्या वतीने कार्य करण्यासाठी संदेष्टे आणि पुत्रांना उभे पुन्हा एकदा तसे वाढवण्याची गरज नव्हती. मनुष्याच्या दृष्टीने, मूलतत्त्व आणि त्यांच्या कार्याच्या पद्धतीमध्ये कोणतेही महत्त्वाचे फरक नाहीत. याच कारणास्तव लोक सदैव देहधारी देवाचे कार्य आणि संदेष्ट्यांच्या व मनुष्याच्या पुत्रांचे कार्य यांमध्ये सतत गोंधळून जात आहेत. देहधारी देवाचे स्वरूप हे मूलतः संदेष्ट्यांच्या आणि मनुष्याच्या पुत्रांसारखेच होते. आणि देहधारी देव हा संदेष्ट्यांपेक्षा अधिक सामान्य आणि वास्तविक होता. म्हणून, मनुष्य त्यांच्यातील फरक ओळखण्यास असमर्थ आहे. मनुष्य केवळ दिसण्यावर लक्ष केंद्रित करतो, तो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतो, की जरी दोघे कार्यात आणि बोलण्यात एकसारखे असले, तरी त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. मनुष्याची दोन गोष्टींमधील फरक ओळखण्याची क्षमता खूपच कमी असल्यामुळे, तो साध्या साध्या गोष्टींमधला फरक देखील ओळखू शकत नाही, मग गुंतागुंतीच्या गोष्टींमधला फरक ओळखणे तर दूरच. जेव्हा संदेष्ट्यांनी आणि पवित्र आत्म्याद्वारे वापरल्या गेलेल्या लोकांनी वचने उच्चारली आणि कार्य केले, तेव्हा ते मनुष्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी होते, निर्मिलेल्या जीवाची कार्ये करण्यासाठी होते आणि ते मनुष्याने करणेच आवश्यक होते. तथापि, देहधारी देवाची वचने आणि कार्य हे त्याचे सेवाकार्य पार पाडण्यासाठी होते. जरी त्याचे बाह्य स्वरूप हे निर्मिलेल्या एखाद्या जीवासारखे असले, तरी त्याचे कार्य हे कार्य पार पाडण्यासाठी नव्हते, तर सेवाकार्यासाठी होते. निर्मिलेल्या प्राण्यांच्या संदर्भात “कर्तव्य” हा शब्द वापरला जातो, तर देहधारी देवाच्या देहाच्या संदर्भात “सेवाकार्य” हा शब्द वापरला जातो. या दोघांमध्ये वस्तुनिष्ठ फरक आहे; हे शब्द समानार्थी म्हणून वापरता येणार नाहीत. मनुष्याचे कार्य हे केवळ त्याचे कर्तव्य पार पाडणे आहे, तर देवाचे कार्य हे व्यवस्थापन करणे आणि त्याचे सेवाकार्य पार पाडणे हे आहे. म्हणून, जरी पवित्र आत्म्याने अनेक प्रेषितांचा वापर केला आणि अनेक संदेष्टे त्याच्यामुळे भारलेले असले तरी, त्यांचे कार्य आणि वचने ही केवळ निर्मिलेले जीव म्हणून असलेले त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी होती. त्यांच्या भविष्यवाण्या देहधारी देवाने सांगितलेल्या जीवनाच्या पद्धतीपेक्षा अधिक असू शकतात आणि त्यांची मानवता कदाचित देहधारी देवाच्या पलीकडे गेली असली, तरीही ते त्यांचे कर्तव्य पार पाडत होते, ते सेवाकार्य करत नव्हते. मनुष्याचे कर्तव्य म्हणजेच मनुष्याचे कार्य; तेच मनुष्याला शक्य आहे. मात्र, देहधारी देवाचे सेवाकार्य म्हणजे त्याचे व्यवस्थापन, जे मनुष्याला अप्राप्य आहे. देहधारी देव बोलत असला, कार्य करत असला किंवा चमत्कार प्रकट करत असला, तरी ते त्याच्या व्यवस्थापनाचे महान कार्य आहे आणि त्याच्याऐवजी मनुष्य असे कार्य करू शकत नाही. मनुष्याचे कार्य केवळ देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याच्या दिलेल्या टप्प्यावर निर्मिलेला एक जीव म्हणून त्याचे कर्तव्य बजावणे एवढेच आहे. देवाचे व्यवस्थापन नसेल, म्हणजेच जर देहधारी देवाचे सेवाकार्य गमावले तर, निर्मिलेल्या जीवाचे कर्तव्य नष्ट होईल. देवाने सेवाकार्य पार पाडणे म्हणजे मनुष्याचे व्यवस्थापन करणे आहे, तर मनुष्याने कर्तव्य पार पाडणे हे निर्मात्याच्या मागण्या पूर्ण करण्याची त्याची स्वतःची बंधनकारक जबाबदारी पूर्ण करणे आहे आणि कोणत्याही प्रकारे त्याला सेवाकार्य म्हणता येणार नाही. देवाच्या अंगभूत ठोसपणासाठी—त्याच्या आत्म्यासाठी—देवाचे कार्य हे त्याचे व्यवस्थापन आहे, परंतु निर्मिलेल्या जीवाचे बाह्य स्वरूप धारण करणाऱ्या देहधारी देवाचे कार्य म्हणजे त्याचे सेवाकार्य पार पाडणे आहे. तो जे काही कार्य करतो ते त्याचे सेवाकार्य पार पाडण्यासाठी असते; येथे मनुष्य जे करू शकतो, ते म्हणजे देवाच्या व्यवस्थापनाच्या कक्षेत आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणे आहे.

मनुष्याने त्याचे कर्तव्य पार पाडणे म्हणजे वास्तविकतेत, मनुष्यामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व गोष्टींची सिद्धी, म्हणजेच मनुष्याला जे शक्य आहे ते. तेव्हाच त्याचे कर्तव्य पार पडते. मनुष्याच्या सेवेदरम्यान त्याचे दोष हळूहळू प्रगतीशील अनुभवातून आणि त्याने न्याय प्रक्रियेतून जाण्याने कमी होतात; ते मनुष्याच्या कर्तव्यात अडथळा आणत नाहीत किंवा त्याला बाधा आणत नाहीत. आपल्या सेवेत काही तोटे असतील या भीतीने जे सेवा करणे सोडून देतात किंवा मागे पडतात, ते सर्वात भित्रे असतात. जर लोक सेवेदरम्यान जे व्यक्त करायलाच हवे ते व्यक्त करू शकत नसतील किंवा जे त्यांच्यासाठी स्वाभाविकपणे शक्य आहे ते साध्य करू शकत नसतील आणि त्याऐवजी मूर्खपणा करत आणि मानसिक आंदोलनांमधून जात असतील, तर त्यांनी निर्मिलेला जीव म्हणून असलेले त्यांचे कार्य गमावले आहे. अशा लोकांना “सुमार” म्हणून ओळखले जाते; ते निरुपयोगी, टाकाऊ असतात. अशा लोकांना निर्मिलेले जीव असे कसे योग्यरीत्या म्हणता येईल? ते बाहेरून चमकणारे पण आतून कुजलेले भ्रष्ट प्राणीच नव्हेत का? जर एखादा मनुष्य स्वतःला देव म्हणवून घेत असेल, तरीही ते दैवी तत्व अभिव्यक्त करू शकत नसेल, स्वतः देवाचे कार्य करू शकत नसेल किंवा देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नसेल, तर तो निःसंशयपणे देव नसतो, कारण त्याच्याकडे देवाचे तत्त्व नसते आणि जे देव नैसर्गिकरीत्या प्राप्त करू शकतो ते त्याच्या आत अस्तित्वात नसते. जर मनुष्याने स्वतःला जे प्राप्त करता येऊ शकते तेच गमावले, तर त्याला यापुढे मनुष्य मानले जाऊ शकत नाही आणि तो निर्मिलेला जीव म्हणून उभा राहण्यास किंवा देवासमोर येऊन त्याची सेवा करण्यास पात्र नाही. शिवाय, तो देवाची कृपा प्राप्त करण्यास किंवा देवाने लक्ष ठेवण्यास, संरक्षित करण्यास आणि परिपूर्ण बनवण्यास पात्र नाही. देवावरील विश्वास गमावलेले अनेकजण देवाची कृपा गमावतात. ते त्यांच्या दुष्कृत्यांचा तिरस्कार तर करत नाहीतच, आणि एवढेच नव्हे, तर ते देवाचा मार्ग चुकीचा आहे असा निर्लज्जपणे प्रचार करतात आणि काही बंडखोर तर देवाचे अस्तित्वही नाकारतात. अशा विद्रोहाने पछाडलेले लोक देवाच्या कृपेचा आनंद घेण्यास पात्र कसे असतील? जे त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत, ते देवाप्रति बंडखोर असतात आणि त्यांनी देवाला त्यांच्याकडून खूप काही द्यायचे असले तरीही ते तोंड फिरवतात आणि देव चुकीचा आहे अशी निंदा करतात. अशा प्रकारचा मनुष्य परिपूर्ण बनण्यास पात्र कसा असू शकतो? बाहेर काढून टाकले जाण्याची आणि शिक्षा होण्याची ही पूर्वसूचनाच नाही का? जे लोक देवासमोर त्यांचे कर्तव्य पार पाडत नाहीत ते आधीच सर्वात घृणास्पद गुन्ह्यांसाठी दोषी आहेत, ज्यासाठी मृत्यूची शिक्षा देखील अपुरी आहे, तरीही देवाशी वाद घालण्याची आणि त्याची बरोबरी करण्याची त्यांची बिशाद आहे. अशा लोकांना परिपूर्ण करण्याचा काय उपयोग? जेव्हा लोक त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी होतात तेव्हा त्यांना अपराधी आणि ऋणात असल्याची भावना वाटली पाहिजे; त्यांनी त्यांच्या कमकुवतपणाचा आणि निरुपयोगीपणाचा, त्यांच्या बंडखोरपणाचा आणि भ्रष्टाचाराचा तिरस्कार केला पाहिजे, एवढेच नव्हे, तर त्यांचे जीवन देवाला अर्पण केले पाहिजे. तरच ते असे निर्मिलेले जीव असतील की, जे देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात आणि केवळ असे लोक देवाचे आशीर्वाद आणि वचने उपभोगण्यास आणि त्याच्याद्वारे परिपूर्ण बनण्यास पात्र असतात. आणि तुमच्यापैकी बहुसंख्यांचे काय? तुमच्यामध्ये राहणार्‍या देवाशी तुम्ही कसे वागता? त्याच्यासमोर तुमचे कर्तव्य तुम्ही कसे पार पाडलेले आहे? तुम्हाला जे काही करायला बोलावले होते, ते अगदी तुमच्या स्वतःच्या जीवाची बाजी लावूनही तुम्ही पार पाडले आहे का? तुम्ही कशाचा त्याग केला आहे? तुम्हाला माझ्याकडून फार काही मिळालेले नाही का? तुम्ही ओळखू शकता का? तुम्ही माझ्याप्रति किती निष्ठावान आहात? तुम्ही माझी सेवा कशी केली आहे? आणि जे काही मी तुम्हाला दिले आहे आणि तुमच्यासाठी केले आहे त्याचे काय? तुम्ही या सर्वाचे मोजमाप केले आहे का? तुमच्या ठायी असलेल्या त्या बेताच्या सदसद्विवेकबुद्धीने तुम्ही याचा न्याय आणि याची तुलना केली आहे का? तुमची वचने आणि कृती यांना कोण पात्र असू शकते? असे होऊ शकते का, की तुमचा इतका उणापुरा त्याग मी तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी पात्र आहे? माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि मी मनापासून तुमच्याशी एकनिष्ठ आहे, तरीही तुम्ही दुष्ट हेतू बाळगता आणि तुमची माझ्याबद्दलची निष्ठा अर्धवट आहे. हीच तुमच्या कर्तव्याची, तुमच्या एकमेव कार्याची व्याप्ती आहे. हे असेच नाही का? निर्मिलेला जीव म्हणून असलेले कर्तव्य पार पाडण्यात तुम्ही सपशेल अपयशी ठरला आहात, हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्हाला निर्मिलेला जीव असे कसे मानता येईल? तुम्ही काय व्यक्त करत आहात आणि जगत आहात हे तुम्हाला स्पष्ट नाही का? तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाला आहात, परंतु तुम्ही देवाची सहिष्णुता आणि उदार कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करता. अशी कृपा तुमच्यासारख्या निरुपयोगी आणि अ-नीतीमान लोकांसाठी नाही, तर जे काहीही मागत नाहीत आणि आनंदाने त्याग करतात त्यांच्यासाठी आहे. तुमच्यासारखे, असे सुमार लोक स्वर्गाच्या कृपेचा आनंद घेण्यास पूर्णपणे अपात्र आहेत. तुमच्यासाठी केवळ त्रास आणि अखंड शिक्षा असेल! जर तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवू शकत नसाल, तर तुमच्या नशिबात दु:खच असेल. जर तुम्ही माझ्या वचने आणि माझे कार्य यासंदर्भात स्वतःला जबाबदार ठरवू शकत नसाल, तर तुम्हाला केवळ शिक्षाच होईल. सर्व कृपा, आशीर्वाद आणि राज्याच्या अद्भूत जीवनाचा तुमच्याशी काहीही संबंध नसेल. तुमच्यासाठी योग्य असलेला हाच अंत असेल आणि तो तुम्हीच ओढवून घेतलेला असेल! अज्ञानी आणि गर्विष्ठ लोक सर्वतोपरी प्रयत्न करत नाहीत किंवा कर्तव्य बजावत नाहीत, एवढेच नव्हे, तर ते कृपेसाठी हात पुढे करतात, जणू काही ते ती मागणी करण्यास पात्र आहेत. आणि जे मागितले ते मिळाले नाही, तर त्यांची श्रद्धा आणखी कमी होते. अशा लोकांना समजूतदार कसे मानता येईल? तुमची क्षमता अत्यंत कमी आहे आणि तुमच्यामध्ये तर्काचा अभाव आहे, व्यवस्थापनाच्या कार्यात तुम्ही जे कर्तव्य केलेच पाहिजे ते पूर्ण करण्यास पूर्णपणे असमर्थ आहात. तुमचे मोल आधीच घसरले आहे. तुमच्यावर एवढी कृपा केल्याबद्दल तुम्ही त्याची परतफेड न करणे हेच मुळात अत्यंत बंडखोरीचे कृत्य आहे, जे तुमचा निषेध करण्यासाठी आणि तुमचा भ्याडपणा, अक्षमता, अ-नीती आणि अयोग्यता दर्शवण्यासाठी पुरेसे आहे. तुम्हाला हात पसरण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही माझ्या कार्यात थोडी देखील मदत करू शकत नाही, तुम्ही निष्ठावान राहण्यास असमर्थ आहात आणि माझ्यासाठी साक्षीदार होऊ शकत नाही हे तुमचे दुष्कृत्य आणि अपयश आहे, तरीही उलट तुम्ही माझ्यावर हल्ला करता, माझ्याविषयी असत्य बोलता आणि मी अ-नीतिमान आहे, अशी तक्रार करता. हीच तुमची निष्ठा आहे का? हेच तुमचे प्रेम आहे का? यापलीकडे तुम्ही दुसरे कोणते कार्य करू शकता? केलेल्या सर्व कार्यांमध्ये तुम्ही कसे योगदान दिले आहे? तुम्ही काय खर्चले आहे? मी तुम्हाला दोष न देऊन खूप सहिष्णुता दाखवली आहे, तरीही तुम्ही निर्लज्जपणे माझ्यासमोर बहाणे करता आणि माझ्याबद्दल खाजगीत तक्रार करता. तुमच्याकडे माणुसकीचा किंचित तरी मागमूस आहे का? मनुष्याचे कर्तव्य मनुष्याच्या मनाने आणि त्याच्या कल्पनेने कलंकित असले, तरी तू तुझे कर्तव्य केले पाहिजेस आणि तुझी निष्ठा दाखवली पाहिजेस. मनुष्याच्या कार्यातील अशुद्धता हा त्याच्या क्षमतेचा मुद्दा असतो, उलट मनुष्याने त्याचे कर्तव्य बजावले नाही तर ते त्याची बंडखोरी दर्शवते. मनुष्याचे कर्तव्य आणि तो आशीर्वादप्राप्त आहे की शापित यांचा काही संबंध नाही. कर्तव्य म्हणजे जे मनुष्याने पूर्ण केलेच पाहिजे; हा त्याचा स्वर्गाने निश्चित केलेला पेशा आहे आणि तो मोबदला, परिस्थिती किंवा कारणांवर अवलंबून नसावा. तरच तो त्याचे कर्तव्य बजावत असेल. आशीर्वाद प्राप्त करणे म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती परिपूर्ण बनते आणि न्यायाचा अनुभव घेतल्यानंतर देवाच्या आशीर्वादांचा आनंद घेते. शापित होणे म्हणजे ताडण आणि न्यायाचा अनुभव घेतल्यानंतरही एखाद्याची प्रवृत्ती न बदलणे, जेव्हा त्यांना परिपूर्ण बनण्याचा अनुभव येत नाही, परंतु शिक्षा दिली जाते. परंतु ते आशीर्वादप्राप्त असोत की शापित असोत, निर्मिलेल्या जीवांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे, त्यांनी जे करायलाच हवे ते केले पाहिजे आणि जे करण्यास ते सक्षम आहेत ते करायला हवे; एखाद्या व्यक्तीने, देवाचा पाठपुरावा करणार्‍या एखाद्या व्यक्तीने किमान हे करायलाच हवे. तू तुझे कर्तव्य केवळ आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करू नयेस, आणि शाप मिळण्याच्या भीतीने कृती करण्यास नकार देऊ नयेस. मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगतो: मनुष्याने त्याचे कर्तव्य बजावणे म्हणजे त्याने जे करायलाच हवे ते आणि जर तो आपले कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असेल तर ही त्याची बंडखोरी आहे. कर्तव्य बजावण्याच्या प्रक्रियेतूनच मनुष्य हळूहळू बदलत जातो आणि या प्रक्रियेतूनच तो आपली निष्ठा दाखवून देतो. त्यामुळे, तू तुझे कर्तव्य पार पाडण्यास जितका अधिक सक्षम असशील, तितके अधिक सत्य तुला प्राप्त होईल आणि तुझी अभिव्यक्ती अधिक वास्तविक होईल. जे फक्त त्यांचे कर्तव्य पार पाडत चालतात आणि सत्याचा शोध घेत नाहीत, त्यांना अखेर बाहेर काढून टाकले जाईल, कारण असे लोक सत्याने आचरण करत आपले कर्तव्य करत नाहीत आणि कर्तव्याच्या पूर्ततेसाठी सत्याने आचरण करत नाहीत. ते असे लोक आहेत जे बदलत नाहीत आणि ते शापित होतील. केवळ त्यांच्या अभिव्यक्ती अशुद्ध असतात एवढेच नव्हे, तर ते व्यक्त करत असलेली प्रत्येक गोष्ट विकृत असते.

कृपेच्या युगात, येशूने सुद्धा बरीच वचने उच्चारली आणि बरेच कार्य केले. तो यशयापेक्षा वेगळा कसा होता? तो दानीएलपेक्षा वेगळा कसा होता? तो संदेष्टा होता का? तो ख्रिस्त आहे असे का म्हटले जाते? त्यांच्यात काय फरक आहेत? या सर्व पुरुषांनी वचने उच्चारली आणि त्यांची वचने कमी-अधिक प्रमाणात मनुष्याला सारखीच दिसली. त्या सर्वांनी वचने उच्चारली आणि कार्य केले. जुन्या करारातील संदेष्ट्यांनी भविष्यवाण्या सांगितल्या आणि त्याच प्रकारे, येशूने भविष्यवाण्या सांगितल्या. हे असे का? त्यांच्यातील वेगळेपणा हा कार्याच्या स्वरूपावर आधारित आहे. ही बाब ओळखण्यासाठी, तू देहाच्या स्वरूपाचा विचार करू नयेस किंवा त्यांच्या वचनांची खोली किंवा उथळपणा यांचा विचार करू नयेस. सदैव तू प्रथम त्यांचे कार्य आणि त्यांच्या कार्याचा मनुष्यावर होणारा परिणाम यांचा विचार केला पाहिजेस. त्या वेळी संदेष्ट्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या मनुष्याला जीवनाचा पुरवठा करत नव्हत्या आणि यशया आणि दानीएल यांच्यासारख्यांनी प्राप्त केलेल्या प्रेरणा केवळ भविष्यवाण्या होत्या, तो जीवनाचा मार्ग नव्हता. जर यहोवाने थेटपणे ते उघड केले नसते, तर ते कार्य कोणीही करू शकले नसते, मर्त्य मनुष्यांसाठी ते शक्यही नाही. येशूने देखील अनेक वचने उच्चारली, परंतु त्याची वचने म्हणजे जीवनाचा मार्ग होता, ज्यातून मनुष्य आचरणाचा मार्ग शोधू शकला. म्हणजेच प्रथम, त्याने मनुष्याला जीवन प्रदान केले, कारण येशू जीवन आहे; दुसरे, तो मनुष्याचे भरकटणे रोखू शकला; तिसरे, युग पुढे नेण्यासाठी त्याचे कार्य यहोवाच्या कार्यापेक्षा यशस्वी ठरू शकले; चौथे, तो मनुष्याच्या गरजा समजून घेऊ शकला आणि मनुष्यामधील उणीवा ओळखू शकला; पाचवा, तो नवीन युग सुरू करू शकला आणि जुने युग संपुष्टात आणू शकला. म्हणूनच त्याला देव आणि ख्रिस्त म्हणतात; तो केवळ यशयापेक्षा वेगळा आहे असे नव्हे तर इतर सर्व संदेष्ट्यांपेक्षाही वेगळा आहे. संदेष्ट्यांच्या कार्याची तुलना म्हणून यशयाकडे पहा. प्रथम, तो मनुष्याच्या आयुष्याची तरतूद करू शकला नाही; दुसरे, तो नवीन युग सुरू करू शकला नाही. तो यहोवाच्या नेतृत्वाखाली कार्य करत होता, नवीन युग सुरू करण्यासाठी नाही. तिसरे, त्याने उच्चारलेली वचने त्याच्याही पलीकडची होती. त्याला थेट देवाच्या आत्म्याकडून प्रकटीकरणे प्राप्त होत होती आणि इतरांना ती ऐकूनही समजणार नव्हती. केवळ या काही गोष्टी हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा आहेत, की त्याची वचने भविष्यवाण्यांपेक्षा अधिक नव्हती, यहोवाच्या जागी केलेल्या कार्याच्या एका पैलूपेक्षा ती अधिक नव्हती. मात्र, तो यहोवाचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता. तो यहोवाचा सेवक होता, यहोवाच्या कार्यातील एक साधन होता. तो केवळ नियमशास्त्राच्या युगात आणि यहोवाच्या कार्यकक्षेत कार्य करत होता; त्याने नियमशास्त्राच्या युगाच्या पलीकडे कार्य केले नाही. याउलट, येशूचे कार्य वेगळे होते. त्याने यहोवाच्या कार्याची व्याप्ती ओलांडली; त्याने देहधारी देव म्हणून कार्य केले आणि सर्व मानवजातीची सुटका करण्यासाठी म्हणून वधस्तंभावर खिळणे पत्करले. म्हणजेच, यहोवाने केलेल्या कार्याव्यतिरिक्त त्याने नवीन कार्य केले. ही नव्या युगाची सुरुवात होती. याव्यतिरिक्त, मनुष्य जे साध्य करू शकला नाही, त्याबद्दल बोलण्यास तो सक्षम होता. त्याचे कार्य हे देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये होते आणि त्यामध्ये संपूर्ण मानवजातीचा समावेश होता. त्याने केवळ काही मोजक्याच मनुष्यांमध्ये कार्य केले नाही किंवा त्याचे कार्य मोजक्याच मनुष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नव्हते. मनुष्य म्हणून देवाची देहधारणा कशी झाली, त्या वेळी आत्म्याने प्रकटीकरण कसे केले आणि कार्य करण्यासाठी आत्मा मनुष्यावर कसा उतरला—या अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्य पाहू शकत नाही किंवा त्यांना स्पर्श करू शकत नाही. या सत्यतांचा वापर, तो देहधारी देव आहे याचा पुरावा म्हणून करणे पूर्णपणे अशक्य आहे. अशा प्रकारे, केवळ देवाच्या वचनांमध्ये आणि कार्यामध्ये फरक केला जाऊ शकतो, जे मनुष्यासाठी स्पष्ट निश्चित आहे. केवळ हेच वास्तव आहे. याचे कारण असे, की आत्म्याच्या बाबी तुला दिसत नाहीत आणि त्या फक्त स्वतः देवालाच स्पष्टपणे माहीत आहेत, देहधारी देवाचा देह देखील सर्व काही जाणत नाही; केवळ त्याने केलेल्या कार्यावरून तो देव आहे की नाही, याची तू पडताळणी करून घेऊ शकतोस. त्याच्या कार्यातून, हे दिसून येते की, प्रथम, तो एका नवीन युगाची सुरुवात करण्यास सक्षम आहे; दुसरे, तो मनुष्याच्या आयुष्याची तरतूद करण्यास सक्षम आहे आणि मनुष्याला अनुसरण करण्याचा मार्ग दाखवू शकतो. तो स्वतः देव आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे आहे. कमीत कमी, तो जे कार्य करतो ते पूर्णपणे देवाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करू शकते, आणि अशा कार्यातून हे दिसून येते की देवाचा आत्मा त्याच्यात आहे. देहधारी देवाने केलेले कार्य मुख्यत्वे नवीन युगाची सुरुवात करणे, नवीन कार्याचे नेतृत्व करणे आणि नवीन कार्यक्षेत्र खुले करणे हेच होते, तो स्वतः देव आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे आहे. या कारणामुळेच तो यशया, दानीएल आणि इतर महान संदेष्ट्यांपेक्षा वेगळा ठरतो. यशया, दानीएल आणि इतर सर्व उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत पुरुषांच्या वर्गातील होते; ते यहोवाच्या नेतृत्वाखाली विलक्षण पुरुष होते. देहधारी देवाचा देह देखील ज्ञानी होता आणि त्यांच्यात समज कमी नव्हती, परंतु त्याची मानवता विशेषतः सामान्य होती. तो एक सामान्य मनुष्य होता आणि उघड्या डोळ्यांना त्याच्यामधील कोणतीही विशेष मानवता ओळखता आली नाही किंवा त्याच्या मानवतेमध्ये इतरांपेक्षा वेगळे काही आढळले नाही. तो बिलकुल अलौकिक किंवा अद्वितीय नव्हता आणि त्याच्याकडे कोणतेही उच्च शिक्षण, ज्ञान किंवा सिद्धांत नव्हते. त्याने सांगितलेल्या जीवनासंबंधीच्या गोष्टी आणि तो चाललेला मार्ग हे सिद्धांत, ज्ञान, जीवनानुभव किंवा कौटुंबिक संगोपनाद्वारे प्राप्त झालेले नव्हते. उलट, ते आत्म्याचे प्रत्यक्ष कार्य होते, जे अवतारी देहाचे कार्य होते. मनुष्याला देवाबद्दल काही उच्च धारणा आहेत आणि विशेषतः या धारणा बऱ्याच अस्पष्ट आणि अलौकिक घटकांनी बनलेल्या आहेत, यामुळे मनुष्याच्या दृष्टीने, मानवी दुर्बलता असलेला, संकेत आणि चमत्कार दर्शवू न शकणारा असा एक सामान्य देव हा निश्चितच देव नाही. या मनुष्याच्या धारणा चुकीच्या नाहीत का? जर देहधारी देवाचा देह सामान्य मनुष्य नसता, तर तो देह झाला असे कसे म्हणता येईल? देहात असणे म्हणजे सामान्य, मनुष्य असणे; जर तो श्रेष्ठ असता, तर त्याने देह धारण केला नसता. तो देहाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी, देहधारी देवाला सामान्य देह धारण करणे आवश्यक होते. हे केवळ देहधारणेचे महत्त्व पूर्ण करण्यासाठी होते. परंतु, संदेष्टे आणि मनुष्याच्या पुत्रांच्या बाबतीत हे असे नव्हते. ते पवित्र आत्म्याने वापरलेले वरदान लाभलेले पुरुष होते; मनुष्याच्या दृष्टीने, त्यांची मानवता विशेषतः महान होती आणि त्यांनी सामान्य मानवतेला मागे टाकणारी अनेक कृत्ये केली. या कारणास्तव, मनुष्याने त्यांना देव मानले. आता तुम्ही सर्वांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे, कारण भूतकाळातील सर्व मनुष्यांचा या मुद्द्यावर सहजपणे गोंधळ उडालेला होता. शिवाय, देहधारणा ही सर्वांत रहस्यमय गोष्टींपैकी एक आहे आणि देहधारी देवाचा स्वीकार करणे मनुष्यासाठी सर्वांत कठीण आहे. मी जे म्हणतो, ते तुमचे कार्य पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला देहधारणेचे रहस्य समजून घेण्यासाठी अनुकूल आहे. हे सर्व देवाच्या व्यवस्थापनाशी, दृष्टांतांशी संबंधित आहे. तुम्ही हे समजून घेणे हे दृष्टांतांचे, म्हणजेच देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे, तुम्हाला विविध प्रकारच्या लोकांनी पार पाडावयाचीच आहेत त्या कर्तव्यांची अधिक समज प्राप्त होईल. जरी ही वचने तुम्हाला थेट मार्ग दाखवत नसली, तरीही ते तुमच्या प्रवेशासाठी खूप मदत करत आहेत, कारण तुमच्या जीवनात सध्या दृष्टांतांचा खूपच अभाव आहे आणि हा तुमच्या प्रवेशातील एक लक्षणीय व महत्त्वपूर्ण अडथळा ठरेल. जर तुम्ही या बाबी समजून घेण्यात असमर्थ असाल, तर तुमच्या प्रवेशासाठी कोणतीही प्रेरणा मिळणार नाही. आणि असा पाठपुरावा हा, तुम्हाला तुमचे कर्तव्य उत्तम प्रकारे पूर्ण करण्यास कसे सक्षम करील?

मागील:  ज्यांना देवाविषयी आणि देवाच्या कार्याविषयी ज्ञान आहे तेच देवाला संतुष्ट करू शकतात

पुढील:  देव सर्व सृष्टीचा प्रभू आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger