देव सर्व सृष्टीचा प्रभू आहे
मागील दोन युगांच्या कार्याचा एक टप्पा इस्रायलमध्ये आणि एक यहूदीयामध्ये पार पाडला गेला. सर्वसाधारणपणे बोलायचे झाले तर, या कार्याचा कोणताही टप्पा इस्रायलच्या बाहेर पार पडला नाही आणि प्रत्येक टप्पा सर्वप्रथम निवडलेल्या लोकांवरच पार पाडला गेला. परिणामी, इस्रायली लोकांचा असा विश्वास आहे, की यहोवा देव हा फक्त इस्रायली लोकांचा देव आहे. कारण येशूने यहूदीयामध्ये कार्य केले होते, जेथे तो क्रुसावर गेला होता, यहूदी लोक त्याला यहूदी लोकांचा उद्धारकर्ता म्हणून पाहत असतात. त्यांना वाटत असते, की तो फक्त यहूद्यांचा राजा आहे, इतर कोणत्याही लोकांचा नाही; तो इंग्रजांची सुटका करणारा प्रभू नाही किंवा तो अमेरिकन लोकांची सुटका करणारा प्रभू नाही, तर तो इस्रायली लोकांची सुटका करणारा प्रभू आहे; आणि त्याने इस्रायलमध्ये ज्या लोकांची सुटका केली ते यहूदी होते. वास्तविक पाहता, देव सर्व गोष्टींचा स्वामी आहे. तो सर्व सृष्टीचा देव आहे. तो फक्त इस्रायली लोकांचा किंवा फक्त यहूदींचा नाही, तर तो सर्व सृष्टीचा देव आहे. त्याच्या कार्याचे मागील दोन टप्पे इस्रायलमध्ये पार पडले, ज्यामुळे लोकांमध्ये काही विशिष्ट धारणा निर्माण झाल्या. त्यांचा असा विश्वास असतो, की यहोवाने त्याचे कार्य इस्रायलमध्ये केले, येशूने स्वतः त्याचे कार्य यहूदीयामध्ये केले आणि त्याशिवाय, कार्य करण्यासाठी त्याने देहस्वरूप धारण केले—आणि काहीही असो, या कार्याचा विस्तार इस्रायलच्या पलीकडे झालेला नाही. देवाने इजिप्शियन किंवा भारतीयांसाठी कार्य केले नाही; त्याने फक्त इस्रायली लोकांसाठी कार्य केले. अशाप्रकारे लोक स्वतःच्या मनात विविध धारणा निर्माण करत असतात आणि एका विशिष्ट व्याप्तीमध्ये देवाचे कार्य रेखाटत असतात. ते म्हणतात, की जेव्हा देव कार्य करतो, तेव्हा त्याने निवडलेल्या लोकांसाठी आणि इस्रायलमध्येच ते केले पाहिजे; इस्रायली लोकांशिवाय, देव इतर कोणासाठीही कार्य करत नाही आणि त्याच्या कार्याची यापेक्षा अधिक व्याप्ती नाही. देवाला अवतारी ठेवण्याच्या बाबतीत ते विशेष कठोर असतात आणि त्याला इस्रायलच्या मर्यादेपलीकडे जाण्याची परवानगी देत नाहीत. या सर्व केवळ मानवी धारणा नाहीत का? देवाने संपूर्ण आकाश, पृथ्वी आणि सर्व काही निर्माण केले, त्याने सर्व सृष्टी निर्माण केली, मग तो त्याचे कार्य फक्त इस्रायलपुरते कसे मर्यादित करू शकेल? तसे असते, तर त्याने सर्व सृष्टी निर्माण करण्याला काय अर्थ असेल? त्याने संपूर्ण जग निर्माण केले आणि त्याने त्याची सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना केवळ इस्रायलमध्येच नाही, तर विश्वातील प्रत्येक व्यक्तीवर अंमलात आणली आहे. मग ते चीन, अमेरिका, इंग्लंड किंवा रशिया कुठेही राहत असले तरीदेखील, प्रत्येक व्यक्ती आदामचा वंशज असतो; त्या सर्वांना देवाने निर्माण केलेले असते. त्यांच्यापैकी कोणीही सृष्टीच्या बंधनातून सुटू शकत नाही आणि त्यांच्यापैकी कोणीही स्वतःला “आदामचे वंशज” या खुणेपासून वेगळे करू शकत नाही. ते सर्व देवाची निर्मिती असतात, ते सर्व आदामची संतती असतात आणि ते सर्व आदाम व हव्वा यांचे भ्रष्ट वंशजसुद्धा असतात. देवाची निर्मिती म्हणजे फक्त इस्रायली लोक नव्हे तर सर्व लोक असतात; फरक फक्त एवढाच असतो, की काहींना शाप मिळालेला असतो, तर काहींना आशीर्वाद. इस्रायली लोकांबद्दल पटण्यायोग्य बऱ्याच गोष्टी आहेत; देवाने सुरुवातीला त्यांच्यावर कार्य केले कारण ते सर्वात कमी भ्रष्ट होते. चिनी लोकांची त्यांच्याशी तुलना करता येणार नाही; ते खूपच कनिष्ठ आहेत. म्हणूनच, देवाने सुरुवातीला इस्रायली लोकांमध्ये कार्य केले आणि त्याच्या कार्याचा दुसरा टप्पा फक्त यहूदीयामध्ये पार पाडला—ज्यामुळे मनुष्याच्या मनात अनेक धारणा आणि नियम निर्माण झाले. खरं तर, जर देव मानवी धारणेनुसार कार्य करत असता, तर तो फक्त इस्रायली लोकांचा देव असता आणि त्यामुळे त्याचे कार्य परराष्ट्रांपर्यंत पोहोचवू शकले नसते, कारण तो फक्त इस्रायली लोकांचा देव असता आणि सर्व सृष्टीचा देव नसता. भाकितांमध्ये असे म्हटले आहे, की परराष्ट्रांमध्ये यहोवाचे नाव वृद्धिंगत होईल, त्याचा परराष्ट्रांमध्ये प्रसार होईल. हे भाकीत का केले गेले? जर देव फक्त इस्रायली लोकांचा देव असता, तर त्याने फक्त इस्रायलमध्येच कार्य केले असते. शिवाय, त्याने या कार्याचा प्रसार केला नसता आणि त्याने असे भाकीत केले नसते. त्यानेच हे भाकीत केले असल्यामुळे, तो परराष्ट्रांमध्ये, प्रत्येक राष्ट्रात आणि सर्व भूमीवर आपले कार्य निश्चितपणे वाढवेल. त्याने ते केलेच पाहिजे कारण हे त्याचेच शब्द आहेत; ही त्याचीच योजना आहे, कारण तोच प्रभू आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी व सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व सृष्टीचा देव आहे. तो इस्रायली लोकांमध्ये किंवा संपूर्ण यहूदीयामध्ये कार्य करत असला तरीही, तो जे कार्य करतो ते संपूर्ण विश्वाचे आणि संपूर्ण मानवतेचे कार्य आहे. तो आज मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात—परराष्ट्रात—अजूनही जे कार्य करत आहे ते मानवतेचे कार्य आहे. इस्रायल हे पृथ्वीवरील त्याच्या कार्याचे आरंभ स्थान असू शकते; त्याचप्रमाणे, परराष्ट्रांमध्ये चीन देखील त्याच्या कार्याचे आरंभ स्थान बनू शकते. “यहोवाचे नाव परराष्ट्रांमध्ये गौरवले जाईल” हे भाकीत त्याने आता पूर्ण केले नाही का? परराष्ट्रांमध्ये त्याच्या कार्याची पहिली पायरी म्हणजे तो मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात करत असलेले कार्य आहे. देवाच्या अवतारी रूपाने या भूमीत कार्य करावे आणि या शापित लोकांमध्ये कार्य करावे, हे विशेषतः मानवी धारणेशी विसंगत आहे; हे सर्व कनिष्ठ दर्जाचे लोक आहेत, त्यांना काहीही किंमत नाही आणि त्यांना यहोवाने सुरुवातीला सोडून दिले होते. इतर लोकांद्वारे लोकांचा त्याग केला जाऊ शकतो, परंतु जर देवानेच त्यांचा त्याग केला असेल, तर त्यांच्यापेक्षा दर्जाहीन कोणीही नाही, किंवा त्यांच्यापेक्षा खालच्या स्तरावरचे कोणीही नाही. देवाच्या निर्मितीसाठी, सैतानाच्या ताब्यात जाणे किंवा लोकांनी सोडून देणे ही खूप वेदनादायक गोष्ट आहे—परंतु एखाद्या निर्मितीला निर्मात्याने सोडून देणे यापेक्षा खालचा दर्जा असू शकत नाही. मवाबचे वंशज शापित होते आणि ते या मागासलेल्या देशात जन्माला आले होते; निःसंशयपणे, अंधाराच्या प्रभावाखाली असलेल्या सर्व लोकांमध्ये, मवाबच्या वंशजांचा दर्जा सर्वात कनिष्ठ आहे. हे लोक आतापर्यंत सर्वात कनिष्ठ दर्जाचे असल्यामुळे, त्यांच्यावर केलेले कार्य मानवी धारणांना उद्ध्वस्त करू शकते आणि देवाच्या संपूर्ण सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेसाठीदेखील ते सर्वात हितकारक आहे. या लोकांमध्ये असे कार्य करणे हा मानवी धारणेला उद्ध्वस्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि तसे करून देव एका युगाची सुरुवात करतो; याने तो सर्व मानवी धारणांना उद्ध्वस्त करतो; यासह तो संपूर्ण कृपेच्या युगाचे कार्य पूर्ण करतो. त्याचे पहिले कार्य इस्रायलच्या हद्दीतील यहूदीया येथे पार पडले; परराष्ट्रांमध्ये, त्याने नवीन युग सुरू करण्यासाठी कोणतेही कार्य केले नाही. कार्याचा अंतिम टप्पा केवळ परराष्ट्रीयांमध्येच नाही, तर त्याहूनही अधिक म्हणजे शापितांमध्ये पार पडला. हा एक मुद्दा सैतानाला अपमानित करण्यास सर्वात सक्षम पुरावा आहे आणि अशा प्रकारे, देव विश्वातील सर्व सृष्टीचा देव, सर्व गोष्टींचा प्रभू, जीवनासह प्रत्येक गोष्टीसाठी उपासनेचा उद्देश “बनतो”.
आजही, देवाने कोणते नवीन कार्य सुरू केले आहे, याची जाण नसणारे लोक आहेत. परराष्ट्रांमध्ये, देवाने नवीन सुरुवात केली आहे. त्याने नवीन युगाला प्रारंभ केला आहे, आणि नवीन कार्य सुरू केले आहे—आणि तो हे कार्य मवाबच्या वंशजांवर करत आहे. हे त्याचे सर्वात नवीन कार्य नाही का? संपूर्ण इतिहासात हे कार्य यापूर्वी कोणीही अनुभवलेले नाही. त्याबद्दल कोणी ऐकलेही नाही, तर कोणी त्याची प्रशंसा करणे ही दूरची बाब. देवाचे ज्ञान, देवाचे आश्चर्य, देवाची अथांगता, देवाची महानता आणि देवाची पवित्रता हे सर्व कार्याच्या या टप्प्यातून, शेवटच्या दिवसांच्या कार्यातून प्रकट होते. हे मानवी धारणा उद्धवस्त करणारे हे कार्य म्हणजे नवीन कार्य नाही का? असे काही लोक आहेत जे असा विचार करतात: “देवाने मवाबला शाप दिला आणि मवाबच्या वंशजांचा त्याग करीन असे म्हटले, मग तो आता त्यांना कसे वाचवू शकेल?” हे ते परराष्ट्रीय आहेत ज्यांना देवाने शाप दिला होता आणि इस्रायलमधून हाकलून दिले होते; इस्रायली लोक त्यांना “परराष्ट्रीय कुत्रे” म्हणत असत. प्रत्येकाच्या मते, ते केवळ परराष्ट्रीय कुत्रे नाहीत, तर त्याहूनही वाईट म्हणजे विनाशाचे पुत्र आहेत; म्हणजे, ते देवाने निवडलेले लोक नाहीत. त्यांचा जन्म कदाचित इस्रायलच्या हद्दीत झाला असेल, परंतु ते इस्रायली लोकांचे नाहीत आणि त्यांना परराष्ट्रांमध्ये हुसकावून लावण्यात आले होते. ते सर्व लोकांमध्ये सर्वात कनिष्ठ आहेत. ते मानवजातीमध्ये सर्वात कनिष्ठ आहेत, या कारणामुळेच देव नवीन युग सुरू करण्याचे कार्य त्यांच्यामध्ये करतो, कारण ते भ्रष्ट झालेल्या मानवतेचे प्रतिनिधी आहेत. देवाचे कार्य निवडक आहे आणि त्याचे लक्ष्य निश्चित आहे; तो आज या लोकांमध्ये जे कार्य करत आहे ते त्याने निर्मिलेल्यांवरच केले जाते. नोहा हा देवाची निर्मिती होता, त्याचप्रमाणे त्याचे वंशजही देवाचीच निर्मिती आहेत. जगात जे काही रक्त आणि मांसाचे आहे, ती देवाचीच निर्मिती आहे. देवाचे कार्य त्याने निर्मिलेल्या सर्वांसाठी आहे; एखाद्याची निर्मिती केल्यानंतर ती व्यक्ती शापित आहे की नाही यावर ते अवलंबून नाही. त्याचे व्यवस्थापन कार्य त्याने निर्मिलेल्या सर्वांवर असते, फक्त त्याने शाप न दिलेल्या निवडलेल्या लोकांसाठीच नाही. देवाला त्याचे कार्य त्याने निर्मिलेल्यांमध्येच पार पाडायचे असल्यामुळे, तो ते निश्चितपणे यशस्वीरित्या पूर्ण करेल आणि तो अशा लोकांमध्ये कार्य करेल जे त्याच्या कार्यासाठी हितकारक आहेत. म्हणूनच, जेव्हा तो लोकांमध्ये कार्य करतो तेव्हा तो सर्व नियम तोडतो; त्याच्यासाठी, “शापित”, “ताडण प्राप्त झालेले” आणि “आशीर्वाद लाभलेले” हे शब्द निरर्थक आहेत! इस्रायलच्या निवडलेल्या लोकांप्रमाणेच यहूदी लोक चांगले आहेत; ते चांगल्या क्षमतेचे आणि मानवतेचे लोक आहेत. सुरुवातीला, यहोवाने त्याचे कार्य त्यांच्यामध्ये सुरू केले आणि त्याची सुरुवातीची कार्ये केली—परंतु आज त्यांच्यावर विजय मिळवण्याचे कार्य करणे निरर्थक ठरेल. ते सुद्धा देवाच्या निर्मितीचा भाग असतील आणि त्यांच्याबद्दलही सकारात्मक असे बरेच काही असू शकेल, परंतु कार्याचा हा टप्पा त्यांच्यामध्ये पार पाडणे निरर्थक आहे; देव लोकांवर विजय मिळवू शकणार नाही किंवा तो त्याने निर्मिलेल्या सर्वांनाच पटवून देऊ शकणार नाही, देवाने त्याचे कार्य मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रातील या लोकांकडे वळवण्याचे हेच मुख्य कारण आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याने एका युगाची सुरुवात करणे, सर्व नियम आणि सर्व मानवी धारणा उद्धवस्त करणे आणि संपूर्ण कृपेच्या युगाचे कार्य समाप्त करणे. जर त्याचे सध्याचे कार्य इस्रायली लोकांमध्ये पार पाडले गेले असते, तर त्याची सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्ण होईपर्यंत, प्रत्येकाचा असा विश्वास तयार झाला असता, की देव फक्त इस्रायली लोकांचा देव आहे, देवाने फक्त इस्रायली लोकांना निवडले आहे आणि फक्त इस्रायली लोकच देवाचे आशीर्वाद आणि वचन मिळवण्यास पात्र आहेत. शेवटच्या दिवसात मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या देशातील परराष्ट्रात देवाचा अवतार हा सर्व सृष्टीचा देव म्हणून देवाचे कार्य पूर्ण करतो; तो त्याचे संपूर्ण व्यवस्थापन कार्य पूर्ण करतो, आणि तो मोठ्या अग्निवर्ण अजगराच्या राष्ट्रात त्याच्या कार्याचा मध्य भाग संपवतो. कार्याच्या या तीन टप्प्यांचा गाभा म्हणजे मनुष्याचा मोक्ष—म्हणजेच, निर्मिलेल्या सर्वांना निर्मात्याची उपासना करायला लावणे. अशा प्रकारे, कार्याच्या प्रत्येक टप्प्याचा फार मोठा अर्थ आहे; देव असे काहीही करत नाही ज्याचा काही अर्थ किंवा किंमत नाही. एकीकडे, कार्याचा हा टप्पा एका नवीन युगाची सुरुवात करतो आणि मागील दोन युगांचा अंत करतो; तर दुसरीकडे, तो सर्व मानवी धारणा आणि मानवी विश्वास व ज्ञानाचे सर्व जुने मार्ग उद्धवस्त करतो. पूर्वीच्या दोन युगांचे कार्य वेगवेगळ्या मानवी धारणांनुसार पार पाडले होते; तथापि, हा टप्पा मानवी धारणा पूर्णपणे दूर करतो, ज्यामुळे मानवतेवर पूर्णपणे विजय मिळवता येतो. मवाबच्या वंशजांमध्ये केलेल्या कार्याद्वारे, त्यांच्यावर विजय मिळवून देव संपूर्ण विश्वातील सर्व लोकांवर विजय प्राप्त करेल. हे त्याच्या कार्याच्या या टप्प्याचे सर्वात खोल महत्त्व आहे आणि त्याच्या कार्याच्या या टप्प्याचा हा सर्वात मौल्यवान पैलू आहे. तुझी स्वतःची स्थिती कनिष्ठ दर्जाची आहे आणि तुझी किंमत कमी आहे हे तुला माहीत असले, तरीही तुला सर्वात आनंददायी गोष्ट मिळाली आहे: तुम्हाला मोठ्या आशीर्वादाचा वारसा मिळाला आहे, महान वचन मिळाले आहे आणि तुम्ही देवाचे हे महान कार्य पूर्ण करण्यात मदत करू शकता. तुम्ही देवाचे खरे रूप पाहिले आहे, तुम्हाला देवाचा मूळ स्वभाव माहीत आहे आणि तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता. देवाच्या कार्याचे पूर्वीचे दोन टप्पे इस्रायलमध्ये पार पडले. जर शेवटच्या दिवसात त्याच्या कार्याचा हा टप्पादेखील इस्रायली लोकांमध्ये पार पाडला गेला, तर देवाने केवळ इस्रायली लोकांना निवडले आहे यावर त्याने निर्मिलेले सर्वजण विश्वास ठेवतील, एवढेच नव्हे, तर देवाची संपूर्ण व्यवस्थापन योजना त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यातदेखील अपयशी ठरेल. इस्रायलमध्ये ज्या काळात त्याच्या कार्याचे दोन टप्पे पार पाडले गेले त्या काळात, परराष्ट्रांमध्ये कोणतेही नवीन कार्य—किंवा नवीन युग सुरू करण्याचे कोणतेही कार्य—केले गेले नाही. आजच्या कार्याचा टप्पा—नवीन युग सुरू करण्याचे कार्य—प्रथम पर राष्ट्रांमध्ये, एवढेच नव्हे, तर सुरुवातीला मवाबच्या वंशजांमध्ये पार पाडला जात आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण नवे युग सुरू केले जात आहे. देवाने मानवी धारणेमधील सर्व ज्ञान उध्वस्त केले आहे, त्यातील काहीही राहू दिले नाही. त्याच्या विजयाच्या कार्यात, त्याने मानवी कल्पना, त्या जुन्या, पूर्वीच्या मानवी ज्ञानाच्या पद्धतींना उद्ध्वस्त केले आहे. तो लोकांना हे पाहू देतो की देवाचे कोणतेही नियम नाहीत, देवाबद्दल काहीही जुने नाही, तो जे कार्य करतो ते पूर्णपणे मुक्त आहे, पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि तो जे काही करतो ते सर्व योग्य आहे. त्याने निर्मिलेल्यांमध्ये तो करत असलेल्या कोणत्याही कार्याला तू पूर्णपणे शरण गेले पाहिजेस. तो करत असलेल्या सर्व कार्यांना काही अर्थ आहे, आणि तो हे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि बुद्धीनुसार करत असतो, मनुष्याच्या निवडीनुसार किंवा धारणांनुसार नाही. जर त्याच्या कार्यासाठी काही हितकारक असेल तर तो ते करतो; आणि जर एखादी गोष्ट त्याच्या कार्यासाठी हितकारक नसेल तर, ती कितीही चांगली असली तरीही करत नाही! तो कार्य करतो आणि त्याच्या कार्याच्या अर्थानुसार व उद्देशानुसार प्राप्तकर्ता आणि त्याच्या कार्याचे स्थान निवडतो. जेव्हा तो कार्य करतो तेव्हा तो भूतकाळातील नियमांचे पालन करत नाही किंवा जुन्या चालीरीतींचे पालन करत नाही. त्याउलट, तो कार्याच्या महत्त्वानुसार त्याच्या कार्याची योजना करतो. अंततः, तो खरा परिणाम आणि अपेक्षित ध्येय गाठेल. जर तुला आज या गोष्टी समजल्या नाहीत तर या कार्याचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.