गंतव्यस्थानी
जेव्हा कधीही गंतव्यस्थान नमूद केलेले असते, तेव्हा तुम्ही त्याकडे विशेष गांभीर्याने पाहता, याखेरीज तुम्ही सर्वच त्याबाबतीत अधिक संवेदनशील असता. काही जण उत्तम गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी जमिनीवर माथा टेकण्यासाठी किंवा देवासमोर आदराने वाकण्यासाठी कमालीचे उत्सुक असतात. तुमची उत्सुकता मला समजते, ती शब्दांत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. तुमचा देह संकटात पडू नये असे तुम्हाला वाटते याहून हे अधिक नाही, आणि भविष्यातील चिरस्थायी शिक्षेत जाण्याची तुमची इच्छा तर बिलकुलच नाही. तुम्हाला अधिक मोकळेपणाने जगता यावे, अधिक सहजपणे जगता यावे, अशी तुम्ही आशा करता. आणि जेव्हा गंतव्यस्थानाचा उल्लेख होतो, तेव्हा तुम्ही प्रक्षुब्ध होता, जर तुम्ही पुरेसे लक्ष दिले नाही तर तुम्ही देवाला अपमानित कराल आणि तुम्हाला योग्य ती शिक्षा होईल, याचे तुम्हाला मनोमन भय वाटत असते. तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानासाठी तडजोड करण्यासाठी संकोच बाळगला नाही आणि तुमच्यापैकी अनेकजण जे कधीकाळी कुटील आणि थिल्लर होते, ते अचानक विशेषतः सभ्य आणि प्रामाणिक झाले आहेत; तुमचा प्रामाणिकपणाचा दिखाऊपणा लोकांना शहारे आणणारा व धडकी भरवणारा आहे. असे असले तरीही, तुम्हा सर्वांकडे “प्रामाणिक” अंतःकरणे आहेत, तुम्ही नेहमीच तुमच्या मनातील गुपिते काहीही राखून न ठेवता माझ्यासमोर खुली केली आहेत, मग ती तक्रार असो फसवणूक असो की भक्तिभाव असो. एकंदरीत तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या अगदी खोलवर दडलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी माझ्यासमोर “कबूल” केल्या आहेत. अर्थात, मी नेहमीच या गोष्टींभोवतीच घुटमळत राहिलो नाही, कारण माझ्यासाठी या बाबी परिचितच आहेत. देवाची मान्यता मिळावी यासाठी केसांची एक बट गमावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानाच्या प्राप्तीसाठी अग्नीच्या सागरात प्रवेश कराल. मी तुमच्याबाबत फार मताभिनिवेशी आहे असे नाही, तर मी जे करत आहे त्याला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडेही भक्तिभावाने ओथंबलेल्या हृदयाची कमतरता आहे. मी जे आता सांगितले ते तुम्हाला कदाचित समजणार नाही, मला तुम्हाला साधेसरळ स्पष्टीकरण देऊ द्या: तुम्हाला ज्याची गरज आहे ते सत्य अथवा जीवन नाही, तुमची वागणूक कशी असावी याबाबतची तत्त्वेही नाहीत, माझे कष्टाचे काम तर बिलकूलच नाही. त्याऐवजी तुम्हाला काय हवे आहे, तर या देहात तुम्ही जे काही धारण करता—संपत्ती, हुद्दा, कुटुंब, लग्न आणि अशा असंख्य गोष्टी. माझी वचने आणि कार्य यांबाबत तुम्ही पूर्णपणे असहमत आहात, त्यामुळे तुमची श्रद्धा मी एका शब्दात व्यक्त करू शकेन: वरवरची. तुम्ही ज्या गोष्टींसाठी पूर्णतः समर्पित आहात, त्या साध्य करण्यासाठी कोणत्याही थरास जाऊ शकता. मात्र, देवावरील तुमच्या विश्वासाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही असे करू शकत नाही, हे मला आढळून आले आहे. तुम्ही तुलनेने समर्पित तर तुलनेने आस्थावान आहात. त्यामुळेच माझे असे म्हणणे आहे, की ज्यांच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा नाही, त्यांच्या देवाप्रती असलेल्या विश्वासात ते अपयशीच ठरतात. काळजीपूर्वक विचार करा—तुमच्यामध्ये अशी अनेक अपयशे आहेत का?
तुम्हाला हे माहिती हवे, की देवावरचा विश्वास हा लोकांच्या स्वतःच्या कृतींतून जन्माला येतो; विशेषतः जेव्हा लोक यशस्वी न होता उलट अयशस्वी होतात तेही त्यांच्या कृतींमुळेच होते आणि त्यात इतर कोणत्याही घटकाची काहीही भूमिका नसते. मला विश्वास आहे, की देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा खूप कठीण आणि अधिक यातनादायी अशी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्ही काहीही करता, शिवाय तुम्ही त्याला इतके महत्व देता की त्यात कोणत्याही प्रकारची चूक तुम्ही खपवून घेत नाही; अशा प्रकारचे अविरत कष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात कायमच करत असता. काही परिस्थितींमध्ये जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची फसवणूक करायला तयार नसता तिथे माझ्या देहाची फसवणूक करण्यासाठी मात्र तुमची तयारी असते. तुम्ही सातत्याने असे वर्तन करता आणि याच तत्त्वानुसार तुम्ही तुमचे आयुष्य व्यतीत करता. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानासाठी माझी फसवणूक करण्याकरिता एक खोटा दिखाऊपणा तर उभा करत नाही ना, जेणेकरून तुमचे गंतव्यस्थान हे अतिशय सुंदर आणि तुमच्या इच्छेनुरूप असेल? मला जाणीव आहे, की तुमची भक्ती ही तुमच्या प्रामाणिकपणाएवढीच तात्कालिक आहे. तुमचा निश्चय आणि तुम्ही मोजत असलेली किंमत ही केवळ आत्ताच्या क्षणापुरती असून भविष्यासाठी नाही असे आहे का? तुम्हाला केवळ सुंदर गंतव्यस्थान मिळवण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करायचा आहे; तुमचा हेतू केवळ त्याबदल्यात काही मिळवण्याचा आहे. हे प्रयत्न तुम्ही काही सत्याचे ऋणी होण्याचे टाळण्यासाठी किंवा त्याहीपेक्षा मी जी किंमत मोजली आहे त्याची परतफेड करण्यासाठी म्हणून मुळीच करत नाही. थोडक्यात काय तर, तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही हुशारीने डावपेच करायला तयार आहात परंतु त्यासाठी खुलेआम लढण्याची तुमची तयारी नाही. हीच तुमची अंतःकरणपूर्वक इच्छा नाही का? तुम्ही असे सोंग घेणे किंवा अन्नपाणी सोडण्याइतका, झोप न लागण्याइतका गंतव्यस्थानाचा ध्यास घेणे अजिबात योग्य नाही. अंततः तुमचा निकाल आधीच ठरलेला असेल हे खरे नाही का? तुम्ही सर्वांनी तुमची कर्तव्ये तुमच्या पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि मनापासून पार पाडली पाहिजेत. त्यासाठी जी किंमत मोजावी लागेल ती मोजण्याची तुमची तयारी असली पाहिजे. जसे तुम्ही म्हणता, की जेव्हा तो अंतिम दिवस येईल, तेव्हा ज्यांनी देवासाठी किंमत मोजली आहे किंवा त्याच्यासाठी सहन केले आहे, त्यांच्याकडे देव दुर्लक्ष करणार नाही. ही खात्री मनात बाळगली पाहिजे, ती न विसरणे हीच योग्य गोष्ट आहे आणि असे केले तरच माझे मन तुमच्या बाबतीत निश्चिंत असेल. नाहीतर तुमच्या बाबतीत माझे मन कायमच साशंक असेल आणि तुम्ही कायम मला अप्रिय असाल. जर तुम्ही सगळे तुमच्या सदसदविवेकबुद्धीचा मार्ग अनुसराल आणि तुमचे सर्वस्व मला अर्पण कराल, माझ्या कार्यासाठी कष्ट कराल, माझ्या सुवार्तेच्या कार्यासाठी आयुष्य वेचाल, तर मग माझे अंतःकरण तुमच्यासाठी आनंदाने उचंबळून का येणार नाही? अशा तऱ्हेने मी माझे हृदय तुमच्याबद्दल संपूर्णपणे निश्चिंत करू शकेन, हो ना? तुम्ही जे काही करता, ते माझ्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षांचा अगदी कणमात्र भाग आहे ही अगदी लज्जास्पद गोष्ट आहे. आणि तसे असूनही मी मात्र तुमच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे म्हणण्याचे धारिष्ट्य तुम्ही कसे काय करू शकता?
तुमचे गंतव्यस्थान आणि तुमचे नशीब तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे—या अत्यंत काळजी घेण्याच्या बाबी आहेत. तुमचा असा विश्वास असतो, की जर तुम्ही गोष्टी अतिशय काळजीपूर्वक केल्या नाहीत, तर त्याचा अर्थ असा होईल, की तुम्ही गंतव्यस्थान मिळवणेच थांबवले आहे, तुम्ही तुमचे स्वतःचेच नशीब उद्ध्वस्त केले आहे. जे लोक केवळ त्यांचे गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न खर्ची घालतात, ते व्यर्थ मेहनत घेत असतात, हे कधी तुमच्या लक्षात तरी आले आहे का? असे प्रयत्न विशुद्ध नसतात—ते बनावट आणि कपटी असतात. जर असे असेल, तर जे फक्त त्यांच्या गंतव्यस्थानाच्या प्राप्तीसाठीच कार्य करतात, ते त्यांच्या शेवटच्या पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत, कारण कपटीपणामुळेच एखाद्या व्यक्तीच्या देवावरील विश्वासामध्ये अपयश येते. मी याआधी सांगितले आहे, की मला खुशामतखोरी किंवा तोंडपूजा किंवा उत्साहाने दिलेली वागणूक आवडत नाही. माझ्या सत्यास आणि माझ्या अपेक्षांना सामोरी जाणारी प्रामाणिक माणसेच मला आवडतात. त्याहीपेक्षा, जेव्हा लोक माझ्या हृद्याप्रति सर्वाधिक काळजी घेत असल्याचे दर्शवतात, माझ्या हृद्याचा विचार करतात, माझ्यासाठी सर्वकाही सोडून देण्याची त्यांची क्षमता असते, ते मला आवडतात. केवळ यामुळेच माझ्या हृद्याला दिलासा मिळू शकतो. या घडीला, तुमच्या किती गोष्टी मला न आवडणाऱ्या आहेत? तुमच्या किती गोष्टी मला आवडणाऱ्या आहेत? असे असू शकते का, की तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानासाठी समोर मांडलेल्या विद्रूपतेच्या वेगवेगळ्या अभिव्यक्तींची जाणीव तुमच्यापैकी कोणालाच झालेली नाही?
माझ्या हृदयात, सकारात्मक आणि उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कोणत्याही अंतःकरणाला क्लेशदायी होण्याची माझी इच्छा नाही आणि स्वतःचे कर्तव्य श्रद्धेने पार पाडणाऱ्या कोणाच्याही ऊर्जेचा हिरमोड करण्याची माझी इच्छा बिलकुल नाही. असे असले तरीही, मी तुमच्या अपुरेपणाची आणि तुमच्या अंतःकरणांमध्ये खोलवर वसलेल्या ओंगळवाण्या आत्म्याची तुम्हाला प्रत्येकाला आठवण करून दिलीच पाहिजे. मी हे या आशेने करत आहे, की जेव्हा तुमचा माझ्या शब्दांशी समोरासमोर सामना होईल तेव्हा तुमच्या विशुद्ध मनाची जाणीव करून देऊ शकेन, कारण मी माझ्याप्रति असलेल्या लोकांच्या कपटीपणाचा सर्वाधिक तिरस्कार करतो. मला एवढीच आशा आहे, की माझ्या कार्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही तुमची सर्वोत्कृष्ट कामगिरी कराल आणि यापुढे अर्धवट अंतःकरणाने नाही तर तुम्ही स्वतःला मनोमन पूर्णपणे समर्पित कराल. अर्थात, मी अशीही आशा करत आहे, की तुम्हा सर्वांना उत्तम गंतव्यस्थान मिळेल. असे असले तरी, माझी आवश्यकता अजूनही तीच आहे, तुमचा संपूर्ण आणि अंतिम भक्तिभाव मला अर्पण करण्याबाबत तुम्ही सर्वोत्तम निर्णय घ्यावा. जर एखाद्या व्यक्तीकडे संपूर्ण भक्तिभाव नसेल, तर तो नक्कीच सैतानासाठीची मौल्यवान मालमत्ता आहे आणि त्याला मी उपयोगासाठी म्हणून अधिक काळ ठेवून घेणार नाही तर त्याच्या पालकांनी देखरेख करावी यासाठी त्याला त्याच्या घरी पाठवेन. माझे कार्य ही तुमच्यासाठी मोलाची मदत आहे; मला तुमच्याकडून काय मिळण्याची आशा आहे, तर ते म्हणजे उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणारे प्रामाणिक अंतःकरण, मात्र अद्याप माझे हात रिकामेच राहिले आहेत. याबाबत विचार करा: जर एखाद्या दिवशी मी वचनांमधून व्यक्त करण्याच्या पलीकडे व्यथित झालो, तर माझा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन काय असेल? आता मी जसा आहे, तसा मनमिळाऊ राहीन का? माझे मन आता जसे शांत आहे, तसे असेल का? जर एखाद्या व्यक्तीने मेहनतीने शेतीची मशागत केली पण धान्याचा एकही दाणा उपजला नाही, अशा व्यक्तीच्या भावना तुम्हाला समजतात का? जेव्हा एखादी व्यक्ती खूप मोठ्या धक्क्याला सामोरी जाते, तेव्हा त्याच्या काळजाला किती जखमा होतात, हे तुम्हाला समजते का? कधीकाळी आशेने ओतप्रोत भरलेल्या आणि अनाठायी मतभेदांमुळे वेगळे व्हावे लागलेल्या व्यक्तीमध्ये आलेला कडवटपणा तुम्ही चाखू शकता का? चिथावणी देण्यात आलेल्या व्यक्तीचा बाहेर पडणारा क्रोध पाहिला आहे का? जेव्हा एखाद्या व्यक्तीला द्वेषपूर्ण आणि कपटी वागणूक मिळते, तेव्हा त्या व्यक्तीची सूड घेण्याची आतुरता तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला या व्यक्तींची मनोवृत्ती समजली, तर तुम्हाला देवाची त्याच्या प्रतिदंडावेळी असलेल्या अभिवृत्तीची कल्पना करणे अवघड असणार नाही. सरतेशेवटी, तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानाच्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न कराल अशी मी आशा करतो, तरीही तुम्ही तुमच्या प्रयत्नांत कपटी मार्गांचा अवलंब न करणे हितावह असेल, अन्यथा माझ्या हृदयात तुमच्याबाबत अपेक्षाभंगच होत राहील. आणि अशा अपेक्षाभंगाचे परिणाम काय होतात? तुम्ही स्वतःचीच फसवणूक करत नाही का? जे लोक त्यांच्या गंतव्यस्थानाचा विचार करतात, तरीही त्याचा विनाश करतात, असे लोक वाचवले जाण्यासाठी कमीतकमी पात्र असतात. जरी ती व्यक्ती ओरडली आणि चिडली तरी अशा व्यक्तीची कोणाला दया येईल? सारांश हा आहे, माझी अजूनही अशी इच्छा आहे, की तुमच्यासाठी योग्य आणि उत्तम गंतव्यस्थान मिळावे आणि त्याहीपेक्षा मी अशी आशा व्यक्त करत आहे, की तुमच्यापैकी कोणीही आपत्तीत सापडू नये.