तीन उपदेश

देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणून, तुम्ही सर्व गोष्टींमध्ये फक्त त्याच्याशीच एकनिष्ठ असले पाहिजे आणि सर्व गोष्टींमध्ये त्याच्या इच्छेनुसार वागण्यास सक्षम असले पाहिजे. असे असले तरी, प्रत्येकाला हा संदेश समजला असला तरीही, मनुष्याच्या विविध अडचणींमुळे—त्याच्या अज्ञानामुळे, मूर्खपणामुळे व भ्रष्टाचारामुळे, उदाहरणार्थ—ही सत्ये, जी सर्वांत उघड आणि मूलभूत आहेत, त्याच्यामध्ये पूर्णपणे स्पष्ट होत नाहीत व म्हणूनच, तुमचा अंत दगडात होण्यापूर्वी, मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला हव्यात ज्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मी पुढे सुरू ठेवण्यापूर्वी, तुम्ही प्रथम हे समजून घेतले पाहिजे: मी जी वचने उच्चारतो ती सर्व मानवजातीसाठी निर्देशित केलेली सत्ये आहेत; ती केवळ विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीला उद्देशून नाहीत. म्हणून, तुम्ही सत्याच्या दृष्टिकोनातून माझे शब्द समजून घेण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि विचलित न होणारे लक्ष व प्रामाणिकपणाची वृत्ती असली पाहिजे; मी उच्चारलेल्या एकाही वचनाकडे किंवा सत्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मी उच्चारलेल्या कोणत्याही वचनांना कमी लेखू नका. मी पाहत आहे, की तुम्ही तुमच्या जीवनात सत्याशी असंबद्ध असलेले बरेच काही केले आहे आणि म्हणूनच मी स्पष्टपणे सांगत आहे, की तुम्ही सत्याचे सेवक व्हा, की तुम्ही दुष्टतेचे व कुरूपतेचे गुलाम होऊ नका आणि तुम्ही सत्याला पायदळी तुडवू नका किंवा देवाच्या घराचा कोणताही कोपरा अपवित्र करू नका. हा माझा तुम्हाला उपदेश आहे. आता मी सध्याच्या महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलेन.

सर्वप्रथम, तुमच्या नशिबासाठी, तुम्ही देवाची संमती घ्यावी. याचा अर्थ असा आहे, की तुम्ही देवाच्या घराचे सदस्य आहात हे तुम्ही कबूल करता, तेव्हा तुम्ही देवाला मनःशांती मिळवून दिली पाहिजे आणि सर्व गोष्टींमध्ये त्याला संतुष्ट केले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही तुमच्या कृतींमध्ये तत्त्वनिष्ठ असले पाहिजे व त्यांच्यातील सत्याचे पालन केले पाहिजे. जर हे तुला शक्य नसेल, तर देव तुझा तिरस्कार करेल आणि तुला नाकारेल व प्रत्येक मनुष्य तुला झिडकारून लावेल. एकदा तू अशा संकटात सापडलास, की तुझी गणना देवाच्या घरामध्ये होऊ शकत नाही, हाच देवाची संमती न मिळणे याचा अर्थ आहे.

दुसरे म्हणजे, तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की जे प्रामाणिक आहेत ते देवाला आवडतात. थोडक्यात, देव श्रद्धाळू आहे आणि म्हणून त्याच्या वचनांवर नेहमी विश्वास ठेवला जाऊ शकतो; शिवाय, त्याच्या कृती निर्दोष व निःसंदिग्ध आहेत, म्हणूनच जे देवाशी प्रामाणिक आहेत ते त्याला आवडतात. प्रामाणिकपणा म्हणजे तुमचे हृदय देवाला अर्पण करणे, प्रत्येक गोष्टीत देवाबरोबर प्रामाणिक असणे, प्रत्येक गोष्टीत त्याच्याशी खुले असणे, तथ्ये कधीही न लपवणे, तुमच्याहून श्रेष्ठ आणि कनिष्ठ लोकांना फसवण्याचा प्रयत्न न करणे व केवळ देवाची कृपा मिळवण्यासाठी एखादी गोष्ट न करणे. थोडक्यात, प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या कृती आणि शब्दांमध्ये शुद्ध असणे व देव किंवा मनुष्य दोघांपैकी कोणालाही न फसवणे. मी जे म्हणतो ते खूप सोपे आहे, परंतु तुमच्यासाठी ते दुप्पट कठीण आहे. बरेच लोक प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा व वागण्यापेक्षा नरकात पडणे पसंत करतील. जे अप्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे इतर उपाय आहेत यात आश्चर्य नाही. अर्थात, तुमच्यासाठी प्रामाणिक राहणे किती कठीण आहे हे मला चांगलेच माहीत आहे. कारण तुम्ही सगळे खूप हुशार आहात, तुमच्या स्वतःच्या क्षुल्लक मापदंडाने लोकांचे मोजमाप करण्यात कुशल आहात, यामुळे माझे काम अधिक सोपे होते. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमची रहस्ये तुमच्या मनाशी घट्ट पकडून ठेवल्यामुळे, मी तुम्हाला, एक एक करून, अग्नीने “प्रशिक्षित” होण्यासाठी आपत्तीत पाठवेन जेणेकरून, त्यानंतर तुम्ही माझ्या वचनांवर पूर्णपणे विश्वास ठेवाल. शेवटी, मी तुमच्या तोंडून “देव हा श्रद्धाळू देव आहे” असे शब्द वदवून घेईन, ज्यावर तुम्ही तुमची छाती पिटत राहाल आणि शोक कराल, “मनुष्याचे हृदय भ्रष्ट आहे!” यावेळी तुमची मनस्थिती काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्ही आता जितका विजयोत्सव करत आहात तितका करणार नाही. आणि तुम्ही आतापेक्षा कमी “प्रगल्भ आणि गूढ” व्हाल. देवाच्या उपस्थितीत, काही लोक चोखंदळ व योग्य असतात, ते “सद्वर्तनी” होण्यासाठी प्रयत्न करतात, तरीही आत्म्याच्या उपस्थितीत ते त्यांचे खरे रंग दाखवतात आणि बंडखोरी करतात. अशा लोकांची गणना तुम्ही प्रामाणिक लोकांमध्ये कराल का? जर तू ढोंगी असशील, “परस्परसंबंधांमध्ये” कुशल असशील, तर माझे असे म्हणणे आहे की तू नक्कीच देवाला कमी किमतीचे मानणारा आहेस. जर तुझे शब्द बहाणे आणि कवडीमोलाच्या समर्थनांनी भरलेले असतील, तर माझे असे म्हणणे आहे की तू सत्य आचरणात आणण्याचा तिरस्कार करणारा आहेस. जर तुझ्याकडे अनेक गुपिते असतील जी उघड करण्यास तू तयार नाहीस, जर तू तुझी गुपिते—तुझ्या अडचणी—इतरांसमोर उघड करून प्रकाशाचा मार्ग शोधण्याच्या विरुद्ध असशील, तर माझे असे म्हणणे आहे की तू सहजासहजी तारण न मिळणारी आणि अंधारातून सहजासहजी बाहेर न पडणारी व्यक्ती आहेस. जर सत्याचा मार्ग शोधणे तुला चांगले वाटत असेल, तर तू नेहमी प्रकाशात राहणारी व्यक्ती आहेस. जर तुला देवाच्या घरी सेवा करणे, प्रसिद्धीच्या झोतात न राहता परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे कार्य करणे, नेहमी दान करणे आणि कधीही काहीही न घेणे यात खूप आनंद वाटत असेल, तर माझे असे म्हणणे आहे की तू एक निष्ठावान संत आहेस, कारण तुला कोणत्याही लाभाची आस नाही आणि तू फक्त एक प्रामाणिक व्यक्ती आहेस. जर तू स्पष्ट राहण्यास तयार असशील, जर तू तुझे सर्व काही खर्च करून टाकण्यास तयार असशील, जर तू देवासाठी तुझे जीवन अर्पण करण्यास सक्षम असशील आणि तुझ्या साक्षीत ठाम असशील, जर तू इतका प्रामाणिक असशील की तुला फक्त देवाला संतुष्ट करणे माहीत आहे व तू स्वतःचा विचार करत नाहीस किंवा स्वतःसाठी काहीही मागून घेत नाहीस, मग माझे असे म्हणणे आहे की असे लोक ते आहेत ज्यांचे पोषण प्रकाशात झाले आहे आणि जे राज्यात कायमचे जगतील. तुझ्यामध्ये खरी श्रद्धा व खरी निष्ठा आहे की नाही, देवासाठी त्रास सहन केल्याचा अनुभव आहे की नाही आणि तू पूर्णपणे देवाला समर्पण केले आहेस की नाही हे तुला समजले पाहिजे. जर तुझ्यात या गोष्टींचा अभाव असेल तर तुझ्यात अवज्ञा, कपट, लोभ आणि तक्रार या गोष्टी भरलेल्या आहेत. तुझे हृदय प्रामाणिकपणापासून दूर असल्याने, तुला कधीही देवाकडून सकारात्मक मान्यता मिळाली नाही व तू प्रकाशात कधीही राहिला नाहीस. शेवटी एखाद्याचे नशीब कसे घडेल हे त्यांच्याकडे प्रामाणिक आणि प्रेमळ हृदय आहे की नाही व त्यांच्यात शुद्ध आत्मा आहे की नाही यावर अवलंबून असते. जर तू खूप अप्रामाणिक, द्वेषपूर्ण मन असलेली, अशुद्ध आत्म्याची एखादी व्यक्ती असशील, तर तुझ्या नशिबाच्या नोंदीमध्ये लिहिल्यानुसार, ज्या ठिकाणी मनुष्याला शिक्षा दिली जाते तेथे तुझा अंत होईल हे निश्चित आहे. जर तू खूप प्रामाणिक असल्याचा दावा करत असशील आणि तरीही सत्यानुसार वागू शकत नसशील किंवा सत्यवचन बोलू शकत नसशील, तर देव तुला प्रतिफळ देईल याची तू अजूनही वाट पाहत आहेस का? देव तुला त्याचा लाडका मानेल अशी तुझी अजूनही आशा आहे का? असा विचार हास्यास्पद नाही का? तू सर्व गोष्टींमध्ये देवाची फसवणूक करतोस; हात अशुद्ध असलेल्या तुझ्यासारख्या मनुष्याला देवाचे घर कसे सामावून घेऊ शकेल?

तिसरी गोष्ट जी मला तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे ती म्हणजे: प्रत्येक व्यक्तीने, देवावर विश्वास ठेवून जीवन जगत असताना, देवाला विरोध करणाऱ्या आणि फसवणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. काही गैरकृत्ये गुन्हा म्हणून नोंदण्याची गरज नाही, परंतु काही अक्षम्य आहेत; कारण प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी आणि ज्यामुळे देवाची प्रवृत्ती दुखावते अशी अनेक कृत्ये आहेत. स्वतःच्या नशिबाची चिंता असणारे बरेच जण विचारू शकतात की ही कृत्ये काय आहेत. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की तुम्ही स्वभावाने मगरूर आणि गर्विष्ठ आहात व वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार नाही. या कारणास्तव, तुम्ही स्वतःवर विचार केल्यानंतर मी तुम्हाला हळूहळू सांगेन. मी तुम्हाला प्रशासकीय आदेशांच्या मजकुराची अधिक चांगली माहिती घेण्यास आणि देवाची प्रवृत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सांगत आहे. तसे न केल्यास, तुमचे ओठ बंद ठेवणे तुम्हाला कठीण जाईल, तुमच्या जिभा वळवळून मोठ्या आवाजात काहीही बोलतील व तुम्ही नकळतपणे देवाच्या प्रवृत्तीला दुखावाल आणि पवित्र आत्म्याचे व प्रकाशाचे अस्तित्व गमावून अंधारात पडाल. तुमच्या कृती तत्त्वशून्य आहेत, जे करू नये ते तू करतोस आणि बोलतोस, त्यामुळे तुला योग्य प्रतिशोध मिळेल. तू हे जाणले पाहिजेस, की तुझे कथन आणि कृती तत्त्वशून्य असल्या तरीही, देव या दोघांमध्येही अत्यंत तत्त्वनिष्ठ आहे. तुला प्रतिशोध मिळण्‍याचे कारण म्हणजे तू देवाला नाराज केले आहेस, एखाद्या व्‍यक्‍तीला नाही. जर तुझ्या आयुष्यात तू देवाच्या प्रवृत्तीविरुद्ध अनेक अपराध केलेस तर तू नरकाचा संतान होशील. मनुष्याला असे वाटू शकते, की तू फक्त काही कृत्ये केली आहेस जी सत्याशी विसंगत आहेत आणि त्यापेक्षा फार काही नाही. तथापि, तुला याची जाणीव आहे का की देवाच्या नजरेत तू आधीच असा आहेस ज्याच्यासाठी आणखी कोणतेही पापार्पण नाही? कारण तू देवाच्या प्रशासकीय आदेशांचे एकापेक्षा जास्त वेळा उल्लंघन केले आहेस आणि शिवाय, पश्चात्तापाचे कोणतेही संकेत दाखवले नाहीस, तुझ्यासाठी नरकात जाण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, जेथे देव मनुष्याला शिक्षा करतो. देवाचे अनुसरण करत असताना, काही मोजक्या लोकांनी तत्त्वांचे उल्लंघन करणारी काही कृत्ये केली, परंतु त्यांच्याशी बोलल्यानंतर आणि त्यांना मार्गदर्शन मिळाल्यानंतर, हळूहळू त्यांना स्वतःचा भ्रष्टाचार दिसला, त्यानंतर ते वास्तविकतेच्या योग्य मार्गावर आले व ते आजही सुस्थितीत आहेत. असे लोक ते आहेत जे शेवटी राहतील. तरीसुद्धा, मी प्रामाणिक व्यक्तीचा शोध घेत आहे; जर तू प्रामाणिक व्यक्ती असशील आणि तत्त्वानुसार वागणारा असशील तर तू देवावर विश्वास ठेवणारा असू शकता. जर तुझ्या कृतीतून तू देवाच्या प्रवृत्तीला दुखावत नसशील आणि देवाच्या इच्छेचा पाठपुरावा करत असशील व तुझ्याकडे देवाप्रती आदरयुक्त अंतःकरण असेल, तर तुझा विश्वास सुयोग्य आहे. जो कोणी देवाचा आदर करत नाही आणि ज्याच्याकडे भीतीने थरथर कापणारे अंतःकरण नाही तो देवाच्या प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करू शकतो. अनेकजण त्यांच्या उत्कटतेच्या बळावर देवाची सेवा करतात परंतु त्यांना देवाच्या प्रशासकीय आदेशांची समज नसते, त्याच्या वचनांच्या परिणामांची पुसटशी कल्पना त्याहूनही कमी असते. आणि म्हणून, त्यांच्या चांगल्या हेतूने, ते अनेकदा देवाच्या व्यवस्थापनात अडथळा आणणाऱ्या गोष्टी करतात. गंभीर प्रकरणांमध्ये, त्यांना बाहेर फेकले जाते, त्याचे अनुसरण करण्याच्या कोणत्याही संधीपासून वंचित ठेवले जाते व त्यांना नरकात टाकले जाते, देवाच्या घराशी त्यांचे सर्व संबंध संपुष्टात आणले जातात. हे लोक त्यांच्या अज्ञानी चांगल्या हेतूंच्या बळावर देवाच्या घरात काम करतात आणि शेवटी ते देवाच्या प्रवृत्तीला रागवावयास लावतात. अधिकारी व प्रभू यांची सेवा करण्याच्या पद्धती लोक देवाच्या घरी आणतात व त्या येथे सहजासहजी लागू करता येतील असा व्यर्थ विचार करून त्यांचे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. देवाची प्रवृत्ती कोकरूसारखी नसून सिंहासारखी आहे अशी कल्पना ते कधीच करत नाहीत. म्हणून, जे प्रथमच देवाशी संबंध ठेवतात ते त्याच्याशी संवाद साधू शकत नाहीत, कारण देवाचे हृदय मनुष्याच्या हृदयापेक्षा वेगळे आहे. अनेक सत्ये समजून घेतल्यावरच तू सतत देवाला ओळखू शकतोस. हे ज्ञान वचने आणि सिद्धांतांनी बनलेले नाही परंतु तू देवावर दृढ विश्वास ठेवण्याचे माध्यम व तो तुझ्यामध्ये आनंदी आहे याचा पुरावा म्हणून ते खजिना म्हणून वापरले जाऊ शकते. जर तुझ्याकडे ज्ञानाची वास्तविकता नसेल आणि तू सत्याने सुसज्ज नसशील, तर तुझी उत्कट सेवा तुझ्यावर देवाची नाराजी व तिरस्कारच आणू शकते. आत्तापर्यंत तुला हे समजले असेल, की देवावरील विश्वास हा केवळ धर्मशास्त्राचा अभ्यास नाही!

जरी मी तुम्हाला ज्या वचनांद्वारे सल्ला देतो ते थोडक्यात असले तरी, मी जे वर्णन केले आहे ते तुमच्यामध्ये सर्वात कमी आहे. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे, की मी आता जे काही बोलत आहे ते मनुष्यामधील माझ्या अंतिम कार्यासाठी, मनुष्याचा अंत निश्चित करण्यासाठी आहे. मला कोणतेही उद्दिष्ट नसलेले जास्त कार्य करण्याची इच्छा नाही किंवा जे कुजलेल्या लाकडासारखे हताश आहेत अशा लोकांना मार्गदर्शन करत राहण्याची माझी इच्छा नाही, जे गुप्तपणे वाईट हेतू ठेवतात त्यांचे नेतृत्व करत राहण्याची माझी इच्छा नाही. कदाचित एके दिवशी तुम्हाला माझ्या वचनांमागील प्रामाणिक हेतू आणि मी मानवजातीसाठी केलेले योगदान समजेल. कदाचित एके दिवशी तुम्हाला तो संदेश समजेल जो तुम्हाला तुमचा स्वतःचा शेवट ठरवण्यास सक्षम करेल.

मागील:  गंतव्यस्थानी

पुढील:  अपराध मनुष्याला नरकात घेऊन जातील

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

कृपया शोधावयाचा शब्द शोध बॉक्समध्ये प्रविष्ट करा.

Connect with us on Messenger
अनुक्रमणिका
सेटिंग्ज
पुस्तके
शोधा