धार्मिक सेवांचे शुद्धीकरण आवश्यक आहे

संपूर्ण विश्वात त्याच्या कार्याला सुरुवात करताना देवाने अनेक लोकांना स्वतःची सेवा करण्यासाठी पूर्वनिश्चित केलेले आहे, त्यामध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. त्याची इच्छा पूर्ण करणे आणि पृथ्वीवरील त्याचे कार्य सहजतेने पूर्ण करणे, हा त्याचा उद्देश आहे; स्वतःची सेवा करण्यासाठी त्या लोकांना निवडण्यामागे देवाचे हेच ध्येय आहे. देवाची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याची इच्छा समजून घेतलीच पाहिजे. त्याच्या या कार्यामुळे देवाचे शहाणपण, त्याची सर्वशक्तिमानता आणि पृथ्वीवरील त्याच्या कार्यामागची तत्त्वे लोकांना अधिक स्पष्टपणे कळतात. देव पृथ्वीवर त्याचे कार्य करण्यासाठी, इथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्यक्षात आला आहे, जेणेकरून त्यांना त्याचे ईश्वरी कार्य अधिक स्पष्टपणे कळू शकेल. आज तुम्हा लोकांच्या या समूहाला प्रत्यक्षातल्या देवाची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. तुमच्यासाठी हा एक गणती होऊ शकत नाही असा अमाप आशीर्वादच आहे—खरोखर, देवानेच तुमचे संगोपन केले आहे. त्याची सेवा करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करताना देव नेहमीच स्वतःची तत्वे वापरत असतो. देवाची सेवा करण्याला केवळ उत्साहाची गरज आहे असे लोकांना वाटत असते, मात्र तसे अजिबातच नाही. आज, तुम्ही पाहत आहात, की लोक देवाची सेवा करतात कारण त्यांना त्याचे मार्गदर्शन मिळते, हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे आणि यात सहभागी झालेले लोक सत्याची कास धरणारे आहेत. देवाची सेवा करणाऱ्या सर्वांसाठी या किमान अटी आहेत.

देवाची सेवा करणे हे सोपे काम नाही. ज्यांची भ्रष्ट प्रवृत्ती कधीही बदलत नाही, ते कधीच देवाची सेवा करू शकत नाहीत. जर देवाच्या वचनांनी तुझ्या प्रवृत्तीचा न्याय आणि ताडण केले नसेल तर तुझी प्रवृत्ती अजूनही सैतानाचेच काम करत आहे. त्यावरून असे सिद्ध होते, की तू स्वतःच्या चांगल्या हेतूने देवाची सेवा करतोस, मात्र तुझी सेवा तुझ्या सैतानी स्वभावावर आधारित आहे. तू तुझ्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे आणि तुझ्या वैयक्तिक प्राथमिकतेनुसार देवाची सेवा करतोस. इतकेच काय, तू ज्या गोष्टी करायला तयार आहेस त्याच देवाला आनंद देणाऱ्या आहेत आणि ज्या गोष्टी करण्याची तुझी इच्छा नाही, त्या देवाला तिरस्करणीय आहेत, असे तुला नेहमीच वाटत असते; तू पूर्णपणे तुझ्या स्वतःच्या प्राथमिकतेनुसार हे काम करतोस. याला देवाची सेवा म्हणता येईल का? अखेर, यामुळे तुझ्या जीवनाच्या प्रवृत्तीत थोडासाही बदल होणार नाही. त्याऐवजी, तुझी अशी सेवा तुला आणखी हट्टी बनवेल, भ्रष्ट प्रवृत्ती तुझ्यात आणखी खोलवर रुजवेल आणि अशा प्रकारे, तुझ्यामध्ये देवाच्या सेवेच्या नव्या रुढी तयार होतील. त्या प्रामुख्याने तुझ्या प्रवृत्तीवर आणि तुझ्या आवडीनुसार केलेल्या सेवेतून मिळणाऱ्या अनुभवांवर आधारित असतील. हे मनुष्याला मिळालेले अनुभव आणि धडे आहेत. हे मनुष्याचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. अशा लोकांची परुशी आणि अधिकारी धार्मिक व्यक्ती म्हणूनच गणना केली जाऊ शकते. जर ते कधीही जागृत झाले नाहीत आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचा पश्चात्ताप झाला नाही, तर निश्चितच ते खोटे ख्रिस्त आणि लोकांना शेवटच्या दिवसांमध्ये फसवणारे ख्रिस्तविरोधी होतील. अशा लोकांमधून, ज्यांच्याविषयी आधी सांगितले आहे असे फसवे ख्रिस्त आणि ख्रिस्तविरोधी निर्माण होतील. देवाची सेवा करणाऱ्या लोकांनी केवळ स्वतःच्या मनाचे ऐकले आणि स्वतःच्या इच्छेनुसारच वर्तन केले, तर त्यांना कधीही वाळीत टाकले जाण्याचा धोका असतो. जे लोक देवाची सेवा करण्याच्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचा उपयोग इतरांची मने जिंकण्यासाठी, त्यांना प्रवचने देण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्वतः उच्च स्थानी जाण्यासाठी करतात—आणि जे कधीही पश्चात्ताप करत नाहीत, कधीही त्यांच्या पापांची कबुली देत नाहीत, त्यांच्या उच्च स्थानाचे फायदे कधीही सोडत नाहीत, असे लोक देवासमोर अगदी रसातळाला जा खालीच पडतील. ते पौलासारखेच आहेत. ते स्वतःचे श्रेष्ठत्व गृहीत धरतात आणि त्यांच्या उच्च पात्रतेचे अनाठायी प्रदर्शन करतात. देव अशा लोकांना परिपूर्ण करणार नाही. अशा सदोष सेवेमुळे देवाच्या कार्यात व्यत्यय येत असतो. लोक नेहमी जुन्या गोष्टींना चिकटून राहतात. ते भूतकाळातील कल्पनांना, मागे पडलेल्या काळातील सर्व गोष्टींना चिकटून राहतात. त्यांच्या सेवेत असणारा हा मोठा अडथळा आहे. तू या गोष्टी सोडून देऊ शकला नाहीस, तर त्या आयुष्यभर तुझ्या मानगुटीवर बसतील. देव तुझी प्रशंसा करणार नाही, तो अगदी किंचितही प्रशंसा करणार नाही. जरी तू अगदी देवाची सेवा करता करता पाय तुटेपर्यंत धावलास किंवा अगदी कंबरडे मोडलेस आणि प्राण सोडलेस तरीही नाही. त्या उलट तो म्हणेल, की तूच पापीच आहेस.

आजपासून, ज्यांच्या स्वतःच्या कोणत्याही धार्मिक कल्पना नाहीत, जे त्यांचे जुने स्वार्थ बाजूला ठेवण्यास तयार आहेत आणि जे साध्या मनाने देवाची आज्ञा पाळतात, त्यांना देव औपचारिकरीत्या परिपूर्ण करेल. ज्यांना देवाच्या वचनांची ओढ असते त्यांना तो परिपूर्ण करेल. या लोकांनी पुढे होऊन देवाची सेवा करावी. देवामध्ये अमर्याद विपुलता आणि अमर्याद ज्ञान आहे. सध्यापेक्षाही जास्त लोकांनी त्यांचा आनंद लुटावा याची प्रतीक्षा त्याचे हे अनोखे कार्य आणि मौल्यवान वचने करीत आहेत. ज्यांच्या धार्मिक धारणा पक्क्या झाल्या आहेत, जे स्वतःचे श्रेष्ठत्व गृहीत धरतात आणि स्वतःला बाजूला ठेवू शकत नाहीत, त्यांना या नवीन गोष्टी स्वीकारणे कठीण जाते असे दिसून येते. या लोकांना परिपूर्ण करण्याची संधी पवित्र आत्म्याला मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीने आज्ञा पाळण्याचा निश्चय केलेला नसेल आणि त्याला देवाच्या वचनांची आस लागली नसेल, तर या नवीन गोष्टी स्वीकारण्याचे कोणतेही साधन त्याच्याकडे नाही; ते फक्त अधिकाधिक बंडखोर होतील, अधिकाधिक धूर्त होतील आणि अशा प्रकारे चुकीच्या मार्गावर जातील. त्यामुळे मग त्याचे कार्य करत असताना देव त्याच्यावर खरेखुरे प्रेम करणारे आणि नवीन दिव्य प्रकाश स्वीकारू शकणारे आणखी लोक उभे करेल. जे धार्मिक उच्चपदावरील अधिकारी स्वतःच्या श्रेष्ठत्वावर विसंबून राहतात, त्यांना तो पूर्णपणे बाजूला करेल; बदलाला हट्टाने विरोध करणाऱ्यांपैकी एकही जण त्याला नको आहे. तुला अशा लोकांपैकी एक व्हायचे आहे का? तू देऊ करत असलेली सेवा स्वतःच्या आवडीनुसार करतोस की देवाला काय हवे आहे त्यानुसार? तू स्वतःसाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे. तू एक धार्मिक अधिकारी व्यक्ती आहेस, की देवाने परिपूर्ण केलेले असे नवजात बालक आहेस? तुझ्या सेवेची पवित्र आत्म्याने किती प्रशंसा केली आहे? देव त्यातले किती लक्षात ठेवायची तसदी तरी घेणार आहे? तुझ्या एवढ्या वर्षांच्या सेवेमुळे तुझ्या जीवनात किती मोठा बदल झालेला आहे? हे सगळे तुला स्पष्ट झालेले आहे का? तू जर खरोखर श्रद्धाळू असशील, तर तुझ्या पूर्वीच्या धार्मिक धारणा बाजूला टाकशील आणि नवीन मार्गाने देवाची अधिक चांगली सेवा करशील. अजूनही जागे व्हायला उशीर झालेला नाही. जुन्या धार्मिक धारणा एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य वाया घालवू शकतात. एखाद्या व्यक्तीला मिळालेला असा अनुभव त्यांना देवापासून दूर घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्या स्वतःच्या मार्गाने गोष्टी पार पाडायला लावू शकतो. जर तू अशा गोष्टी स्वतःपासून बाजूला सारल्या नाहीत, तर त्या तुझ्या आयुष्याच्या प्रगतीतले अडथळे बनतील. जे देवाची सेवा करतात, त्यांना देव नेहमी परिपूर्ण करतो आणि त्यांना सहजासहजी दूर सारत नाही. जर देवाच्या वचनांमधला न्याय आणि ताडण यांचा तू खरोखरच स्वीकार केलास, स्वतःच्या जुन्या धार्मिक प्रथा आणि नियम बाजूला ठेवू शकलास आणि जुन्या धार्मिक धारणांचा वापर करून देवाच्या आजच्या बोलण्याची समीक्षा करणे थांबवू शकलास, तरच तुझे भविष्य घडेल. परंतु जर तू जुन्याच गोष्टींना चिकटून राहिलास, त्यांचेच जतन करीत राहिलास, तर तुला वाचवता येऊ शकण्याचा कोणताही मार्ग नाही. देव अशा लोकांची दखल घेत नाही. तुला खरोखरच परिपूर्ण व्हायचे असेल, तर तू आधीपासूनचे सर्व काही पूर्णपणे सोडून देण्याचा निश्चय केला पाहिजे. आधी केलेले जरी बरोबर वाटत असेल, जरी ते देवाचे कार्य असेल, तरीही आता ते बाजूला ठेवणे आणि त्याला चिकटून न राहाणे, तुला जमले पाहिजे. जरी ते उघड उघड पवित्र आत्म्याचे कार्य असले, ते थेट पवित्र आत्म्याने केले असले, तरी आज तू ते बाजूला ठेवले पाहिजे. तू ते धरून ठेवू नयेस. देवाला हेच हवे आहे. सर्वांचे नवे स्वरुप निर्माण होणे आवश्यक आहे. देवाच्या कार्यात, देवाच्या वचनांमध्ये, तो जुन्या, पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टींचा संदर्भ देत नाही, तो जुन्या ग्रंथांतून काही खोदून काढत नाही; देव नेहमी नित्य नूतन असतो. तो कधीही जुना नसतो आणि भूतकाळातील स्वतःच्या वचनांदेखील तो धरून राहात नाही. यावरून देव कोणत्याही नियमांचे पालन करत नाही असे दिसते. म्हणून तर खुद्द देवच पूर्वीच्या साधनांचा वापर करून कार्य करत नसेल, तर एक मनुष्य म्हणून तू सतत भूतकाळातील गोष्टींना चिकटून राहिलास, त्या सोडून दिल्या नाहीस आणि कठोरपणे सुत्रबद्धपद्धतीने त्यांना लागू केलेस तर मग तुझे शब्द आणि कृती विध्वंसक होणार नाहीत का? तू देवाचा शत्रू झाला नाहीस का? अशा जुन्या गोष्टींमुळे तुझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होणे तुला मान्य आहे का? या जुन्या गोष्टींना चिकटून राहिल्यामुळे तू देवाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्यांपैकी कोणी एक होशील. तुला अशी व्यक्ती व्हायचे आहे का? जर तुला खरोखरच ते नको असेल, तर आता जे करत आहेस ते त्वरित थांबव आणि मागे फिर. पुन्हा पहिल्यापासून सर्व काही सुरू कर. देव तुझी पूर्वीची सेवा लक्षात ठेवणार नाही.

मागील:  भ्रष्ट झालेल्या मानवात देवाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता नसते

पुढील:  आपल्या देवावरील श्रद्धेनुसार देवाची आज्ञा पाळावी

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger