भ्रष्ट झालेल्या मानवात देवाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता नसते

मनुष्य कायम अंधाराच्या प्रभावाखाली जगत आलेला आहे. तो कायम सैतानाच्या प्रभावाच्या गुलामगिरीत अडकलेला आहे. तो त्यातून सुटका करून घेऊ शकलेला नाही आणि सैतानाने वापर करून घेतल्यामुळे त्याची प्रवृत्ती अधिकाधिक भ्रष्ट होत जाते आहे. मनुष्य नेहमी आपल्या भ्रष्ट सैतानी स्वभावानुसार वागत राहिलेला आहे आणि देवावर खरेखुरे प्रेम करण्यास तो असमर्थ असतो, असे म्हणता येऊ शकेल. असे असल्याने, जर मनुष्याला देवावर प्रेम करायचे असेल, तर आपल्या सदाचाराच्या कल्पना, स्वतःचे महत्त्व, उद्धटपणा, अहंकार यासारख्या सर्व सैतानी प्रवृत्तीच्या गोष्टी त्याच्यातून काढून टाकल्या पाहिजेत. तसे नसल्यास, त्याचे प्रेम हे अशुद्ध प्रेम राहील, ते सैतानी प्रेम असेल आणि त्याला ईश्वराची मान्यता कधीही मिळू शकणार नाही. परिपूर्ण झाल्याशिवाय, देवाला सामोरे गेल्याशिवाय, विदीर्ण झाल्याशिवाय, नकोश्या गोष्टी छाटल्या गेल्याशिवाय, स्वत:ला शिस्त लावल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय आणि पवित्र आत्म्याने शुद्ध केल्याशिवाय कोणीही देवावर खरेखुरे प्रेम करू शकत नाही. आपल्या स्वभावाचा एक भाग ईश्वराचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे आपण देवावर खरेखुरे प्रेम करण्यास सक्षम आहोत असे जर तुम्ही म्हणत असाल, तर तुमचे हे बोलणे गर्विष्ठपणाचे असून तुममचे वागणे विसंगतपूर्ण आहे. असे लोक श्रेष्ठ देवदूत आहेत! मनुष्याचा जन्मजात स्वभाव देवाचे थेट प्रतिनिधित्व करण्यास अक्षम आहे; त्याने ईश्वराच्य्या परिपूर्णतेला अंगीकारून स्वतःचा जन्मजात स्वभाव टाकून दिला पाहिजे आणि तेव्हाच—म्हणजे ज्यावेळी केवळ देवाच्या इच्छेची काळजी घेऊन, देवाच्या हेतूंची पूर्तता करून आणि शिवाय पवित्र आत्म्याचे कार्य करून—माणूस जे जगेल, तेच देवाला मंजूर होऊ शकते. मानवी देहात राहणारा कोणीही देवाचे थेट प्रतिनिधित्व करू शकत नाही, जोपर्यंत पवित्र आत्मा त्याला नियंत्रित करत नाही तोवर हे शक्य नाही. तथापि, अशाव्यक्तीसाठी देखील, तिचा स्वभाव आणि ते व्यक्ती जे जगते ते पूर्णपणे देवाचे प्रतिनिधित्व करत असते असे म्हणता येणार नाही. ती व्यक्ती जे जगत आहे, ते पवित्र आत्म्याने निर्देशित केल्यानुसार जगते आहे, असेच केवळ म्हणता येईल. अशा स्वभावाचा माणूस देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही.

जरी मनुष्याचा स्वभाव देवाने नियोजित केलेला असला—ही बाब निःसंदिग्ध असून तिला सकारात्मक मानता येऊ शकेल—तरीही त्यावर सैतानाने त्याची प्रक्रिया केलेली आहे आणि म्हणूनच मनुष्याचा संपूर्ण स्वभाव हा सैतानाचा स्वभाव आहे. काही लोक म्हणतात की, देवाचा स्वभाव म्हणजे कार्य करताना सरळसोटपणे वागणे, आणि हे त्यांच्यात देखील प्रकट होते की, त्यांचे चरित्र देखील असेच आहे. म्हणूनच त्यांचा स्वभाव ईश्वराचे प्रतिनिधित्व करतो असे ते म्हणतात. हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत? भ्रष्ट सैतानी स्वभाव देवाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे का? आपला स्वभाव देवाचे प्रतिनिधित्व करतो, असा दावा जो कोणी जाहीरपणे करत असतो, तो देवाची निंदा करतो आणि पवित्र आत्म्याचा अपमान करतो! पवित्र आत्मा ज्या पद्धतीने कार्य करतो त्यावरून पृथ्वीवरील देवाचे कार्य केवळ विजयप्राप्तीसाठीचे कार्य आहे असे दिसून येते. अशा प्रकारे, मनुष्याच्या अनेक भ्रष्ट सैतानी प्रवृत्तींना अद्याप शुद्ध करणे बाकी आहे. मनुष्य जे जगतो ते अजूनही सैतानाचे स्वरूप आहे. मनुष्य ते चांगले आहे असे मानतो आणि ते मनुष्यदेहाच्या कृत्यांचे प्रतिनिधित्व करत असते; ते अधिक स्पष्टपणे सांगायचे तर सैतानाचेच प्रतिनिधित्व करते आणि देवाचे प्रतिनिधित्व करूच शकत नाही. पृथ्वीवर स्वर्गीय जीवनाचा आनंद घेता येईल इतकी एखादी एखादी व्यक्ती ईश्वरावर आधीपासूनच प्रेम करत असली: “हे देवा! मी तुमच्यावर पुरेसे प्रेम करू शकत नाही,” असे जरी ती म्हणत असली आणि सर्वोच्च शिखरावर पोहोचली असली, तरीही ती देवासारखे राहते किंवा परमेश्वराचे चे प्रतिनिधित्व करते असे म्हणता येणार नाही. कारण मनुष्याच्या आतील मूलतत्व देवापेक्षा वेगळे आहे. माणूस कधीही देवासारखा जगूच शकत नाही, मग देवत्वाला पोहोचणे तर दूरच. देवाने मनुष्याकडून जी अपेक्षा केली आहे, केवळ त्यानुसारच माणसाने जगावे असे पवित्र आत्म्याने मनुष्याला सांगितले आहे.

सैतानाच्या सर्व कृती आणि कृत्ये मनुष्यामध्ये प्रकट होत असतात. आज, मनुष्याच्या सर्व कृती आणि कृत्ये जणू सैतानाच्या अभिव्यक्तीच आहेत आणि म्हणूनच तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. मनुष्य हा सैतानाचा मूर्त अवतार आहे आणि त्यामुळे मनुष्याचा स्वभाव देवाच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ आहे. काही लोक चांगल्या चारित्र्याचे असतात; अशा लोकांच्या चारित्र्याद्वारे देव काही कार्य करू शकतो. जे कार्य करतात ते पवित्र आत्म्याद्वारे निर्देशित केलेले असते. तरीही त्यांचा स्वभाव देवाचे प्रतिनिधित्व करण्यास असमर्थ आहे. देव त्यांच्याकडून जे कार्य करवतो, ते त्यांच्यात मुळातच अस्तित्वात असलेल्या गुणांचा वापर करून घेऊन कार्य करणे आणि त्याचा विस्तार करणे यापेक्षा अधिक नाही. भूतकाळातील प्रेषित असोत किंवा देवाचा संदेश घेऊन आलेले प्रेषित असोत, त्याचे थेट प्रतिनिधित्व कोणीही करू शकत नाही. लोक केवळ परिस्थितीच्या दबावाखालीच देवावर प्रेम करतात आणि स्वतःच्या इच्छेने कोणीही ईश्वरी कार्यात सहयोग देण्याची आस धरत नाही. सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत? जे काही थेट देवाकडून येते, ते सकारात्मक असते; मात्र मनुष्याच्या स्वभावात सैतानाने ढवळाढवळ केली आहे आणि म्हणून तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. प्रेम, दु:ख सहन करण्याची इच्छा, नीतिमत्ता, अधीनता, नम्रता आणि त्यात दडून राहिलेला देवाचा अंश हेच केवळ थेट देवाचे प्रतिनिधित्व करतात. याचे कारण, मानव अस्तित्वात आला तेव्हा त्याचा स्वभाव पापी नव्हता आणि सैतानाने कोणतीही ढवळाढवळ करण्याआधीच तो थेट देवाकडून अस्तित्वात आला. येशू केवळ पापी देहासारख्या रूपात आहे आणि तो खचितच पापाचे प्रतिनिधित्व करत नाही, म्हणून, सुळावर चढण्यापूर्वी (अगदी त्याच्या सुळावर जाण्याच्या क्षणासह) त्याचे जीवितकार्य पूर्ण होण्याआधीपर्यंतच्या त्याच्या सर्व कृती, कृत्ये आणि शब्द हे सर्व थेट देवाचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. पापी स्वभाव असलेला कोणीही देवाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही हे येशूच्या उदाहरणावरून पुरेसे सिद्ध होते, आणि मनुष्याचे पाप सैतानाचे प्रतिनिधित्व करत असते हे दिसते. याचाच अर्थ असा की, पाप हे देवाचे प्रतिनिधित्व करत नाही. देव पापरहित आहे. पवित्र आत्म्याने मनुष्यामध्ये केलेले कार्य देखील केवळ पवित्र आत्म्याद्वारे निर्देशित केले गेले आहे असे मानता येऊ शकते. ते मनुष्याने देवाच्या वतीने केले आहे असे थेटपणे म्हणता येणार नाही. परंतु, माणसाविषयी बोलायचे तर त्याचे पाप किंवा त्याचा स्वभाव देवाचे प्रतिनिधित्व करत नाही. भूतकाळापासून आजपर्यंत पवित्र आत्म्याने मनुष्यावर केलेले कार्य पाहिल्यास असे दिसते की, पवित्र आत्म्याने ते कार्य केल्यानेच त्यावरच मनुष्य सर्वथा जगत असतो. पवित्र आत्म्याचा प्रभाव पडल्यावर आणि त्याने शिस्त लावल्यानंतर फार थोडे लोक सत्याचे अधिष्ठान असलेले जीवन जगू शकतात. म्हणजे केवळ पवित्र आत्म्याचे कार्य अस्तित्वात राहते आणि मानवाचे त्यामध्ये सहयोग असल्याचे दिसत नाही. आता हे तुम्हाला स्पष्टपणे कळले आहे का? मग असे असताना, पवित्र आत्मा कार्य करत असेल, तेव्हा तुम्ही त्याला सहयोग देण्यासाठी आणि तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारे पराकोटीचे प्रयत्न करू शकाल?

मागील:  विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कसा असावा

पुढील:  धार्मिक सेवांचे शुद्धीकरण आवश्यक आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger