नवीन युगातील आज्ञा
देवाच्या कार्याचा अनुभव घेताना, तुम्ही देवाची वचने काळजीपूर्वक वाचली पाहिजेत आणि सत्य जाणून घेऊन स्वतःला सज्ज केले पाहिजे. परंतु तुम्हाला जे काही करायचे आहे किंवा ते कशा प्रकारे करायचे आहे याबाबत तुम्ही मनापासून प्रार्थना अथवा विनवणी करण्याची गरज नाही व खरे तर या गोष्टी निरुपयोगी आहेत. तरीही, आता या काळात, तुमच्यापुढे असलेल्या समस्या म्हणजे, तुम्हाला देवाच्या कार्याचा अनुभव कसा घ्यायचा हे माहीत नाही आणि तुमच्यामध्ये खूप निष्क्रियता आहे. तुम्हाला बरेच सिद्धांत माहीत आहेत, पण तुमच्याकडे पुरेशी वास्तविकता नाही. हे चुकीचे संकेत नव्हे का? या तुमच्या समूहात खूपच चुकीचे असे काही दिसत आहे. आज तुम्ही “सेवेकरी” म्हणून असे प्रयत्न करण्यास असमर्थ आहात व अशा प्रकारचे अन्य प्रयत्न करण्याबाबत किंवा त्यांचा विचार करण्याबाबत तसेच देवाच्या वचनांनुसार सुधारणा करण्यास असमर्थ आहात. तुम्ही प्रत्यक्षात आचरणात आणण्यायोग्य अनेक गोष्टी टिकवून धरल्या पाहिजेत. याचा अर्थ असा, की लोकांनी त्यांच्या कर्तव्यांना चिकटून रहायला पाहिजे, लोकांनी याच गोष्टी धरून चालायला पाहिजे आणि त्यांनी त्याच केल्या पाहिजेत. पवित्र आत्म्याने जे करायला हवे ते त्याला करू द्या; मनुष्य त्यात बिलकुल भाग घेऊ शकत नाही. मनुष्याने जे केले पाहिजे, तेच त्याने धरून चालले पाहिजे, त्याचा पवित्र आत्म्याशी काहीही संबंध नाही. ते दुसरे तिसरे काहीही नसून मनुष्याने जे केलेच पाहिजे असे कर्तव्य आहे व जुन्या करारातील नियमांचा जसा अंगिकार केला जातो, त्याचप्रमाणे आज्ञा समजून त्याचा अंगिकार केला पाहिजे. आता जरी नियमशास्त्राचे युग नसले तरी अजूनही, अशी अनेक वचने आहेत, की जी नियमशास्त्राच्या युगात उच्चारलेल्या वचनांप्रमाणेच आहेत. केवळ पवित्र आत्म्याच्या स्पर्शावर अवलंबून ही वचने प्रत्यक्षात आणली जात नाहीत. उलट, ती अशी गोष्ट आहे, जिला मनुष्याने धरून चालले पाहिजे. उदाहरणार्थ:
तुम्ही व्यावहारिक देवाच्या कार्यावर अभिप्राय देऊ नये.
तुम्ही देवाने साक्ष दिलेल्या मनुष्याला विरोध करू नये.
देवासमोर तुम्ही तुमच्या स्थानी राहिले पाहिजे आणि दुराचारी बनू नये.
तुमचे बोलणे मवाळ असावे व तुमच्या कृती आणि वचने ही देवाने साक्ष दिलेल्या मनुष्याच्या व्यवस्थेला अनुसरून राहिली पाहिजेत.
तुम्ही देवाच्या साक्षीचा मान राखला पाहिजे. तुम्ही देवाचे कार्य व त्याच्या मुखातून निघणार्या वचनांकडे दुर्लक्ष करू नये.
देवाच्या वचनांचा सूर आणि उद्दिष्टांची बतावणी करू नये.
बाह्यतः, देवाने साक्ष दिलेल्या मनुष्याला स्पष्टपणे विरोध होईल असे काहीही करू नये, इत्यादि.
प्रत्येक व्यक्तीने याच गोष्टींना धरून राहिले पाहिजे. प्रत्येक युगात देव काही नियम ठरवतो जे नियमशास्त्रांप्रमाणेच असतात व मनुष्याने त्यांचे पालन केले पाहिजे. याद्वारे तो मनुष्याच्या प्रवृत्तीला प्रतिबंधित करतो आणि त्याची सचोटी जोखत असतो. उदाहरणार्थ, जुन्या कराराच्या युगातील “तुमचे वडील व आई यांचा आदर राखा” हे वचन पहा. आज ही वचने लागू होत नाहीत; त्या काळात त्यांनी केवळ मनुष्याच्या काही बाह्य प्रवृत्तींना आवर घातला होता, मनुष्याच्या देवावरील विश्वासातील खरेपणा दाखवण्यासाठी त्या वचनांचा वापर करण्यात आला आणि ज्यांचा देवावर विश्वास होता त्यांचे ते लक्षण होते. सध्या जरी राज्याचे युग असले, तरी अजूनही असे नियम आहेत जे मनुष्याने पाळले पाहिजेत. भूतकाळातील नियम आता लागू पडत नाहीत व आज अनेक सुयोग्य कृती आहेत ज्या मनुष्य करू शकतो आणि ज्या आवश्यक आहेत. त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या कार्याचा संबंध नसतो व ज्या मनुष्यानेच करणे गरजेचे असते.
कृपेच्या युगात, नियमशास्त्राच्या युगातील अनेक पद्धतींचा त्याग करण्यात आला कारण ही नियमशास्त्रे त्या काळातील कार्यासाठी विशेष प्रभावी नव्हती. त्यांचा त्याग केल्यानंतर अनेक पद्धती अमलात आल्या ज्या त्या युगासाठी योग्य होत्या आणि त्यातून आजचे अनेक नियम तयार झाले आहेत. जेव्हा आजचा देव अवतरला, तेव्हा हे नियम सोडून देण्यात आले, आता त्यांचे पालन करणे आवश्यक राहिले नाही व आजच्या कार्यासाठी योग्य अशा अनेक पद्धती सुस्थापित केल्या गेल्या. आज, या पद्धती म्हणजे नियम नाहीत, त्याउलट त्यांचा उद्देश परिणाम साधणे हा आहे; आज ते योग्य असतील— उद्या कदाचित ते नियमही होतील. थोडक्यात, तू आजच्या कार्यासाठी फलदायी असेल तेच धरून ठेवावे. उद्याकडे लक्ष देऊ नको: आज जे काही केले आहे ते आजच्यासाठीच आहे. कदाचित उद्याचा दिवस उगवेल, तेव्हा तुला अधिक चांगल्या गोष्टी कराव्या लागतील—पण त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नको. उलट देवाला विरोध करणे टाळण्यासाठी आज ज्यांचे पालन करायचे आहे, त्यांना धरून ठेव. आज खालील गोष्टींपेक्षा इतर कशाचेही पालन करणे मनुष्यासाठी अधिक महत्त्वाचे नाही:
तुझ्यासमोर उभ्या असलेल्या देवाला भुलवण्याचा किंवा त्याच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नको.
तुझ्यासमोर असलेल्या देवापुढे ओंगळ किंवा उद्धट असे काही बोलू नको.
तुझ्या डोळ्यासमोर असलेल्या देवाचा विश्वास संपादन करण्यासाठी मधाळ शब्द बोलून आणि छान भाषणातून त्याला फसवू नको.
देवासमोर अनादराने वागू नको. देवाच्या मुखातून निघालेल्या सर्व वचनांचे पालन कर व त्याच्या वचनांना विरोध किंवा त्यांचा प्रतिकार करू नको अथवा त्यावर वाद घालू नको.
देवाच्या मुखातून निघालेल्या वचनांचा तुला वाटेल तसा अर्थ लावू नको. तू दुष्टांच्या फसव्या कारस्थानांना बळी पडू नयेस, यासाठी तुझी जीभ सांभाळ.
देवाने तुझ्यासाठी घालून दिलेल्या मर्यादांचा भंग होऊ नये, यासाठी तुझी पावले सांभाळ. जर तू मर्यादा ओलांडलीस, तर त्याने तुला देवाच्या स्थानी उभे राहायला आणि बढाईखोर व मिजासखोर शब्द उच्चारायला भाग पाडले जाईल आणि मग देव तुझा तिरस्कार करेल.
तू देवाच्या मुखातून निघालेल्या वचनांचा निष्काळजीपणे प्रसार करू नयेस, इतरांना तुमची खिल्ली उडवू देऊ नये व सैतानाला तुम्हाला मूर्ख बनवू देऊ नकोस.
आजच्या देवाच्या सर्व कार्याचे पालन कर. तुला जरी ते समजले नाही, तरी त्यावर अभिप्राय देऊ नकोस; फक्त सहभागिता शोधण्याचा प्रयत्न करत राहा.
कुणाही व्यक्तीने देवाचे मूळ स्थान ओलांडून जाऊ नये. तू मनुष्याच्या भूमिकेतून आजच्या देवाची सेवा करण्यापलीकडे अधिक काही करू शकत नाहीस. मनुष्याच्या भूमिकेतून आजच्या देवाला शिकवू शकत नाहीस—असे करणे म्हणजे दिशाभूल करणे आहे.
देवाने साक्ष दिलेल्या मनुष्याच्या जागी दुसरा कोणीही उभा राहू शकत नाही; तू तुझे शब्द, कृती आणि अंतस्थ विचार यातूनच मनुष्याच्या स्थितीत असतोस. या गोष्टीचे पालन केले पाहिजे, तीच मनुष्याची जबाबदारी आहे व ती कुणीही बदलू शकत नाही; तसा प्रयत्न करणे म्हणजे व्यवस्थापनाच्या आदेशांचा भंग होईल. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
देवाने त्याची वचने सांगण्यास आणि उच्चारण्यास घेतलेल्या दीर्घ काळामुळे देवाची वचने वाचणे व लक्षात ठेवणे हेच त्याचे प्रथम कार्य ठरवणे मनुष्याला भाग पडले आहे. कुणीही प्रत्यक्ष आचरणाकडे लक्ष देत नाही आणि तुम्ही ज्याचे पालन केले पाहिजे ते तुम्ही करत नाही. त्यामुळे तुमच्या सेवेत अनेक अडचणी व समस्या आल्या आहेत. देवाची वचने आचरणात आणण्याआधी, तू जे धरून चालायला पाहिजेस त्याला धरून चालला नाहीस, तर तू देवाने नाकारलेल्या आणि गर्हणीय समजलेल्या लोकांमधील एक ठरशील. या पद्धतींचे पालन करताना तू प्रामाणिक व सच्चे रहायला हवेस. तू त्या वचनांना बेड्या समजू नयेस, तर आज्ञा समजून त्यांचे पालन केले पाहिजेस. आज काय लाभ मिळवायचा यात गुंतून राहू नयेस; थोडक्यात, पवित्र आत्मा अशाच प्रकारे कार्य करत असतो आणि जो कोणी अपराध करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पवित्र आत्मा हा भावनाहीन असतो व सध्याच्या तुझ्या अर्थबोधाकडे त्याचे लक्ष नसते. जर तू आज देवाचा अवमान केलास तर, तो तुला शिक्षा देईल. जर तू त्याच्या कार्यकक्षेत त्याला अवमानित केलेस, तर तो तुला सोडणार नाही. तू येशूच्या वचनांच्या पालनाबाबत किती गंभीरपणे विचार करतोस याची त्याला तमा नसते. जर तू देवाच्या आजच्या आज्ञांचा भंग केलास, तर तो तुला शिक्षा करेल आणि तुला मृत्यूची शिक्षा फर्मावेल. मग त्यांचे पालन न करणे तुला कसे स्वीकारार्ह होईल? त्यामुळे थोडासा त्रास झाला, तरी त्यांचे पालन करायलाच हवे. कोणताही धर्म, गट, देश किवा पंथ असो, भविष्यकाळात त्या पद्धती सर्वांनी पाळल्या पाहिजेत. त्यात कुणालाच सूट नाही व त्यातून कुणाचीच सुटका नाही. कारण पवित्र आत्मा जे आज करतो त्या याच पद्धती आहेत आणि कुणीही त्यांचा भंग करू नये. जरी या पद्धती फार श्रेष्ठ नाहीत, तरी प्रत्येकाने त्या अनुसरल्या पाहिजे; आणि पुनर्जन्म झालेल्या व स्वर्गारोहण करणार्या येशूने मनुष्यासाठी ठरवलेल्या त्या आज्ञा आहेत. “मार्ग …(७)” असेच म्हणत नाही का, की तू पापी की पुण्यवान याविषयी येशूची व्याख्या ही देवाविषयीच्या तुझ्या दृष्टिकोनानुसार ठरत असते? या मुद्द्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. नियमशास्त्राच्या युगात, परुशांच्या पिढ्या न पिढ्या देवावर विश्वास ठेवत होत्या, पण कृपेचे युग आल्यावर ते येशूला ओळखेनासे झाले आणि त्यांनी त्याला विरोध केला. परिणामी, त्यांनी जे काही केले ते निष्फळ ठरले व वाया गेले आणि देवाने त्यांची कृत्ये स्वीकारली नाहीत. जर तुला हे समजले, तर तू सहजतः पाप करणार नाही. कदाचित, अनेक लोकांनी देवासमोर स्वतः अजमावले आहे. देवाला विरोध करणे कसे असते? कडू की गोड? तू हे समजून घेतले पाहिजेस; तुला माहीत नाही असा देखावा करू नकोस. कदाचित काही लोकांना मनातून पटत नसावे. तरी मी तुला सल्ला देईन, की तू तसा प्रयत्न कर व ते कसे वाटते ते पहा. त्यामुळे त्याबद्दल संशय घेणे अनेकांना टाळता येईल. अनेक लोक देवाची वचने वाचतात, तरीही अंतःकरणातून त्याला छुपेपणाने विरोध करतात. अशा प्रकारे त्याला विरोध करताना तुमच्या हृदयावर कुणी तरी सुरी फिरवली आहे, असे तुला वाटत नाही का? जर कौटुंबिक मतभेद नसतील, तर शारीरिक अस्वस्थता असेल किंवा मुले आणि मुलींबाबत काही दुःख असेल. जरी तुझ्या देहाची मृत्यूपासून सुटका झाली, तरी देवाच्या हातून तू कधीच सुटणार नाहीस. हे इतके सोपे असेल, असे तुला वाटते का? विशेषतः, देवाच्या जवळ असलेल्या लोकांनी याकडे अधिक लक्ष देण्याची अजूनही आवश्यकता आहे. जसा काळ पुढे जातो, तसे तू विसरू लागशील व नकळत मोहामध्ये पडशील आणि सगळे काही दुर्लक्षित करू लागशील व ही तुझ्या पापांची सुरुवात असेल. ही गोष्ट तुला क्षुल्लक वाटते का? जर तू हे काम चांगले केलेस, तर तुला परिपूर्ण होण्याची संधी मिळेल—देवासमोर येऊन आणि थेट त्याच्या मुखातून त्याचे मार्गदर्शन प्राप्त करण्याची संधी मिळेल. जर तू निष्काळजी राहिलास, तर संकटात सापडशील—देवासमोर उद्धटपणे वागशील, तुझे शब्द व कृती चारित्र्यहीन बनतील आणि आज नाही तर उद्या तू मोठ्या वादळाने व प्रचंड लाटांनी वाहावत जाशील. तुमच्यापैकी प्रत्येकाने या आज्ञा लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही त्यांचा भंग केलात, तर जरी देवाने साक्ष दिलेल्या मनुष्याने तुझा धिक्कार केला नाही, तरी देवाच्या आत्म्याचे तुझ्याबरोबरचे कार्य अपुरेच असेल आणि तो तुला सोडणार नाही. तुझ्या अपराधाचे परिणाम तू भोगू शकशील का? म्हणूनच, देव काहीही म्हणो, तू त्याची वचने आचरणात आणली पाहिजेस व तुला शक्य असेल त्या प्रकारे त्यांचे पालन केले पाहिजे. ही साधी गोष्ट नाही.