देवाच्या मनुष्याच्या उपयुक्ततेविषयी
ज्यांना पवित्र आत्म्याने विशेष दिशादर्शन आणि मार्गदर्शन केले आहे, त्यांच्याखेरीज कोणीही स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नाही, कारण ज्यांचा देवाने उपयोग केला आहे, अशांच्या सेवाकार्याची आणि देखरेखीची आवश्यकता असते. अशा प्रकारे, प्रत्येक युगात देव वेगवेगळ्या लोकांची जोपासना करतो, जे त्याच्या कार्यासाठी चर्चच्या देखरेखीचा खटाटोप करण्यात व्यस्त असतात. म्हणजेच, देव ज्यांना अनुकूलपणे पाहतो आणि त्याला जे मान्य आहेत, त्यांच्या माध्यमातून देवाचे कार्य केले पाहिजे; पवित्र आत्म्याला कार्य करण्यासाठी उपयोगी पडेल असा त्यांच्यातील भाग पवित्र आत्म्याने वापरला पाहिजे आणि पवित्र आत्म्याद्वारे परिपूर्ण केले जाण्याने ते देवाच्या उपयोगासाठी योग्य बनवले जातात. मनुष्याकडे समजण्याच्या क्षमतेचा फारच अभाव असल्याने, देवाने ज्यांचा उपयोग केला आहे त्यांनीच त्याचे पालनपोषण केले पाहिजे; देवाने मोशेचा उपयोग केला तेही असेच होते. त्यावेळी देवाला त्याच्यामध्ये उपयोग करून घेण्यायोग्य बरेच काही आढळले आणि त्या टप्प्यावर देवाच्या कार्यासाठी त्याने त्याचा उपयोग केला. या टप्प्यावर, देव मनुष्याचा उपयोग करतो आणि त्याच वेळी पवित्र आत्म्याद्वारे कार्य करण्यासाठी त्याचा जो भाग उपयोगात आणला जाऊ शकतो, त्याचा फायदाही घेतो आणि पवित्र आत्मा त्याला दिशा देतो त्याच वेळेस उरलेल्या अस्थिर भागाला परिपूर्णदेखील बनवतो.
देवाने ज्याचा उपयोग केला आहे त्याने केलेले कार्य ख्रिस्ताच्या किंवा पवित्र आत्म्याच्या कार्याला सहकार्य करण्यासाठी आहे. या मनुष्याला देव मनुष्यांमध्ये वाढवतो, देवाच्या सर्व निवडलेल्यांचे तो नेतृत्व करतो आणि देव त्याला मानवी सहयोगाचे कार्य करण्यासाठीही वाढवतो. अशा प्रकारची, मानवी सहयोगाचे कार्य करण्यास सक्षम असणारी व्यक्ती असताना, देवाच्या मनुष्याकडून असलेल्या आवश्यकताआणि पवित्र आत्म्याने मनुष्यांमध्ये राहून जे केले पाहिजे ते कार्य, त्याच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. हे दुसऱ्या प्रकारे असे मांडता येते: देवाने या मनुष्याचा उपयोग करून घेण्याचा उद्देश असा आहे, की देवाचे अनुसरण करणारे सर्वदेवाची इच्छा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील, आणि देवाच्या अधिकाधिक आवश्यकता पूर्ण करू शकतील. देवाची वचने किंवा देवाची इच्छा थेट समजण्याची लोकांची क्षमता नसल्यामुळे, असे कार्य करण्याची सवय असलेल्या एखाद्या व्यक्तीला देवाने वाढवले आहे. देवाने उपयोग केलेल्या अशा व्यक्तीचे वर्णन, ज्याद्वारे देव लोकांना मार्गदर्शन करतो असे माध्यम, देव आणि मनुष्य यांच्यात संवाद साधणारा “अनुवादक” म्हणूनही करता येते. अशा प्रकारे, असा मनुष्य देवाच्या घरात कार्य करणाऱ्यांसारखाकिंवा त्याच्या प्रेषितांसारखा नाही. त्यांच्याप्रमाणे, तो देवाची सेवा करणारा आहे असे म्हणता येऊ शकते, पण त्याच्या कार्याचे सार आणि ज्याप्रकारे देव त्याचा उपयोग करतो त्या पार्श्वभूमीनुसार, तो इतर कार्य करणाऱ्यांपेक्षा आणि प्रेषितांपेक्षा फार वेगळा आहे. त्याच्या कार्याचे सार आणि ज्याप्रकारे देव त्याचा उपयोग करतो त्या पार्श्वभूमीनुसार, देवाने उपयोग केलेला मनुष्य देवानेच वाढवलेला आहे, त्याला देवाच्या कार्यासाठी देवाने तयार केलेले आहे आणि तो देवाच्या कार्यात सहयोग देतो. त्याच्याऐवजी अन्य कुणीही व्यक्ती कधीही त्याचे कार्य करू शकत नाही—दैवी कार्याच्या जोडीने हे मानवी सहकार्य अनिवार्य आहे. दरम्यान, इतर कार्य करणाऱ्यांनी किंवा प्रेषितांनी पार पाडलेले कार्य म्हणजे प्रत्येक युगातील चर्चच्या व्यवस्थांच्या अनेक पैलूंचे केवळ अभिव्यक्तीआणि अंमलबजावणी, किंवा चर्चचे जीवनसांभाळण्यासाठी असलेल्या जीवनातील काही साध्या गोष्टींची तरतूद करण्याचे कार्य आहे. हे कार्य करणारे आणि प्रेषित यांना देवाने नेमलेले नाही, आणि त्याहूनही त्यांना पवित्र आत्म्याने उपयोग केलेले असे म्हणता येत नाही. त्यांना चर्चमधून निवडले जाते आणि ठरावीक कालावधीसाठी त्यांना प्रशिक्षित आणि संस्कारित केल्यानंतर, जे सुयोग्य असतील त्यांना ठेवले जाते आणि जे अयोग्य असतील त्यांना ते जिथून आले तिथे परत पाठवले जाते. या लोकांना चर्चमधून निवडलेले असल्यामुळे, काहीजण पुढारी झाल्यानंतर त्यांचे खरे रंग दाखवतात आणि काही तर अनेक वाईट गोष्टी करतात आणि शेवटी त्यांना बाहेर काढून टाकले जाते. याउलट, ज्या मनुष्याचा देवाने उपयोग केला आहे, तो असा मनुष्य आहे ज्याला देवाने तयार केले आहे आणि ज्याच्याकडे एक विशिष्ट क्षमता आणि मानवता आहे. पवित्र आत्म्याने त्याला अगोदरच तयार केलेले आणि परिपूर्ण बनवलेले आहे आणि त्याला पवित्र आत्म्याचे पूर्ण मार्गदर्शन मिळालेले आहे आणि विशेषतः त्याच्या कार्याच्या बाबतीत, त्याला पवित्र आत्मा दिशा दाखवतो आणि आज्ञा देतो—यामुळे देवाच्या निवडलेल्या लोकांचे नेतृत्व करण्याच्या मार्गात कोणतेही विचलन नसते, कारण देव नक्कीच त्याच्या स्वतःच्या कार्याची जबाबदारी घेतो आणि देव सर्वकाळ त्याचे स्वतःचे कार्य करतो.