विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (१)

मानवजातीला सैतानाने भ्रष्ट केले आहे, देव आहे हेच तिला माहीत नाही आणि देवाची उपासना करणे तिने थांबवले आहे. प्रारंभी, जेव्हा आदाम आणि हव्वा यांची निर्मिती करण्यात आली, तेव्हा यहोवाचा गौरव आणि साक्ष कायम होती. परंतु भ्रष्ट झाल्यानंतर, मनुष्याने गौरव आणि साक्ष गमावली, कारण प्रत्येकाने देवाविरुद्ध बंड केले आणि त्याचा आदर करणे पूर्णपणे सोडून दिले. आजचे विजयाचे कार्य म्हणजे सर्व साक्ष आणि सर्व गौरव परत मिळवणे आणि सर्व लोकांना देवाची उपासना करायला लावणे आहे, जेणेकरून निर्माण केलेल्यांमध्ये साक्ष असेल; हे या टप्प्यात करायचे कार्य आहे. मानवजातीवर नक्की विजय कसा मिळवायचा? या टप्प्यातील वचनांचे कार्य वापरून मनुष्याला पूर्णपणे पटवून द्यायचे; प्रकटीकरण, न्याय, ताडण आणि निर्दयी शाप यांचा वापर करून त्याला पूणपणे पटवून द्यायचे; मनुष्याचा बंडखोरपणा उघड करायचा आणि त्याच्या प्रतिकाराचा अंदाज घ्यायचा, जेणेकरून त्याला मानवजातीचे अनीतिमान आणि घाणेरडेपणा कळेल आणि अशा प्रकारे या गोष्टींचा उपयोग देवाच्या नीतिमान प्रवृत्तीसाठी विरोध म्हणून करायचा. मुख्यतः या वचनांद्वारेच मनुष्यावर विजय मिळवला येतो आणि त्याला पूर्णपणे पटवून देता येते. वचने हेच मानवजातीवर अंतिम विजय मिळवण्याचे साधन आहेत आणि जे लोक देवाच्या विजयाचा स्वीकार करतात त्यांनी त्याच्या वचनांचा फटकारा आणि निर्णय स्वीकारला पाहिजे. आज बोलण्याची प्रक्रिया म्हणजेच विजयाची प्रक्रिया आहे. आणि लोकांनी सहकार्य कसे करावे? या वचनांचे सेवन आणि प्राशन कसे करायचे हे जाणून घेऊन आणि त्यांच्याविषयी समज प्राप्त करून. लोकांवर विजय कसा मिळवावा, हे ते स्वतः करू शकत नाहीत. या वचनांचे सेवन आणि प्राशन करणे, भ्रष्टता आणि मलिनता, बंडखोरी आणि अनीतिमानता ओळखणे आणि देवासमोर नतमस्तक होणे याद्वारेच तू हे करू शकतोस. जर, देवाची इच्छा समजून घेतल्यावर, तू ती आचरणात आणण्यास समर्थ असशील, आणि जर तुझ्याकडे दृष्टिकोन असेल आणि तू या वचनांच्या पूर्णपणे अधीन राहण्यास समर्थ असशील, आणि स्वतःहून कोणतीही निवड करत नसशील—तर तुझ्यावर विजय मिळवलेला असेल—आणि ते या वचनांचा परिणाम म्हणून असेल. मानवजातीने साक्ष का गमावली? कारण देवावर कोणाचाही विश्वास नाही, कारण लोकांच्या अंतःकरणात देवाला स्थान नाही. मानवजातीवर विजय म्हणजे मानवजातीमध्ये श्रद्धेची पुनर्स्थापना आहे. लोक प्रापंचिक जगात मागे पुढे न पाहता सदैव धावू इच्छितात, ते खूपच आशा बाळगतात, त्यांच्या भविष्यात खूप काही हवे असते आणि त्यांच्या खूप अवाजवी मागण्या असतात. ते सदैव देहाचा विचार करत असतात, देहासाठीच योजना आखत असतात आणि देवावर विश्वास ठेवण्याचा मार्ग शोधण्यात त्यांना रस नसतो. त्यांची अंतःकरणे सैतानाने हिसकावून घेतलेली असतात, त्यांनी देवाबद्दलचा आदर गमावला आहे आणि त्यांचे विचार सैतानावरच खिळले आहेत. पण मनुष्याची निर्मिती देवाने केली आहे. अशा प्रकारे, मनुष्याने साक्ष गमावली आहे, याचाच अर्थ त्याने देवाचा गौरव गमावला आहे. देवाबद्दल मनुष्याच्या आदराचा गौरव पुन्हा प्राप्त करणे हाच मानवजातीवर विजय मिळवण्याचा उद्देश आहे. हे असेही म्हणता येईल: असे अनेक लोक असतात जे जीवनाचा पाठपुरावा करत नाहीत; काही लोक जीवनाचा पाठपुरावा करणारे असले, तरी ते मोजकेच असतात. लोक त्यांच्या भविष्याविषयी अधिक विचार करत असतात आणि जीवनाकडे लक्ष देत नाहीत. काही देवाविरूद्ध बंड करतात आणि त्याचा प्रतिकार करतात, त्याच्या पाठीमागे त्याचा न्याय करतात आणि सत्याचे आचरण करत नाहीत. या लोकांकडे सध्या दुर्लक्ष केले जाते; तूर्तास, या बंडखोर मुलांचे काहीही केले जात नाही, परंतु भविष्यात तू अंधारात, रडत आणि दात चावत राहशील. तू प्रकाशात राहत असतोस, तेव्हा तुला त्याचे मोल जाणवत नाही, परंतु तू अंधःकारमय रात्रीत राहिलास, तर तुला त्याचे मोल जाणवेल आणि तेव्हा तुला वाईट वाटेल. तुला आता बरे वाटत आहे, पण असा एक दिवस येईल, जेव्हा तुला वाईट वाटेल. जेव्हा तो दिवस येईल आणि सर्वत्र अंधार पसरेल आणि कुठेच प्रकाश उरणार नाही, तेव्हा पश्चात्ताप करण्यासाठीही खूप उशीर झालेला असेल. तुला आजचे कार्य अजूनही समजत नाही आणि तू आज तुझ्याकडे असलेल्या वेळेची कदर करण्यात अपयशी ठरतोस, म्हणून हे होते. संपूर्ण विश्वाचे कार्य सुरू झाल्यानंतर, म्हणजे आज जे काही मी सांगतो ते खरे ठरेल, तेव्हा बरेच लोक डोके धरून दुःखाचे अश्रू ढाळतील. आणि असे करताना, ते रडत आणि दात चावत अंधारात पडलेले नसतील का? जे सर्व जण खरोखर जीवनाचा पाठपुरावा करतात आणि परिपूर्ण केले जातात, ते वापरले जाऊ शकतात, तर बंडखोरीचे सर्व पुत्र जे वापरण्यास अयोग्य आहेत, ते अंधारात पडतील. ते पवित्र आत्म्याच्या कार्यापासून वंचित राहतील आणि काहीही समजण्यास असमर्थ असतील. अशाप्रकारे, ते रडतील, शिक्षेच्या गर्तेत बुडतील. जर तू कार्याच्या या टप्प्यावर सुसज्ज असशील आणि आयुष्यात प्रगती केली असशील, तर तू वापरण्यासाठी योग्य आहेस. जर तू सुसज्ज नसशील, तर तुला कार्याच्या पुढील टप्प्यासाठी बोलावले गेले, तरीही तू वापरासाठी अयोग्य असशील—तुला स्वतःला सुसज्ज करायचे असेल, तरी या टप्प्यावर तुला दुसरी संधी मिळणार नाही. देव निघून गेलेला असेल; आता तुझ्यासमोर असलेली संधी शोधण्यासाठी तू कुठे जाऊ शकशील? देवाने स्वतः प्रदान केलेली कृती घेण्यासाठी तू कुठे जाऊ शकशील? तोपर्यंत, देव स्वतः बोलत नसेल किंवा त्याचे उच्चारण देत नसेल; आज ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत, त्या वाचणे एवढेच तुला करता येईल—मग जाणीव सहज कशी साध्य होईल? भविष्यातील जीवन आजच्यापेक्षा चांगले कसे असेल? त्या वेळी, तू रडत आणि दात चावत असताना, तुला जिवंत मृत्यू सहन करावा लागणार नाही का? आता तुला आशीर्वाद दिले जात आहेत, परंतु त्यांचा आनंद कसा घ्यावा हे तुला माहीत नाही; तू आशीर्वादात जगत आहेस, तरीही अनभिज्ञ आहेस. यावरून हे सिद्ध होते, की दुःख भोगणेच तुझ्या नशिबी आहे! आज, काही लोक विरोध करतात, काही बंड करतात, काही हे किंवा ते करतात आणि मी त्याकडे केवळ दुर्लक्ष करतो—परंतु तुम्ही काय करत आहात याबद्दल मला माहिती नाही असे समजू नका. तुमचे सार मला समजत नाही का? माझ्याशी का भांडत राहता? तू देवावर विश्वास ठेवतोस, तो तुझ्या स्वतःसाठी जीवन आणि आशीर्वाद मिळवण्यासाठीच नव्हे का? तू तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठीच देवावर विश्वास ठेवत नाहीस का? सध्याच्या घडीला, मी केवळ बोलून विजयाचे कार्य करत आहे आणि विजयाचे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर, तुझा अंत स्पष्ट होईल. मी हे स्पष्टपणे सांगायला हवे का?

आजच्या विजयाच्या कार्याचा उद्देश मनुष्याचा अंत काय होईल हे स्पष्ट करण्यासाठी आहे. आजचे ताडण आणि न्याय हा अखेरच्या दिवसांतील महान पांढऱ्या सिंहासनासमोरचा न्याय आहे, असे का म्हटले जाते? तुला हे दिसत नाही का? विजयाचे कार्य हा अंतिम टप्पा का आहे? हे मनुष्याच्या प्रत्येक वर्गाला कोणत्या प्रकारचा अंत लाभेल हे स्पष्ट करणेच नाही का? ताडण आणि न्यायावर विजय मिळवण्याच्या कार्यात, प्रत्येकाला त्यांचे खरे रंग दाखवण्याची आणि त्यानंतर त्यांच्या प्रकारानुसार त्यांचे वर्गीकरण करण्याची परवानगी देणे नाही का? हे मानवजातीवर विजय मिळवणे आहे असे म्हणण्यापेक्षा, हे प्रत्येक वर्गाच्या व्यक्तीसाठी कोणत्या प्रकारचा अंत असेल हे दर्शवणे आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल. हे लोकांच्या पापांचा न्यायनिवाडा करणे आणि नंतर व्यक्तींचे वेगवेगळे वर्ग स्पष्ट करणे प्रकट करणे आणि त्याद्वारे ते वाईट किंवा नीतिमान आहेत हे ठरवण्याचे कार्य आहे. विजयाच्या कार्यानंतर, चांगल्याला बक्षीस देण्याचे आणि वाईटाला शिक्षा करण्याचे कार्य असते. जे लोक पूर्णतः आज्ञापालन करतात—म्हणजेच ज्यांच्यावर पूर्णपणे विजय मिळवलेला असतो—त्यांना देवाच्या कार्याचा संपूर्ण विश्वात प्रसार करण्याच्या पुढील चरणात स्थान दिले जाईल; ज्यांच्यावर विजय मिळवलेला नाही, अशा लोकांना अंधारात टाकले जाईल आणि त्यांना आपत्तींना सामोरे जावे लागेल. अशाप्रकारे, मनुष्याचे वर्गीकरण प्रकारानुसार केले जाईल, दुष्कर्म करणाऱ्यांना दुष्टांच्या सोबत टाकले जाईल, ते कायम सूर्यप्रकाशापासून वंचित राहतील, आणि नीतिमानांना प्रकाश प्राप्त करण्यासाठी आणि प्रकाशात कायमचे जगण्यासाठी चांगल्या लोकांच्या सोबत ठेवले जाईल. सर्व गोष्टींचा अंत जवळ आला आहे; मनुष्याचा अंत त्याच्या डोळ्यांना स्पष्टपणे दर्शवला गेला आहे आणि सर्व गोष्टींचे प्रकारानुसार वर्गीकरण केले जाईल. तर मग, प्रत्येकाचे प्रकारानुसार वर्गीकरण केल्याच्या दुःखातून लोक कसे सुटू शकतात? जेव्हा सर्व गोष्टींचा अंत जवळ आलेला असतो, तेव्हा प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीचा अंत उघड केला जातो आणि हे संपूर्ण विश्वावर विजय मिळवण्याच्या कार्यादरम्यान केले जाते (यामध्ये सध्याच्या कार्यापासून सुरू होणाऱ्या विजयाच्या सर्व कार्याचा समावेश होतो). सर्व मानवजातीचा अंत कसा असेल हे न्यायासनाच्या समोर, ताडणाच्या दरम्यान आणि शेवटच्या दिवसांतील विजयाच्या कार्याच्या दरम्यान केले जाते. लोकांचे प्रकारानुसार वर्गीकरण करणे म्हणजे त्यांना त्यांच्या मूळ वर्गाकडे परत पाठवणे नव्हे, कारण निर्मितीच्या वेळी जेव्हा मनुष्याला घडवण्यात आले, तेव्हा केवळ एकच प्रकारचा मनुष्य होता, केवळ नर आणि मादी अशी विभागणी होती. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे लोक नव्हते. हजारो वर्षांच्या भ्रष्टाचारानंतर मानवाचे वेगवेगळे वर्ग उदयास आले आहेत, त्यात काही घाणेरड्या सैतानांच्या अधिपत्याखाली आहेत, काही दुष्ट सैतानांच्या अधिपत्याखाली आहेत आणि जीवनाचा मार्ग अवलंबणारे काही लोक सर्वशक्तिमान देवाच्या अधिपत्याखाली आहेत. केवळ अशा प्रकारे लोकांमध्ये हळुहळू वर्ग तयार होतात आणि केवळ अशा प्रकारे मनुष्याच्या मोठ्या कुटुंबाअंतर्गत लोक विविध वर्गांमध्ये विभागले जातात. सर्व लोकांचे “पिता” वेगवेगळे असतात; प्रत्येकच जण पूर्णपणे सर्वशक्तिमान देवाच्या अधिपत्याखाली नसतो, कारण मनुष्य खूप बंडखोर आहे. न्याय्य निर्णय प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीचे खरे स्वत्व प्रकट करतो, इथे काहीही लपून राहत नाही. प्रत्येकजण प्रकाशात त्याचा खरा चेहरा दाखवतो. या टप्प्यावर, मनुष्य आता पूर्वीसारखा राहिला नाही, त्याचे पूर्वजांशी असलेले मूळ साधर्म्य कधीच नाहीसे झाले आहे, कारण आदाम आणि हव्वा यांच्या असंख्य वंशजांवर सैतानाने खूप पूर्वीपासून ताबा मिळवला आहे, त्यांना पुन्हा कधीही स्वर्ग कळू शकला नाही आणि लोक सैतानाच्या विषाने भरून गेले आहेत. अशा प्रकारे, लोकांना त्यांची योग्य गंतव्यस्थाने मिळाली आहेत. एवढेच नव्हे, वेगवेगळ्या विषाच्या आधारावर त्यांच्या प्रकारानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते, म्हणजे त्यांच्यावर आज ज्या प्रमाणात विजय मिळवला जातो, त्यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. मनुष्याचा अंत ही जगाच्या निर्मितीवेळीच निश्चित केलेली गोष्ट नाही. याचे कारण म्हणजे सुरुवातीला, एकच वर्ग होता, त्याला एकत्रितपणे “मानवजात” असे म्हटले जात असे आणि सुरुवातीला सैतानाने मनुष्याला भ्रष्ट केले नव्हते, आणि सर्व लोक देवाच्या प्रकाशात जगत होते, त्यांच्यावर अंधार पडला नव्हता. परंतु सैतानाने मनुष्याला भ्रष्ट केल्यानंतर, सर्व प्रकारचे लोक संपूर्ण पृथ्वीवर पसरले—सर्व प्रकारचे स्त्री आणि पुरुष जे सरसकट “मानवजात” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबातून आले होते. त्या सर्वांना त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या सर्वात जुन्या पूर्वजांपासून—पुरुष आणि महिला यांचा समावेश असलेल्या मानवजातीपासून (म्हणजेच सुरुवातीच्या आदाम आणि हव्वा या त्यांच्या सर्वात जुन्या पूर्वजांपासून) दूर नेले होते. त्या वेळी, केवळ इस्रायली लोकांचे पृथ्वीवरील जीवन यहोवाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. संपूर्ण इस्रायलमधून (म्हणजे मूळ कुळातून) उदयास आलेले विविध प्रकारचे लोक नंतर यहोवाचे मार्गदर्शन गमावून बसले. हे सुरुवातीचे लोक, मानवी जगाच्या गोष्टींबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते, ते नंतर त्यांच्या पूर्वजांसोबत त्यांनी दावा केलेल्या प्रदेशात राहायला गेले, जे आजतागायत चालू आहे. अशा प्रकारे, ते यहोवापासून कसे दूर झाले आणि आजपर्यंत सर्व प्रकारचे घाणेरडे सैतान आणि दुष्ट आत्म्यांद्वारे ते कसे भ्रष्ट झाले, याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. ज्यांना आत्तापर्यंत खूप भ्रष्ट केले गेले आहे आणि दूषित केले गेले आहे—ज्यांना अखेर सोडवणे शक्य नाही—त्यांना त्यांच्या पूर्वजांसोबत, म्हणजेच त्यांना भ्रष्ट करणाऱ्या घाणेरड्या सैतानांसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांना अखेर वाचवता येईल, ते मानवजातीच्या योग्य गंतव्यस्थानी, म्हणजेच वाचवलेल्या आणि विजय मिळवलेल्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या अंतापर्यंत पोहोचतील. ज्यांना वाचवणे शक्य आहे त्यांना वाचवण्यासाठी सर्व काही केले जाईल—परंतु जे लोक असंवेदनशील आणि असाध्य आहेत अशा लोकांपुढे पूर्वजांच्या मार्गानेच ताडणाच्या अथांग गर्तेत कोसळणे हाच एकमेव मार्ग असेल. असा विचार करू नकोस, की तुझा अंत सुरुवातीलाच निश्चित केलेला होता आणि तो केवळ आता उघड झाला आहे. तसा विचार केला, तर मानवजातीच्या सुरुवातीच्या निर्मितीच्या काळात कोणताही वेगळा सैतानी वर्ग निर्माण झाला नव्हता, हे तू विसरलास का? आदाम आणि हव्वा यांच्यापासून बनलेली एकच मानवजात निर्माण केली होती, (म्हणजे फक्त नर आणि मादी यांना निर्माण केले होते) हे तू विसरलास का? जर तू सुरुवातीला सैतानाचा वंशज असतास, तर याचा अर्थ असा होत नाही का, की जेव्हा यहोवाने मनुष्याला निर्माण केले, तेव्हा त्याने त्याच्या निर्मितीमध्ये सैतानी गटाचा समावेश केला होता? त्याने असे काही केले असते का? त्याने मनुष्याला फक्त त्याच्या साक्षीसाठी निर्माण केले; त्याने मनुष्याला फक्त त्याच्या गौरवासाठी निर्माण केले. तो त्यालाच विरोध करणारा सैतानाचा एक वर्ग जाणूनबुजून का निर्माण करेल? यहोवा असे कसे करेल? जर त्याने हे केले असेल, तर त्याला नीतिमान देव कोण म्हणेल? जेव्हा मी आता म्हणतो, की तुमच्यापैकी काही जण अखेरीस सैतानासोबत जातील, तेव्हा याचा अर्थ असा नाही, की तू सुरुवातीपासून सैतानासोबत होतास; उलट, याचा अर्थ असा होतो, की तू इतका खाली बुडाला आहेस की जरी देवाने तुला वाचवण्याचा प्रयत्न केला असला, तरीही तू तारण मिळवण्यात असमर्थ ठरला आहेस. तुम्हाला सैतानासोबत वर्गीकृत करण्याशिवाय पर्याय नाही. याचे कारण, तू तारणाच्या पलीकडे आहेस. देवाने तुझ्यावर अन्याय केला आहे आणि तुला दुःख सहन करायला लावण्यासाठी हेतुपुरस्सर तुझे नशीब सैतानाचा अवतार म्हणून निश्चित केले आहे आणि नंतर तुला सैतानाच्या वर्गात टाकले आहे, असे नाही. विजयाच्या कार्याचे ते अंतर्गत सत्य नाही. जर तुझा त्यावर विश्वास असेल, तर तुझी समज खूपच एकतर्फी आहे! विजयाच्या अंतिम टप्प्याचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना वाचवणे आणि त्यांचे अंत उघड करणे आहे. याद्वारे न्यायाच्या मार्गाने लोकांचे अधःपतन उघड केले जाते, त्यांना पश्चात्ताप करण्यास आणि नंतर पुन्हा उभे राहून आयुष्य आणि मानवी जीवनाचा योग्य मार्ग यांचा पाठपुरावा करण्यास उद्युक्त केले जाते. बथ्थड आणि मठ्ठ लोकांची अंतःकरणे जागृत करण्यासाठी आणि निर्णयाद्वारे त्यांना त्यांच्या आंतरिक बंडखोरीची ओळख करून देण्यासाठी हे केले जाते. मात्र, तरीही जर लोक पश्चात्ताप करू शकत नसतील, मानवी जीवनाच्या योग्य मार्गाचा पाठपुरावा करू शकत नसतील आणि हे भ्रष्टाचार दूर सारण्यास असमर्थ असतील, तर ते तारणाच्या पलीकडे आहेत आणि सैतान त्यांना गिळंकृत करेल. देवाच्या विजयाचे हेच महत्त्व आहे: लोकांना वाचवणे आणि त्यांचा अंत दाखवून देणे. चांगले अंत, वाईट अंत—ते सर्व विजयाच्या कार्याद्वारे उघड केले जातात. लोकांना वाचवले जाईल की त्यांना शाप दिला जाईल हे सर्व विजयाच्या कार्यादरम्यान उघड होते.

शेवटच्या दिवसांत सर्व गोष्टी विजयाद्वारे प्रकारानुसार वर्गीकृत केल्या जातील. विजय मिळवणे हे अखेरच्या दिवसांतील कार्य आहे; दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक व्यक्तीच्या पापांचा न्याय करणे हे अखेरच्या दिवसांचे कार्य आहे. अन्यथा, लोकांचे वर्गीकरण कसे करता येईल? वर्गीकरणाचे जे कार्य तुमच्यामध्ये केले जाते, ती संपूर्ण विश्वात अशाप्रकारच्या कार्याची सुरुवात आहे. यानंतर, सर्व भूमी आणि सर्व लोकांवरदेखील विजयाचे कार्य केले जाईल. याचा अर्थ, सृष्टीतील प्रत्येक व्यक्तीचे प्रकारानुसार वर्गीकरण केले जाईल, त्यासाठी न्यायनिवाड्याच्या आसनासमोर त्यांना सादर केले जाईल. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही गोष्ट या ताडणापासून आणि न्यायापासून वाचू शकत नाही किंवा कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू प्रकारानुसार वर्गीकृत होणे टाळू शकत नाही; प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण केले जाईल, कारण सर्व गोष्टींचा अंत जवळ आला आहे आणि संपूर्ण स्वर्ग आणि पृथ्वीही त्यांच्या समारोपापर्यंत पोहोचले आहेत. मानवी अस्तित्वाच्या शेवटच्या दिवसांपासून मनुष्य कसा सुटू शकेल? आणि अशा प्रकारे, तुमची अवज्ञाकारी कृत्ये किती काळ चालू राहू शकतात? तुमचे शेवटचे दिवस जवळ येत आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? जे देवाचा आदर करतात आणि त्याच्या दर्शनाची आस बाळगतात, त्यांना देवाच्या नीतिमानतेच्या दर्शनाचा दिवस कसा दिसणार नाही? त्यांना चांगुलपणाचे अंतिम बक्षीस कसे मिळणार नाही? तू चांगले कार्य करणारा आहेस की वाईट कार्य करणारा आहेस? तू न्याय्य निर्णय स्वीकारून त्याचे पालन करणारा आहेस की न्याय्य निर्णय स्वीकारून नंतर शापित झालेला आहेस? तू न्यायासनासमोर प्रकाशात जगतोस की अंधारात अधोलोकात राहतोस? तुझा अंत बक्षीसाचा असेल की शिक्षेचा असेल, हे तुला स्वतःलाच स्पष्टपणे माहीत नाही का? देव नीतिमान आहे, याची सर्वात स्पष्ट कल्पना आणि सखोल ज्ञान तुलाच नाही का? मग तुझे आचरण आणि अंतःकरण कसे आहे? आज मी तुझ्यावर विजय मिळवत असताना, तुझी वागणूक चांगली की वाईट हे स्पष्ट करण्यासाठी तुला माझी खरोखर गरज आहे का? तू माझ्यासाठी किती त्याग केला आहेस? तू माझी किती मनापासून पूजा करतोस? तू माझ्याशी कसे वागतोस हे तुला स्वतःला स्पष्टपणे माहीत नाही का? तुझा अंत अखेरीस कसा असेल, हे इतर कोणाहीपेक्षा तुलाच अधिक चांगले माहीत असायला हवे! खरंच, मी तुला सांगतो: मी केवळ मानवजात निर्माण केली आणि मी तुला निर्माण केले, परंतु मी तुम्हाला सैतानाच्या हाती दिले नाही; मी तुम्हाला जाणूनबुजून माझ्याविरुद्ध बंड करायला किंवा मला विरोध करायला आणि परिणामी माझ्याकडून शिक्षा भोगायला भाग पाडले नाही. तुमची अंतःकरणे खूप कठोर आणि तुमची वागणूक खूप घृणास्पद आहे, म्हणूनच ही सर्व संकटे आणि दुःखे उद्भवत नाहीत का? मग, तुमचा अंत तुम्ही स्वतःच ठरवत नाही का? तुमचा अंत कसा होणार हे तुमच्या अंतःकरणात तुम्हाला इतर कोणाहीपेक्षा अधिक चांगले माहीत नाही का? मी लोकांवर विजय मिळवण्याचे कारण म्हणजे त्यांना उघड करणे आणि तुझे तारण करणे आहे. हे तुला दुष्कृत्य करायला लावण्यासाठी नाही किंवा तुला जाणूनबुजून विनाशाच्या नरकात नेण्यासाठी नाही. जेव्हा वेळ येईल, तेव्हा तुझे सर्व मोठे दुःख, तुझे रडणे आणि दात चावणे—हे सर्व तुझ्या पापांमुळेच होणार नाही का? म्हणजेच, तुझा स्वतःचा चांगुलपणा किंवा वाईटपणा हाच तुझा सर्वोत्तम निर्णय नाही का? तुझा अंत काय असेल याचा हा सर्वोत्तम पुरावा नाही का?

आज, मी चीनमध्ये देवाने निवडलेल्या लोकांमध्ये, त्यांची सर्व बंडखोर प्रवृत्ती उघड करण्यासाठी आणि त्यांची सर्व कुरूपता उघड करण्यासाठी कार्य करत आहे आणि मला जी प्रत्येक गोष्ट सांगायची आहे, ती या संदर्भातील आहे. त्यानंतर, जेव्हा मी संपूर्ण विश्वावर विजय मिळवण्याच्या पुढील पायरीवर कार्य करेन, तेव्हा मी संपूर्ण विश्वातील प्रत्येकाच्या अनीतीतत्वाचा न्याय करण्यासाठी माझ्या निर्णयाचा वापर करेन, कारण तुम्ही लोक मानवजातीमधील बंडखोरांचे प्रतिनिधी आहात. जे सुधारणा घडवू शकत नाहीत ते केवळ विरोधी आणि सेवा देणा-या वस्तू बनतील, तर जे सुधारणा घडवू शकतात त्यांचा वापर केला जाईल. मी असे का म्हणतो, की जे पाऊल उचलू शकत नाहीत ते केवळ विरोध म्हणून कार्य करतील? कारण माझी सध्याची वचने आणि कार्य हे सर्व तुमच्या पार्श्वभूमीला लक्ष्य करत असते आणि तुम्ही संपूर्ण मानवजातीमध्ये बंडखोरांचे प्रतिनिधी आणि प्रतीक बनले आहात. नंतर, तुमच्यावर विजय मिळवणारी ही वचने मी परदेशात घेऊन जाईन आणि तिथल्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी त्यांचा वापर करेन, तरीही तुला ती मिळवता येणार नाहीत. त्यामुळे तू विरोधी ठरणार नाहीस का? सर्व मानवजातीची भ्रष्ट प्रवृत्ती, मनुष्याची बंडखोर कृत्ये आणि मनुष्याच्या कुरूप प्रतिमा आणि चेहरे—हे सर्व आज तुमच्यावर विजय मिळवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वचनांमध्ये नोंदवले गेले आहे. त्यानंतर मी ही वचने प्रत्येक राष्ट्राच्या आणि प्रत्येक संप्रदायाच्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी वापरेन, कारण तुम्ही हा मूळ नमुना, मागील दाखला आहात. मात्र, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सोडून देण्याचे ठरवलेले नाही, जर तू तुझ्या पाठपुराव्यात चांगले कार्य करण्यात अयशस्वी ठरलास आणि म्हणून तू असाध्य ठरलास, तर तू फक्त सेवा देणारी वस्तू आणि विरोधी बनणार नाहीस का? मी एकदा म्हणालो होतो, की माझे शहाणपण सैतानाच्या योजनांवर आधारित आहे. मी असे का म्हणालो? मी सध्या जे काही बोलत आणि करत आहे, त्यामागे हेच सत्य नाही का? जर तू सुधारणा घडवू शकत नसशील, जर तू परिपूर्ण झालेला नसशील, उलट तुला शिक्षा झालेली असेल, तर तू विरोधी बनणार नाहीस का? कदाचित तुझ्या वेळेत तुला खूप त्रासही झाला असेल, परंतु तरीही तुला काहीच कळत नाही; जीवनाच्या सर्व बाबींविषयी तू अनभिज्ञ आहेस. जरी तुझे ताडण केले गेलेले असले आणि तुझा न्याय झाला असला, तरीही तू बिलकुल बदललेला नाहीस आणि आत खोलवर, तुला जीवन मिळालेले नाही. जेव्हा तुझ्या कार्याची कसोटी घेण्याची वेळ येईल, तेव्हा तुला अग्नीसारखी भयंकर परीक्षा आणि त्याहूनही मोठ्या क्लेशाचा अनुभव येईल. हा अग्नी तुझ्या संपूर्ण अस्तित्वाची राख करेल. ज्याच्याकडे जीवन नाही, ज्याच्या अंतःकरणात कणभरही शुद्ध सोने नाही, जो जुन्या भ्रष्ट प्रवृत्तीत अडकला आहे आणि जो चांगले कार्यही करू शकत नाही, एक विरोधी ठरलेल्या अशा तुला काढून का बरे टाकता येणार नाही? ज्याची एका पैशाचीही किंमत नाही आणि ज्याच्याजवळ जीवनच नाही, अशा व्यक्तीचा विजयाच्या कार्यासाठी काही उपयोग होऊ शकतो का? जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा तुमचे दिवस नोहा आणि सदोमच्या दिवसांपेक्षाही कठीण असतील! तेव्हा तुझ्या प्रार्थनेने तुला काहीही फायदा होणार नाही. तारणाचे कार्य आधीच संपुष्टात आलेले असताना, तू नंतर परत येऊन नव्याने पश्चात्ताप करण्यास प्रारंभ कसा करू शकतोस? एकदा का तारणाचे सर्व कार्य पूर्ण झाले की मग काहीही उरणार नाही; तेथे काय असेल ते केवळ दुष्टांना शिक्षा देण्याच्या कार्याची सुरुवात. तू विरोध करतोस, बंड करतोस आणि वाईट आहे हे माहीत असलेल्या गोष्टीही करतोस. तू कठोर शिक्षेचे लक्ष्य ठरणार नाहीस का? मी आज तुझ्यासाठी हे स्पष्ट सांगत आहे. जर तू न ऐकण्याचे ठरवलेस, तर नंतर जेव्हा तुझ्यावर संकट कोसळेल, तेव्हा तुला पश्चात्ताप वाटू लागणे आणि तेव्हा तू विश्वास ठेवायला सुरुवात करणे याला फार उशीर झालेला नसेल का? मी तुम्हाला आज पश्चात्ताप करण्याची संधी देत आहे, परंतु तू तसे करण्यास तयार नाहीस. तुला किती वेळ प्रतीक्षा करायची आहे? ताडणाच्या दिवसापर्यंत? मला आज तुझी पूर्वीची उल्लंघने आठवत नाहीत; मी तुला पुन्हा पुन्हा माफ करतो, तुझ्या नकारात्मक बाजूंपासून दूर जाऊन फक्त तुझ्या सकारात्मक बाजूकडे पाहतो, कारण माझी सध्याची सर्व वचने आणि कृती तुला वाचवण्यासाठी आहेत आणि माझी तुझ्याविषयी कोणतीही दुर्भावना नाही. तरीही तू प्रवेश करण्यास नकार देतोस; तुला चांगल्या-वाईटातला भेद सांगता येऊ शकत नाही आणि तुला दयाळूपणाचे मोल कसे करावे हेही कळत नाही. अशा लोकांनी केवळ शिक्षेची आणि नैतिकतापूर्ण शिक्षेची वाट पाहू नये का?

मोशेने जेव्हा शिळेवर आघात केला आणि यहोवाने दिलेले पाणी उसळून वर आले, तेव्हा त्यामागे त्याचा विश्वास होता. जेव्हा दावीदाने आनंदभरित हृदयाने, माझ्या म्हणजे यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ लायर हे वाद्य वाजवले, तेव्हा त्यामागे त्याचा विश्वास होता. ईयोबाने जेव्हा आपले अगणित पशुधन व अमाप संपत्ती गमावली आणि त्याचे शरीर पुटकुळ्यांनी भरून गेले, तेव्हा त्यामागे त्याची श्रद्धा होती. जेव्हा तो माझा, परमेश्वराचा, आवाज ऐकू शकला व माझा, यहोवाचा महिमा पाहू शकला, तेव्हा त्यामागे त्याची श्रद्धा होती. येशू ख्रिस्ताचे अनुसरण पेत्र करू शकला त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. तो माझ्यासाठी सुळावर जाऊ शकला आणि महान साक्ष देऊ शकला त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. जेव्हा योहानाला मनुष्याच्या पुत्राची देदीप्यमान प्रतिमा दिसली, त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. जेव्हा त्याने शेवटच्या दिवसांमधील दृष्य पाहिले, त्याचेही सर्वात मोठे कारण त्याची श्रद्धा होती. परराष्ट्रांमधील तशाकथित समूहांना माझा साक्षात्कार प्राप्त झाला आहे व मी माझे मनुष्यांमधील कार्य करण्यासाठी सदेह परत आलो आहे हे त्यांना कळले याचे कारण त्यांची श्रद्धा होती. जे माझ्या कठोर वचनांनी व्यथित झाले आहेत आणि तरीही त्यांनीच दिलासा दिला आहे व ते वाचले आहेत—त्यांनी हे आपल्या श्रद्धेमुळेच केलेले नाही का? लोकांना त्यांच्या श्रद्धेच्या बळावर खूप काही मिळाले आहे आणि तो नेहमी आशीर्वाद असेल असे नाही. दाविदाला वाटलेला आनंद आणि हर्ष त्यांना कदाचित मिळणार नाही किंवा मोशेप्रमाणे यहोवाने दिलेले पाणी त्यांना मिळणार नाही. उदाहरणार्थ, यहोवाने ईयोबला त्याच्या श्रद्धेमुळे आशीर्वाद दिले, पण त्याच्यावर संकटेही आली. तुम्हाला आशीर्वाद मिळालेला असो वा आपत्ती आलेली असो, या दोन्ही आशीर्वादित घटना आहेत. श्रद्धेविना, तू विजयाचे हे कार्य प्राप्त करण्यास असमर्थ असशील, मग तुझ्या डोळ्यांसमोरची यहोवाची कृत्ये दिसणे तर दूरच. तू ती पाहू शकणार नाहीस, मग ती प्राप्त करणे तर दूरच. हे फटके, ही संकटे आणि सर्व न्याय—ते तुझ्यावर कोसळले नाहीत, तर तुला आज यहोवाची कृत्ये पाहता येतील का? आज, ही श्रद्धाच तुझ्यावर विजय मिळवू देते आणि या विजयामुळेच तू यहोवाच्या प्रत्येक कृतीवर विश्वास ठेवू शकतोस. केवळ श्रद्धेमुळेच तुला असे ताडण आणि न्याय मिळतो. हे ताडण आणि न्याय याद्वारेच, तुझ्यावर विजय मिळवता येतो आणि तुला परिपूर्ण करता येते. आज तुम्हाला ज्या प्रकारचे ताडण आणि न्याय मिळत आहे, तो मिळत नसेल, तर तुझी श्रद्धा व्यर्थ ठरेल, कारण तू देवाला ओळखत नसशील; तुझा त्याच्यावर कितीही विश्वास असला, तरी तुझी श्रद्धा वास्तविकतेत केवळ निराधार, पोकळ अभिव्यक्ती असेल. हे विजयाचे कार्य, ते तुला पूर्णपणे आज्ञाधारक बनवते, ते तुला प्राप्त झाल्यानंतरच, तुझी श्रद्धा खरी आणि विश्वासार्ह बनते आणि तुझे अंतःकरण देवाकडे वळते. जरी तुला “श्रद्धा” या शब्दामुळे, मोठा न्याय आणि शाप सहन करावा लागला, तरीही तुझी श्रद्धा खरी आहे आणि तुला सर्वात खरी, सर्वात वास्तविक आणि सर्वात मौल्यवान वस्तू मिळते. याचे कारण, न्यायाच्या वेळीच तुला देवाच्या निर्मितीचे अंतिम गंतव्यस्थान दिसते; या न्यायातच तुला कळते, की निर्मात्यावर प्रेम केले पाहिजे; विजयाच्या अशा कार्यातच तुला देवाचा हात दिसतो; या विजयातच तुला मानवी जीवन पूर्णपणे समजते; या विजयातच तुला मानवी जीवनाचा योग्य मार्ग सापडतो आणि “मनुष्य” या शब्दाचा खरा अर्थ कळतो; केवळ या विजयातच तुला सर्वशक्तिमान देवाची नीतिमान प्रवृत्ती आणि त्याचा सुंदर, तेजस्वी चेहरा दिसतो; या विजयाच्या कार्यातच तुला मनुष्याच्या उत्पत्तीविषयी समजते आणि सर्व मानवजातीचा “अमर इतिहास” समजून घेता येतो; या विजयातच तुला मानवजातीचे पूर्वज आणि मानवजातीच्या भ्रष्टाचाराचा उगम समजतो; या विजयातच तुला आनंद आणि सांत्वन लाभते तसेच निर्मात्याने निर्माण केलेल्या मानवजातीला अंतहीन ताडण, शिस्त आणि वचनांचे फटकारे मिळतात; या विजयाच्या कार्यातच तुला आशीर्वाद मिळतात, तसेच मनुष्यावर येणारी संकटेही मिळतात…. हे सर्व तुझ्या थोड्याशा श्रद्धेमुळेच नाही का? आणि या गोष्टी मिळाल्यानंतर तुझी श्रद्धा वाढली नाही का? तुला खूप काही मिळाले नाही का? तू केवळ देवाचे वचन ऐकलेस आणि देवाचे शहाणपण पाहिलेस, एवढेच नव्हे, तर तू त्याच्या कार्याच्या प्रत्येक टप्प्याचा स्वतः अनुभवले आहेस. कदाचित तू म्हणशील, की जर तुझी श्रद्धा नसती, तर तुला अशा प्रकारचे ताडण किंवा अशा प्रकारचा न्याय सहन करावा लागला नसता. परंतु तुला हे माहीत असले पाहिजे, की श्रद्धेविना, सर्वशक्तिमान देवाकडून तुला अशा प्रकारचे ताडण किंवा अशा प्रकारची काळजी मिळणे शक्य नाही, एवढेच नव्हे, तर निर्माणकर्त्याला भेटण्याची संधीदेखील तू कायमची गमावून बसशील. तुला मानवजातीची उत्पत्ती कधीच कळणार नाही आणि मानवी जीवनाचे मोल कधीच उमजणार नाही. जरी तुझे शरीर मरण पावले आणि आत्मा निघून गेला, तरीही तुला निर्मात्याची सर्व कृत्ये समजणार नाहीत, तर निर्मात्याने मानवजातीची निर्मिती केल्यानंतर पृथ्वीवर इतके महान कार्य केले आहे, हे समजणे तर दूरच. त्याने निर्माण केलेल्या या मानवजातीचा सदस्य म्हणून, तू अशा प्रकारे अज्ञानापोटी अंधारात पडण्यास आणि अनंतकाळची शिक्षा भोगण्यास तयार आहेस का? जर तू आजचे ताडण आणि न्यायापासून स्वतःला दूर ठेवलेस, तर तुला काय सापडेल? तुला असे वाटते का, की सध्याच्या न्यायापासून वेगळे झाल्यावर तू या कठीण जीवनातून बाहेर पडू शकशील? हे खरे नाही का, की जर तू “हे ठिकाण” सोडलेस, तर तुला सैतानाकडून वेदनादायक यातना किंवा क्रूर अत्याचार सहन करावे लागतील? तुला असह्य दिवस आणि रात्रींना तोंड द्यावे लागू शकते का? तुला असे वाटते का, की तू आज या न्यायापासून सुटका करून घेतलीस, म्हणून तू भविष्यात कायम या छळापासून दूर राहू शकशील? तुझ्या मार्गात काय असेल? तुला ज्याची आशा आहे, असा शांग्री-ला खरोखरच असेल का? तुला असे वाटते का, की सध्या तू जसे करतोस, त्याप्रमाणे वास्तविकतेपासून केवळ पळ काढून तू भविष्यातील निश्चित ताडणापासून सुटू शकतोस का? आजच्या नंतर, अशा प्रकारची संधी आणि असा आशीर्वाद तुला पुन्हा कधी मिळेल का? तुझ्यावर आपत्ती कोसळेल, तेव्हा तू त्याचा शोध घेऊ शकशील का? सर्व मानवजात विश्रांतीत प्रवेश करेल, तेव्हा तू त्यांचा शोध घेऊ शकशील का? तुझे सध्याचे आनंदी जीवन आणि तुझे ते सुसंवादी छोटे कुटुंब—ते भविष्यातील तुझ्या शाश्वत गंतव्यस्थानाला पर्याय ठरू शकतात का? जर तुझी खरी श्रद्धा असेल आणि या श्रद्धेच्या बळावर तुला खूप काही मिळाले असेल, तर सर्वप्रथम ते सर्व तुला—निर्मितीला—मिळायला हवे आणि तुझ्याकडे असायला हवे. तुझ्या श्रद्धेसाठी आणि जीवनासाठी अशा विजयापेक्षा लाभदायक काहीही नाही.

आज, तू हे समजून घ्यायला हवेस, की विजय मिळवलेल्यांकडून देवाला काय हवे आहे, परिपूर्ण केलेल्यांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि सध्या तू कशात प्रवेश केला पाहिजेस. काही गोष्टी तुला फक्त थोड्या समजून घ्यायला हव्यात. तुला काही गूढ शब्दांची छाननी करण्याची गरज नाही; ते जीवनात फारसे मदतीला येत नाहीत आणि त्यांच्याकडे केवळ एकदा नजर टाकली तरी पुरे असते. तू आदाम आणि हव्वा यांच्या रहस्यासारखी रहस्ये वाचू शकतोस: त्या काळी आदाम आणि हव्वा काय होते आणि आज देवाला कोणते कार्य करायचे आहे. तू हे समजून घ्यायला हवेस, की मनुष्यावर विजय मिळवून आणि त्याला परिपूर्ण करून, देव मनुष्याला पुन्हा आदाम आणि हव्वा जसे होते, त्यांच्यासारखे बनवू इच्छितो. तुझ्या अंतःकरणात, तुला देवाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या परिपूर्णतेच्या पातळीची चांगली कल्पना असली पाहिजे आणि नंतर तू ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेस. हे आचरणाशी संबंधित आहे आणि हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणांबद्दल देवाच्या वचनांनुसार प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे हे तुझ्यासाठी पुरेसे आहे. जेव्हा तू हे वाचतोस “आज मानवजात जिथे आहे, तिथे पोचण्यासाठी त्यांना इतिहासात हजारो वर्षे लागली आहेत”, तेव्हा तू जिज्ञासू बनतोस आणि म्हणून भाऊ आणि बहिणींसोबत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोस. “देव म्हणतो मानवजातीचा विकास सहा हजार वर्षे मागे जातो, बरोबर? मग हजारो वर्षांचे काय?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करून काय उपयोग? देव स्वत: हजारो वर्षे किंवा शेकडो लाखो वर्षांपासून कार्य करत असला तरीही—तू हे जाणून घेणे त्याच्यासाठी खरोखर गरजेचे आहे का? ही गोष्ट तू, निर्मिलेल्या एका जीवाने, जाणून घेण्याची गरज नाही. या प्रकारच्या संभाषणाचा थोडक्यात विचार करा आणि तो एक दृष्टांत असल्याप्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आज तू कोणत्या गोष्टीत प्रवेश केला पाहिजेस आणि काय समजून घ्यायचे आहे, याची तुला जाणीव असायला हवी आणि नंतर तुला त्याचे दृढ आकलन असायला हवे. तरच तुझ्यावर विजय मिळवता येईल. वरील वचन वाचल्यानंतर, तुझी सामान्य प्रतिक्रिया असायला हवी: देव चिंतेने जळत आहे, त्याला आपल्यावर विजय मिळवायचा आहे आणि गौरव आणि साक्ष प्राप्त करायची आहे, मग आपण त्याला कसे सहकार्य करावे? त्याच्याद्वारे पूर्णपणे जिंकले जाण्यासाठी आणि त्याची साक्ष होण्यासाठी आपण काय केले पाहिजे? देवाला गौरव मिळवून देण्यासाठी आपण काय केले पाहिजे? सैतानाच्या अधिपत्याखाली न राहता देवाच्या अधिपत्याखाली राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? याचाच विचार लोकांनी केला पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाला देवाच्या विजयाचे महत्त्व स्पष्टपणे माहीत असायला हवे. ती तुमची जबाबदारी आहे. ही स्पष्टता प्राप्त केल्यानंतरच तुम्हाला प्रवेश मिळेल, तुम्हाला कार्याचा हा टप्पा कळेल आणि तुम्ही पूर्णपणे आज्ञाधारक व्हाल. अन्यथा, तुम्ही खरी आज्ञाधारकता प्राप्त करू शकणार नाही.

मागील:  त्रैक्य अस्तित्वात आहे का?

पुढील:  विजयाच्या कार्याचे अंतर्गत सत्य (३)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger